मुंबई सायकल कट्टा आणि "फूड सायकल by प्रशांत ननावरे"

मोदक's picture
मोदक in जनातलं, मनातलं
7 Aug 2017 - 2:28 am

रामराम...
मिपावर तुमचे सायकल-पराक्रम वाचतो. माझ्या एका मित्राच्या सायकल उपक्रमांविषयी तुम्हाला सांगावंसं वाटतं.
माझा मित्र प्रशांत ननावरे हा लोकसत्तामध्ये काम करतो. गेल्या काही महिन्यांपासून मुंबई आवृत्तीमध्ये दर शनिवारी 'खाऊखुशाल' हे खादाडीविषयी सदरही लिहितो. तसंच तो सायकलप्रेमीही आहे.

असा नूलकर काकांचा व्यनी आला. "आवडीनिवडी एक सारख्या आहेत तर एकदा भेटून गप्पा मारूया आणि खादाडी करूया.." असा प्लॅनही नूलकर काकांनी कळवला. सुरूवातीला ठरलेली तारीख मला जमणार नव्हती त्यामुळे मी इरसाल कार्टे आणि भटक्या खेडवालांचे नांव सुचवले व तुम्ही भेटा असे सुचवले, तर नूलकर काकांनी भेटण्याची तारीख पुढे ढकलूया असा तोडगा काढला.

..आणि मुंबई कट्ट्याची तयारी सुरू झाली. नूलकर काकांनी प्रशांतच्या यूट्यूब चॅनेलची लिंकही दिली होती त्यामुळे ते व्हिडीओ बघून झाले.

दादरला भेटणे आणि गप्पा खादाडी असा सरळ सोपा प्लॅन होता. बोका कुठेतरी मुंबईबाहेर आणि प्रासही बाहेर जाणार असल्याने दादरात जाऊन त्यांची भेट होणार नाही अशी चिन्हे होती. प्रशांत, नूलकर काका, भटक्या खेडवाला, इरसाल कार्टे आणि मी असा कोरम ठरला.

मी पुण्यातून डेक्कन क्वीनने निघालो. टीसी दिसल्या दिसल्या पँट्री कारचे लोकेशन विचारले तर त्याने खुशखबरी दिली की आज पँट्री कार नाही.
डेक्कन क्वीनची पँट्री कार + खंडाळ्याचे डोंगर + गरमागरम कॉफी - हे डेक्कन क्वीनचे नेहमीचे आकर्षण. आज नेमका या बेताला सुरूंग लागला कारण पँट्री कारच नव्हती.

मग निवांत पुस्तक वाचत दादर येईपर्यंत वेळ काढला. थोड्या थोड्या वेळाने नूलकर काका, भटक्या खेडवाला (भ.खे.) आणि इरसाल कार्टे तिघांचे मेसेजवर अपडेट येत होते.

दादर स्टेशनला उतरलो. लगेचच तिघेजण भेटले. मग आंम्ही पायीपायी एका इराण्याकडे कूच केले.

तेथे पोहोचतो न पोहोचतो तोच प्रशांतही आला. मग आंम्ही दाटीवाटीने भरलेल्या इराणी हाटेलात शिरून आणखी गर्दी वाढवली व एकाच टेबलाभोवती अ‍ॅडजस्ट झालो.

सुरूवात इराणी चहा आणि बन मस्का ब्रुन मस्का ने केली.

ब्रुन मस्का आणि बन मस्का मध्ये नक्की काय फरक असतो या विषयाने गप्पा सुरू झाल्या आणि नंतर चर्चेचे ट्रॅक झपाझप बदलू लागले. भ.खे आणि प्रशांत आधी भेटले होतेच. माझे आणि प्रशांतचेही अनेक सायकलवाले कॉमन मित्र निघाल्याने गप्पा आणखी रंगात आल्या.

चहा संपल्यानंतर आंम्ही एक मोकळे टेबल पटकावले आणि म्येन कोर्सची ऑर्डर दिली
.
खिमा पाव.
.
.
.
अंडा बुर्जी
.
.
.
ऑम्लेट
.
.
.
मी उगाचच कलात्मकता दाखवत एक फोटो काढला.
.
.
.

