अनफन & अनफेर

अद्द्या's picture
अद्द्या in जनातलं, मनातलं
23 May 2017 - 2:15 am

काही काही दिवस असे अति चांगले जात असतात . म्हणजे त्या दिवशी कोणाशी वाद होत नाहीत, पेट्रोल पंप वर हि गर्दी नसते, ३-४ तास गारपिटीसकट पाऊस पडून हि BSNL ची लाईन अगदी व्यवस्थित चालू असते . मागवलेला पिझा ३० मिनिटे उशिरा येतो . आणि त्यामुळे फुकट मिळतो . कॅंटीन वाल्याने अगदी जीव ओवाळून टाकावा असा चहा केलेला असतो, आणि सोबत कांदा भाजी पण दिलेली असते नाश्त्याला . पण तरीहि ऑफिस मध्ये काही तरी चुकल्या सारखं होत होतं. मागचा सोमवार असाच गेला . नेहमी काही ना काही गोंधळ असलेलं ऑफिस . काहीच घडलं नाही सकाळ पासून . जास्ती काम हि नव्हतं , त्यामुळे मी हि गप आपल्या सिस्टम वर सिनेमा बघत बसलो होतो . ना कोणाला त्रास . ना कुठल्या डिपार्टमेंट ला जाऊन तिथे धडपड . असं काहीही केलं नाही . गप सिनेमा बघत बसलो होतो . आणि तेवढ्यात मॅनेजर आपल्या केबिन मधून ओरडला .

" Aditya.. this bloody intercom of yours is not working. throw it away.. "

लोक मॅनेजर लेव्हल ला गेले कि त्यांचं डोकं कामातून गेलेलं असतं . त्यामुळे आम्ही जास्ती लक्ष नाही देत याच्या आरड्याओरड्या कडे . आणि बहुतेकदा छोटीशी काही तरी गोष्ट असते . आत्ताही तेच झालेलं . याने काही तरी ओढाताण करताना फोन ची केबल ओढली गेली होती. आणि त्यामुळे इंटरकॉम बंद पडला होता . ती केबल जोडली . आणि मी काही न बोलता फक्त त्याच्याकडे बघितलं . हळूच म्हणाला " Keep it to yourself "

वर सांगितलं तसं अगदीच गुडी गुडी जात होता दिवस.. काही तरी घडलं पाहिजे होतं. त्यामुळे मग आपल्या खुर्ची वर जाऊन पाहिलं काम केलं ते आऊटलूक उघडलं .. To all मध्ये एक मेल टाकला . If you are facing any problems with the intercom.. or any electrical device for that matter. Don't act like a moron and call IT support for everything.. check if the cable is connected first .. love.. your manager..

अक्षरशहा १५ सेकंदात रिप्लाय आला . . " you blood asshole.. I told you to keep it to yourself "

खरं तर माझ्या मेल ला रिप्लाय देऊन त्याने ठेवलेल्या कुऱ्हाडीवर दुसऱ्या मजलावरून उडी मारली . पण ठीक आहे. जसं मी वर म्हणालो . लोक मॅनेजर झाले कि डोकं कामातून गेलेलं असतं . .दुपार ४-५ वाजे पर्यंत मग नुसत्या दंग्यात गेला . मॅनेजर असला तरी चेष्टेला चेष्टेत घेण्याची अक्कल आहे , मुख्य म्हणजे तो स्वतःच असले किडे कायम करत असल्यामुळे आम्हीही त्रास देत असतो अधे मध्ये . टिपिकल ऑफिस मधलं मरतुकडं वातावरण नाहीये . तर असो . मुद्दा हा . कि सगळं चांगलं जात असून सुद्धा सगळं अगदी चुकल्या सारखं होतं .

