तुम्ही कोणते वर्तमानपत्र वाचता आणि का ?

एकुलता एक डॉन's picture
एकुलता एक डॉन in काथ्याकूट
27 May 2017 - 11:52 pm
गाभा: 

प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते तरी तुम्ही कोणते वर्तमानपत्र वाचता व का ?

उदाहरणार्थ पुणेकर 'दै. सकाळ' जास्त वाचतात.

मुंबईकर 'दै. महाराष्ट्र टाईम्स'.

नगरकर 'दै. लोकसत्ता' का वाचतात प्रश्न आहे.

औरंगाबाद 'दै. दिव्य मराठी'.

तसेच 'दै. टाइम्स ऑफ इंडिया'त जाहिराती जास्त असूनही लोक का घेतात?

प्रतिक्रिया

अभ्या..'s picture

27 May 2017 - 11:56 pm | अभ्या..

दिव्य मराठी
कारण पैले त्याच्याबरोबर मला बकेट टब आणि मग फ्री मिळालाय
कारण दुग्गे मि डिज़ाइन केलेल्या झाइराती असल्याने मला फुकट मिळतो.

सतिश गावडे's picture

28 May 2017 - 12:36 am | सतिश गावडे

छापिल - सकाळ (काही कारणास्तव घरी सकाळ घ्यावा लागतो)
ऑनलाईन - दिव्य मराठी (संध्यानंदची ऑनलाईन आवृत्ती नाही म्हणून)

एकुलता एक डॉन's picture

28 May 2017 - 9:43 am | एकुलता एक डॉन

काही काही लोक तर पोलीस टाइम्स पण वाचतात

कीव येते

कीव करण्यासारखे काये त्यात?
चांगला ४ कलर अंक काढतात की, पोलीस कशा पध्दतीने गुन्हे उघडकीस आणतात ह्यामध्ये असतो रस काही जणांना. ते फोटो वगैरे जरा त्रासदायक वाटू शकतात पण कित्येक जणांचा त्याचा सुध्दा अभ्यास असतो, करावा वाटतो, शिवाय यमकी हेडलाईन्स कसल्या कॅची असतात.
क्राईम डायरी, सीआयडी सारख्या मालिका चालू शकतात, पोलीस टाइम्स का नाही?

दीपक११७७'s picture

28 May 2017 - 12:42 pm | दीपक११७७

क्राईम डायरी, सीआयडी सारख्या मालिका चालू शकतात, पोलीस टाइम्स का नाही?

हा तर्क एकदम लाजवाबच आहे. शीवाय अचुक ही.
+१११११११.................

कालिगंगा आणि पोलिस टाईम्स आवडणारे लोक विशिष्ट प्रकारचे दिसत असतात. थोडे मध्यमवयिन, खत्रूड दिसणारे, थोडे एकलकोंडे वाटणारे असे हे लोक असतात, हे पेपर पुढारीत लपवून नेतात.(क्वचित, सिगारेट ओढतात) या आठवड्याचा पोलिस टाईम्स अजून आला नाही हे ऐकलं की थोडे अस्वस्थ होतात. पोलिस टाईम्सचा दिवाळी अंक सुद्धा विकत घेतात.
अर्थात आमच्या पेपरच्या स्टॉलवर बसून ऑब्झर्व्ह केलेली गिर्हाईके एवढाच माझा सँपल सेट.

ज्ञानोबाचे पैजार's picture

28 May 2017 - 10:14 am | ज्ञानोबाचे पैजार

आमच्या कडे "नवा सिंहगड परिसर" नियमित येतो.
पैजारबुवा,

उपेक्षित's picture

28 May 2017 - 11:30 am | उपेक्षित

त्यासोबत आमच्याकडे सिंहगड मित्र हा अजून १ पेपर नियमित येतो :)

सतिश गावडे's picture

28 May 2017 - 5:08 pm | सतिश गावडे

तुम्ही दोघेही आमचे शेजारी दिसता. :)

आदूबाळ's picture

28 May 2017 - 5:27 pm | आदूबाळ

अत्यंत वाचनीय आणि नवसाहित्याने संपृक्त असा पेपर आहे तो. त्यासारखाच आणखी एक होता. त्याने मान टाकलेली दिसतेय.