हे सगळे खाणे सुरू असताना गप्पा सुरू होत्याच.. एक दोन पावही मागवून झाले.
.
नंतर सुलेमानी चाय.
.
.
.
इथे प्रशांत फोटो काढत असताना मी त्याला सांगितले की फोटोमध्ये लिंबू पिळल्यानंतरचा थेंबही येऊदे.. ;)
.
.
.
मनसोक्त खादाडी झाल्यानंतर आंम्ही बाहेर पडलो. तेथे बाहेर पडताना मला एक पुस्तक दिसले. त्या पुस्तकामध्ये इराणी हॉटेल आणि त्यांचा पूर्ण इतिहास असावा असे वाटले. मी तेथील एकाला पुस्तकाबद्दल विचारले तर त्याने "चाबी नै है" असे सांगीतले. हे सगळे काऊंटरवरून मालक बघत होतेच.. आमचे संभाषण ऐकून ते स्वत: आले आणि पूर्वी कधीतरी लावलेले कुलूप काढण्याची खटपट करू लागले. तब्बल पांच मिनीटे खटपट बघितल्यानंतर "आता राहूदे" म्हणून मी निघालो तर त्यांनी थांबवूनच घेतले आणि यशस्वीपणे कुलूप काढले.

ते पुस्तक खास घ्यावे असे वाटले नाही.

"अरे आपण बिल तर दिले होते.. मग त्या मालकाने तुला का पकडून ठेवले होते..?" असे म्हणून भ.खे. काकांनी माझी खेचायला सुरू केली. :D

नंतर एक कोणतेतरी झाड बघायला आंम्ही चालत चालत बरेच दूरवर कुठेतरी गेलो.. त्या झाडाची माहिती नूलकर काका देतीलच.

त्या प्रचंड झाडाजवळ इरसाल कार्टं...
.
.

नंतर प्रशांतने आंम्हाला एका ठिकाणी नेले.

शेवपुरी सँडविच.
.
.
.
तेथून निघून परत आंम्ही मणीज जवळ पोहोचलो. त्या दरम्यान फोनाफोनी होऊन प्रास सायकलवर अवतरले...

मग पुन्हा नवीन विषय आणि नवीन गप्पा सुरू झाल्या...

मणीजची कॉफी..

.

डावीकडून प्रशांत ननावरे, प्रास, इरसाल कार्टं, सुधांशुनूलकर, भटक्या खेडवाला आणि मोदक

वेळ झाल्याने भ.खे.नी निरोप घेतला.. नंतर थोड्यावेळाने प्रशांतलाही निघायचे असल्याने त्यानेही आमचा निरोप घेतला. परतीची डेक्कन क्वीन दादरला थांबेल अशा आविर्भावात मी निवांत बसलो होतो... तोच नूलकर काकांनी अज्ञानात भर घातली आणि चला CST कडे असे फर्मावले. मग एका ठिकाणी बसची वाट बघून बस मिळाली नाही म्हणून आंम्ही टॅक्सीने फ्लोरा फाऊंटनला गेलो. तेथे पुस्तक खरेदी झाली आणि CST ला पोहोचलो.

झकास मजा आली. नूलकर काका आणि भ.खे.ना पहिल्यांदाच भेटलो... धो धो गप्पा झाल्या.. आता पुढचा कट्टा वाडा किंवा इंदापूर कुठेतरी करायचा असे याच कट्ट्याच्या वेळी ठरले.

**************************

प्रशांतच्या फूड सायकलचे २ एपिसोड -

.

**************************

मौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

क्या बात है! फारच भारी झाला कट्टा. कट्टेकऱ्यांची नावे लिहा की फोटोखाली.

ज्योति अळवणी's picture

7 Aug 2017 - 8:35 am | ज्योति अळवणी

अरे वा! मस्तच. मणिजचा भिसीबीली भात देखील A1 आहे बरका!

सायकल कट्टा म्हणून मी टाळले पण साधाच होता. आलो असतो दहा मिनिटे.

सावत्या's picture

7 Aug 2017 - 12:00 pm | सावत्या

माटुंगास्टेशन समोरचं गुप्ता चाट सेंटर का हो?

