मनालीतली मौज ...

भटकीभिंगरी's picture
भटकीभिंगरी in भटकंती
22 Jun 2017 - 9:05 pm

मार्चनंतर उकाड्याचा तडाखा वाढु लागला.. आणी हिमालयाची शिखरे साद घालु लागली ..खरतर हिमालयातुन परततानाच परत कधी कुठे यायच त्याच प्लॅनिंग सुरु होत . पण लवकरच परतण्याच आश्वासन मनाला आणी हिमालयाला देउनच मी जड अंत:करणाने हिमालयाचा निरोप घेते.. यावेळेस काही फार मोठा प्लॅन नव्हता .गावात रहायचे, येथिल जीवनपध्द्ती जाणुन घ्यायची, निसर्गसहवासचे सुख उपभोगायचे, छोटामोठा ट्रेक करायचा . असे ठरउन निघाले ..कुलु-मनाली दरम्यान हायवेलगत अनेक छोटी छोटी गावे वसली आहेत. यातील बरिच युथ हॉस्टेल ट्रेक दरम्यान ओळखीची झाली आहेत. याखेपेस एका मैत्रीणीकडे धोबी गावात मुक्काम
केला

फोटो १

आजुबाजुला निसर्ग नुसता ओसंडुन चाललाय .. त्यामुळे सहज बाहेर फेरफटका मारला तरी डोळ्याचे पारणे फिटते. ..
फोटो २

इथे एक लग्नसमारंभ आणी वाढदीवसानिमित्त पार्टी अशा दोन समारंभात सामिल झाले ..लग्नाला जवळजवळ सर्व गाव हजर होते .. . इथे घरे तशी मोठी आहेत.
फोटो ३

आजुबाजुला मागे पुढे जागेत झाडे, फुलझाडे लावलेत. लग्नघरी घराशेजारी जागेत जेवण बनविले होते. येथे नेहमिच समारंभात जेवण म्हणजे भरपुर भात पानात वाढतात. मग त्यावर थोड्या थोड्या वेळाने ३/४ प्रकारच्या रस्से, आमटी असे वाढतात. चणा- मुगडाळीची आमटी , राजमा ,रस्सा, मटार पनीर रस्सा .. भातावर अश्या दोनतीन प्रकारच्या आमट्या ..होत्या . आणी साखरभात. बस्स.. लोणचे चटणी पापड कुछ नही.. वाढदिवसाला तेच .. फक्त साखरभाताऐवजी केक ..
लग्नात पारंपारिक गीतांबरोबर डिजे वाजवला जातो. त्यावर सर्वजण आवडिने नाचतात .लग्नात सर्वजण प्रेझेंट म्हणुन एका व्यक्तीजवळ पैसे जमा करतात. ज्याने जितके पैसे दिले ते त्याचे नाव लिहुन त्याच्यासमोर लिहिले जाते. ..
घरांची डागडुजी करताना अद्ययावत पध्दतीने केली जाते .. वाशरुममधे टाइल्स, वेस्टर्न कमोड, बेसीन गीझर अशा सोई असतात. . अद्ययावत किचन प्लॅटफॉर्म , गॅस,फ्रिझ, हिटर,दिवाण, सोफे अशा सुखसोयी ऐपतीप्रमाणे असतात . घरात बसायला कायम बेड टाकलेलेच असतात .. त्याच्यावरच बसायचे .. कमी उंचीचे बेंच असतात. ते पुढे ओढुन त्यावर डायनिंग टेबलसारखे चहा जेवण घेतले जाते..
सकाळ संध्याकाळ फिरण्यासाठी खुप जागा येथे आहेत ...एके संध्याकाळी एका गल्लीतुन आत शिरले ... येथे घरे तसेच शेते होती ..जागोजागी गुलाब तसेच ईतर रंगीबेरंगी तऱ्हेतर्हेच्या फुलांची रेलचेल होती.. शेताच्या कडेने तर बांधावर ओळीने गुलाबाच्या झाडांचे कुंपणच घातले होते .. ८/८ फुट उंचींच्या त्या झाडांवर गुलाबाचे घोसच्या घोस लगडले
होते
फोटो ४

