ताज्या घडामोडी - १०

गामा पैलवान's picture
गामा पैलवान in राजकारण
18 Aug 2017 - 6:20 pm

ता.घ. - ९ चे १५० प्रतिसाद झाले म्हणून नवीन धागा.

-गा.पै.

प्रतिक्रिया

गामा पैलवान's picture

28 Aug 2017 - 7:47 pm | गामा पैलवान

श्रीगुरुजी,

न्यायव्यवस्थेने जर १० वर्षांची शिक्षा देऊ केली आहे तर बाबाला फासावर का चढवायचं?

बाबाने करायला नको ते केलंय हे बहुधा खरं असावं. पण इतके लोकं त्याला का पाठींबा देतात हा प्रश्न उरतोच. आज लोकं चिरडले, पिडले, नाडले गेले आहेत. त्यांना बाबांनीच आधार पुरवला ना? नाहीतर कोण विचारंत होता त्यांना?

आ.न.,
-गा.पै.

बाबा राम रहीम यांनी केलेल्या गंभीर गुन्ह्याचे ( अजून किती सांगाडे डेरामध्ये सापडतील ते माहित नाही) समर्थन करता येणार नाहीच पण डेरा सच्चा सौदा सारखे संप्रदाय वाढीस का लागले याचा हि विचार येथे होणे आवश्यक आहे. जालावर आलेली माहिती खाली जशीच्या तशी देत आहे.
You literally can't talk about dera sachha sauda violence without discussing why deras were created in punjab and how their role and warped and changed over time. There's no point to being 'horrified'.

DSS has given thousands of people across north India an identity away from the historical oppression they've known. It's given them safety. a huge number of its members are from backwards castes, who had converted to Sikhism, but found the same upper caste oppression there too. Sikhism is, in theory, casteless. The ground realities, however, are sobering and unfortunate. The jat sikh-khatri coterie has taken over religious politicking, especially representation in sgpc and other gurudwara committee. I was horrified to recently learn that my village has two Gurudwaras - one for Jat Sikhs and other for as they say Balmikis. They've systematically kept new converts out of the loop and have actively oppressed them because they represent a status quo shakeup. The same holds true for Hinduism. The upper cast Jats, Khatri or business class and others - no Brahmins here- have always oppressed them, closed the temples to them and in short treat them as outcasts.

This (along with other factors) has led to people being angry, helpless, disillusioned. They see no way out, no way up. They turn to drugs. Punjab and nasha have become synonymous, and this has been worsened by economic insecurity+lack of education. They're a lost people. So when the dera sachha sauda comes up as a saviour organisation, they're interested. Of course they are. The dera promises them dignity. they dera educates its people, feeds them, keeps them off drugs, gives them jobs, gives them a purpose. It gives them a dignity of being. A lost man doesn't care if a rapist gives him direction. A hungry man will take food from a murderer's hand. Never forget this.

What you see isn't *just* an expression of misogyny and religious fervour. That too, yes, but it's actively an expression of insecurity too. What you and i see as justice, a large number of people see as a possible slide down to the pits they've barely emerged from. What you see on the today has been simmering over a generation and a half. In our race to *appear* developed, we forgot that development, as understood by very rudimentary economics, is unfair, unjust, unequal, and problematic. If nothing else, this should serve as a lesson. If we try to climb up by stepping on someone else's broken back, those people will risc e.

Politicians understand this. They know a votebank when they see one, that's why they're politicians. they've been allowing these deras to flourish and mutate. Think of this as a very messed up, but immensely effective delegation system. They support the deras in their bullshit knowing the votebank will be appeased by them. this allows deras a free reign. The deras will fight each other, they will fight within themselves, and they will go to any lengths to 'win'. The politicians allow this because it also makes deras comfortably indebted to them. Think of divine right of rule. Same principle applies.

What you have is a reckless product that feeds off people's insecurities and replaces their drugs with a more potent one- faith&security. Religion might be an opiate, but faith? Man, that's a trip if i ever saw one. DSS has a veritable army of people willing to kill for it. And we made this. We allowed this with our apathy. When you look down on the protestors, remember this. We're culpable too, massively so.

