ये अच्छी बात नही है! आवाज दाबू नका...

मार्मिक गोडसे's picture
मार्मिक गोडसे in राजकारण
22 Sep 2017 - 9:34 pm

ये हमारी चोरी किया हुवा पैसा वापिस आना चाहिये कि नही आना चाहिये ?... ये काला धन वापिस आना चाहिये?... ये चोर लुटेरोंसे एक एक रुपया वापिस लेना चाहिये?... इस रुपयोंपर जनता का अधिकार है कि नही है?... ये रुपया जनता के काम आना चाहिये? अरे एक बार...ये जो चोर लुटेरोंके पैसे विदेशी बँकोमे जमा है ना उतने भी रुपये हम ले आये ना.. तो भी हिन्दुस्थान के एक एक गरीब अदमीको मुफतमे १५ -२० लाख रुपया यू ही मिल जायेगा.. इतने रुपये है ये हमारे एमपी साहब कह रहे थे रेल्वे लाईन..ये काला धन वापीस आ जाय जहा चाहे वहा रेल्वे कर सकते हो.. ये लूट चलाई है..और बेशरम होकर कहते है.. सरकार आप चलाते हो और पुछते मोदी को... ये कैसे लाये? जिस दिन भारतीय जनता पार्टी को मौका मिलेगा.. एक एक पाई हिन्दुस्थान की वापीस लाई जाएगी और हिन्दुस्थान के गरीबोंके लिये काम लायी जायेगी... ये जनता के पैसे है, गरिब के पैसे है... हमारा किसान खेत मे मजदूरी करता है, उससे निकला हुआ धन है.. उस धन पर हिन्दुस्थान का अधिकार है ,हिन्दुस्थान के कोटी कोटी गरिबोंका अधिकार है, और उनको वो धन मिलना चाहिये.....

तुमच्यावर विश्वास ठेवून जनतेने तुम्हाला निवडून दिले.. तेही प्रचंड बहुमताने.. सत्तेचा गाडा सुरळीत चालवण्यासठी कुठलेही कडबोळ्याचे लोढने तुमच्या गळ्यात अडकवले नाही. विदेशातला भारतीय काळा पैसा आणणे तुम्हाला जमले नाही.. एकतर त्या विषयाचा अभ्यास नाही.. पक्षातील जाणकारांचे ऐकायचे नाही.. बिनडोक दोन चार लोकांना बरोबर घेवून असा काळा पैसा परत येत असतो काय? सत्तेत येऊन दोन वर्ष उलटली... एक फुटी कवडीही विदेशातून तुम्हाला आणता आली नाही..(आणता येणार नाही हे पहिल्यापासूनच सांगत होतो) थोड्याच दिवसात जनतेला कळून चुकले ... अरे ह्याला देशाचा गाडा काय , साधी बैलगाडीही हाकलता येत नाही. तुम्हाला टेंशन आलं... आणि मग साक्षात्कार झाला ,अरे देशातील काळा पैसाच येथील अर्थव्यवस्थेला कमकुवत बनवत आहे...मग तुमच्या डोक्यात एका बिनडोकाने (अशी लोकं तुम्हालाच सापडू शकतात) त्याच्या डोक्यातील अर्थक्रांतीचा कीडा तुमच्या डोक्यात हळूच सोडला...विदेशातील काळा पैसा आणण्यात आलेल्या अपयशामुळे तुमच्या डोक्यात किडे पडायची वेळ आली होती..अर्थक्रांतीचा हा कीडा तुमच्या डोक्यात फिट्ट बसला.. पुन्हा एकदा बिनडोक निर्णय घ्यायला तुम्ही सज्ज झालात.

कुठलाही मागचा पुढचा विचार न करता(कधी करता?) ८ नोव्हें. २०१६ ला नोटाबंदीची घोषणा केली. काळा पैसा,खोट्या नोटा, दहशतवाद नष्ट करण्याचं ब्रम्हास्त्र सोडल्याचे तुम्ही घोषित केले. दोन दिवसात तुम्हाला कळाले, की ते ब्रम्हास्त्र नसून बुमरँग आहे. नोटा बदलायला लोकांना बँकांसमोर रांगा लावाव्या लागल्या, त्यात अनेक जणांचे प्राण गेले. लोकांचा विरोध वाढत गेला... ३१ डिसेंबरपर्यंत सगळे सुरळीत झाले नाही तर तुम्ही सांगाल त्या चौकात मी शिक्षा भोगायला तयार आहे असे जनतेला भावनीक आवाहन केले. (मी तर पोकळ बांबू घेवून तयारच होतो). पण कसचं काय , ३१ तारखेनंतरही गोंधळ चालूच होता आणि तुम्ही जनतेपासून तोड लपवत होता.
आजही शेतकरी, कष्टकरी ज्यांचे हातावर पोट आहे त्यांचे नोटाबंदीमुळे अतोनात हाल होत आहेत. जुन्या बाद केलेल्या जवळ जवळ सगळ्या नोटा परत आल्या हे RBI ने घोषित केले व नोटाबंदी फेल गेली ह्यावर शिक्कामोर्तब झाले.नोटाबंदीमुळे GDP ग्रोथ घटणार(प्रत्यक्षात तसंच झालं) असं बोलणार्‍यांची तुम्ही खिल्ली उडवत होता. नोटाबंदी विरोधकांना 'नोटाबंदीभक्त' देशद्रोही ठरवू लागले . विरोधकांचा आवाज दाबला जात आहे. सत्य स्विकारण्याऐवजी तुम्ही त्याकडे काणाडोळा करत आहात. ये अच्छी बात नही है!

प्रतिक्रिया

सुबोध खरे's picture

28 Sep 2017 - 8:18 pm | सुबोध खरे

India Sees 55% Increase In Digital Transactions In A Year; Mobile Banking Jumps 122%
http://special.ndtv.com/cashless-bano-india-14/news-detail/india-sees-55...

स्पेसिफिक उत्तर द्या. रांगेत लोकं मेली ती मनरेगाच्या उन्हात मेली त्याच प्रकारे का वेगळ्या प्रकारे?
=================
तोपर्यंत मी अर्थव्यवस्था कॅशलेस फेल जाऊन कवड्या, गजगे वापरून चालू लागली आहे हे मान्य करतो.

पैसा's picture

29 Sep 2017 - 11:16 am | पैसा

>≥>>>>>>>>>नोटबंदीची उद्दिष्टांची निगेटिव लिस्ट तुम्हाला कुठं सापडली? आम्हालाही द्या. "काळे पैसे परत यावेत आणि कॅशयुक्त व्यवहारांना ऊत यावा" असं विधान कोण्या माणसानं नोटबंदीच्या आरंभी केलं? बायको केल्यादिवशी तिला मूल होणार आहे असं तोंडानं म्हटलं नाही नि नंतर मूल झाल्यावर पेढे वाटले म्हणजे आकस्मिक घटनेचं निर्लज्ज श्रेय लाटलं असं होतं का?≥>>>>>>>>>>>>

आगायायाया! _/\_

=)) =)) =))=))

मार्मिक गोडसे's picture

29 Sep 2017 - 8:16 pm | मार्मिक गोडसे

नोटबंदीची उद्दिष्टांची निगेटिव लिस्ट तुम्हाला कुठं सापडली? आम्हालाही द्या.

