आजारी व्यक्तिची देखरेख करणाऱ्या संस्थाबददल माहिती हवी आहे

बाप्पू's picture
बाप्पू in काथ्याकूट
24 Jun 2017 - 9:00 pm
गाभा: 

कोल्हापुर परिसरात आजारी आणि वयस्कर व्यक्ति ची देखरेख आणि औषधोपचार करणाऱ्या एखाद्या सेवाभावी संस्थेबददल माहिती हवि आहे.
आमच्या इथ गावीे शेतीवर काम करण्यास एक मजुर होता. आमच्या बरोबरच आजुबाजुला असणाऱ्या इतर घरी छोटी मोठी कामे करून उपजीविका करायचा.. परंतु वय झाल्यामुळे आजकाल काहि करने त्याला अवघड जात होते.. तरीही बिचारा दिवस ढ़कलत होता..
काहि दिवसांपूर्वी अचानक त्याच्या पायखालचे अवसान गेले.. त्याला पायावर उभे रहता येईना.. गवातल्या लोकांनि त्याला गावातील एका लहानश्या दवाखान्यात दाखल केले. पण तेथील डॉक्टर त्याचे निदान करण्यात सफल झाले नाही.. दुसऱ्या दिवशी त्याच्या माने पासून खालच्या सर्व हालचाली थांबल्या.
तेव्हा लोकांनी त्याला ससुंन हॉस्पिटल मध्ये बेवारस म्हणून दाखल करण्याचे ठरवले...
पुण्या पासून दूर असल्यामुळे आम्हाला या गोष्टिबाबत काहीच समजले नाही..

आम्हाला है सर्व समजताच त्याला आम्ही चांगल्या हॉस्पिटल मध्ये आनुन उपचार सुरु केले आहेत.. कारण इतके वर्ष इमाने इतबारे आमच्या शेतात काम करणाऱ्या मामा ला त्याच्या वाइट प्रसंगी वारयावर सोडने मनाला बरे वाटेना... त्याला ससुन सरख्या हॉस्पिटल मध्ये खितपत ठेवणे.. ते देखील बेवारस म्हणून.. कल्पनाच करवेना..

त्याच्या चांगल्या काळामध्ये त्याला फुकट मध्ये राबवुन घेणाऱ्या लोकांच्या जवळ आता त्याला आर्थिक आधार देण्याची थोडी देखील नियत नाहीये..

असो...

मोठ्या आणि चांगल्या दवखान्यात त्याला हवे असलेले सर्व उपचार आम्ही पूर्ण केले आहेत ..आता डॉक्टरांच्या मते तो चालू फिरु शकन्यासाठि वेळ लागेल.. कदाचित 4-5 महिने...

आता आम्हाला इच्छा असूनही त्याच्यावर खर्च करण्यासाठी वेळ नहिये. कारण त्याला बरे होण्यासाठी लागणारा अवधि मोठा आहे... .तसेच त्याला कोणीही वारस म्हणजे मुलगा किंवा मुलगी नहिये जो त्याची रोज देखभाल करेल...

अत्ता पर्यन्त त्याचा वैद्यकीय खर्च आणि देखरेख आम्ही माणुसकी च्या भावनेने केला.... परंतु 4-5 महीने कामधंदा सोडुन त्याच्यावर वेळ खर्च करु शकेल असे कोणी माझ्या कुटुंबात नहिएत.... तर त्यासाठी अशी कोणती सेवाभावी संस्था आहे का जी त्याची देखभाल करेल.. त्यासाठी लागणारा औषध आणि इतर आर्थिक खर्च देण्याची आमची तयारी आहे..

प्रतिक्रिया

अनिवासि's picture

26 Jun 2017 - 10:11 am | अनिवासि

पुण्याशेजारी खराडी ह्या गावी "बेहेरे " वृद्धाश्रम म्हणून
एक संस्था आहे.त्याला मधे भेट देण्याचा योग आलां
त्यांचा पत्ता इ. माहिती माझ्याकडे येथे नाही पण ति आपणास सहज मिळू शकेल.
मला तेथील व्यवस्था'स्वच्छता व कामगारवर्ग आवडला. आपल्याला ह्या माहितीचा उपयोग होइल ही इच्छा.

बाप्पू's picture

26 Jun 2017 - 6:26 pm | बाप्पू

प्रतिसादाबद्दल खुप खुप धन्यवाद... चौकशी करून पहतो..

अनिवासि's picture

26 Jun 2017 - 10:11 am | अनिवासि

पुण्याशेजारी खराडी ह्या गावी "बेहेरे " वृद्धाश्रम म्हणून
एक संस्था आहे.त्याला मधे भेट देण्याचा योग आलां
त्यांचा पत्ता इ. माहिती माझ्याकडे येथे नाही पण ति आपणास सहज मिळू शकेल.
मला तेथील व्यवस्था'स्वच्छता व कामगारवर्ग आवडला. आपल्याला ह्या माहितीचा उपयोग होइल ही इच्छा.

