लग्नाचा उद्देश काय!!!! सेक्सची सोय? साहचर्य? की आणखी काय??????

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture
टर्बोचार्जड फिलॉसॉफर in काथ्याकूट
16 May 2017 - 2:14 pm
गाभा: 

लग्न ही संस्था कशी अस्तित्वात आली यावर समाजशास्त्रज्ञांनचं एकमत आहे.पुर्वापार पुरुष हे अपत्याला पोसत असल्याने होणारे अपत्य आपलेच असले पाहीजे हा रोख होता ,त्यातून स्त्रीला स्वतःशी बांधुन ठेवले तर तिच्यापासून होणारे अपत्य आपलेच असेल याची बर्यापैकी खात्री असते.यातूनच विवाहसंस्था अस्तित्वात आली.भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास या वि का राजवाडे यांच्या पुस्तकानुसार पुर्वी मुक्त लैंगिक संबंध चालायचे.पुढे ते कमी होत एकपत्नीव्रताला ग्लॅमर आले.मुक्त लैंगिक संबंधात कामभावनेचा निचरा योग्य प्रमाणात होतो हे मी माझ्या आधीच्या एका धाग्यात मांडले होते,अनेकजण त्याच्याशी सहमतही होते.
तर ही मुक्त व्यवस्था बंद पडल्याने पुरुषांची पंचाईत झाली .मग ते बिचारे लग्न या एकाच गोष्टीकडे " लैंगिक भावनेचा निचरा म्हणून पाहू लागले.भारतातलं लैंगिकतेला अनैसर्गीक समजण्याचं हिंदूंचं धोरण विवाहसंस्थेला बळकट करु लागले .यात मग स्त्री चे वस्तुकरण होणे अपरिहार्य होते.
आजकाल विवाहाचा उद्देश काय हे जेव्हा माझ्या मित्रांना मी विचारतो तेव्हा सेक्सची सोय असे उत्तर मिळते.कुणी फार पुढे जाऊन दोन जिवांचे मिलन,सृजनशिलता,साहचर्य(companionship) अशी मखलाशी करत असतात.प्रत्यक्षात बायकोशिवाय इतरही स्त्रीयांकडे वखवखलेल्या नजरेने हे कल्पितानंदही बघत असतात.
प्रत्यक्षात लग्न हा माझ्यामते पुरुषाच्या अनावर कामेच्छेला मोकळी वाट करुन देण्याचा एक करार आहे ,बाकी काही नाही.
दो बदन एक जान,अर्धांगिनी,बेटर हाफ,सृजन वगैरे कविकल्पना म्हणून ठीक असतील पण प्रत्यकषात निसर्गाचे नियम फार वेगळे असतात.हा माझा दृष्टीकोण असेल कदाचित पण त्याला वास्तवाची किनार निश्चित आहे.
तर,मिपाकरांना याविषयी काय वाटते ते जाणून घ्यायला आवडेल.
१ .लग्न ही व्यवस्था "सेक्सची सोय म्हणून आहे असे आपल्याला वाटते का? नसल्यास का नाही?
२.एकपत्नीव्रत ह्याला आपला समाज आदर्श मानत असेल तर बहुतांश विवाहीत पुरुष इतर स्त्रीयांकडे कोणत्या उद्देशाने पाहतात्?

३.सिधि बात नो बकवास" याचं भारतीयांना वावडं का आहे?
चर्चेदरम्यान येणारे मुद्दे धाग्यात समाविष्ट केले जातील ,धन्यवाद.

प्रतिक्रिया

संजय क्षीरसागर's picture

22 May 2017 - 12:27 am | संजय क्षीरसागर

आर्थिक मुद्दा तुम्ही मांडला त्याहीपेक्षा गंभीर आहे !

जर एक स्त्री पाच माणसांबरोबर रत झाली असेल. तर प्रत्येक मूल जन्माला आल्यावर ६५ हजार रुपये खर्च होतील.

प्रगोंच्या मुक्त लैंगिक व्यवस्थेत एक स्त्री कितीही पुरुषांबरोबर रत होऊ शकते. दिवसाला एक या (किमान) हिशेबानं, गर्भधारणा होईपर्यंत ती जर शंभर पुरुषांशी रत झाली असेल तर एका मुलामागे डीएनए टेस्टला १३ लाख रुपये लागतील :) ! पहिली गोष्ट हे पैसे भरणार कोण ? दुसरी गोष्ट त्या पुरुषांचा ट्रेस ठेवणार कोण ? पुढे ते सर्व जण टेस्टला तयार व्हायला हवेत आणि सरते शेवटी ती टेस्ट मान्य करुन, प्रगोंचं (माहिती नाही), पण इतर ९९ पुरुषांची जवाबदारी तो एकटा नरपुंगव स्वीकारेल काय ? आणि त्याही पुढे जाऊन, सदर नरपुंगवाची संप्रेरकं (डोपामाईन का काय ते), त्या स्त्रीला पाहून सिक्रीट झालं नाही तरीही तो त्या अपत्याचं संपूर्ण संगोपन करेल काय ?

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

21 May 2017 - 12:09 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

संक्षी,खालील प्रश्नाची उत्तरे द्या.
१.पुरुष हे नैसर्गीक polygamous आहेत यावर विज्ञानाने शिक्कामोर्तब केलेले आहे ,तरीही प्रेम या खुळचट संज्ञेला तुम्ही का रेटत आहात?
२.एकाचवेळी अनेक स्त्रीयांशी संभोग करण्याची पुरुषांची फॅन्टसी असते हे आपल्याला माहीत नाही काय?
३.मध्यमवयीन जोडप्यातले बहुतांश स्त्री पुरुष तरुण ,आकर्षक जोडीदाराची स्वप्न बघत असतात हे वास्तव वेगवेगळ्या सेक्स सर्व्हेमधुन पुढे आलेले असताना monogamyची स्तोम माजवत काय साध्य करायचे आहे?
४.अपत्याची जबाबदारी पुरुषाची असते कारण तोच प्रोव्हाईड करु शकतो,जगभरात बापाचे नाव लावण्याची प्रथा कुठुन आली हे आपल्याला ठाऊक नाही काय????

१.पुरुष हे नैसर्गीक polygamous आहेत यावर विज्ञानाने शिक्कामोर्तब केलेले आहे ,तरीही प्रेम या खुळचट संज्ञेला तुम्ही का रेटत आहात?

२.एकाचवेळी अनेक स्त्रीयांशी संभोग करण्याची पुरुषांची फॅन्टसी असते हे आपल्याला माहीत नाही काय?

ही पुरुषांनी पसरवलेली अफवा आहे. स्त्रीयांना सुद्धा अनेक पुरुषांबरोबर रत व्हायला तितकीच मजा येते याची तुम्हाला कल्पना दिसत नाही ! इन फॅक्ट स्त्रीयांचा क्लायमॅक्स-पॉइंट यायला पुरुषापेक्षा बराच दीर्घकाल लागतो त्यामुळे बहुतांश स्त्रीया आयुष्यात कधी ऑरगॅजम उपभोगूच शकत नाहीत. खरं तर याच कारणानं पुरुषांनी स्त्रीयांना कायम रिसिवींग रोल मधे ठेवलं आहे. जर एका वेळी स्त्री अनेकांशी रत झाली तर तिच्या ऑरगॅजमची शक्यता हमखास निर्माण होते. आणि याच लफड्यामुळे पुरुष स्त्रीयांना कायम वचकून असतात (ही उघड गोष्ट आहे. लग्न केल्यास विदा मागायची गरज उरणार नाही :)

३)३.मध्यमवयीन जोडप्यातले बहुतांश स्त्री पुरुष तरुण ,आकर्षक जोडीदाराची स्वप्न बघत असतात हे वास्तव वेगवेगळ्या सेक्स सर्व्हेमधुन पुढे आलेले असताना monogamyची स्तोम माजवत काय साध्य करायचे आहे?

माझा तुम्हाला एकदम सुरुवातीला दिलेला प्रतिसाद पुन्हा वाचा ! अतृप्त कामेच्छा हे दुसरा जोडीदार हवा असं वाटण्याचं मूळ कारण आहे. ज्या जोडप्यात अनुबंध आणि जिव्हाळा आहे त्यांचा प्रत्येक संभोग अधिकाधिक सरस होत जातो कारण ते आपला आनंद एकमेकांशी शेअर करतात. याचा अर्थ फँटसी नसतेच असा नाही पण मी या आधीच्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे :

१) अपराध शून्य चित्तदशा (नो गिल्ट फिलींग), २) कमालीचा निवांतपणा आणि ३) एकमेकातला अनुबंध ! यात दोघातली कंपॅटिबिलीटी इतकी कमालीची वाढते की दुसरी संधी आली तरी तो माहौल जमून येण्याची शक्यता नसते. तस्मात, वैविध्याचं आकर्षण केवळ फँटसी म्हणून असू शकतं पण पुरेशी मॅच्युरिटी असली की ज्या तीन गोष्टी विवाहित जोडप्यात जमून येतात त्याची खुमारी हिट-अँड-रनमधे कधीही मिळू शकणार नाही हे सहज लक्षात येतं.