औषध कंपन्या बाजारात औषध आणण्यापुर्वी त्या औषधाच्या अनेक चाचण्या घेते व सुरक्षीत मात्रेचे औषध बाजारात आणते. चाचण्यांमध्ये आढळलेले साइड इफेक्ट औषधाच्या माहितीपत्रकात दिले जाते. म्हणजे औषध कंपनी आपल्यापासून औषधाचे दुष्परिणाम लपवत नाही. परंतू इथे ह्या नीम हकीमला आपण काय औषध देतोय ,ते लागू पडेल की नाही हेच माहीत नव्ह्ते (लागू पडले तर नाहीच) औषधाच्या साइड इफेक्टचा त्याला पत्ताच नव्हता. परंतू औषधाचे साइड इफेक्ट झटपट दिसायला लागले, पेशंट गडबडा लोळू लागला, डोके आपटू लागला, पेशंटने थोडा वायू सारला काय ह्या नीम हकीमचा आनंद गगनात मावेनासा झाला, मला वायूच बाहेर काढायचा होता असं म्हणू लागला. बद्धकोष्टता दूर करायची होती ती झालीच नाही. आता तुम्हाला हवी असलेली लिस्ट ह्या नीम हकीमकडे मिळू शकेल.

सुबोध खरे's picture

29 Sep 2017 - 8:21 pm | सुबोध खरे

काहीही.

ट्रेड मार्क's picture

30 Sep 2017 - 12:11 am | ट्रेड मार्क

तुम्हाला बद्धकोष्ठ झालाय तर! मग ठीक आहे, पोट साफ झालं नाही की असं होतं. एनिमा दिला तर कदाचित फायदा होईल.

नोटाबंदीमूळे ज्यांचा जीव गेला त्याचा जाब विचारणे म्हणजे फालतू?

भारतात ५० दिवसात ५०*३०००० = १५,००,००० लोक मरतात. त्यातले १५० मंजे किती?
===========================
जाब विचारायची नविन हौस लागली आहे का? आतापावेतो कशाकशाने किती किती लोक मेले याचा जाब विचारावा याचा बराच मोठा हिशेब करता येईल.

गामा पैलवान's picture

27 Sep 2017 - 9:59 pm | गामा पैलवान

पगला गजोधर,

तुमचा इथला संदेश वाचला. माझी मतं सांगतो.

१.

"तेलगी सारख्या गुन्हेगारांनी व ISI ने बनावट नोटा छापल्या, त्याही अगदी बेमालूमपणे की, असल और नकल मे फरक ना कर पाओ..."

आयेसाय बनावट नोटा छापते. तेलगी खऱ्या नोटा अवैधपणे छापायचा. दोन्ही अंतिमत: भारतास नुकसानकारक आहेत.

२.

मग आता असा प्रश्न आहे की, नव्या छापलेल्या नोटा या बनावटीकरणापासून वाचू शकतात का ? नै म्हणजे काही स्पेशल फिचर, जसे की चिप वैगरे ? काही आहे का या नोटांमध्ये ??

बनावटीकरणापासून कोणतंही चलन मुक्त नाही.

३.

याबाबतीत भाजप सायबर सेलकडून, तुम्हाला काहीतरी विश्वासहार्य बातमी, आतल्या गोटातून मिळाली असेलच की !

मिळाली तरी तुम्हांस सांगणार नाही.

आ.न.,
-गा.पै.

पगला गजोधर's picture

28 Sep 2017 - 8:00 am | पगला गजोधर

बनावटीकरणापासून कोणतंही चलन मुक्त नाही.

एका बाजूला म्हणता, तेलगी/ISI/तत्सम शक्तींनी अर्थव्यवस्थेत घुसवलेल्या नोटा, निष्प्रभ करण्यासाठी डीमॉ केलं.

दुसऱ्या बाजूला असंही म्हणता की, बनावटीकरणापासून कोणतंही चलन मुक्त नाही (अगदी नवे चलनही...)

अरे भाई कहना क्या चाहते हो ????

गामा पैलवान's picture

28 Sep 2017 - 11:55 am | गामा पैलवान

प.ग.,

त्याचं काय आहे की जेवलं नाही तर माणूस भुकेने तडफडून मारतो. आणि जेवलं तर म्हातारा होऊन मरतो. जेवलं तरी पंचाईत, नाही जेवलं तरी पंचाईत. निसर्ग कहना क्या चाहता है भाई!

आ.न.,
-गा.पै.

नव्या छापलेल्या नोटा या बनावटीकरणापासून वाचू शकतात का ?
विकिपेडिया -

Counterfeiting of the currency of the United States is widely attempted. According to the United States Department of Treasury, an estimated $70 million in counterfeit bills are in circulation, or approximately 1 note in counterfeits for every 10,000 in genuine currency, with an upper bound of $200 million counterfeit, or 1 counterfeit per 4,000 genuine notes.[1][2] However, these numbers are based on annual seizure rates on counterfeiting, and the actual stock of counterfeit money is uncertain because some counterfeit notes successfully circulate for a few transactions.

४०००:१ हे प्रमाण ना के बराबर आहे कारण ही एक नोट बनवण्यातला, त्याला डिस्पोज करण्यात नेट प्रॉफीट अजून कमी असेल.
भारतात हे प्रमाण २५०:१ असे राहिले आहे.
=======================================
किंमत किती मोजायची यावर हे अवलंबून आहे.

गामा पैलवान's picture

27 Sep 2017 - 10:06 pm | गामा पैलवान

खरे डॉक्टर,

तेलगी नी खोट्या नोटा छापल्या याचा काही संदर्भ देता येईल का?

तेलगीने खऱ्या नोटा छापल्या हे माझं विधान आहे. त्यासंबंधी इथे एक लेख आहे : http://www.boloji.com/index.cfm?md=Content&sd=Articles&ArticleID=5030

त्यात शेवटी नाशिकच्या मुद्रणालयाच्या काही कर्मचाऱ्यांकडे परदेशी चलन आढळल्याचं म्हंटलं आहे. याचा अर्थ देशी चलन छापणंही तेलगीस सुलभ असावं असा मी काढला आहे. शिवाय मला आठवतं त्याप्रमाणे या प्रकरणाच्या सुरुवातीस छापे घातले तेव्हा देशी चलन सापडलं होतं. मोठ्या प्रमाणावर मुद्रांक नंतर सापडले आणि या घोटाळ्याची व्याप्ती प्रचंड वाढली.

बडे हस्ती गुंतलेले असल्याने कोणीच तोंड उचकटंत नाहीये. पण हा घोटाळा केवळ तेलगीच्या आवाक्यातला नाही हे कोणालाही सहज कळेल.

आ.न.,
-गा.पै.

जाताजाता : यशवंत सिन्हा जास्त वचवच करू लागला तर मोदी त्याला आरामात खोपच्यात घेऊ शकतात. फक्त तेलगी एव्हढा शब्द उच्चारायचा अवकाश, गडी मऊ सुतासारखा सरळ येईल.

रामपुरी's picture

27 Sep 2017 - 10:41 pm | रामपुरी

"मग तुमच्या डोक्यात एका बिनडोकाने (अशी लोकं तुम्हालाच सापडू शकतात) त्याच्या डोक्यातील कीडा तुमच्या डोक्यात हळूच सोडला.. पुन्हा एकदा बिनडोक निर्णय घ्यायला तुम्ही सज्ज झालात"
आणि म्हणून जिलबी टाकली काय?