..काश्मीर तसेच उत्तराखंड आणी हिमाचलप्रदेशात अश्याप्रकारच्या गुलाबांची मुबलकता पहाणे हे काही नविन नव्हते .. पण या धोबी गावात गुलाबांचा अक्षरशः अतीरेक झालेला दिसतो .. अन्यही कीतीतरी जातींची,अनेक प्रकारची , लहानमोठी विविध रंग आणी आकाराची फुले सर्वत्र विपुलतेने दिसली.. फुलांप्रमाणेच सकाळच्या वेळी विविध जातींचे हिमालयीन पक्षीही दिसले. मी जरा लवकरच आले आहे . कारण अत्ता कुठे झाडांवर सफरचंदे, डालिंबे , नाशपती पेर,पिच,लिची इत्यादी फळे धरु लागली आहेत ..आणी अत्तापापासुनच त्याभोवती पक्षांची लगबगही सुरु आहे. ॲजुन काही दिवसानी फळे तयार होतील .
एके दिवशी जोगीनी वॉटरफॉल चा ट्रेक ठरवला. .. सकाळी लवकरच मनालीकडे जाणारी बस पकडली. सकाळची वेळ असल्याने ट्रॅफिक फार नव्हता. मनालीला उतरल्यावर बसथांब्यावरिल प्रसिद्ध कोकोनट नानखटाइ आणी वेपर्स सोबत घेतले.. आणी रिक्षाने वसिस्ट कुंडाकडे आले . कॉफी घेतली आणी चढायला सुरवात केली. हा ट्रेक करताना वरती जाणारे बरेच मार्ग लागतात .त्यामुळे रस्ता चुकण्याची शक्यता असते ..म्हणुन मधूनमधून लोकल व्यक्तीना रस्ता विचारीत रहावे ..परंतू हा ट्रेक अगदी सिनिक आहे. एका बाजुला धबधब्याच्या वहाणार्या पाण्यामुळे तयार झालेला ओढा वहतोय .. तर दुसर्या बाजुने हिमालयीन वृक्षराजी..
फोटो ५

पलीकडे किंबहुना चोहोकडे हिरवे नीळे पहाड .. काही ठीकाणी या उंच पहाडांच्यामागुन डोकावणारी हिमशिखरे....पायथ्याशी आणी उतारावर बांधलेली टुमदार घरे .मधे तर रस्ता देवदारांच्या भरगच्य दाट जंगलातुन जातो.. तेव्हा पाय तीथुन निघत नाही .. तर असा वेडावणारा नजारा पार करीत शेवटची उभी दमछाक करणारी चढण लागते .. शेजारीच जवळपास जोगीनी फॉल दिसु लागतो .. त्यामुळे नेटाने ती चढाई पार केली की समोर कोसळणारा जोगिनी वाटरफॉल दिसतो. आणी सार्या श्रमांचे सार्थक झाल्यासारखे वाटते . सुमारे शंभर फुटांवरुन कोसळणारा हा आवेग कोसळताना सभोवार पाण्याचे फवारे उधळतो.. त्यामुळे उडणारे हे पाणी एखाद्या मोठ्या शेकोटीमधुन उसळणाऱ्या धुरागत भासते. त्यातुन उडणारे जलकण जेव्हा आपल्याला स्पर्षुन जातात तेव्हा अंगातुन अशी थण्डगार शिरशिरी येते.. फॉल पडतो तीथे गोलाकार तळं तयार झालय.. अंगावर थंडगार जलकणांचा शॉवर घेत तीथे जाउन सोसवत नसतानाही हाताने तोंडावर पाण्याचे हबके मारण्याचा मोह आवरला नाही.. थोडावेळ तेथेच बसुन त्या स्वर्गिय सुखात हरवुन गेलो . मग मात्र परतीचा रस्ता धरला ..