४) ४.अपत्याची जबाबदारी पुरुषाची असते कारण तोच प्रोव्हाईड करु शकतो,जगभरात बापाचे नाव लावण्याची प्रथा कुठुन आली हे आपल्याला ठाऊक नाही काय????

कदाचित तुम्हाल फक्त धागे काढण्यातच इंटरेस्ट आहे. प्रतिसाद काय आलेत ? ते आपण नीट वाचलेत का ? त्यावर आपण स्वतःचं मत तयार करु शकतो का ? या गोष्टींमधे काहीही रस दिसत नाही ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. मी तुमच्या या विधानातून निर्माण होणारे प्रश्न वर प्रगोला ऑलरेडी दाखवून दिले आहेत.

आता तरी वाचा :

अ) जन्मदातीनं मुलावर हक्क सांगितला आणि तीनं बापाकडे बघून तिची संप्रेरकं सिक्रीट होत नाहीत म्हटलं तर बाप काय करणार ?

ब) शिवाय अपत्याच्या सुयोग्य संगोपनासाठी दोघांची आवश्यकता असते, जर बापाला मुलाच्या आईकडे बघून डोपामाईन निघत नाहीत असं लक्षात आलं तर तो मुलावरचा हक्क सोडणार की मुलाच्या आईला सोडणार ?

क) कायद्यानं मुलाच्या पाचव्या वर्षापर्यंत जन्मदाती हीच योग्य पालक आहे असा नियम आहे. पाच वर्षानंतर अपत्यानं बापाकडे जायला नकार दिला तर बाप काय करणार ?

ड) तुमच्या मुक्त संभोग व्यवस्थेत एक बाप हा दहा मुलांच्या जन्माचा नरपुंगव आहे असं निष्पन्न झालं आणि ती सर्व मुलं तथाकथित स्त्रीयांनी त्या थोर बापाच्या दारात आणून ठेवली तर ओशोंच्या ज्या `स्वातंत्र्याच्या सर्वोच्चतेचा' तुम्ही पाठपुरावा करतायंत ते महत्त्वाचं ठरवणार की मुलांचं संगोपन ?

प्रगो बहुदा या प्रश्नांची उत्तरं देऊ शकणार नाहीत. तुम्ही किमान प्रश्न जरी नीट वाचलेत तरी तुमच्या धागा काढण्याचं तुम्हालाच सार्थक झाल्यासारखं वाटेल.

सुबोध खरे's picture

21 May 2017 - 1:01 pm | सुबोध खरे

टफि साहेब
सिंह एकाच वेळेस अनेक सिंहिणि बरोबर संबंध ठेवतो परंतु आपल्या छाव्या वर प्रेम करतो.तेंव्हा बहुपत्नीत्व आणि प्रेम या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आई मुलावर करते बाप मुलावर करतो तेही प्रेमच असते खुळचट हा गैरसमज आहे. बाकी नंतर.

सुबोध खरे's picture

21 May 2017 - 1:01 pm | सुबोध खरे

टफि साहेब
सिंह एकाच वेळेस अनेक सिंहिणि बरोबर संबंध ठेवतो परंतु आपल्या छाव्या वर प्रेम करतो.तेंव्हा बहुपत्नीत्व आणि प्रेम या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आई मुलावर करते बाप मुलावर करतो तेही प्रेमच असते खुळचट हा गैरसमज आहे. बाकी नंतर.

सुबोध खरे's picture

21 May 2017 - 1:01 pm | सुबोध खरे

टफि साहेब
सिंह एकाच वेळेस अनेक सिंहिणि बरोबर संबंध ठेवतो परंतु आपल्या छाव्या वर प्रेम करतो.तेंव्हा बहुपत्नीत्व आणि प्रेम या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आई मुलावर करते बाप मुलावर करतो तेही प्रेमच असते खुळचट हा गैरसमज आहे. बाकी नंतर.

अभ्या..'s picture

21 May 2017 - 1:08 pm | अभ्या..

बहुप्रतिसादत्व आवडले ;)

दशानन's picture

21 May 2017 - 1:18 pm | दशानन

ह्या क्लोन प्रतिसादाचे दायित्व कोणाचे म्हणतो मी!

=))

सुबोध खरे's picture

21 May 2017 - 1:35 pm | सुबोध खरे

भ्रमण ध्वनीची कृपा )))---

गामा पैलवान's picture

21 May 2017 - 2:27 pm | गामा पैलवान

.... आणि झाले तीन हा प्रकार इथेही बघण्यात येईलसं वाटलं नव्हतं! ;-)

-गा.पै.

गामा पैलवान's picture

21 May 2017 - 2:40 pm | गामा पैलवान

मार्कस ऑरेलियस,

मी भारत सौदी अमेरिका अशा अनेक ठिकाणी काळ घालवल्याने प्रत्येक ठिकाणी लोकांच्या संकल्पना धारणा भिन्न भिन्न असु शकतात , असतातच हे मला कळुन चुकले आहे .

नेमक्या याच कारणासाठी आपण तथ्यांवर आधारित चर्चा करूया असं म्हणालो होतो. तथ्यांसंबंधी एकवाक्यता असते. धारणा जरी विभिन्न असल्या तरी वस्तुस्थिती एकंच असते.

उदाहरणादाखल एक तथ्य असं की LGBT समूहात नशेबाजी प्रचंड बोकाळते. LGBT संबंधी अनेकांच्या अनेक धारणा असतील. काही अनुकूल असतील तर काही प्रतिकूल. पण तिथे माजलेली नशेबाजी हे (निदान युरोप आणि अमेरिकेत तरी) चिरंतन तथ्य आहे. ते कधीच विवादास्पद नाही.

अशा तथ्यांच्या आधारे चर्चा करायची असेल तर मी चर्चेस तयार आहे.

आ.न.,
-गा.पै.

स्पा's picture

22 May 2017 - 11:54 am | स्पा

काय ठरले म शेवटी?

सतिश गावडे's picture

22 May 2017 - 1:08 pm | सतिश गावडे

ईट सिम्स यू आर इंटरेस्टेड इन कन्क्ल्युजन.

स्पा's picture

22 May 2017 - 1:31 pm | स्पा

Lol

गामा पैलवान's picture

22 May 2017 - 6:00 pm | गामा पैलवान

What a witty response!

अफलातून प्रतिसाद आहे.

-गा.पै.

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 May 2017 - 8:53 pm | डॉ सुहास म्हात्रे

=))

असं सग्ळ गुपित उघडं करायचं नस्तं, शी बा ! ;)

१) लग्न हा नॉर्मल स्त्री-पुरुषांसाठी सहजीवनाचा उत्तम पर्याय आहे. प्रगोंचे १० का काय ते पर्याय नॉर्मल स्त्री-पुरुषांसाठी नाहीत. नॉर्मल म्हणजे ज्यांना रोज शक्यतो घरचं जेवण लागतं, अपत्यप्राप्तीची इच्छा आहे आणि एकमेकांबरोबर, दोघांचं मिळून एकच सहजीवन जगण्याची इच्छा आणि तयारी आहे.

२) प्रगो प्रणित मुक्त लैंगिक व्यवस्थेत अपत्याची जवाबदारी कुणाची आणि त्याचं संगोपन कसं होणार यावर ते स्वतः कोणतही उत्तर देऊ शकत नाहीत. त्यामुळे वर उल्लेख केलेल्या १० पर्यायातला लिव-इन पर्याय सुद्धा बाद ठरतो.

३) टफिचां नवे विचार मांडण्याचा प्रयत्न सदर विचार जुनाट आणि काल्पनिक असल्यानं फसला आहे.

अजुन सगळे प्रतिसाद वाचले नाहीत.

परवाच आमच्या बिल्डींगचा कचरा घेऊन जाणारी स्त्री सांगत होती 'मला चार मुलीच आहेत. नवरा मारहाण करतो. आता तो दुसरी कोणी बाई घेऊन आला आहे आणि मला घराबाहेर काढलय. सध्या बहिणीकडे राहते.....' तिला काय ते अनुबंध कृतज्ञता कंपेटेबिलीटी वगैरे प्रवचन ऐकवायला हवं होतं....

