सोनू निगम, अभिजित आणि ट्विटरवरचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य

सच्चिदानंद's picture
सच्चिदानंद in काथ्याकूट
24 May 2017 - 11:17 pm
गाभा: 

तर सोनू निगम ने भलं मोठ्ठं पत्र लिहून ट्विटर सोडण्याची घोषणा केली आणि आधीच सुरु असलेल्या गोंधळात अजून नवी भर पडली. पण यातून काही प्रश्न निर्माण झालेले आहेत.

पार्श्वभूमी अशी की, भाजपाच्या काही लोकल नेत्यांचा एका सेक्स रॅकेटमध्ये सहभाग असल्याच्या बातम्या आल्या आहेत. त्या किती खर्‍या-खोट्या की नेहमीप्रमाणे निवडणुकीच्या तोंडावरचे आरोप ते सिद्ध व्हायचे तेव्हा होइल. पण ही बातमी जेएनयु (हे कायम बातमीत) च्या एका विद्यार्थी संघटनेच्या माजी उपाध्यक्षा असलेल्या 'शेह्ला रशीद' नावाच्या एका मुलीने ट्विटरवर टाकली.
यावर आधी नियमित असा गदारोळ सुरु होता पण अभिजित भट्टाचार्य या गायकाने यावर एक कमेंट टाकली आणि आगीत तेल ओतले गेले.
-
abhijit tweet
-
हे अर्थातच आक्षेपर्ह असे ट्विट होते आणि यावर दोन्ही बाजूंनी गोंधळ झाला आणि अभिजितरावांचे ट्विटर अकाउंट धारातीर्थी पडले.

यावर शेह्ला रशीदची तिची बाजू मांडणारी ही पोस्ट,
https://www.facebook.com/ShehlaRashidOfficial/posts/129243290974403

यालाच समांतर दुसरी घटना म्हणजे त्यातच परेश रावल यांनी 'दगडफेकीसमोर काश्मिरी तरुणाऐवजी च यांनाच बांधून न्यायला हवे होते' अशा अर्थाचे ट्विट टाकले (याला अरुंधती रॉय यांचे आधीचे विधान कारणीभूत होते).
-
paresh raval tweet
-
या ट्विटवर देखील गदारोळ सुरु होता आणि ते ट्विट डिलिट करावे अशी ट्विटर कडून परेश रावल यांना सूचना आली होती.

या दोन्ही घटनांच्या पार्श्वभूमीवर आधीच अजानसंबंधित ट्विटवेळी 'असहिष्णुता' सहन करावी लागलेल्या सोनू निगमने निषेध म्हणून ट्विटर अकाउंट बंद करत असल्याची घोषणा केली पण त्याच वेळी त्याने होत असलेल्या दुजाभावाबद्दल सविस्तर लिहिले.
-
sonu tweet1
sonu tweet 2
sonu tweet3
-

एरवी याकडे दुर्लक्ष केले असते पण सोनूने काही रोचक मुद्दे मांडले आहेत जे नक्कीच चर्चा करण्याजोगे, विचार करण्याजोगे आहेत असं वाटलं.
१९ वा मुद्दा नक्कीच पटला, तो म्हणे ' मी डावा अथवा उजवा नाही. इतरांच्या मतांचा नक्कीच आदर करतो पण इथे तुम्ही कोणत्यातरी बाजूचे असलाच पाहिजे (असा एक अट्टाहास दिसतो)'.

आजकाल सगळेच जास्तीत जास्त टोकदार मतांचे होऊ लागले आहेत काय?
नेमस्तपणा, तटस्थपणा हे चर्चांमधले सद्गुण न ठरता नेभळटपणाची ओळख ठरु लागले आहेत काय?
दुराग्रही लोकांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे त्यांचे मत स्वीकारणे असा ग्रह बळावू लागला आहे का की ज्यामुळे सगळेच पोट तिडिकीने भांडू लागलेत.

याच बरोबर अधिक महत्त्वाचे म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मर्यादा कुठवर आणि कशाच्या परिमाणावर आखायच्या. तर मग अभिजितची कमेंट ही कितीही घृणास्पद वाटली तरी 'अभिव्यक्ती स्वातंत्र्य' म्हणून स्वीकारायची का? नसेल तर 'इंडिया मुर्दाबाद' ही घोषणा अथवा एखाद्या अभिनेत्रीबद्दलची बातमी एखाद्या व्यक्तीस हिडिस/घृणास्पद वाटली त्याचे काय करायचे ?
एक महिला गौतम गंभीरला जीपला बांधण्याची (त्या काश्मीरच्या घटनेच्या रेफरन्सने) कमेंट करु शकतो पण तेच परेश रावल अरुंधती रॉयबद्दल म्हणाला की चूक कसे ठरते?
एखाद्या सार्वजनिक क्षेत्रात काम करणार्‍या व्यक्तीच्या(पब्लिक फिगर) बद्दल जेव्हा कमेंटस येतात तेव्हा त्यांनी त्या 'व्यक्तिगत हल्ला' म्हणत तक्रार करणे कितपत योग्य आहे जेव्हा याच व्यक्ती इतर पब्लिक फिगर्स बद्दल टिका करताना (उ.दा. मोदींचे वैवाहिक जीवन, दिग्विजय सिंह यांचा पुनर्विवाह) याचा किती विचार करतात?

या संदर्भात सोनू निगम काही विचार करण्याजोगे मुद्दे मांडेल असे कधी वाटले नव्हते पण झाले आहे खरे.

प्रतिक्रिया

मंदार कात्रे's picture

24 May 2017 - 11:27 pm | मंदार कात्रे

ट्विटर अमेरिकेपासून दिल्लीपर्यन्त (व्हाया लंडन - सीरिया -इराक ) पक्के मुस्लिमधार्जिणे आहे , हे वेळोवेळी सिद्ध झालेले आहे , त्याबद्दल फारसा आक्षेप नाही , परंतु ते आता दहशतवाद्याना देखील सपोर्ट करू लागलेले आहे. यापूर्वीदेखील आयसिस शी संबंधित अकाउण्ट्स आणि मजकूर काढायला ट्विटरने नकार दिलेला होता... याबाबतीत फेसबुक वाला झुक्याही मागे नाही ... मुस्लिम पॉप्युलेशन दुखावून आपली अकाउण्ट्स कमी होवू नये याची पुरेपूर दक्षता हे दोन्ही "लिबरल"सोशल मीडिया जायन्ट्स घेत असतात

थोडक्यात हुजरेगिरी जोरात ...त्यात ट्विटरचा इण्डिया हेड शान्तताप्रिय धर्मी आहे ... यास्तव त्यांच्याकडून फारशी अपेक्षा ठेवणेच गैर आहे ...

गामा पैलवान's picture

25 May 2017 - 12:32 am | गामा पैलवान

सच्चिदानंद,

मी सोनू निगमचं प्रकरण उडतउडत वाचलं. नंतर शांतपणे वाचेन.

तुमच्या लेखातली ही दोन विधानं रोचक वाटली.

१.

आजकाल सगळेच जास्तीत जास्त टोकदार मतांचे होऊ लागले आहेत काय?

मी सुरुवातीपासूनंच टोकदार हिंदूहितैषी भूमिका घेत आलेलो आहे. बाकीच्यांचं माहीत नाही.

२.

नेमस्तपणा, तटस्थपणा हे चर्चांमधले सद्गुण न ठरता नेभळटपणाची ओळख ठरु लागले आहेत काय?

नाही. मी टोकदार हिंदूहितैषी भूमिका घेऊनही नेमस्त व तटस्थ आहे.

आ.न.,
-गा.पै.

सच्चिदानंद's picture

25 May 2017 - 4:02 pm | सच्चिदानंद

मी टोकदार हिंदूहितैषी भूमिका घेऊनही नेमस्त व तटस्थ आहे.

अशी भुमिका घेऊनही 'नेमस्त व तटस्थ' आहे असे सांगावे लागते, यातच बरेच काही आले, नाही का ?
(अशी टोकदार भुमिका घेणारे, त्याच वेळेस तटस्थ असल्याचा दावा कसा काय करु शकतात ? नेमस्तपणाचा आणि कोण्या एका बाजूंचा संबंध आहे असे गृहित नव्हते.)

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कितीही गप्पा मारल्या तरी शेवटी त्याच्या मर्यादा या बहुमताच्या जोरावरंच ठरतात. उदा. ईंडीया मुर्दाबाद हि घोषणा भारतात देशद्रोह ठरते तर पाकिस्तानात देशप्रेम

"दुराग्रही लोकांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे त्यांचे मत स्वीकारणे असा ग्रह बळावू लागला आहे का"
होय, खूपच. अगदी इथेही असे महाभाग तुम्ही पाहीले असतील. आणि त्यामुळे ते जास्त हास्यास्पद ठरतात हेही त्यांच्या लक्षात येत नाही. :)

अद्द्या's picture

25 May 2017 - 10:50 am | अद्द्या

मग तुमच्या मते ती घोषणा देशद्रोहाची ठरू नये कारण घोषणा देणारे आणि त्याच्या मागे उभे राहणारे अल्पसंख्यांक आहेत ?

जे चूक आहे ते चूक आहे हे मान्य करायला काय जातंय ? ( हे तुम्हाला नाही. एकुणातच .. स्वतःला सेक्युलर / लिबरल / intellectual वैगेरे म्हणवून घेणाऱ्यांसाठी आहे ) बाष्कळ विधाने दोन्ही बाजूचे लोक करत हा मान्य आहेच . पण तरीही .. जे चूक आहे ते चूक आहे

मोदक's picture

25 May 2017 - 10:56 am | मोदक

जे चूक आहे ते चूक आहे हे मान्य करायला काय जातंय ?

+११११

मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की "बरोबर" आणि "चूक " याच्या व्याख्या संदर्भानुसार/काळानुसार बदलतात आणि ते संदर्भ बहुसंख्यांकांच्या मतेच ठरतात. एखादी गोष्ट मला जरी अगदी प्रामाणीकपणे बरोबर वाटत असेल तरी जर ती बहुसंख्यांकांच्या मते चूक ठरत असेल तर ती चूकच मानली जाते. अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं तर " पृथ्वी सूर्याभोवती फिरते" हे विधान एकेकाळी कदाचित देशद्रोहापेक्षाही भयंकर मानलं जात असे.

एकूणच ट्विटर हा हुच्चभ्रु लोकांचा प्रकार वाटल्याने जास्त वाट्याला जात नाही.

बरोबर-चूक काय ते माहित नाही पण ट्विटर अमेरिकन कम्पनी आहे. त्यांच्या स्वतः च्या गाइडलाईन्स आहेत

We’ve all seen something on the Internet we disagree with or have received unwanted communication. Such behavior does not necessarily constitute online abuse

If you continue receiving unwanted, targeted and continuous replies on Twitter, and feel it constitutes online abuse, consider reporting the behavior to Twitter.

https://support.twitter.com/articles/१५७९४

अभिजित, रावल लोकांचे ट्विट लोकांना abusive वाटले म्हणून त्यांनी ट्विटर वर रिपोर्ट केले. ट्विटर ने अभिजितला बॅन केले आणि रावल ला ट्विट डिलिट करायला लावली.

या सगळ्या प्रकरणात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा लावून धरणे योग्य होणार नाही कारण प्रायव्हेट कम्पनी ठरवू शकते आपल्या सायटीवर काय ठेवायचं - काय नाही.

अवांतर: ट्विटर अमेरिकन कम्पनी असल्याने त्यांना भारतीय कायदे पालन करणे अनिवार्य असते का? समजा भारतीय कोर्टाने सांगितले कि अमुक एक अकाउंट बॅन करा, तर ट्विटर ला तो निर्णय बंधनकारक असेल का?

अत्रे's picture

25 May 2017 - 8:05 am | अत्रे

वरती लिंक चुकली

https://support.twitter.com/articles/15794

सच्चिदानंद's picture

25 May 2017 - 4:19 pm | सच्चिदानंद

या सगळ्या प्रकरणात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा लावून धरणे योग्य होणार नाही कारण प्रायव्हेट कम्पनी ठरवू शकते आपल्या सायटीवर काय ठेवायचं - काय नाही.

हे तांत्रिकदृष्ट्या बरोबर असले तरी हा सोईस्कर युक्तिवाद झाला. मग त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गफ्फा हाणू नयेत. कोणी विचारले की फक्त 'मेरी मर्जी' असं सांगावं सरळ.

लोकांनी मुक्तपणे आली मतं मांडावी आणि भावना व्यक्त कराव्यात. पण धमक्या देणं, गैरवर्तन करणं, कुणाचाही आवाज दाबवण्याचा आणि छळाचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर निर्बंध घालण्यात येतील', असं ट्विटरने स्पष्ट केलं आहे.

हे ट्विटरने परेश रावल यांचे अकाउंट बंद करताना सांगितले आहे. आता मला 'अभिनेता' परेश रावल बद्दल आदर असला तरी 'खासदार' परेश रावल आणि त्यांची मते याबद्दल काहीही आपुलकी नाही (अजूनतरी). पण ज्या पद्धतीने त्यांचे अकाउंट बंद झाले आहे ते नक्कीच तेवढे सहज पटत नाही, खासकरुन सोशल मिडियावर (ट्विटरसहित) यापेक्षा नमुनेदार अशी गैरवर्तने आणि कमेंटस आढळत असताना.

रावलचे अकाऊंट (अजून तरी) बॅन झालेले नाही.

https://mobile.twitter.com/SirPareshRawal
मटा मधली बातमी खोटी आहे असे वाटते.

ट्विटरची बॅन पॉलिसी काय आहे हे त्यांनाच विचारावे लागेल. पण अकाउंटला बऱ्याच जणांनी रिपोर्ट केल्यावर बॅन करत असावेत असे वाटते.

पैसा's picture

25 May 2017 - 8:21 am | पैसा

सगळ्या ऑनलाइन social सायटींवर हेच चालू असते. परेश रावळ वर हल्ला करताना स्वरा भास्करने woman card सुद्धा वापरले, जे कोणत्याही विचार करू शकणाऱ्या व्यक्तीला अजिबात आवडणारे नाही. विशेषतः मानवाधिकार वाले आणि पुरस्कार वापसी ब्रिगेड असल्या घटनात अग्रभागी असतात. तेव्हा जे घडले त्यात खरे तर आश्चर्य वाटण्याजोगे काही नाही.

दुर्लक्ष अनुल्लेखाने अशा लोकांना मारा म्हटले तर म्हातारी मेल्याचे दु:ख नाही पण काळ सोकावतो हे ट्विटर काय मिपावर पण दिसतेच. सोसेल तेवढाच वावर सोशल मीडियावर ठेवावा हे आपल्या डोक्याच्या शांततेसाठी आवश्यक असते.

सच्चिदानंद's picture

25 May 2017 - 4:23 pm | सच्चिदानंद

एकंद प्रतिसाद पटला.

सगळ्या ऑनलाइन social सायटींवर हेच चालू असते. परेश रावळ वर हल्ला करताना स्वरा भास्करने woman card सुद्धा वापरले, जे कोणत्याही विचार करू शकणाऱ्या व्यक्तीला अजिबात आवडणारे नाही.

अर्थात.! मी याबद्दल लिहिणार होतो पण इथे वेगळे वळण लागेल म्हणून ते टाळले. पण तो ही एक ढोंगीपणाचा महत्त्वाचा मुद्दा आहेच.

दुर्लक्ष अनुल्लेखाने अशा लोकांना मारा म्हटले तर म्हातारी मेल्याचे दु:ख नाही पण काळ सोकावतो हे ट्विटर काय मिपावर पण दिसतेच. सोसेल तेवढाच वावर सोशल मीडियावर ठेवावा हे आपल्या डोक्याच्या शांततेसाठी आवश्यक असते.

हे आहेच. पण कोणत्याही प्रशासनाने एकावर कारवाई करावी आणि दुसर्‍याला क्लीन चीट हे पण जरा न पटणारे आहे. या माध्यमांना जर मुक्त अभिव्यक्तीची साधने म्हणावे तर त्यावरच प्रश्न उपस्थित होतो मग.

मंदार कात्रे's picture

25 May 2017 - 9:52 am | मंदार कात्रे

मला जर कुणी पिस्तुल दिली तर सर्वात पहिल्यांदा नरेंद्र मोदींवर वापरेन
- विजय तेंडुलकर
What a courageous man! अभिव्यक्ती स्वातंत्र्य !

त्या दंगलखोरा ऐवजी अरूंधती रोयला जीपपुढे बांधायला पाहिजे होते.
- परेश रावल
हाय तोबा हाय तोबा
Shame Shame!!!
जातीयवादी जातीयवादी.....
************************

एकूणच अभिव्यक्तीस्वातंत्र्य केवळ बुबुडाविपुमाधविंना असते असे दिसते.

व्हॉट्सअ‍ॅपवर एक पोस्ट फिरत आहे. काही क्वचित व्हॉट्सअ‍ॅप पोस्टमध्ये काही तथ्य असते त्यातील ही एक पोस्ट आहे.

"मला जर कुणी पिस्तुल दिली तर सर्वात पहिल्यांदा नरेंद्र मोदींवर वापरेन
- विजय तेंडुलकर
What a courageous man! अभिव्यक्ती स्वातंत्र्य !
त्या दंगलखोरा ऐवजी अरूंधती रोयला जीपपुढे बांधायला पाहिजे होते.
- परेश रावल
हाय तोबा हाय तोबा
Shame Shame!!!
जातीयवादी जातीयवादी....."

आणि परेश रावळने जे काही म्हटले आहे ते जे.एन.यु मध्ये एम.फील करणार्‍या शेहला रशीदच्या पोस्टला उत्तर होते हे सगळे बुबुडाविपुमाधवि अगदी सोयीस्करपणे विसरत आहेत. हा सगळा टिवटिवाट आता डिलीट झाला आहे. त्यामुळे टिवटिवाट इथे एम्बेड करता येणार नाही. कोणीतरी त्याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवला होता. तेव्हा तोच इथे चिकटवत आहे.

1

आणि परेश रावळने जे काही म्हटले आहे त्यात मला तरी काहीही चुकीचे वाटलेले नाही. अरूंधती रॉय सारख्या खाल्या ताटात **णार्‍या लोकांना नुसते असे जीपला बांधले नाही तर गितमोमध्ये पाठवून शंभर वेळा वॉटरबोर्डिंग केले तर मी माझ्या ओळखीतल्या प्रत्येकाला पेढे वाटून तो दिवस साजरा करेन. भारतात जन्माला आलेल्या
(भारतीय मुद्दामून म्हणत नाही) ज्या लोकांविषयी मला अगदी कमालीचा दुस्वास आहे त्यात अरूंधती रॉय या हडळीचा* नंबर बराच वरचा आहे.

*: उगीच पोलिटिकली करेक्ट राहण्यासाठी गुळमुळीत लिहिणे, बोलणे मला जमत नाही. माझ्यासाठी तरी जे काही आहे ते रोखठोक आणि कसलाही आडपडदा न ठेवता. तरीही मिपावर हडळ हा शब्द योग्य नाही असे संपादकांचे मत असल्यास तो शब्द जरूर संपादित करावा.

अत्रे's picture

25 May 2017 - 10:20 am | अत्रे

असहमत.

जीपला बांधले नाही तर गितमोमध्ये पाठवून शंभर वेळा वॉटरबोर्डिंग केले तर

अशे फतवे आचरणात आणण्याची जबाबदारी कोणाची? उद्या कोणी असे खरोखर केले आणि त्यांना पोलिसांनी जेल मध्ये टाकल्यास फतवे जाहीर करणाऱ्यावर त्याची जबाबदारी येते का?

पण तेच परेश रावल अरुंधती रॉयबद्दल म्हणाला की चूक कसे ठरते?

