’हॅरी पॉटर’: कास्टिन्ग (भाग १)

अनिरुद्ध प्रभू's picture
अनिरुद्ध प्रभू in जनातलं, मनातलं
11 Jul 2017 - 9:30 am

’हॅरी पॉटर’ म्हटलं कि सर्वात आधी आठवतात तीन नावं – अभ्यासात सर्वात हुशार असलेली हर्मायनी ग्रेंजर, थोडासा मस्तीखोर, घाबरट आणि एका उंदराच मालक असलेला रॉन विजली आणि द स्टार ऑफ द फिल्म अर्थात ’हॅरी पॉटर’ .... ही तीन पात्र ज्यांनी पडद्यावर रंगवली ती आता ३० च्या घरात आहेत.
हर्मायनी रंगवली ती ब्रिटिश अभिनेत्री एमा वोट्सन या ब्रिटिश अभिनेत्रिने. पहिल्या भागात काय cute दिसते ती. रॉन विजली उभा केला तो रुपर्ट ग्रीन्ट याने. सुरुवातीला अगदीच वेंधळा वाटत असला तरीही पहिल्या भागाच्या शेवटी बुद्धिबळाचा डाव खेळताना काय सुंदर अभिनय केलाय पठ्ठ्याने. आणि ’हॅरी पॉटर’ रंगवला तो निळ्या डोळ्याच्या डॅनियल रॅडक्लिफने . हि पात्र आज सगळ्यांना ठाऊक आहेत. या तिघांचही या चित्रपट श्रुन्खलेशिवाय स्वतःच असं एक नाव आणि वलय आहे, पण हे सर्व आता.......ज्यावेळी म्हणजेच २००० साली आणि फिलोसोफार स्टोन वर चित्रपट बनवण्याची तयारी वार्नर ब्रोझ. करत होते तेव्हा ही तीन महत्वाची पात्र शोधण कठीण झालं
होत. जेव्हा हि कथा सुरु होते तेव्हा ही तीनही पात्र जेमतेम १०-१२ वर्षांची आहेत, म्हणून त्याच वयातली मुल निवडायची होती. दिग्दर्शक म्हणून ख्रिस कोलंबस चिंतेत होता.अशावेळी हजारो मुलांच्या ऑडिशन मधून त्यावेळी कुणीच नसलेल्या एमा आणि रुपर्ट ला निवडलं. या दोघांनी यापूर्वी फक्त शाळेत नाटकात काम केलं होत. ही निवड झाली तेव्हा रुपर्ट ११ वर्षांचा होता आणि एमा १० वर्षांची. हर्मायनी आणि रॉनची निवड झाली असली तरीही महत्वाचं पात्र अजून सापडलं नव्हत . ’हॅरी पॉटरसाठी जवळपास सात महिने शोध चालू होता पण तो कसा संपला ही एक रंजक कथा आहे.
या चित्रपटा चे निर्माते डेव्हिड हेअमन आणि पटकथाकार स्टीव्ह क्लोव्ह लंडन मध्ये एका चित्रपटगृहात बसले होते. त्यांच्या सीट्सच्या मागे एक निळ्या डोळ्यांचा, चुणचुणीत असा मुलगा बसला होता. त्या मुलाबाबत डेव्हिड सांगतात, ‘ सगळ्यात पहिल्यांदा मला त्याचे मोठे निळे डोळे आवडले. माझ्यावर त्याच पाहिलं इम्प्रेशन तो खूप जिज्ञासू आणि ज्ञान मिळवण्यासाठी उत्सुक आहे अस पडल होत. ‘ त्या मुलाच नाव होत डॅनियल रॅडक्लिफ ......... डॅनियलने याआधीच आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात BBC TELEVISION च्या डेव्हिड कोपर्फिल्ड (DEVID COPPERFIELD) मध्ये काम करून केली होती. तिथे सगळ्यात पहिल्यांदा हा मुलगा कुणाच्या नजरेत भरला तर तो मॅगी स्मिथ च्या.. या मॅगी स्मिथ म्हणजेच Prof. Minerva McGonagall. त्याही या सिरीज मध्ये काम करत होत्या. श्रुन्खलेसाठी त्यांची निवड आधीच झाली होती. पण त्यांना ठाऊक होत कि दिग्दर्शक ख्रिस कोलंबसना हॅरी पॉटर अजून मिळाला नाही. डॅनियल रॅडक्लिफला त्यांनीच सर्वात आधी हॅरी साठी सुचवलं. आपण निवडलेला मुलगा हाच मॅगी स्मिथने ज्या मुलाला सुचवल तो आहे हे कळाल्यावर ख्रिस कोलंबस भन्नाट खुश झाला होता. विशेष म्हणजे जेव्हा जे.के. रोलिन्ग ला हे कळालं तेव्हा तिने कोट केलं कि ख्रिसला डॅनिअलपेक्षा अजुन चांगला हॅरी पॉटर नक्कीच मिळाला नसता . पुढे मग डॅनियलच्या आईवडलांनी त्याला परवानगी दिली, तो निवडला गेला आणि पुढे काय घडल ते आपल्याला ठाऊकच आहे.....