असो....

सध्याची लग्नव्यवस्था ही उच्च वर्गातले पुरुष आणि निम्न वर्गातल्या स्त्रिया यांच्यावर अतिप्रचंड अन्याय करणारी आहे.

आणि हो भारतीय कायद्यात लग्नांतर्गत बलात्कार हा गुन्हा नाही याबद्दल सगळे चिडीचुप का असतात? तुमच्या बायकांना एकपती राहण्याची, शरीरसुख देण्याची किंमत मिळत असेल हो; करत असतील त्या वसूल 2bhk अन् काय न् काय... पणम्हणुन निम्नवर्गातल्या स्त्रीनेदेखील ते च नियम का पाळायचे? की आपल्यावर एकच पुरुष लिगली सोशली बलात्कार करतोय याचंच समाधान मानायचं....

गामा पैलवान's picture

25 May 2017 - 11:50 am | गामा पैलवान

अॅमी,

पणम्हणुन निम्नवर्गातल्या स्त्रीनेदेखील ते च नियम का पाळायचे? की आपल्यावर एकच पुरुष लिगली सोशली बलात्कार करतोय याचंच समाधान मानायचं....

त्याचं काये की, संसार एकमेकांच्या सहमतीने करायचा असतो. बिछान्यात पटलं नाही म्हणून संसार मोडायचा आहे का, असा प्रश्न आहे. उत्तर होकारार्थी असल्यास संसार जमवूच नये.

आ.न.,
-गा.पै.

धर्मराजमुटके's picture

25 May 2017 - 5:47 pm | धर्मराजमुटके

लग्नाचा उद्देश काय!!!!
सेक्सची सोय ? होय !
साहचर्य ? होय !
आणखी काय?????? होय ! जमल्यास अधून मधून भांडायचे असेल तर थर्ड पार्टी शोधायचे कष्ट वाचतात. :)

एमी's picture

27 May 2017 - 9:05 pm | एमी

मागील पानावरील पैटर्नीटीबद्दलची चर्चा लॉल आहे अगदी =)).

स्त्रीचा फर्टाइल काळ तो किती... त्यात ती शंभरजणांशी रत होण्याची शक्यता किती... काय त्या फँटस्या... (की फोबिया ?)

In general, a woman’s fertile window is the day of ovulation (usually 12 to 16 days before the menstrual period begins) and the five days preceding it. For the average woman that occurs somewhere between days 10 and 17. But the problem is that few women are average.

समजा अ‍ॅवरेज काळ १५ दिवस धरु, यात कालात स्त्री ३० पुरुषांशी रत झाली आहे. आता अपत्याच्या पितृत्वाचा प्रश्न आहे. त्या सर्व पुरुषांचा हिशेब कोण ठेवणार ? शिवाय ऐनवेळी ते सर्व पुरुष डिएनएला तयार होणार का ? जर प्रत्येक टेस्टचा खर्च १३,००० असेल तर तो कोण करणार ? शिवाय प्रगोंचा सगळा भरवसा डोपामाईन स्त्रवण्यावर आहे. टेस्ट पश्चात पुरुषाला सदर स्त्रीकडे पाहून डोपामाईन सिक्रिट झालं नाही तर तो त्या अपत्याची जवाबदारी घेईल का ? पुन्हा स्त्रीला डोपामाईन स्त्रवलं नाही तर ती त्या पुरुषाबरोबर राहील का ?

थोडक्यात, मुक्त लैंगिक व्यवस्थेत अपत्याच्या संगोपनाची जवाबदारी कोण घेणार ?

संजय क्षीरसागर's picture

28 May 2017 - 12:16 am | संजय क्षीरसागर

फर्टिलिटीचा पॉइंट मान्य आहे पण तुमचा मूळ मुद्दा हुकला आहे

सतिश गावडे's picture

28 May 2017 - 12:42 am | सतिश गावडे

समजा अ‍ॅवरेज काळ १५ दिवस धरु, यात कालात स्त्री ३० पुरुषांशी रत झाली आहे.

हायपोथेटीकल केस म्हणूनही वाचवत नाही हो असलं काही.

संजय क्षीरसागर's picture

28 May 2017 - 1:30 am | संजय क्षीरसागर

जिथे कल्पनाच इतकी भेदी आहे तिथे वास्तव काय असेल ? तस्मात, एक पुरुष निदान एका स्त्रीच्या अपत्याची जवाबदारी घेतो ही सद्य स्थिती सोयीची आणि लॉजिकल नाही का ? शिवाय डिएनए टेस्ट आणि डोपामाईनच्या भानगडी नाहीत !

जिथे कल्पनाच इतकी भेदी आहे तिथे वास्तव काय असेल ?

आपलं म्हणणं रेटण्यासाठी तुम्ही कल्पनेचा कडेलोट केला आहे. कल्पनेच्या नावाखाली आपण काय लिहीतोआहोत याचं भान तुम्हाला राहीलेलं नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 May 2017 - 2:41 pm | डॉ सुहास म्हात्रे

हायपोथेटीकल केस म्हणूनही वाचवत नाही हो असलं काही.

"आऊटलायर्स" ही संज्ञा अशी टोकाची परिस्थिती/व्यक्ती यांचा निर्देश करण्यासाठी निर्माण केली गेली आहे ! काहींना त्या टोकाच्या स्थळावर (आऊटलायर) रहायला इतके आवडते की ते त्या संज्ञेतल्या "आऊट" लाच "गेट आऊट" करून टाकतात. ;) =))

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 May 2017 - 9:23 pm | डॉ सुहास म्हात्रे

कृपया, वरच्या प्रतिसादात "परिस्थिती/व्यक्ती" यात "परिस्थिती/व्यक्ती/कल्पनेची भरारी" असा बदल करून करून वाचावे !

एमी's picture

28 May 2017 - 4:16 am | एमी

नीट वाचा

In general, a woman’s fertile window is the day of ovulation and the five days preceding it. For the average woman that occurs somewhere between days 10 and 17. >> याचा अर्थ स्त्रीचा फर्टाइल काळ ६-७ दिवस असतो.

दुसरी गोष्ट म्हणजे पुर्ण आयुष्याचा विचार केला तर सध्या एक स्त्री ३०-३५ फर्टाइल वर्षात २/३ मुलं जन्माला घालते. कंसीव करायला अगदी १-२ वर्ष पकडली तरी ५ वर्ष एकपती राहीलं तर पुरेसं आहे. अपत्य संगोपनाचे पैसे आधीच वसूल करून मगच मुलं जन्माला घालावीत. बाकीचा काळ तिने तिला हवं तेव्हा, तिला हव्या त्याच पुरुषाशी रत व्हावे. 'आपण की नै आपापल्यात एकेक स्त्री वाटून घेऊ आणि तिच्यावरच बलात्कार करू आणि मुलगा/गी हवी करत पाहिजे तितकी पोरं काढून घेऊ' असल्या सिस्टीमचा भाग बनू नये.

===
समजा अॅवरेज काळ १५ दिवस धरु, यात कालात स्त्री ३० पुरुषांशी रत झाली आहे. >> असे होइल असे खरंच तुम्हाला वाटते का? एवढ्या सहजपणे स्त्रिया कोणासोबतही सेक्स करतील? त्यांचा काहीच चॉइस/ क्रायटेरीआ असणार नाही?

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

28 May 2017 - 3:19 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

एवढ्या सहजपणे स्त्रिया कोणासोबतही सेक्स करतील?>>>हायपोथेटील आहे ते ॲमी.एमबीएच्या अभ्यासक्रमात एखाद्या कंपणीतील सर्वांनी एकदम नोकरी सोडली तर काय होईल? असले हायपोथेटीकल अभ्यास असतात.प्रत्यक्षात असे घडते का?

मला देखील एक हायपोथेटिकल प्रश्न पडलाय.

जर एका बिलिअनरने तुम्हाला अशी ऑफर दिली कि माझी दोन मुलं जन्माला घालायची आणि वाढवायची. त्याबदल्यात एक मिलियन ट्रस्ट फंड मध्ये ठेवले जातील. तुम्ही त्यातूनच तुमचा आणि मुलांचा खर्च भागवायच. उरलेलं पैसे मुलांना वारसा म्हणून मिळतील. तर ती ऑफर तुम्ही अकॅसेपत कराल का?

त्याने अशी ऑफेर १००० स्त्रियांना दिली आहे. तुमच्याकडून सेक्स आणि मोनोगमी अपेक्षित नाही.

पुरुषांनी याचे उत्तर आपण स्त्री असतो तर काय केल असते असा विचार करून द्यावे....

