ईतिहासाचा जिनोम कसा माहित करुन घ्यावा ?

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
8 Jun 2017 - 2:05 pm
गाभा: 

मला अपेक्षीत धागा शीर्षक 'जिनोमच्या साहाय्याने भारतात झालेल्या स्थलांतराचां इतिहास कसा माहित करुन घ्यावा ?' असे आहे, आणि अजून एक मला या विषयाची माहिती नाही, प्रांजळपणे सांगायचे झालेतर वाचनात आलेलेल्या लेखनातील बर्‍याचशा तांत्रिकशब्दाच्या टर्मीनॉलॉजी डोक्यावरुन जात असतात म्हणूनच धागा काढत आहे.

आता पर्यंत जे काही समजून घेण्याचा प्रयत्न केला त्यात १) सध्याच्या जगभरच्या मानवांचे जिन्स पाहता हा जिन्ससंग्रह असलेला सर्वच माणसांचे पुर्वज कोणत्या न कोणत्या काळात आफ्रीकेतून उर्वरीत जगात स्थलांतरीत झाले आहेत ही अद्यापतरी सध्याची मुख्य थेअरी आहे. २) भारतीय उपमहाद्वीपात बाहेरुन एकगठ्ठा स्थलांतर न होता ते काळाच्या ओघात धीम्या गतीने छोट्या छोट्या प्रमाणात होत आले आहे. ३) यात स्त्रीयांपेक्षा पुरुषांचे स्थलांतर होऊन आलेल्यांचे प्रमाण अधिक आहे आणि त्यांनी स्थानिक स्त्रीयांना स्विकारले असावे ४) कारण भारतातील जिनपूल मध्ये आईच्या साईडने एकसारखेपणा अधिक आहे तर पुरुषांच्या बाजूने आलेल्या जिनपूल मध्ये तौलनीकदृष्ट्या अधिक वैवीध्य आहे. ४) स्वतःच्याच जातीत विवाह करण्याची प्रथा इस्वीसनाच्या पहील्या शतकानंतर चालू झाली असावी त्यापुर्वी होणार्‍या विवाहासंबंधांना जातीचे बंधन नसावे (भारतीयांच्या जिनपूलमध्ये इतपत बेसिक समानता आहे)

आता पर्यंतच्या जिनॉमीक अभ्यासाच्या मर्यादा १) अभ्यासले गेलेले डाटासेट्स तसे लहान आहेत २) अभ्यासले गेलेले डाटासेट्स मुख्यत्वे सध्याच्या जनरेशन्सचे वापरले गेले आहेत भारतातील जुन्या लोकांच्या शारीरीक अवशेषांची उपलब्धता कमी असावी आणि त्यात जी उपलब्धता आहे त्याच्या जिन्सपूलचा अभ्यास आणि तेही तौलनीक अभ्यास अद्यापतरी पुरेसा झाला नसावा त्यामुळे ठोस निष्कर्षांच्यादृष्टीने या निश्कर्षांना मर्यादा पडत असाव्यात.

उपरोक्त बाबीचा व्यक्तीशः मी काढलेला अन्वयार्थ असा की भारतात होलसेल म्हणजे एकगठ्ठा आर्याअक्रमणाची थेअरी चुकीची आहे परंतु अल्पप्रमाणात सातत्याने स्थलांतर होतही आले असावे. केवळ संघर्ष आणि आक्रमणांचा विचार डोक्यात असण्यामुळे पुर्वीच्या भारतातील लोकांची लोकसंख्या खूपच कमी आणि विरळ असावी, स्थलांतरीतांना प्रत्येक स्थलांतरा नंतर स्थानिक लोक लगेच भेटले असतील असेही नसेल एवढी जुन्या प्राचीन काळातील लोकसंख्या विरळही असू शकतात हा विचार फारसा लक्षात घेतला जाताना दिसत नाही.

