वर्णभेद अजून शिल्लक आहेत ?

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
27 Jun 2017 - 10:39 pm
गाभा: 

धोंडो केशव कर्वेंनी आश्रमात आश्रयास दिलेल्या सवर्ण स्त्रीयांच्या विरोधामुळे धोंडो केशव कर्व्यांना अस्पृश्य स्त्रीस आश्रय देणे शक्य झाले नव्हते, या बद्दल कर्व्यांवर टिका झाली. कर्व्यांच्या पुढच्या पिढीने कर्व्यांच्या चुकीची कबुली लगोलग दिली, पुढच्या पिढीने कर्व्यांच्या चुकीची कबुली आणि दिलगिरी व्यक्त केल्यामुळे कर्व्यांवरची टिका तेवढी ताणली जात नाही. अर्थात हा प्रश्न जातीयवादाचा होता. भारतीय जातीयवादी असलेतरीही वर्णवादी नाहीत असे गृहीत धरुन चालले जाते. गोर्‍या रंगाचे कौतुक असले आणि सावळा रंगाची थट्टामस्करी बर्‍याचदा भरकटत असली तरी त्यात युरोमेरीकेन वर्णभेदा प्रमाणे दुराव्या एवजी जिव्हाळ्याची भावना असण्याची शक्यता अधिक असे समजले गेल्याने आपण वर्णभेदाचे अस्तीत्व नाकारत असतो का ?

युरोमेरीकेन हँडशेकने दुरावा कमी होतो असे मानतात पण हँडशेक करुनही मनातला वर्णभेद संपून जिव्हाळा आणि संधींची समानता कितपत निर्माण होते ही साशंकीत बाब आहे. युरोमेरीकनांनी वर्णभेदाबाबत आत्मपरीक्षण करुन बदलण्याचे बरेच प्रयत्न केले आहेत नाही असे नाही. कॅनडासारखा शीखांना विद्वेषाने वागवणार्‍या देषाने भुतकालीन चुकांबद्दल दिलगिरी व्यक्त केलीच पण त्यांना समान संधी देण्याचा बराच प्रयत्न केला आहे. अशी उदाहरणे असली तरीही रोममध्ये काळा पोप निवडला जाणे अद्याप बाकी आहे. किंवा अगदी ताजी बातमी पहावयाची झाल्यास इंग्लडातील एका पंजाबी कपलला अनाथालयाने गोरीमुले दत्तक देण्यास नकार दिल्याची आहे.

अर्थात भारतीय वर्णवादी नाहीत यात पूर्ण तथ्य आहे का ? त्या पंजाबी कपलने गोर्‍या एवजी आफ्रीकन बाळ दत्तक म्हणून कितपत मोकळेपणाने स्विकारले असते हे ऑफर करुन पाहिल्या शिवाय सांगणे कठीण आहे. अगदी आफ्रीकन लोकही भारतीयांना वर्णवादी वागणून देतात नाही असे नाही. भारतीय वंशाच्या सावळ्या (काळ्या) व्यक्तीलाही गोरा किंवा पिवळा म्हणून लूटणे ह्यातही छुपा वर्णवाद असू शकतो आफ्रीकेपेक्षा अधिक भारतीय लोकसंख्या काळ्या वर्णाची असू शकते हे आफ्रीकनांच्या गावीही नसते. पण आपले भारतीयही कमी नाहीत स्वतःचा रंग कसाही असो सावळा किंवा काळा असला तरीही आफ्रीकेत त्यांच्या देशात राहून त्यांना त्यांच्या रंगावरुन हिणवणारे भारतीय पाहीले की नवल वाटते. म्हणजे आपण आफ्रीकन देशांच्या राजकीय स्वातंत्र्याची अधिक बूज राखली तरी वागण्यातला फरक आफ्रीकनांच्या नजरेतून सुटत नाही. महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रीकेत केलेले पहीले आंदोलन भारतीयांना स्थानिक पोस्ट ऑफीसात स्थानिकांसोबत प्रवेश करावा लागू नये म्हणून युरोपीयनांप्रमाणे स्वतंत्र दरवाजाच्या मागणीसाठी होते, ह्या बाबत गांधींच्या पुढच्या पिढ्यांनी अथवा अनुयायांनी प्रांजळ दिलगिरी अद्यापतरी व्यक्त केली असावी असे वाटत नाही.