उपेक्षित's picture

28 May 2017 - 6:16 pm | उपेक्षित

ज्याने मान टाकली त्या पेपरचा मालक लयी डेंजर होता, जाहिरातीसाठी लयी पिडायचा पण चांगला माणूस होता (आहे :) )

काय नाव होतं हो त्या पेपराचं?

उपेक्षित's picture

29 May 2017 - 8:50 pm | उपेक्षित

पेपरचे नाव नाही आठवत पण मालकाचे नाव लोखंडे म्हणून आहे (होते ?)

कपिलमुनी's picture

28 May 2017 - 11:02 am | कपिलमुनी

इंग्रजी पेपरच्या रद्दीचा भाव जास्त असल्याने आम्ही इंग्रजी पेपर घेतो

प्रसाद_१९८२'s picture

28 May 2017 - 11:33 am | प्रसाद_१९८२

रद्दीचा, सध्या काय भाव सुरु आहे ??

१० न दिली काल....२० किलो भरली....

मनिमौ's picture

28 May 2017 - 1:26 pm | मनिमौ

लोकसत्ता आवडतो. हाच पेपर घेण्याचे कारण म्हणजे अजून तरी छान माहिती येत असलेल्या पुरवण्या. बाकी सर्व पेपर च्या पुरवण्यात मजकुर वीतभर आणी झैराती हातभर अशी स्थिती आहे.

दीपक११७७'s picture

28 May 2017 - 2:04 pm | दीपक११७७

मी पण लोकसत्ता वाचतो कारण गिरीष कुबेर हेच एकमेव जाणते- जाणकार आहेत ह्या जगात असे भासते.

खेडूत's picture

28 May 2017 - 2:37 pm | खेडूत

कुठून सुरुवात करावी?
खरं तर कालानुरूप कोणत्या पेपरच्या इपेपर आवृत्ती आवडतात/ वाचता हा प्रश्न ठीक राहील. मी दहा वर्षे फक्त ई पेपर्स वाचतो.
सध्या कोथरूड मित्र येतो तोच एक पेपर! त्याचा उपयोग भाज्यांच्या काड्या कापून बागेतल्या झाडांना घालताना कचरा होऊ नये म्हणून खाली धरण्यास उत्तम होतो.
बाकी पेपरचं म्हणाल तर 'मुलं मोठी झाली, केला बंद पेपर' असं नाही झालं.

बालपणी मटा वाचत आम्ही मोठे झालो. त्याकाळी म्हणजे ऐंशीच्या दशकात मटा वाचनीय होता.
पुढे लोकसत्ता अनेक वर्षे वाचला. माधवराव गडकरींच्या काळात सर्वोत्तम वाटला.
२००६ मधे एकदा सहज मिनिमलिस्ट व्हायचं ठरवलं. तेव्हा पेपर, बी एस एन एल फोन अन घड्याळ अन साप्ताहिक बाहेर खाणे हे सर्व ठरवून १ जूनला बंद केले. मोबाईल आल्यावर चारपाच वर्षे लँडलाईन अन हातात घड्याळ नको वाटत होते. पेपरची रद्दी घरात साठली की ओंगळ दिसत असे. रद्दी घालायला जाणे नको वाटे अन पेपरवाल्याला सांगितले तर तो रद्दी घ्यायला दोन दोन महिने येत नसे. शिवाय वेळोवेळी गावाला/ प्रवासाला जाताना नको म्हणले तरी आल्यावर १० दिवस पेपर दारात साठलेले, त्या टाकणार्‍या बालमजूर मुलावर ओरडणे नको वाटे..फक्त शनिवार रविवारी कोपर्‍यावरून लोकसत्ता घेऊन येत असे. लगेच दोन वर्षात इंटरनेटवर सगळे पेपर्स मिळायला लागले.
बालपणी साप्ताहिक श्री आणि स्वराज्य वाचत असे. पेपरात विनोद छापून येणे विशेष वाटे. पुढे संध्यानंदने सगळी रेकॉर्ड्स मोडली. प्रभात प्रेसजवळ रहात असल्याने तो पेपर वाचणे होई अन आवडतही असे. मुंबईकर मित्रामुळे नवाकाळ ची ओळख झाली, तोही आवडत असे. विचित्र विश्व अन मायापुरी नावाचे प्रकार मधे मधे पहायला मिळत. स्टारडस्ट वगैरे उच्चभ्रू प्रकार पुण्यात आल्यावर पहिल्यांदाच पाहिले.