संजय क्षीरसागर's picture

28 May 2017 - 6:25 pm | संजय क्षीरसागर

मुक्त लैंगिक व्यवस्थेत अपत्याची जवाबदारी कोण स्वीकारणार हा खरा प्रश्न आहे.

अपत्य संगोपनाचे पैसे आधीच वसूल करून मगच मुलं जन्माला घालावीत

पुरुष म्हणाला मला अपत्याची गरज नाही तर स्त्री कुणाकडून पैसे वसूल करणार ? आणि पुन्हा नक्की कोण पुरुष अपत्य जन्माला जवाबदार आहे हे कसं ठरवणार ? तुमच्या सिस्टममधे संगोपनाचा खर्च ५ ते ७ लाख आहे तर कुठला पुरुष संग करण्यासाठी ही रक्कम मोजेल ?

'आपण की नै आपापल्यात एकेक स्त्री वाटून घेऊ आणि तिच्यावरच बलात्कार करू आणि मुलगा/गी हवी करत पाहिजे तितकी पोरं काढून घेऊ' असल्या सिस्टीमचा भाग बनू नये.

लग्न म्हणजे बलात्कारच हा शोध कुठून लावला ? का लग्नाचा तो एकच हेतू आहे असं तुम्हाला वाटतं ? लग्न म्हणजे दोघात मिळून एक आयुष्य जगणं आहे आणि सेक्स हा त्या सहजीवनाचा आनंद शेअर करण्याचा एक भाग आहे. प्रपंच हा बराच व्यापक विषय आहे.

संजय क्षीरसागर's picture

28 May 2017 - 10:06 pm | संजय क्षीरसागर

अपत्य संगोपन म्हणजे त्याला ग्रॅज्युएट करायचं तर २१ वर्ष लागतात आणि वर्षाला ५०,००० रुपये इतका खर्च धरला तरी १०.५० लाख होतील ! :) कोणता तरुण ही रक्कम आधी सुपुर्द करायला तयार होईल? आणि त्यात इतकी रक्कम त्याच्याकडे असेल का हा प्रश्नचे. असल्या भन्नाट कल्पनांनी सगळा प्रकारच स्टँड स्टीलला येईल !

मुक्त लैंगिक व्यवस्थेत अपत्याची जवाबदारी कोण स्वीकारणार हा खरा प्रश्न आहे. >> अपत्याची जबाबदारी कोण घेणार हे ठरवून मगच अपत्य जन्माला घालावीत. अपघाती , नकोशी मुलं जन्माला घालू नयेत.

===
पुरुष म्हणाला मला अपत्याची गरज नाही तर स्त्री कुणाकडून पैसे वसूल करणार ? >> मग स्त्री ने मुल जन्माला घालू नये. किंवा स्वतः जबाबदारी घ्यावी.

आणि पुन्हा नक्की कोण पुरुष अपत्य जन्माला जवाबदार आहे हे कसं ठरवणार ? >> लिहलंय की वर. परत काय तेचते?

===
तर कुठला पुरुष संग करण्यासाठी ही रक्कम मोजेल ? >> संग करण्यासाठी ५/१० लाख? प्रत्येक संगातून पोरं पैदा होतात का?

===
लग्न म्हणजे बलात्कारच हा शोध कुठून लावला ? >> भारतीय कायदा '१५+ वर्षावरील बायकोसोबत नवर्याने केलेला संग हा बलात्कार नसतैच' असे का समजतो?

===
का लग्नाचा तो एकच हेतू आहे असं तुम्हाला वाटतं ? >> कायद्याचं बोला!

===
लग्न म्हणजे दोघात मिळून एक आयुष्य जगणं आहे आणि सेक्स हा त्या सहजीवनाचा आनंद शेअर करण्याचा एक भाग आहे. प्रपंच हा बराच व्यापक विषय आहे. >> मी पहिल्या प्रतिसादात जे उदाहरण दिले आहे तिला असल्या प्रवचनाचा काहीही फायदा होणार नाही.

===
असो. बायबाय. तुमचं चालूद्या.

१) अपत्याची जबाबदारी कोण घेणार हे ठरवून मगच अपत्य जन्माला घालावीत.

अर्थात ! पण तुम्ही तर म्हणतायं आधी संगोपनाचा फुल खर्च पुरुषाकडून वसूल करावा. त्यात तुम्हाला विवाह मान्य नाही. त्यामुळे हे फारच इंप्रॅक्टीकल आणि हास्यास्पद आहे.

२) प्रत्येक संगातून पोरं पैदा होतात का?

हे बरोबरे पण नुसताच संग करायचा असेल तर मग सहजीवनाची तरी गरज काय ?

३) भारतीय कायदा '१५+ वर्षावरील बायकोसोबत नवर्याने केलेला संग हा बलात्कार नसतैच' असे का समजतो? कायद्याचं बोला!

फारच उत्तम प्रश्न ! याला दोन कारणं आहेत :

अ) कायद्याचं ड्राफ्टींग सुजाण आणि विधायक विचारसरणी असणारे करतात. विवाह हा दोन मॅच्युअर्ड व्यक्तीतला एकत्र राहाण्याचा करार आहे ही किमान समज ठेवून कायदा ड्राफ्ट केला गेला आहे. तुम्ही जो विचार करता (आपण की नै आपापल्यात एकेक स्त्री वाटून घेऊ आणि तिच्यावरच बलात्कार करू आणि मुलगा/गी हवी करत पाहिजे तितकी पोरं काढून घेऊ' ) तितका विक्षिप्त विचार कायद्यात अंतर्भूत नाही.

ब) जर उपरोल्लेखित विक्षिप्त विचार करणारे लोक असतील तर थोडा जरी मतभेद झाला तर रोज सकाळी उठून बलात्काराची तक्रार करायला अशा व्यक्ती पोलीस स्टेशन गाठतील आणि अशा निर्बुद्ध केसेस इतक्या बेसुमार होतील की सगळी समाज आणि न्याय व्यवस्थाच कोलमडेल. तस्मात, अशा व्यक्तींनी विवाहापासून दूर राहावं यासाठी ती तरतूद असावी.

४) मी पहिल्या प्रतिसादात जे उदाहरण दिले आहे तिला असल्या प्रवचनाचा काहीही फायदा होणार नाही

बरोबर आहे. आयुष्यात किती आनंद मिळणार आणि ते किती सुखाचं होणार हे व्यक्तिगत दृष्टीकोन आणि बुद्धिमत्ता यावर अवलंबून आहे. मला सुद्धा चार मुलं असती तर कदाचित अशीच ओढाताण झाली असती ! म्हणजे धाकट्याचा अजून अभ्यास घ्यायला लागतोयं, मोठी मुलगी लिव-इनमधे राहायचं म्हणतेयं, धाकटीला उच्चशिक्षणासाठी घर जामीन ठेवून कर्ज घ्यायचंय, थोरले सुपुत्र आणि सुन पाळणाघराची उत्तम सोय म्हणून बरोबर राहातात, पत्नीशी गप्पा मारायला मोकळा वेळ ती हॉस्पिटलमधे अ‍ॅडमिट झाल्यावर मिळतो, आणि या सगळ्या उपद्व्यापात जीवाला थोडा विरंगुळा म्हणून मी दुसरीकडे सूत जमवलंय ..... वगैरे.

थोडक्यात, संसार किती वाढवायचा हे समजलं नाही की परिणाम भोगावे लागणारच.

५) बाय द वे, वर तुम्ही म्हटलंय सध्याची लग्नव्यवस्था ही उच्च वर्गातले पुरुष आणि निम्न वर्गातल्या स्त्रिया यांच्यावर अतिप्रचंड अन्याय करणारी आहे.

मला एका गोष्टीचं कायम नवल वाटतं , पब्लिकला स्वतःपेक्षा दुसरा काय करतो याचीच पडलेली असते :) ! तुम्ही वरील दोन पैकी नक्की कोणत्या गटात येता ? आणि विवाहाचा तुम्हाला नेमका काय त्रास वाटतो ?

एमी's picture

29 May 2017 - 7:52 pm | एमी

तुमचं चालू द्या....

===
वाचकांना हवे असेल तर त्यांनी maneka gandhi यांचे marital rape बद्दलचे निवेदन आणि त्यावरुन झालेली काँट्रोवर्सी गुगलून पहावी.

हा कायदा १७३४ साली कोणा ब्रिटिशाने त्यांच्या साठीच ड्राफ्ट केलेला. तोच इकडे आणला १८५० मधे...

नंतर मारलेला कंप्लीट यू टर्न तुम्ही वाचलेलाच दिसत नाही !

