मांजर टाळण्यायोग्य प्राणी आहे का?

श्रीगुरुजी's picture
श्रीगुरुजी in काथ्याकूट
1 Jul 2017 - 3:08 pm
गाभा: 

मांजर टाळण्यायोग्य प्राणी आहे का?

काही दिवसाआधी मी मीत्रा कडून एक मांजरीचे पीलू आणले. ही मांजर म्हणजे मला आणी माझ्या भावाला जीव की प्राण. पण माझ्या आई वडिलांना ती मांजर क्षण भरही चालत नाही. त्यावरून रोज सुनावणी. मला हे समजत नाही की कुत्रा सर्वांना चालतो तर मांजर का नाही?

प्रतिक्रिया

मांजर चालत असेल हो, कोणी तीचे पाय बांधले आहेत का बघा.

मुक्त विहारि's picture

1 Jul 2017 - 3:42 pm | मुक्त विहारि

मांजर, कुत्रा, कोंबडी यासारखे उपयुक्त प्राणी शेतघरात हवेतच.

(धागा कुठल्याही प्रकारचा असओ, आम्ही आमच्या मताला ठाम रहायचा प्रयत्न करतो.)

सतिश पाटील's picture

1 Jul 2017 - 3:57 pm | सतिश पाटील

घरात उंदीर आला की मांजर हवीच.
मांजर टाळण्यायोग्य प्राणी नाही.

दीपक११७७'s picture

1 Jul 2017 - 5:09 pm | दीपक११७७

कुत्रा आणि मांजर या पाळीव प्राण्यांतील फरक म्हणजे

कुत्रा हा मालक या व्यक्तीला बांधलेला असतो . मालक जाईल ती कडे हा जातो. मागे लागतो

तर

मांजर ही घराला बांधलेली असते. म्हणजे मालक घर रिकामे करुन गेला तरी ही तेथेच राहु शकते/राह्ते मागे लागत नाही.

या वरुनच कुत्रा हा मांजरी पेक्षा का श्रेष्ठ आहे याचा अंदाज यावा