एक दिवस रॉफ्टींगचा बेत केला .. मनालिला मी खुपदा येते पण बियासमधे कधी रॉफ्टींग केले नव्हते यावेळी ते साधले बियास खळाळत धावते. तसेच मधेमधे ती खडकाळ आहे ..पण येथिल इंस्ट्रक्टर्सना राफ्ट कोठुन कशी काढायची ते बरोबर माहित असते . राफ्टचा रुट त्यातल्यात्यात सुरक्षीत असा ठरलेला आहे मी मैत्रीण आणी तीच्या मैत्रीणी असा रॉफ्टींगचा कार्यक्रम खुप एंजॉय केला रॉफ्टींग ॲडव्हेंचरस आणी म्हणुनच थ्रीलिंगही आहे ..
दुसर्या दीवशी मैत्रीणिच्या सुनेच्या माहेरी गेलें . येथे फारशी माकडे दिसली नाहीत पण आज मात्र जाताना खुप माकडे दिसली .हे गाव जरा उंचावर आहे त्यामुळे अधिकच थंडी होती. माणसे सारी अगत्यशिल आणी अतिथ्यशिल आहेत.. गेल्यागेल्या गादीवर बसवले .पायाला थंडी लागेल म्हणुन पायावर घ्यायला गोधडी दिली. जेवनानंतर हात धुवायला ताटातच पाणी दिले ...हे सर्व स्वागत पाहुन मलाच फार अवघडल्यासारखे होत होते पण तो त्यांच्या अतिथ्यशिलतेचा एक भाग होता .
एक दिवस जाणा धबधबा बघायचा कार्यक्रम ठरवला. नग्गरच्या जवळ जाणा गाव आहे यासाठी पतलिकुलला ०७३० ची बस पकडली .. जाणाला ०८३० पर्यंत पोचलो पुढे तीनसाडेतीन कि.मि चालत गेलो .हा सर्व पहाडाच्या आणी दरीच्या मधुन जाणारा रस्ता निसर्गरम्य आहे त्यामुळे चालताना खुप मजा येत होती . समोरुन एक मानसीक दृश्ट्या कमजोर असलेला मुलगा आमच्याकडे बघत हासत निघुन गेला .. तो अगदी रस्त्याच्या दरीकडच्या कडेने चालला होता.. मला भिती वाटली मी त्याला पहाडाच्या बाजुने चालायला सांगितले पण ते काही त्याला समजले नाही. तो तसाच पुढे निघुन गेला. घरच्यानी त्याला असे एकटे कसे काय सोडले होते कोण जाणे ..कदाचित त्याला असे चालण्याची सवय असावि.
आम्ही जाणा फॉलपाशी पोचलो ..प्रथम नाश्ता केला .. नाश्त्याला सिडु आणी मकईची रोटी त्यासोबत जी चटणी होती ती बिछुकाटाच्या झाडापसुन केली होती. सिडु हा लोकल पदार्थ आहे कणीक ५/६ तास भिजवून ठेवतात. मग पुरीसारखे लाटुन त्यात मसाला भरतात त्यानंतर ते करंजीसारखे मिटउन उकडतात कणीक भिजौन ठेवल्यामुळे सिडु इडलीसारखा फुगतो मग त्याचे स्लाइस करुन त्यावर भरपुर तूप घालुन चटणीसोबत खातात . खुप टेस्टी लागते . येथे धबधबा लहानसाच आहे.
फोटो ६

