इंग्लीश स्कूलचं फॅड

परशुराम सोंडगे's picture
परशुराम सोंडगे in जनातलं, मनातलं
9 Jun 2017 - 10:46 pm

कथा आणि व्यथा

इंग्लीश स्कूलचं फॅड

गावचा नामा त्या दिवशी भेटला.
बॅंकेच्या दारात.गडी जरा घाईतच होता.हातात बरीचं कागद होती.
त्याला बॅंकेचं कर्ज काढायचं होतं.
मी:अरे कर्ज कशाला काढतो?"
तो:"कशाला म्हंजे? पोरग टाकलं की शाळात"
मी:"शाळात टाकलं ?त्यासाठी कर्ज ?"
तो:"मग ?"इंग्लीश स्कूल मध्ये टाकलं.
रोज येतं की स्कूलबसात बसून पाटादयाला."
मी: "किती पैसं भरलं ?
तो:आता भरलं पंच्चीस. पुन्हा दयाचं वीस.तसं काय नाही .सारे संभाळून घेतात आपल्याला.रामाचं पोरग घेतलं की पियोन म्हणून ."
मी:"आरं,एवढ पैसं कशी आणणाऱ ?"
तो:"कसं म्हंजे? काय झाडाला तोडायचेत व्ह? उचल घेणारं .बायको भी समजदार. ती पण म्हंती काय भी करू.कुणाचा गू काढू पण पोरग इंग्जीतच शिकू.मुकादम उचल देतो की.त्याच्या मेहूण्याचीच शाळा जनू"
मी:" पोराचं काय वय?"
तो:" चौथं लागलं असलं बघा आवंदा."
मी: "अजून त्याचं वय नाही की झाली शाळाचं "
तो:आता पोटातचं असल्या पासून शिकशान सुरू होतं .उग कशाला याड घेता.?
मी:गावात शाळा आहे सरकारी.अंगणवाडी आहे बरं सारं फुकाटं उग़ कशाला खर्चात पडतो ?
तो:गावात हाय.सार हाय .फुकाट हाय
पण ते मराठी हाय. आपल्याला इंग्रजी पायजे"
मी:"का ?मराठी भाषा आपली "
तो: कोण शिकतं मराठी ?"
मी: "मुकादम पैसं देणाऱ मग कर्ज कशाला?"
तो: " पुस्तकं.कपडे घ्यावी लागतात.त्याचं सात हजारं दयाचेत"
मी:अरे,सारं फुकटंच सोडून का खर्चात पडतो? अजून तर त्यांच शाळाचं वय नाही ."
तो:सर, ठरलं एकदा .पोरग इंग्लीस स्कूलातचं शिकणार .आमचं जिनं गेलं पाचाटात .त्याला नाय या नरकात येऊ दयायचो. मोठा सायब करणार
घाणं राहू पण इंग्लीशचं शिकू "

माझी बोलती बंद झाली. एेपत नसतानी हा कसा शिकवणाऱ . महागडया फिस कशा भरणाऱ?
महत्त्वकांक्षा चेतवल्या जात आहेत.
आपली दकानं चालवण्यासाठी सरकरी शाळा व शिक्षक यांना बदनाम केले जात आहे. उंदड झाली इंग्लीश स्कूल पण सरकार कां राहतं थंडा थंडा कूल ? इंग्लीश स्कूल म्हंजे ब्रम्ह देवाचा हात नाही तिथं गेलं की साहेब व्हायला.पण हे कुणाला सांगावा ? कसं सांगाव? आपलीच कथा आपलीच व्यथा ....!!
(परशुराम सोंडगे,पाटोदा बीड . . . . . 9673400928)
. .

कथालेख

प्रतिक्रिया

सौन्दर्य's picture

10 Jun 2017 - 12:02 am | सौन्दर्य

पोराचा बाप काही अगदीच चूक नाही. समाजात सर्वत्र इंग्रजीचा प्रभाव वाढला असताना आपल्या मुलाला इंग्रजी येणे आवश्यक आहे असे प्रत्येक पालकांना वाटत असते. मात्र त्यासाठी किती खस्ता खायच्या हा ज्याच्या त्याच्या इच्छेचा प्रश्न आहे. मी स्व:ता मराठी मिडीयम मधून शिकलो, परंतु कॉलेजमध्ये पाय ठेवल्यावर थोडं कठीणच गेलं आणि नोकरी शोधताना अति कठीण.