वरचा परिच्छेद युरोमेरीकेत वर्णभेद नाहीच म्हणणार्‍यांसाठी लिहीला. अर्थात एका चुकीने दुसर्‍या चुकीचे समर्थन होत नाही. दुसर्‍या बाजूला दिल्ली रेसकोर्साची परवाची बातमी आहे. पाम थिमय्या नावाच्या क्लब मेंबर ने आसामच्या ? बिझनेस वूमनला जेवणाचे आमंत्रण दिले होते. बिझनेसवूमन सोबत तिच्या मुलाच्या गव्हर्नेस (घरगुती शिक्षीका) जेवणास सोबत (आमंत्रीतच) होती. तिच्या दिसण्या आणि पेहरावरुन क्लबच्या मॅनेजरने ऐन जेवण चालू असताना जेवणाचा टेबल सोडून जाण्यास सांगितले आणि तिचा अपमानही केला-अपमान करताना त्या मॅनेजरला ती नेपाळी वाटली म्हणे आणि प्रत्यक्षात मेघालयची होती - जे झाले त्याने नेपाळी लोकही दुखावणार ईशान्य भारतीयही दुखावणार आणि भारतातला घरकामगार वर्ग आणि भारतीय घरकामगारांना चांगली वागणून दिली जात नाही हा जागतीक गवगवाही होणार. क्लबने मॅनेजरच्या एटीकेट्स बाबतच्या चुकीबाबत माफ मागितली पण क्लबमेंबरच्या स्टाफला क्लब मध्ये जॉईन होता येत नाही असा नियम असल्याचे सांगून त्याबाबत मेंबर चुक असल्याचे अप्रत्यक्ष सुचीत केले. एखाद्या क्लबमेंबरने आपल्या स्टाफला अथवा गेस्टच्या स्टाफला जेवणास सोबत घेऊन बसावे की नाही हा त्या क्लबमेंबरचा व्यक्तिगत प्रश्न असावयास नको का ? पण एकदा सरंजामशाहीची सवय झालेली असेल तर आपले नियम मुदलातच चुक आहेते हे समजवावे हा मोठा प्रश्न असतो. आणि हे सारे सरंजामशाही नियम असलेला उमरावांनाच उपलब्ध असलेला हा दिल्ली गोल्फ क्लब मायबाप भारत सरकारच्या आर्थीक मेहरबानीवर चालतो. उजव्या म्हणवल्या जाणार्‍या मोदी सरकारने लाल दिवेवाली सरंजामशाही बंद केली. लाल दिव्यांना सुरक्षेसारखा काहीतरी तर्क होता. पण स्वतःस समतावादी म्हणवणार्‍या नेहरुते आतापर्यंत समतावादाची दुहाई देत पोसली गेलेल्या दिल्ली गोल्फातील उमरावांच्या अधिकच्या समतावादाला मोदी सरकार लगाम लावणार का हे येणारा काळ सांगेल.

एनी वे चर्चेस प्रश्न हवा तो तसा शीर्षकात आहे त्या सोबत वर्णभेद दाखवणार्‍यां भारतीयांना आणि संस्थांना जबर आर्थीक दंडाची तरतूद असण्याची गरज आहे का ? यावर मिपाकरांचे मत काय ?

प्रतिक्रिया

मुद्दा खूपच रास्त आहे, आपण खरे तर दांभिक जास्त आहोत हेच परत परत अधोरेखित होते आहे, अगदी आताचे दार्जिलिंग च्या ज्या बातम्या येत आहेत किंवा तुम्ही उल्लेख केलेली घटना असो. सगळ्यात मोठी हाईट तर टीव्ही पत्रकार करत आहेत.. उदा. टूबलाईट चित्रपटातील भारतीय बालकलाकाराला लाईव्ह टीव्हीवर विचाराने कि "भारतात येऊन कसे वाटत आहे"

भारतीयांची वर्णभेदाबाबतची दांभिकता ही अत्यंत चीड आणणारी आहे. जातिव्यवस्थेचा पाया हा इतर कारणांबरोबरच वर्णभेदावरदेखील आधारलेला आहे हे वास्तव आपण मान्य करत नाही.

रामपुरी's picture

27 Jun 2017 - 11:54 pm | रामपुरी

"अगदी ताजी बातमी पहावयाची झाल्यास इंग्लडातील एका पंजाबी कपलला अनाथालयाने गोरीमुले दत्तक देण्यास नकार दिल्याची आहे."

यात नक्की काय चुकिचे आहे? जगभरात लहान मुले दत्तक देताना जे सर्वसाधारण लिखित्/अलिखित निकष असतात त्याला धरूनच आहे. आता पंजाबी जोडप्याला गोरी मुलेच हवी होती का? तसे असेल तर त्यांनाच वर्णभेदी म्हणावे लागेल.

माहितगार's picture

28 Jun 2017 - 7:27 am | माहितगार

मी बातमी जशी वाचली, पंजाबी कपलनी केवळ मुल दत्तक हवे आहे असे कळवले -गोरे काळे असे कळवले नाही- तर तुमच्या वर्णाचे मुल उपलब्ध नसल्याचे त्यांना सांगण्यात आले.

