पंतप्रधान आवास योजनेबद्दलची माहिती

अ.रा.'s picture
अ.रा. in काथ्याकूट
26 May 2017 - 12:16 pm
गाभा: 

नमस्कार मित्रांनो ,
तुम्हा सर्वाना परिचयात असलेलया 'पंतप्रधान आवास योजनेबद्दल' थोडी अधिक माहिती जाणून घ्यावयाची आहे.
केंद्र सरकारने मोठा गाजावाजा करत ‘सर्वासाठी घरे’ या संकल्पनेवर आधारित ‘प्रधानमंत्री आवास योजना’ २०१५ मध्ये सर्वसामान्यांसाठी सादर केली. पण सरकार दफ्तरी या योजनेची कोणाला माहिती आहेच असे नाही.

या योजनेंतर्गत घरकुल योजनेसाठी चार घटक ठरविण्यात आले आहेत. त्यातील पहिल्या घटकांत झोपडपट्टय़ांच्या पुनर्विकासाचा समावेश करण्यात आला आहे. त्याअंतर्गत झोपडय़ांचा आहे त्याच जागेवर पुनर्विकास करण्यात येणार आहे. ही योजना फक्त आर्थिक दुर्बल घटकांसाठी असून त्यांतील लाभार्थ्यांना केंद्र सरकारकडून १ लाख रुपये व राज्य सरकारकडून १ लाख रुपये असे दोन लाख रुपये अनुदान मिळणार आहे.
दुसरा घटक हा कर्जसंलग्न अनुदान योजनेचा आहे. ही योजना दुर्बल घटक व अल्प उत्पन्न घटकांसाठी (वार्षिक उत्पन्न ३ लाख ते सहा लाख रुपयांपर्यंत) आहे.
(यामध्ये २०१७ वर्षी अजून २ घटकांना सामावून घेण्यात आले आहे ते म्हणजे वार्षिक उत्पन्न ६ लाख ते १२ लाख रुपयांपर्यंत आणि १२ लाख ते १८ लाख रुपयांपर्यंत).
या योजनीतल तिसऱ्या घटकानुसार खासगी विकासक किंवा खासगी कंपन्यांच्या सहभागातून बांधण्यात आलेल्या गृहप्रकल्पांतील ३५ टक्के घरे दुर्बल घटकांसाठी राखून ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.
चौथा घटक हा वैयक्तिक घरबांधणीसंबंधी आहे. स्वत:च्या मालकीच्या जागेवर नवीन घर बांधणे किंवा जुन्या घराची वाढ करणे यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून २.५० लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे. ही योजना पूर्णपणे आर्थिक दुर्बल घटकांसाठी आहे.

हि झाली आंतरजालावर उपलब्ध असलेली माहिती. तरीही सर्वसमावेशक अशी माहिती अजूनही उपलब्ध नाही.
खालील गोष्टींची माहिती असल्यास नक्की प्रतिसाद द्यावा.
१. या योजनेसाठीची पात्रता निकष?
२. अर्ज भरण्यासाठीही प्रक्रिया ?
३. यासाठीचे आवेदन कोठे करावयाचे आहे? (आंतरजालावर ऑनलाइन पद्धतीने वा बँकेत?)
४. या प्रक्रियेसाठी लागणारा वेळ? आणि मिळणारी सबसिडी हि कोणत्या प्रकारे आणि कशा स्वरूपात मिळते?
५. कागदपत्रांची पूर्तता?
आपल्या जाणकार मिपाकरांनी त्यावर प्रकाशझोत टाकावा. त्यामुळे एकत्रित अशी माहिती सर्वांसाठी उपलब्ध होऊ शकेल. याव्यतिरिक्त अजून काही उहापोह होत असल्यास नक्कीच स्वागतार्ह असेल.

प्रतिक्रिया

पैसा's picture

26 May 2017 - 5:42 pm | पैसा

चर्चेतून अधिक माहिती मिळेल अशी अपेक्षा.

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 May 2017 - 6:16 pm | डॉ सुहास म्हात्रे

+१

एस's picture

26 May 2017 - 6:46 pm | एस

यासंदर्भात अजून माहिती जाणून घ्यायला आवडेल.

विशुमित's picture

27 May 2017 - 12:15 pm | विशुमित

गुरुजी कुठायेत ? बरेच दिवस गायब आहेत.

जनतेच्या फायद्याच्या चर्चे वेळेस नेमके कोणी मोदी सरकार तज्ज्ञ धावून येणार नाहीत.

फक्त गोरक्षा, नोटबंदी, भ्रष्टाचार, काश्मीर, पाकिस्तान, विरोधक, खांग्रेसशी, सिकुलर ब्ला ब्ला वांझोट्या चर्च्यामध्ये चढाओढीने भाग घेतील.

विशुमित's picture

27 May 2017 - 12:17 pm | विशुमित

गुरुजी कुठायेत ? बरेच दिवस गायब आहेत.

जनतेच्या फायद्याच्या चर्चे वेळेस नेमके कोणी मोदी सरकार तज्ज्ञ धावून येणार नाहीत.

फक्त गोरक्षा, नोटबंदी, भ्रष्टाचार, काश्मीर, पाकिस्तान, विरोधक, खांग्रेसशी, सिकुलर ब्ला ब्ला वांझोट्या चर्च्यामध्ये चढाओढीने भाग घेतील.

आता कळले की मोदीजी का आपल्या कार्यकर्त्यांना सरकारी योजना समजावून सांगा म्हणून सारखे बजावत आहेत.