गौतमचं काय प्रकरण आहे माहिती नाही. पण परेश रावळ साफ म्हणजे साफ चूक. कारण त्यानं हे विधान केवळ अफवेचा आधार घेऊन केलं होतं. प्रत्यक्षात अरुंधती असं काही बोलल्या नव्हत्या.ती एक फेक बातमी होती की अरुंधती रॉय यांनी "७० लाख भारतीय जवान काश्मीरमधील स्वातंत्र्यसैनिकांना पराभूत करू शकत नाहीत." असं विधान पाकिस्तानी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केलं म्हणून.
परेश रावळ हे खासदार आहेत भाजपचे. त्यांनी कोणताही ट्विट करण्याआधी निदान जे झालंय ते खरंच झालंय का हे पडताळून पाहायला हवं.
पण सध्याच्या स्पर्धेच्या युगात आपण किती देशभक्त आहोत हे सिद्ध करण्याची नवीन स्पर्धा सुरु असल्याने त्यांनी गडबडीत हे ट्विट केलेलं असाव.

कारण त्यानं हे विधान केवळ अफवेचा आधार घेऊन केलं होतं

तुम्हाला असे म्हणायचे आहे का, की ती बातमी अफवा नसली असती तर असे फतवे जाहीर करणे योग्य ठरले असते? :)

सच्चिदानंद's picture

25 May 2017 - 4:32 pm | सच्चिदानंद

तुम्ही दोन वेळा फतव्यांच्याबद्दल तेही ठळक करुन बोलला आहात म्हणून आपले विचारतोय, 'कोणतेही फतवे जाहीर करणे तुम्हाला पटते का ? की काही विशिष्ट लोकांनाच त्याचे अधिकार असावेत ?
तसेच, कोणती विधाने 'फतवा' ठरावीत? म्हणजे असे की तुमच्या मते गॅरी ट्रुमन यांनी या प्रतिसादात फतवा जारी केला आहे असे तुम्हाला म्हणायचे आहे का (तुमच्या प्रतिसादावरुन तसे ध्वनित होते आहे म्हणून प्रश्न) ?

अत्रे's picture

25 May 2017 - 6:23 pm | अत्रे

माझ्या मते फतवा म्हणजे कोणालाही जाहीर केलेली (बेकायदेशीर) शिक्षा आणि (ऑप्शनल) त्यासाठी जाहीर केलेले बक्षिस/सुपारी/Bounty

जसे कि सोनू निगम चे मुंडन करण्यासाठी एक फतवा निघाला होता.

माझ्या मते असे फतवे जाहीर करायला कायदेशीर बंदी असावी.

ट्रेड मार्क's picture

26 May 2017 - 1:00 am | ट्रेड मार्क

फतवा हे फक्त मत आहे असं कोणी तरी मुस्लिम क्लेरिक सोनू निगमच्या फतव्यानंतर म्हणाला. थोडक्यात काय, हे शांतीप्रिय लोक त्यांना सोयीस्कर असेल तसे शब्दांचे/ घटनांचे अर्थ बदलतात व भूमिकाही बदलतात. मुस्लिम कायद्याप्रमाणे गुन्हेगारांना शिक्षा द्यायला लागले तर त्यांची संख्या लक्षणीयरीत्या कमी होईल. म्हणून त्यावेळी भादंवि प्रमाणे न्याय करा म्हणतात. पण लग्नाच्या बाबतीत मात्र मुस्लिम कायदा पाहिजे.

फतवे जाहीर करायला नाही पण तो पाळण्याची जबरदस्ती करायला कायद्याने बंदी आहे. म्हणून तर फतव्याविरुद्ध बोललं की ते नुसतं मत आहे म्हणायचं. म्हणजे कोणी पाळलाच तर ते त्याचं कृत्य म्हणून मौलवी सुटेल आणि मग फतवा पाळणं बंधनकारक आहे असं आमच्या पुस्तकात लिहिलंय असं म्हणून कृती करणाराही सुटेल. त्यांना साथ द्यायला उदारमतवादी आहेतच.

तुम्ही एकाच धाग्यात अनेक कंगोर्‍यांचे प्रश्न विचारले आहेत त्यामुळे प्रतिसाद मोठा झाला आहे. सहिष्णुपणे समजावून घ्याल अशी अपेक्षा आहे. ;)

इथे तुम्ही कोणत्यातरी बाजूचे असलाच पाहिजे (असा एक अट्टाहास दिसतो)'.

ही सध्याच्या सोशल मिडीयाची चिंताजनक बाजू आहे. याला अनेक कारणे आहेत. माझ्या मते मुख्य कारण म्हणजे विशिष्ट लोकांचे सोयीस्कर मतप्रदर्शन आणि सोयीस्कर विरोध लोकांच्या ध्यानात येऊ लागले आहे. सोशल मिडीया हा मतप्रदर्शनाचा सोयीचा प्लॅटफॉर्म असला तरी मोठमोठे मंत्री, नेते आणि विचारवंतही एका कमेंटच्या अंतरावर आहेत (माझ्या गल्लीतल्या एखाद्या मित्रासारखे) आणि "त्यांच्या विचारांना मी लॉजिकल उत्तर देत असेन तर मला पुन्हा उत्तर देणे ही त्यांची जबाबदारी आहे" ही सोय यापूर्वी नव्हती.
दुसरी गोष्ट म्हणजे, विचारातील / भूमीकेतील समानता. आपण सर्वजण सदासर्वकाळ बरोबर असू शकत नाही. सोशल मिडीयावर तर मुळीच नाही कारण "आपले पूर्वानुभव आणि एखाद्या गोष्टीबद्दल असलेला दृष्टीकोन" या गोष्टींचा आपल्या भूमीका ठरण्यात मोठा वाटा असतो. अशा वेळी आपले अनुभव त्यावर व्यक्त होणार्‍या प्रत्येकाला समजतीलच असे नाही. दुसर्‍या बाजूने विचार केला तर माझ्या विचारांच्या विरोधी विचारांचा कोणी अस्तित्वात असेल आणि मला "आज आत्ता ताबडतोब" निर्णय हवा असेल किंवा त्याला खोटे पाडायचेच असेल तर मोघम आरोप करून त्याला खोटे पाडणे जास्ती सोपे असते. मग लाँग रन मध्ये तो माणूस बरोबर ठरला तरी नवीन आरोप शोधले जातात आणि पूर्वीचे बरोबर असलेले मुद्दे सोयीस्कररीत्या विसरून नवीन नवीन खोटेपणा केला जातो.

आजकाल सगळेच जास्तीत जास्त टोकदार मतांचे होऊ लागले आहेत काय? नेमस्तपणा, तटस्थपणा हे चर्चांमधले सद्गुण न ठरता नेभळटपणाची ओळख ठरु लागले आहेत काय?

आयडेंटिटी क्रायसीस म्हणा किंवा आणखी एखादी गोष्ट असेल.. पण मी एखाद्याला निरूत्तर केले म्हणजे माझा विजय किंवा मला कोणी निरूत्तर केले म्हणजे माझा पराजय ही भावना टोकाच्या भूमीका घ्यायला भाग पाडते कारण मी सज्जनपणे नवीन विचार स्वीकारून त्यावर विचार करण्याची तयारी दाखवली तरी अनोळखी प्रश्नकर्ता ती भूमीका समजून घेईलच असे नाही. मग तो मार्ग संपूर्णपणे बंद करून आहे त्या परिस्थितीत टोकाच्या भूमीकांमध्ये राहणे जास्ती सोपे आहे.
एखाद्याचा तटस्थपणा किंवा नेमस्तपणा जर एकाच विचारधारेकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून विशिष्ट विचारधारेची भलामण करत असेल तर त्याला सध्याच्या घडीला उघडपणे विरोध होतो आहे. अशावेळी मुद्द्यांच्या आधारे केलेला विरोध म्हणजे "असहिष्णुता" किंवा "हमको चाहिये आजादी" अशा अजेंड्याखाली ढकलला जात असेल तर कोणताही सामान्य माणूस "असहिष्णुता तर असहिष्णुता पण आधी या सोयीस्कर विचारवंतांचे बुरखे टरकावूया" असा विचार करेल हे अत्यंत साहजिक आहे. (मी स्वत: याच विचाराने मिपावर राजकारणी चर्चांमध्ये भाग घ्यायला सुरूवात केली)

दुराग्रही लोकांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे त्यांचे मत स्वीकारणे असा ग्रह बळावू लागला आहे का की ज्यामुळे सगळेच पोट तिडिकीने भांडू लागलेत.

याला दुराग्रही / सोयीस्कर मानवाधिकारवाले / पुरस्कार वापसी गँग जबाबदार आहेत हे माझे स्पष्ट मत आहे. एखाद्या व्यक्तीचा / विचारधारेचा विरोध करताना तारतम्य पाळले नाही तर तुमचा वागळे किंवा राजदीप सरदेसाई होणारच याला सध्याच्या घडीला इलाज नाही. भूमीका हातोहात बदलणे, खोटे बोलणे, आपण एक लॉजिक देऊन त्याच लॉजिकने आलेले पण स्वत:ला सोयीचे नसलेले निष्कर्ष नाकारणे, मोघम आरोप करणे, नसलेल्या शक्यता ध्वनीत करणे वगैरे प्रकार या लोकांकडून नेहमी केले जातात. मिपावरच्या अशा किमान ३ वेगवेगळ्या लोकांच्या (डुआयडींच्या नव्हे!) मी लिंका देऊ शकतो. मग अशावेळी समोर दिसत असलेला पक्षपातीपणा उघड पाडण्यासाठी मैदानात उतरणे भाग पडते आणि एकदा मैदानात उतरलात की तुम्हाला विरोधकांकडून लेबले लावली जाणारच. तुमच्यावर आरोप करताना कितीही पातळी सोडली तरी प्रतिकार करताना तुम्ही पातळी सोडू नये अशी एक अजब अपेक्षा या लोकांची असते. अशा अनेक दांभीक भूमीकांचा परिणाम म्हणजे सध्या सुरू असलेले समर्थकांचे पोटतिडकीचे भांडण.

..मी समोरच्याला फक्त चिमटा काढला तर त्याने माझ्या कानाखाली आवाज का काढला..? अशी वागळे/सरदेसाई छाप भूमीका असेल तर मर्यादेची रेषा कोण आखणार हा रोचक मुद्दा उरतोच.

अत्रे's picture

25 May 2017 - 11:10 am | अत्रे

बराचसा प्रतिसाद आवडला.

एखाद्या व्यक्तीचा / विचारधारेचा विरोध करताना तारतम्य पाळले नाही तर तुमचा वागळे किंवा राजदीप सरदेसाई होणारच

यातले वागळे प्रकरण काय आहे? लिंक मिळेल का एखादी?

विशुमित's picture

25 May 2017 - 11:50 am | विशुमित

तुमचे पहिले २ मुद्दे १००% पटले.

फक्त ३ ऱ्या मुद्द्यांमध्ये काही शंका आहेत.

१) सोयीस्कर मानवाधिकारवाले / पुरस्कार वापसी गँग हे कोण आहेत हे समजले पण दुराग्रही मध्ये कोणाचा समावेश होतो कृपया हे जरा विस्कटून सांगता का?
२) एखाद्या व्यक्तीचा / विचारधारेचा विरोध करताना तारतम्य पाळले नाही तर तुमचा फक्त वागळे किंवा राजदीप सरदेसाईच होणार का ? साध्वी, स्वामी, रावसाहेब, परिचारक, अभिजीत होऊ शकतात का?
३) भूमीका हातोहात बदलणे, खोटे बोलणे, आपण एक लॉजिक देऊन त्याच लॉजिकने आलेले पण स्वत:ला सोयीचे नसलेले निष्कर्ष नाकारणे, मोघम आरोप करणे, नसलेल्या शक्यता ध्वनीत करणे वगैरे प्रकार या लोकांकडून नेहमी केले जातात. या लोकांमध्ये सोयीस्कर मानवाधिकारवाले / पुरस्कार वापसी गँग बरोबर टंटनी, संघाचे काही लोक येतील का?

तुमच्यावर आरोप करताना कितीही पातळी सोडली तरी प्रतिकार करताना तुम्ही पातळी सोडू नये अशी एक अजब अपेक्षा या लोकांची असते. अशा अनेक दांभीक भूमीकांचा परिणाम म्हणजे सध्या सुरू असलेले समर्थकांचे पोटतिडकीचे भांडण.===>> १००% सहमत.

दुराग्रहीं च्या कप्प्यामध्ये महाजन बसतील का ? कारण ते श्री श्री दाऊद च्या नातेवाईकाच्या लग्नात बिर्याणी हादडत होते.

http://www.loksatta.com/pune-news/minister-girish-mahajan-who-attended-w...

मी प्रतिसादामध्ये पुरेसे विस्तृत आणि स्पष्ट लिहिले आहे.

(तुम्ही आणखी १० नांवे आणलीत तरी माझे उत्तर हेच असेल. प्रतिसादामध्ये नोंदवलेले विचार वाचून (तुमच्या सोयीने) फुटपट्टी लावून तुम्हाला वाटतील ते निष्कर्ष काढू शकता.)

विशुमित's picture

26 May 2017 - 10:24 am | विशुमित

४.५५ PM ला शंका निरसन केल्याबद्दल आभार मानले आहेत. नेमका त्याच वेळेस तुमचा हा प्रतिसाद आला आहे. असो.

तुम्ही तुमच्या सोयीनुसार मानवाधिकारवाले / पुरस्कार वापसी गँग/ सरदेसाई/ यांची नावे घेतलीत म्हणून तुमचे विचार सगळ्या प्रकारच्या दुराग्रहींसाठी आहे का नाही ही शंका निरसन करण्यासाठी हा लेख प्रपंच.

मी पुढच्याचे विचार पटले तर त्या नुसार निष्कर्ष काढत असतो सोयीनुसार नाही. फुटपट्टी घेऊन तर बिलकुल नाही कारण प्रत्येकाचे विचार १९-२० इकडे तिकडे सरकलेले असतात याची मला पूर्ण जाण आहे. कृपया गैसमज नसावा.

मोदक's picture

28 May 2017 - 1:43 am | मोदक

ओके.. हा लेखनप्रपंच करण्यापूर्वी "बादरायण संबंध" या दोन शब्दांची माहिती काढावी ही एक सहज जाताजाता सुचवणूक.

कसे आहे.. इथे विषय सुरू आहे वैचारीक विरोधाचा. दुराग्रही म्हणजे दुसर्‍याच्या विचारांचा विरोध लक्षात न घेता आपलेच विचार रेमटवणे. मात्र तुम्ही जाणीवपूर्वक विषय भरकटवण्यासाठी "एका भाजप नेत्याने एका लग्नाला लावलेली हजेरी" इथे आणून त्याला तुमच्या चष्म्याने दुराग्रही नांव दिले. आपण असे समजू की महाजन दोषी आहेत तरी त्यांना दुराग्रही म्हणणे हा निष्कर्ष नक्की कोणत्या चष्म्याने काढलात ते सांगता का..?

वागळे / सरदेसाई नांवे उचलताना "एखाद्या व्यक्तीचा / विचारधारेचा विरोध करताना तारतम्य पाळले नाही तर.." हा माझ्या प्रतिसादातला अत्यावश्यक भाग सोयीस्कररीत्या वगळला. बर्र.. ही सगळी दिशाभूल करताना तुम्ही मूळ प्रश्नाकडे दुर्लक्ष केलेत आणि त्या अनुषंगाने प्रतिसाद देणे किंवा मला प्रश्न विचारणे सहज शक्य असताना इतक्या कोलांट्याउड्या का माराव्यात तर भाजपा नेत्याने लग्नाला लावलेली हजेरी हायलाईट करायला.. त्यापेक्षा वेगळा धागा काढा की. कारण असे बादरायण संबंध जोडून भुजबळ प्रकरण, तेलगी प्रकरण किंवा आणखी प्रकरणे काढून तुमच्या उदो उदो वाल्या श्रद्धास्थानांवर हल्ले झाले तर तुम्ही लगेच धोतरात हात घालायला निघाल. (बादवे-तुम्ही हे जे जाणीवपूर्वक विषयांतर केले आहे यालाच ट्रोलिंग असे म्हणतात)

आणखी एक.. तुम्ही वर लिहिले आहे ना; "सरकलेले विचार" हा ही (धोतरात हात घालण्यासारखा) चुकीचा शब्दप्रयोग आहे. तुमचे विचार सरकलेले असतील कदाचित, पण माझे नक्कीच नाहीत.

<<<हा लेखनप्रपंच करण्यापूर्वी "बादरायण संबंध" या दोन शब्दांची माहिती काढावी ही एक सहज जाताजाता सुचवणूक.>>>
==>मी दिलेल्या प्रतिसादांचे टाईमिंग बघितलं तर बादरायण संबंध कसे आहेत ते तुम्हाला समजून येईल.

<<<दुराग्रही म्हणजे दुसर्‍याच्या विचारांचा विरोध लक्षात न घेता आपलेच विचार रेमटवणे.>>>
==>> मानवाधिकारवाले/ पुरस्कार वापसी गॅंग/ वागळे/ सरदेसाई/ यांची नावे पुढे केल्यामुळे तुमच्या चष्म्याचा नंबर समजला होता. विचार रेमटवण्यात आताचे सरकार, त्याचे अंध समर्थक, त्या सरकारची मातृ संस्था हे सुद्धा अग्रेसर आहेत. याला सोयीस्कर बगल देऊन मिपावरील ३-४ आयडी वर तुम्ही बिल फाडून मोकळे झालात(३-४ आयडी मध्ये मला मी ओढून घेत नाही आहे ).

<<<कारण असे बादरायण संबंध जोडून भुजबळ प्रकरण, तेलगी प्रकरण किंवा आणखी प्रकरणे काढून तुमच्या उदो उदो वाल्या श्रद्धास्थानांवर हल्ले झाले तर>>>
==>> वर दिलेली कोणती ही प्रकरणे अजून सिद्ध झाली नाहीत. तरी तुम्ही आमच्या धोतरात हात घालायला निघालात. शॉक बसेल.

<<<बादवे-तुम्ही हे जे जाणीवपूर्वक विषयांतर केले आहे यालाच ट्रोलिंग असे म्हणतात>>>
==>>तुमचा संपूर्ण प्रतिसाद मागचे हिशोब चुकते करण्याचा प्रयत्न वाटला. तो ट्रक का काय सारखा फिरत असतो जिथे तिथे. असो चालू द्यात.

<<<तुमचे विचार सरकलेले असतील कदाचित, पण माझे नक्कीच नाहीत.>>>
==> दुराग्रही व्याख्येत बसेल का हे विधान?

दुराग्रहीपणा आणि तुम्ही दिलेली महाजनांची लिंक याचा संबंध उलगडून सांगा बघू.

तुमचा प्रतिसाद.

दुराग्रहीं च्या कप्प्यामध्ये महाजन बसतील का ? कारण ते श्री श्री दाऊद च्या नातेवाईकाच्या लग्नात बिर्याणी हादडत होते.

१) त्याच मुद्द्यातील बाकी भाग वाचावा.

२) "पब्लीककडून सार्वजनिक अपमान होणे" अशा अर्थाने मी ही दोन नांवे वापरली. या वृत्तीला (तुमच्या सोयीने) हवी ती नावे देऊ शकता. सलमान खानच्या बचावार्थ ट्वीट केल्यानंतर अभिजीतची काय अवस्था झाली होती हे आठवत असेलच.

३) ज्या कोणी व्यक्तीने अशी सोयीस्कर दांभीक भूमीका घेतली असेल तर त्या लोकांबाबतही माझे हेच मत असेल. पक्ष किंवा नेत्याच्या झेंड्याचा रंग न बघता.

विशुमित's picture

25 May 2017 - 4:55 pm | विशुमित

तिन्हीही शंका निरसन केल्याबद्दल आभारी आहे.

सच्चिदानंद's picture

25 May 2017 - 3:55 pm | सच्चिदानंद

मोदक, प्रतिसाद आवडला..