फोन वाजला . व्हाट्सएप वर फोटो आला होता एक . नाव वाचून हसलोच . म्हणजे , रिलेशन तोडून जरी वर्ष - दीड वर्ष झालं होतं . तरी फॅमिली फ्रेंड असल्यामुळे इकडे तिकडे भेट व्हायचीच . त्यामुळे बोलणं हि व्हायचं अधेमधे . एकमेकांची सगळी खबर असायची , नेहमीसारखा दंगा असायचा . फक्त विषय थोडाफार फ्लर्टींग , असलेल्या आणि नसलेल्या नात्याकडे वळायला लागला कि तो विषय बदलला जायचा आपोआप. कित्येकदा आपण ऐकतो कि समजूतदारपणा असेल दोघांमध्ये तर नातं आयुष्यभर टिकतं , च्यायला इथे झालं होतं उलटं . नको तेवढा समजूतदारपणा असल्यामुळे भांडून चिडून ओरडून वगैरे नव्हतं तुटलं नातं . हॉटेल मध्ये बसून बडबड करता करता मला मिळत असलेली इन्क्रिमेंट आणि तिला मिळत असलेली नवीन नोकरी . आणि त्यावर मग पुढे काय यावर बोलणं निघालं . काही मतं अशी होती कि दोघांनीही त्यात मागे जाणं शक्यच नव्हतं . आणि हे दोघांनाही माहिती होतं . म्हणजे. गेल्या १०-१२ वर्षाच्या ओळखीत . आणि २-३ वर्षाच्या नात्यात तेवढं ओळखत होतोच दोघे . सो मग . सॅम्पल सगळं . यालाही वर्ष होऊन गेलं होतंच म्हणा .

एक तर व्हाट्सएप वर आलेले फोटो / व्हिडियो एक तर मी कधी डाउनलोड करत नाही . कोणी मुद्दाम ते बघायला सांगितल्याशिवाय . तो फोटो आल्यावर बरोबर मी त्या खाली हसायचे इमोजी टाकून दिले आणि परत आपला वारणम आयरं बघत बसलो . परत मेसेज : " नालायक माणसा , इमेज बघ तरी.. प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीवर हसून काही होत नाही रे . " म्हणलं बरं .. बघितलं तर होती ती पत्रिका .
आता यात काही मला आश्चर्य वाटण्यासारखं काही नव्हतं . कारण मुलगा बघत होते तिला हे सगळ्यांना माहित होतं . पत्रिकांमध्ये पण ट्रेंड असतात कपड्यांसारखे . मध्ये ते जुने लखोटे येत होते सगळीकडे . त्या आधी ३-४ पानांच्या पत्रिका . आता येते ती फक्त एक पानाची . त्यावर हि फक्त नवरा नवरीचं नाव . लग्नाची जागा वेळ लिहिलेली असते . आणि एखाद्या ओळीचा मेसेज पुढे . कि लग्नाला नक्की या आम्ही वाट बघतोय वगैरे . आणि या सगळ्याच्या मागे बॅकग्राउंड ला बहुतेकदा याच दोघांचा साखरपुड्याच्या फोटो असतो. किंवा मग अधे मध्ये फोटो शूट करून घेतलं असेल तर त्यातली एखादी पोज . इथेही तेच होतं . फक्त पूर्ण फोटो नव्हता . इथे फक्त मुलीचा हात दिसत होता मनगटापासून . आणि मुलाचा हात तिला अंगठी घालताना . मुलाच्या बाजूला हेच उलट केलेलं असेल . आयडिया चांगलीच होती .

पण होतं काय . आम्हा मुलांची स्मरणशक्ती विचित्र असते , म्हणजे . आईने दुकानातून आणायला सांगितलेल्या १४ पैकी फक्त ११ गोष्टी येतील . किंवा मग पेट्रोल भरायला म्हणून बाहेर पडलेला माणूस गाड्यावरून वडापाव पार्सल करून घेऊन येईल . बायको / गर्लफ्रेंड चे वाढदिवस वैगेरे विसरणं तर अतीच साधी गोष्ट . आता तुम्ही म्हणाल मग मेंदूत काय भरलेलं असतं . तर तिथे इतर महत्वाच्या गोष्टी असतात . जसं कि ऑफिस च्या पार्किंग लॉट मध्ये जर तिसऱ्या ओळीत पाचव्या जागेला गाडी लावली . तर कमीत कमी वेळ ती उन्हात थांबते . किंवा मग , एखाद्या गेम च्या पन्नास एक चीट कोड्स जे कुठल्याही भाषेत नाहीत . कैच्याकाय अक्षरं जोडलेली आहेत फक्त ज्यातून कोणतेही शब्द तयार होत नाहीत . किंवा मग . असंच काही तरी पांचट . आमची आणि तुमची " महत्वाची माहिती " ची व्याख्या वेगळी आहे . आताही तेच झालं . तो फोटो बघितल्या बघितल्या मलाही काही लक्षात नसताना माझा मेसेज गेलेला होता .