सुधांशुनूलकर's picture

7 Aug 2017 - 6:25 pm | सुधांशुनूलकर

बरोबर.

जेदि's picture

7 Aug 2017 - 12:55 pm | जेदि

इराणी होटॅल कोणते ?

सुधांशुनूलकर's picture

7 Aug 2017 - 6:29 pm | सुधांशुनूलकर

कॅफे कॉलनी - प्लाझाहून टिळक पुलावरून खोदादाद सर्कलकडे येताना सर्कलजवळ पुलाच्या पायथ्याशी, डावीकडे हिंदू कॉलनीत जाणार्‍या गल्लीच्या कोपर्‍यावर.

जेदि's picture

8 Aug 2017 - 1:08 pm | जेदि
धन्यवाद
वेल्लाभट's picture

8 Aug 2017 - 3:08 pm | वेल्लाभट

लाइट ओफ भारत ऐकलंच असेल. ओव्हनफ्रेशच्या सर्कल ला. अप्रतिम हॉटेल.

थोडं माटुंग्याकडे गेला असतात तर कूलार होतंच.

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Aug 2017 - 1:04 pm | डॉ सुहास म्हात्रे

सायकल कट्टा म्हणजे सायकली घेऊन भटकंती करत केलेला कट्टा असेल असे वाटले होते ! मात्र, गप्पा आणि पोटोबा मस्तं प्रकारे झाल्याने कट्टा भारी झाला यात वाद नाही (शिवाय फोटो होतेच साक्षीला) :) ब्राव्हो !!

इरसाल कार्टं's picture

7 Aug 2017 - 8:51 pm | इरसाल कार्टं

भरपूर गप्पा आणि दिवसभर खादाडी.

सुधांशुनूलकर's picture

8 Aug 2017 - 1:16 pm | सुधांशुनूलकर

समानशीले व्यसनेषु सख्यम्... सायकलचं वेड - व्यसनच म्हणा ना - या एकाच गोष्टीसाठी मोदक पुण्याहून, इरसाल कार्टं वाड्याहून तर भ खे (कामावर जायचं असूनसुद्धा) अंबरनाथहून आले, यासाठी सर्वांचं खूप कौतुक करावंसं वाटतं. प्रशांतची तर माझ्याव्यतिरिक्त कुणाशीच ओळख नव्हती; आणि बाकी सगळे सायकलवीर, मी मात्र सायकलशी काहीही संबंध नसणारा. माझ्या अतिशय बाळबोध (खरं म्हणजे बालिश) प्रश्नांना त्यांनी न हसता उत्तरं दिली.

सर्वांशी झालेल्या गप्पांमधून या सर्वांच्या सायकलप्रेमाचे बरेच पैलू उलगडले. बहुतेकांना अगदी लहानपणापासून सायकलचं वेड होतं. सगळेच जण (मीसुद्धा) लहानपणी चारपाच वेळा धडपडून, गुढघ्या-ढोपराला फोडून घेऊन सायकल शिकलेले असतात. मोठेपणी हा छंद लागल्यावर या सर्वांना इतर अनुभवी सायकलपटूंकडून प्रोत्साहन आणि मार्गदर्शन मिळालं; तसंच आपल्या उद्दिष्टांनुसार योग्य सायकल कोणती, ती कुठून कशी किती किमतीला मिळेल याबद्दल मदतही मिळाली. सायकल महागडी असली तर ती चांगली असते, हा गैरसमजही दूर झाला. भटक्या खेडवालांना मात्र बहुधा मिपावरून सायकलिंगची प्रेरणा मिळाली असावी. सायकल हा छंद जोपासताना सर्वांना खूप काही अनुभव, खूप माणसं मिळाली. एक छंद म्हणूनच सगळे सायकलिंग करतात, ‘फिटनेस’हे उद्दिष्ट ठेवलेलं नसतं, तर हा छंद जोपासताना फिटनेस आपोआप साधला जातो.

वदनी कवळ घेता...
वदनी कवळ घेता..... अन्न हे पूर्णब्रह्म
डावीकडून - भटक्याखेडवाला, मोदक, सुधांशुनूलकर, इरसाल कार्टं, प्रशांत ननावरे.