शिवाय एकाच्या चुकीने दुसर्‍याच्या चुकीचे समर्थन होत नाही. जगभराची रीत आहे म्हणून चुकीच्या रितींचे समर्थन कसे होऊ शकते. केवळ रुढींच्या नावावर जातीवाद आणि रंगभेदाचे समर्थन शतकोन शतके केले गेले. चुक ही चूक असते रुढी आहे म्हणून समर्थनीय ठरत नसावी.

रामपुरी's picture

28 Jun 2017 - 7:01 pm | रामपुरी

जगभराची "रीत" किंवा रूढी नाही, निकष आहेत. ते लहान मुलांच्या मानसशास्त्राला धरून असावेत. ४-५ वर्षांपुढील मुलांना एवढं नक्कीच समजेल की आई वडील आपल्यासारखे दिसत नाहीत. त्यावेळी त्या मुलावर काय परिणाम होईल? प्रत्येक मूल हे सहजतेने स्वीकारेल असं नाही. कदाचित या गोष्टीचा विचार त्यामागे असावा.
पंजाबी जोडपे भारतातूनही मूल दत्तक घेउ शकते आणि अफ्रिकेतील एखाद्या देशातूनही. पण त्यांनी तो पर्याय निवडला नाहीये.

माहितगार's picture

28 Jun 2017 - 8:13 pm | माहितगार

पंजाबी जोडपे भारतातूनही मूल दत्तक घेउ शकते आणि अफ्रिकेतील एखाद्या देशातूनही. पण त्यांनी तो पर्याय निवडला नाहीये.

ते जोडपे वंशाने पंजाबी मूळचे असले तरी भारताच्या संपर्कात कधी राहीलेले नाही, ब्रिटनमध्येच जन्मले आणि वाढले आहे त्यांनी त्यांना हवे असलेले मूल ब्रिटनच्या बाहेरुनच का आणावे ?

४-५ वर्षांपुढील मुलांना एवढं नक्कीच समजेल की आई वडील आपल्यासारखे दिसत नाहीत. त्यावेळी त्या मुलावर काय परिणाम होईल?

हा हा =)) काय विनोद आहे, आपण भारतीय नाही आहात का ? कारण वेगवेगळ्या रंगाचा फारसा संकर न झालेल्या / होऊ न दिलेल्या युरोमेरीकेतूनच अशी थेअरी येऊ शकते. भारतात (माझ्या घराण्याच्या इतिहासासहीत मला आठवणारी आजोबा-आजी ते या पिढीतील भाऊ-भावजया अर्थात त्यांची गोरी सावळी काळी मुले एकत्रच वाढतात) असंख्य कुटूंबात गोरी काळी सावळी एकत्र नांदत लग्न मुले करत आलेली आहेत. बाल विवाह घडवले जात त्या काळात लग्नाच्या मुलां-मुलींना रंगाचे चॉईस देण्याच्या प्रथा नव्हत्या. आर्थीक आणि वतनदारीच्या बेसिस वर लग्न लावली जात. कसले परीणाम होतात ? कसलेही नाही. अहंगंड न्यूनगंड मानवी स्वभावात केवळ रंगावरुन येत नाहीत इतर असंख्य कारणावरुन येऊ शकतात आणि त्यास सामाजिक आणिक मानसशास्त्रीय उपचार हा उपाय आहे. वर्ण संकराची भिती घालणे हा उपाय नव्हे.

रामपुरी's picture

29 Jun 2017 - 12:31 am | रामपुरी

" गोरी सावळी काळी मुले एकत्रच वाढतात"
भारतातील एका घराण्यातील मुले गोरी काळी असणे वेगळे आणि पूर्ण वंश वेगळा असणे वेगळे.

"बाल विवाह घडवले जात त्या काळात लग्नाच्या मुलां-मुलींना रंगाचे चॉईस देण्याच्या प्रथा नव्हत्या. आर्थीक आणि वतनदारीच्या बेसिस वर लग्न लावली जात. कसले परीणाम होतात ? कसलेही नाही"
हा निष्कर्श नक्की कसा काढला कळू शकेल का? बाल विवाहाचं समर्थन वगैरे करायचा प्रयत्न नसावा अशी आशा आहे.

"अहंगंड न्यूनगंड मानवी स्वभावात केवळ रंगावरुन येत नाहीत इतर असंख्य कारणावरुन येऊ शकतात आणि त्यास सामाजिक आणिक मानसशास्त्रीय उपचार हा उपाय आहे."
५-६ वर्षाच्या दत्तक मुलाला रंगावरून न्यूनगंड आला म्हणून मानसोपचार तज्ञ? धन्य आहे...