गामा पैलवान's picture

29 Aug 2017 - 12:58 pm | गामा पैलवान

खरे डॉक्टर,

मजकूर दिल्याबद्दल धन्यवाद. बाबाचा पाय घसरला हे वाईट झालं. त्याचे शिष्यगण जितके असुरक्षित आहेत तितकाच बाबाही असुरक्षित आहे, हे दिसून येतं. बाबा जर वैदिक परंपरेचा ठाम अभिमानी असता तर इंद्रियांवर निग्रहात्मक नियंत्रण ठेवण्यात यशस्वी झाला असता. हे माझ्या तोंडानं बोलणं सोपं आणि प्रत्यक्ष आचरण्यास कठीण आहे. मात्र बाबाने एव्हढी सत्ता हाती असतांना जबाबदारीने वागणे अभिप्रेत आहे. ज्या लोकांनी आपल्यावर एव्हढ विश्वास टाकला त्यांचा विश्वासघात करणं बरोबर नाही. याचा पश्चात्ताप होऊन उपयोग नाही. पूर्वतापच व्हायला हवा होता. तो झाला नाही हे बाबाचं, त्याच्या शिष्यगणांचं आणि इतरांचं दुर्दैव.

स्पिरिच्युअल सेक्युरिटी हा साफ वेगळा प्रकार आहे.

आ.न.,
-गा.पै.

२० ते २२ लोग म्रुत्युमुखी पडल्याची बातमी येतेय....

फारच वाइट झालं

जेम्स वांड's picture

21 Jan 2021 - 1:48 pm | जेम्स वांड

की

गरज असली तर ब्राह्मणांना भाजपची गरज आहे भाजपला ब्राह्मणांची गरज नाही

ह्यावर मी दिलेली दोन उदाहरणे "गंडलेली" आहेत असे श्रीगुरुजी ह्यांनी सप्रमाण अन स-तर्क पटवून दिले होते. राणे पितापुत्र, त्यांचा ब्राह्मण विरोध अन कणकवली मालवण परिसरात असलेला त्यांचा मर्यादित प्रभाव आणि गुंडगिरी ह्याबद्दल पण श्री गुरुजींनी समतोल विवेचन केलं होतं, राणे कंपनीपैकी कोणीही भाजपात आल्यास परत भाजपला विधानसभेत मतदान न करण्याची प्रतिज्ञा सुद्धा त्यांनी बोलून दाखवली होती, ते असो.

त्यानंतर पुलाखालून भरपूर पाणी गेल्याचे एकंदरीतच दिसते, राणेंचे पक्ष प्रवेश, त्यांनी पक्षातर्फे घेतलेल्या पत्रकार परिषदा, विरोधी पक्ष अन खासकरून सेनेला त्यांनी सेनेच्याच भाषेत दिलेली प्रत्युत्तरे हे मला वाटतं आपण सगळ्यांनी पहिलेच असतील, हल्लीच निलेश राणेंना ही एक महत्वाची जबाबदारी भाजपने सोपवली आहे, थोडक्यात राणे हे पक्षात महत्वाचे आहेत हे भाजपला सांगायचे आहे काय ? असा प्रश्न पडतोय. अर्थात राजकारणातील अभ्यासाचे मुरब्बी अभ्यासक असलेले गुरुजी ह्यातील काही अंतर्गत खाचाखोचा सांगतीलच असल्या तर, पण एकंदरीत मला ह्यातून बरंच काही शिकायला मिळेल असे वाटते.

तुमचे मत काय ?

श्रीगुरुजी's picture

21 Jan 2021 - 2:53 pm | श्रीगुरुजी

राणे कंपनीपैकी कोणीही भाजपात आल्यास परत भाजपला विधानसभेत मतदान न करण्याची प्रतिज्ञा सुद्धा त्यांनी बोलून दाखवली होती,

ऑक्टोबर २०१९ मधील महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मी व माझ्या कुटुंबियांनी मत दिले नाही. आम्ही मतकेंद्रावर गेलोच नव्हतो. राणे कुंटुंबियांना भाजपने दिलेली उमेदवारी हे मत न देण्यामागच्या अनेक कारणातील एक कारण होते.

हल्लीच निलेश राणेंना ही एक महत्वाची जबाबदारी भाजपने सोपवली आहे, थोडक्यात राणे हे पक्षात महत्वाचे आहेत हे भाजपला सांगायचे आहे काय ?