प्रशांतने सायकलप्रेमाला वेगळे आयाम दिले आहेत. लोकसत्तामध्ये एक वर्षभर सायकलविषयक सदर लेखन केल्यावर आता त्या लेखांचं एक पुस्तक प्रकाशित होईल. तसंच, सायकलप्रेमाला खादाडीप्रेमाची जोड देऊन त्याने ‘फूड सायकल’ हा व्हिडिओ उपक्रमही सुरू केलाय, त्याचे दोन व्हिडिओ मोदकने वर दिलेच आहेत. काही दिवसांपूर्वी प्रशांतने ‘दो पहिया’ हा सायकलवर आधारित लघुचित्रपटांचा महोत्सवही आयोजित केला होता. त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला.

खादाडीसाहित गप्पा झाल्यावर आम्ही चालत चालत माटुंग्याला महेश्वरी उद्यानाजवळ ‘अंदमान पॅडॉक’ हे अजस्र आवळेजावळे वृक्ष पाहायला गेलो. यांना फुलोरा आल्यावर आठ-दहा दिवसात पावसाला सुरुवात होते, असं निरीक्षण आहे. आपण तीन जणांनी हातात हात धरून रिंगण केल्याइतका या एका वृक्षाचा बुंधा मोठा आहे.

अंदमान पॅडॉकजवळ

तिथून रुइया कॉलेजजवळ मणीजमध्ये कॉफी प्यायला आल्यावर प्रासना फोन केला, तेव्हा कळलं की ते मुंबईतच होते. लगेच सायकलवरून येऊन त्यांनी सायकल कट्टा सार्थ केला. मग गप्पांना प्रासरंग चढला. दोन वाजत आले होते, भटक्या खेडवालांना कामावर जायचं होतं, त्यांनी निरोप घेतला. प्रशांतलाही कुठे जायचं होतं, मग त्यानेही निरोप घेतला.

तर असा झाला हा सायकलवेड्यांचा कट्टा. खूप मजा आली. आता वाड्याच्या कट्ट्यासाठी उत्सुक आहे. तो कट्टाही असाच मस्त होईल, याची खातरी आहे.

फोटो – प्रशांत ननावरे.

मस्त वृत्तांत. मिपाकर एकमेकांना भेटण्यासाठी इतक्या लांबून लांबून येतात ही मिपासाठी गर्वाची बात आहे. 'अंदमान पॅडॉक' या वृक्षाबद्दलही थोडीशी माहिती लिहा. इन फॅक्ट, वृक्षवल्लींवर एखादी लेखमालाच लिहू शकाल असे सुचवतो. कृपया मनावर घ्या.

सुधांशुनूलकर's picture

8 Aug 2017 - 5:19 pm | सुधांशुनूलकर

वृक्षवल्लींवर एखादी लेखमालाच लिहिणं - हे माझ्या आवाक्याबाहेरचं काम. झाडाझुडांबद्दल मला फार काही माहीत नाही. हा माझा विनय वगैरे नसून वस्तुस्थिती आहे. म्हणून 'That's not my cup of tea.'
कीटक, फूलपाखरं, पक्षी, साप-बेडूक, सस्तन प्राणी यांच्याबद्दलच थोडंफार माहीत आहे, त्यामुळे मिपावर त्याबद्दलच लेखन केलं आहे.

खरं तर भटक्या खेडवालांना वृक्षवल्लींबद्दल खूप माहीत आहे. त्यांनी लिहावं अशी त्यांना विनंती.

मिपाकर एकमेकांना भेटण्यासाठी - ओळख नसतानाही, पूर्वी भेट झालेली नसतानाही - इतक्या लांबून लांबून येतात, ही मिपासाठी खरंच अभिमानाची गोष्ट आहे. मला भाजे लेणी दाखवायला प्रचेतस-सगा-नाखु वगैरे पुणेकर पुण्याहून मुद्दाम येतात, तर पुणेकरांना ओरिगामी प्रदर्शन दाखवायला पुण्याला यावंसं मला वाटतं.... यातच सर्व काही आलं, म्हणून तर मिपाकर ग्रेट आहेत.

पद्मावति's picture

8 Aug 2017 - 1:20 pm | पद्मावति

खुप मस्तं.