याला दुराग्रही / सोयीस्कर मानवाधिकारवाले / पुरस्कार वापसी गँग जबाबदार आहेत हे माझे स्पष्ट मत आहे. एखाद्या व्यक्तीचा / विचारधारेचा विरोध करताना तारतम्य पाळले नाही तर तुमचा वागळे किंवा राजदीप सरदेसाई होणारच याला सध्याच्या घडीला इलाज नाही. भूमीका हातोहात बदलणे, खोटे बोलणे, आपण एक लॉजिक देऊन त्याच लॉजिकने आलेले पण स्वत:ला सोयीचे नसलेले निष्कर्ष नाकारणे, मोघम आरोप करणे, नसलेल्या शक्यता ध्वनीत करणे वगैरे प्रकार या लोकांकडून नेहमी केले जातात.

या संदर्भात इतकेच म्हणेन की हे बहुतेक पक्ष अथवा विचारधारेच्या समर्थकांकडून होतेच होते. यात पुरस्कार वापसी गँग इ. आणून इतर स्वतःला 'बाईज्जत बरी' करु शकत नाहीत.

तुमच्यावर आरोप करताना कितीही पातळी सोडली तरी प्रतिकार करताना तुम्ही पातळी सोडू नये अशी एक अजब अपेक्षा या लोकांची असते.

इथे तुम्ही अभिजितच्या कमेंटची भलामण करताय का? म्हणजे मी जरी त्या मुलीच्या कुठल्याही विचारांशी सहमत नसेन तरी तिला प्रतिवाद म्हणून कोणी 'पुरेसे पैसे मिळाले नाही म्हणून तक्रार करणारी वेश्या' म्हणत असेल तर ते नक्की कुठल्या पातळीवर येते? तिने अशी कोणती पातळी सोडली होती म्हणून ही प्रतिक्रिया समर्थनीय ठरते ? जर ती भाजपासमर्थक असती (आणि तथाकथित सेक्स रॅकेट्ची बातमी काँग्रेसची असती) तर अभिजीतच्या या कमेंटवरच्या प्रतिक्रिया अशाच असत्या का ?

यात महत्त्वाचा एक बेसिक मुद्दा म्हणजे आपली पातळी आपण का सोडावी ? आपला तटस्थपणा स्वयंभू असावा, इतरांच्या ढोंगीपणामुळे, कोलांटउड्यांमुळे त्यात बदल होऊ नये. एखाद्याचे एखादे मत पटले तर ते स्वीकारायला इतर संदर्भ (तो कोणत्या पक्षाचा समर्थक/विरोधक इ.इ.) मध्ये येऊ नयेत.

..मी समोरच्याला फक्त चिमटा काढला तर त्याने माझ्या कानाखाली आवाज का काढला..? अशी वागळे/सरदेसाई छाप भूमीका असेल तर मर्यादेची रेषा कोण आखणार हा रोचक मुद्दा उरतोच.

हे मान्यच. आणि हा एक प्रश्न आहेच.

या संदर्भात इतकेच म्हणेन की हे बहुतेक पक्ष अथवा विचारधारेच्या समर्थकांकडून होतेच होते. यात पुरस्कार वापसी गँग इ. आणून इतर स्वतःला 'बाईज्जत बरी' करु शकत नाहीत.

सर्वच जण असे करत असतील असे तुमचे मत असेल तर "सुरूवात कोण करत आहे आणि प्रत्युत्तर कोण देत आहे" हे बघावे लागेल. सुरूवात = चिमटा काढणे आणि प्रत्युत्तर = कानाखाली आवाज काढणे असे असेल तर "मोठी हिंसा" म्हणून प्रत्युत्तर देणार्‍याला संपूर्ण दोष देता येणार नाही.

इथे तुम्ही अभिजितच्या कमेंटची भलामण करताय का?

अभिजीतच्या कमेंटची भलामण नाही. सर्वसाधारण विधान आहे.

यात महत्त्वाचा एक बेसिक मुद्दा म्हणजे आपली पातळी आपण का सोडावी ? आपला तटस्थपणा स्वयंभू असावा, इतरांच्या ढोंगीपणामुळे, कोलांटउड्यांमुळे त्यात बदल होऊ नये. एखाद्याचे एखादे मत पटले तर ते स्वीकारायला इतर संदर्भ (तो कोणत्या पक्षाचा समर्थक/विरोधक इ.इ.) मध्ये येऊ नयेत.

समजा एखादा बेवडा मुद्दामहून माझ्या रस्त्यात येत असेल तर मी कितीवेळा रस्ता बदलणार..? स्वयंभू तटस्थपणा आजच्या काळात आणि अंतर्जालावरच्या फॉरमॅटमध्ये कितपत लागू ठरेल हे शंकास्पद आहे. (हे फक्त पातळी सोडण्यासंदर्भात आहे, मत स्वीकारण्यासंदर्भात नाही.)

सच्चिदानंद's picture

25 May 2017 - 7:55 pm | सच्चिदानंद

काही मुद्दे पटले नाहीत. उ.दा.

. सुरूवात = चिमटा काढणे आणि प्रत्युत्तर = कानाखाली आवाज काढणे असे असेल तर "मोठी हिंसा" म्हणून प्रत्युत्तर देणार्‍याला संपूर्ण दोष देता येणार नाही.

मग याच न्यायाने नक्षलवादाचे समर्थन करणारे करतात आणि ते अक्षरशः करतात. प्रॉब्लेम असा आहे की प्रत्येक जण त्याने आधी चिमटा काढला हेच म्हणत बसतो आणि मग कानठळ्या, बुक्क्या, लाथाळ्या सुरु होतात. तुमच्या बेवड्याच्या प्रतिक्रियेस प्रमाण मानून अशा वेळेस दोन्ही बाजू लाथाळ्यांचे समर्थन करु लागेल तर ते कसे बरोबर ठरेल ?

समजा एखादा बेवडा मुद्दामहून माझ्या रस्त्यात येत असेल तर मी कितीवेळा रस्ता बदलणार..? स्वयंभू तटस्थपणा आजच्या काळात आणि अंतर्जालावरच्या फॉरमॅटमध्ये कितपत लागू ठरेल हे शंकास्पद आहे. (हे फक्त पातळी सोडण्यासंदर्भात आहे, मत स्वीकारण्यासंदर्भात नाही.)

ही बेवड्याची तुलना तेवढी पटली नाही (थोड अ‍ॅपल/ऑरेन्ज झाले). तरीही बेवडा समोर आला तर त्याच्या पातळीवर उतरणे काही मान्य नाही.

तटस्थता स्वयंभू असावी हे या फॉरमॅटमध्येही शक्य आहे नक्कीच आणि इथे सुहास म्हात्रेंसारखे नक्कीच चांगले उदाहरण आहेत त्याचे (माझ्यामते).

मी डॉक्टरसाहेबांइतका अनुभव, विस्तृत विचार करण्याची पातळी गाठली तर माझे वरील विचार कदाचित मला स्वत:लाच गैरलागू वाटू शकतील. :)

सच्चिदानंद's picture

27 May 2017 - 4:51 pm | सच्चिदानंद

अर्थात, मग कोणाचा आदर्श घ्यायचा ते आपल्यावर आहे ना ..!,आपली पातळी कुठे असावी हे आपण ठरवणार. माझ्यामते तरी डॉ. म्हात्रे यांची पातळी गाठण्यात रस असेल. :)

अरे व्वा.. या निमित्ताने तुम्हाला शुभेच्छा देतो.

आजकाल सगळेच जास्तीत जास्त टोकदार मतांचे होऊ लागले आहेत काय?
नेमस्तपणा, तटस्थपणा हे चर्चांमधले सद्गुण न ठरता नेभळटपणाची ओळख ठरु लागले आहेत काय?

होय. शांतपणे चर्चा, वाद, संवाद यांच्या माध्यमातून मुद्दे समजावून देण्याला प्रतिष्ठा उरलेली नाही. सुमार बुद्धीमतेच्या, सवंग(trite) मते असणार्‍या पण कुठल्याही विचारसरणीचा अतिरेकी पाईक असणार्‍यांना लाईमलाईट मिळू लागलेला आहे.
बाकी 'अभिजीत' जे जे करत आलेला आहे त्याला ट्विटर अकाऊंट बंद करणे ही शिक्षा म्हणजे करूणा झाली.

arunjoshi123's picture

25 May 2017 - 2:00 pm | arunjoshi123

एकदम सहमत.

करण्याची कुवत असती तर परेश रावल यांनी खालच्या पातळीवर जाउन हे विधान करण्याची गरजच भासली नसती.
परेश यांच्याकडुन याहुन जास्त अपेकशा बाळगणेच आता चुक आहे.
अरुंधतींनी मैौन बाळगुन बरे केले.
इराणी यांनी परेश यांचा दीर्घ टीकात्मक १४० पानांचा
निबंध वाचलेला नाही.

गॅरी ट्रुमन's picture

25 May 2017 - 3:03 pm | गॅरी ट्रुमन

सुशिक्षित, बुद्धीवादी, पुरोगामी इत्यादी लोकांविषयी कल्पना नाही पण ही मंडळी सोडून आपल्या देशावर प्रेम असलेल्या सामान्य भारतीयाला या अरूंधती रॉय या बयेचे तथाकथित 'विचार' हे 'विचारांचा मुकाबला विचारांनी करावा' अशाप्रकारचे कोणतेही सौजन्य दाखवायच्या लायकीचे नाहीत असेच वाटते अशी बर्‍यापैकी खात्री आहे.

तरीही अरूंधती रॉय ही स्वतः आणि तिच्या 'विचारांचा' मुकाबला विचारांनीच केला पाहिजे असा विचार करणारे लोक अशांवर इतके संतापणे बंद करायला हवे असे वाटते. कारण मोदींच्या मिशन-२०१९ चे हे ब्रॅन्ड अ‍ॅम्बॅसॅडर्स आहेत. मोदींना विरोध करायच्या निमित्ताने जो कोणी मोदींच्या विरोधात असतील त्या सगळ्यांना, अगदी देशद्रोह्यांना पाठिंबा द्यायला मागेपुढे बघत नाहियेत. यातूनच ही हलकटातील हलकट जमात स्वतः होऊनच आपला खरा चेहरा जगापुढे आणत आहे आणि अन्यथा मोदींना मते दिली नसती अशा अधिकाधिक लोकांना मोदींच्याच कॅम्पमध्ये ढकलत आहेत. अरूंधती रॉय, निखिल वागळे पासून मुग्धा कर्णिकपर्यंत शेकडो ब्रॅन्ड अ‍ॅम्बॅसॅडर्स आहेत मोदींचे!!

विक्रम गोखले, तेंडूलकर आणि परेश रावल यांच्यात कुणाला खालील फरक वाटला का?
~ परेश रावल हे खासदार आहेत तेदेखिल सत्तापक्षाचे, म्हणजे अरूंधती रॉय यांना जीपला बांधावे हे त्यांचे मत कृतीत बदलण्याची पात्रता त्यांच्यात येणे संभवनीय आहे.(त्यांना संरक्षण मंत्री वगैरे बनवले गेले तर). विक्रम गोखले आणि तेंडूलकर मात्र कुणीही नाहीत किंवा नव्हते, त्यांचे मत कृतीत आणणे त्यांना शक्य नव्हते/नाही. त्यांच्या बोलण्याला घरातल्या पेन्शनराची बडबडीएवढेच मुल्य आहे. परेश रावल यांचे वक्तव्य मात्र भयावह ठरते.

रावल यांनी याही पेक्षा भयावह मत तिच्याबद्दल द्यावे या लायकिची ती आहे.

मारवा's picture

25 May 2017 - 3:04 pm | मारवा

कुठल्या विचारावर आक्शेप व त्याना यासाठी शिक्शा व्हावी अस म्हणण कुठल्या कायद्याच्या आधारे .
की नुसताच .....?

पुंबा's picture

25 May 2017 - 2:38 pm | पुंबा
एकच इलाज . दांभिक लोक एकही विचार न मांडता नुसताच चिखल उडवण्यात धन्यता मानतात. १- Sometimes I think the world is divided into those who have a comfortable relationship with power and those who have a naturally adversarial relationship with power. २- The mullahs of the Islamic world and the mullahs of the Hindu world and the mullahs of the Christian world are all on the same side. And we are against them all. ३-
एकच इलाज . दांभिक लोक एकही विचार न मांडता नुसताच चिखल उडवण्यात धन्यता मानतात. १- Sometimes I think the world is divided into those who have a comfortable relationship with power and those who have a naturally adversarial relationship with power. २- The mullahs of the Islamic world and the mullahs of the Hindu world and the mullahs of the Christian world are all on the same side. And we are against them all. ३-
धर्मराजमुटके's picture

25 May 2017 - 5:37 pm | धर्मराजमुटके

ट्वीटरवर अकाऊंट डिलीट झाले / बॅन झाले तर काय झाले ? अनेक जन्म घेणारे डु आयडी घेऊन अजेंडा पुढे लोटत रहावा की. अ‍ॅडमीनला देखील काही मर्यादा असतात त्याचा काही लाभ घ्यावा ना !
नसेल जमत तर एकदा मिपावर येऊन अभ्यास करा म्हणावं !

गॅरी ट्रुमन's picture

25 May 2017 - 6:06 pm | गॅरी ट्रुमन

गेल्या काही वर्षात अरूंधती रॉय काय काय बरळली आहे हे बघा--

१. Kashmir needs freedom from India

२. Kashmir should get Azadi from bhookhe-nange Hindustan हे "आझादी द ओन्ली वे" या सेमीनारमध्ये बोलली होती.

३. संसदेवर हल्ला करायच्या भयंकर प्रकाराबद्दल तीन स्तरीय न्यायालयीन प्रक्रीया आणि राष्ट्रपतींकडे केलेला दयेचा अर्ज यानंतर भविष्यात फासावर गेलेल्या अफजल गुरूविषयी ती हे म्हणत आहे. या लेखातील काहीकाही वक्तव्ये बघून तळपायाची आग मस्तकातच जाते. "Not surprisingly, PM A.B. Vajpayee seized the opportunity to compare the assault to the September 11 attacks in the US that had happened only three months previously." यात 'Not surprisingly' लिहायचे कारण काय? म्हणजे वाजपेयी असे काहीतरी होऊ दे आणि मग आपल्याला शेजारच्या देशातील शांतीप्रिय धर्माच्या कनवाळू अनुयायांवर त्याचे खापर फोडता येईल याची वाटच बघत होते तर.

४. इथे म्हटले आहे की सलमान रश्दी आणि इतरांनी २६/११ च्या हल्ल्यांचा काश्मीर प्रश्न, गुजरात दंगली आणि बाबरीप्रकरणाशी संबंध जोडायच्या अरूंधती रॉयच्या प्रयत्नांवर टिका केली. अरूंधतीने असे काही म्हटले होते याची डायरेक्ट लिंक अजून मिळालेली नाही पण तिचा पूर्वेतिहास लक्षात घेता ती असे काहीतरी बरळली असेल याविषयी तीळमात्र शंका नाही.

हे असले काहीतरी वाचले की वाटते की सर्जिकल स्ट्राईक्स पाकिस्तानात नाही तर अरूंधती रॉयच्या आणि इतर दिडशहाण्या बुबुडाविपुमाधविंच्या घरी आणि जे.एन.यु मध्ये करायला हवेत. ही असली अंतर्गत किड नष्ट व्हायला हवी.

गामा पैलवान's picture

25 May 2017 - 7:00 pm | गामा पैलवान

सच्चिदानंद,

अशी भुमिका घेऊनही 'नेमस्त व तटस्थ' आहे असे सांगावे लागते, यातच बरेच काही आले, नाही का ?
(अशी टोकदार भुमिका घेणारे, त्याच वेळेस तटस्थ असल्याचा दावा कसा काय करु शकतात ?

तुमचा प्रश्न समर्पक आहे. उदाहरण देऊन सांगतो.

आज सौदी अरेबियाकडून येमेनमधल्या निरपराध मुस्लिमांची कत्तल चालू आहे. भारतातल्या मुस्लिम नेत्यांनी याविरुद्ध तोंडातून ब्र तरी काढलेला ऐकलाय का कोणी? मी हिंदुत्ववादी असूनदेखील या निरपराध्यांच्या संहाराचा निषेध करतो. यावरून हिंदूहितैषी भूमिका सर्वसमावेशक आहे हेच सिद्ध होत नाही काय?

उत्तर प्रदेशांतल्या निवडणुकींत मुस्लिमांनी याच कारणासाठी भरभरून मोदींना मतं दिली. मुस्लिम नेत्यांच्या मागे गेलं तर इथल्या मुस्लिमांची गत येमेनप्रमाणेच होणार हे सगळ्यांना कळतं.

भारतातल्या मुस्लिमांचे नेते म्हणवणारे लोकं सौदीचा पैसा खायला चटावलेत. म्हणूनंच टोकदार हिंदूहितैषी भूमिकेतंच बिगर हिंदूंचंही सौख्य सामावलेलं आहे.

आ.न.,
-गा.पै.

आ.न.,
-गा.पै.

1

हे शेला रशिदचे ट्विट किंवा योगी आदित्यनाथ यांच्याबद्दलचे ट्विट किंवा भाजपाचे लोक सरसकट सेक्स रॅकेट चालवतात वगैरे ट्विट ही नक्कीच आक्षेपार्ह आहेत. त्यासाठी तिचा अकाउंट रद्द केला गेला नाही. मात्र परेश रावळ याचा अकाउंट तशाच ट्विटसाठी रद्द केला गेला अशी महाराष्ट्र टाईम्सची बातमी आहे.

अभिजीत भट्टाचार्यची ट्विट्स नक्कीच आक्षेपार्ह आहेत. तशा ट्विट्ससाठी अकाउंट रद्द केला जाऊ शकतो. मला प्रश्न एवढाच आहे की शेला रशीदची ट्विट्स आक्षेपार्ह आहेत तिचे खाते रद्द करा अशी मागणी कोणी ट्विटर कडे केली होती का नाही? त्यावर जर ट्विटरने कारवाई केली नसेल तर भाजपामधील कोणी तिच्यावर चारित्र्यहनन केले म्हणून कोर्टात केस दाखल करू शकतो का नाही? असल्या तोंडाळ लोकांच्या नादी लागून आपली लेव्हल सोडण्यापेक्षा आपल्या हातात असलेल्या कायदेशीर मार्गांनी त्यांना जेरीस आणता येते. ज्यांना खरेच काही करायचे असेल त्यांनी पुढे जाऊन ट्विटर पक्षपाती आहे म्हणून त्यावर सामुदायिक बहिष्कार घालून ट्विटरलाच धडा शिकवता येईल. काही दिवसांपूर्वी आमीरखानच्या बायकोच्या वक्तव्यांमुळे वैतागून तो ब्रँड अँबेसेडर असलेल्या स्नॅपडीलकडे लोकांनी पाठ फिरवली होती आणि स्नॅपडीलला नुकसान सोसावे लागले होते याची आठवण आल्याशिवाय रहात नाही.

पिशी अबोली's picture

26 May 2017 - 11:20 am | पिशी अबोली

जेएनयूला अजून किती प्रसिद्धी देत राहणार? जेएनयूमधील शिक्षणाच्या दर्जाबद्दल जी काही कौतुकसुमने उधळली जातात, त्यांच्यात फार काही तथ्य असल्याचे तिथले विद्यार्थ्यांचे निबंध-प्रबंध(किमान माझ्या विषयातले) बघता वाटत नाही. अफाट प्रमाणात मिळणारे फंड्स, हे तिथल्या रिसर्च प्रोजेक्ट्सचे रहस्य आहे. हल्लीच पीएचडीच्या विद्यार्थ्यांच्या संख्येवर योग्य ती मर्यादा घालून तिथल्या मनमानीला थोडासा आळा घालायला सुरुवात झालेली आहे. विरोधी मत प्रवाहात असणं योग्य, पण त्याला अनुसरून बौद्धिक मक्तेदारीबद्दल तिथे जो काही उद्धटपणा चालतो, त्याला अजिबात भाव न देणं, हाच उपाय योग्य आहे, असं वाटतं.

आणि अगदी हेच जेएनयूच्या विचारधारेच्या थेट विरुद्ध विचार असणाऱ्या, पण तेवढ्याच उद्धटपणे त्याचं टोकाचं समर्थन करणाऱ्या लोकांबद्दलही वाटतं.