" त्या बोटाच्या शेवटच्या पेरा वरचा तीळ झाकला जाईल ना अंगठी घातल्यावर ?? "

मेसेज गेल्यावर मीच माझ्या डोक्यावर हात मारून घेतला , आणि पुढे काही टाईप करणार तेवढ्यात कॉल चा आला . उचलल्या उचलल्या बोलायलाच लागली . हि एक सवय .. लक्षात राहिलेली,
" वाटलंच होतं , असलाच काही तरी रिप्लाय देणार तू . आता तरी विसर साल्या . लग्न होतंय माझं . आणि हो . अंगठी जर नेहमी सारखी घातली तर झाकला जातो तो तीळ . त्यामुळे मी मग ती थोडी पुढे सरकवून घालते . आमच्या नवरोबाना अजून याचं कारण लक्षात आलेलं नाही .. ते जाऊदे . तू नाव तरी वाचल्यास का ? "

मी : आं? नाव? थांब बघतो .

पुढे साधारण तीन एक मिनिटे हिडिंबे सारखं हसणं.. हि अजून एक सवय . उगाच कमी आवाजात तोंडावर हात दाबून हसणं कधीच जमलं नाही बाईसाहेबांना . हे अगदी तोंड फाडून दिलखुलास हसणार . इतकं कि समोरचा ते हसू बघून हसायचं . जोक कसाही असो .

ती : गौरव . गौरव नाव आहे त्याचं . तुझाच ज्युनियर आहे . आणि हो . तारीख तू विसरू शकणार नाहीस . २२ लाच आहे . फक्त ऑकटोबर च्या जागी मे मध्ये ठेवलंय . अजून ५ महिने वाट बघणे अशक्य .

मी : वोक्के . भेटूच मग नक्की .
.
.

२२ तारीख तर गेली . सोमवार होता त्यामुळे ऑफिस पेक्षा बेस्ट कारण काय असणार ना कुठे हि जाणं चुकवायला ! शिव्या पडल्या संध्याकाळी मेसेज वर . But who cares. ब्लॉक केलं आणि संपला विषय .
.
एवढ्यात घरी जायचा अजिबात मूड नव्हता . सकाळची वेळ असली तर कोकणात तरी जाता आलं असतं . पण नाही . शेवटी मग कुठे तरी वाचलेलं आठवलं . डोकं फिरलेलं असेल कि पोट भरून खावं . पोट हि शांत होतं .आणि डोकं हि . भूक तर खच्चून लागली होती . आणि इथली नेहमीची बिर्याणी वैगेरे खाण्यात हि काही अर्थ नव्हता . त्यानिमित्ताने कोल्हापूर ट्रिप मात्र झाली . घरच्यांच्या फोन वर मेसेज टाकला . " जेवायला येत नाहीये . ऑफिस मध्ये काम आहे " बरेच महिने डोक्यात होतं . कोल्हापूर ला परत जावं . भवानी मंडपातून जी गल्ली खाली गेले तिथे "गावरान" नावाचं एक जबरा हॉटेल आहे . फक्त संध्याकाळी उघडं असतं . . ७ -१० . मेनू वैगेरे काही नाही . प्रश्न फक्त चिकन कि मटण एवढाच असतो . जे सांगाल थाळी समोर येते . २ मोठ्याल्या भाकऱ्या . सुकं आणि ओलं मटण . आणि तांबडा पांढरा रस्सा . हे सगळं जास्तीत जास्त १५० रुपये. आपल्याला काय , चांगलं खायला पाहिजे . . बाकी सगळ्या गोष्टी येत जात असतात . चांगलं जेवण मात्र महत्वाचं .