स्थलांतरासोबतच युरोपशी हस्तेपरहस्ते समुद्री आणि जमिनी व्यापार चालू होता. स्थलांतर आणि व्यापारी देवाणीघेवाणी दोन्हीच्या संगमातून इंडोयुरोपीय भाषांच्या शब्दसंग्रहात बर्‍यापैकी प्रमाणात कॉमन दिसतील एवढ्या शब्दांची देवाण घेवाण झाली. अगदी ऋग्वेदी संस्कृतसुद्धा युरोपीयभाषांशी किमान भाषीक शब्दस्वरुपांची देवाण घेवाण झाल्यानंतरची भाषा आहे म्हणजे भारतातील रेकॉर्डेड भाषातील सर्वात जुनी असली तरी भारतीयभाषेचे सर्वात जुने स्वरुपही नसावे. देवाण घेवाण करणारी भाषा एका दिशेने केवळ युरोपीय भाषेशी देवाण घेवाण करेल आणि भारतातील अन्यभाषांशी देवाण घेवाण करणार नाही हेही तर्कास धरुन वाटत नाही म्हणजे प्राचीन संस्कृत सोबत अथवा त्या आधीपासून इतर भाषा भारतात अस्तीत्वात असल्या पाहीजेत म्हणजे सर्वात प्राचीन असल्याचा एकमेवत्वाचा मुख्य म्हणजे एकमेव उगमत्वाचा हक्क संस्कृतभाषेस कितपत पोहोचतो या बाबत साशंकता वाटते. अर्थात हि चर्चा ह्या धाग्याचा मुख्य विषय नाही. मुख्य विषय 'जिनोमच्या साहाय्याने भारतात झालेल्या स्थलांतराचां इतिहास कसा माहित करुन घ्यावा ?' आणि तत्संबंढी तांत्रीक अवजड संज्ञांचा अर्थबोध कसा करुन घ्यावा हा आहे.

खरे म्हणजे हे माहित करुन घेऊन करायचे काय या प्रश्नातही तथ्य आहे नाही असे नाही. आफीकेतील मुत्सद्दी ज्युलीअस न्यरेरे यांनी सर्व पृथ्वी मुलतः सार्वजनिक असल्याचा का काय साधा सुधा सिद्धांत मांडला होता म्हणे. पण माणसाची जिज्ञासा कोणत्याही दिशेने भागत नाही. तसे पाहू जाता भौगोलीक संघर्ष केवळ मनुष्यप्राणी करतो असे नाही. असंख्य प्राणी मलमुत्र विसर्जन करुन आपला व्यक्तिगत अथवा आपल्या टोळीचा भौगोलीक प्रदेश सुनिश्चित करुन घेतात म्हणे. सगळ्यात सहज दिसणारे उदाहरण पाळीव प्राणी म्हणून ओळखल्या जाणार्‍या कुत्र्यांचे त्यांच्या व्यक्तिगत परीघात नवे कुत्रे आले की सगळा परिसर डोक्यावर घेतात. पण इतर प्राण्यांचे संघर्ष त्यांनी निगोशीएट केलेल्या तत्कालीन परीघापुरते मर्यादीत असतात, तुझे खापरपणजोबा आधी आले का माझे पणजोबा आधी आले या फंदात ते पडत नाहीत पण मनुष्य प्राण्याचे तसे नाही कोण कुठे आधी पोहोचले हे सिद्धकरण्यासाठी बराच आटापिटा केला जातो तसा संशोधकांनी केलेल्या संशोधनाचाही आधार घेण्याचा प्रयत्न असतो. समुहाचे हितसंघर्ष आठवले की ज्युलीअस न्यरेरे यांनी सर्व पृथ्वी मुलतः सार्वजनिक असल्याचा का काय साधा सुधा सिद्धांत विस्मरणात जाण्यास वेळ लागत नाही .

असो, सध्या माहित नाही ते शोधण्याचे काम जसे संशोधक करतात त्या संशोधनांचा अभ्यास अभ्यासक करतात त्याची समिक्षा होते आणि त्यानंतर सध्या जे माहित आहे ते असे आहे ह्या तत्वावर ज्ञान्कोश अशा माहितीची दखल घेत असतात.

