मेन्युकार्ड - लघुकथा

प्रतिक कुलकर्णी's picture
प्रतिक कुलकर्णी in जनातलं, मनातलं
22 Jun 2017 - 9:49 pm

नवीन शहर, नवीन भाषा. सगळं नवीन होतं माझ्यासाठी. चारही बाजूला हजार मैलांपर्यंत कोणीही ओळखीचं नाही. मी रेल्वेमधून उतरलो. गर्दीच गर्दी होती. भरपूर लोक होते. कानावर पडणारी भाषा अगदीच वेगळी. सगळीकडे लिहिलेलं त्या वेगळ्या भाषेतच होतं. लोक मात्र माझ्या शहरात होते तसेच होते. रंग, उंची, फारसा फरक नव्हता. मला जरा हायसं वाटलं. खूप मोठा प्रवास झाला होता, म्हणलं जरा श्वास घ्यावा. एका उपहारगृहात गेलो. कोपऱ्यातलं टेबल बघितलं, एका खुर्चीवर बॅग ठेवली, एका खुर्चीवर मी बसलो. सुरुवातीपासून शेवटपर्येंत मेन्यूकार्ड काळजीपूर्वक वाचून काढलं. पाकीट काढून पैसे किती आहेत बघितलं. वेटर आला. मी हव्या असलेल्या पदार्थासमोर बोट ठेवलं. तो गेला. मी उत्सुकतेने वाट पाहत बसलो काय येतय म्हणून. चहा किंवा कॉफी येईल असं मला वाटत होतं. वेटर हातात एक ताटली घेऊन आला. त्याने ती माझ्यासमोर ठेवली, झरकन निघुनपण गेला. मी विचारात पडलो. हे काय आणून ठेवलं याने? दुसऱ्या कोणाची ऑर्डर तर नाही. अचानक डोक्यात प्रकाश पडला. माझीच ऑर्डर आहे. मेन्युकार्डमध्ये एक अंकी किंमत असलेला एकमेव पदार्थ होता - एक्स्ट्रा पाव. मी पाव खाल्ला, पाणी प्यायलं आणि निघालो.

कथालेख

प्रतिक्रिया

ज्योति अळवणी's picture

22 Jun 2017 - 11:24 pm | ज्योति अळवणी

अहो ही तर लघुत्तम आहे... कथा पण नाही म्हणता येणार

चांदणे संदीप's picture

23 Jun 2017 - 10:37 am | चांदणे संदीप

शतशब्दकथा करता आली असती छान.
पुलेशु!

Sandy

योगेश लक्ष्मण बोरोले's picture

23 Jun 2017 - 11:04 am | योगेश लक्ष्मण बोरोले

पुलेशु!

फक्त एक्स्ट्रा आयटेमचे हॉटेल टाकायाची आयडिया विचार कर्णेबल आहे.

जबरदस्त..थरारक कथा !! खिळवून ठेवणारी लेखनशैली...
आज एक मिपाकर असल्याचा अभिमान वाटला!
लिहीत राहा...आम्ही वाचत राहू

जव्हेरगंज's picture

23 Jun 2017 - 1:14 pm | जव्हेरगंज

शैली आवडली!!!!

नितिन५८८'s picture

23 Jun 2017 - 1:19 pm | नितिन५८८

पुलेशु!

अत्रे's picture

23 Jun 2017 - 1:27 pm | अत्रे

एक्स्ट्रा पाव.

का बरे, नुसता पाव पण असू शकतो की! मेनू कार्ड वाचता येत नसलं तर "एक्सट्रा" शब्द कसा कळेल..

बाकी गोष्ट आवडली.

कथा ठीकठाकच.. पण जव्हेरगंज म्हणाले तसे शैली चांगली आहे. चांगल्या कल्पना असतील डोक्यात तर उत्तम फुलवू शकाल.
पुलेशु.

अभिजीत अवलिया's picture

23 Jun 2017 - 3:56 pm | अभिजीत अवलिया

ठीकठाक प्रयत्न पण काहीतरी चुकलय का?

अचानक डोक्यात प्रकाश पडला. माझीच ऑर्डर आहे. मेन्युकार्डमध्ये एक अंकी किंमत असलेला एकमेव पदार्थ होता - एक्स्ट्रा पाव.
——> जर भाषा येत नव्हती तर हे कसे समजले ?

अभिजीत अवलिया's picture

23 Jun 2017 - 3:59 pm | अभिजीत अवलिया

साॅरी समजले :)

त्यांचे पण आकडे अरबीच असतील हो, का टेन्शन घेताय उगीच?
आजकालच्या आपल्या पोरांना सुधा कुठे देवनागरी आकडे कळतात? मराठी मज्कुरात अरबी आकडे घेतोच की चालवून. तसेच....
शिवाय मेनुचा फोर्म्याट सेमच असणार. लेफ्टाला आयटम राईटाला प्राईस.

प्रतिक कुलकर्णी's picture

23 Jun 2017 - 5:22 pm | प्रतिक कुलकर्णी

धन्यवाद मित्रांनो.
मला "एक्स्ट्रा पाव"वाचून नव्हे तर समोरचा पदार्थ पाहून कळाले असे लिहायचे होते.
असो. पुढील कथा अधिक व्यवस्थित लिहिण्याचा प्रयत्न करेन :)

आवर्जून लिहा, तुमच्यात सशक्त लेखन करण्याचे गुण आहेत.
शुभेच्छा!