पगला गजोधर's picture

28 Sep 2017 - 2:08 pm | पगला गजोधर

गोडसे काही प्रश्न
१. निरोगी व व्यवस्थित चाललेल्या अर्थव्यवस्थेला बेल आउट पॅकेज द्यावे लागते का ?
२. भारतीय अर्थव्यवस्थेला बेल आउट पॅकेज, देण्यासंधार्भात सध्या काही हालचाल दिसत आहे का ? काही बातम्या त्या संधार्भात दिसत आहे का माध्यमात ?
३. क्र २ दोन चे उत्तर होकारार्थी असेल, तर भारतीय अर्थव्यवस्थेला बेल आउट पॅकेज, देण्याची वेळ का यावी ?
नोटबंदी व GST यांचा काही रोल .....

सुखीमाणूस's picture

28 Sep 2017 - 10:40 pm | सुखीमाणूस

मतदानाच्या दिवशी, आमच्याकडे कामाला येणार्या मावशी, सन्ध्याकाळीच मत देतात पैसे मिळाले की.
त्यान्च्या भागातली स्थानिक लीडर सान्गते कोणाला मत द्यायचे ते....
गावाहुन ट्रक भरुन माणसे आणून बोगस मतदान केले जाते
ही सगळी ६०/७० वर्षातली घाण जर नोटाबन्दीमुळे कमी होणार असेल तर मस्तच होइल
गरीबाना कळत नाही की ते अशिक्शित व गरीब रहाण्यात ६० वर्ष राज्य केलेल्या पक्शाचा स्वार्थ साधला जातो त्यान्ची vote bank सुरक्शित रहाते.
हे सगळे बदलतय म्हणुन तर हा गळा काढणे चालू आहे का?

सुखीमाणूस's picture

28 Sep 2017 - 11:10 pm | सुखीमाणूस

तुमचे लेखाचे शीर्षक किवा जागा जरा चुकलेच...
आवाज दाबला जातोय म्हणताय आणि तुम्ही यथेच्छ शिव्या घालताय मोदीना आणि त्यान्च्या निर्णयाना
हा लेख अजुन public आहे म्हणजे काही आवाज दाबला जात नाहीये. आणि सगळे विरोधक देखिल मोदिन्विरोधात पुरेशी बोम्बाबोम्ब करतायत

किवा मिपा फारसे वाचले जात नसावे. त्यामुळे आपली त(म)ळमळ लोकान्पर्यन्त पोचणार कशी? किमानपक्शी मोदिना कळायला हवे ना की त्यान्च्या आजुबाजुला बिन डोक लोक भरली असुन त्यानी option शोधायला हवा.

हममम कोण बर जास्त मुर्ख? भारतीय जनता की त्यानी आता/यापुर्वी निवडून दिलेले लोक?

तुमचे लेखाचे शीर्षक किवा जागा जरा चुकलेच...
आवाज दाबला जातोय म्हणताय आणि तुम्ही यथेच्छ शिव्या घालताय मोदीना आणि त्यान्च्या निर्णयाना

अगदी वरच्या भागातच दोष!

ट्रेड मार्क's picture

29 Sep 2017 - 2:22 am | ट्रेड मार्क

मागो इथे अगदी अभ्यास नाही, डोक्यात किडे पडलेत, बिनडोक ई विशेषणे वापरत आहेत. आवाज करणारेच आवाज दाबला जातोय असा फुकाचा आरडाओरडा करत आहेत. काँग्रेसमधेल नेत्यांपासून केजरीपर्यंत आणि MSM पासून ते मोदींना विरोध करणाऱ्या सामान्य लोकांपर्यंत सगळ्यांनी सोशल मेडिया, प्रिंट मेडिया, टीव्ही, सार्वजनिक सभा, संमेल्लन ई जमेल तिथे वाट्टेल तश्या शिव्या दिल्या आहेत. एवढंच काय त्यांच्या आईपासून ते बायकोपर्यंत नको नको ते बोलले आहेत. त्याचं समर्थनही FoE म्हणून करतात आणि वर आवाज दाबला जातोय हे ओरडत बसतात.

या कोणावरही मोदींवर वैयक्तिक टीका केली म्हणून कारवाई झालेली दाखवून द्यावे. मात्र याच लोकांना "भक्तां"पैकी कोणी साधा विरोध जरी केला तरी मात्र लगेच आमच्या FoE वर गदा आणली जातेय म्हणून ओरडतात. आम्ही तटस्थ आहोत अश्या वल्गना करणारे लोक मोदींच्या बोलण्यातले एक/ दोन शब्द घेऊन, त्यांचा संदर्भ लक्षात न घेता वाट्टेल ते अर्थ लावतात. पण राहुल गांधी, मणिशंकर अय्यर, दिग्विजय सिंग, केजरीवाल या सारख्यांचे सरळ सरळ अपमान करणारे वाक्यच नव्हे तर परिच्छेद, धमक्या हे मात्र नजरेआड करतात.

नुसते मनमोहन सिंग किती हुशार याचे गोडवे गेले जातात पण १० वर्षांच्या काळात त्या हुशारीचा त्यांनी किती उपयोग केला? सोनिया आणि राहुल असे किती शिकलेले आहेत आणि असा त्यांना काय अनुभव आहे की देशाच्या पंतप्रधानाने त्यांच्या सगळ्या आज्ञा बिनशर्त मानाव्यात. त्यावेळेला या ओरडणाऱ्यांपैकी कोणी किती आक्षेप घेतला?

तुम्हाला फक्त सिलेक्टिव्ह गोष्टी दिसतात का? ममो सिंगानी मग यशवंत सिंगांनी नोटबंदीचा आणि जीएसटी चा विरोध केला. याचा एवढा गवगवा केलात. पण वर्ल्ड बँकेचा नोटबंदीबद्दलचा रिपोर्ट, वर्ल्ड बँकेच्या बँकेच्या अध्यक्षांनी भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल केलेले हे विधान, मॉर्गन स्टॅन्लेचा रिपोर्ट या आणि अश्या संस्थांनी आणि व्यक्तींनी सांगितलेले मात्र दिसत नाही.

उगाच एखाद्याचा द्वेष करायचा म्हणून ती व्यक्ती जे करेल त्याला नावं ठेवायची हेच चालू आहे ना? जीडीपी कमी झाला तुम्हाला किंवा मिपाकरांपैकी किती जणांना काय त्रास होतोय ते पॉईंटवाईज सांगा बघू. नोटबंदीनी काही काळ त्रास होणार हे गृहीतच होतं, आता काय त्रास होतोय ते सांगा. जीएसटी मुळे काय त्रास होतोय ते सांगा. हे मी वैयक्तिक तुम्हाला काय त्रास झाला हे विचारतोय. उगाच गरिबांचे हाल चाललेत वगैरे गोष्टी सांगू नका.

स्रुजा's picture

29 Sep 2017 - 3:12 am | स्रुजा

+१११

डिमॉनेटायझेशन च्या नावाने ओरडणार्‍या सगळ्यांना मला विचारावंसं वाटतं की डिमॉ ने काय करायला हवं होतं म्हणजे ती यशस्वी झाली असं म्हणता आलं असतं? नोटा बंद झाल्या नाहेत का? झाल्या. नवीन नोटा आल्या नाहीत का? आल्या. हॉस्पिटल आणि तत्सम जागांवर पहिले ५० दिवस जुन्या नोटा स्विकारायचा आदेश नव्हता का? होता. बाहेरुन आलेल्या भारतीय नागरिकांना मुदतवाढ मिळाली नाही का? मिळाली. डिजिटल व्यवहारांसाठी यु पी आय, रुपे कार्ड, पेटी एम (आता हे वादग्रस्त आहे पण तरी, ) क्रेडिट कार्डस, आधीच आस्तित्वात असलेले ऑनलाईन बँकिंग सारखे पर्याय उपलब्ध नव्हते का? तर होते. मग फक्त तुम्हाला न विचारता केलं म्हणुन एवढा राग आलाय का?