कथा

प्रतिक्रिया

स्पा's picture

23 May 2017 - 7:39 am | स्पा

K

सतिश गावडे's picture

23 May 2017 - 10:28 am | सतिश गावडे

L

अभ्या..'s picture

23 May 2017 - 12:06 pm | अभ्या..

OM

सूड's picture

23 May 2017 - 12:14 pm | सूड

P

किसन शिंदे's picture

23 May 2017 - 12:56 pm | किसन शिंदे

D

दशानन's picture

23 May 2017 - 8:09 am | दशानन

छान लिहले आहेस...

पैसा's picture

23 May 2017 - 9:40 am | पैसा

हं.

सतिश गावडे's picture

23 May 2017 - 10:27 am | सतिश गावडे

" त्या बोटाच्या शेवटच्या पेरा वरचा तीळ झाकला जाईल ना अंगठी घातल्यावर ?? "

हे काही झेपलं नाही. जरा इस्कटून सांगता का?

यशोधरा's picture

23 May 2017 - 10:35 am | यशोधरा

तुमच्याकडे ऑफिशिअल ईमेल कम्युनिकेशन मध्ये मोरॉन वगैरे शब्द वापरतात?

अद्द्या's picture

23 May 2017 - 10:38 am | अद्द्या

हो .. कोणालाच काही वाटत नाही त्याच

यशोधरा's picture

23 May 2017 - 11:33 am | यशोधरा

कठीण आहे :)

उपेक्षित's picture

23 May 2017 - 10:45 am | उपेक्षित

अफाट लिहिले आहे मस्त आवडले

अनुप देशमुख's picture

23 May 2017 - 11:42 am | अनुप देशमुख

ओघवती शैली आहे. छान वाटलं वाचून! येउद्या अजून..

खेडूत's picture

23 May 2017 - 12:03 pm | खेडूत

aमजा आली वाचायला. छोट्या कंपनीत काहीही म्हणजे काहीही चालू असतं.. मजेदार दिवस!

टवाळ कार्टा's picture

23 May 2017 - 12:03 pm | टवाळ कार्टा

आयला करंट अकाउंट सांभाळ की ;)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

23 May 2017 - 7:08 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

तुला त्याची करंट अफेयर मोजायला बशिवलाय काय रे? =))

ह्म्म!! काही विषेष कळलं नाही.

परत वाचल्यावर मलाही काही कळत नाहीये .. मरो .. तेवढीच आपली थोडी जागा खाल्ली मिपाच्या सर्वर वर =))

संजय पाटिल's picture

23 May 2017 - 12:53 pm | संजय पाटिल

छान!

सूड's picture

23 May 2017 - 2:33 pm | सूड

ओक्के...

अक्षरशहा

अक्षरशः येवढंच फक्त सापडलं मला परत वाचून, म्हटलं सारखं काय ग्रामर नाझी बनायचं. पण ओसीडी काही शांत बसू देईना. =))

जीमेल मार खातो अश्या शब्दात =]]

नावातकायआहे's picture

24 May 2017 - 6:51 am | नावातकायआहे

"अक्षरश" आणि " : "करा कि राव!
:-)

चिनार's picture

23 May 2017 - 12:28 pm | चिनार

छान लिहिलंय !!
मायला आमच्याही केसमध्ये "त्या" भयकान्याचं नाव गौरवचं होतं. अन तो पण मला बरोब्बर एक वर्ष जुनियर होता माझ्याच कॉलेजमध्ये.
कलेक्टिव्ह सुपारी द्यायची का अद्याभाऊ?

अद्द्या's picture

23 May 2017 - 12:55 pm | अद्द्या

आज बढो .. हमारी सुपारी साथ है

एस's picture

23 May 2017 - 12:54 pm | एस

जो हुआ वो अच्छा हुआ
जो हो रहा है वो अच्छा हो रहा है
जो होगा वो भी अच्छा होगा

तस्मादपरिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि! (थोडक्यात, उगी उगी! ;-) )

सिरुसेरि's picture

23 May 2017 - 2:34 pm | सिरुसेरि

ऐ दिल है मुश्कील असा प्रकार दिसतो आहे .