महाराष्ट्र प्रदेश सचिव हे एक अत्यंत फालतू, फारसे महत्त्व नसलेले पद आहे. राणेला महत्त्व द्यायचे असते तर फार पूर्वीच केंद्रात मंत्रीपद दिले असते.

खरं सांगायचे तर राणे कुटुंबीय राजकारणातून संपले आहेत.

अर्थात राजकारणातील अभ्यासाचे मुरब्बी अभ्यासक असलेले गुरुजी ह्यातील काही अंतर्गत खाचाखोचा सांगतीलच असल्या तर, पण एकंदरीत मला ह्यातून बरंच काही शिकायला मिळेल असे वाटते.

मी मुरब्बी वगैरे अजिबात नाही. काही अंदाज बरोबर येतात इतकंच. ऑक्टोबर २०१९ मधील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत, हा अंदाज एप्रिल २०१९ मध्येच मी काही समाज माध्यमांवर व्यक्त केला होता. तो खरा ठरला. सेनेशी पुन्हा युती करणे ही भाजपची अत्यंत गंभीर घोडचूक ठरेल, हा अंदाज सुद्धा खरा ठरला. खडसे, मुंडे, बावनकुळे या इतर मागासवर्गीय नेत्यांना संपविणे, ब्राह्मण उमेदवारांना उमेदवारी नाकारणे व भाजपला मराठा जातीचा पक्ष बनविणे याचा भाजपला फटका बसेल हा अंदाजही खरा ठरला.

फडणवीस/पाटील हे दोघे फक्त स्वतःच्या खुर्चीसाठी भाजपला खड्ड्यात घालत आहेत व आगामी स्थानिक व विधानसभा निवडणुकीत याचे प्रत्यंतर येईल हा माझा अंदाज आहे. नुकत्याच पार पडलेल्या शिक्षक-पदवीधर विधानपरीषद निवडणुकीत हेच दिसले आहे. आगामी विधानसभा निवडणुक केव्हाही झाली तरी त्यात राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष असेल व भाजप चौथ्या क्रमांकावर जाईल हा माझा अंदाज आहे. जर भाजपने महाराष्ट्रात नेतृत्वबदल केले तरच भाजपची घसरण थांबेल.

जेम्स वांड's picture

7 Jul 2021 - 11:20 pm | जेम्स वांड

आत्ताच ही बातमी वाचली

अन ही वाचल्यानंतर खालील मुद्दे ग्राह्य वाटले, अर्थात आपण ह्यावर विचारमंथन केले असेलच, ह्यांना फक्त माझ्या शंका समजा, अन जमल्यास लवकर निरसन करा कृपा करून.

राणे कुंटुंबियांना भाजपने दिलेली उमेदवारी हे मत न देण्यामागच्या अनेक कारणातील एक कारण होते.

आता तर केंद्रात मंत्रिपद दिले, त्याच्यामागे काय तत्वज्ञान असेल किंवा चाणक्यनिती असेल हे आपल्यासारख्या उत्तम विशेलष्क व्यक्तीकडून ऐकणे आवडेल.

महाराष्ट्र प्रदेश सचिव हे एक अत्यंत फालतू, फारसे महत्त्व नसलेले पद आहे. राणेला महत्त्व द्यायचे असते तर फार पूर्वीच केंद्रात मंत्रीपद दिले असते.खरं सांगायचे तर राणे कुटुंबीय राजकारणातून संपले आहेत.

महाराष्ट्र प्रदेश सचिव हे फालतू पद असल्याचे तुमचे विवेचन मला अगदीच पटले होते, तर आता केंद्रीय मंत्रिपद पण फालतू असल्याबद्दल आपले काही विद्वत्तप्रचुर विश्लेषण असल्यास कृपया माझे ही ज्ञानवर्धन करावे ही मागणी आत्यंतिक नक्कीच नसेल ना आपल्यास सरजी ?
राणे परिवार राजकारणातून संपले असल्याच्या विधानावर आपले आजरोजी काय मत असेल ते नोंदवून घेणे आवडेल मला माझ्या अभ्यास वासरीत सांगाल का प्लीज ?