आपली अर्थव्यवस्था जुनाट आहे - ती बदलायची असेल तर थोडे धाडसी प्रयोग करायलाच हवे होते. जो पैसा बँकेत जमा झाला तो काळ्याचा पांढरा झाल - पण तो बँकेत जमा झाला ना !! इजंट दॅट द पॉईंट? काळा पैसा काय वेगळा असतो? सरकारला ज्यावर कर मिळत नाही तो पैसा काळा. बँकांमध्ये जमा झाल्यावर तो कराच्या मर्यादेत आला ना. कॅशलेस ईकॉनॉमी चे अनेक फायदे आहेत - मुख्य फायदा म्हणजे सरकारला खेळता पैसा मिळतो आणि पायाभुत सुविधांमध्ये वगैरे वापरता येतो. आता अशा सुविधा आणि यानिमित्ताने होणारे परिणाम एका रात्रीतुन काय दिसणार? त्याला वेळ जावा लागेल.

बरेच लोकं हे ऑनलाईन पेमेंट गेटवे कडे संशयित नजरेने बघतात, तसे व्यवहार करणं त्यांना सुरक्ष्झित वाटत नाही पण ही भावना कमी करायची असेल तर कुठे तरी सुरुवात करायलाच हवी. ती आजवर आपणहुन झाली नाही यातच काय ते आलं.

ज्यांच्याकडे स्मार्ट फोन्स आहेत, कार्ड्स आहेत, गाड्या आहेत त्यांना या डिमॉ ने एवढा काय त्रास झाला ते मला अजुन ही कळत नाहीये. मी त्याच सुमारास भारतात जाऊन आले होते - एकदा फक्त बँकेत गेले - जुन्या नोटा जमा करयला. त्या व्यतिरिक्त जेमतेम १०००-२००० रुपये घेऊन फिरले आणि रस्त्यावरचा नारळ पाणी वाला सोडला तर पाणी पुरीवाल्याने सुद्धा कार्ड घेतलं. नेमकं काय खुपतंय??

रविकिरण फडके's picture

29 Sep 2017 - 7:48 am | रविकिरण फडके

सुजा मॅम,
तुम्ही म्हणता, डिमॉ ने काय करायला हवं होतं म्हणजे ती यशस्वी झाली असं म्हणता आलं असतं?

माझा प्रश्न डिमॉ योग्य होते की नाही हा नाहीच. हा प्रश्न विचारण्याएवढा माझा अधिकार नाही. ह्या प्रश्नाचे काही ठोस उत्तर असू शकेल का ह्याचीही शंका आहे - जसे, नर्मदा धरण अंतिमतः फायद्याचे की तोट्याचे हा, किंवा असेच काही अन्य, प्रश्न.

माझा सवाल हा आहे की तडकाफडकी (overnight) नोटा रद्द करून काय साधले? रद्द केलेल्यात ज्या काही 'काळ्या नोटा' होत्या त्या बँकेत परत आल्याच. त्या येणार नाहीत असे मानण्याएवढा भाबडेपणा (naivete) मोदींकडे असेल ह्यावर मी तरी विश्वास ठेवणार नाही. (असेल तर कठीण आहे!)

बाकी उद्दिष्टे काय होती (मुळात सर्व उद्दिष्टे लोकांना सांगितली होती की काही गुप्तही होती हा पुन्हा वेगळाच issue, त्यात आपण जाऊ नये हे बरे) आणि त्यातील किती साद्ध्य झाली, हा विषय नाही.

(फक्त काळ्या पैशांचा विचार करता) मुदत देऊन हे डिमॉ करता आले नसते का, आणि नसल्यास का नाही, ह्या प्रश्नाचे मला समाधानकारक उत्तर मिळालेले नाही एवढेच मी नोंदवू इच्छितो.

हा प्रश्न इतका महत्वाचा का?

तुम्ही लिहिता, तुम्हाला ह्या काळात काही त्रास झाला नाही. मान्य, मी मुंबईत होतो, मलाही नाही झाला. पण मुंबई पुणे म्हणजे भारत नव्हे. माझे नातेवाईक लहान शहरात / गावात राहतात. तिथे मोठ्या बँका नाहीत. जिल्हा मध्यवर्ती बँकांना नोटा बदलून द्यायची परवानगी नाही. अकाउंटला पैसे असून काढता येत नाहीत कारण नवीन नोटांचा पुरवठा नाही. नोटबंदीमुळे जुन्या नोटा कुणी घेत नाहीत. असे व्यवहार ठप्प झाले. त्यातही, गावातल्या गावात कसेतरी भागून जात होते पण ज्यांना प्रवास करावा लागत होता अशांचे हाल जास्त.

ही जी प्रचंड किंमत समाजाने मोजली ती भरमसाठ नव्हती का? सवाल हा आहे. बाकी, ज्याअर्थी दंगली वगैरे काही झाल्या नाहीत त्याअर्थी लोकांना फारसा त्रासही झाला नाही असे argument असल्यास, माझे त्यावर काहीही म्हणणे नाही.

या प्रतिसादातल्या भाषेपासून धागाकर्त्याने मतप्रदर्शनाची सुयोग्य भाषा म्हणजे काय ते शिकावे ही विनंती.
==================================================================================

ह्या प्रश्नाचे काही ठोस उत्तर असू शकेल का ह्याचीही शंका आहे

प्रत्येक निर्णयाचं अध्ययन खोलात जाऊन केलं जातं. सर्व पैलू पाहिले जातात. शासनाच्या निर्णयप्रणालीला खरे नाही उतरले तर कोणत्याही निर्णयाची अंमलबजावणी होत नाही. निर्णयांना विरोधक असणे वेगळे आणि निर्णय चूक असणे वेगळे. धरणांच्या बाबतीत प्रगत देशांत वार्षिक पावसाच्या २.५ पट (अर्थातच मागचे धरून) पाणी साठवलेले असते. भारतात ०.०६ पट. विजेच्या व्हेरियेबल कॉस्टच्या (फिक्स्ड कॉस्टच खूप असते ते असो) ३% फक्त पाण्याची किंमत असली तरी आपले विजेचे कारखाने फक्त पाणी नाही या कारणाने ६-६ महिने बंद असतात.
या जगात दोन परस्परविरोधी मतप्रवाह आहेतः
पहिला:
१. निसर्गात ढवळाढवळ करायची नाही.
२. खेड्याकडे चला
३. साधे जगावे
दुसरा:
१. मनुष्याच्या आधुनिक अपेक्षांप्रमाणे ठरलेल्या गरजांची आपूर्ती करावी.
२. त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करावा.
शासकीय निर्णय हे शक्यतो दोन्ही भूमिकांच्या मेरिट्स , डिमेरिट्स ना लक्षात घेऊन घेतले जातात.
======================
समजा तुमचे अपत्य एक यशस्वी डॉक्टर झाले तेव्हा तुम्हाला ते एक यशस्वी राजदूत झाले असते तर श्रेयस्कर असते असे दु:ख असणे कितपत सुयोग्य आहे?

arunjoshi123's picture

29 Sep 2017 - 11:35 am | arunjoshi123

तडकाफडकी (overnight) नोटा रद्द करून काय साधले?