"It is considered that the concept of marital rape, as understood internationally, cannot be suitably applied in the Indian context due to various factors like level of education/illiteracy, poverty, myriad social customs and values, religious beliefs, mindset of the society to treat the marriage as a sacrament etc."

विवाह हा भारतीय संस्कृतीनं मानवाच्या समग्र जीवनाचा विचार करुन जगापुढे ठेवलेला विधायक पर्याय आहे. ( इंटरेस्ट असेल तर याविषयी माझे सुरुवातीचे प्रतिसाद वाचावे). मनेका बाईंना विवाह संकल्पने मागच्या या समग्र परिमाणाची कल्पनाच दिसत नाही आणि ज्यावेळी त्यांनी वैवाहिक बलात्काराची भंपक कल्पना मांडली त्या वेळी ही नव्हती. अर्थात, नंतर त्यांना किमान स्वतःच्या विधानातली व्यर्थता आणि अवास्तविकता कळली आणि त्यांनी ते मागे घेतलं, त्यासाठी मग भले त्या काहीही कारणं देवोत. तुम्हाला बहुदा त्यांच्या ओरिजिनल विधानाच्या प्रभावातून अजून सुद्धा बाहेर पडता येत नाही असं तुमच्या प्रतिसादांवरुन दिसतंय.

काय वाचता आणि काय लिहता... धन्य आहात _/\_

ज्याला युटर्न म्हणताय ती दुसर्याची मतं त्यांनी फक्त वाचून दाखवलेली, त्या वरुनच काँट्रोवर्सी झाली आणि मग त्या परत आधीच्याच मताकडे गेल्यात.

Answering a question in Rajya Sabha on March 10, Women and Child Development Minister Maneka Gandhi said, “It is considered that the concept of marital rape, as understood internationally, cannot be suitably applied in the Indian context due to various factors like level of education/illiteracy, poverty, myriad social customs and values, religious beliefs, mindset of the society to treat the marriage as a sacrament etc.” The same statement had been read out in Rajya Sabha in April 2015 by Minister of State for Home Haribhai Parathibhai Chaudhary.

=)) कसले कॉमेडी आहात ओ तुम्ही!

याच स्टेटमेंटवरुन तर काँट्रोवर्सी झाली होती. त्यानंतर परत मनेका परत बैक टू ओरीजनल स्टँड गेल्यात.

सोपं करुन सांगते; बघा समजतय काः
१. marital rape हा कायद्या ने गुन्हा असावा असे मनेकांनी एका मुलाखतीत सांगितले होते.
२. त्या नंतर काही काळाने राज्यसभेत एका प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी दुसर्यानेच ड्राफ्ट केलेले उत्तर फक्त वाचून दाखवले.
३. त्यावरुन त्यांच्यावर बरीच टीका झाली.
४. मग त्या परत marital rape हा गुन्हा असावा या स्टँडवर गेल्यात.

Months after her statement that "concept of marital rape cannot be applied in the Indian context" created some controversy, Union minister Maneka Gandhi on Tuesday said even if there was a law against it, women are unlikely to complain about this kind of abuse.

The Minister for Women and Child Development said women could instead file complaint of marital rape under the existing Domestic Violence law.

तुम्हाला इंग्रजी कळत नसेल तर मराठीतून सांगतो. मनेका बाईंना त्यांच्या विधानातला भंपकपणा कळल्यामुळे त्यांनी तसा कोणताही कायदा भारतीय जीवनशैलीत आणता येणार नाही असा स्टँड घेतला आणि तदनंतर स्त्रीयांनी सदर प्रकारची तक्रार असेल तर ती डोमेस्टीक वायलंस म्हणून दाखल करावी असं म्हटलं.

त्यांनी स्वतःचा स्टँड केव्हाच बदललायं, तुम्ही मात्र चुकीच्या स्टँडवर अजूनही अडकून आहात.

संजय क्षीरसागर's picture

30 May 2017 - 4:22 pm | संजय क्षीरसागर

हा त्यांना पडलेला पश्चात प्रकाश !

We have a law already on violence against women and that includes marital rape. The point is that there has never been a complaint under it, never...We can use domestic violence (law) and then build on it but at the moment there is not even one complaint," she told an All Women Journalists' Warkshop at Vigyan Bhawan.

आता तरी सदर प्रकाश तुम्हाला ही पडो ही कामना : )

आधीतर युटर्न म्हणत म्हणत ज्यावरुन काँट्रैवर्सी झाली तेच कॉपीपेस्ट करत होतात की. आत्ता वेगळे काही पेस्टताय. कधीच्या बातम्या आहेत या? तुम्ही दिलेली लिंक ओपन होत नाही पण ही http://www.governancenow.com/news/regular-story/maneka-gandhis-uturn-mar... लिंक वाचा. एप्रिल मधली आहे. मी याला युटर्न म्हणत होते.

We have a law already on violence against women and that includes marital rape. >> जर marital rape भारतात क्राइम आहे तरमग तुम्ही म्हणता ती जगबुडीची सिचुएशन का आली नाही ? '' थोडा जरी मतभेद झाला तर रोज सकाळी उठून बलात्काराची तक्रार करायला अशा व्यक्ती पोलीस स्टेशन गाठतील आणि अशा निर्बुद्ध केसेस इतक्या बेसुमार होतील की सगळी समाज आणि न्याय व्यवस्थाच कोलमडेल.''

बादवे marital rape हा भारतात क्राइम नाहीय. तो क्राइम करायचा की नाही यावरूनचतर गोंधळ चालू झालेला.

संजय क्षीरसागर's picture

31 May 2017 - 11:51 am | संजय क्षीरसागर

१) लिंक उघडते आहे. नसेल तर ही यूआरेल कॉपी करुन उघडा आणि वाचा

http://www.ndtv.com/india-news/can-have-law-on-marital-rape-but-women-wo...

तुमच्या बातमीनंतरची म्हणजे June 08, 2016 ची ही न्यूज आहे आणि बाईंना अशा कायद्याची गरज नाही हा प्रकाश पडला आहे.

२) जर marital rape भारतात क्राइम आहे तरमग तुम्ही म्हणता ती जगबुडीची सिचुएशन का आली नाही ?

बाईश्री, एकतर तुमच्या आदर्श मनेकाबाईंनीच मॅरिटल रेपची तक्रार डोमेस्टिक वायलंसखाली गुदरायला सांगितली आहे. तस्मात, तुमची मॅरिटल रेपच्या गुन्ह्याची व्यथा निकालात निघाली आहे (किमान इतपत लॉजिक तरी समजायला हरकत नाही).

या उप्पर आता तुम्ही मलाच विचारतायं की जगबुडी का झाली नाही ?

माझ्या मते दोन बिएचकेच्या बदल्यात आपल्यावर रोज बलात्कार होतोयं इतकी कॉमेडी कल्पना करणारी विवाहित स्त्री दुर्लभ असेल त्यामुळे डोमेस्टिक वायलंस खाली तक्रारी होत नसतील.

किती मतिमंद सारखे प्रतिसाद देतात लोकं....सगळ्या विकसित देशात marital rape कायद्याने गुन्हा झालेला आहे. मुस्लिम आणि आफ्रिकन देशात मात्र तो अजूनही गुन्हा नाही. आणि आपला महान भारत देश अशा 36 वाळवंटी वृत्तीच्या लोकां सोबत असावा असे मत असणारे दुसर्याला जागाच्या पाठीमागे म्हणतायत.... जमलं तर marital rape ची wiki वाचून काढा.

तुमच्या बातमीनंतरची म्हणजे June 08, 2016 ची ही न्यूज आहे आणि बाईंना अशा कायद्याची गरज नाही हा प्रकाश पडला आहे. >> ठीक. बाईचं तळ्यात मळ्यात चालू आहे वाटत.

या उप्पर आता तुम्ही मलाच विचारतायं की जगबुडी का झाली नाही ? >> हा हा तुमचीच मतं फोबियाग्रस्त आहेत म्हणून तुम्हाला विचारलं. काय तर म्हणे एक स्त्री १०० जणा सोबत सेक्स करेल. १५ दिवसात ३० जण. जरा काही बिनसल तर लगेच बलात्काराची तक्रार...चक्कु छूरी दगा फटका

माझ्या मते दोन बिएचकेच्या बदल्यात आपल्यावर रोज बलात्कार होतोयं इतकी कॉमेडी कल्पना करणारी विवाहित स्त्री दुर्लभ असेल >> तुमची मतं कळली काय लायकीची आहेत. अनुबंध कृतज्ञता वगैरेच्या आवरणाखाली केवळ आपल फोबियां आणि इन्सेक्युरिटी लपवताय.