खडसे, मुंडे, बावनकुळे या इतर मागासवर्गीय नेत्यांना संपविणे, ब्राह्मण उमेदवारांना उमेदवारी नाकारणे व भाजपला मराठा जातीचा पक्ष बनविणे याचा भाजपला फटका बसेल हा अंदाजही खरा ठरला.

अभिनंदन सरजी, आपले होरे फारच अचूक बघा, बाकी खडसेना आजच ईडीची नोटीस मिळाली आहे म्हणतात, ते एक असो, एकंदरीत खडसे बावनकुळे मुंडे संपवून शेलार, भारती पवार, कपिल पाटील वगैरे नेतृत्व पुढे का आणावे वाटले असेल ? घर की मुर्गी म्हणण्याचा मोह टाळतोय कारण अजून तुमची बिनतोड कारणमीमांसा यायची वाट पाहतोय , असे पक्के तर्क आहेत तुमचे का बस.

फडणवीस/पाटील हे दोघे फक्त स्वतःच्या खुर्चीसाठी भाजपला खड्ड्यात घालत आहेत व आगामी स्थानिक व विधानसभा निवडणुकीत याचे प्रत्यंतर येईल हा माझा अंदाज आहे.

वरील दोन नेते (नावं आपणच आपल्या शुभहस्ते टंकलेली आहेत) भाजपचं इतकं तळपट करत असताना अन महाराष्ट्र क्षेत्री इतके अक्षम्य लांगुलचालन करत असताना केंद्रीय नेतृत्वाने त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेऊन राणेंना मंत्रिपद द्यावे ? हे म्हणजे चाणक्य अन चंद्रगुप्तांस एखाद मंडलिकाने शिकवण्यालायक काम झाले. स्वतःची खुर्ची अबाधित ठेवण्यासाठी खेळ करणारी ही तुम्ही नावं घेतलेली दुक्कल केंद्रातील बुद्धिमान नेतृत्वाला कळले नाही ह्यावर माझा विश्वास नाही, तरीही ह्या मागील विचार अन तत्वज्ञान कृपया सांगाल का समजावून ?

एकंदरीत,

गरज असली तर ब्राह्मणांना भाजपची आहे, भाजपला ब्राह्मणांची गरज नाही

हे माझे मत तूर्तास परत एकदा तुमचे मेधावी तर्कपूर्ण खंडन अन स्पष्टीकरण येईस्तोवर मी राखीव ठेवतो, अर्थातच उत्तम तर्काने आपण माझे मुद्दे खोडाल मला भरोसा आहेच.

(तुमचा चाहता आणि तर्कबुद्धीत तुमचा शिष्य) वांडो

बाकी राम गणेश गडकरी, सावरकर, ही मंडळी जुनाट असली तरी आम्हाला श्रद्धेय आहेत अजून.

श्रीगुरुजी's picture

8 Jul 2021 - 10:37 am | श्रीगुरुजी

आता तर केंद्रात मंत्रिपद दिले, त्याच्यामागे काय तत्वज्ञान असेल किंवा चाणक्यनिती असेल हे आपल्यासारख्या उत्तम विशेलष्क व्यक्तीकडून ऐकणे आवडेल.

हा धागा व त्यातील माझे प्रतिसाद जुलै २०१७ मधील आहेत. राणे त्याच महिन्यात भाजपत आले होते व त्यांना केंद्रात मंत्री करणार असे काही प्रतिसादात लिहिले होतै. कोकणात जम बसवायला भाजपला राणे उपयोगी पडतील, तसेच शिवसेनेला लगाम घालायला त्यांचा उपयोग होईल, असे काही जणांनी लिहिले होते. राणे हे प्रभावी आणि अभ्यासू नेते आहेत, याचा फायदाच होईल असे एकाचे मत होते.

त्यावेळी, म्हणजे बरोबर ४ वर्षांपूर्वी व नंतर जानेवारी २०२१ पर्यंत मी खालील भाकिते केली होती.

- राणेंना मंत्री करणार नाहीत
- कोकणात राणेंचा प्रभाव अत्यंत मर्यादित क्षेत्रात असून भाजपला कोकणात जम बसवायला किंवा शिवसेनेला लगाम घालायला राणेंचा उपयोग होणार नाही.
- राणे कुटुंबीय राजकारणातून संपले आहे.