संभ्रम नको म्हणून काही गोष्टी:
१.नोटछपाई सितंबर २०१६ पासून सुरु झाली.
२. नोट डिझाईन त्यापूर्वी ६ महिने सुरु झाली.
३. नोटबंदी कशी करावी हे किमान ३० दिवस तरी ठरवले असेल.
४. करावी कि नाही हे देखिल ३० दिवसात ठरवले असेल.
तर या अर्थानं तडकाफडकी म्हणता येत नाही.
==========================================
आता दुसरा भागः
प्रगत देशांत १००००:१ असं नकली नोटांचं प्रमाण आहे. आपल्याकडे २५०:१ असं आहे. विदेशात काळी अर्थव्यवस्था ५-७% आहे. आपल्याकडे ३०% ते ७५% असल्याचे अनुमान "होते". तिकडे भ्रष्टाचार कमी आहे, आपण त्यात अग्रगण्य आहोत. तिकडे भ्रश्टाचार व्यक्तिगत असतो, आपल्याकडे संस्थागत आहे. म्हणून इकडे जुगाड शोधणे आणि सरकारचे उपाय तोंडावर हाणून पाडणे सोपे आहे. म्हणून युरो प्रमाणे आपण ४ दिवस अगोदर सांगून नंतर सावकाश नोटबंदी केली असती तर ती अजूनच फेल असती.

रद्द केलेल्यात ज्या काही 'काळ्या नोटा' होत्या त्या बँकेत परत आल्याच. त्या येणार नाहीत असे मानण्याएवढा भाबडेपणा (naivete) मोदींकडे असेल ह्यावर मी तरी विश्वास ठेवणार नाही. (असेल तर कठीण आहे!)

हे कदाचित बरोबर आहे. मोदी गुंतवणूकदारांसमोर नेहमी स्वतःला ममोंपेक्षा फार कमी पॉप्यूलिस्ट म्हणत असले तरी वास्तविक तसं म्हणता येणार नाही. त्यांची बनिया कंस्टिट्यूयन्सी फार दुखावली जाऊ नये म्हणून नोटा परत करण्याचे अनेक मार्ग मोकळे ठेवले होते. फार कमी मोठ्या माशांना सरकारनं आयडेंटीफाय केलं आहे.
======================
पण काळ्या नोटा आणि काळी संपत्ती या दोन भिन्न संकल्पना आहेत. काळ्या नोटा ह्या टीप ऑफ द आईसबर्ग आहेत. त्याखालची काळी संपत्ती नामोहरम करण्यासाठी सरकारने उचललेली इतर १०-१५ पावले स्तुत्य आहेत. काहींच्या बाबतीत आतापर्यंतचं पचलं असलं तरी पुढचा मार्ग दुस्तर करून ठेवला आहे.

शब्दबम्बाळ's picture

30 Sep 2017 - 1:26 am | शब्दबम्बाळ

भारीच लॉजिक!
आपण नोटबंदीच्या संपूर्ण कालखंडात भारतात होतात का?
एका माणसाला बँकेतून रोज किती पैसे काढण्याची मुभा होती आपणास माहिती आहे का? नियम कितीदा बदलले गेले त्याने "तुम्हाला" काहीतरी त्रास झाला का?
स्वतःचे कष्टाचे पैसे बँकेत भरायला "सामान्य" लोकांना किती हेलपाटे मारायला लागले याची काही कल्पना आहे का?

भारताचे एकूण किती "वर्किंग अवर्स" वाया गेले याचा हिशोब आहे का? अमेरिकेत ग्रहण होत तेव्हा "केवळ तेवढ्या कालावधीत" लोक काम करणार नाहीत त्यामुळे $700 million च नुकसान सोसावं लागेल असा अंदाज वर्तवला गेला होता.
भारतात ५०+ दिवस करोडो लोक रांगांमध्ये उभे होते... किती नुकसान झालं असेल मोजायला घेतलं तर?

नोटबंदी घोषणा झाली तेव्हा मलाही चांगले काहीतरी होईल वाटले होते पण अत्यंत गचाळपणे कारभार केला गेला!
तुम्हाला फक्त स्मार्टफोन वाल्यांची काळजी असेल तर बोलून काही फायदा नाही पण जरा इतरांचं उदाहरण देतो.
नोव्हेंबर डिसेम्बर मध्ये बरीच लग्ने होती त्यात बॅंडवाले असतातच, आता झाला असं कि लागोपाठ कार्यक्रमाच्या तारखा होत्या त्यामुळे त्यांना प्रवास देखील करायचा होता. पण जर प्रवास करायचा असेल तर खर्च होणारच, याशिवाय बँडच्या प्रत्येक माणसाला पगार द्यावा लागणार! ज्यांच्या घरी लग्न आहे त्यांनी बँडप्रमुखाच्या खात्यात पैसे जरी जमा केले तरी रांगेत जाऊन उभे कधी राहणार? किती पैसे काढणार? कोणाकोणाला देणार? याशिवाय त्यांच्याकडे डेबिट कार्ड वगैरे नसल्यावर अकौंट मध्ये पैसे असले तरी आजूबाजूचे जाणंयेण्याच्या रोखीचे व्यवहार करणार कसे? हे आणि अनेक प्रश्न त्यांना होते. आणि कार्यक्रम सोडून स्वतःचे नुकसान करून रांगेत उभे राहणे देखील परवडणारे नव्हते. किती गावांमध्ये ATM मशीन आहे ते पण बघा एकदा. अशी अनेक उदाहरणे मिळतील जर दुसऱ्या बाजूचा विचार करायची इच्छा असेल तर.
नोटबंदीच्या धाग्यात देखील बरीच चर्चा झालेली आहे... त्यामुळे उगीच अजून उदाहरणे देत नाही.

अमेरिकेत ग्रहण होत तेव्हा "केवळ तेवढ्या कालावधीत" लोक काम करणार नाहीत त्यामुळे $700 million च नुकसान सोसावं लागेल असा अंदाज वर्तवला गेला होता.

ग्रहण ही अवकाशात होणारी एक तद्दन रटाळ, फालतू गोष्ट आहे. अवकाशातील चमत्कारिक गोष्टींबद्दल अमेरिकन लोकांचा रस पाहता तिथे किमान ७ ट्रिलियन डॉलरची स्पेस ऑब्झर्वेशन इकॉनॉमी संभव असावी. असं दिसतंय.

नोटबंदीच्या संपूर्ण कालखंडात

कालखंड शब्द वापरायला ५० दिवस पुरेसे आहेत काय?

थॉर माणूस's picture

4 Oct 2017 - 5:13 am | थॉर माणूस

कालखंड = period = an amount of time

त्यामुळे हा शब्द वापरण्यास हरकत नसावी.

शब्दबम्बाळ's picture

5 Oct 2017 - 3:40 am | शब्दबम्बाळ

तुम्हाला जो आवडता शब्द असेल तो लावून घ्या तिथे!
आम्रखंड आवडतो का?
मुद्दे नसले कि असं सैरभैर टायपायला होत असेल नाही का? :D

मुद्दे नसले कि असं सैरभैर टायपायला होत असेल नाही का?

असं काही नाही.

भारताचे एकूण किती "वर्किंग अवर्स" वाया गेले याचा हिशोब आहे का?