स्वलेकर's picture

15 Jun 2017 - 1:58 pm | स्वलेकर

एकदम बरोबर

अत्रुप्त आत्मा's picture

10 Jun 2017 - 5:38 am | अत्रुप्त आत्मा

विंग्लिश मुक्त पीठ..! ;)

माहितगार's picture

10 Jun 2017 - 7:31 am | माहितगार

शिक्षण इंग्रजीतून घ्यावे कि मराठीतून हा वेगळा मुद्दा आहे. आर्थीक बाजू बद्द्ल; मला वाटते खासगी शाळांना त्यात इंग्रजी सुद्धा आल्या काही टक्के जागा आर्थीक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मोफत देणे बंधनकारक आहे. (अर्थात हे बहुधा वयाच्या ६व्या वर्षापासून असावे) नेमके डिटेल्स इतर जाणकारांनी द्यावेत. पण मुख्य म्हणजे अशा पद्धतीची चर्चा होताना धागा लेखकास हा मुद्दा माहित असता तर एका गरजू व्यक्तीपर्यंत सुयोग्य माहिती अधिक नेमकेपणाने पणे पोहोचली असती.

तुषार काळभोर's picture

10 Jun 2017 - 3:31 pm | तुषार काळभोर

शिक्षणाचा अधिकार कायदा
प्रत्येक वर्गातील २५%जागा राखीव असतात सामाजिक व आर्थिक दुर्बल गटातील मुलांसाठी.
आमच्या ऑफिसमध्ये ७-८ जणांनी त्यांच्या मुला-मुलींसाठी आर टी ई अंतर्गत प्रवेशासाठी अर्ज केले होते. सर्वांचं पॅकेज पाच ते सोळा लाख रुपयांच्या घरात! त्यातील काहींनी एजंटला लाखभर रुपये देऊन प्रवेश "घडवून" आणला. एकदा एक लाख खर्च, मग पुढची तेरा वर्षे नामांकित, प्रतिष्ठित इंग्रजी शाळेत फुकट शिक्षण!
आर टी ई मध्ये खऱ्या किती गरजूंना प्रवेश मिळत असेल, शंका आहे. हे प्रमाण निम्म्यापेक्षा कमी असावे, असा माझा अंदाज आहे.

वकील साहेब's picture

15 Jun 2017 - 12:30 pm | वकील साहेब

शिक्षण मराठीतून अथवा इंग्रजीतून घेणे आणि आयुष्यात यशस्वी होणे या दोन भिन्न गोष्टी आहेत. आमचे हि शिक्षण मराठीतून झाले आहे पण ज्या वेळी आम्ही करियर च्या वाटा धुंडाळत होतो तेव्हा आमचे प्रतिस्पर्धी पण असेच मराठी शाळेतून आलेले जास्त होते म्हणून आम्ही तरुन गेलो पण ज्यावेळी या नामाचा मुलगा मोठा होईल (कदाचित मराठी शाळेत शिकून) तेव्हा त्याचे प्रतिस्पर्धी मध्ये इंग्रजी शाळेतून शिक्षण घेतलेल्यांची संख्या मागच्या पिढी पेक्षा जास्त असेल. साहजिकच स्पर्धाही जास्त च असेल. त्यामुळे जगाची पावल ओळखून नामाने टाकलेले पाऊल योग्यच वाटते. बाकी पैशा बद्दल म्हणाल तर हा ज्याचा त्याचा आर्थिक प्रश्न आहे.

करीयरच्या स्पर्धेत इंग्रजी / मराठी माध्यमाची पार्श्वभूमी महत्वाची ठरेल की त्या कामासाठी आवश्यक असलेले शैक्षणिक / तांत्रिक ज्ञान..?

याचं उत्तर बायनरी असतं तर बरं झालं असतं. पण मला वाटतं करियरच्या एका टप्प्याच्या पुढे "अद्ययावत शैक्षणिक / तांत्रिक ज्ञान" हे गृहित धरलं जातं, आणि संवादकौशल्यांना जास्त महत्त्व प्राप्त होतं. (संवादकौशल्यं म्हणजे कोकाटे स्टाईल फाडफाड इंग्लिश नव्हे. आपला मुद्दा कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त प्रभावीपणे समोरच्या विविध देशांतून/संस्कृतींतून आणि वेगवेगळ्या भाषा असलेल्या लोकांपर्यंत पोचवणे.)

माझ्या अंदाजानुसार अद्ययावत शिक्षण आणि तांत्रिक ज्ञान असेल तर भाषा सांभाळून घेतली जाते.

पण तुमच्या मताशी सहमत - याचे उत्तर बायनरी असणार नाही.