यातील दुसरे भाकित आजतागायत खरे ठरले आहे. शिवसेनेविरूद्ध १६ वर्षे झगडूनही राणे शिवसेनेचा केसही वाकडा करू शकले नाही, तसेच कोकणात स्वत:चा व भाजपचा प्रभाव वाढवू शकले नाही.

पहिले भाकित परवापर्यंत खरे ठरले होते. परंतु कालपासून ते खोटे ठरले. राणे मंत्री झाल्याने निदान ते तरी राजकारणात अजून संपले नाहीत असे दिसले आहे. परंतु त्यांचे दोन्ही पुत्र अजूनही संपलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे तिसरे भाकित अंशतः अजूनही खोटे ठरलेले नाही.

एकंदरीत खडसे बावनकुळे मुंडे संपवून शेलार, भारती पवार, कपिल पाटील वगैरे नेतृत्व पुढे का आणावे वाटले असेल ?

याची कारणे अनेकदा इतर धाग्यात लिहिली आहेत. मुख्यमंत्रीपदाची इच्छा सार्वजनिकरित्या बोलून दाखविण्याचा अत्यंत गंभीर गुन्हा मुंडे, खडसे वगैरे नेत्यांनी केल्याने त्यांना योजनाबद्ध पद्धतीने संपविले. बावनकुळे व गडकरी हे विदर्भातील वरीष्ठ नेते असल्याने बावनकुळेंंना सुद्धा डावलले गेले. गडकरी तसेही राज्यात नव्हतेच. परंतु त्यांच्या अनेक समर्थकांना उमेदवारी नाकारली.

एकंदरीत इतर मागासवर्गीय नेत्यांना ठरवून संपविले जात आहे अशी प्रतिमा निर्माण होऊन त्याचा फटका २०१९ विधानसभा निवडणुकीत बसला होता. त्यामुळे कपिल पाटील, भारती पवार, कराड वगैरे प्रतिस्पर्धी नसलेल्या इणर मागासवर्गीय नेत्यांना मंत्री करून प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न सुरू आहे.

वरील दोन नेते (नावं आपणच आपल्या शुभहस्ते टंकलेली आहेत) भाजपचं इतकं तळपट करत असताना अन महाराष्ट्र क्षेत्री इतके अक्षम्य लांगुलचालन करत असताना केंद्रीय नेतृत्वाने त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेऊन राणेंना मंत्रिपद द्यावे ?

मागील २-३ वर्षात भाजपत आलेले आयाराम पाहिले (राणे, विखे, मोहिते, हर्षवर्धन पाटील, उदयन भोसले, संभाजी भोसले, पाचपुते इ.) तर एक विशिष्ट pattern दिसतो. भाजप नेतृत्वाने फडणवीसांना महाराष्ट्रात मुक्तहस्त दिला आहे असे माझे मत आहे. राणेंना मंत्री करणे हा त्याच pattern नुसार असावे.

गरज असली तर ब्राह्मणांना भाजपची आहे, भाजपला ब्राह्मणांची गरज नाही

हे मत संपूर्ण चूक आहे हे मी पूर्वीच लिहिले आहे. २०१८ मध्ये अराखीव जागांचे प्रमाण तब्बल १६ टक्के कमी करणे, काही मतदारसंघातून विद्यमान ब्राह्मण आमदारांना उमेदवारी नाकारून एका विशिष्ट जातीला उमेदवारी देणे हे प्रकार बऱ्याच ब्राह्मण मतदारांना आवडलेले नाहीत. Save Merit Save Nation ही मोहीम सर्वात पहिल्यांदा विदर्भात सुरू झाली. २०१४ च्या तुलनेत २०१९ मध्ये विदर्भात भाजपला १५ जागा गमवाव्या लागल्या, त्यामागे या मोहिमेचा सुद्धा हातभार होता. त्या निवडणुकीत बरेच ब्राह्मण मतदार मत द्यायला गेलेच नव्हते. २०२० मध्ये भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या पुणे पदवीधर मतदारसंघात खूप मोठ्या फरकाने भाजपचा अब्राह्मण उमेदवार पडला. संपूर्ण राज्याचा निकाल फिरवू शकतील इतकी ब्राह्मण मतदारांची संख्या नाही. परंतु काही मोजक्या मतदारसंघात ते नक्कीच निकाल फिरवू शकतात. बहुमताच्या आकड्यापर्यंत पोहोचताना दमछाक होणाऱ्या भाजपला अगदी थोड्या हक्काच्या मतदारसंघात पराभव झाला तरी कसा फटका बसतो हे २०१९ मध्ये दिसले आहे व कायम मत देणाऱ्या ब्राम्हणांची मते गृहीत धरून त्यांचे नुकसान सुरूच ठेवले तर भविष्यातील निवडणुकीतही फटका बसेल.