सस्नेह's picture

23 May 2017 - 2:40 pm | सस्नेह

बघ आता कोल्हापूरचीच !

इरसाल कार्टं's picture

23 May 2017 - 2:56 pm | इरसाल कार्टं

छान

धर्मराजमुटके's picture

23 May 2017 - 3:00 pm | धर्मराजमुटके

जाऊ द्या हो ! बाबा आमीर खानुल्लांचे वचन आठवा. बस, ट्रेन और लडकी के पीछे भागना नही ! एक गई तो तो दुसरी आती है !

मी-सौरभ's picture

23 May 2017 - 4:36 pm | मी-सौरभ

ह्या अद्द्याच कसं आहे की कुठलीही पोरगी येते ती सोडूनच जाते (त्याच्या लेखनात बरं का).

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

23 May 2017 - 7:13 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

अगदी अगदी. ही किमान चौथी गोष्टं अद्द्याची. =))

@अद्द्या, लेका कसं व्हायचं रे अश्यानं. एक तरी पटवं. =))

(शिंगल) कॅजॅस्पॅ

अद्द्या's picture

23 May 2017 - 10:23 pm | अद्द्या

(शिंगल) कॅजॅस्पॅ

बरं =]]

बाकी सगळ्या गोष्टी येत जात असतात . चांगलं जेवण मात्र महत्वाचं .

हे एक नंबर पटलं हो अद्द्याभौ..
लेख सुरेखच आहे..

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

23 May 2017 - 7:11 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

अनफेर हा शब्दं काळजाला भिडला. =))

बाकी बोटावरचे तीळ वगैरे. व्वा. निरिक्षणशक्ती अफाट आहे रे तुझी. =))

बाकी तुमच्या हापिसात मोरॉन, अ‍ॅसहोल वगैरे शब्दं फॉर्मल मेलीत चालतात हे वाचुन ड्वॉळे पाणावले. नोकरी आहे का पहा ना एखादी. ;)

सतिश गावडे's picture

23 May 2017 - 8:53 pm | सतिश गावडे

ही सत्यकथा आहे?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

23 May 2017 - 8:59 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

होपफुली नसावी.

सतिश गावडे's picture

23 May 2017 - 9:03 pm | सतिश गावडे

धिस इज नोट फन एंड फेर.

अद्द्या's picture

23 May 2017 - 10:23 pm | अद्द्या

थांकु थांकु =))

अरे दंगा मस्तीच्या मेल मध्ये असे शब्द अति नॉर्मल आहेत .. कमीत कमी बेळगाव ब्रांच ला तरी . आहे नोकरी.. पण तुला इथला पगार परवडायचा नाही

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 May 2017 - 9:20 pm | डॉ सुहास म्हात्रे

चांगलं लिहिलंय ! शैली ओघवती आहे. लिहित रहा.

माझी मलाच फालतू वाटत होती हि कथा . पण असो ..
भंगार कथेला हि चांगलं म्हणाल्या बद्दल सगळ्यांचे धन्यवाद :)

अमेरिकन त्रिशंकू's picture

23 May 2017 - 11:41 pm | अमेरिकन त्रिशंकू

याचा भाग २ दिसतोय

http://www.misalpav.com/node/30562

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

24 May 2017 - 6:39 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

अद्द्या. २२ ऑक्टोबरचं आणि तुझं कै वाकडं आहे का बे? =))
भेंडी.

प्राची अश्विनी's picture

24 May 2017 - 12:39 pm | प्राची अश्विनी

आवडली कथा.

चांदणे संदीप's picture

24 May 2017 - 3:49 pm | चांदणे संदीप

कथा वाचली आणि जेवायला बसलो.

Sandy

हेमंत८२'s picture

24 May 2017 - 4:08 pm | हेमंत८२

मेल मधील भाषा वाचून आश्च्यर्य वाटले इथे तोंडावर पण आले तरी बोलू शकत नाही..

धडपड्या's picture

24 May 2017 - 4:42 pm | धडपड्या

त्या फन फेअरचा पुढचा पार्ट आहे का ओ?