पं.प्र.आ.योजने अंतर्गत ४ गट बनवले आहेत ...
१ EWS & LIG -कुटूंबाचे वार्षिक ऊत्पन्न ६ लाख, ह्या गटात जास्तीत जास्त ६० Sqm. (फीट नाही)चे तयार किंवा अंडर कंस्ट्र्क्शन घर घेऊ शकता. घराचि किंमत कीतिही असली तरी सबसिडी जास्तीत जास्त ६ लाख लोन अमाऊंट वर साधारण्पणे २.६७ लाखापर्यंत सबसिडी मिळते. खरेदीखतात कुटूंबातिल महिलेचं नाव असणे बंधनकारक (अंडर कंस्ट्र्क्शनसाठी बहूधा अट शिथील)

२. MIG 1- सध्या फक्त २०१७ साला पुरते हा गट बनवलाय. कुटूंबाचे वार्षिक ऊत्पन्न ६ ते १२ लाख, ह्या गटात जास्तीत जास्त ९० Sqm. (फीट नाही)चे तयार किंवा अंडर कंस्ट्र्क्शन घर घेऊ शकता. घराचि किंमत कीतिही असली तरी सबसिडी जास्तीत जास्त ९ लाख लोन अमाऊंट वर साधारण्पणे २.३५लाखापर्यंत सबसिडी मिळते. खरेदीखतात कुटूंबातिल महिलेचं नाव असणे बंधनकारक नाही.

३. MIG २- हा पण सध्या फक्त २०१७ साला पुरते गट बनवलाय. कुटूंबाचे वार्षिक ऊत्पन्न १२ ते १८ लाख, ह्या गटात जास्तीत जास्त ११० Sqm. (फीट नाही)चे तयार किंवा अंडर कंस्ट्र्क्शन घर घेऊ शकता. घराचि किंमत कीतिही असली तरी सबसिडी जास्तीत जास्त १२ लाख लोन अमाऊंट वर साधारण्पणे २.३०लाखापर्यंत सबसिडी मिळते. खरेदीखतात कुटूंबातिल महिलेचं नाव असणे बंधनकारक नाही.
===============================================================================
मुख्य अटी -
खरेदीदाराच्या नावे संपुर्ण भारतात कुठेही पक्के घर नसावे.
कुटूंबाची व्याख्या - नवरा, बायको आणि त्यांची अविवाहीत मूले , अविवाहीतांसाठी आईचे नाव लावायची मुभा (खात्री करुन घेणे)
===============================================================================
अर्ज करावयाची पध्द्त-
सर्व प्रथम ज्या बँकेतून कर्ज घ्यायचे आहे तिकडे ह्या योजनेची माहीती घ्यावी. बँक सर्व साधारणपणे आपल्या कर्जाची मर्यादा ठरवून आपल्याला कर्ज मंजूर करेल, त्या नंतर आपल्याला एक साधे डीक्लेरेशन द्यायचे आहे. सदरहू बँक आपली फाईल ह्या योजनेसाठि पुढे पाठवेल. साधारणपणे ३-४ महीन्यात आपल्या अर्जावर निर्णय होऊन सबसिडीचि रक्कम आपल्या बँकेत जमा होईल त्यानंतर बँक आपल्याला २ पर्याय देतील. १- कर्ज हफ्ता कमी किंवा २- कर्ज फेड मुदत कालावधी कमी करणे.

==============================================================================
माझे अनुभव-

वरील माहीती, गेली ३ महीने मी स्वतः माझ्या गॄहकर्जासाठी, ह्या योजनेबद्द्ल माहीति गोळा करतोय त्यातून मिळालेली आहे. एस.बी.आय च्या मुंबई येथील एका शाखेत ह्या योजनेबद्दल अनभिज्ञता जाणवली. अ‍ॅक्सिसच्या एका शाखेत ऊत्तम माहीती तर एका शाखेत आमच्याकडे ही स्किम नाही म्हणून सांगितले. अजून एका निमसरकारी बँकेत ही योजना फक्त एकदम गरीब, मोलमजूरी करुन जगणार्यांसाठी आहे म्हणून सांगितले मग मीच त्याना MIG ग्रुप बद्द्ल माहीती दिली. HDFC बँक मात्र आपल्या वेबसाईट वर ह्या योजने चांगली आणि आग्रही प्रसिध्दी देतेय म्हणून मी गॄहकर्जासाठी तिथे अप्लाय केला आहे. (टीप- मला कुठचीहि बँक कमिशन देत नसून सदर अनुभव हे पुर्णतः व्यक्तिक आहेत. )

डोके.डी.डी.'s picture

30 May 2017 - 4:59 pm | डोके.डी.डी.

नवीन कर्जा साठी चांगली स्कीम आहे पण जुन्या कर्जालाही लागू करायला हवी होती. मी 2016 ला कर्ज घेतले त्यासंदर्भात चौकशी केली होती. अजून काही
Hdfc चे कर्ज मिळणे सोपे आहे सर्व्हिस उत्तम आहे.

सतिश पाटील's picture

30 May 2017 - 5:22 pm | सतिश पाटील

माझे उत्पन्न ६ लाखापर्यंत आहे. भारतात माझ्या नावे दुसरे कुठेही घर नाही.
मागच्या वर्षी एप्रिलला तयार घर्खरेदी केली. ३१० स्क्वेरफुट.
खरेदी खतात वडिलांचे नाव आहे.( त्यामुलेच जास्त कर्ज मिळाले.)
तर मला देखील हे अनुदान मिलु शकते का?

जुन्या कर्जांबद्द्ल आपल्या बँकेत चौकशी करा.