अश्या दत्तक मुलांच्या अडचणी जवळून पाहिलेल्या आहेत. जमल्यास एखाद्या अनाथाश्रमाला भेट देऊन माहिती घ्या. तिथल्या मुलांच्या बाजूने विचार करायचा प्रयत्न करा ही विनंती.

माहितगार's picture

29 Jun 2017 - 8:45 am | माहितगार

समस्या न्युनगंडाचीच असू शकते, एखादे मूल अपंग असेल त्यास अपंगत्वाचा न्यूनगंड येईल म्हणून तुम्ही न्यूनगंडावर समुपदेशनाचा उपचार शोधणार की अपंगांसाठी वेगळी वसाहत उभी करणार ? न्यूनगंड एकाच रंगाच्या घरात पण येत असतात. केस, उंची, सडपातळपणा ते लठ्ठपणा, डोळे डोळ्यांचे रंग, नाक सरळ आहे की चपटे आहे, कपाळ लहान आहे की मोठे आहे, कान सरळ आहेत की सुपासारखे आहेत, ओठ पातळ आहेत की जाड आहे, गालावर खळी पडते की नाही, दातांची ठेवण, हनुवटीची ठेवण, मान, खांदे लहान आहेत का मोठे आहेत, डावखूरा असणे, गुप्तांगांचे आकार लहान अथवा मोठे वाटून घेणे, अंगावरचे केस, पाय जुळवून उभे टाकल्यास गुडघे आणि मांड्या एकमेकांना टेकतात की टेकत नाहीत, तळपाय आणि त्याची बोटे फार लहान अथवा फार मोठी असणे, तळपाय सपाट असणे, तळपायाचे रंग, चालण्याची ढब , हे शारिरीक झाले सोबत आर्थीक स्थिती , शाळा ही केवळ काही उदाहरणे झाली अशी शेकडो नव्हे हजारो कारणे न्युनगंड उत्पन्न करत असतात. टाँट मारणारे कशावरुनही मारतात. त्यांना तोंड देण्याचे कौशल्य विकसीत करावयाचे की त्यापासून पळून जावयाचे ? रंगभेद न करणारी संस्कृती जोपासायची की इतर रंगभेद करणार्‍यांना घाबरुन अनीष्ट संस्कृती चालू ठेवायची ?

घरात जाणीवपूर्वक एकच रंग जोपासणारे काही अत्त्यल्प संखीय भारतीय मोजके समूह आहेत बाकीचा भारत तसे करत नसावा. असो.

रामपुरी's picture

29 Jun 2017 - 7:09 pm | रामपुरी

रंगभेद न करणारी संस्कृती जोपासायची की इतर रंगभेद करणार्‍यांना घाबरुन अनीष्ट संस्कृती चालू ठेवायची ?
तुम्ही फक्त दत्तक घेणार्‍यांच्या बाजूने विचार करताय मी मुलांच्या मनावर होणार्‍या परिणामांवर बोलतोय. अनाथाश्रमात जाऊन चौकशी केलीत तर तुमच्या कदचित लक्षात येईल की ईशान्य भारतातील मूलही सहजासहजी तुम्हाला दत्तक मिळणार नाही ( तुम्ही मराठी आहात हे गॄहित धरून). ईथे फक्त रंगभेदाचाच प्रश्न नसतो. मुलांना घर मिळते जुळते बघून दिले जाते. मुले म्हणजे पाळीव प्राणी नव्हेत की पाहिजे त्या रंग रूपाचे मूल अनाथाश्रमातून उचलून आणता येईल. खूप मोठी प्रक्रिया असते.
असो.. मागेच सांगितल्याप्रमाणे अशी उदाहरणे जवळून बघितली आहेत. समुपदेशनाचाही फारसा उपयोग होत नाही हे ही पाहिले आहे. तेव्हां तुमचे विचार तुमच्याजवळ माझे माझ्याजवळ.

आणि त्यांच्या एजंसीज ना सांगा एकदा.

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Jun 2017 - 2:19 am | डॉ सुहास म्हात्रे

वर्णभेद, धर्मभेद, जातीभेद आणि इतर मानवाच्या आर्थिक/सामाजिक स्तरावरून सर्वसामान्य जीवनात केलेले जाणारे भेद हे चीड आणणारे आहेत यात वाद नाही. मात्र ते जनमनात इतके खोलवर आहेत की मानवी जमात त्यातून बाहेर यायला अजून अर्धे एक शतक तरी जाईल. आणि कदाचित तोपर्यंत माणसे भेद करायला अजून काही कारणे शोधून काढतील. :(