भ ट क्या खे ड वा ला's picture

9 Aug 2017 - 2:16 pm | भ ट क्या खे ड वा ला

हा कट्टा जमवायचं काम सुधांशु नूलकर यांनीच केलय . माझी व प्रशांतची जुजबी ओळख होती, आता ती परिचयात बदलली, सुधांशु सरांबरोबर काही कट्टे व एक मोठी सहल ही केली होती, मोदक व इरसाल कार्ट यांना भेटायची खूप उत्सुकता होती, कारण सायकल सायकल या समुहावर कायम भेटतो पण प्रत्यक्ष पाहिले नव्हते.
सायकल च्या वेडाची लागण प्रथम २००८ च्या डिसेंबर मध्ये झाली, जेव्हा गोव्याला दूधसागर ट्रेक ला गेलो होतो. तेथे एका वस्तीच्या ठिकाणी ट्रेकर्स व सायकल वाले एकत्र असतात. ५० शी नंतर वळू सायकलिंग कडे असे तेव्हाच ठरवले होते. प्रशांत ची लोकसत्ता मध्ये गेल्या वर्षी आलेली लेखमाला नियमित वाचत होतो. त्यामुळे सायकल विषयक द्यानात खूप भर पडली, जालोरीपास सायकल ट्रेक केला तेव्हा या क्षेत्रातले दिग्गज भेटले व हा छंद वाढत गेला. मोदक ही असाच दिग्गज आहे सायकलिंग मध्ये. इरसाल कार्टे ची व माझी ही छान दोस्ती झाली.
मिपा चा कट्टा म्हणजे खादाडी हवीच, ती भरपूर झालीच व गप्पा ही मस्त रंगल्या,
मोदक चे खास कौतुक ,कारण पुण्याहून येऊन पूर्ण वेळ सहभागी झाला. सायकल, वाचन , संगणक अशा अनेक विषयात माहीर आहे हा भला माणूस.
दो टकीयोन्की नौकरी के लिये लाखोन्का कट्टा अर्धवट सोडून जावे लागले, त्यामुळे प्रास शी फार गप्पा मारता आल्या नाहीत. कट्टा सोडून निघालो ते मात्र पुन्हा भेटण्याचे इरादे करूनच

स्थितप्रज्ञ's picture

9 Aug 2017 - 4:29 pm | स्थितप्रज्ञ

प्रशांतच्या लेखांची लिंक इथे टाकू शकाल काय?

इरसाल's picture

9 Aug 2017 - 3:16 pm | इरसाल

स्रळ स्रळ अन्याव हाये युरॉनर. श्रावणात असे अभक्श भक्षण केल्याचे फटु, कुठे फेडाल ही पापं ?????????

पिलीयन रायडर's picture

9 Aug 2017 - 7:05 pm | पिलीयन रायडर

ए हा सायकलवाल्यांचा फुड कट्टा आहे! सायकली नाहीचेत तर सायकल कट्टा कसला रे?! पण बरंय, तुला विदाऊट सायकल कधी मधीच पहायला मिळतं. चेंज बरा वाटला!

प्रशांत ह्यांचे दोन्ही व्हिडीओ पाहिले. काहीच्या काही उच्च प्रकार आहे हा तर! मला अजिबात वाटलं नव्हतं की इतक्या उत्तम दर्जाचे व्हिडीओ असतील. कॅमेरा, स्क्रिप्ट आणि सादरीकरण, सर्वच अप्रतिम! स्पेशल मेन्शन फॉर सबटायट्ल्स.

ह्या सर्वात सायकल्सची माहिती हा एक भन्नाट ट्विस्ट आहे. त्यातही मला "बांबुची" तर फारच आवडलीये!!

एकच बारिकशी तक्रार, व्हिडीओची क्लॅरिटी शेवटी एकदम घसरते. टिमची नावं येतात ती अजिबात कळत नाहीयेत. ब्लर झाली आहेत. तेवढं बघा.

सबस्क्राईब केलंय "फूड सायकल"ला. वाट बघते अजुन व्हिडीओजची.

अभिजीत अवलिया's picture

9 Aug 2017 - 10:09 pm | अभिजीत अवलिया

आवडला कट्टा ...