खर तर चढावावर अंतराअंतराने छोटे छोटे धबधबे आहेत . या धबधब्यांच्या तळाशी बाजुने चहापाण्यासाठी खुर्च्या टाकल्यात .

फोटो ७

आम्ही थोडे पहाड चढुन आलो. आजुबाजुला भटकलो .मग लंच केले दोघित एक प्लेट. येथला लोकल लाल भात ,मका रोटी , चटणी, दाल ,कढी सिडु गुळ तांदुळाची ,खिर असा बेत होता . जेवलो आणी चालत जाणाला आलो तोपर्यंत १२३०/१ वाजलेला . यानंतर पतलिकुहलला जाणारी बस ३ वाजता होते आता दोन तास इथे थांबायला हवे होते.. थोडावेळ बसुया.. मग इथे वाट पहात बसण्यापेक्षा आपण पुढे चालत राहु जीथे मिळेल तीथे बस किंवा एखादी प्रॉयव्हेट गाडी पकडू. असा विचार करुन थोडावेळ तेथेच बसलो . तेवढ्यात तेथे सकाळी भेटलेला मतीमंद मुलगा दिसला . आमच्याकडे बघुन सतत हसत राहिलां..
आम्ही पुढे जाण्यासाचा विचारच करत होतो इतक्यात तेथे एक मोटारसायकलस्वार आला . आम्हाला बसची वाट बघताना पाहून थांबला. कुठे जायचय असे विचारले . तो नगरला जात होता आणी मी नगरला सोडतो म्हणाला .आम्हाला पतलिकुलला तेथुन शेअर टॅक्सी मिळाली असती ..आमची मजाच झाली.. आम्ही मग ट्रीपलसिट मोटारसायकलस्वार नगरला निघालो . दाटीवाटीने उभा असलेल्या देवदारच्या जंगलातुन घाट आणी नागमोडी रस्ता असा आमचा प्रवास चालला होता . खुप मजा येत होती .. उतारावर गाडी धावत होती . वळणावर वळण घेताना सिटवरुन सरकायला होत होत . मोटारस्वार फिश सप्लायर होता . जाणाला त्याच फिशफॉर्म होत. मोठमोठ्या हॉटेल्सना तो फिश सप्लाय करतो . आम्ही नगरला पोचल्यावर त्याने नगरच्या किल्य्यावर गाडी नेली .तेथे ३० रुपये प्रवेश फी आहे . पण हॉटेलचे फिश सप्लायर सोबत असल्यामुळे आम्हाला फ्री एंट्री मिळाली. अश्याप्रकारे एक जास्त स्थळ बघायला मिळाले..
या किल्य्याची नीर्मीती राजा सिध्धी सिन्हने सोळाव्या शतकाच्या आरंभी केली. या किल्याच्या दोन लाकडी दरवाजांची निर्मीती केवळ कुऱ्हाड वापरुन केली असे म्हणतात . दरवाजांच्या रुंदीवरुन अंदाज येतो की मोठ्या देवदार वृक्षापासुन ते तयार केले आहेत ..या दोन दारान्मधे लोखंड इत्यादी धातू अजिबात वापरले नाहित नग्गरचा किल्ला म्हणजे लाकुड आणी पाषाण यापासून निर्मिलेली एक बेजोड मध्ययुगीन हवेली आहे . या किल्याच्या प्रांगणात एक छोटेसे ऐतिहासिक ' जगतीपट्ट '
नावाचे मंदीर आहे त्यातील देवाची सर्व देवांचे प्रतीक म्हणून पूजा केली जाते .. किल्ल्याचा पुरातन ढाचा जतन करीत त्याचा व्यापक जिर्णोध्धार आणि नविनीकरण केले आहे यातील बऱ्याचशा भागात सध्या एक हॉटेल आहे . दोन मुख्य दरवाजे मंदीर एका छोट्या खोलीत काही प्राचिन वस्तू तसेच दर्शनी भागात भिंतीवर काही लाकडी वस्तू ,तसेच शिकार केलेल्या प्राण्यांची सुमारे १४६० वर्ष येथुन राज्यकारभार् केला गेला..
एकदा रात्री मी जेवायला बसले असताना मैत्रीणिला फोन आला नही 'मै नही आउंगी ! मेरे घरमे मेहेमान है !' ती फोनवर बोलत होती मी तीला विचारले तुला कोणी बोलावित आहे का ?मग जा ना ती म्हणाली मैत्रीणिंची पार्टी आहे पण तु आहेस तर मी आज नाही जाणार मी तीला परोपरीने जायला सांगत होते. तेव्हा ती म्हणाली तु आलिस तर मी जाईन. म मिही तीच्यासोबत गेले .. म्हटले बघु कशी पार्टी आहे ते .. तेथे गेल्यावर कळले की मधुन मधुन त्यांच्याकडे अशा पार्ट्या होतात .. एखादीकडे शेतातले काही काम असले तर तीच्या परिचयातल्या काही बायका तीला मदत करायला जातात . मग रात्री श्रमपरिहार म्हणून ही पार्टी असते त्यात कधीकधी पुरुषही सामिल होतात . यात *लुगडी* नावाचे हलकी नशा देणारे पेय घेतले जाते . ते करायची कृती - भातामधे काही आयुर्वेदिक जडीबुटी मीसळुन ४/५ दिवस ठेवण्यात येते. नंतर त्यात पाणी मिसळुन परत १०/१२ दिवस ठेवतात .. मग हे ड्रिंक तयार होते . हे तब्येतीला पण खुप छान असते . आणी तीथल्या कडक ठंडीत उबही देते. खरोखर ही श्रमपरीहाराची कल्पना खुप छान आहे .. इथल्या स्त्रीया खुप कस्टकरी आहेत . त्याना तेवढाच विरंगुळा .स्त्रीपुरुष दोघेही कष्ट करुन गोडिगुलाबिने समाधानाचा संसार करतात .. मुले शिकली तरी कोणतेही कष्टाचे काम करणे कमिपणाचे मानित नाहीत..
काही घरे लाकडाची आहेत.. ठंडीमधे गारठा जास्त जाणवत नाही अशा घरात ..प्रत्येक घरात एक धुरांडे असते धुर वरुन बाहेर घालवण्यासाठी . थंडीच्या दिवसात घरातली हवा उबदार रहाण्यासाठी लाकडे जाळुन उष्णता निर्माण केली जाते भयंकर थंडीत हिटर पुरे पडत नाहित .
मी मैत्रीणी बरोबर कधी कधी संध्याकाळी फिरायला जाई तसेच ४/५ दिवस तीथे मला फिरताना पाहिल्यामुळे सर्वाना ओळखिची झाले होते त्यामुळे गावातील स्त्रीया हसत,बोलत कधी कधी घरी यायचा चहा प्यायचा आग्रहही करित खुप प्रेमळ अगत्यशिल आणी गोड माणसे आहेत पहाडी माणसे पहाड्ससारख्याच विषाल ह्रदयाची!
फोटो ८