माहितगार's picture

28 Jun 2017 - 7:38 am | माहितगार

खरे आहे. स्वतःचा अहंभाव सुखावण्यासाठी दुसर्‍यांना कोणत्या प्रकारे कमी दाखवता येईल हे मानवी स्वभावात आहे की संस्कृतीत कल्पना नाही. एका आफ्रीकन माणसाने भारतातील जातीवादाचा विषय काढला, मी ते चुकच आहे आणि होत असलेल्याया सुधारणणा प्रयत्नांची माहिती दिली. सोबत त्याच्या श्जारच्या देशात एका आफ्रीकन जमातीने दुसर्‍या आफ्रीकन जमातीचा केलेला मानव संहार त्या शिवाय आफ्रीकेत सुद्धा जाती सदृष्य स्ट्रॅटीफिकेशनची आठवण दिली. ईशान्य भारतीय आदीवासी जमातीसुद्धा आपापसात एक्दुसर्‍यांना पाडून पहात असतात.

एकुण स्वभावतः मानवात असेलही पण स्वभाव बदलून सांस्कृतीक बदल होणेही जरुरी आहे. आपण म्हणता तसा कालावधी नक्कीच लागेल.

गामा पैलवान's picture

28 Jun 2017 - 6:07 pm | गामा पैलवान

माहितगार,

तुमचा प्रश्न फारंच जटील आहे :

वर्णभेद दाखवणार्‍यां भारतीयांना आणि संस्थांना जबर आर्थीक दंडाची तरतूद असण्याची गरज आहे का ? यावर मिपाकरांचे मत काय ?

भारतात कितीतरी प्रकारचे भेद आहेत. तर मग वर्णभेदालाच दंड का बरं? तसंही पाहता घटनेने शासनास भेदभाव करण्यास मनाई केली आहे. मात्र तशी मनाई नागरिकांना करता येणार नाही. त्यासाठी प्रबोधनच करावं लागेल.

कृष्णवर्णीयांच्या वर्णभेदावरून आठवलं की अमेरिकेत कृष्णवर्णीयांत सवर्णी हिंसाचार (ब्लॅक ऑन ब्लॅक व्हायोलन्स) प्रचंड आहे. मात्र तरीही कृष्णधवल वर्णभेदाचे कायदे लागू करतांना ही बाब तितकीशी विचारांत घेतलेली दिसंत नाही (चूकभूल देणेघेणे). तसाच काहीसा प्रकार भारतात असू शकेल काय?

आ.न.,
-गा.पै.

गापै, भेदभाव करण्यास मनाई नागरिकांना देखिल केली आहे. अस्पृष्यतेच्या संदर्भात. संविधानाचे आर्टिकल १७.

माहितगार's picture

29 Jun 2017 - 2:57 pm | माहितगार

गापैंना समवर्णी म्हणावयाचे असावे.

...मात्र तरीही कृष्णधवल वर्णभेदाचे कायदे लागू करतांना ही बाब तितकीशी विचारांत घेतलेली दिसंत नाही

यात गापैंना काय म्हणू इच्छितात ते नेमके कळाले नाही.

भारतात कितीतरी प्रकारचे भेद आहेत. तर मग वर्णभेदालाच दंड का बरं? तसंही पाहता घटनेने शासनास भेदभाव करण्यास मनाई केली आहे. मात्र तशी मनाई नागरिकांना करता येणार नाही. त्यासाठी प्रबोधनच करावं लागेल.

केवळ घटनेत तरतुद असून अथवा प्रबोधनही पुरेसे ठरत नाही. कायद्याचा वचक असण्याची टांगती तलवार अल्पशी का होईना असावी लागते तशी भारतात religion, caste, sex डिस्क्रीमिनेशन टाळण्याबाबत दंड करणारे विवीध कायदे राज्य आणि केंद्रात सक्षम आहेत पण '(इकॉनॉमीक) क्लास' आणि 'रेस' या प्रकारांसाठी भेदभावपूर्ण वागणूक टाळण्यासाठी भारतीय कायद्यांत फारसे प्रोटेक्शन नाहीत. घटनेचे कलम १५ (२) अ वाचावे दिल्ली रेसकोर्सवर झालेला भेदभावातील हेटाळणी साठी नेपाळी म्हणणे हा उल्लेख रेसिस्ट ठरतो आणि घटनात्मक दृष्ट्या स्पष्ट पणे अवैध कृती आहे पण त्यासाठी दिल्ली रेसकोर्स अथवा अपमान करणार्‍या कर्मचार्‍यांना कोणत्याही प्रकारच्या दंडाची स्पष्ट तरतुद नाही. संदर्भ (चुभूदेघे)

आता कामगार / घर साहाय्यक / आया मोलकरीण यांना त्यांच्या कामाच्या स्तरावरून '(इकॉनॉमीक) क्लास' भेदभाव न करण्याची घटनेतील कलमांमध्ये माझ्या पहाण्यात आलेली नाही. दिल्ली रेसकोर्सच्या मॅनेजरने नेपाळी दिसण्याचा उल्लेख केला नसता आणि केवळ गव्हर्नेस आहात म्हणून बाहेर जा म्हटले तर तोही भेदभावच पण त्यासाठी घटनेत अथवा कायद्यात काही तरतूद आहे का माहित नाही.