दक्षता, चांदोबा अन किशोर मासिके १० वर्ष सतत वाचली. सर्व उत्तम.
केसरी हा पेपर एकदा तरी घेऊन पहायचाय, १९८५ नंतर पहाण्यात नाही.

जाता जाता- औरंगाबाद दिव्य मराठी हे काय आहे? असा पेपर आहे का काय?
.
.
मूळ धाग्यापेक्षा मोठा प्रतिसाद देण्याचं स्वप्न होतं (काय स्वप्नं असतात नै!) ते पूर्ण झालं.

औरंगाबाद दिव्य मराठी हे काय आहे? असा पेपर आहे का काय?

नॉर्थला जो फेमस दैनिक भास्कर ग्रुप आहे (डीबीकॉर्प) त्यांचे मराठी पब्लिकेशन दिव्य मराठी ह्या नावाने आहे. सोलापूर, औरंगाबाद आवृत्ती असते. पब्लिकेशनचा दांडगा अनुभव आणि इन्फ्रास्ट्रक्चर असल्याने चालवतात व्यवस्थित पेपर. बराच इंटुक स्टाफ (केतकर वगैरे) संपादक म्हणून घेतलाय, न्युज फीडपेक्षा कमर्शिअलकडे जास्त लक्ष असते. १६ पानात १० पाने झैराती असतात. शिवाय मधुरिमा आरोग्य टाइप पुरवण्याही असतात. पोलिटिकली बॅलन्सड असा आव असतो, लोकल न्युज जास्त कव्हर करतात. सोलापुरात सध्या लोकमतनंतर सर्क्युलेशनमध्ये त्यांचाच नंबर आहे. नवीन सर्क्युलेशन्साठी बादल्या टब थर्मास वाटने, फ्री टाकणे वगैरे प्रकार केलेत त्यांनी.

अछा, म्हणूनच पहाण्यात नाही. लोकसत्ताने पुण्यात नवे असताना ९६-९७ मधे वॉटर कूलकेज, व अन्य वस्तू दिल्याचे आठवते.

शनिवार रविवारचे एशिएन एज,लोकसत्ता फक्त॥ काही दिवस एएऐवजी हिंदुस्तान टाइम्स घेत असे.
टाइम्सही उपयुक्त होता परंतू टाइम्स + ( मुंबई मिरर/इकोटा/मटा) हे बोचकं एकत्र बांधले तेव्हापासून फारकत घेतली. शिवाय टाइम्स+मिरर हे अगोदर एकत्र असतात त्यातला मिरर उगाच माथी मारतात. काही पेपरवाले त्याबदली लिहिल्याप्रमाणे मटा बदलून देत नाहीत. मटा नक्की कोणत्या मराठी आर्थिक /वयोगट/ नोकरदार/मालक/युवा गटासाठी आहे हे निश्चितच होत नाही अजून. टाइम्सला "ओल्ड लेडी अवअ बोरिबंदर" गंमतीने म्हणतात तसे इतर पेपरांना नावे आहेत का?

तुम्ही कोणते वर्तमान मात्र पत्र वाचता व का ?

"वर्तमान मात्र पत्र" म्हणजे काय..?