मान्य. टोटली अ‍ॅग्रीड. एकतर खिशात पैसे नाहीत वर अहर्निश रांगेत थांबायचं, त्यामुळे :
१. देशावरचे लोकसंख्या वाढीचे दडपण या काळात कमी झाले असणार. या कामासाठी वापरले जाणारे तास रांगेत वाया गेले.
२. लोकांनी दारू पिली नसणार, म्हणून त्यांचे आरोग्य सुधारले असणार.
३. प्रवास केला नसणार, म्हणून अपघातांची संख्या कमी झाली असणार.
४. खायला कमी मिळाले असणार, म्हणून पोटाचे आजार कमी झाले असणार.
५. चैनीच्या वस्तू, म्हणजे घड्याळे, सोने, बूट, सूट घेणे थांबवले असणार, आणि पैशांचा सदुपयोग झाला असणार.
६. ५० दिवस पैसे खर्च न केल्याने पैशांची बचत झाली असणार.
७. लोकांना आपण किती कमी पैशांत जगू शकतो ते कळले असणार.
८. लोकांची उद्यासाठीच्या एखाद्या महामंदीसाठी मानसिकता तयार होऊन जाणार.
९. बँकाचा तोच स्टाफ एरवी किती रिकामा असतो याची कल्पना देशाला आली. हाच प्रकार सर्व सेक्टर्समधे असणार.
१०. लोकांना आपली बँक, ब्रँच कुठे आहे ते माहीत झाले.
११. लाईनमधे थांबल्यामुळे बर्‍याच लोकांना मित्र, काहींना जीवनसाथी मिळाले.
१२. एरवी तशी संधी न मिळणार्‍या तरुण पोरांना, पोरींना रात्री उशिरा फिरायला मिळालं.
१३. लाईनमधे २-३ दा १-२ तास थांबलं तरी ५० दिवस रोज ४-५ तास थांबल्याचा श्रमपरिहार मिळाला.
१४ ८ तारखेपर्यंत नोव्हेंबरचे सारे मुख्य खर्च झाले होते आणि डिसेंबरपर्यंत बर्‍यापैकी पैसे आलेले, तरी दोन महिन्याचे कष्ट आणि त्याग देशासाठी उचलल्याचे सुख मिळाले.
१५. गरीब कामगारांना खडे फोडण्याऐवजी स्वतःचे (सांगण्यासाठी का होईना) हजारो रुपये बँकेत टाकण्याचे त्यामानाने सुखाचे काम मिळाले.
१६. एवढं करूनही लोकांनी सरतेशेवटी लोकांनी त्या क्वार्टरचा जीडीपी मागच्यापेक्षा वा मागच्या वर्षीच्या पेक्षा ६% नी जास्तच ठेवला, मंजे शब्दबंबाळ साहेब म्हणतात तसं मूळचा १०० चा जीडीपी ३००% नी वाया घालवून एफेक्टिवली ६% वाढवला म्हणजे त्या महिन्यात अतीव कष्ट केलं. २५ चा चक्क २६.२५ केला. सरकारनं त्या महिन्यांत लोकांनी नक्की काय करून हे नुकसान भरून काढले त्याचे अध्ययन केले पाहिजे. नेमकी नोटबंदीच्या काळात झालेलं नुकसान भरून येण्यासाठी जी काही जादू लोकांनी केली ती ते एरवी का करत नाहीत? देश सुपरपावर बनवायला हा हिट्ट फॉर्म्यूला आहे.

किती गावांमध्ये ATM मशीन आहे ते पण बघा एकदा.

मंजे तिथे रात्रीच्या रांगा नव्हत्या?

नोव्हेंबर डिसेम्बर मध्ये बरीच लग्ने

नोटबंदी करण्यास आपल्यामते संलग्न दोन आदर्श महिने कोणते?

थॉर माणूस's picture

4 Oct 2017 - 6:00 am | थॉर माणूस

उत्तम प्रश्न. यावर बंदीआधी विचार केला असेल का हा फक्त अंदाजच करू शकतो आपण सध्या.

असे निर्णय घेताना, याआधी जगभरात घेतले गेलेले याप्रकारचे निर्णय, त्यांचे यशापयश, त्यांनी अंमलात आणताना केलेली तयारी आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यातली तफावत, त्यांना लागलेला एकूण काळ हे सगळे विचारात घेणे गरजेचे असते. त्यामुळे सरकारने ५० दिवसच का घेतले, हे दोन महीनेच का निवडले, एका रात्रीतच नोटा रद्द का ठरवल्या इत्यादीचा अंदाज बांधण्यासाठी यापुर्वीच्या घटना शोधून त्यांचे यशापयश शोधावे लागेल.

तुम्हाला फक्त स्मार्टफोन वाल्यांची काळजी असेल तर बोलून काही फायदा नाही पण जरा इतरांचं उदाहरण देतो.

स्मार्टफोनवाले ३० कोटी आहेत. त्यांच्या घरातले प्रत्येकी २-३ पकडले तरी ६० ते ९० कोटी होतात.

याशिवाय त्यांच्याकडे डेबिट कार्ड वगैरे नसल्यावर अकौंट मध्ये पैसे असले तरी आजूबाजूचे जाणंयेण्याच्या रोखीचे व्यवहार करणार कसे? हे आणि अनेक प्रश्न त्यांना होते. आणि कार्यक्रम सोडून स्वतःचे नुकसान करून रांगेत उभे राहणे देखील परवडणारे नव्हते.

ग्रहणात अमेरिकेचे ७०० मिलियन गेले तसे लग्न नावाच्या भंपक प्रकारात भारताचे नक्की काय काय "वाया जाते" यावर आपलं काय मत आहे?

शब्दबम्बाळ's picture

5 Oct 2017 - 3:59 am | शब्दबम्बाळ

तुमच्या ओढून ताणून आणलेल्या मुद्द्यांवर(?!) प्रतिसाद द्यायला नको वाटतय पण परत म्हणाल माझ्या प्रश्नाला उत्तर नाही तुमच्याकडे म्हणून लिहितोय. (तुम्ही जाणून बुजून असे प्रतिसाद देत आहेत हे दिसत आहेच पण नाईलाज असेल म्हणून असो)
आपणास लक्षात असेल पण तरीही सांगतो कि भारतात अजून तरी लोकशाही आहे. त्यामुळे लोकांनी कष्टाने कमावलेला पैसे ते कसा खर्च करतात त्यावर इतरांनी नाक खुपसण्याचे कारण तसे काहीच नाही.
लग्नावर होणार बराच खर्च हा "वायफळ" वाटू शकतो पण तो ज्या त्या माणसाच्या आर्थिक स्थितीवर असायला हवा. त्यासाठी लोक अर्थसाक्षर व्हायला हवेत आणि ऐपतीप्रमाणे सोहळे करावयास हवेत.
पण तरीही अंतिमतः लग्नावर करायचा खर्च हा ज्याच्या त्याच्या "मर्जी"वरच असायला हवा.

तुम्हाला कम्युनिस्ट लोकांचे विचार पटत नसतीलच, त्यामुळे सगळ्या लोकांच्या लग्नावर करायच्या खर्चावर बंधन वगैरे आणायचा विचार नसेल अशी आशा आहे.

आता राहिला मुद्दा पैसे "वाया" जाण्याचा, तर महाशय "लग्नात पैसे जाळले जात नाहीत" वाया जायला. ते पैसे बॅंडवाला, घोडेवाला, आचारी, पंडित, कार्यालय अश्या अनेक गोष्टीत गुंतवले जातात. त्यामुळे त्या लोकांना फायदा हा होतोच. पैसा खेळता राहतो.
लोंकाना लग्नाला येण्याचे "बंधन" नसते त्यामुळे तिथेही ऑप्शन आहे. जेवण लागेल तितके घेतले तर तेही वाया जाणार नाही.