क्रमशः

©अनिरुद्ध दिलिप प्रभू
ll श्रीजेकेरोलीन्गापर्णामास्तु ll

चित्रपटमाहिती

प्रतिक्रिया

उगा काहितरीच's picture

11 Jul 2017 - 9:38 am | उगा काहितरीच

जरा मोठाले भाग येऊ द्या की साहेब !

अनिरुद्ध प्रभू's picture

11 Jul 2017 - 9:41 am | अनिरुद्ध प्रभू

पण मोठाल्या भागात मजा येत नाय राव..........
तरीही नेक्स्ट टाईम ऩ़क्की.....

हॉलिवूडसाठी ब्रिटन म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीसारखे दिसते.
लैच दर्जेदार अभिनेते आणि अभिनेत्र्या ब्रिटिश आहेत. अर्थात मराठी प्रमाणेच ब्रिटिश एकटिंग स्कुल ची प्राचीन परंपरा असणारच म्हणा.

अभ्या भाउ,

जवळपास ८० % लोक्स रन्गभूमीवरुनच तर येतात चित्रपटसृष्टीत

हर्मायनी's picture

11 Jul 2017 - 9:54 am | हर्मायनी

यात गंमत अशी की, पुस्तकात हॅरी पॉटर चे डोळे त्याच्या आईसारखे म्हणजेच हिरवे आहेत पण डॅनिअल रॅडक्लीफ चे डोळे निळे आहेत. आणि रॉन विझली चे डोळे निळे आहेत मात्र रुपर्ट ग्रीन्टचे डोळे हिरवे आहेत.. :p

अनिरुद्ध प्रभू's picture

11 Jul 2017 - 10:15 am | अनिरुद्ध प्रभू

हॅरी पॉटर चे डोळे त्याच्या आईसारखे म्हणजेच हिरवे आहेत पण डॅनिअल रॅडक्लीफ चे डोळे निळे आहेत

हर्मायनी,

यामागचा किस्सा वेगळा आहे.....

ख्रिसने डॅनिअलला हिरव्या रन्गाची लेन्सेस वापरयला दिले होते...कही काळ याच हिरव्या डोळ्यान्वर शूटही झाल पण नन्तर अस लक्षात आल कि डॅनला लेन्सेसची अ‍ॅलर्जी आहे.......सो त्याच्या निळ्या (खुप सुन्दर आहेत हे सुद्धा) डोळ्यान्वर रिशूट झाल....

मस्त सुरवात !! येऊ द्या अजून..