माहितगार,

१.
मला म्हणायचंय की अमेरिकी काळ्यांमध्ये आपसांत इतका हिंसाचार होतो की गोऱ्यांनी केलेले काळ्यांच्या हत्या किरकोळ ठरतात. अशा वेळेस गोऱ्यांवर वर्णभेदाचा गुन्हा देखील दाखल करावा काय?

२.

पण '(इकॉनॉमीक) क्लास' आणि 'रेस' या प्रकारांसाठी भेदभावपूर्ण वागणूक टाळण्यासाठी भारतीय कायद्यांत फारसे प्रोटेक्शन नाहीत.

माझ्या मते खाजगी ठिकाणी व्यवस्थापन प्रवेशावर निर्बंध लागू करू शकतं. मात्र एकदा प्रवेश दिल्यावर बाहेर काढणं योग्य नाही.

आ.न.,
-गा.पै.

माहितगार's picture

29 Jun 2017 - 7:17 pm | माहितगार

गापै

१) पहिल्या याच्यात तुम्ही एका चुकीने दुसर्‍या चुकीचे समर्थन होते असे म्हणताय; वस्तुतः जेव्हा दोन चुका असतात, तेव्हा त्या दोन चुका असतात, एका चुकीने दुसरी चुक निरस्त झाली असे होत नसते आणि म्हणून एका चुकीने दुसर्‍या चुकीचे समर्थन रास्त ठरत नाही.

२) किमान दिल्ली गोल्फ क्लबला घटनात्मक दृष्ट्या रेसवरुन भेदभाव करता येत नाही कारण तो शासकीय जमिनीवर शासकीय आर्थीक सवलतींचा लाभ घेओ.

१५ (२) No citizen shall, on grounds only of religion, race, caste, sex, place of birth or any of them, be subject to any disability, liability, restriction or condition with regard to ..(b) the use of wells, tanks, bathing ghats, roads and places of public resort maintained wholly or partly out of State funds or dedicated to the use of the general public

नागरीकांची घटनेत नमुद कर्तव्यात sectional diversities बद्दल

to promote harmony and the spirit of common brotherhood amongst all the people of India transcending religious, linguistic and regional or sectional diversities; to renounce practices derogatory to the dignity of women;

नमुद केलेले आहे त्या शिवाय

(h) to develop the scientific temper, humanism and the spirit of inquiry and reform;

असेही कर्तव्य दिले आहे. कर्तव्यांची न्यायालय सहसा सक्ती करत नाहीत पण अलिकडे सिनेमा टॉकीज मध्ये राष्ट्रगीत चालू असताना उभे टाकण्याचा आदेश काढून सर्वोच्च न्यायालय गरज पडल्यास गोष्टी मनावर घेण्यास मागे पुढे पहाणार नाही हेही दाखवून दिले आहे.

त्याही पेक्षा भेदभावाची वागणूक राष्ट्रीय एकात्मतेच्या भावनेला तडा देणारी असते त्यामुळे त्यांचा वेळीच निषेध केलेला चांगला.

गामा पैलवान's picture

29 Jun 2017 - 10:38 pm | गामा पैलवान

माहितगार,

१. माझ्या युक्तिवादातून एका चुकीमुळे दुसऱ्या चुकीचं समर्थन कसं काय होतं ते कळलं नाही.

२. दिल्ली गोल्फ क्लब सरकारी अनुदानावर चालतो हे मला माहित नव्हतं. अशा परिस्थितीत नेपाळी महिला शासनाच्या प्रतिनिधीकडून मूलभूत अधिकार हनन झाल्याचा दावा दाखल करू शकते.

आ.न.,
-गा.पै.

माहितगार's picture

29 Jun 2017 - 3:03 pm | माहितगार

भारतीय घटनेचे कलम 51A ई :
(e) to promote harmony and the spirit of common brotherhood amongst all the people of India transcending religious, linguistic and regional or sectional diversities; to renounce practices derogatory to the dignity of women;

वरील प्रमाणे नागरीकांची कर्तव्ये नमुद करते त्यात sectional diversities हा उल्लेख बराच ब्रॉड आहे त्यात कामगारांचा अथवा आर्थीक स्तराचा समावेश करता येऊ शकेल पण पुन्हा तुम्ही म्हणता तसे प्रबोधन करावे लागणारे कर्तव्य आहे. त्या दृष्टीने कर्तव्यात चुकल्यास दंडाची तरतुद असण्यासाठी वेगळा कायदाच हवा.