असो तुम्हाला शेवटचा प्रतिसाद.

संजय क्षीरसागर's picture

2 Jun 2017 - 1:01 pm | संजय क्षीरसागर

.

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

28 May 2017 - 8:06 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

लग्न म्हणजे दोघात मिळून एक आयुष्य जगणं आह

या साठी लग्न करावे लागते???
लग्न न करता लिव्ह इन किंवा अगदी "बायका ठेऊन" सहजीवनाचा आनंद घेणारी इतिहासात व वर्तमानात कितीतरी उदाहरणं आहेत.फक्त सिलेक्टीव्ह थिंकींग करत आहात?

संजय क्षीरसागर's picture

28 May 2017 - 10:12 pm | संजय क्षीरसागर

टफि परवडेल का विचार करा ! बायका ठेवणं सोपं काम नाही. आणि दोघात मिळून एक आयुष्य जगायचं ही कमीटमेंट असेल तर लग्नाला काय अडचणे ? इतिहासाचं सोडा स्वतःच्या व्यक्तिगत आयुष्याचा विचार करा. लोकांना कमीटमेंटची धास्ती वाटते म्हणून तर लीव-इनकडे कल आहे.

बायका ठेवणं सोपं काम नाही

सहमत.
मी तर तीन तीन लग्न केली, दुर्दैव दुसरे काय... दर वेळी तीच होती ;)

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

29 May 2017 - 12:27 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

लोकांना कमीटमेंटची धास्ती वाटते म्हणून तर लीव-इनकडे कल आहे
>>>>
त्यात गैर काय आहे.मी चाळीशीत असताना माझ्या रंगरुपाकडं,पैश्याकडे आकर्षीत होऊन जर एखादी पंचवीशीची तरुणी मला तिच्याशी संग करु देत असेल तर चाळीशीत अंगाचं पोतं झालेली माझी बायको फक्त लग्नाचं कमीटमेंट म्हणून मी सांभाळत बसावी का?

सुबोध खरे's picture

29 May 2017 - 1:49 pm | सुबोध खरे

वैयक्तिक होत असेल पण दुसऱ्या अंगाने विचार करून पहा.
एखाद्या माणसाची पंचविशीतील बायको दुसऱ्या माणसाकडे त्याचा पैसे आणि प्रतिष्ठा पाहून आकर्षित झाली आणि त्याच्याशी संग करू लागली तर किती पुरुषांना हे झेपेल.
जनावरांसारखे वासनेच्या आहारी जाऊन "कुणाशीही कसेही रत" होणे हे आपल्याला मुक्ततेत अध्यारुथ आहे काय?
अधिकार ये जबसे साजनका हर धडकन पर माना मैने
मै जबसे उनके साथ बंधी, ये भेद तभी जाना मैने
कितना सुख है बंधनमे
या बंधनाची "खोली" (गहराई) आपल्याला कळेल का?

किंवा तुमचा निर्णय आधीच झाला आहे पण तुम्ही त्याबद्दल साशंक आहात म्हणून जनमत चाचपणीसाठी हा धागा काढलायं.

मी चाळीशीत असताना माझ्या रंगरुपाकडं,पैश्याकडे आकर्षीत होऊन जर एखादी पंचवीशीची तरुणी मला तिच्याशी संग करु देत असेल तर चाळीशीत अंगाचं पोतं झालेली माझी बायको फक्त लग्नाचं कमीटमेंट म्हणून मी सांभाळत बसावी का?

उलट विचारही करुन पाहा म्हणजे खाडकन जाग येईल.

आता तुम्हाला सायकॉलॉजिकल कारणमिमांसा देतो. ज्याला स्वतःच्या निर्णयाची खात्री नाही त्यानं लग्न न करणं उत्तम कारण तो काही रोज उठून बघायचा डोपामाईन टेस्टींगचा विषय नाही. त्यातून ज्यांना लग्न म्हणजे दोन बिएचकेच्या बदल्यात रोज ओढवून घेतलेला बलात्कार वाटतो त्यांच्यासाठी तर नक्कीच नाही. लग्न हा एकमेकांच्या सहवासाचा आणि परस्पराप्रती विश्वासाचा आनंद सोहळा आहे. वयपरत्वे रुपात फरक पडत जाणार इतकी सुद्धा मॅच्युरिटी नसेल त्यांना कमीटमेंट शक्य नाही. आणि ज्यांना स्त्री-पुरुष सहजीवन म्हणजे निव्वळ संभोगासाठी जवळीक इतकंच दिसतं ते कितीही संभोग केला तरी अतृप्तच राहाणार कारण संभोगाची खुमारी प्रितीत आहे. दोघात मिळून एक आयुष्य म्हणजे तीचं ते सर्व आपलं आणि आपलं ते सगळं तीचं ही खूणगाठ आहे. तीनं आपल्यासाठी आणि आपण तिच्यासाठी कायकाय केलं याप्रती एकमेकांना कृतज्ञता आहे. अपत्य जन्म आणि संगोपन हे दोघांचं बालपण परत येणं आणि दोघांनी मिळून ते एंजॉय करणं आहे. इतके पैसे आधी ठेव तरच मी मूल जन्माला घालीन असला भंपकपणा सुजाण विवाहितांच्या कल्पनेत सुद्धा येत नाही.

एनी वे, मी स्वतः एक यशस्वी आणि आनंदाचं वैवाहिक आयुष्य जगतो त्यावरनं सर्व मतं मांडली आहेत. लिव-इन म्हणजे दोघांनी रेनकोट घालून झेपेल तेवढी अंघोळ करणं आहे, त्यात कुणालाच सुख नाही. शेवटी निर्णय तुमचा आहे.

जयंत कुलकर्णी's picture

30 May 2017 - 5:24 pm | जयंत कुलकर्णी

आपण कोण आहात हे मला माहीत नाही....पण जिच्याबरोबर काही काळ तरी सुखाचा काढला आहे अशा स्त्री बद्दल ( तसे म्हटले तर कुठल्याच स्त्रीबद्दल अशी भावना बाळगणे हे चुकीचे आहे) एक रद्दी वस्तू म्हणून आपण पहात आहात हे वाचून मलाच शरम वाटते आहे.

संपादक महाशय जरा इकडे लक्ष द्याल का?

संजय क्षीरसागर's picture

30 May 2017 - 6:19 pm | संजय क्षीरसागर

त्यांचं अजून लग्न झालेलं दिसत नाही. लग्न करावं की नाही हा पेच सोडवण्यासाठी त्यांनी हा धागा काढला आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 May 2017 - 1:32 pm | डॉ सुहास म्हात्रे

धाग्याची वाटचाल खालील उद्येशाच्या दिशेने जावी असा काही जणांचा प्रामाणिक प्रयत्न चालू आहे...

"अचाट कल्पनाशक्तीचा वापर करून, अतीटोकाचे विचार पुढे मांडून, वाचकांचे मनोरंजन करणे."

लेखकाचा इतिहास पाहता, त्याच्याही मनात असेच काहीसे असावे असे वाटायला बराच वाव आहे ;) आणि हा उद्येश बर्‍याच अंशी सफल होत आहे हे दिसतेच आहे ! :)

और आंदो !

संजय क्षीरसागर's picture

29 May 2017 - 2:06 pm | संजय क्षीरसागर

उद्देश असं लिहावं.

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 May 2017 - 4:50 pm | डॉ सुहास म्हात्रे

वा, वा ! या वेळेला तुम्हाला आमचे "मत" पूर्णपणे पटले, त्यात काहीएक कुसळ सापडले नाही का ? वॉव, अत्यानंद का काय म्हणतात ना तो झाला आहे ! :D

मात्र, "अशी उपाय योजना कुणी करुन पाहिलीये का ?"; व तत्सम अंतीम -ईये असलेले शद्बप्रयोग कौतुकाने वारंवार करणार्‍याकडून असा "वैय्याकरणीय" प्रतिसाद ! काय हे ?! स्वभावाला औषध नाही, दुसरे काय ? ;)

असा फुकट सल्ला देण्यात काय फायदा नाही बघा. अध्यात्माबरोबर व्याकरणाचे क्लासेस घेणारे संस्थळ काढा आणि सल्ला देण्याचा दर दिवस / महिना / वर्ष / सल्ला चार्ज लावा. (टीप : हा सल्ला फुकट आहे.) =)) =)) =))

संजय क्षीरसागर's picture

30 May 2017 - 1:09 am | संजय क्षीरसागर

त्याला व्याकरण नाही म्हणत हो ! तो साधा मराठी शब्द आहे आणि तो उद्येश असा नसून उद्देश असा आहे. अध्यात्म वगैरे तर त्यात अजिबात नाही. किरकोळ गोष्टीसाठी ओढाताण नका करु जीवाची.