एकुलता एक डॉन's picture

29 May 2017 - 2:49 pm | एकुलता एक डॉन

टायपिंग मिस्टेक

मी वयाच्या ८ व्या वर्षापासून पेपर वाचतो. लहाणपणी, जेव्हा आमची स्वतःची न्युजपेपर एजन्सी नव्हती तेव्हा शेजारच्या घरातील जुने पेपर वाचत असे, भेळेचा कागद, किराणा सामान गुंडाळून आणलेले कागद देखिल सोडत नसे. नंतर साधारण मी ११ वर्षांचा झालो तेव्हा आमची एजन्सी सुरू झाली. मग तर मला मेजवाणी मिळू लागली. सुरूवातीला पुढारी आणि लोकमत हे दोन पेपर येत असत. दोन्हीही मी अथ पासून ईती पर्यंत वाचत असे. लोकमतमधिल अत्यंत वेडगळ काँग्रेसनिष्ठ अग्रलेखांमुळे लोकमत तिरस्करणिय वाटत असे. पुढारीत मात्र बर्‍यापैकी निष्पक्ष अग्रलेख येत असत. पुरवण्या मात्र लोकमतच्या आवडत असत. नंतर नंतर इंडियन एक्स्प्रेस येऊ लागला. अक्षरशः एक शब्द देखिल समजत नसूनसुद्धा वाचायचो. अडलेले शब्द टिपून घेऊन शाळेतल्या डिक्शनरीत हुडकायचो.(माझे इंग्रजी सुधारण्याचे बरेचसे श्रेय या सवयीला जाते.) बारावीपर्यंत हे तीन पेपर वाचीतच असे. लोकसत्ता क्वचित मिळे आणि विशेषतः रविवार लोकसत्तेचे अप्रूप फार वाटायचे, मी वडिलांना बाहेर गेले तर लोकसत्ता आणायला सांगत असे. त्याचा त्यांना फार राग यायचा, लोकसत्ता, सकाळची एजन्सी आम्हाला गावातल्या दुसर्‍या एजंटच्या मोनोपॉलीमुळे मिळू शकली नव्हती त्यामुळे त्या पेपर्स वर त्याम्चा मनस्वी राग होता. नंतर इंजिनीअरींगला गेल्यावर मात्र चारही वर्षे न चुकता लोकसत्ता विकत घेत असे. कॉलेजमध्ये इकॉनॉमिक टाईम्स, बिझिनेस स्टँडर्ड आणि मटा वाचायला मिळायचे, शिवाय ऐक्यही(:))). शेवटच्या वर्षी पहिल्यांदा द हिंदू वाचला आणि या पेपरच्या अक्षरशः प्रेमात पडलो. निष्पक्ष, अतिशय संतुलीत वार्तांकन, प्रचंड वैविध्यपूर्ण संपादकिय, परराष्ट्र, आर्थिक धोरण, पर्यावरण आणि गव्हर्नन्स या विषयांवर लिहिणारे उत्तम विश्लेषक आणि सर्वात महत्वाचे म्हणजे देशाच्या कानाकोपर्‍यातून वर्ताहरांच्या प्रचंड जाळ्याच्या माधय्मातून होणारे साक्षेपी वार्तांकन यामुळे या वृत्तपत्राने माझ्यावर मोहिनी घातली. पेड न्युजच्या जाळ्यात न अडकलेले दोनच मिडिया हाऊसेस, एक एक्स्प्रेस ग्रूप आणि दुसरा द हिंदू. इंजिनिअरींग संपल्यावर गेली चार वर्षे रोज द हिंदू, इंडियन एक्स्प्रेस आणि क्वचित लोकसत्ता वाचतो. लाईव्ह मिंट आणि बिझिनेस स्टँडर्ड चाळतो केवळ. सकाळ केव़ळ ढिंग टांग वाचायला. मात्र वर्तमानपत्र वाचत नाही असा एक दिवसही जात नाही. माझ्या मते ज्ञानाचा इतका चांगला स्त्रोत दुसरा असू शकत नाही. सध्याच्या काळात टिव्ही आणि सोशल मिडियावरून जी कंठाळी बसवणारी गलिच्छ आणि एकसुरी पत्रकारिता चालू आहे तेव्हा तर "verification, fact-checking, attribution and gatekeeping" ही बातमीची मुळ वैशिष्ट्ये कायम ठेवणे छापील माध्यमांकडूनच अपेक्षिले जाऊ शकते असे वाटते.

या माहितीचं तुम्ही काय करणार आहात?