पण काही पक्ष निवडुणकांच्या काळात वारेमाप जाहिराती करायला पैसे कुठून आणतात हा मात्र प्रश्न आहे. हेलिकॉप्टर उडवत या ठिकाणावरून त्या ठिकाणी जायला, रस्त्या रस्त्यांवर पोस्टर लावून शहरे बकाल करायला, ती पोस्टर फाटून रस्त्यावर पसरल्यावर ती घाण साफ करायला काय काय वाया जात असेल हो?

जालावर केवळ समोरच्याला त्रास देण्याच्या उद्देशाने अनेक लोक वागतात, त्यात मी ही एक असू शकतो, अशी आपणांस शंका असणं रास्त आहे. मला त्यावर फार काही बोलायचं नाही. माझ्याकडून इतकंच म्हणेन कि प्रकटनाची शैली वा मूळातच ज्ञान वा बायस यांच्यापैकि कशाचाही दोष असू शकतो हे मान्य आहे. पण तुमच्या कडून एका मर्यादेत त्रागा व्यक्त करत आमच्यासारख्यांना सहन करणं अपेक्षित आहे. समाजात माझ्यासारखेच लोक जास्त असणार. असो.

महाशय "लग्नात पैसे जाळले जात नाहीत" वाया जायला. ते पैसे बॅंडवाला, घोडेवाला, आचारी, पंडित, कार्यालय अश्या अनेक गोष्टीत गुंतवले जातात. त्यामुळे त्या लोकांना फायदा हा होतोच. पैसा खेळता राहतो.

सूर्यग्रहण पाहून वेळेचा अपव्यय करून देशाचं उत्पन्न कमी करणं आणि बँडवाला, इत्यादिंना बँड वाजवायला, इत्यादिला पैसे देऊन देशाचं उत्पन्न वाढवणं हे तत्त्वतः समानच आहे. सूर्यग्रहण पाहून मिळालेल्या आनंदाचं मूल्य त्या वाया गेलेल्या उत्पन्नापेक्षा जास्त असावं. म्हणूनच लोक ते करत असावेत. दुसरीकडे बँडवाला कदाचित अर्थव्यवस्थेत उपयुक्त कामे करणारांचे फुकट जगून शोषण करत असावा. देशाच्या उत्पन्नामधे अधिकृतरित्या काय मोजलं जातं आणि काय नाही आणि लोकांना कशाचं मूल्य आहे आणि कशाचं नाही यांत तफावत असते. याशिवाय, माझं, मी सोडून अन्य लोकांना कशाचं किती मूल्य वाटत आहे ते देखिल कितपत योग्य आहे वा अयोग्य आहे याबद्दल वेगळं मत असतं.
नोटबंदीत वाया घालवलेल्या तासांत (एक मिनिट ती पूर्ण फेल्यूअर मानून) वा त्यावेळेसच्या मानसिकतेप्रमाणे केलेल्या वेळेच्या गुंतवणूकीत (काहीतरी चांगलं निघेल असं वाटलेलं आपण देखिल वर बहुतेक प्रांजळपणे म्हटलेलं आहे.) एक फलित अपेक्षित होतं. त्या फलिताचं आजचं मूल्य कोणाच्या लेखी शून्य असलं तरी तेव्हाच्या कृतीला वाया जाणे म्हणता येणार नाही.
समजा एका गावात १०० कुटुंबे राहतात. ती कोणतेही निरुपयुक्त काम करत नाहीत. तिथे एक भिकारी, वा वादक आला आणि त्याचा संसार चालवण्यासाठी लोकांनी असलेल्या उत्पन्नातून त्याला पैसे दिले तर ते एक प्रकारचं विचित्र आर्थिक शोषण आहे. त्यामुळे लोक थोडं अधिक उत्पन्न कमवू लागले नि त्यांना वादनात मूल्य आढळले तर गावाचे उत्पन्न वाढले असे मानले जाईल.
नोटबंदीत वेळ वाया गेल्याने आर्थिक नुकसान झाले नाही असं म्हणायचं नाही, पण त्या काळात करायच्या ज्या विशिष्ट कृतिचं आपण उदाहरण दिलं आहे, त्यापेक्षा नोटब्बंदीत तास वाया घालवणे अधिक उपयुक्त ठरावे. वेळ, आर्थिक स्रोत कमी कमी करत गेले तर लोक केवळ अत्यंत उपयुक्त कामे करतील नि जी अनावश्यक आहेत त्यांना सर्वप्रथम तिलांजली देतील हे साहजिक आहे.

अशी अनेक उदाहरणे मिळतील जर दुसऱ्या बाजूचा विचार करायची इच्छा असेल तर.

लहान मुलांना शिक्षण दिल्याने त्यांचे किती तास वाया जातात, बालपण कसे नष्ट होते, २५-३० वयापर्यंत ते कसे काही कमावत नाहीत, शिवाय खर्च किती होतो, सरकारचे पैसे किती वाया जातात अशा दुसर्‍या बाजूचा विचार प्रत्येक ठिकाणी आवश्यक असावा.

मार्मिक गोडसे's picture

3 Oct 2017 - 3:11 pm | मार्मिक गोडसे

चुकीची तुलना. शिक्षण आरामात घेता येते. न घेण्याचा पर्याय असतो. परंतू नोटबंदी काळात जुन्या बाद नोटा ठराविक मुदतीतच बदलून मिळणार होत्या व आपल्याच खात्यातील पैसे काढण्याची मर्यादा असल्याने लोकांना सतत बँकेच्या रांगेत उभे राहावे लागत होते. लोकांना गृहीत धरून हा निर्णय घेतला होता.

arunjoshi123's picture

3 Oct 2017 - 3:59 pm | arunjoshi123

मी फक्त दुसरी बाजू असण्याबद्दल बोलत होतो.

थॉर माणूस's picture

4 Oct 2017 - 5:24 am | थॉर माणूस

दुसरी बाजू मांडा, हरकत नाही. थोडी तर्कसंगत उदाहरणे घ्या इतकंच. शिक्षण नॉन प्रॉडक्टीव वेळ समजणे उदाहरणासाठीसुद्धा चुकीचेच आहे, मला तरी अजून अशी दुसरी बाजू असलेले कुणी सुशिक्षीत व्यक्तीमत्व भेटायचे आहे.

प्रसाद_१९८२'s picture

3 Oct 2017 - 4:09 pm | प्रसाद_१९८२

परंतू नोटबंदी काळात जुन्या बाद नोटा ठराविक मुदतीतच बदलून मिळणार होत्या

--

त्या नोटा बदलून घेण्याऐवजी स्वत:च्या खात्यात भरायचा ऑप्शन देखील होताच.

आपल्याच खात्यातील पैसे काढण्याची मर्यादा असल्याने लोकांना सतत बँकेच्या रांगेत उभे राहावे लागत होते.

--

अशी किती लोक, किती तास सतत बँकेच्या रांगेत उभी राहत होती?

मार्मिक गोडसे's picture

3 Oct 2017 - 4:37 pm | मार्मिक गोडसे

अशी किती लोक, किती तास सतत बँकेच्या रांगेत उभी राहत होती?
त्याने काय सिद्ध होईल?

शब्दबम्बाळ's picture

30 Sep 2017 - 1:41 am | शब्दबम्बाळ

जीडीपी कमी झाला तुम्हाला किंवा मिपाकरांपैकी किती जणांना काय त्रास होतोय ते पॉईंटवाईज सांगा बघू.

एक्कच नंबर हा! म्हणजे भारीच! काय फरक पडतो आपल्याला जिडीपी कमी होऊ दे नाहीतर पार बुडू दे, कुठून तरी उगीच आकडे काढून खेळ दाखवत असावेत!

