व्हेजिटेरियन ब्रेड स्टु

केडी's picture
केडी in पाककृती
13 Oct 2017 - 6:37 pm

Vegetarian Stew

साहित्य

१ मोठा कांदा, चिरून
८ ते १० लसूण पाकळ्या, चिरून
५ ते ६ हिरव्या मिरच्या, चिरून
१ मोठा टोमॅटो, चिरून
१ मोठा बटाटा, मोठे तुकडे करून
२ छोटे गाजर, तुकडे करून
१ कप मुशरूम, चिरून
१ कप, शिमला मिरची, चिरून [असल्यास हिरवी, लाल आणि पिवळी वापरावी]
१ कप बेबीकॉर्न, उभे चिरून
१ मूठ पालक, चिरून
१/२ कप मटार
२ तमालपत्र
१/२ चमचा हळद
१५ ते २० काळेमिरे, जाडसर वाटून
१ चमचा तेल
२ चमचे बटर
मीठ चवीनुसार
७ ते ८ ब्रेड स्लाईस
३ ते ४ कप गरम पाणी
कोथिंबीर बारीक चिरून

कृती
स्टु हा शब्द फ्रेंच शब्द "estuier" ह्यावरून आलाय. त्याचा शब्दशः अर्थ, झाकून असा होतो. स्टु चे बरेच प्रकार असतात, आणि त्यात पाणी, मास, भाज्या आणि इतर मसाले एकाच भाड्यात झाकून एकत्र शिजवले जातात.

सध्या पाऊस सुरूच आहे, एखाद्या पावसाळी संध्याकाळी, हा गरमागरम स्टु अगदी चार चांद लावतो.

ब्रेड च्या स्लाईस चे तुकडे करून, ब्रेड भिजेल एवढ्या पाण्यात भिजत ठेवा. एका जाड बुडाच्या पातेल्यात, तेल आणि बटर गरम करून घ्या. त्यात लसूण, मिरच्या घालून त्या परतून घ्या.

Step1  Step2

ह्यात बारीक चिरलेला पालक घालून ते अजून थोडा वेळ परतून घ्या. ह्यात चिरलेला कांदा घालून तो थोडा वेळ परतून घ्या. कांदा थोडा परतून झाला कि त्यात टोमॅटो टाकून मिश्रण अजून थोडं परतून घ्या.

Step3  Step4

आता पातेल्यात इतर भाज्या घालून त्या परतून घ्या [बटाटे, गाजर, शिमला मिरची, बेबीकॉर्न, मटार].

Step5  Step6

भाज्या तेलावर, मंद आचेवर परतून झाल्या कि त्यात हळद टाकून मिश्रण ढवळून घ्या. . पातेल्यात ३ ते ४ कप गरम पाणी टाकून, त्यात तमालपत्र टाकून, गॅस बारीक करा. पातेल्यावर झाकण ठेवून मंद आचेवर शिजू द्या.

Step7  Step8

ब्रेड च्या स्लाईसेस ची मिक्सर मधून बारीक पेस्ट करून घ्या. लागल्यास थोडं पाणी टाका.

Step9  Step10

भाज्या शिजत आल्या कि पातेल्यात हि ब्रेड ची पेस्ट टाकून, त्यात काळीमिरी पावडर टाकून मिश्रण ढवळून घ्या. अजून २ ते ५ मिनिटे झाकण ठेवून एक वाफ काढून घ्या.

Step11  Step12

चवीनुसार मीठ टाकून, वरून चिरलेली कोथिंबीर पेरून गरमागरम स्टु, खायला घ्या! सोबत हवं तर फ्रेंच ब्रेड चे थोडे बटर मध्ये भाजलेले तुकडे घ्या!

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

13 Oct 2017 - 7:48 pm | अत्रुप्त आत्मा

थंडीची चाहूल लावणारी पाक-क्रुती.

आहा! खासच..
नक्की करुन बघेन.

पद्मावति's picture

13 Oct 2017 - 10:47 pm | पद्मावति

क्लास!

एस's picture

13 Oct 2017 - 11:33 pm | एस

बादलीभर लाळ गळली!

बादवे तो फ्रेंच ब्रेड कसा बनवायचा?

फोटू खूपच सुंदर आलाय. पाकृ आवडली पण फक्त ते ब्रेडचं प्रकरण करू शकणार नाही. दुसरा उपाय सांगा. उदा. दाटणासाठी आपल्याकडील भाज्यांना बेसन, तांदूळपिठी लावली जाते तसं काहीतरी.

पगला गजोधर's picture

14 Oct 2017 - 11:35 am | पगला गजोधर

कुळीथ पिठी किंवा नाचणी सत्व

रेवती's picture

14 Oct 2017 - 1:09 am | रेवती

दाटपणासाठी असं वाचावं.