अनिवासि's picture

26 Jun 2017 - 10:11 am | अनिवासि

पुण्याशेजारी खराडी ह्या गावी "बेहेरे " वृद्धाश्रम म्हणून
एक संस्था आहे.त्याला मधे भेट देण्याचा योग आलां
त्यांचा पत्ता इ. माहिती माझ्याकडे येथे नाही पण ति आपणास सहज मिळू शकेल.
मला तेथील व्यवस्था'स्वच्छता व कामगारवर्ग आवडला. आपल्याला ह्या माहितीचा उपयोग होइल ही इच्छा.

गीयां बारे सिन्ड्रोम झालाय का रुग्णाला? वर्णनावरुन तेच वाटतंय.

फार कस पाहणारा आजार आहे. रुग्णासाठी आणि नातेवाईकांसाठीही. महिनोनमहिने लागतात. पण पूर्ण लाईफसपोर्ट आणि इन्फेक्शन्स, बेडसोअर्स वगैरेची २४ तास आयसीयूत काळजी घेतल्यास काही प्रमाणात तरी रिकव्हरी होते.

बाप्पू's picture

26 Jun 2017 - 6:28 pm | बाप्पू

बरोबर ओळखले गवि... हाच आजार आहे. धागा भरकटु नये म्हणून जास्त डिटेल नहि दिले... पण खरच खुप विचित्र आणि भयानक आजार आहे..

nanaba's picture

26 Jun 2017 - 9:00 pm | nanaba

ॲशी माणसे असतात बघून फार बरे वाटले.

आजारी व्यक्ती बरी व्हावी यासाठी प्रार्थना ! तुमचे कार्य स्तुत्य आहे.

एस's picture

28 Jun 2017 - 6:19 am | एस

+१.

पर्वती पायथा पुणे येथे कृृष्णप्रभू नावाचे hospital आहे तिथे महिन्याचे चार्जेस भरुन ठेवता येईल

दोन प्रकार आहेत कमी चार्जेस व जास्त चार्जेस लक्ष्मीनगर एरिया.

श्रीगुरुजी's picture

28 Jun 2017 - 5:20 pm | श्रीगुरुजी

येथील व्यवस्था चांगली नाही. परिचयातील एका व्यक्ती बद्दल वैयक्तिक वाईट अनुभव आहे.

माहितगार's picture

29 Jun 2017 - 3:41 pm | माहितगार

त्यांना बहुधा कोल्हापुर परिसरातील संस्थेची माहिती हवी असावी, पण या संस्थेचा विषय निघालाच आहे तर माझ्या परीचितांचा अनुभव खूपही वाईट नव्हता पण, मुख्य म्हणजे लिफ्ट शिवाय वरचा मजला छोट्या शेअर्ड रुम आहेत, चालणे फिरणे वाढताना स्पेस कमी पडू शकतो. चालत्या फिरत्या वृद्धांसाठी गैरसोईचेच आहे.

दुसरे विशेष आहाराची गरज असलेले रुग्णांसाठी तशी सोय नसल्याने गैर सोयीचे असू शकते.

फिजीओ थेरपी सपोर्ट हवा असल्यास तेथे तो रिझनेबल दरात असावा असे वाटते. वृद्धांना डायपर्सची गरज असेल तर ती तेथील मेडीकल पेक्षा होलसेलला अधिक रिझनेबल घेतलेली बरी पडतात.

पद्मावति's picture

27 Jun 2017 - 5:47 pm | पद्मावति

आजारी व्यक्ती बरी व्हावी यासाठी प्रार्थना ! तुमचे कार्य स्तुत्य आहे. असेच म्हणते.

आजारी व्यक्ती बरी व्हावी यासाठी प्रार्थना ! तुमचे कार्य स्तुत्य आहे.
खालील दुव्यांचा काही उपयोग होतो का बघा.
https://www.justdial.com/Pune/Charitable-Old-Age-Homes/nct-11051383
http://bestofhealthindia.com/seniors/list-of-old-age-homes-in-pune
http://www.aarogya.com/family-health/seniors-health/annasaheb-behere-old...

सर्व मिपाकरांचे धन्यवाद...

हा धागा काढला पण याचा update द्यायला विसरलो.
कोल्हापूर येथील एका केअर सेंटर मध्ये आम्ही त्याच्यावर यशस्वी रित्या उपचार करू शकलो. डॉक्टरांच्या आणि आमच्या प्रयत्नांना थोडे फार का होईना पण यश आले.

गीयां बारे सिन्ड्रोम ::::
भयानक आणि तुमच्या patiance आणि पैश्याची परीक्षा घेणारा आजार. पण आता आमच्या मामा ची ( आम्ही सगळे त्याला मामा च म्हणतो ) तब्येत आता खूप सुधारली असून सर्व सेन्सेस परत आले आहेत.. आता त्याचे हात पाय पुन्हा हालचाल करू लागलेत. परंतु इतके दिवस अंथरुणाला खिळून असल्याने त्याच्या स्नायूंची शक्ती कमी झाली आहे त्यामुळे चालू फिरू शकण्यास अजून थोडा अवधी लागेल असे डॉक्टरनाचे म्हणणे आहे. एवढ्या मोठ्या आजारातून आम्ही त्याला सुखरूप पाने बाहेर काढू शकलो हेच आमच्यासाठी खूप मोठी अचिव्हमेंट आहे.
तो पुर्णपणे बरा व्हावा आणि पुन्हा आपल्या पायावर चालू फिरू लागावा एवढीच इच्छा.