बाकी विचारांनी प्रतिवाद करणं वगैरेला तर मिपावरही अर्थ राहिलेला नाही. जमाना चिखलफेकीचा आहे. पांढरे कपडे घातलेत, तर खराब होणारच. एक तर ते सहन करा, नाहीतर चिखल दिसणार नाही अशा रंगांचे कपडे घाला..

गॅरी ट्रुमन's picture

26 May 2017 - 11:43 am | गॅरी ट्रुमन

विचारांचा मुकाबला विचारांनीच करावा हे मान्य. पण जर ते तथाकथित विचार 'भारत तेरे तुकडेतुकडे होंगे, तबतक हम चैन से नही बैठेंगे, इन्शाल्ला' वगैरे असतील तर असल्या विचारांना ते सौजन्य अजिबात नाही. बाकी मुद्द्यांवर चर्चा करायला काहीही हरकत नाही. काहीही झाले तरी भारत देशाच्या सार्वभौमत्व, अखंडता इत्यादी गोष्टींविषयी कोणतीही तडजोड नाही. त्या फ्रेमवर्कमध्ये राहूनच कोणतेही मुद्दे मांडावेत. काहीही हरकत नाही. पण गेल्या तीनेक वर्षात अनेक लोक ही गोष्ट सोयीस्करपणे विसरले आहेत आणि असेच लोक असहिष्णुता वाढली अशी उलटी कोल्हेकुईही करत आहेत. तेव्हा विचारांचा मुकाबला विचारांनीच करायला हवा यातील हा एक फरक नक्कीच लक्षात घ्यायला हवा. असो.

It is better to be alive and hated than be dead and loved.

गामा पैलवान's picture

26 May 2017 - 12:17 pm | गामा पैलवान

गॅरी ट्रुमन,

तुमच्या या कथनाशी शंभर टक्के सहमत आहे. सुझान अरुंधती रॉय या बाईकडे वैचारिक भूमिका आहे असा काहीसा आभास उत्पन्न केला जात आहे. प्रत्यक्षात ही बाई भारताच्या वाईटावर तपोन बसलेली आहे. हिच्यासमवेत चर्चा होऊच शकंत नाही. सभ्य माणसांचे नियम हिला लावता येत नाहीत.

आ.न.,
-गा.पै.

गॅरी ट्रुमन's picture

26 May 2017 - 1:03 pm | गॅरी ट्रुमन

सुझान अरुंधती रॉय या बाईकडे वैचारिक भूमिका आहे असा काहीसा आभास उत्पन्न केला जात आहे.

अरूंधती रॉयच्या विचारांचा मुकाबला विचारांनी करणे असे म्हणणे आणि हातात चाकू ठेऊन आपल्या गळ्यावरून तो चाकू कधीनाकधी फिरवायची इच्छा बाळगून असलेल्या कोणाबरोबर सौजन्याने वागावे आणि त्याच्या विचारांचा मुकाबला विचारांनी करावा असे म्हणण्यासारखे झाले. १३ डिसेंबर २००१ च्या त्या महाभयानक प्रकारातून आपला देश कसा काय वाचला याचेच आश्चर्य वाटते. खरे तर खासदार , मंत्री, कदाचित पंतप्रधानांनाही ओलीस ठेवणे असले काहीतरी घडायचे त्या दिवशी. आणि त्या प्रकारात सहभागी असल्याबद्दल कायद्याच्या प्रक्रीयेतून फासावर गेलेल्या कोणाविषयीही सहानुभूती ठेवणे म्हणजे आपल्या गळ्यावरून चाकू फिरवायची इच्छा असल्यासारखेच झाले.

अरूंधती रॉय सारख्यांविषयी कोणतीही सहानुभूती मला तरी नाही. इतरांचे माहित नाही.

अत्रे's picture

26 May 2017 - 1:56 pm | अत्रे

ट्रुमनसाहेब,

तुम्ही म्हटलंय कि एका ठराविक लिमिटमध्येच विचारांचा विचाराने मुकाबला करता येतो. या लिमिट्स कोणत्या असल्या पाहिजेत?

माझ्या दृष्टीने जोपर्यंत शांततेच्या मार्गाने एखादी व्यक्ती विचार व्यक्त करत आहे, कोणत्याही हिंसेला प्रोत्साहन देत नाही आहे - तो पर्यंत विचारांचा मुकाबला विचाराने करता येतो.

समजा सगळे काश्मीरी लोक म्हणाले कि आम्ही अहिंसक असहकार आंदोलन करतो - आमची मागणी आहे कि भारतातून आम्हाला वेगळे व्हायचे आहे, स्वतः चे सरकार स्थापन करायचे आहे. तर भारत सरकारने काय करायला हवे असे तुम्हाला वाटते? (अश्याच मागण्या करून आपल्याला ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळाले नाही का?)

एक कल्पना सुचली. असा एखादा काल्पनिक संवाद लिहिता येईल का - काश्मीर आझादी वाला एखादा तरुण/तरुणी आपले आझादीचे मुद्दे मांडत आहे आणि अखंड भारतवाला त्याला समजावून सांगत आहे?

गॅरी ट्रुमन's picture

26 May 2017 - 2:02 pm | गॅरी ट्रुमन

कोणत्याही हिंसेला प्रोत्साहन देत नाही आहे - तो पर्यंत विचारांचा मुकाबला विचाराने करता येतो.

काश्मीरात गांधीजी आणि गौतम बुद्ध यांना लाजवेल अशा पध्दतीने अगदी अहिंसात्मक आंदोलनच चालू आहे ना? अफजल गुरू दिल्लीत संसदभवनावर पदयात्रा करत गेला होता की नाही? काय बोलता राव?

तुम्हाला मी हायपोथेटिकल प्रश्न विचारला आहे. "समजा" हा शब्द कृपया लक्षात घ्या.

संसदेवर बॉम्ब टाकणे वगैरे गोष्टी अहिंसेत बसत नाहीत, म्हणून त्याचा सम्बन्ध माझ्या प्रतिसादाशी कृपया लावू नये.

गॅरी ट्रुमन's picture

27 May 2017 - 8:43 am | गॅरी ट्रुमन

तुम्हाला मी हायपोथेटिकल प्रश्न विचारला आहे. "समजा" हा शब्द कृपया लक्षात घ्या.

हायपोथेटिकल प्रश्न जरूर विचारावेत पण त्या हायपोथेटिकल परिस्थितीचा वास्तविकतेशी दुरूनदुरूनपर्यंत संबंध लागत नाही अशी परिस्थिती नको.उद्या कोणी हायपोथेटिकल प्रश्न विचारला---"समजा माणूस गुहेतून बाहेर पडलाच नसता तर" आणि यातील "समजा" हा शब्द कृपया लक्षात घ्या तर त्याला काय कप्पाळ उत्तर देणार? तद्वतच काश्मीरात जे काही चालू आहे त्याच्याशी "समजा" अहिंसक पध्दतीने असते तर काय अशाप्रकारचे प्रश्न विचारले तर त्याला काय डोंबल उत्तर देणार?

तुम्ही वरती म्हटले होते कि भारताच्या अखण्डतेच्या विरोधात जे बोलतील त्यांच्या विचारांचा विचाराने मुकाबला करता येणार नाही.

मी त्याला एक्सेप्शन दाखवून देण्याचा प्रयत्न करत आहे. समजा काश्मिरी सेपरेटिस्ट लोकांनी गांधीजीचा मार्ग अवलंबला तर ..

आनन्दा's picture

26 May 2017 - 3:42 pm | आनन्दा

बाकी चालू द्या. फक्त

(अश्याच मागण्या करून आपल्याला ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळाले नाही का?)

याबद्दल माझ्या मनात संभ्रम आहे. हे एव्हढेच कारण पुरेसे नव्हते याबद्दल माझ्या मनात मुळीच शंका नाही. किंबहुना या गोष्टीची स्वातंत्र्य मिळवून द्यायची क्षमता २०% पण नव्हती असे वाटते. अर्थात त्याचे इतरत्र काही अत्यंत महत्वाचे चांगले परिणाम झालेत, त्यामुळे ही गोष्ट कुचकामी नव्हती याबद्दलही माझ्या मनात मुळीच शंका नाही. तरी पण.

असो. अवांतर नको. चालू द्या.

पिशी अबोली's picture

27 May 2017 - 12:48 pm | पिशी अबोली

जेएनयूला एकूणच अवास्तव महत्व दिलं जातं एवढंच माझं म्हणणं आहे. जेएनयू महत्वाची संस्था आहे, पण म्हणून तिथे कुणीही उठून काहीही बोलला की त्याला प्रसिद्धी मिळावी, त्यावर खासदारांसकट लोकांनी प्रतिक्रिया द्यावी, एवढी महत्वाची आहे का? तिकडे नक्की काय चालतं, हे सरकारला खरंच माहीत नसेल? आणि सरकार त्यावर काहीच कारवाई करत नसेल? तिथली काही आचरट टाळकी येऊन सोशल मीडियावर हैदोस घालतात, तशीच आरडाओरडा करून सरकारने कारवाई करावी का?
माझा आक्षेप दुसर्‍या बाजूच्या आक्रस्ताळ्या प्रतिक्रियेला आहे.
इतकी दशके ज्यांनी सरकारसकट अनेक गोष्टींची ढाल करून बौद्धिक मक्तेदारी मिरवली, त्यांना जमिनीवर आणणं इतक्या कमी काळात व्हावं अशी अपेक्षा का? 'भारत तेरे टुकडे होगे' सारख्या घोषणा काय फक्त या तीन वर्षात जन्माला आल्या? संशोधनासाठी घेतल्या जाणार्‍या विद्यार्थीसंख्येवर नियम कडक करून मर्यादा आणणे, इतक्या सटल पातळीवरून तिथे काही ना काही होत आहे. होतील गोष्टी..हळूहळू.
तुम्ही ज्या पद्धतीने रॉय वगैरे लोकांना मोदींचे ब्रँड अँबासिडर म्हणता, त्याप्रमाणे या जेएनयू विरोधात सोशल मीडियावर पेटलेल्या लोकांनीच जेएन्यू मधील या टाळक्यांचा भाव वधारून ठेवला आहे.

आणि हो, विचारांचा विचारांनी विरोध हा याच काय, कुठल्याही संदर्भात होणं बंद झालेलं आहे, हे मिपावरसुद्धा दिसतं हे मी माझ्या प्रतिसादात लिहिलेलं होतं. त्याला डावे-उजवेपणाच्या किंवा कुठच्याही विचारसरणीच्या मर्यादा राहिलेल्या नाहीत. त्यामुळे जमाना चिखलफेकीचा आहे एवढंच खरं.. प्रतिवाद महत्वाचा, प्रतिसाद नाही, ही प्रवृत्ती आजच्या काळाचीच आहे, हे दुर्दैवी सत्य आहे.

सुबोध खरे's picture

27 May 2017 - 6:06 pm | सुबोध खरे

अबोली ताई
एकदा वेगळ्या तर्हेने विचार करून पहा.
पूर्वी सामाजिक माध्यमे म्हणजे काय होतं तर पत्रकार जे तुम्हाला सांगतील तेच सत्य होतं आणि त्याचा प्रतिवाद करणे म्हणजे वाचकांनी लिहिलेलीपात्रके यापैकी स्वतःला सोयीस्कर असणारी पत्रकेच फक्त प्रसिद्ध होती. म्हणजेच काय तर सर्व सामान्य माणसाला आवाजच नव्हता. पत्रकार लिहितील तोच सामान्य माणसाचा आवाज होता पेक्षा समजला जात होता.
आता फेसबुक, ट्विटर, व्हॉट्स अँप सरकय्या माध्यमांमुळे सामान्य माणसालाही बोलता येऊ लागले आहे. आणि त्याचा आवाज हा पत्रकाराच्या गाळणीतून गळेल तसा आणि तेवढाच न राहता यथातथ्य रूपाने इतरांपर्यंत पोहोचू लागला आहे. यामुळेच पत्रकारितेची विश्वासार्हता आता पणाला लागली आहे. आणि यामुळेच हे सर्व डावे लोक ( ज्यांच्याकडे प्रचार माध्यमांचा मक्ता होता) ते उघडे पडले आहेत. त्यातून त्यांचा पाश्चात्य देशातून होणार पैशाचा ओघ आटला आहे शिवाय मोदी सरकारने त्यांचा रमणा बंद केला आहे.
अर्थात सामाजिक माध्यमे यात बऱ्याच लोकांनी आवाज उठवला आहे म्हणून आवाज (आणि त्याबरोबर गोंगाटही) जास्त झाला आहे. आणि याचा चिखलफेक करणारे लोकहि फायदा उठवतात हे गृहीत धरले तरीही एकांगी पत्रकारिता बंद झाली आणि सत्य जास्त प्रमाणावर उघड होऊ लागले आहे हि वस्तुस्थिती लक्षात घ्यावीच लागेल.
यामुळेच राजदीप सरदेसाई, बरखा दत्त, सुमार केतकर सारखे एकांगी विचारसरणीचे पत्रकार यांची चलती बंद झाली हि हि वस्तुस्थिती आहे.

पिशी अबोली's picture

29 May 2017 - 3:25 pm | पिशी अबोली

हे पटलं.

उपेक्षित's picture

26 May 2017 - 12:42 pm | उपेक्षित

लाख वेळा सहमत पिशी ताई, अरुंधती रॉय काहीही बडबड करो पण सत्ताधारी पक्षाचा एक जबाबदार (?) खासदार या नात्याने परेश रावळने असली विधाने टाळली पाहिजे.
बाकी विजय तेंडूलकर यांच्या विधानाची तुलना परेश भौंशी केलेली पाहून लयीच करमणूक वगेरे झालेली आहे. साला लोक कुठला विदा कधी कुठ वापरून समर्थन करत बसतील काय भरोसा नाय राहिला.

आनन्दा's picture

26 May 2017 - 3:48 pm | आनन्दा

वा वा. तुम्हाला हळूहळू लोकसत्तामध्ये नोकरी बघायला हरकत नाही.
परवाच जेम्स बाँडला मोठे ठरवताना त्याने रजनीकांतबद्दल तारे तोडलेत. कदाचित रजनीकांत भाजपाच्या जवळ जात आहे म्हणून देखील त्याला त्रस होत असेल. तशीच तुलना तुम्ही देखील करत आहात म्हणून म्हटले.

व्यक्तिशः मला विजय तेंडुलकरांची जबाबदारी जास्त वाटते, कारण त्यांना समाज (पुरोगामी) किमान गांभीर्याने घ्यायचे, पण तेव्हा त्यांना हेच ज्ञान शिकवायला कोणीही आले नव्हते. कारण हे त्यांच्या मनातले बोलत होते. आणि आता त्याअंच्यावर बाजू उलटत चाललीय म्हणून असे चालू आहे. असो.

तुम्ही कोणत्या पदावर आअहात त्यापेक्षा तुम्हाला समाजात किती मान आहे यावर तुमची जबाबदारी ठरते असे मला वाटते.

उपेक्षित's picture

26 May 2017 - 9:16 pm | उपेक्षित

आनंदा माझ्या नोकरीची उठाठेव तू नको करूस, आणि मुद्दा पटला नसेल तर शांतपणे प्रतिवाद कर उगाच फालतू सल्ले देऊ नकोस परत दिलेस तर तुला आणि तुझ्या सल्ल्याला फाट्यावर मारण्यात येईल.

मला जे वाटते ते मी स्पष्टपणे कुणालाही टार्गेट न करता बोललो आहे बाकी चालू दे तुझे.

मराठी_माणूस's picture

26 May 2017 - 12:20 pm | मराठी_माणूस

ही बाई भारताच्या वाईटावर तपोन बसलेली आहे

का बरे ?

गामा पैलवान's picture

26 May 2017 - 2:52 pm | गामा पैलवान

याला भारताच्या वाईटावर टपून बसणे म्हणतात :

https://c.tribune.com.pk/2010/10/arundhati-roy-afp-640x480.jpg

-गा.पै.

मराठी_माणूस's picture

26 May 2017 - 3:49 pm | मराठी_माणूस

फोटो वरुन काही समजले नाही.

गामा पैलवान's picture

26 May 2017 - 5:16 pm | गामा पैलवान

मराठी_माणूस,

मी खुलासा करायला हवा होता. राहून गेल्याबद्दल क्षमस्व. वरील चित्रात सुझन अरुंधती रॉय ही महिला यासीन मलिक नामे फुटीरतावाद्यास हात धरून पुढे नेत आहे.

अधिक माहितीसाठी कृपया हा लेख वाचा म्हणून सुचवेन : https://tribune.com.pk/story/68010/author-arundhati-roy-defends-kashmir-...

आ.न.,
-गा.पै.

सतिश गावडे's picture

26 May 2017 - 9:33 pm | सतिश गावडे

बरेचसे मिपाकर रॉयविरुद्ध आगपाखड करत आहेत म्हणजे त्या काहीतरी चुकीचं करत आहेत यात शंका नाही. पण मग त्यांच्याविरोधात सरकारकडून कायदेशीर कारवाई का होत नाही?

आनंदयात्री's picture

26 May 2017 - 10:30 pm | आनंदयात्री

हा प्रश्न नेमका आहे. याचे उत्तर जाणून घ्यायला आवडेल.

मारवा's picture

27 May 2017 - 7:02 am | मारवा
मिपाकर आगपाखड ............ म्हणजे अभुक अमुक असेलच .......यात शंकाच नाही..... ??? इतकी निरागसता इतका प्रांजलपणा हा सुर्य. प्रुथ्वी भोवतीच फिरतो वाले, नंतर इतक्या शुध्द स्वरुपात आसारामारहीमांदी च्या च्या. शिष्यामध्ये आढळतो. पण एखाद्या संस्थळाप्रती इतकी निष्ठा वॅाव वाॅव मजा आ गया
सतिश गावडे's picture

27 May 2017 - 8:28 am | सतिश गावडे

ते लहान मुलांसाठी नव्हतं लिहीलं =))

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 May 2017 - 12:09 pm | डॉ सुहास म्हात्रे

कसं सुचतं हे असं ?! =))

गॅरी ट्रुमन's picture

27 May 2017 - 8:49 am | गॅरी ट्रुमन

पण मग त्यांच्याविरोधात सरकारकडून कायदेशीर कारवाई का होत नाही?

या असल्या लोकांच्या बाबतीत मोदी पाहिजे तितका कणखरपणा दाखवू शकलेले नाहीत हे नक्कीच.

कदाचित अजूनही विचारवंतांची मिडिया, शिक्षणसंस्था इत्यादी ठिकाणची पकड मोडून काढायच्या स्थितीत ते नाहीत. आणि असल्या विचारवंतांना कायमचे देशोधडीस लावायची ताकद मोदींना मिळावी यासाठी मी माझा खारीचा वाटा २०१९ मध्ये उचलणार आहेच.

सुबोध खरे's picture

27 May 2017 - 9:33 am | सुबोध खरे

श्री मोदींना माहित आहे कि अरुंधती रॉय सारख्या देशद्रोहींना सामान्य माणूस ओळखत सुद्धा नाही( जो मोदींचा मतदार आहे). हे पुरस्कार वापसी मेणबत्ती मोर्चा सारख्या स्टण्ट मध्ये सामान्य माणसाला मुळीच रस नसतो. त्याच्या रोजच्या जीवनात अशा गोष्टींनी काहीच फरक पडत नाही.
मोदींनी तर "खूनी" म्हणणाऱ्या पत्रकारांनापण खेटराने "ही" विचारले नाही
चार डावे पत्रकार, विकाऊ पाश्चात्य मीडिया आणि साडेतीन पुरोगामी त्यांचा उदो उदो करतात ज्याने मोदींचे शष्प बिघडत नाही. उगाच डोंगर पोखरून उंदीर काढण्यात त्यांना रस नाही.
श्री अरुण जेटलींनीं श्री अरविंद केजरीवालांची न्यायालयात खटला दाखल करून गोची करून ठेवली आहे वर आगाऊ वक्तव्य केल्याबद्दल बदनामीच्या खटल्यात अतिरिक्त १० कोटींची रक्कम जेटलींनी जोडली आहे म्हणून आता केजरीवालांनी राम जेठमलानींकडून आपले वकीलपत्र काढून घेतले आहे. त्यामुळे जेठमलानींना पण तोंडघशी पडल्याची भावना अली आहे.
कोणाची उपद्रव क्षमता किती आहे, अरुंधती रॉय शोभा डे सारख्या बायकांची लायकी काय आहे हे त्यांना माहित आहे. त्यामुळे असल्या फडतूस लोकांच्या मागे लागून आपला अमूल्य वेळ वाया घालवण्यात शहाणपणा नाही हे हि ते चांगले जाणून आहेत.