एकुलता एक डॉन's picture

4 Jun 2017 - 2:33 am | एकुलता एक डॉन

अभ्यास

लहानपणापासून घरी सगळ्यानाच वर्तमान पत्र वाचण्याची खूप चांगली सवय आहे, कधी वेळ मिळाला कि सगळे जण पेपर घेऊनच बसतात अजूनही........
सकाळ आम्हा पुणेकरांचा आवडीचा पेपर , पूर्वी खूप उत्तम उत्तम लेख यायचे , दिवाळी आणि उन्हाळ्याच्या दिवसाला "सुट्टीचे पानं" तर फारच आवडायचे आम्हाला सगळ्याना .............
सुविचार,बोधकथा,दिनविशेष,खेळातले दिग्गज ,वेगवेळ्या लेखमाला (सण, स्पर्धा नुसार) इत्यादी अजून बऱ्याच गोष्टी यायच्या रोजच्या पेपर मध्ये , खूप गोष्टीशी वर्तमान पत्राने ओळख करून दिली.
शब्दामध्ये किती समर्थ असते हे कळले वर्तमान पत्रामुळेच....
लहानपणी माझ्या बहिणीला आणि मला कात्रणं गोळा करायची सवय होती पेपर मधून,तेव्हा कळायचंच नाही कुठंला पेपर चा भाग ठेवू आणि कुठला नको इतकी छान माहिती असायची.
आताच्या पेपर मध्ये काही येताच नाही कि ते कात्रण म्हणून ठेवावेसे वाटावे , त्यामुळंच कि काय आजकाल जुनी लोक सोडून बाकीचे पेपर कोणी वाचत नाहीत........
लोकसत्ता पण वाचायचो ,त्यातील काही कात्रणे अजूनही आहेत माझ्याकडे , ऐक लेखमाला चालू केली होती त्यानी जगप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शकाची.
अकिरा कुरसोवा, फ्रान्सिस फोर्ड कपोला ,आंद्राई तारास्कोव्ही, रोमन पोलान्स्की इत्यादी दिग्गजांशी ओळख पपेरमधूनच झाली ,मला अजून त्यांच्या चित्रपटापेक्षा ते लेखच फार आवडतात वाचायला.(कोणाला हवे असतील तर नक्कीच शेर करायला आवडतील ,ई-मेल id व्यनि करावा .... )
आणि दहावी बारावीला असताना पेपर मध्ये येणारे अभ्यासाचे लेख हि खूप उपयोगी पडले..........

सध्या वाढलेल्या इंटरनेट मुळे वर्तमान पत्रांना नक्कीच मागणी कमी झाली आहे तरी पण अजूनही गाव गावात वर्तमान पत्र वाचतात ,त्यामुळे वर्तमान पत्र कुठले हि असू त्यांनी जनतेला उपयोगी आणि खरी माहिती छापावी हीच अपेक्षा..........................................................

तेजस आठवले's picture

29 May 2017 - 5:33 pm | तेजस आठवले

मी शाळेत असताना आम्ही फक्त रविवारी पेपर आणत असू, तो पण लोकसत्ता.
सध्या लोकसत्ताच आणतो, पण एक वीकांताच्या पुरवण्या सोडल्या तर क्वचितच काही वाचण्यालायक असते.अपवाद अर्थवृत्तांत.
लहानपणी कळण्याचे वय नव्हते, पण तेव्हा स्मरणात राहिलेल्या काही केतकरी बातम्यांचे संदर्भ/अर्थ नंतर कळले.
सध्याच्या काळात दुर्दैवाने कुबेर ती परंपरा पुढे चालू ठेवत आहेत.

बाकी एकूणच लोकशाहीचा चौथा स्तंभ असण्याचे दिवस केव्हाच गेले आहेत, ज्याच्या कडून चौथाई मिळेल त्याचे चांगभले करण्याचे दिवस आहेत.
सत्यता, निस्पृहता, देशहितासाठी काही करण्याची तळमळ/प्रयत्न हे सगळे मागे पडून जाहिरातींच्या उत्पन्नातून पेड पत्रकारिता करायची आणि कोणी शंका घेतल्यास असहिष्णुता सिद्धांत वापरायचा.
अंतू बर्वा च्या तोंडी एक वाक्य आहे, "पेपरवाले काय, द्याल ते छापतील. दामू नेना कसला प्रेमळ ?.........."
एकूणच पेपरात काय छापायचे हे त्यांच्या हातात असल्याने वाचकांच्या हातात तसे पण फार काही नसते.पण साध्वी प्रज्ञासिंग हिची जामिनावर सुटका करण्यात आली हे वाक्य आणि हाफिज सईद ह्यांच्या सभेसाठी पाकिस्तानात विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या ह्या वाक्यांमधील फरक सामान्य जनतेला कळतो.विशिष्ट अग्रलेख विनाशर्त मागे का घेतला जातो आणि भारतीय न्यायव्यवस्था,पोलीस ह्यांनी कायदेशीर मार्गाने, बचावाच्या सर्व संधी देऊन एका देशद्रोही दहशतवाद्याला केलेली फाशीची शिक्षा का खुपते हे कळण्याइतके वाचक नक्कीच स्मार्ट झाले आहेत.सामान्य माणसाच्या मनातले विचार, पण ते फक्त काही विशिष्ट लोकांनी मांडल्यामुळे ह्यांच्या मते "वादग्रस्त" असतात आणि सतत वादग्रस्त मते मांडणारे लोक मात्र "प्रतिपादन" करतात.मालेगाव/अजमेर बॉम्बस्फोट हिंदू दहशतवादी घडवून आणतात पण बाकीच्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये हल्लेखोरांना धर्म नसतोच मुळी.ते अज्ञानामुळे मूलतत्ववाद्यांच्या संपर्कात आलेले निरपराध तरुण असतात. अश्या प्रकारच्या "सिलेक्टिव्ह बायस" नसणाऱ्या बातम्या छापणारे वृत्तपत्र दुर्मिळ झाले आहे.
असो.