प्रतिक्रिया

भटकीभिंगरी's picture

22 Jun 2017 - 9:09 pm | भटकीभिंगरी

लेख टाकताना फोटो कसे टाकायचे ते मला अजुनही निट कळले नाही ...
त्यामुळे फोटो मागेपुढे अताकले गेलेत ...
यासंदर्भात मिपाचे श्री . कंजुस यानी बहुमोल मार्गदर्शन केले त्याचे खुप आभार ...

भटकीभिंगरी's picture

22 Jun 2017 - 9:34 pm | भटकीभिंगरी

लेखासोबत फोटो कसे टाकायचे हे मला अजुनही नीट कळले नाही ..मी शिकते आहे ..
प्रस्तुत लेखात फोटो मागेपुढे टाकले गेलेत ..
फोटो कसे टाकावेत याबाबत मीपाचे सदस्य श्रीं कंजूस यांचे बहुमोल सहकार्य झाले त्यांची मी आभारी आहे .

संजय क्षीरसागर's picture

23 Jun 2017 - 12:09 am | संजय क्षीरसागर

चांगलाच जीव रमवलायं तुम्ही !

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Jun 2017 - 12:49 am | डॉ सुहास म्हात्रे

भेट दिलेल्या जागेचे खरेखुरे अनुभवाने श्रीमंत असलेले दर्शन घेतले आहे तुम्ही... ही खरी भटकंती ! *good*

स्रुजा's picture

23 Jun 2017 - 3:29 am | स्रुजा

+११११११

फारच कौतुक वाटलं.

खुप मस्तं.
भेट दिलेल्या जागेचे खरेखुरे अनुभवाने श्रीमंत असलेले दर्शन घेतले आहे तुम्ही... ही खरी भटकंती ! खरंय अगदी.

खूपच मस्त..माझ्या फिरायच्या कल्पना पण अशाच आहेत.. आणि नुकताच ह्या भागात ट्रेक केल्यामुळे जरा जास्तच आवडला लेख..

कंजूस's picture

23 Jun 2017 - 9:23 am | कंजूस

असेच ट्रेक करायला मिळोत तुम्हाला आणखी.

जुन्या ट्रेक्सचेही लेखन वाचायला आवडेल.

भटकीभिंगरी's picture

23 Jun 2017 - 12:43 pm | भटकीभिंगरी

हो सवड मिळेल तसे लिहीनच ...
छान छान प्रतीक्रियांसाठी सर्वाना धन्यवाद ..

दुर्गविहारी's picture

27 Jun 2017 - 8:09 pm | दुर्गविहारी

मस्त लिहीताय काकू ! मी तुम्हाला वांरवार लिहा म्हणुन सांगतोय ते यासाठीच.

ऋतु हिरवा's picture

23 Jul 2017 - 11:22 pm | ऋतु हिरवा

छान नाव घेतले आहे. लेख सुंदरच. तुमच्या फिरण्याची कमाल वाटते.

थिटे मास्तर's picture

24 Jul 2017 - 1:39 am | थिटे मास्तर

मिपा ID परफेक्ट घेतलाय.
संसाराच्या गाडात्न निघेन तर तर तर मला सुद्धा असे फिरायचेय .... असो.

सदानन्द's picture

26 Jul 2017 - 1:27 pm | सदानन्द

खुप प्रेमळ अगत्यशिल आणी गोड माणसे आहेत पहाडी माणसे पहाड्ससारख्याच विषाल ह्रदयाची! खरय.

सिरुसेरि's picture

26 Jul 2017 - 5:09 pm | सिरुसेरि

मस्त लेखन आणी फोटो .