मी आणि मोठा भाऊ हॅरी पॉटरचे पंखे आहोत. मोठा भाऊ जरा जास्तच...
मला आवडणारे पात्र....डम्बलडोर आजोबा !!...
अन त्या हर्मायनीवर आपला लय जीव..तिच्याकडे तुमचे हिरवे/निळे/पिवळे/घारे डोळे वटारून पाहू नका रे...

अनिरुद्ध प्रभू's picture

11 Jul 2017 - 10:42 am | अनिरुद्ध प्रभू

लवकरच लग्न करित आही चिनार भौ.........

तिथंच घोळ झाला ना..आमचं गोत्र एकचं निघालं म्हणून आमचे घरचे नाही म्हणाले राव..
एव्हाना हॉग्वर्ट्सला आमच्या पुढच्या पिढीने ऍडमिशन घेतली असती..जोडीने सोडायला आलो असतो प्लॅटफॉर्मवर...

अनिरुद्ध प्रभू's picture

11 Jul 2017 - 1:04 pm | अनिरुद्ध प्रभू

.आमचं गोत्र एकचं निघालं म्हणून आमचे घरचे नाही म्हणाले राव.

वाट लागली राव हसुन हसुन

सिरुसेरि's picture

11 Jul 2017 - 1:50 pm | सिरुसेरि

रुपर्ट ग्रीन्ट / रॉन हा काही वर्षांपुर्वी "मोजो" नाटकामधे काम करत होता .

पद्मावति's picture

11 Jul 2017 - 2:14 pm | पद्मावति

सुंदर सुरूवात. मस्तच. पु.भा.प्र.
जमल्यास जरा मोठे भाग टाका प्लीज. हे म्हणजे 'दिल अभी भरा नही' असे झालेय :)
एमा वाट्सन सगळ्यात आवडीची. आता ब्यूटी अँड द बीस्ट मधे काय गोड दिसलीय.

पिशी अबोली's picture

11 Jul 2017 - 5:17 pm | पिशी अबोली

खरं सांगायचं तर पहिल्या चित्रपटात सगळे त्यांच्या पुस्तकातील वर्णनाप्रमाणे दिसलेत. रॉन तर विशेष आवडतो.

नंतर नंतरच्या चित्रपटांमध्ये हॅरीला हिरो, रॉनला त्याची साईडकीक आणि हरमायनीला चित्रपटांच्या स्टँडर्ड प्रमाणे सौंदर्यवती बनविण्यात त्यांच्या कॅरॅक्टर्सची अफलातून वाट लावलीये. या पूर्ण सिरीजमध्ये तगडे ऍक्टर्स घेऊन त्यांची अगदी शिस्तीत माती करायचा विडा उचलला होता काय कोण जाणे..

पहिल्यापासून शेवटपर्यंत always आवडलेलं पात्र एकच..

जेम्स वांड's picture

11 Jul 2017 - 6:59 pm | जेम्स वांड

क्युट म्हणावं असलं लेखन आहे प्रभू !.

आपले आवडते डोंबलडोर आजोबाच आहेत, त्याशिवाय सिरीयस ब्लॅक अन मिसेस विजली अन फ्रेड अँड जॉर्ज सुद्धा आवडते, जिनी विजली फक्त हॅरी मुंजा मरू नये अन दोस्ती को रिष्तेदारी मे बदलणे की सोय असावी असे वाटते (पुस्तक अन चित्रपट दोन्हीत) शिवाय लुना लॉंगवूड का लॉंगगुड कोण ती पोरगी असते तिचे गूढ वागणे पाहून भीतीच वाटत असे.

मनिमौ's picture

11 Jul 2017 - 9:19 pm | मनिमौ

जरा मोठे टाका की भाग. डडली आणी हॅग्रिड कसे काय आठवले नाहीत कुणाला?

वरुण मोहिते's picture

13 Jul 2017 - 2:55 pm | वरुण मोहिते

लिहा पुढचाही भाग .. पुस्तकांचा फॅन . मुव्ही चा नाही जास्त . पण कास्टिंग जबरदस्त झालेली .