सतिश गावडे's picture

27 May 2017 - 9:42 am | सतिश गावडे

उत्तर काहीसं असंच असेल असे वाटले होते. मात्र हाच कित्ता इतरांनीही गिरवावा असे वाटते.

वर मारवा यांच्या प्रतिसादाची मला मौज वाटली. त्यांनी अरुंधती रॉय यांच्या उतार्‍यांची झापडे लावल्याने त्यांना माझा उपहासात्मक तटस्थ प्रश्नही कळला नाही.

सचिन७३८'s picture

26 May 2017 - 5:34 pm | सचिन७३८

याच, अगदी याच कारणांमुळे २०१४ साली ‘मोदी का येऊ नये?’ येथपासून आता येणाऱ्या २०१९ साली ‘मोदी या कारणांमुळे यावेत’ अशा काहीशा निष्कर्षाप्रत मी आलो आहे.

गॅरी ट्रुमन's picture

26 May 2017 - 8:51 pm | गॅरी ट्रुमन

२०१९ साली ‘मोदी या कारणांमुळे यावेत’ अशा काहीशा निष्कर्षाप्रत मी आलो आहे.

मोदींचे ब्रॅन्ड अ‍ॅम्बॅसॅडर्स प्रभावी आहेतच तितके.

यांचा विरोध मोदी सरकारला आहे की भारत देशालाच आहे असा प्रश्न पडावा यांची अशी वर्तणूक आहे. मोदी सरकारला विरोध असला तर तसा विरोध करायचा अधिकार प्रत्येक भारतीय नागरीकाला आहे. पण मोदी सरकारला विरोध म्हणून संसदेवर हल्ला करण्यासारख्या महाभयानक प्रकारात हात असलेल्याचे समर्थन करायचे आणि असे समर्थन करणार्‍यांची तळी उचलून धरायचे कारण काय? यातूनच होत असे आहे की अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या गप्पा मारणारे मोठेमोठे उच्चभ्रू विचारवंत सोडले तर देशावर प्रेम असलेल्या सामान्य भारतीयापुढे असे चित्र उभे राहात आहे की हे विरोधक मोदींना विरोध करायच्या नावावर देशालाच विरोध करत आहेत. यातूनच देशाच्या हिताची केवळ मोदींना पडलेली आहे आणि सगळ्या विरोधकांना देशद्रोह्यांचा कळवळा आहे असे चित्र आपसुकच उभे राहात आहे. मोदी हे बघून मनातल्या मनात किती समाधानी असतील!! म्हणूनच मी असल्या लोकांना मोदींचे ब्रॅन्ड अ‍ॅम्बॅसॅडर्स म्हणत आहे. जसे मणीशंकर अय्यर, केजरीवाल असे मोठेमोठे ब्रॅन्ड अ‍ॅम्बॅसॅडर्स आहेत तसेच फेसबुक, मिसळपाव इत्यादी ठिकाणी छोटेछोटे ब्रॅन्ड अ‍ॅम्बॅसॅडर्सही आहेतच. या चर्चेतही ते आलेच आहेत.

एकूणच काय की गेल्या तीन वर्षात मोदी सरकारच्या कामगिरीवर तारतम्याने भाष्य करणे आणि सरकारच्या कमतरता काय आहेत हे व्यवस्थित पध्दतीने लोकांसमोर मांडण्यात विरोधी पक्ष अगदी पूर्ण म्हणजे पूर्ण अपयशी ठरले आहेत. जर मोदी २०१९ मध्ये परत निवडून आले तर ते सरकारची कामगिरी दृष्ट लागण्यासारखी वगैरे आहे म्हणून नक्कीच नाही तर या असल्या विरोधी पक्षांमुळे आणि या ब्रॅन्ड अ‍ॅम्बॅसॅडर्समुळे निवडून येतील.

तिबेट हॅंगकाॅंग --चायना चा भुभाग
पण भारताला असे बांगलादेश संदर्भात वाटले नव्हते
सध्या तिबेट संदर्भात वाटत नाही.
भारताचा भुभाग अरुणालल प्रदेश
पण चायनाला ते मान्य नाही.
ढीगभर या जमीनीच्या वादाची उदाहरणे पाचही
खंडात आहेत.
यातला कुठलाही स्टेक होल्डर बाजु लढवणारा केवळ
अमुक एक बाजुचा या केवळ एकाच निकषावर
निर्वीवाद गुन्हेगार ठरतो की
त्याची मागणी व त्या मागील मांडणी यावर त्याची केस वरचढ दखलपात्र ठरते
असे आहे म्हणुनच तिबेट व बांगलादेश ही भुमिका घेण्याची योग्य केस आहे.
फाळणी च्या वेळी ही केवळ बाजु वेगळी मागणी म्हणुन चुकच असे नव्हतेच
इट इज डीबेटेबल


What's a country? It's just an administrative unit, a glorified municipality. Why do we imbue it with esoteric meaning and protect it with nuclear bombs? I can't bow down to a municipality... it's just not intelligent. The bastards will do what they have to do, and we'll do what we have to do. Even if they annihilate us, we'll go down on the other sid

Every people, every society, needs a culture of resistance, a culture of being difficult and disobedient, that is the only way they will ever be able to stand up to the inevitable abuse of power by whoever runs the state apparatus, the capitalists, the communists, the socialists, the Gandhians, whoever.

नका हो असे अवघड विचार मांडू इथे ;) काही लोकांना घाबरायला होतं.

बाय द वे, या विधानांचा स्रोत काय?

We will do what we have to do

चा अर्थ काय अपेक्षित आहे?

मारवा's picture

26 May 2017 - 10:15 pm | मारवा


Nationalism of one kind or another was the cause of most of the genocide of the twentieth century. Flags are bits of colored cloth that governments use first to shrink-wrap people's minds and then as ceremonial shrouds to bury the dead.

To love. To be loved. To never forget your own insignificance. To never get used to the unspeakable violence and the vulgar disparity of life around you. To seek joy in the saddest places. To pursue beauty to its lair. To never simplify what is complicated or complicate what is simple. To respect strength, never power. Above all, to watch. To try and understand. To never look away. And never, never to forget.

यातीलच हा एक तुकडा त्यांच्यातील संवेदनशीलता दर्शवणारा At times there's something so precise and mathematically chilling about nationalism. Standing at the exact spot where his house once stood, on land acquired for the canal. Build a dam to take water away from 40 million people. Build a dam to pretend to bring water to 40 million people. Who are these gods that govern us? Is there no limit to their powers? The last person I met in the valley was Bhaiji Bhai. He is a Tadvi tribal from Undava, one of the first villages where the government began to acquire land for the Wonder Canal and its 75,000 kilometre network. Bhaiji Bhai lost seventeen of his nineteen acres to the Wonder Canal. It crashes through his land, 700 feet wide including its walkways and steep, sloping embankments, like a velodrome for giant bicyclists. The Canal network affects more than two hundred thousand families. People have lost wells and trees, people have had their houses separated from their farms by the canal, forcing them to walk two or three kilometres to the nearest bridge and then two or three kilometres back along the other side. Twenty-three thousand families, let's say a hundred thousand people, will be, like Bhaiji Bhai, seriously affected. They don't count as 'Project-affected' and are not entitled to rehabilitation. Like his neighbours in Kevadia Colony, Bhaiji Bhai became a pauper overnight. Bhaiji Bhai and his people, forced to smile for photographs on government calendars. Bhaiji Bhai and his people, denied the grace of rage. Bhaiji Bhai and his people, squashed like bugs by this country they're supposed to call their own. It was late evening when I arrived at his house. We sat down on the floor and drank over-sweet tea in the dying light. As he spoke, a memory stirred in me, a sense of deja vu. I couldn't imagine why. I knew I hadn't met him before. Then I realised what it was. I didn't recognise him, but I remembered his story. I'd seen him in an old documentary film, shot more than ten years ago, in the valley. He was frailer now, his beard softened with age. But his story hadn't aged. It was still young and full of passion. It broke my heart, the patience with which he told it. I could tell he had told it over and over and over again, hoping, praying, that one day, one of the strangers passing through Undava would turn out to be Good Luck. Or God. Bhaiji Bhai, Bhaiji Bhai, when will you get angry? When will you stop waiting? When will you say `That's enough!' and reach for your weapons, whatever they may be> When will you show us the whole of your resonant, terrifying, invincible strength? When will you break the faith? Will you break the faith? Or will you let it break you? लेखांचा दुवा http://www.narmada.org/gcg/gcg.html
पैसा's picture

27 May 2017 - 8:05 am | पैसा

सरकारच्या विरोधात शस्त्रे उचला सांगणे म्हणजे संवेदनाशीलता? मग त्या स्वतः नक्षली किंवा माओवाद्यांना जॉईन का होत नाहीत?

मोदक's picture

27 May 2017 - 8:26 am | मोदक

Who knows...

मारवा's picture

27 May 2017 - 9:32 am | मारवा

तुम्ही
वरचा
पॅरा तील प्रसंग वाचण्याची तसदी तरी घेतलीत का हो '
मी संवेदनशील का म्हणालो ते ...
असो

वाचलं म्हणूनच लिहिलंय. कोणीही संवेदनाशील आणि डोके ठिकाणावर असलेला माणूस शस्त्र उचला म्हणून सांगणार नाही. इथे मिपावरच चिगो नावाच्या एका आयडीने एका सरकारी अधिकार्‍यावर जीवघेणा हल्ला दोन वेळा कसा झाला ते लिहिले होते ते शोधून वाचायची तसदी तुम्हीसुद्धा घ्या. आणि मग असल्या चिथावणीखोर लोकांना संवेदनाशील वगैरे म्हणणे थांबवा. तिने जर शस्त्र उचलण्याची भाषा केली नसती तर ती ती संवेदनाशील आहे हे मी एकवेळ कबूल केले असते. पण सरकारविरोधात शस्त्र उचला सांगणे हा सरळ बुद्धिभेद करणे आहे. धर्माच्या नावावर जिहाद करा सांगण्यात आणि या सुझानताईंच्या बोलण्यात मला तत्त्वतः काही फरक दिसत नाही. कारण त्यांची संवेदनाशीलता सिलेक्टिव्ह आहे.

सच्चिदानंद's picture

27 May 2017 - 6:50 pm | सच्चिदानंद

बास बास.. थोडक्यात विरोधाभास स्पष्ट केलात तुम्ही. आवडलं.

गॅरी ट्रुमन's picture

27 May 2017 - 8:36 am | गॅरी ट्रुमन

हे टिपीकल डावे विचार आहेत आणि डावे लोक अडचणीत टाकणारे प्रश्न विचारले की पळून जातात हा सार्वत्रिक अनुभव आहे. त्यामुळे मारवा केवळ अरूंधती काय बोलली आहे तेच कॉपी-पेस्ट करणार आणि विचारलेल्या प्रश्नांना मात्र उत्तरे देणार नाहीत याची खात्री आहे. माझा हा प्रतिसाद इतर मिपाकरांसाठी आहे.

बाकीचा फापटपसारा राहू दे. काही प्रश्नः

१. Why do we defend the nation using nuclear bombs हा प्रश्न कोण विचारत आहेत तर डावे. खो खो खो खो. डावे विचार मुळापासून फांद्यांपर्यंत पूर्ण गंडलेले असल्यामुळे आणि ते मनुष्य स्वभावाविरूध्द असल्यामुळे बाह्य सक्तीशिवाय ही व्यवस्था टिकणे अशक्य आहे. जगात कुठेही डाव्या राजवटी लष्करी दडपशाही, गुंडगिरी याच्याच जोरावर टिकून राहतात. ती पकड जरा ढिली पडली की या राजवटी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे भुईसपाट होतात. हा अनुभव रशियात आला आहे, पूर्व युरोपात आला आहे. तेव्हा अरूंधती रॉयला उलटा प्रश्नः Why do you have to defend leftist polity using brute military force?

२. देश म्हणजे 'ग्लोरिफाईड म्युनिसिपालटी' वगैरे बोलणे कधी ठिक आहे? जेव्हा सगळे लोक तसाच विचार करतात तेव्हा. पाकिस्तानची स्थापना आणि अस्तित्व या दोन्ही गोष्टी केवळ हिंदूद्वेष आणि भारतद्वेष या पायावर आधारीत आहेत याकडे डावे लोक शहामृगाप्रमाणे वाळूत मान खुपसून दुर्लक्ष करत असतील. पण माझ्यासारख्या सामान्य भारतीयाला मात्र तसे करता येणे शक्य नाही. अर्थात अरूंधतीचेही बरोबरच आहे म्हणा. तिला कसली आहे पाकिस्तानी दहशतवाद्यांची भिती? तिला तर पाकिस्तानातील विधानसभेत सन्मानाने भारताविरूध्द बोलायला आमंत्रण येते.

पाकिस्तानातील बर्‍याच मोठ्या वर्गाला भारताविषयी आणि हिंदूंविषयी द्वेष वाटतो हे सत्य अरूंधतीसारखेच रेमेडोके नजरेआड करू शकतील.जोपर्यंत असे लोक आपल्या शेजारच्या देशात आहेत तोपर्यंत मला भारतीय आणि हिंदू म्हणवून घ्यावेच लागेल. कारण मी लाख स्वतःची ओळख 'माणूस' हिच सांगेन पण ते मला (एक सामान्य भारतीय या अर्थी) भारतीय आणि हिंदू म्हणूनच समजतात आणि त्यामुळे सगळ्या भारतीय आणि हिंदूंप्रमाणे मी पण त्यांच्या 'गळा कापायच्या' लीस्टवर आहेच.

बाकी पाकिस्तानविरूध्द माझ्यासारख्या सामान्य भारतीयाला अत्यंत प्रखरपणे वाटते. पण तसे भूतान किंवा म्यानमारविषयी वाटत नाही हे का असले प्रश्न त्या अरूंधती रॉयसारख्यांना पडायचा नाहीच.

३. Why do we defend the nation using nuclear bombs हा प्रश्न अरूंधतीने कधी पाकिस्तान आणि चीनला विचारल्याचे ऐकिवात नाही. की त्यांचे देश हे अस्तित्व तिला मान्य आहे पण भारताचे मात्र नाही? डावे लोक नेमका हाच हलकटपणा कायम करत असतात.

४. देश ही संकल्पना मान्य नसेल तर मग पाकिस्तान या 'देशाचे' पित्ते असलेल्या हुरियतच्या नेत्यांच्या गळ्यात गळे घालताना तिला कसे काही वाटत नाही?

५. काश्मीर आणि उत्तर-पूर्व भारतातील लोकांना भारत या 'देशातून' बाहेर पडायचा अधिकार आहे असे तिचे म्हणणे असेल तर मग तसाच पाकिस्तानातून बाहेर पडायचा अधिकार बलुचिस्तान आणि सिंधमधल्या लोकांनाही आहे याविषयी ती काय बोलली आहे? बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी लष्कर काय करत आहे हे जगजाहिर आहे आणि तिथे पाकिस्तानातून बाहेर पडायला चळवळही चालू आहे. त्याविषयी अरूंधती कधी काही बोलल्याचे ऐकिवात नाही. पी.ओ.के मध्येही पाकिस्तानविरोधी निदर्शने होत असतात. मग त्या लोकांना पाकिस्तान या 'देशातून' बाहेर पडायचा अधिकार नाही वाटते? त्याविषयी ती कधी काय बोलली आहे? म्हणे भारत नागालॅन्डमध्ये 'अ‍ॅग्रेसर' आहे. मग पाकिस्तानने बलुचिस्तान अगदी प्रेमाचाच संदेश देत व्यापले होते की नाही? म्हणजे या लोकांचे सगळे तत्वज्ञान केवळ भारत या देशाविरूध्द. भारताविरूध्द चुरूचुरू बोलणार्‍या जीभेला असे काही प्रश्न विचारले की अगदी पक्षाघाताचा लकवा येतो.

सुबोध खरे's picture

27 May 2017 - 9:47 am | सुबोध खरे

ट्रुमन साहेब
कशाला डाव्यांच्या नादी लागताय.
There is nothing right about them.
त्यांनी चालवलेल्या राज्यांची परिस्थिती पहिली तर ते लक्षात येतेच.
मॉस्कोत पाऊस पडला कि इकडे छत्री उघडणारे लोक ते.
भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाला विरोध करणारी मंडळी हि
भिकार** नुसते
अरुंधती रॉय याना एक बुकर पारितोषिक काय मिळाले त्यांनी जगातल्या सर्वच प्रश्नांवर तारे तोडायला सुरुवात केली.
आपण "लेखक" असलो म्हणजे आपल्याला सर्वच गोष्टीत सर्वच कळतं अशी धारणा असणारे हे लोक.
कुठे यांच्या नादाला लागता?

गॅरी ट्रुमन's picture

27 May 2017 - 10:03 am | गॅरी ट्रुमन

कुठे यांच्या नादाला लागता?

असल्या लोकांच्या नादी लागण्यात शहाणपणा नाही हे नेहमीच कळते पण वळत नाही :( अरूंधती रॉय सारखे उपटसुंभ काहीतरी बरळणार आणि त्याची भलामण आपल्या मिपावर होताना दिसली तर खरच ते सहन होण्यापलीकडे जाते. तरीही असल्या लोकांपासून दूर राहावे हे कळलेले 'वळवायचा' प्रयत्न मात्र नक्कीच आहे.

अद्द्या's picture

27 May 2017 - 11:58 am | अद्द्या

यायला इथे लिंक चिकटवण्याची सवय कोणी लावली काय माहित. स्वतःचे मुद्दे आणि त्यावर प्रश्नांना उत्तरे द्यायचा सोडून लिंक टाकत बसलेत

पूर्वीचे मिपा राहिले नाही हेच खरं!
असे इंग्रजी प्रतिसाद आणि लिंका असलेले प्रतिसाद सटासट उडत बा आमच्या वेळी ;)

सतिश गावडे,

बरेचसे मिपाकर रॉयविरुद्ध आगपाखड करत आहेत म्हणजे त्या काहीतरी चुकीचं करत आहेत यात शंका नाही. पण मग त्यांच्याविरोधात सरकारकडून कायदेशीर कारवाई का होत नाही?

प्रश्न अगदी समर्पक आहे. त्याचं काय आहे की सुझानबाईंसारखे गणंग असल्यामुळे मोदींना फुक्कटची मतं अनायसे मिळतात. स्वत:ची मतपेढी स्वत:च्याच हातानेच बुडवायला मोदी काय पप्पू थोडेच आहेत !

आ.न.,
-गा.पै.

गामा पैलवान's picture

27 May 2017 - 1:42 pm | गामा पैलवान

मारवा,

सुझान अरुंधती रॉय यांच्या एकेक विधानांचा समाचार घेतो.

१.
What's a country? It's just an administrative unit, a glorified municipality.

नेमक्या अशाच विधानांमुळे सुझान अरुंधती रॉय यांना मी देशद्रोही मानतो.

२.
Why do we imbue it with esoteric meaning and protect it with nuclear bombs?

पाकिस्तान आणि चीनला अण्वस्त्रं कशाला पाहिजेत मग? (धन्यवाद, गॅरी ट्रुमन).