खाली पिरा ह्यांनी नारळाचा वापर करून इष्टु बनवलाय, तसं तुम्ही ब्रेड ऐवजी नारळाचे दूध वापरून बघा, नाहीतर कॉर्नफ्लार किंवा तांदळाचे पीठ (१ ते २ चमचे) गरम पाण्यात घोळवून मग ते वापरून बघा

पिलीयन रायडर's picture

14 Oct 2017 - 3:51 am | पिलीयन रायडर

stew

आजच करुन पाहिली. मुलाला सर्दी खोकला झालाय. म्हणून पटकन गरम गरम करायला आणि पोटभर होईल अशी मस्त पाकृ. केव्हापासून करायची होती, पण कधी नीट रेसेपी पाहिलेली नसल्याने केली नव्हती. तुमचा धागा पाहून कॉन्फिडन्स आला.

मी तेल खूप कमी घातलं, एक तमाल पत्र आणि दोन लवंगा घेतल्या. होत्या त्या सगळ्या भाज्या आणि दाटपणा येईल असं वाटलं म्हणून सालीसकट एका बटाट्याचे तुकडे घेतले. ह्यात अगदी थोडेसे पाणी घालून झाकण ठेवले. तोवर ओला नारळ + हाताशी होतीच म्हणून थोडी कोथिंबीर वाटून घेतली आणि भाज्यांवर घालून मिसळून घेतले. जर पाणी पाणी वाटले असते तर मी चमचाभर कॉर्न स्टार्च घालणार होते. पण भरपूर नारळ घातल्याने तसं काही झालं नाही. (मला खरं तर नारळाचे दूध वापरुन पहायचे होते. पण नव्हते हाताशी.)

मी हे एक ब्रेड बटरवर खरपूस भाजून त्या सोबत खाल्ले. केवळ लवंग, तमालपत्र, मिरपूड आणि मीठ असल्याने भाज्यांची चव अगदी सुंदर लागत होती.

एक झटपट पदार्थ सांगितल्याबद्दल धन्यवाद! फोटो नेहमीप्रमाणेच कातील. गॅसवर डोकावून पातेल्यात बघतोय असं वाटतं.

वाह, पिरा, मस्त फोटो. तुम्ही बनवला तो केरळी पद्धतीचा इष्टु. ओला नारळ होता, मग नारळाचे दूध करायचे की गरम पाणी आणि नारळाचा चव मिक्सर मधून फिरवून, गाळून? कोकोनट बेस चे सगळेच पदार्थ मला प्रचंड आवडतात!

तुमची पाकृ आणि फोटो देखील खूप छान.

पिलीयन रायडर's picture

14 Oct 2017 - 9:34 am | पिलीयन रायडर

तो इथे फ्रोझन असतो हो. फार काही अर्थ नसतो त्याला. विचार केला मी एक क्षण, पण मग सरळ तसाच वापरला. आणि मला नारळाचा चव आवडतो (टेक्श्चर वाईज) म्हणून तसंच वापरलं.

कोकोनट बेस चे सगळेच पदार्थ मला प्रचंड आवडतात!

सेम पिंच!

सेम सेम.. कोकोनट बेस्ड पदार्थ म्हणजे भारी..!!!! एक प्रकारचा रिफ्रेशिंग टच असतो त्या डिशेसना.

अ‍ॅटमॉस्फियर ६ - विमाननगर आणि सॅफ्रन - शास्त्री रोड येथे टॉम खा (हेच नांव का.?) हे सूप ट्राय करा. नक्की आवडेल.

केडीची पाकृ मस्त आणि पिराचा प्रयत्नही कौतुकस्पद.

त्रिकाया मधलं लाकसा सूप पण छान आहे, ट्राय कर एकदा, मला आवडते ते.

मोदक's picture

14 Oct 2017 - 7:50 pm | मोदक

भौ.. आपण घेतले होते ते .. इसरलास..?

सीफूड लाकसा सूप होते.

केडी's picture

15 Oct 2017 - 7:36 am | केडी

येस, विसरलो!

छान झालाय स्ट्यू. फोटू आवडला.

स्वाती दिनेश's picture

14 Oct 2017 - 5:30 pm | स्वाती दिनेश

पाकृ आणि फोटो दोन्ही मस्त!
पिराचा स्ट्यु ही छान!
स्वाती

सविता००१'s picture

15 Oct 2017 - 6:42 pm | सविता००१

मस्तच पाककृती आणि फोटो
पिरे... भन्नाट गं

सविता००१'s picture

15 Oct 2017 - 6:49 pm | सविता००१

अवियल च्या जवळ जाणारी आहे. अवियल पण वन डिश मील आहे. अगदीच वाटलं तर भात करतात त्याबरोबर.

स्पा's picture

15 Oct 2017 - 9:08 pm | स्पा

आम्हा ब्याचलरांना सहज करता येईल अशी
एक प्रयत्न करून पाहिला

१.ghgfh

२.fsfdf

३.fgdgf

केडी's picture

16 Oct 2017 - 9:08 am | केडी

क्या बात है! मस्त, फोटो सुद्धा छान!

इरसाल कार्टं's picture

21 Oct 2017 - 7:15 pm | इरसाल कार्टं

हिवाळ्यात करून बघण्यात यील. निमित्त म्हणून सर्दी होण्याची वाट पाहतो आहे.