उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक मुदत ठेव

डोके.डी.डी.'s picture
डोके.डी.डी. in काथ्याकूट
28 May 2017 - 4:29 am
गाभा: 

महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्हा मध्यवर्ती बँका डबघाईला आल्या तर काही बंद ही पडल्या त्या आता फक्त शेतकरी विमा वाटप एवढेच काम करतात. त्यावेळी चालू असणाऱ्या अशा
उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक उस्मानाबाद या बँकेत मागील 10 वर्षांपूर्वी खाते उघडून कष्टाच्या पैशातून 36000 हजार रु दाम दुप्पट साठी मुदत ठेव ठेवली होती. मागील 2 वर्षांपूर्वी मुदत संपली पण मधल्या काळात बँक डबघाईला आली किंवा अंशतः बंद पडली बँकेने पैसे नाहीत म्हणून रक्कम दिली नाही. दीड वर्षासाठी परत मुदत ठेव करायला लावली. पण आता मुदत संपली तरी बँक पैसे देत नाही. जेव्हा पैसे येतील म्हणजे कर्ज वसुली किंवा बँक चांगली चालायला लागेल तेव्हा पैसे देऊ अस त्यांचं म्हणणं आहे. लोक प्रतिनिधी ही मदत करत नाहीत कृपया यावर काय करता येईल. कुणाची मदत घेता येईन.
ग्राहक मंचाची मदत होईल काय.

प्रतिक्रिया

वरचे संभाषण त्यांच्याकडून लेखी स्वरूपात घ्या. नंतर ग्राहक मंचाकडे जातोय असे मॅनेजरला सांगा. किंवा हेड ऑफिसमध्ये कोणी ओळखीचे असेल तर त्या मार्गाने पैसे काढून घ्या.

डोन्ट फील बॅड पण इथे तुम्हाला ग्राहक पंचयतीत जावा ह्याशिवाय वेगळा सल्ला मीळणार नाही आणि त्या सल्ल्याचा वापर उस्मानाबाद डीसीसीवर होणार नाही. अशा कित्येक केसेस ऑलरेडी पडल्यात. लेखी वगैरे काहीही मिळणार नाही. तशा स्ट्रिक्ट सूचना आहेत एम्प्लॉयीजना. पॉलिटिकल इस्श्युजमुळे ती अजुन लिक्विडेशन किंवा मर्जिंग मध्ये गेलेली नाहीय इतकेच. हा काही आजचा प्रकार नाही. गेली साताठ वर्षे हेच चालले आहे. लोकप्रतिनिधी मदत करणार नाहीतच. त्यांनीच ती बँक विकून खाल्लीय असा प्रचार आहे. मॅनेजर लेव्हलवर कुणी असेल ओळखीपाळखीचे तर काही मार्ग निघतो का बघावे. किंवा त्यांच्या थोड्या ब्रांचेस जरा बर्‍या स्थितीत आहेत तेथून ह्या एफडीजवर लोन वगैरे मिळते का बघा.

डोके.डी.डी.'s picture

28 May 2017 - 8:37 pm | डोके.डी.डी.

सर आपण सांगितलेली परिस्थिती खरी आहे. कर्मचारी लेखी देत नाहीत आणि ते गावातील असल्याने भांडणे होतात. सर fd वर कर्ज मिळते हे माहीत आहे. पण dcc बँकेत मिळेल काय? दुसरी बँक देऊ शकते काय. आणि अजून एक 1 लक्षपर्यंत विमा असतो म्हणे त्या अंतर्गत काही होणार नाही काय.बँक विलीन झाली तर नंतर तरी रक्कम मिळते का? कृपया मार्गदर्शन करावे

अभिजीत अवलिया's picture

11 Jun 2017 - 12:30 pm | अभिजीत अवलिया

तुमच्यात फार चिकाटी असेल तर मिळतील पैसे. आमच्या वडिलांनी आमचे सर्व सल्ले धुडकावून भुदरगड नागरी सहकारी पतसंस्थेत पैसे ठेवले होते. कालांतराने ही पतसंस्था बुडाली. पण वडिलांनी केस करून कोर्टाकडून 'रक्कम परत देण्यात यावी' असा आदेश आणला होता. पतसंस्थेने तरीही रक्कम परत देण्यास नकार केल्यावर शेवटी पतसंस्थेच्या विभाग प्रमुख का कोणाविरुद्ध अटक वॉरंट आणले होते. मग मात्र घाबरून त्या विभाग प्रमुखाने स्वत: येऊन पैसे परत केले होते. पण अशी हिम्मत दाखवायला फार चिकाटी लागते. तितकी तुमच्यात असेल तरच ह्या फंदात पडा.