३.
The bastards will do what they have to do, and we'll do what we have to do.

स्वत: बास्टर्ड आहे म्हणून लोकनियुक्त शासनही बास्टर्ड असायला पाहिजे हा अट्टाहास कशासाठी? बास्टर्ड म्हणजे नक्की काय? कुठलाही वैचारिक पाया नसलेले भारतातले डावे विचारवंत चीन नाहीतर सोव्हियेत रशियाची पोपटपंची करतात ती अनौरस (म्हणजे बास्टर्ड ) नव्हे काय?

४.
Every people, every society, needs a culture of resistance, a culture of being difficult and disobedient, that is the only way they will ever be able to stand up to the inevitable abuse of power by whoever runs the state apparatus, the capitalists, the communists, the socialists, the Gandhians, whoever.

एक तत्त्व म्हणून हे विधान कित्तीकित्ती गोंडस वाटतं, नाही? डावी चळवळ धादांत खोटेपणावर आधारित आहे. त्यामुळे वरील विधान म्हणजे पोकळ गप्पा आहेत.

५.
Nationalism of one kind or another was the cause of most of the genocide of the twentieth century.

WRONG ! UTTERLY WRONG !!

भारतातल्या हिंदूंचा निर्वंश कुठल्याही राष्ट्रवादामुळे झालेला नसून केवळ इस्लामपायी झालेला आहे.

६.
Flags are bits of colored cloth that governments use first to shrink-wrap people's minds and then as ceremonial shrouds to bury the dead.

शेकड्याने भारतीय क्रांतिकारक तिरंग्यासाठी हसतहसत फासावर चढले. हज्जारो सैनिकांनी तिरंग्यासाठी आपापले प्राण वेचले. आणि ही बाई खुशाल त्याला वेष्टन म्हणून अपमान करते. काय लायकी आहे हिची ते कळलं आम्हाला.

७.
To love. To be loved. To never forget your own insignificance. To never get used to the unspeakable violence and the vulgar disparity of life around you. To seek joy in the saddest places. To pursue beauty to its lair. To never simplify what is complicated or complicate what is simple. To respect strength, never power. Above all, to watch. To try and understand. To never look away. And never, never to forget.

सुझानताईंचा बुद्ध्यंक कमी पडंत असल्याने या विधानावर माझा पास.

आ.न.,
-गा.पै.

मारवा's picture

27 May 2017 - 7:14 pm | मारवा


बांगलादेश हा एकेकाळी पाकिस्तानच्ञा मालकीचा भुभाग होता.
तेथील स्थानिक जनतेवर होत असलेले पाकीस्तानी सरकार चे अन्न्याय विरोधात जेव्हा
भारताने इंदिरा गांधी नी जेव्हा भुमिका घेतली तेव्हा पाकिस्तानी सरकार ही काहीतरी पवित्र बाब आहे असे अर्थातच मानले नाही.
व ते योग्य च होते. मानवी मुल्यांच्या आधारावर बांगलादेशी जनतेला भारताचा पाकिस्तान सरकार विरोधात जाऊन पाठींबा होता.

याच रीतीने आजही मोदी बलुचिस्तान ला जो पाठिंबा देतात तो ही योग्य च आहे. तेथील जनता जी अन्य्याय पिडित आहे त्या विरोधात ही भुमिका आहे. सर्वसामान्य बलुच जनतेला कदाचित पाकिस्तान सरकार पाक वाटत नाही मोदींनाही नाही.

तिबेट च्या दलाई लामा यांना पाठिंबा देतांना भारतात आश्रय देतांनाही एक तिबेट विषयी तेथील नागरीकांच्या चायना सरकार ने चालवलेल्या मुस्क्टदाबी विरोधात भारताची एक मानवी मुल्यांवर आधारीत भुमिका आहे. दलाई लामा यांना अनेक देश अनेक बुद्धीजीवी लोक स्वातंत्र्य शांतीदुत बलाढ्य सरकारशी टक्कर घेत तिबेट च्या स्वातंत्र्या साठी लढणारा नेता मानतात.
यातही चायना सरकार ही पवित्र बाब आहे काहीतरी दैवी अनटचेबल आहे असे मानत नाही.

तर वरील दोन्ही उदाहरणांत मानवी मुल्ये वरचढ आहेत
दोन्ही लोकशाही वा साम्यवादी सरकार असो ती पवित्र मानली गेलेली नाहीत. सरकार या यंत्रणेचा अन्य्याय मान्य आहे.
त्या विरोधात नुसतीच वैचारीक भुमिका नव्हे तर आक्रमक प्रत्य्क्ष कृती घेतली गेलेली आहे उदा. दलाई लामा ला पाठींबा बांगलादेश मुक्ती संग्रामातला सहभाग वगैरे.

तर
१- सरकार ही मानव निर्मित एक यंत्रणा मात्र आहे. ज्यात दैवी पवित्र असे काही नाही.
२- सरकार साम्यवादी लोकशाही राजेशाही असु शकते तरीही अन्यायकारक असु शकते.
३- एकेकाळी राजेशाही सर्वत्र होती ती जाऊन बहुतांश ठिकाणी लोकशाही आली. याहुन ही प्रगल्भ यंत्रणा माणुस नक्कीच शोधु शकतो.
४- जसे राजा एके काळी देव मानला जात असे त्याच्याशी निष्ठा वगैरे तसे आता लोकशाही देशात एखाद्या जमीन मालकी विषयी पावित्र्यपुर्ण आग्रह असु शकतो. झेंडा वगैरे प्रतिका विषयी एखाद्या गाण्याविषयी पवित्र टोकाचा आग्रह एखाद्या टोळीचा असु शकतो.
५-पण त्याहुन मोठी मानवी मुल्ये आहेत. शेवटी सरकार कायदा या सर्व यंत्रणा मानव निर्मीत व त्यात अंतर्भुत असलेल्या मानवांच्या कल्याणासाठीच आहेत. त्या जेव्हा व्यवस्थित काम करत नाहीत. त्या जेव्हा अन्य्यायाचे साधन बनतात तेव्हा त्या मोडणे त्या विरोधात जाणे. हे आवश्यक मानवी कर्तव्य च ठरते.
६- समजा एखादा जगापासुन तुटलेला आदिवासी तुकडा आहे. तिथे एखाद्या कुटुंबाची सत्ता असलेली रानटी दडपशाही आहे सत्ता आहे. ती तेथील लोक पवित्र वगैरे मानतात. मात्र त्यात केवळ त्या कुटुंबाकडुन शोषण च होत आहे. तर कोणी अपघाताने बाहेरुन आलेल्यांनी जर ते चुक अन्ण्यायकारक आढळळे म्हणून ते अमान्य केले त्याला विरोध केला तर त्याला जर कोणी भाबडेपणाने " नव्हे मांडोर कधी चुक असुच शकत नाहीत मांडोर विरोध करणे म्हणजे महापाप मांडोर दैवी आहे " असे काहीतरी म्हणत मांडोर घराण्याची भलामण करत हे शोषण हा अन्य्यय च कसा बरोबर आहे व तो तुम्ही अमान्य करता म्हणजे देशद्रोही आहात जगण्याच्या लायक नाहीत वगैरे वगैरे टेप लावली तर ती केवळ आत्मवंचनाच ठरेल.
७-
फाळणी होण्यापुर्वी फाळणी ची चर्चा अमान्य नव्हती ते वास्तव होते. तेव्हा असे शक्य नव्हते की हा चर्चेचा मुद्दा असु शकत नाही.
जी संस्थाने बळजबरी जोडण्यात आली किंवा आजही जी राज्ये अंतर्गत विभाजनाची आस धरतात किंवा जी पुर्वोत्तर राज्ये मुळ केंद्राच्या प्रवाहाला सामील होण्यास त्यांच्यासाठी महत्वपुर्ण असलेल्या कारणांनी त्यांच्यावरील अन्य्यायाने विरोध करतात.हे सर्व वास्तव जणु अस्तित्वातच नाही अशा शैलीत उन्मादी राष्ट्रवादाची मांडणी होत आहे.
हे सर्वत्र सर्व जगात होते यात इथली केस घेतली आहे इतकेच


तर हा शेवटी जो शेवटचा बिंदु आहे जो पिडित आहे वा समजतो त्याच्या स्वातंत्र्याचा प्रश्न आहे. तो माझ्या किंवा इतरांच्या मताचा प्रश्न असु शकत नाही. त्या सार्वमताला विरोध हा दांभिक आहे. यात एकतर हातातुन निसटण्याची "भिती" आहे किंवा आपल्या हातुन होत असलेल्या अन्य्यायाची कबुलीपुर्ण जाणीव आहे. अन्यथा काय अडचण असु शकते ?

मोदी इंदिरा गांधी यांची बलुचिस्तान बांगलादेश संदर्भातील किंवा तिबेट संदर्भातील भारताची भुमिका
आणि अरुंधती रॉय यांची काश्मीर विषयक भुमिका यात
वेगळेपण नेमके कशात आहे ?
की पावित्र्याचा राष्ट्रवादाचा टोळीचा मुद्दा आहे.
टोळीवाद त्याचे प्रतिक झेंडा की त्याचे गाणे की अजुन काही. व ज्यांना नविन राष्ट्रच करायचे आहे ते करोत.
पण मुळ मानव निर्मीत सरकार नावाच्या यंत्रणेने चिरडलेला माणुस व त्याचे समर्थन जर अन्याय विरोध या
व इतक्याच पहील्या पायरीपर्यंत काय गैर आहे.
म्हणजे एका व्यक्तीने एका मानवनिर्मीत सरकार नावाच्या यंत्रणेने चालवलेल्या अन्य्याया विरोधात उठवलेला आवाज हा पहील्या पायरीवर चुक कसा ठरतो ?
( त्यापुढील पुन्हा एक नविन राष्ट्र च एक नविन म्युनिसीपालीटी होण्यातली ट्रॅजेडी कृपया बाजुला ठेवावी माझा मुद्दा पहील्या
प्पायरीवरच्या विरोधापुरताच मर्यादीत आहे. )

सुबोध खरे's picture

27 May 2017 - 7:28 pm | सुबोध खरे

विरोध खाल्ल्या ताटात भोक पाडण्याला आहे. इथे राहायचं आणि जेवायचं आणि इथल्याच भूमीशी बेईमानी करायची.
बाकी सर्व तात्विक काथ्याकूट (किंवा वैचारिक मैथुन म्हणा) हवे तितके करता येईल.
पण ते च्यूईंग गम चघळण्यासारखे होईल.
कितीही वेळ चघळा पोटात काहीच जात नाही.
काही वेळाने तोंडाला स्वादही राहत नाही

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 May 2017 - 9:51 pm | डॉ सुहास म्हात्रे

मोदी इंदिरा गांधी यांची बलुचिस्तान बांगलादेश संदर्भातील किंवा तिबेट संदर्भातील भारताची भुमिका
आणि अरुंधती रॉय यांची काश्मीर विषयक भुमिका यात वेगळेपण नेमके कशात आहे ?

वरचा इतका तत्ववादी प्रतिसाद लिहिणारा "बलुचिस्तान, बांगलादेश, तिबेट" आणि "काश्मीर" यांच्यामधला फरक काय असे विचरतो (पक्षी : त्यांच्यात फरक नाही असे म्हणतो), तेव्हा खरे तर, कितीही फरक दिसत असले तरीही (कोणत्याही गुप्त कारणांनी का होईना पण) आपल्या भूमीकेला सोडायचे नाही, हे त्याने नक्की केलेले असते. :)

तरीही, काही गोष्टींकडे लक्ष वेधतो...

१.अ. काश्मीर मधला असंतोष खालील सिद्ध झालेल्या गोष्टींनी "बनवलेली" परिस्थिती आहे :
* प्रत्यक्ष पाकिस्तानी हस्तक्षेपाने (पक्षी : सीमेपार अतिरेकी पाठवून) होणार्‍या कारवाया.
* काश्मीरमध्ये असलेल्या व पाकिस्तानी पैश्याने खरेदी केलेल्या फुटीरतावादी हस्तकांकरवी केल्या जाण्यार्‍या कारवाया.
* केवळ काश्मीरबरोबरचीच नव्हे तर अफगाणिस्तान व काही प्रमाणात इराण बरोबरचीही सरहद्द पेटत ठेवून, त्यामुळे निर्माण होणार्‍या अस्थिर परिस्थितीचा बागुलबुवा कायम ठेवून पाश्चिमात्य (विशेषतः अमेरिका) आणि खाडी देशांसाठी महत्वाचे (स्ट्रॅटेजिक) स्थान कायम ठेवून राजकारणी आणि आर्थिक फायदा लुटत राहण्याची पाकिस्तान लष्कराची रणनीति.

१.आ. काश्मीरमधल्या बहुसंख्य जनतेने तिचे मत खालील गोष्टींनी वारंवार स्पष्टपणे व्यक्त केले आहे :
(अ) अनेक स्थानिक, राज्य व राष्ट्रीय निवडणूकांत, अतिरेक्यांच्या धमक्यांना भीक न घालता, मोठ्या संखेने होणारे मतदान.
(आ) अनेकदा झालेल्या पोलिस व सैन्य भरतीच्या वेळेस, अतिरेक्यांच्या धमक्यांना भीक न घालता, हजारोंच्या संखेने असलेली काश्मीरी युवकांची हजेरी.

अर्थातच, काश्मीरमधिल (आणि बर्‍याच अंशी अफगाणिस्तानातली) परिस्थिती शेजारी राष्ट्राने (पक्षी : पाकिस्तानने) चालवलेल्या अतिरेकी कारवायांवर आधारीत आहे, त्यात स्थानिक बहुसंख्य लोकांच्या आशा-आकांक्षांचा फारसा सहभाग नाही; किंबहुना,
या पाकिस्तान-निर्मित दुष्टचक्रात सर्वसामान्य जनता भरडून काढली जात आहे.

२. तिबेट चीनने सरळ सरळ आक्रमण करून ताब्यात घेतलेला भूभाग आहे, हे चीनही अमान्य करणार नाही. या प्रकरणात, दलाई लामांना आश्रय देणे यापलिकडे, भारताचा कोणताही सहभाग नाही.

३. बांगलादेश प्रकरणाबद्दल "अधिक काही विचारण्याची आणि सांगायची" गरज फक्त झोपेचे सोंग घेणार्‍यासाठी आवश्यक ठरेल. तरीही... बांगलादेश युद्धात शरण आलेल्या पाकिस्तानच्या सैनिकांना आपल्या बंदुकांना स्वतःजवळ बाळगण्याची, न भूतो (आणि बहुदा) न भविष्यती, परवानगी कोणत्या कारणासाठी दिली गेली, याच एका अतीप्रसिद्ध गोष्टीची कारणपरंपरा माहित करून घेतल्यास, बांगलादेश प्रकरणाच्या फरकाबद्दलचे सगळे गैरसमज मूळातून दूर होतील.

तेव्हा...

या वरच्या गोष्टींचा विचार करून काश्मीर समस्येकडे परत प्रामाणिक दृष्टीक्षेप टाकायची इच्छा असलेल्या माणसाचे अधिक अभ्यासाने स्वतःहूनच मतपरिवर्तन होईल असे वाटते... अन्यथा इतरांनी अजून जास्त प्रयत्न करणे म्हणजे, झोपलेल्या माणसाला उठविण्याचा प्रयत्न होईल, व असे करण्याचे फलित काय असते हे तुमच्यासारख्या बुद्धिमान व विचारी माणसाला सांगण्याची गरज नाहीच. :)

मारवा दुर्लक्ष करत असलेला अजून एक फरक आहे. बांगला देश, तिबेट, बलुचिस्तान या सर्वांसाठी इंदिरा गांधी, मोदी परकीय आहेत. आपल्या शत्रूच्या कमकुवत बाजूचा फायदा करून घेण्याची मानसिकता त्यांनी दाखवली तर त्यात काही विशेष नाही. याउलट सुझान अरुंधती रॉय या भारतीय नागरिक अजून असाव्यात बहुतेक. निदान त्यानी भारतीय नागरिकत्व सोडून अन्यत्र राजकीय आश्रय घेतल्याचे ऐकले नाही. काश्मिर हा आज भारताचा भूभाग आहे यातही दुमत असण्याचे कारण नाही. अशा परिस्थितीत भारतीय सरकारच्या विरोधात शस्त्रे उचला असे कोणी म्हणत असेल तर त्याच्यावर राष्ट्रद्रोहाचा आरोप नक्कीच होईल. त्याची भलावण करणारे लिखाण मिपावर असणे कदाचित मिपाला अडचणीत आणू शकेल अशी मला भीती वाटत आहे.

आपल्याला जे राष्ट्र, त्याच्या निशाण्या मान्य नाहीत त्याचा त्याग करून सुझान अरुंधती रॉय अन्यत्र नागरिकत्व घेऊन रहायला गेल्यास त्यांनी असे वागणे निदान काही प्रमाणात नैतिक ठरू शकेल. आताच्या परिस्थितीत मात्र ते संपूर्ण अनैतिक आहे.

दशानन's picture

27 May 2017 - 10:47 pm | दशानन

सहमत!

हा एक प्रकारचा देशद्रोह आहे.
कायदेशीर माहिती नाही, पण नकाशामध्ये भारतीय नकाशा चुकीचा दाखवला म्हणून कायदेशीर कार्यवाही होऊ शकते तर लोकांना देशाविरुद्ध शस्त्र हाती घेण्यासाठी प्रवृत्त करणे देखील याच कलमाखाली यावे.

अत्रे's picture

28 May 2017 - 5:54 am | अत्रे

मिपावर हिंसक क्रांतीला प्रोत्साहन कोण आणि कुठे देत आहेत ते कळेल का?

रावल यांनी याही पेक्षा भयावह मत तिच्याबद्दल द्यावे या लायकिची ती आहे.

माझ्या मते वरची विधानेच मिपाला अडचणीत आणू शकतील.

पैसा's picture

28 May 2017 - 1:34 pm | पैसा

त्यांनी अरुंधती बाईची लायकी काढली, तिला मारा म्हटले नाही. मारवा यांनी सुझान बाईची वक्तव्ये दिलीत त्यात त्या सरळ सरकारविरोधात शस्त्रे उचला म्हणत आहेत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 May 2017 - 1:29 pm | डॉ सुहास म्हात्रे

यासंबंधी डोळे उघडणारी, कर्मधर्मसंयोगाने, आजच टीव्हीवर दाखवत असलेली ताजी बातमी...

हिज्बूल मुजाहिदीन या अतिरेकी संघटनेच्या म्होरक्याला सुरक्षादलांनी नुकतेच ठार केल्याच्या निषेधार्थ हुरियत या फुटीरतावादी संघटनेने दिलेल्या आवाहनाला धाब्यावर बसवून आज (२८ मे २०१७) जम्मू आणि काश्मीर मध्ये चालू असलेल्या सैन्यातिल भरतीची पूर्वपरिक्षा देणारे काश्मीरी तरूण...

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 May 2017 - 3:03 pm | डॉ सुहास म्हात्रे
मारवा's picture

28 May 2017 - 6:39 pm | मारवा

तिबेट चीनने सरळ सरळ आक्रमण करून ताब्यात घेतलेला भूभाग आहे, हे चीनही अमान्य करणार नाही.

हे विधान रोचक वाटले . तिबेट समजा ठिक तर
सरदार पटेल यांनी भारतासाठी साम दाम सोबतच दंड वापरुन
काही संस्थानांचा भुभाग उदा हैद्राबाद सरळ आक्रमण करुन पोलिस अॅक्शन इ? केंद्र सकारच्या ताब्यात घेतला
समजा हाच तर्क वापरुन....
तर.?

तुम्ही कुठल्या बाजूला आहात?

नाही, म्हणजे हा देश, राष्ट्र इत्यादी तुम्ही मान्य करता कि नाही करत?