मराठी कथालेखक's picture

28 Jun 2017 - 7:46 pm | मराठी कथालेखक

आडगुलं-मडगुलं या मराठी चित्रपटाची आठवण झाली.
छान खुसखुशीत चित्रपट आहे. कोकणस्थ कुटूंबातील एका दांपत्याला (सुबोध भावे - गिरिजा ओक) एक काळा मुलगा होतो. त्यामुळे कुटूंबातले बहुतेक सगळे दु:खी होतात चित्रविचित्र वागू लागतात. नायिका- म्हणजे त्या मुलाची आई (गिरिजा) आणि नायकाचे आजोबा (आईचे वडील) हेच काय ते आनंदात असतात. नायक संशयाने ग्रस्त असतो तर नायकाची आई , नायिकेचे आई-वडील ई सगळे शरमेने ग्रस्त ...
अशा तणावाच्या परिस्थितीत अगदी नाईलाजास्त्व नायकाचे वडील एक 'लाजिरवाणे' (म्हणजे त्यांच्या मते ) गुपीत उघड करतात ते म्हणजे 'माझे आजोबाही काळे होते' !!

पुष्करिणी's picture

29 Jun 2017 - 3:10 pm | पुष्करिणी

इंग्लंडमधे गोर्‍या कुटुंबाला सुद्धा आशियायी किंवा आफ्रिकन वर्णाची मुलं सहकासहजी दत्तक दिली जात नाहीत

http://www.dailymail.co.uk/news/article-1306887/White-couple-told-adopt-...

इंग्लडाची सध्याची स्थिती इतर वर्णिय शेजारी म्हणून चालतात, मिश्रवर्णिय विवाह चालतात पण घरात कुटूंबांचे घटक म्हणून दत्तक मूले चालत नाहीत अशी आहे का ?

बराक ओबामा दत्तक नव्हते पण मिश्रवर्णीय कुटूंबात वाढले, ऐन तारुण्यात त्यांची घालमेलही झाली म्हणतात पण सरते शेवटी आमेरीकेचे अध्यक्षपद ८ वर्षे सांभाळले. जन्मदत्त असो अथवा दत्तक असो संगोपन आणि आत्मविश्वासावर अवलंबून आहे.

सच्चिदानंद's picture

29 Jun 2017 - 6:10 pm | सच्चिदानंद

http://www.goodreads.com/book/show/6434826-toward-a-political-philosophy...

हे पुस्तक बघा.. काही इंटरेस्टींग संकल्पना मांडल्या आहेत.

गामा पैलवान's picture

29 Jun 2017 - 6:35 pm | गामा पैलवान

सौरा,

घटनेचं सतरावं कलम असंय :

“Untouchability” is abolished and its practice in any form is forbidden. The enforcement of any disability arising out of “Untouchability” shall be an offence punishable in accordance with law.

यामध्ये नागरिकांना थेट आज्ञा नाही. अस्पृश्यतेमुळे कोणालाही कसलीही अडचण आली तर शासनाने दंड करावा इतकीच आज्ञा आहे. या तरतुदीचा सर्वसामान्य नागरिकांना सहज बोध होणं कठीण आहे. त्यासाठी प्रबोधन हवंच.

आ.न.,
-गा.पै.

मुक्त विहारि's picture

29 Jun 2017 - 8:10 pm | मुक्त विहारि

आणि दिसतो तो वर्ण.

आमच्या ३-१३-१७६० ग्रहावर पण हीच स्थिती आहे. (तिथले नियम तर जास्तच कडक आहेत.)

सुखीमाणूस's picture

1 Jul 2017 - 11:35 am | सुखीमाणूस

काय असतो माहित आहे.
मी सावळी आणि भाउ गोरा . ८० च्या दशकात मुलान्चे मानसशास्त्र खिजगणतित नव्हते तेव्हा उघडउघड हेटाळणीने दु:खी व्हायचे.
माझी आजी मस्त समजूत काढायची
"गोरी गोरी पान तिच्या घरात घाण
काळी काळी कुळकुळीत तिच घर झुळझुळीत"

गुणवत्ता महत्वाची हे कळल्यावर पुढे कधीच त्रास झाला नाही.

मधे सैराट यशस्वी झाल्यावर माझ्या शाळेच्या WhatsApp groupवर मित्राचा message आला की रिन्कु राजगुरू च्या एवढया यशानन्तर पण तिचे फारसे कौतूक इतर उच्चवर्णिय कलाकारान्कडून झाले नाही. गुप्ते'खेडेकर,ताम्हणकर इ नावे होती त्या mesage मधे
मला तरी वाटले की असे नकळत उच्चवर्णियाना महत्व दिले जाते.
आज रिन्कूला मिळालेला पैसा,राज्यस्तरीय पुरस्कार याबरोबर recognition by established people पण आवश्यक वाटले.

