पहिला पाऊस- एक आठवण

एक प्रेमवेडा's picture
एक प्रेमवेडा in जनातलं, मनातलं
25 Jun 2017 - 4:13 pm

"लगी आज सावन की फिर वो झड़ी है।
वही आग सीने में फिर जल पड़ी है।

कुछ ऐसे ही दिन थे वो जब हम मिले थे। 
चमन में नहीं फूल दिल में खिले थे।

वही तो है मौसम मगर रुत नहीं वो..
मेरे साथ बरसात भी रो पड़ी है।"

         पाऊस येतो आठवणी घेऊन तिच्या सोबतीच्या. मनांत फुलवतो पुन्हा एक नाजूकसा धागा प्रितीचा..कुठं असेल बरं ती आज? तिलाही येत असेल का आठवण माझ्यासारखीच?..कदाचित..
         पहिला पाऊस तिच्या सोबतीतला!. कामानिमित्त आपापल्या घरापासून, गावापासून लांबवर असलेलं दोघांचं वास्तव्य..मग सहज म्हणून झालेली ओळख आणि पुढं जाऊन बहरलेली मैत्री..त्यातून फुललेलं अव्यक्त प्रेम.. त्याचाच  एक सुंदर प्रवास..कधी हसवतो कधी रडवतो..

    हातात हात गुंफून निर्वेध भटकताना पहील्या पावसात आणि पहील्यांदाच चिंब भिजलेलो आम्ही दोघंच! तिचं ते बघतच रहावं असलं मुर्तीमंत ओलेतं सौंदर्य. गालातल्या गालांत हसत एकदुसर्यांकडे बघताना दोघांच्याही मनांत फुललेल्या त्या 'कोमल' भावना..तिच्या डोक्यावरून खांद्यावर निथळणार्या पाण्याचे नितळ थेंब आणि केसांवरती वरतून पडलेल्या पाण्यामुळे तयार झालेले सप्तरंगी तुषार कसे आजही डोळ्यांसमोर नाचतात! सोबतीला अंगावर शहारा आणणारा थंडगार वारा आणि त्यामुळे हवाहवासा वाटणारा सहवास आमच्यातील प्रेमबंध आणखी दृढ करत होता. चिखलात पाय घसरून पडायला लागलेली ती..आणि तिला सावरायला मी पुढं केलेला माझा हात आपल्या हातात घेताना तिच्या चेहर्यावर अविष्कारलेली स्त्रीसुलभ ऋजुता आणि त्यामुळे तिनं खाली झुकविलेल्या तीच्या नाजूक पापण्या कसलं वेड लावून गेल्या! कितीतरी वेळ आम्ही दोघं त्या पावसात दिशाहीन भटकत होतो..अगदीच निर्विकारपणे!
    आता आहेत फक्त बेचैन करणाऱ्या काही आठवणी. मी अजूनही तिची वाट बघतोय. ती येईल कारण माझा तिच्या शब्दांवर आजही विश्वास आहे. तीनं म्हटलं होतं, "मी फक्त तुझीच आहे! वाट बघ मी नक्की येईन."
―₹!हुल/३१मे१७
[पुर्वप्रकाशित]

कथालेख

प्रतिक्रिया

फारच शॉट्कट मारलाय राव .....