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 May 2017 - 10:13 pm | डॉ सुहास म्हात्रे

हैद्राबाद संस्थानात, मूठभर सत्ताधारी जुलुमी व अतिरेकी रझाकार सोडले तर इतर बहुसंख्य जनतेची काय आशाआकांक्षा होती, हे न झोपलेल्यांना (किंवा झोपेचे सोंग घेतलेल्यांनाही) त्या कारवाईच्या दिवसांपासून ते आजतागायत स्पष्टपणे दिसत आहेच आहेच... की तिथेही "आझादी,आझादी" म्हणत भव्य निदर्शने आणि आजतागायत स्वातंत्र्यलढा चालू आहे असा समज आहे ?!
(याविरुद्ध, बलुचिस्तानच्या पाकिस्तानमधील विलिनिकरणाचा इतिहास आणि जबरदस्तीने केलेल्या विलिनिकरणामुळे तिथे चालू असलेला बहुसंख्य जनतेचा आझादीसाठीचा लढा, डोळे उघडणारा ठरावा !)

वर सांगितलेल्या "झोपेचे सोंग घेतलेल्याला जागे करता येत नाही" या म्हणीमध्ये थोडासा बदल करावा अशी हल्ली परिस्थिती आहे, हे मात्र खरे. तो बदल असा...

"झोपेचे सोंग घेतलेल्याला कधीमधी जागे करता येते, पण झोपेचे नाटक संपविले की तो लगेच वडाची साल पिंपळाला लावत सुटतो."

;) :)

नागालॅन्ड प्रदेशातील नागा आदिवासींनी स्वातंत्र्यपुर्व काळापासुन ते आजपर्यंत भारतापासुन स्वतंत्र त्याच्या
स्वतंत्र भुभागाची मागणी केली.
पहील्या १९५२ च्या भारताच्या निवडणुकी वर. नागांनी बहिष्कार टाकला. रेफरेंडमची मागणीच नव्हे तो स्वतंत्रतेने घेण्याचा प्रयत्नही केला ही पाकीस्तान निर्मीतीपुर्व. मागणी होती हे महत्वाचे.
ही रेकाॅर्ड वर आहे.
तिबेटचे स्वातंत्र्य जसे चीन ला मान्य नाही तसेच नागालॅंड चे भारताला ही मान्य नाही.
इथे तर थेट ब्रिटीशांकडे पासुन ही मागणी नागा करत आलेले आहेत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 May 2017 - 3:59 pm | डॉ सुहास म्हात्रे

अजून एक वडाची साल पिंपळाला... =))

नागा स्वातंत्र्याची मागणी नगण्य होऊन बंडखोर नागा भारतिय संघराज्याच्या निवडणूक प्रक्रियेत सामिल झाले, ते बहुसंख्य लोकांचा त्या प्रक्रियेला पाठिंबा होता यासाठीच (मूठभर लोकांनी शस्त्रे उचलून अतिरेकी कारवाया करत जनजीवन विस्कळीत करायला लोकांचा पाठींबा नव्हता, ते लोकांना नाईलाजाने सहन करावे लागत होते.). आज जे काही तुरळक घातपाताचे प्रकार चालू आहेत ते खंडणी गोळा करण्यासाठीची स्थानिक गुंडगिरी आहे. गोंधळ कायम असला की सरकारी मलिदा खाणे सुलभ जाते, हा हितसंबंधी हेतू राखण्यासाठी अनेक भूतपूर्व भारतिय सरकारांनी पूर्वोत्तर राज्यांचा संसाधनात्मक विकास (इन्फ्रास्ट्रक्चरल डेवलपमेंट) केला नाही. स्थानिक गुंडांच्या आणि त्याच प्रवृत्तीच्या राजकारण्यांच्या हे सगळे सोईचेच होते. मात्र, सद्या ते चित्र बदलते आहे, कदाचित पुढच्या दोन एक वर्षांत पूर्वोत्तर राज्यांतील असंतोष, हा मुद्दा डाव्यांच्या बडबडीतून बाहेर गेला तर आश्चर्य वाटणार नाही.

म्हणजे, नागा उदाहणानेच, तेथिल आणि बलुचिस्तान व तिबेटमध्ये असलेली एकदम विरुद्ध परिस्थितीच अधोरेखीत होते आहे... पुरेसे ध्यानात आले नसले तर खालील विवरण वाचा.

(अ) बलुचिस्तान (कलातचा राजा) व तिबेट (दलाई लामा) मधिल तात्कालीन स्थानिक सत्ताकेंद्रांना त्यांच्यावरील आक्रमणांच्या वेळेस बहुसंख्य जनतेचा पाठींबा होता व अजूनही आहे. त्यापैकी दलाई लामांना आक्रमणानंतर जीव वाचविण्यासाठी भारतात पळून यावे लागले आणि सद्य काळातला महत्वाचा नेमस्त बलुच नेता खान बुख्ती याची पाकिस्तान सैन्याच्या हाती हत्या आपणच घडवून आणली, अशी कबूली तत्कालिन पाकिस्तानी राष्ट्राध्यक्ष मुशर्रफ याने स्वतःच टीव्हीवरील मुलाखतीत दिली आहे. त्यानंतरही आजतागायत अनेक बलुच नेत्यांची पाकिस्तानी सैन्यातर्फे हत्याकांडे चालू आहेतच.

(आ) बलुचिस्तान हा भारत व पाकिस्तान यांच्या अगोदर स्वातंत्र्य मिळालेला सार्वभौम देश होता आणि भारताबरोबर विलिनिकरणाचा त्याचा विचार चालू होता. चीन विकसित करत असलेले आताचे बलुचिस्तानातले ग्वादार बंदर व आजूबाजूचा भूभाग १७८३ सालापासून सल्तनत ऑफ ओमानच्या अधिपत्याखाली होता. भारताच्या स्वतंत्र्यानंतर ओमानने तो भूभाग भारताला मोफत देण्याची तयारी दाखवली होती. भारताने नाकारल्यावर, बंदरासह तो भूभाग ओमानने, ६ सप्टेंबर १९५८ साली पाकिस्तानला विकला.

(इ) भारताच्या स्वातंत्र्यानंतर, तत्कालीन नॉर्थवेस्ट फ्राँटियर प्रॉव्हिन्सचे सर्वेसर्वा "सरहद्द गांधी" खान अब्दुल गफार खान 'आम्हाला भारतात सामील करू घ्या' असा आग्रह करत दिल्लीत तळ ठोकून बसले होते आणि नेहरूंनी त्यांचा आग्रह न मानल्यामुळे नाईलाजाने परत जाताना "तुम्ही आम्हाला लांडग्यांच्या (पक्षी : पाकिस्तानच्या) तोंडी देत आहात" असा दु:खद शेरा मारू गेले होते.

(ई) तिबेट चीनचा प्रॉव्हिन्स नव्हता तर एक मैत्रीसदृश्य कराराने संलग्न सार्वभौम राज्य होते. चीनच्या तिबेटवरील आक्रमणाच्या प्रकरणात भारताने बोटचेपे धोरण पत्करून मूग गिळून बसणे पसंत केले. तिबेटसारखे भारताच्या उत्तरेकडील मैत्रीपूर्ण बफर स्टेट चीनला गिळंकृत करायची मुभा देऊन भारताने चीनला आपल्या दरवाजापर्यंत येण्याचे आमंत्रण दिले आणि नंतर एका अर्थी नाक वर करून भारताच्या भूभागावरही हक्क सांगण्याची मुभा दिली !

या सर्व प्रकरणांत, तत्कालीन भारतिय नेतृत्व अत्यंत अदूरदर्शी आणि दुबळे ठरले, यात संशय नाही. तोच अदूरदर्शीपणा आणि दुबळेपणा काश्मीर सामिलीकरणाच्या करारात (जो भारतात सामील व्हायला अधीर झालेल्या राजाबरोबर होता !), नको ती भारताला तोट्याची कलमे घुसडून दाखवला गेला. काळाबरोबर ते नेते गेले पण देशापुढे एका प्रचंड मोठ्या डोकेदुखीचा आणि देशापेक्षा स्वार्थ मोठा समजणार्‍या विचारसरणींचा कायम वारसा ठेवून गेले ! :(

गोलपोस्ट बदलायला नागा नंतर अजून काही उदाहरणे आठवत नसली तर... नक्षलवादाची स्पेसिफिक नसलेली, पण तुमचा आतापर्यंतचा वाद पाहता, तुमच्या मते स्पेसिफिक ठरू शकेल अश्या उदाहरणाची) मीच आठवण करून देतो =)) =)) =))

***************

पाकिस्तान आणि त्याच्या अतिरेकी कारवायांची भलावण करताना भले भले डावे नेते हे विसरतात की, पाकिस्तानचे खरेखुरे "अतिरेक्याची खाण" हे रूप सर्व जगासमोर स्पष्टपणे पुढे आले आहे. त्यानंतरही आंधळेपणे पाकिस्तानची पाठराखण करण्यामागे केवळ खालील कारणे असू शकतात...

१. पाकिस्तानकडून किंवा इतर हितसंबंधियांकडून मिळणारा मलिदा बंद होण्याची भिती वाटणे
(हल्लीचे डावे तीनचार दशकांपूर्वीचे तत्ववादी लोक अजिबात नाहीत, तर दिल्लीतील उच्चभ्रू ल्युटेन परिसरातील घरांत आणि क्लबांत संध्याकाळी बसून शँपेन 'सिप' करणारे आणि (कामगारांच्या नव्हे तर) केवळ स्वतःच्या हितसंबंधांचे रक्षण करण्याचे आडाखे बांधणारे छुपे गब्बर लोक आहेत. ते, त्यांची मुले आणि जवळचे नातेवाईक यांच्या संपत्या, पाश्चिमात्य देशातिल शिक्षण व वास्तव्ये पाहिल्यास डोळे सत्ताड उघडतील आणि बराच काळ तसेच राहतील !),.

२. पाकिस्तानी अतिरेकी कारवायांमुळे भारतात निर्माण होणार्‍या संभ्रमित अवस्थेचा उपयोग करत, (अ) आपले आर्थिक-राजकिय हितसंबंध कायम राखणे व (आ) आपले बुडू लागलेले राजकिय जहाज कसेबसे पाण्यावर ठेवण्याची कसरत करणे
(भारतीय डाव्यांची सर्वात मोठी भिती, "पाकिस्तानी व नक्षली कारवाया थांबल्या तर आपल्याला उचलायला मुद्देच राहणार नाहीत व आपण आपोआप मोडीत निघू" ही आहे),

३. भारतिय जनता मूर्ख आहे, "एखादे असत्य शंभरदा सांगितले की तिला ते सत्य वाटू लागेल" या गोबेल्सच्या तत्वावर डाव्यांचा अजूनही ठाम पण मूर्ख विश्वास असणे
(भारतिय जनता पूर्वानुभवावरून शिकून शहाणी झाली आहे हे तिने २०१४ व त्यानंतरच्या निवडणूकांत सतत सिद्ध केले आहे आणि तिने बंगालमधूनही डाव्यांची हकालपट्टी केली आहे. मात्र, डाव्यांना शहाणे व्हायला अजून बराच काळ लागेल असेच दिसत आहे),

४. ज्या (भुक्कड) डाव्या तत्वांवर आतापर्यंतचे आयुष्य खर्च केले, ती एकामागोमाग मोडीत निघत आहेत*, हे डोळ्यासमोर स्पष्ट दिसत असूनही (अ) हे सत्य मानण्याची, स्वतःच्या इगोमुळे, मनाची तयारी नसणे... किंवा (आ) ते सत्य मानण्यात (खरोखरच) शरम वाटणे, व असे उघड कबूल करण्याची धमक अंगात नसणे किंवा (इ) उघड बोललो तर आपल्याच साथीदारांकडून आपल्याला 'धोका' होण्याची शक्यता असणे (या 'धोका' च्या बाबतीत डावे आणि अतिरेकी यांचे कायम दाट एकमत असते !)
(* डाव्यांचे मायबाप, म्हणजे रशियातले आणि चीनमधले डावे, काही दशकांपूर्वीच "सरंजामी भांडवलशहा" झाले आहेत, इतके प्रचंड ते बदलले आहेत. हे भारतिय डाव्यांना कळत नाही असे नाही. पण, तत्व-बेवारस झाल्यामुळे त्यांना आता केवळ कल्पनाविलासावर जगण्याची पाळी आली आहे.)

वरची अवस्था पाहता, डाव्यांचे नेतेच इतके अगतिक झालेले असताना, त्यांच्या अनुयायांनी स्वत:चे डोके वापरून सत्याची भलावण सुरू करणे कठीण आहे... आणि तसे झाले तर आम्हाला पण ते भोवळ येण्याइतके अतीआश्चर्यकारकच वाटेल !

तेव्हा, मिपाकर या नात्याने एक अनाहूत सल्ला...

झोपेचे सोंग घेणे त्यातल्या त्यात जास्त चांगले कारण त्याने "झाकली मूठ सव्वा लाखाची" तरी राहते... वडाची साल पिंपळाला लावण्याच्या प्रयत्नांत मूठ उघडी होऊन हातातली माती लोकांना दिसते.

तुम्ही सूज्ञ आहातच, तेव्हा तुम्हाला अजून काय सांगणे ?! :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Jun 2017 - 6:34 pm | डॉ सुहास म्हात्रे

काय योगायोग पहा !

कालपासून भारतसरकारच्या इडीसकट इतर विभागांनी काश्मीरी फुटीरतावाद्यांच्या दिल्ली, श्रीनगर, इत्यादी जागांवर धाडी घालणे सुरु केले आणि माझे वरचे अंदाज खरे ठरू लागले आहेत असे प्रथमदर्शनी तरी दिसते आहे !

यात अजून आनंदाची गोष्ट म्हणजे फुटीरतावाद्यांच्या कपाटांतून बाहेर पडणार्‍या काही हाडकांवर काश्मीर (आणि कदाचित भारतातील) राजकिय पक्षांच्या नेत्यांची नावे दिसत आहेत. नेहमी फुटीरतावाद्यांच्या गळ्यात गळा घालून "स्टेक होल्डर्स, स्टेक होल्डर्स" असा गळा काढणार्‍या या नेत्यांची आता मात्र दातखीळ बसली आहे :)

थोडक्यात, गेल्या दोन-तीन दिवसांच्या बातम्या पाहता काश्मीर समस्येवर सरकारने वेगळे आणि दूरदर्शी उपाय करण्याची सुरुवात केली आहे असे म्हणायला वाव दिसत आहे. पाहुया कशा विकसित होतात या कारवाया ते.

गॅरी ट्रुमन's picture

5 Jun 2017 - 10:11 am | गॅरी ट्रुमन

कालपासून भारतसरकारच्या इडीसकट इतर विभागांनी काश्मीरी फुटीरतावाद्यांच्या दिल्ली, श्रीनगर, इत्यादी जागांवर धाडी घालणे सुरु केले

अशा बातम्या आहेत की या धाडी घातलेल्यांमध्ये पाकिस्तानला फळांची निर्यात करणार्‍या काही व्यापार्‍यांचाही समावेश आहे.या फळांच्या व्यापार्‍यांमार्फत काश्मीरातील दगडफेकीला आणि दहशतवाद्यांना फंडिंग करायचा मार्ग ई.डी च्या लक्षात आला.समजा २५ लाखांची फळे निर्यात केली तर बिल ५० लाखांचे करायचे. वरच्या २५ लाखांपैकी थोडा वाटा त्या फळ व्यापार्‍याचा आणि उरलेला वाटा काश्मीरातील 'काही' लोकांना पोहोचता करणे अशा स्वरूपाची ही योजना आहे. माझ्या चेपु मित्रमंडळींपैकी एका निवृत्त कर्नलने याविषयी चेपुवर लिहिले त्यावरून असे काही असते हे कळले. असल्या काही फळ व्यापार्‍यांवरही छापे घालण्यात आले आहेत.

एक समजत नाही. पाकड्यांना अगदी सगळ्या गोष्टींच्या निर्यातीवर आणि कुठच्याही प्रकारच्या देवाणघेवाणीवर पूर्ण बंदीच का टाकत नाहीत?काही फरक पडत नाही पाकड्यांना फळं खायला मिळाली नाहीत तरी.अर्थातच असे काही केले तर एकजात सगळ्या विचारवंतांना पाकड्यांचा पुळका येईलच. आणि अशा विचारवंतांना अगदी पूर्ण
रस्त्यावर आणून देशोधडीला लावण्याचा कणखरपणा मोदी सरकार अजूनही दाखवू शकलेले नाही ही एक मोदी सरकारविषयी तक्रार आहेच.

नेहमी फुटीरतावाद्यांच्या गळ्यात गळा घालून "स्टेक होल्डर्स, स्टेक होल्डर्स" असा गळा काढणार्‍या या नेत्यांची आता मात्र दातखीळ बसली आहे

छे हो अशी कशी दातखिळ बसेल? अजून काही दिवसात फळ व्यापार्‍यांवर कसा अन्याय होत आहे याविषयीच्या कहाण्या ऐकायला मिळाल्या तरी आश्चर्य वाटायला नको.

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Jun 2017 - 12:52 am | डॉ सुहास म्हात्रे

फुटीरतावाद्यांशी ज्यांचा तडक किंवा तडक संबंध/पाठींबा आहे त्यांची दातखीळ बसली आहे. मात्र, आता डावे नेते आणि भारतातले आणि बुर्ज्वा पाश्चिमात्यांच्या देशात काम करणार्‍या (आणि त्यांच्या डॉलर्सना अस्पृश्य न समजणारे) तथाकथित "विचारवंत आणि अ‍ॅकॅडेमिशियन" यांनी नथीतून तीर मारायला सुरुवात केली आहे. तसे करताना त्यांनी सैन्यावर आडून टीका करत पाकिस्तानला खाद्य पुरवण्याचा जुना धंदा परत सुरू केला आहे.

मारवा's picture

27 May 2017 - 8:53 pm | मारवा

हिटलरच्या दडपशाही च्या चिखलातुन जर्मनीतुनच शुभ्र गुलाब उमलले होते.
बिभीषण विदूर सार्वकालिक आहेत.
https://en.m.wikipedia.org/wiki/White_Rose

सुबोध खरे's picture

29 May 2017 - 10:17 am | सुबोध खरे

येथे गवतास फाटे ( भाले ऐवजी) फुटतात

डँबिस००७'s picture

27 May 2017 - 9:09 pm | डँबिस००७

Sign The Petition To Remove Raheel Khursheed as Head of Twitter India For Discrimination In Twitter With Nationalists

Dear Jack,

It was a heartbreaking to read Mr Raheel Khurshed making fun of a very sacred hindu festival telling Indian women the following :

“”For ur Navraatras: Durex Upwaas, Saboodana Flavor. Let festive season begin!””

Durex is a condom name, he is indirectly saying Hindus to do fasting with condom Saboodana flavor

He is using extremely vulgar and lewd language to Insult hindu festivals as well as hindus, especially hindu women. The following content will help you realize exactly how bad and sad this tweet made us feel.

डँबिस००७'s picture

27 May 2017 - 9:11 pm | डँबिस००७

हे खर आहे का ?


कुठल्याही मानवकेंद्रीत समस्येवरील विचार वा कृती करतांना, मुलतहा महत्व हे त्या मानवी व्यथेला दिले पाहीजे.
त्या आड येत असलेल्या त्याला कारणीभुत होत असलेल्या मानवी संस्था राष्ट्र धर्म कायदा इ यांची चिकीत्सा, फेरमांडणी, त्या
संस्था त्या मशिनरीज सतत उत्क्रांत होत असलेल्या मानवी समुहाला अपुर्ण वा प्रसंगी घातक ठरत असतील तर त्यांचे ओझे न वाहता त्यास नवे पर्याय वा किमान क्रांतिकारी बदल केलाच पाहीजे. उदा. राजेशाही चा सार्वत्रिक इतिहास व त्यात केलेला बदल, किंवा राइट टु रीकॅाल सारखे लोकशाही या संस्थेतील बदलाचे प्रयत्न.

यात जुन्या मानव यंत्रणे कडे बघण्याचा दृष्टीकोण केवळ उपयुक्ततावादी असावा. त्या यंत्रणेला अंतिम वा पवित्र समजणे. त्याचा वापर
शोषणाचे हत्यार म्हणुन करणे, त्या यंत्रणेला व तिच्या संकेतांना ती मुलतहा ज्या मानवांसाठी. आहे त्याहुन अधिक महत्व देणे गैर वाटते.