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 May 2017 - 3:03 pm | डॉ सुहास म्हात्रे

"पाहिलीये" तरी कुठे प्रमाण शब्द आहे ? स्वतः "पाहिले आहे" हे आणि तत्सम चुकांसंबंधी बरोबर असलेले शब्द शंभर वेळा लिहून काढा आणि परत तशी चूक करणार नाही असे कबूल करा. नाहीतर, "लोका सांगे ब्रम्हज्ञान... " अशी किर्ती झाली आहेच तिच्यात अजून वाढच होईल. :D

संबंध नसताना, नको तिथे, नको ते खुसपट काढण्याची सुरसुरी तुम्हाला आली यातच काय ते सगळे सिद्ध होत आहे. इथे तुम्हाला कोणी "कॉपी एडिटर" म्हणुन नेमले आहे का ? नाही. तेव्हा "अशी सुरसुरी स्वतःच्या खाजगी संस्थळावर भागवून घेणेच योग्य होईल" असा विनाशुल्क पण योग्य सल्ला आहे.

लोकांचे जबरदस्तीने मनोरंजन करण्याची तुमची खोड जाणे कठीणच्च आहे म्हणा ! =)) =)) =))

***************

अवांतर :

वैद्यकीय महाविद्यालयातले आमचे एक सर्जरीचे शिक्षक असे म्हणत असत, "कोणत्याही सर्जनमध्ये सर्जरी करण्याचे कौशल्य अत्यावश्यक आहेच, पण 'केव्हा सर्जरी करू नये' हे ज्याला नीट माहीत आहे व ते तो अमलात आणतो, केवळ तोच उत्तम सर्जन असतो."

अधिक शिक्षण आणि अनुभवानंतर तो सल्ला सर्व विषयांमध्ये उपयोगी असल्याचे कळून चुकले. म्हणून, आता आम्ही खालील तत्व कटाक्षाने ध्यानात ठेवतो आणि अमलातही आणतो...

एखाद्या विषयात प्राविण्य असणे हे त्या विषयातल्या तज्ञासाठी आवश्यक असतेच, पण, त्या विषयातही, आपले मत केव्हा देऊ नये हे ज्याला माहीत असते, तो उत्तम तज्ञ असतो. प्राविण्य असलेले नसलेले बाकी सगळे, "उथळ पाण्याला खळखळाट फार", या म्हणीची उदाहरणे असतात.

संजय क्षीरसागर's picture

30 May 2017 - 4:12 pm | संजय क्षीरसागर

चवथीच्या मराठी शिक्षकाला विचारलं तरी हरकत नाही. `उद्देश' असंच लिहीतात `उद्येश' असं कदापी लिहीत नाहीत.

इतकी छोटीशी सुधारणा मनातल्या मनात करुन घेतली तरी काम होईल.

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 May 2017 - 4:58 pm | डॉ सुहास म्हात्रे

संक्षी, तुमची इयत्ता सांगून अजून किती हसवणार तुम्ही आता ? पोट दुखायला लागलं =)) =)) =))

अजून एक म्हण आठवली, "स्वतःचे ठेवी झाकून, दुसर्‍याचं पाही वाकून !" :D

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 May 2017 - 5:06 pm | डॉ सुहास म्हात्रे

इतकी छोटीशी सुधारणा मनातल्या मनात करुन घेतली तरी काम होईल.

मन ? हे मन तर लै खट्याळ असतं आणि त्या मनाचा लब्बाड कंप्युटर बंद करून मगच त्याच्यातून उत्तरे बाहेर (कशी ? काय ? कोण जाणे :D ) काढायची असतात ना, तुमच्याच पूर्वीच्या एका उपदेशानुसार ???!!!

मग आता त्या लब्बाड मनातल्या मनात काही तरी करायचा सल्ला कसा काय देताय, आँ ?! =)) =)) =))

संजय क्षीरसागर's picture

30 May 2017 - 5:13 pm | संजय क्षीरसागर

उद्देश हा शब्द चवथीपर्यंत जायला हरकत नाही असा प्रतिसादाचा अर्थ होतो. एनी वे, मनातल्या मनात निदान हा प्रतिसाद तरी वाचता येतोयं का ? तसाच तो शब्द मनातल्या मनात म्हणा. इतक्या दीर्घ प्रतिसादांची आवश्यकता नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 May 2017 - 5:31 pm | डॉ सुहास म्हात्रे

ठीक आहे, थोडक्यात...

संतुइसांअकिहतुआ ? पोदुला =))

बस ? खूष ?

संजय क्षीरसागर's picture

30 May 2017 - 6:15 pm | संजय क्षीरसागर

तुमच्या कशातही विनोद वाटून हसण्यावर !

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 May 2017 - 8:37 pm | डॉ सुहास म्हात्रे

पोदुला =))

सतिश गावडे's picture

29 May 2017 - 2:31 pm | सतिश गावडे

अचाट कल्पनाशक्तीचा वापर करून, अतीटोकाचे विचार पुढे मांडून, वाचकांचे मनोरंजन करणे

अगदी अगदी.

संजय क्षीरसागर's picture

29 May 2017 - 2:59 pm | संजय क्षीरसागर

धाग्यावर मांडले गेलेले चांगले विचार वाचताच येत नाहीत असं दिसतं.

अरूण गंगाधर कोर्डे's picture

29 May 2017 - 7:57 pm | अरूण गंगाधर कोर्डे

एकटं जगणे कठीण आहे . म्हणून सहजीवनासाठी लग्न आवश्यक आहे. वय कोणतेही असो , एकटं जगणं कठीण जातं . एकड्या लोकांना विचारून पाहा.

गामा पैलवान's picture

29 May 2017 - 8:20 pm | गामा पैलवान

संजय क्षीरसागर,

लिव-इन म्हणजे दोघांनी रेनकोट घालून झेपेल तेवढी अंघोळ करणं आहे,

शंभर टक्के सहमत. रेनकोटाची कुठलीही आवृत्ती घ्या, सत्य काही बदलंत नाही! :हसून हसून गडबडा लोळण:

आ.न.,
-गा.पै.

सुबोध खरे's picture

30 May 2017 - 9:31 am | सुबोध खरे

है शाबास
२०० झाले कि

दशानन's picture

30 May 2017 - 10:24 am | दशानन

200 झाले ?
मग हा 201 =))

वेशीवरचा म्हसोबा's picture

30 May 2017 - 12:01 pm | वेशीवरचा म्हसोबा

या लेखावरील काही रिप्लाईज हे विवाहसंस्थेचे समर्थन कमी आणि I am living great married life अशी स्वतःची लाल करणारे अधिक वाटतात.

ज्यांना व्यक्त होण्याची हिंमत आहे ते व्यक्त होतात. ज्यांना आधीच वैवाहिक जीवनात पाचर बसली आहे ते गप राहातात. ज्यांच्याकडे काहीच सांगण्यासरखं नाही किंवा करण्याची हिंमत नाही त्यांना कुठेच काही विधायक दिसत नाही. असे लोक सर्कास्टिक कमेंटस करण्यापलिकडे विशेष काही करु शकत नाहीत.

वेशीवरचा म्हसोबा's picture

30 May 2017 - 9:15 pm | वेशीवरचा म्हसोबा

तुम्ही ज्याला हिंमत करुन व्यक्त होणं म्हणता त्याला आम्ही कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळणे म्हणतो :)

संजय क्षीरसागर's picture

30 May 2017 - 9:29 pm | संजय क्षीरसागर

आमचाकडे अशी म्हण आहे की जो उघडाच आहे तो सोडणार काय आणि गुंडाळणार काय ? फक्त फालतू कमेंटस करण्यापलिकडे त्याच्याकडे काही नाही.

गामा पैलवान's picture

2 Jun 2017 - 11:52 am | गामा पैलवान

अॅमी,

सगळ्या विकसित देशात marital rape कायद्याने गुन्हा झालेला आहे.

भारतीय लोकांच्यात नवराबायकोमधली भांडणं नवरा आणि बायकोनेच सोडवायची पद्धत आहे. ही पद्धत परिपूर्ण आहे असा दावा नाही. मात्र हिच्यामुळे भारतात दरडोई घटस्फोट अत्यल्प आहेत. तुम्ही म्हणता त्या विकसित देशांत जोडप्यांत स्वत:ची धुणी दाराआड धुण्याची प्रगल्भता नाही. सरकारी चव्हाठ्यावर धुतल्याने काही विशेष साफ होतात असंही नाही. नवरा सांभाळायची अक्कल नसेल तर लग्नंच करू नये, अशी भारतीय धारणा आहे. कशाला पाहिज मग वैवाहिक बलात्कार!