मटा ची ऑनलाईन आवृत्ती चाळतो, पण त्यात काही दम नाही. अपवाद मुक्तपीठ. ह्या एका गोष्टीसाठी मटा वाल्याना हजार गुन्हे माफ ! :) मुक्तपीठ ची नशा काही औरच आहे. :D
बाकी लोकसत्ता आणि मटा आपल्या ऑनलाईन आवृत्त्यांमध्ये सामनामध्ये रोज काय छापून आले आहे हे का छापतात देव जाणे. उबग आला आहे. बातमी तर अशी देतात की जणू शिवसेनेने मोदी सरकारला हादरवले आहे आणि भाजप चळाचळा कापते आहे. लोकसत्ताला रोज मोदींवर या ना त्या स्वरूपात टीका करण्याची इतकी सवय लागली आहे कि त्यामुळे ते रोज मोदींना चर्चेत ठेवतात, आणि कदाचित अश्याच स्वरूपाच्या गोष्टी मोदींना परत २०१९ मध्ये निवडून येण्यास मदत करतील.

अप्पा जोगळेकर's picture

29 May 2017 - 5:46 pm | अप्पा जोगळेकर

मटाने पण मुपी चालू केले वाटते. काही म्हणा हे मटा वाले साले चोर. सामनाच्या बातम्या छापत होते इतके दिवस. आता थेट सदर चोरले म्हणजे नवलच म्हणायचे.

तेजस आठवले's picture

29 May 2017 - 6:01 pm | तेजस आठवले

मटा ची ऑनलाईन आवृत्ती चाळतो, पण त्यात काही दम नाही. अपवाद मुक्तपीठ. ह्या एका गोष्टीसाठी मटा वाल्याना हजार गुन्हे माफ ! Smile मुक्तपीठ ची नशा काही औरच आहे. Biggrin

मटा ऐवजी सकाळ असे वाचावे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 May 2017 - 6:52 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दै.सकाळ, दै. लोकमत, दै. सामना, महाराष्ट्र टाइम्स, दिव्य मराठी.

औरंगाबादचे लोक दिव्य मराठी वाचतात हे कुठे छापून आलं. =))

-दिलीप बिरुटे

उपेक्षित's picture

29 May 2017 - 9:00 pm | उपेक्षित

लहान असताना रोजचा पेपर परवडायचा नाही म्हणून फ़क़्त रविवारी आमच्याकडे सकाळ यायचा,
खूप वाट पाहायचो रविवार सकाळची खास करून पुरवणीची भरपूर साहित्याने भरलेली असायची ती पुरवणी त्यातील रामनाथ चव्हाणांचे सदर तर विशेष प्रिय होते मला.

असो सध्याला वाचण्यासारखे पेपर कमी असतात पण सवय जात नाही त्यामुळे घेतो पेपर.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 May 2017 - 9:55 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>रामनाथ चव्हाणांचे सदर तर विशेष प्रिय होते मला.

रामनाथ चव्हाणाची भटक्यांच्या जीवनावरची पुस्तकेही अतिशय माहितीपूर्ण आहेत.

-दिलीप बिरुटे

उपेक्षित's picture

4 Jun 2017 - 6:40 pm | उपेक्षित

प्रा.डॉ. लगे हात पुस्तकांची नावे बी टाका ना आमच्या सारख्याला तेवढीच मेजवानी .... ( आंतरजालावर शोधू शकतो पण तुम्ही रेफर केलीत तर जास्ती बरे)

सिरुसेरि's picture

30 May 2017 - 7:13 pm | सिरुसेरि

पुर्वी "द हिंदु" - तामिळनाडु , आंध्र -- "डेक्कन क्रॉनीकल " , कर्नाटक - "डेक्कन हेरॉल्ड " असं काहिसं समिकरण असावं .