श्रीगुरुजी's picture

8 Jul 2021 - 1:30 pm | श्रीगुरुजी

अजून एक लिहायचं राहून गेलं.

राणेंना मंत्री करणे म्हणजे वठलेल्या झाडाला खत, पाणी देण्यासारखे आहे. अर्थात त्यांना मंत्री करण्यामागे मोदी-शहांची काही वेगळी गणिते असतील. परंतु कोणतीही गणिते असली तरी त्याचे उत्तर शून्यच येणार असा माझा अंदाज आहे.

राजकीय दृष्ट्या त्यांच्या चाली योग्य आहेत कारण असे उद्योग प्रबळ विरोधक नसतानाच करायचे असतात ज्यामुळे जनतेकडे इतर पर्याय उरत नाहीत राणे आले म्हणून कोण किती भाजपा समर्थक राष्ट्रवादी, शिवसेना अथवा काँग्रेस जवळ करतील ?

श्रीगुरुजी's picture

8 Jul 2021 - 2:23 pm | श्रीगुरुजी

काही भाजप समर्थक कोणालाच मत न देता घरी बसतील तर काही जण भाजप विरोधात मत देतील. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कोणालाही मत न दिलेले काही कट्टर भाजप समर्थक मला माहिती आहेत.

आणि असे करून या कट्टर भाजपेयी लोकांनी साध्य काय केले ?

श्रीगुरुजी's picture

8 Jul 2021 - 2:35 pm | श्रीगुरुजी

प्रत्येक लहानमोठ्या निवडणुकीत डोळे झाकून मत देऊनही लबाडी करून त्यांचा विश्वासघात केल्याची शिक्षा दिली.

??? भाजपा किती सुधारला ?

श्रीगुरुजी's picture

8 Jul 2021 - 2:47 pm | श्रीगुरुजी

भाजप सुधारला नसून अजून बिघडलाय. पुढच्या निवडणुकीत जास्त कठोर शिक्षा मिळेल.

गॉडजिला's picture

8 Jul 2021 - 3:20 pm | गॉडजिला

असो...

पर्यायी नेतृत्व ही बाब जेंव्हा जेंव्हा दुर्लक्षित होईल मतदार स्वतःला शिक्षा करत राहतील

प्रदीप's picture

9 Jul 2021 - 8:48 am | प्रदीप

ह्या अशा काही त्यांच्या थोड्याफार, नैतिक मूल्यांचा विधीविशेष असलेल्या पाठराख्यांनी त्यांना मते न देता, अगदी विरूद्ध पक्षाच्या उमेदवारांना दिली, तर त्यामु़ळे भाजपचे नक्की किती नुकसान होईल? माझ्या मते फारसे नसावे (पण मी ह्याबद्दल काही आकडेवारी देऊ शकत नाही. हे नुसते वरवरचे मत समजा, हवे तर).

शेवटी कुठल्याही पक्षाला आपापला बरावाईट कार्यक्रम राबवण्यासाठी सत्ता असणे जरूरीचे आहे. त्यामुळे काही तडजोडी करणे अपरिहार्य असते. आता कृपाशंकर सिंह ह्यांना रीतसर व सन्मानपूर्वक भाजपने पक्षांत घेतले आहे, ते मुंबईतील उत्तर भारतीयांची मते आपल्याकडे वळवण्यासाठी. भाऊ तोरसेकरांनी अलिकडे ही नोंद सविस्तरपणे केली आहे.