मी इतिहासात नव्हतो आणि सध्याचे जिनोम तंत्रज्ञान कळत नाही त्यामुळे चुभूदेघे. जिनोम जेनेटिसजाणकार मिपावर कितपत असतात माहीत नाही. जे आहेत त्यांच्याकडून हेप्लो ग्रूप वगैरे संज्ञा वाचनात आल्यास त्यांचा अन्वयार्थ कसा लावावा हे जाणून घेणे आवडेल. जाणकार मंडळी लिहू लागताच विषयांतरे थांबबावीत. चर्चा सहभागासाठी आणि अनुषंगिक आवांतरे करुन धागाचर्चा चालवण्यासाठी आवांतरकारांचे आभार. :)

* मी भारतीय जिनोम बद्दल उपरोक्त केलेले लेखन या पुर्वीच्या वाचनाच्या स्मरणातून केले आहे. खालील लेखांचा संबंध नाही रादर खालील लेख मला नीटसे समजून घेता आले नाहीत म्हणून धागा लेख काढला. खालील प्रकारचे लेख कसे वाचावेत की समजतील या बद्दल जाणकारांनी मार्गदर्शन केल्यास आभारी राहीन.

* bmcevolbiol.biomedcentral.com/articles वर भारताच्या संबंधाने वाचण्याचा प्रयत्न केलेले काही लेटेस्ट लेख:
**Carriers of mitochondrial DNA macrohaplogroup R colonized Eurasia and Australasia from a southeast Asia core area
** Phylogeography of human Y-chromosome haplogroup Q3-L275 from an academic/citizen science collaboration
** A genetic chronology for the Indian Subcontinent points to heavily sex-biased dispersals

*ताजी टिप : अवांतरे अनुषंगिक करावीत असे लिहिलेले आहे. तथाकथित शुद्धलेखन व्याकरण भाषाशास्त्रीय सुचना धाग्यावर अथवा व्यनितून न करता स्वतःचा वेळ आणि श्रम वाचवण्याबद्दल आणि केलेल्या वगळण्या बद्दल खूप खूप आभार.

प्रतिक्रिया

खेडूत's picture

8 Jun 2017 - 2:29 pm | खेडूत

पहिले अवांतर-
विषयाबद्दल ठाऊक नाही, आस्थाही नाही, मात्र ईतिहास, माहित, हि, तांत्रीक, शारीरीक ,आवांतरे, पुर्वज, वैवीध्य , तौलनीक, निगोशीएट, भाषीक, इस्वीसनाच्या असे असंख्य शब्द वाचवत नाहीत हो! 'आफीकेतील' किंवा दोन शब्द न तोडणे, याकडे दुर्लक्ष केलेय.
.

प्रकाशित करायची इतकी घाई का असते असा प्रश्न पडतो. वैयक्तिक घेऊ नये, खूप जण असे करतात! यात वृत्तपत्रे पण आता मागे नाहीत.

दीपक११७७'s picture

8 Jun 2017 - 4:47 pm | दीपक११७७

जिनोम कुठला, त्याला कोणत्या ग्रुप मध्ये ठेवायचं? कसं ठेवायच? का ठेवायचं? हे जिसकी लाठी उसकी भेंस असा प्रकार आहे.
थोडक्यात सांगायचं म्हणजे १० जिनोम च्या संचाला एखादा जणं दोन संचात तर दुसरा पाच संचात सुध्दा divide करु शकतो, इतकं ते Vague असतं.

बाकी आर्य ई ई सोडुन देऊ(ईंग्रजांनी त्या काळी सोडलेली अफवा), त्या आधी मोहन-जोदारो, हड्डप्पा हे लोक एव्हडी भक्कम संस्कृतीअसुन ही ३००० हजार वर्षा पुर्वी नेमके गेले कुठे, त्यांची भाषा काय ई ई बाबत शोध लावला तर बरे होईलअसे वाटते (सायंस खुप पुढे गेलं ना म्हणून) कारण घटना अलीकडीलच आहे, आपण तर ७०,००० इतक्या प्रचंड वर्षा पुर्वीचे प्रवास वर्णन करतो (त्यांनी वापरलेली होडी पण दाखवतो असो