ही मानवाची मानसिकता अशीच रहाणार.

गामा पैलवान's picture

1 Jul 2017 - 12:46 pm | गामा पैलवान

सुखीमाणूस,

सैराट चित्रपटाचा संदेश काय हे सर्वांना माहितीये. मग उच्चवर्णीयांना नकारात्मक रीतीने प्रस्तुत निंदा करणाऱ्या चित्रपटाची बेफाट स्तुती उच्चवर्णीयांनी का म्हणून करायची?

आ.न.,
-गा.पै.

माहितगार's picture

1 Jul 2017 - 1:44 pm | माहितगार

मी सावळी आणि भाउ गोरा .

अगदी वरच्या प्रतिसादात मि म्हटलच आहे काही अपवादात्मक जातसमुह सोडले तर किमान एक्स्टेंडेड फॅमिलीतील भांवंडे मोजली तर सावळे, गोरे, काळे वेगवेगळ्या शेड्स एकत्र नक्कीच सापडतात.

मराठी लोकगीतातील खालील ओवी लग्नांमध्ये रंगांचा विचार होतो पण मर्यादीतच होतो याची साक्षच आहे.

गोरी माझी मैना काळ्या सावळ्याला दिली
मोती पवळ्यात त्यात मिळवण केली
संदर्भ

तेव्हा त्यांची मुले, एकत्र कुटूंब पद्धती होती तेव्हा ते एकत्रच नांदणार हे सहाजिक होते. (आता विभक्त कुटूंबांमुळे लगेच लक्षात येत नाही) . इतर न्यूनगंडाच्या कारणांशी इतरांना जसे झगडावे लागते तसे सावळ्यांनाही न्यूनगंडातून बाहेर पडण्यासाठी भोवतालच्या परिस्थितीशी झगडावे लागते हे खरे आहे. तुम्ही खाली म्हटल तसे गुण महत्वाचे आहेत हे लक्षात आले की न्यूनगंड चालले जातात. कोणत्याही शारीरीक फिचरवरुन दुखावणे चुकच असते, आपण भारतीय संवाद साधताना याबाबत पुरेशी काळजी घेत नाही पण ती घेतली पाहीजे. अर्थात असे संवाद साधताना युरोमेरीकेत शाब्दीक काळजी घेतली तरी प्रत्यक्षात दुरावा ठेवला जातो, उलटपक्षी बोलण्यात काळजी न घेणारा भारतीय बहुतांश वेळी जिव्हाळा जपतानाही दिसतो. अर्थात शब्दही तोलून मापून वापरावेत आणि जिव्हाळाही जपावा हे सर्वात चांगले.

सावळ्या रंगाचे भारतीय साहीत्यातून वेळोवेळी सुरेख वर्णनेही आलेली आहेत वीष्णूदास नाम्याचे एक पद आहे.

विष्णुदास नाम्यांचे पद असे आहे

रात्र काळी,घागर काळी,यमुना जळे ती काळी हो माय !
बुंथ काळी,बिलवर काळे, गळामोती एकावळी काळी हो माय !
मी काळी, कांचोळी काळी, कांसे कांसिली ती काळी हो माय !
एकली पाणीया नच जाय साजणी, सवे पाठवा मूर्ती सावळी हो माय !
विष्णुदास नाम्याची स्वामिनी काळी, कृष्ण्मूर्ति बहु काळी हो माय !

संत तुकारामांचा एका अभंगात खालील प्रमाणे उल्लेख येतात

बहु काळीं बहु काळी । आम्ही देवाचीं गोवळीं ॥१॥
....

हरी तुझी कांति रे सांवळी । मी रे गोरी चांपेकळी ।
तुझ्या दर्शनें होईन काळी । मग हें वाळी जन मज ॥१॥
...

संत एकनाथ गाई बद्दल जरा वेगळ्या संदर्भात उदाहरण देताना म्हणताहेत

...गाय काळी आणि तांबडी । परी दुधीं वांकुडी चवी नाहीं ॥१८॥

गुणवत्ता महत्वाची हे कळल्यावर पुढे कधीच त्रास झाला नाही.

हे लक्षात आलेकी न्यूनगंडावर मात होतेच.

मनमोकळ्या प्रतिसादासाठी आभार

वर्णच काय कुठल्याही भेदाभेदावर आधारित वाईट ट्रीटमेंट ला विरोध.
फक्त माणसाच्या वाईट प्रवृत्तीचा अपवाद.