श्रीगुरुजी's picture

9 Jul 2021 - 9:09 am | श्रीगुरुजी

मुळात महाराष्ट्रात भाजपला मिळालेली सर्वाधिक मते २८.५% आहेत (२०१४ ची स्वबळावर लढविलेली विधानसभा निवडणुक) ज्यात भाजपने १२२ जागा जिंकल्या होत्या.

२०१९ मध्ये युती करूनही भाजपची मते सुमारे २.७५% कमी होऊन २५.७५% वर आली व जागा १२२ वरून १०३ पर्यंत कमी झाल्या. मुळात बहुमतापर्यंत पोहोचतानाच भाजपची दमछाक होते. त्यामुळे अजून १-२ टक्के मते विरोधात गेली तरी भाजपचा आकडा ९० च्या खाली येईल, कारण एक मत विरोधात गेले तर प्रत्यक्षात २ मतांचा फरक पडतो.

राष्ट्रवादी व कॉंग्रेस यांच्या एकत्रित मतांची संख्या ३२% पेक्षा कमी नाही. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी-कॉंग्रेस युती वि. भाजप वि. शिवसेना या तिरंगी लढतीत कोण विजयी होईल हे स्पष्ट आहे. अशा परिस्थितीत आहेत ती मते टिकवून नवीन मते मिळविण्याऐवजी भाजप आपल्या कट्टर समर्थकांना नाराज करून, मताधार असणाऱ्या निष्ठावंतांना अडगळीत टाकून अल्प मताधार असणारे बदनाम नेते पक्षात आणत आहे. याचा फटका नक्कीच बसेल.

तडजोडी समजू शकतो, परंतु सध्या महाराष्ट्र भाजपत जे सुरू आहे ते म्हणजे कंबरेचे सोडून डोक्याला गुंडाळण्यासारखे आहे. जगावर ओवाळून टाकावी अशांना भाजपत पायघड्या घातल्या जात आहेत. दुसरीकडे प्रबळ मताधार असलेल्या जुन्या निष्ठावंत भाजप नेत्यांना अडगळीत टाकले जात आहे. खडसे राष्ट्रवादीत गेले. पुढील निवडणुकीपूर्वी मुंडे भगिनी शिवसेना किंवा राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शिवसेनेला लगाम घालण्यासाठी राणे, कृपाशंकर वगैरेंना भाजपत आणायचं, राष्ट्रवादीला लगाम घालण्यासाठी अनिल देशमुख, खडसे वगैरेवर कारवाई करायची आणि त्याचवेळी सत्तेसाठी शिवसेना, राष्ट्रवादी वगैरेंबरोबर सत्तेसाठी गुपचुप वाटाघाटी सुरू ठेवायच्या हे दुटप्पी धोरण संतापजनक आहे.

गामा पैलवान's picture

9 Jul 2021 - 6:43 pm | गामा पैलवान

श्रीगुरुजी,

तुमच्या या संदेशाशी ९९% सहमत आहे. फक्त हे संतापजनक नाही, इतकाच मतभेद आहे. मोदी वगळता भाजप बाकीच्या पक्षांसारखाच आहे. संतापायचं कुणावर?

आ.न.,
-गा.पै.

गॉडजिला's picture

10 Jul 2021 - 3:44 pm | गॉडजिला

भाजपाने घएआणेशाहीला अजुन मैदान मोकळे सोडलेले नाही विशेषतः मंत्रिमंडळ विस्तार बघितला तर पदे वाटपकरताना घराणेशाही बाजुला ठेवली आहे प्रसंगि नाराजी पत्करुन

गामा पैलवान's picture

11 Jul 2021 - 2:01 pm | गामा पैलवान

गॉडझिला,

तुमच्या म्हणण्यात तथ्य निश्चित आहे. मात्र, मला हे भाजपपेक्षा मोदींचं धोरण वाटतं.

आ.न.,
-गा.पै.

जेम्स वांड's picture

10 Jul 2021 - 9:05 am | जेम्स वांड


मोदी वगळता भाजप बाकीच्या पक्षांसारखाच आहे. संतापायचं कुणावर?

पार्टी विथ अ डिफ्रन्स वगैरे काहीही नसतं इतपत निश्चितच मत झालेला (वांडो)