चहा

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
19 Jun 2017 - 9:39 pm

एम आय डी सी ला असताना भवरलाल नावाचा एक राजस्थानी मारवाडी दोस्त होता..
भवरला्ल चे स्टील विक्रीचे दुकान होते मी व बरेच लोक्स त्याच्या कडूनं स्टील विकत घेत असु..
वास्तविक भवरलाल ला स्टील मधले शष्प कळत नव्हते..
साधारण राजस्थानी लोक्स किराणा माल..कपडे आदीची दुकानदारी करतात..
पण भवरशेट नी हि लाइन निवडली होती..
इंडस्ट्रियल स्टील ट्रेडिंग हे ट्कनिकल काम आहे म्हणजे थोडीतरी माहिती हवी..
स्टील मध्ये अनेक प्रकार आहेत..फ्याब्रिकेशन ला लागणारे च्यानल सळया पट्ट्या..तर ऍलोय स्टील मध्ये अनेक प्रकार आहेत जसे OHNS..En24-En32 spring steel आदी..
पण भवरलालाशेटने आमच्या सारख्या मित्रांच्या मदतीने व मागणी प्रमाणे स्टील ची
ईन्व्हेन्ट्री करून ठेवली होती..
बक्कळ पैसा होता..
आमच्या सारखे खास मित्र दुकानात गेले की त्याच्या कडे चहा घ्यावाच लागे..
भवर शेट कडे चहाचे २ प्रकार होते..
१ आण्णा चा चहा...२ नाना चा चहा
आमच्या सारखे गि-हाईक आले की..भवर शॉप मध्ये काम करणा-या मुलाला हाक देत असे...
"अरे आण्णा xxxसाहेब आले आहेत..२ स्पेशल चहा आण"
आण्णाचा चहा म्हणजे हमखास येणारा चहा..
मग तो मुलगा चहाच्या दुकानातून तत्परतेने चहा आणत असे...
दुसरा प्रकार म्हणजे "नाना चा चहा"
भवर च्या दुकानात अनेक गि-हाइक चौकशी करायला येत असत..
"हे स्टील आहेका? भाव काय? दुसरी कडे इतका भाव आहे इत्यादी"
भवर शेट त्यांना पण चहाचा आग्रह करत असे पण तो नाना चा चहा असे..
भवर शॉप मध्ये काम करणा-या मुलाला हाक देत असे...
"अरे नाना xxxसाहेब आले आहेत..२ स्पेशल चहा आण"
त्या मुलाला इशारा कळत असे..
चौकशी करायला आलेले गि-हाइक चहाची वाट बघत बसे..
शेवटी ५-१० मिनिटात कंटाळले गि-हाइक विचारत असे..भवर मुलाला म्हणत असे अरेनाना चहा आणलास का?
पोरग सांगत असे " चहावाला स्टोव्ह मध्ये डिझेल भरत आहे ५-१० मिनिटात आणतो"
कंटाळलेले गि-हाईक " भवर शेट चहा राहु देत जरा घाईत आहे"
भवर बर म्हणत असे..
मात्र तेच गि-हाइक जेव्हा ऑर्डर घेऊन येत असे तेव्हा त्याला "आण्णा चा चहा" मिळत असे.
एम आय डी सी ला असताना भवरलाल नावाचा एक राजस्थानी मारवाडी दोस्त होता..
भवर शेट कडे चहाचे २ प्रकार होते..
१ आण्णा चा चहा...२ नाना चा चहा

कथा

प्रतिक्रिया

अभिजीत अवलिया's picture

19 Jun 2017 - 9:47 pm | अभिजीत अवलिया

स्टोव्ह मध्ये डिझेल ???

आदूबाळ's picture

22 Jun 2017 - 2:39 am | आदूबाळ

नानाचं असेल.

कंजूस's picture

22 Jun 2017 - 12:02 pm | कंजूस

स्टोव्ह मध्ये डिझेल ??? हा विनोद नव्हे खरी गोष्ट आहे हो.
बस ड्राइवर लोकांचे स्टोव डिझेलवरच चालतात.

आण्णाचा चहा आणि नानाचा चहा हा बराच जुना किस्सा आहे. कै च्या कै जोडलाय भंवरलालच्या किश्श्याला.

सुचिता१'s picture

20 Jun 2017 - 12:10 am | सुचिता१

अहो , हे इतके जुने झाले आहे की नाना चा चहा म्हटला की कोणी थांबत च नाही ,,.. किंवा स्वत: पोराला सांगतात की नाना ला नको , अण्णा ला सांग चहा ..

हा चा गेल्या तीन वर्षांत मिपा सोडून न जाता चिकटून राहणाय्रा गिह्राइकासाठी.

फारच विनोदी.

जेम्स वांड's picture

20 Jun 2017 - 10:18 am | जेम्स वांड

साधारण राजस्थानी लोक्स किराणा माल..कपडे आदीची दुकानदारी करतात..

असलं काहीतरी बोलू नका हो, त्या आर्सेलर मित्तल वाल्या स्टील विक्या मित्तल नामे राजस्थानी मारवाड्याला राग यायचा.

दशानन's picture

21 Jun 2017 - 10:02 pm | दशानन

+ मारबल, ट्रान्सपोर्ट चे विविध किंग पण रागावतील की ;) आणि सोबत शिक्षणमहर्षी देखील आहेत अनेक... आणि मसाला किंग देखील... :P

खूप आवडली गोष्ट. विशेष म्हणजे विसाव्यांदा ऐकतानाही अगदी नवी वाटली!

पुण्यातील गोष्ट दिसते

कंजूस's picture

21 Jun 2017 - 3:07 pm | कंजूस

पुण्यातील गोष्ट दिसते~~
- काही अनुभव गाठीशी दिसतोय।

अत्रुप्त आत्मा's picture

22 Jun 2017 - 7:28 am | अत्रुप्त आत्मा

@ काही अनुभव गाठीशी दिसतोय ››› =)))))

मुक्त विहारि's picture

21 Jun 2017 - 5:48 pm | मुक्त विहारि

आणि आमचा प्रतिसाद

(अकु कथा फॅन) मुवि