यात निर्भीड विचारकाची भुमिका कळीची ठरते. तो उपलब्ध मानवी यंत्रणांच्या मर्यादा दाखवतो, पर्याय देतो, चिकीत्सा करतो. यात स्वतंत्र विचारकाची भुमिका यंत्रणावादी नसुन व्यक्तीवादी असते. अशा विचारकांद्वारेच वेळोवेळी मानवसमुहाला नवनविन अधिक उपयुक्त ,वा उत्क्रांत यंत्रणांचा लाभ झालेला आहे. म्हणुनच निर्भिड विचारकांचे मोठे महत्व आहे.


कुठल्याही मानवकेंद्रीत समस्येवरील विचार वा कृती करतांना, मुलतहा महत्व हे त्या मानवी व्यथेला दिले पाहीजे.
त्या आड येत असलेल्या त्याला कारणीभुत होत असलेल्या मानवी संस्था राष्ट्र धर्म कायदा इ यांची चिकीत्सा, फेरमांडणी, त्या
संस्था त्या मशिनरीज सतत उत्क्रांत होत असलेल्या मानवी समुहाला अपुर्ण वा प्रसंगी घातक ठरत असतील तर त्यांचे ओझे न वाहता त्यास नवे पर्याय वा किमान क्रांतिकारी बदल केलाच पाहीजे. उदा. राजेशाही चा सार्वत्रिक इतिहास व त्यात केलेला बदल, किंवा राइट टु रीकॅाल सारखे लोकशाही या संस्थेतील बदलाचे प्रयत्न.

यात जुन्या मानव यंत्रणे कडे बघण्याचा दृष्टीकोण केवळ उपयुक्ततावादी असावा. त्या यंत्रणेला अंतिम वा पवित्र समजणे. त्याचा वापर
शोषणाचे हत्यार म्हणुन करणे, त्या यंत्रणेला व तिच्या संकेतांना ती मुलतहा ज्या मानवांसाठी. आहे त्याहुन अधिक महत्व देणे गैर वाटते.

यात निर्भीड विचारकाची भुमिका कळीची ठरते. तो उपलब्ध मानवी यंत्रणांच्या मर्यादा दाखवतो, पर्याय देतो, चिकीत्सा करतो. यात स्वतंत्र विचारकाची भुमिका यंत्रणावादी नसुन व्यक्तीवादी असते. अशा विचारकांद्वारेच वेळोवेळी मानवसमुहाला नवनविन अधिक उपयुक्त ,वा उत्क्रांत यंत्रणांचा लाभ झालेला आहे. म्हणुनच निर्भिड विचारकांचे मोठे महत्व आहे.

मारवा's picture

28 May 2017 - 8:19 am | मारवा


ज्या काहींना यंत्रणा सोयीचे शोषणाचे हत्यार झालेले आहे. यंत्रणेत हितसंबंध गुंतलेले आहे, वा कुठलीही व्यवस्था बसवतांना च्या आवश्यक रेटा वा प्रचार या सर्वाच्या एकत्रित परीणामाने एक भाबडी भावनिक गुंतवणुक त्यात झालेली आहे,वा स्थैर्यलोलुपतेने, वा पोकळीच्या आदीम भयाने प्रेरीत होऊन, वा अन्य नकारात्मक प्रेरणांनी
मग दृष्टीकोण विशाल मानवी व्यथा केंद्रीत असा न होता तो
संकुचित असा मानवी यंत्रणा केंद्रीत असा होतो.
यातुन च टोकाची असंवेदनशीलता वा बधिरपणाची टोळीवादी मानसिकता विकसीत होण्यास वाव मिळत जातो.

गामा पैलवान's picture

28 May 2017 - 11:23 am | गामा पैलवान

मारवा,

१.
मोदी इंदिरा गांधी यांची बलुचिस्तान बांगलादेश संदर्भातील किंवा तिबेट संदर्भातील भारताची भुमिका
आणि अरुंधती रॉय यांची काश्मीर विषयक भुमिका यात
वेगळेपण नेमके कशात आहे ?

काश्मिरात हिंदूंचा निर्वंश झाला आहे. भारताच्या ज्या ज्या भागांत हिंदू अल्पसंख्य वा नष्ट झाले ते ते भाग भारतापासून तुटले. त्यामुळे सुझान अरुंधती रॉय यांची भूमिका भारतासाठी घातक आहे.

२.

पण मुळ मानव निर्मीत सरकार नावाच्या यंत्रणेने चिरडलेला माणुस व त्याचे समर्थन जर अन्याय विरोध या
व इतक्याच पहील्या पायरीपर्यंत काय गैर आहे.

दुर्दैवाने काश्मिरी हिंदूंच्या बाबतीत ही पहिली पायरी सुद्धा गाठण्यासाठी तथाकथित डावे विचारवंत तयार नसतात. अशांचे लाड का म्हणून खपवून घ्यायचे? पहिल्यांदा काश्मिरी हिंदूंचं पुनर्वसन होऊ द्या, नंतर काय ती मुक्ताफळे उधळा.

आ.न.,
-गा.पै.

गॅरी ट्रुमन's picture

29 May 2017 - 9:57 am | गॅरी ट्रुमन

मिपावर अगदी पहिल्यापासूनच मी डाव्यांविरूध्द भूमिका घेऊन तसे लिहिले आहे. मी डाव्यांच्या इतक्या विरोधात का आहे असा प्रश्न मला मला अनेक लोक विचारतात. माझ्या डाव्यांना असलेल्या पराकोटीच्या विरोधाचे कारण एकत्र करायचे फारच उपयुक्त काम मारवांनी केले आहे. यापूर्वी मला त्याचे कारण वेगवेगळ्या सोर्सेसमधून द्यावे लागायचे. आता या लेखाची एक लिंक दिली आणि त्यातील मारवांचे प्रतिसाद वाचा असे सांगितले की झाले. इथे अरूंधती रॉयचे तथाकथित 'विचार' मारवांनी दिले आहेत ते अगदी टिपीकल डावे विचार आहेत. हे तथाकथित विचार अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या मोठ्यामोठ्या गप्पा मारणारे तथाकथित विचारवंत सोडून आपल्या देशावर प्रेम असलेल्या सगळ्या सामान्य भारतीयांना अत्यंत घृणास्पद वाटतील यात काहीही शंका नाही.

दशानन's picture

29 May 2017 - 10:56 am | दशानन

+१
तसेच सिलेक्टिव्ह, सोयीचे तेवढेच घेऊन आपला विचार किंवा ज्याचे पाईक आहेत त्याचा विचार पुढे रेटत राहणे हा प्रकार पाहिला की अजून जास्त त्यांच्या बद्दल मनात कडवटपणा निर्माण होतो हे वेगळेच.

गॅरी जी
डाव्यांचा व त्यांच्या विचारसरणीचा विरोध करण्यासाठी डाव्या विचारसरणीवर मुलगामी अतीसुक्ष्म आघात करणारी अजुन काही उत्तम संदर्भ उपलब्ध आहेत. आपण यांच्याही लिंका अवश्य द्याव्यात. केवळ भावनिक विरोधापेक्षा हा अत्यंत उपयुक्त तार्किक तात्विक असा प्रतिकार उपलब्ध असल्यावर आवडेल वाटेल अश्या आशावादाची गरजच राहणार नाही. हे पटेल इतके प्रत्ययकारी तार्किक आहे.

तर व्हॅक्लाव्ह हॅवेल यांचा एक निबंध पॉवर ऑफ पॉवरलेस नावाचा निव्वळ अप्रतिम अतीसुक्ष्म व मार्मिक असा आहे. यात साम्यवादी दडपशाहीचे तसेच या विचारसरणीवर त्यातील भयावह दांभिकतेवर अत्यंत मुलगामी मार्मिक असा प्रहार केलेला आहे. सुदैवाने हा संपुर्ण निबंध जालावर उपलब्ध आहे. ( अल्प माहीतीप्रमाणे याला नोबेल पारीतोषिक मिळाले आहे ) ही याची लिंक

http://www.vaclavhavel.cz/showtrans.php?cat=eseje&val=2_aj_eseje.html&ty...
तर आपण बहुधा वाचले असेलच (नसल्यास आवर्जुन वाचावे ) टंकाळा असल्याने थोडक्यात ( माझ्या जुन्या प्रतिसादांचे कॉपी पेस्ट देत) इतकेच मांडतो
याचा वापर तुम्हाला नक्कीच होइल याची खात्री आहे.

तर झाले असे होते की एका संस्थळावर फिडेल कॅस्ट्रो चा लोगो लावण्यात आलेला होता. त्याला मी केलेला विरोध केलेला होता तेव्हा
इथे माझ्या या प्रतिसादात मी खालील प्रकारे टीका केलेली आहे. ( ती इथे देण्याचा हेतु हा की तुम्हास उपयोगी ठरेल म्हणुन व तुमचे काम अजुन कमी झाले व एकाच ठिकाणी डाव्या विरोधातले मटेरीयल जास्तीत जास्त जमा झाल्यास एकच लिंक पुरे ठरेल. )

इथे माझ्या विरोधातील सभासदाने मला साम्यवादाने निर्माण केलेल्या आदर्शवादा संदर्भात मत व्यक्त केलेले होते त्याला माझा प्रतिसाद असा होता.

प्रतिसाद सुरु

तुम्ही म्हणता तसा आदर्शवाद नक्कीच साठ सत्तरच्या काळात अस्तित्वात होता. प्रश्न आजचा २०१६ मध्ये तुम्ही व मी आहोत व आपल्याला
१- त्या आदर्शवादाची प्रत्यक्षात कशात परीणीती झालेली आहे हे नीट माहीत आहे. आज २०१६ मध्ये आपल्या समोर एका स्वप्नाची अखेर नेमकी कशात झाली त्याचे संदर्भ रशिया व इतर अनेक साम्यवादी राष्ट्रांच्या स्थितीवरुनच पुरेसे स्पष्ट आहे. आपल्या समोर पुर्ण सिनेमा स्क्रिप्ट सहीत उपलब्ध आहे.
२- याच्या असंख्य कारणांत त्या विचारसरणीच्या मुळातच असलेल्या अंगभुत दोषांसहीत त्याहुन महत्वाचे त्या विचारसरणीच्या नायकांनी ( ज्यांकडे ६०-७० मध्ये एक मोठा वर्ग सर्व नाही स्वप्नाळु अपेक्षेने बघत होता ) केलेली प्रचंड प्रतारणा केलेली कृष्णकृत्ये केलेली मुस्कटदाबी तुडवलेली मानवी मुल्ये राबवलेले दबावतंत्र आचरलेली निर्दयी हुकुमशाही (इथे कॅस्ट्रो च्या संदर्भात घ्यावे. आपल्या समोर अनेक पुराव्यांनीशी उपलब्ध आहे.
३- तर जी विचारसरणी आपण आदर्श व तिचे नायक उदात्त मानले गेलेत त्या दोहोंचे २०१६ मधील प्रत्यक्ष वास्तवाचे आपण साक्षीदार आहोत.
४- तर आज २०१६ मध्येही हे सर्व जाणुनही आपण जर आज त्या नायकाचे उदात्तीकरण करत असु तर त्याचे कारण आपल्या स्मरणरंजनातुन आपण बाहेर येण्यास तयार नाही हे एक किंवा आपण दांभिक हे दुसरे किंवा अजुनही वास्तव आपल्या पर्यंत कदाचित पोहोचले नसेल हे तिसरे अशी कारणे असु शकता असे म्हणण्यास वाव आहे.
किंवा त्या मुळ विचारसरणीने आपल्यावर केलेल्या गारुडातुन अजुन आपण बाहेर आलेलो नाही. (१)

टीप-(१) Václav Havel च्या The Power of the Powerless या निबंधात हा मुद्दा मुळ विचारसरणीचे गारुड ज्यावर आधारीत ज्यातुन आलेली राजवट हुकुमशहा कितीही भयंकर वागले पुढे जाऊन तरी कमी होत नाही त्या संदर्भातला हा परीच्छेद फार रोचक आहे. यात पारंपारीक हुकुमशाही व साम्यवादी हुकुमशाहीतला फरकही मोठा मार्मिकतेने दाखवलेला आहे.
In the second place, if a feature of classical dictatorships is their lack of historical roots (frequently they appear to be no more than historical freaks, the fortuitous consequence of fortuitous social processes or of human and mob tendencies), the same cannot be said so facilely about our system. For even though our dictatorship has long since alienated itself completely from the social movements that give birth to it, the authenticity of these movements (and I am thinking of the proletarian and socialist movements of the nineteenth century) gives it undeniable historicity. These origins provided a solid foundation of sorts on which it could build until it became the utterly new social and political reality it is today, which has become so inextricably a part of the structure of the modern world. A feature of those historical origins was the "correct" understanding of social conflicts in the period from which those original movements emerged. The fact that at the very core of this "correct" understanding there was a genetic disposition toward the monstrous alienation characteristic of its subsequence development is not essential here. And in any case, this element also grew organically from the climate of that time and therefore can be said to have its origin there as well.

One legacy of that original "correct" understanding is a third peculiarity that makes our systems different from other modern dictatorships: it commands an incomparably more precise, logically structured, generally comprehensible and, in essence, extremely flexible ideology that, in its elaborateness and completeness, is almost a secularized religion. It of fears a ready answer to any question whatsoever; it can scarcely be accepted only in part, and accepting it has profound implications for human life. In an era when metaphysical and existential certainties are in a state of crisis, when people are being uprooted and alienated and are losing their sense of what this world means, this ideology inevitably has a certain hypnotic charm. To wandering humankind it offers an immediately available home: all one has to do is accept it, and suddenly everything becomes clear once more, life takes on new meaning, and all mysteries, unanswered questions, anxiety, and loneliness vanish. Of course, one pays dearly for this low-rent home: the price is abdication of one’ s own reason, conscience, and responsibility, for an essential aspect of this ideology is the consignment of reason and conscience to a higher authority. The principle involved here is that the center of power is identical with the center of truth.

याच निबंधात एक जबरदस्त उदाहरण येते जे लोगो वर लावलेल्या चित्रासंदर्भात फारच समर्पक आहे. व्हॅक्लाव्ह कम्युनिस्ट दडपशाही असलेल्या देशात ग्रीनग्रॉसर आपल्या स्टोअर समोर एक स्लोगन लावतो. त्या स्लोगन लावण्याचे त्या साध्या प्रतिकात्मक कृतीचे खोलवर उलगडलेले अर्थ संबंध व्हॅक्लाव्ह फार मार्मिकतेने उलगडुन दाखवतात. इथेही आपण एक स्लोगन सारखेच चित्र चिकटवलेले आहे म्हणुन हा संदर्भ मला फार महत्वाचा वाटला.

The manager of a fruit-and-vegetable shop places in his window, among the onions and carrots, the slogan: "Workers of the world, unite!" Why does he do it? What is he trying to communicate to the world? Is he genuinely enthusiastic about the idea of unity among the workers of the world? Is his enthusiasm so great that he feels an irrepressible impulse to acquaint the public with his ideals?
Obviously the greengrocer is indifferent to the semantic content of the slogan on exhibit; he does not put the slogan in his window from any personal desire to acquaint the public with the ideal it expresses. This, of course, does not mean that his action has no motive or significance at all, or that the slogan communicates nothing to anyone. The slogan is really a sign, and as such it contains a subliminal but very definite message. Verbally, it might be expressed this way: "I, the greengrocer XY, live here and I know what I must do. I behave in ihe manner expected of me. I can be depended upon and am beyond reproach. I am obedient and therefore I have the right to be left in peace." This message, of course, has an addressee: it is directed above, to the greengrocer's superior, and at the same time it is a shield that protects the greengrocer from potential informers. The slogan's. real meaning, therefore, is rooted firmly in the greengrocer's existence. It reflects his vital interests. But what are those vital interests?

Let us take note: if the greengrocer had been instructed to display the slogan "I am afraid and therefore unquestioningly obedient;' he would not be nearly as indifferent to its semantics, even though the statement would reflect the truth. The greengrocer would be embarrassed and ashamed to put such an unequivocal statement of his own degradation in the shop window, and quite naturally so, for he is a human being and thus has a sense of his own dignity. To overcome this complication, his expression of loyalty must take the form of a sign which, at least on its textual surface, indicates a level of disinterested conviction. It must allow the greengrocer to say, "What's wrong with the workers of the world uniting?" Thus the sign helps the greengrocer to conceal from himself the low foundations of his obedience, at the same time concealing the low foundations of power. It hides them behind the facade of something high. And that something is ideology.

Ideology is a specious way of relating to the world. It offers human beings the illusion of an identity, of dignity, and of morality while making it easier for them to part with them. As the repository of something supra personal and objective, it enables people to deceive their conscience and conceal their true position and their inglorious modus vivendi, both from the world and from themselves. It is a very pragmatic but, at the same time, an apparently dignified way of legitimizing what is above, below, and on either side. It is directed toward people and toward God. It is a veil behind which human beings can hide their own fallen existence, their trivialization, and their adaptation to the status quo. It is an excuse that everyone can use, from the greengrocer, who conceals his fear of losing his job behind an alleged interest in the unification of the workers of the world, to the highest functionary, whose interest in staying iu power can be cloaked in phrases about service to the working class. The primary excusatory function of ideology, therefore, is to provide people, both as victims and pillars of the post-totalitarian system, with the illusion that the system is in harmony with the human order and the order of the universe.

या व्यतिरिक्त ज्यांना इंग्रजी लिखाण आवडत नसेल त्यांना तुम्ही श्री प्रभाकर पाध्ये यांचे "मानव आणि मार्क्स " या पुस्तकाची अवश्य शिफारस करा. या पुस्तकात मार्क्सवादाचा सर्वात प्रगल्भ अत्यंत सुक्ष्म असा विरोध प्रतिवाद पाध्ये यांनी केलेला आहे.
स्वतः श्री शरत पाटील सारखे दिग्गज ही हे मान्य करतात. मार्क्सची विचारसरणी कम्युनिझम ची विचारसरणी योग्यच होती मात्र तिच्या केवळ अंमलबजावणीत चुका झाल्याने मुळ चांगल्या विचारसरणीचे नुकसान झाले इ. हा जो कम्युनिस्टांचा आवडता दावा होता.
यालाच लक्ष्य करत श्री प्रभाकर पाध्ये या महान टीकाग्रंथात मार्क्स ची मुळ विचारसरणीच कशी कुठे चुक होती हे थेट मुळ जर्मन संदर्भाचा हवाला देत अत्यंत उत्कृष्ठ अशा तार्कीकतेने पुराव्याने कम्युनिझम च्या अक्षरशः अंतरंगातील विसंगतीवर चुकावंर मर्यादांवर दोषावंर बोट ठेवतात. त्यातला फोलपणा दांभिकता उलगडुन दाखवतात.
तर मराठी वाचकांना आपण मानव आणि मार्क्स हा एकच ग्रंथ डाव्या चळवळी विरोधासाठी अवश्य सुचवावा.

वरील २ व्हॅक्लाव्ह हॅवेल चा निबंध आणि प्रभाकर पाध्येंची टीका पुस्तक हे आपणास नक्कीच उपयुक्त ठरतील याची खात्री आहे.

धर्मराजमुटके's picture

29 May 2017 - 5:06 pm | धर्मराजमुटके

अभिजित इज बॅक - नवीन ट्वीटर हँडल @singerabhijeet या पत्त्यावर.

सचिन७३८'s picture

29 May 2017 - 7:45 pm | सचिन७३८

भारत सीमावर्ती क्षेत्रात सीमाविस्तारासाठी असो वा आहे तो भाग टिकविण्यासाठी करत असलेली कृती असो, त्याचे स्वागतच आहे. आपल्या देशाच्या सीमा मजबूत व सुरक्षित नाही करायच्या तर काय परकीयांच्या करायच्या? राहीला प्रश्न डाव्यांचा. ‘डावे’ या शब्दाला उलटे वाचा आणि काय ते समजून जा.