बर मला सांगा, काँग्रेसच्या काळात इतके घोटाळे झाले. त्याचा वैयक्तिक त्रास सांगा बघू जरा.
कॉमन वेल्थ : तुम्ही खेळायला गेला होतात का? मग काय त्रास त्याचा?
२ जी घोटाळा : तुम्ही स्पेक्ट्रम खरेदी करणार होतात का? मग जाऊ द्या ना...
कोळसा घोटाळा : तुम्ही खाण खोदणार होतात का? मग काय करायचंय!
आता या सगळ्या घोटाळ्यांनीही आपल्याला काहीच फरक नाही पडला कि! मग चांगलं चाललेलं कि काँग्रेसच्या काळात!
उगीच घालवलं बिचार्यांना नाही का?
आता उगीच देशाचा पैसा गेला वगैरे गोष्टी सांगू नका, तुम्हाला काय फरक पडला त्याने ते सांगा.

जाता जाता bloomberg चाही रिपोर्ट बघा. संतुलित आहे
How India's failed note ban move taught the world what not to do

Modi's Anti-Graft Drive Hit After Indians Return 99% of Banned Notes

rbi

ट्रेड मार्क's picture

30 Sep 2017 - 3:10 am | ट्रेड मार्क

मोदींना विरोध करायचा म्हणून किती वहावत गेलात? चक्क भ्रष्टाचाराचं समर्थन करताय? या सगळ्या घोटाळ्यांची तुलना जीडीपी कमी होण्याशी करताय? कमाल आहे. जसं लोकांनी काँग्रेसला घालवलं तसच या सरकारचे निर्णय पटत नसतील तर त्यांनाही घालवतील. चिंता नसावी.

घोटाळ्यांमुळे देशाचे नुसते पैश्यांचे नुकसान नाही झाले तर एक देश म्हणून जगात नाचक्की झाली आणि बाकी सोशल कॉस्ट काय आहेत ते पण बघा.

रिपोर्ट कसले दाखवताय, दोन्ही बाजूंनी समर्थन करणारे ढीगभर रिपोर्ट्स आहेत, मी पण माझ्या वरील प्रतिसादात दिले आहेत. संतुलित आहे का नाही हे आपण आपल्याला जे पटतं त्यावरून ठरवतो.

एवढं बॅंडवाल्यांचं उदाहरण दिलंत. नोटबंदीमुळे त्रास झाला हे कोणीच अमान्य करत नाहीये, पण जर गरिबांना खूपच त्रास झाला असता आणि अजूनही होत असता तर सरकारच्या विरोधात कुठेतरी काहीतरी झालं असतं. अगदी नोटबंदीच्या काळातसुद्धा विरोधीपक्षाने लोकांना भडकवायचा प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही. जाऊनही विरोधीपक्ष ममोसिंग किंवा यशवंतसिंग सारख्या कोणीतरी केलेल्या कमेंटवर विसंबून आहे आणि मागो किंवा तुम्ही इथे मिपावर असले लेख/ प्रतिसाद लिहिताय.

थॉर माणूस's picture

30 Sep 2017 - 6:17 am | थॉर माणूस

>>>मोदींना विरोध करायचा म्हणून किती वहावत गेलात?
त्यांच्या दोन्ही प्रतिसादात मोदींना कुठे विरोध केलाय ते काही सापडत नाहीये. नोटबंदीच्या निर्णयाविषयी आलेल्या प्रतिक्रीयेला प्रतिसाद मात्र दिसतोय. प्रत्येक गोष्ट इतकी मोदींला लावून नका ना घेऊ.

>>>चक्क भ्रष्टाचाराचं समर्थन करताय?
त्यांनी भ्रष्टाचाराचं समर्थन कुठे केलं ते दाखवता का जरा? एका त्यांच्यादृष्टीने रीडीक्युलस आर्ग्युमेंटला (जे त्यांनी क्वोटसुद्धा केलेलं आहे प्रतिसादात) पॅरेलल काऊंटर आर्ग्युमेंट दिलीत त्यांनी (त्यातली निरर्थकता दाखवण्यासाठी) हे तर दिसत आहे, समर्थन कुठे आहे कळाले नाही.

>>>अगदी नोटबंदीच्या काळातसुद्धा विरोधीपक्षाने लोकांना भडकवायचा प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही.
विरोध प्रत्येक वेळी लगेचच मतपेटीत दिसतोच असे नाही. नाहीतर ६० वर्षे काही लोक देश विकून वगैरे खात होते असं म्हणतात, तरीही ते निवडून येत राहीलेच की. तसेही मला नाही वाटत लोकांचा टीपिंग पॉईंट अजून आला आहे की ते पुन्हा एकदा मोठा सत्ताबदल वगैरे घडवतील.

नाहीतर ६० वर्षे काही लोक देश विकून वगैरे खात होते असं म्हणतात

६० वर्षे काही लोक काबाडकष्ट करून, कमावून देशाला पलंगावर आणून खाऊ घालत होते हे उघडं नागडं वास्तव कसं दिसणार नतदृष्टांना?

थॉर माणूस's picture

4 Oct 2017 - 5:03 am | थॉर माणूस

अमुक एका पक्षाने देश विकून खाल्ला... देशाची वाट लावली इत्यादि प्रकारचे दावे करणारे अनेक लोक दाखवता येतात. अगदी सोशल साईट्सवर सुद्धा सहज सापडतात. "देशाला पलंगावर आणून खाऊ घालत होते" असा दावा करणारे कुठे सापडले म्हणायचे बरे तुम्हाला?

कुणीतरी एका टोकाला गेलंय म्हणून आपण विरुद्ध दिशेचे टोक गाठायलाच पाहीजे असं नसतं ना हो. जरा स्पेसिफीक मुद्द्यांवर राहीलो तर नीट चर्चा होते. उगाच वाट्टेल ते टोले मारण्यात फक्त शक्ती खर्ची पडते, साध्य काहीच होत नाही.

शब्दबम्बाळ's picture

5 Oct 2017 - 3:33 am | शब्दबम्बाळ

धन्यवाद साहेब!
निदान मांडलेले मुद्दे समजून घेणारे आणि त्यानुसार बोलणारे काही लोक "अजूनही" मिपावर आहेत हे पाहून जरा बरे वाटले.
ट्रेड मार्क भाऊंना पण त्यांचे अर्थहीन वाक्य कळले नसेल असे नाही पण त्याचा फोलपणा दाखवल्यावर ते चुकीचे आहे हे मानण्याची पद्धत अस्तित्वात नाही.
असो, स्वतः पंप्र अजूनही सांगत आहेत नोटबंदी खूप यशस्वी झाली आणि देश कमी!? पैशांवर पण "सुरळीत" चालू शकतो हे सिद्ध झालं! त्यामुळे समर्थकांकडून फारश्या वेगळ्या अपेक्षा नाहीतच म्हणा...
मग उगीच काहीही प्रतिवाद करत बसायचं!

कोणीतरी केलेल्या कमेंटवर विसंबून आहे आणि मागो किंवा तुम्ही इथे मिपावर असले लेख/ प्रतिसाद लिहिताय.

याना bloomberg चे रिपोर्ट दाखवले तरी असली वाक्य, असोच...आणि सरकार कोणाचेही असो त्याला जाब विचारण्याचा प्रत्येक सामान्य माणसाला अधिकार आहे.
त्यासाठी त्याला तो "देशभक्त" "मोदीभक्त" इत्यादी असल्याची साक्ष देणे गरजेचे नाही.