आ.न.,
-गा.पै.

संजय क्षीरसागर's picture

2 Jun 2017 - 1:00 pm | संजय क्षीरसागर

१) जमलं तर marital rape ची wiki वाचून काढा.

ज्यांची धारणा लग्न म्हणजे एकाच पुरुषाकडून होणारा रोजचा बलात्कार अशी आहे त्यांना सहजीवन कळण्याची शक्यता शून्य ! तस्मात, असले फालतू विचार वाचायचं तुम्ही सुद्धा थांबवाल तर प्रतिसादातून दिसणारा उद्वेग कमी होण्याची शक्यता जास्त .

२) ठीक. बाईचं तळ्यात मळ्यात चालू आहे वाटत.

इतक्या वेळानं का होईना तुम्हाला मुद्दा समजला हे काय कमीये !

३) तुमची मतं कळली काय लायकीची आहेत. अनुबंध कृतज्ञता वगैरेच्या आवरणाखाली केवळ आपल फोबियां आणि इन्सेक्युरिटी लपवताय.

नेमकी उलटी परिस्थिती आहे ! ज्यांना इन्सिक्योरिटी वाटते ते दुसर्‍यावर विश्वास टाकूच शकत नाहीत. साध्यासाध्या आनंदाच्या गोष्टीत, जिथे दोघांनी एकत्र एंजॉय करायचं, तिथे त्यांना दुसरा बळजबरी करतोयं असं वाटू शकतं. अशा लोकाच्या जीवनात लग्न अशक्य आहे कारण तो पारस्पारिक विश्वासाचा मामला आहे. इन फॅक्ट, ज्याला आपल्या निर्णयाची खात्री नाही अशी व्यक्ती कुणाबरोबरही कायम साशंक राहाणार आणि जोडीदाराच्या कधीही प्रेमात पडू शकणार नाही. कारण प्रेम विश्वासातून निर्माण होतं. प्रेम हा तुम्ही म्हणत असलेल्या `फोबियां आणि इन्सेक्युरिटी ' वर एकमेव उपाय आहे.

४) असो तुम्हाला शेवटचा प्रतिसाद.

हा मात्र तुमच्यादृष्टीनं योग्य निर्णय असू शकतो. माझ्याशी वाद घालणारे चुकीच्या धारणातून मुक्त होतात कारण वादात त्यांचे मुद्दे बाद होतात !

माझ्याशी वाद घालणारे चुकीच्या धारणातून मुक्त होतात कारण वादात त्यांचे मुद्दे बाद होतात !

व्हय द्येवा म्हाराजा, शिरी शिरी शिरी स्वामीम्हाराजा ! तुम्च द्येवुळ कुटंसं हाय म्हनाव ?

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

हायला काय काय म्हुन डिल्युजन आसतात येकेकाची *yahoo* लईच कटिन हाय कि रे खर्र्या द्येवा म्हाराजा *fool* *dash1*

संजय क्षीरसागर's picture

2 Jun 2017 - 1:54 pm | संजय क्षीरसागर

.

:)

चिनार's picture

2 Jun 2017 - 3:39 pm | चिनार

गब्रिएल भाऊ ..
जवळपासच्या एखाद्या कृष्ण मंदिरात डोकं टेकवून या...हे साहेब आसपासचं असतील
कारण असंच काहीसं वाक्य भगवंतानं गीतेमध्ये सांगितलं आहे

पैसा's picture

2 Jun 2017 - 1:28 pm | पैसा

तुमचं पुरेसं मणोरंजन झालं असेल तर आता दुसरा एखादा विषय घ्या च्युइंगमसारखा चघळायला.

मुक्त विहारि's picture

5 Jun 2017 - 9:44 pm | मुक्त विहारि

मग काय ठरलं शेवटी?

तू आहेस का?

सतिश गावडे's picture

6 Jun 2017 - 10:57 am | सतिश गावडे

फक्त विकडेला मी रात्री सव्वा दहाला घरी पोचतो. आलात की फोनवा.

संजय क्षीरसागर's picture

6 Jun 2017 - 11:19 am | संजय क्षीरसागर

बंद पडली वाटतं ! :)

मुक्त विहारि's picture

6 Jun 2017 - 12:01 pm | मुक्त विहारि

तसे नाही.....

एखाद्या गोष्टीचा उपयोग तुम्ही कसे करता त्यावर त्या गोष्टीची योग्यता किंवा अयोग्यता ठरत असते. (आणि ती बर्‍याचदा व्यक्ती सापेक्ष असते.सामाजिक भान हा वेगळा मुद्दा आहे आणि तो ह्या धाग्यात नाही.)

जादूची छडी हॅरी पॉटरच्या हातात आली की समाजोपयोगी ठरते आणि टॉम रीडलच्या हाती आली की समाजविघातक वागते (मग भले त्या छडींचे केंन्द्र एक असले तरी.)

असो,

ह्या धाग्यावर चर्चा करण्यात जास्त अर्थ नाही.

बादवे,

आपला एक कट्टा बॅलन्स आहे. डोंबोलीला कधी येताय?

संजय क्षीरसागर's picture

6 Jun 2017 - 1:31 pm | संजय क्षीरसागर

एखाद्या गोष्टीचा उपयोग तुम्ही कसे करता त्यावर त्या गोष्टीची योग्यता किंवा अयोग्यता ठरत असते.

एकदम बरोब्बर !

या पोस्टचा उपयोग लग्न या एका महत्वाच्या पर्यायाची विधायकता मांडण्यासाठी केला गेला. अर्थात, ज्यांना लग्न करुन मजा येत नाही ते करवादले आहेत, कदाचित त्यामुळे ते धागा भरकटवण्याच्या प्रयत्नात आहेत. त्याला माझा इलाज नाही.

जे लग्नाला घाबरलेले आहेत त्यांना लिव-इनची निष्फलता सांगण्याचा प्रयत्न केला. अशा लोकांना इथे प्रतिवाद जमला नाही, हे कदाचित या पोस्टचं यश आहे.

ज्यांना कशातच काही मजा येत नाही ते केवळ फ्रस्ट्रेशन काढायला इथे येतात असा अनुभव आहे. ते एकसंध पोस्ट टाकू शकत नाहीत की एका ओरियंटेशननी विचार करु शकत नाहीत. अशा लोकांना किमान प्रतिसाद वाचून एक- विचार- दिशा मिळावी अशी आशा आहे.

तुम्ही म्हणता तसा संकेतस्थळाच्या सुविधेचा उपयोग कोण कसा करतो यावर सगळं अवलंबून आहे, धागा कुणाचा आहे यानं फारसा फरक पडत नाही.

आणि कट्टा म्हणाल तर मिपा हाच माझा ऑन-लाईन कट्टा आहे :) ज्याच्याकडे व्यक्त करण्यासारखं काही आहे त्याला बोललं काय आणि लिहीलं काय, काही फरक पडत नाही. इन फॅक्ट, धिस इज फास्टेस्ट अँड ऑलवेज टू द पॉइंट.

आता काही लोक चर्चेचा खफ करतात, तेवढीच त्यांची प्रगल्भता ! :)

असे नसते हो,

मी तरी जाणून बुजुन एखाद्या धाग्याचा खफ करतो. (काही धागे त्या साठी(च) असतात, असे माझे मत.)

एखाद्या धाग्याचा खफ का होतो? किंवा ह्या धाग्याचा खफ का झाला? हे चर्चेचे विषय नाहीत.... टाईमपासचेच विषय आहेत.

आणि कट्याचे म्हणाल तर...... मी तरी कट्याचा उपयोग एकत्र खाणे-पिणे (अगदी चिंचेची चटणी आणि बटाटे-वडे असले तरी पण त्यावेळी चालते) आणि गप्पा-टप्पा ह्या साठीच करतो.

असो,

जमल्यास कधीतरी एकत्र भेटू आणि निवांत पणे गप्पा मारू.

(कुणास ठावूक कदाचित तुम्ही पण आमच्यासारखे कट्टा प्रेमी व्हाल.)

संजय क्षीरसागर's picture

6 Jun 2017 - 2:40 pm | संजय क्षीरसागर

चर्चेत अनेकांनी मनापासून सहभाग घेतला आणि मी तर घेतलाच घेतला. कारण विवाह हा माझ्या अनेक प्रिय विषयांपैकी एक आहे.

शिवाय इथलं माझं स्टेटस `नोन टू ऑल बट मिसींग फ्रॉम ऑल' मला फार आवडतं. लोक्स माझी तमा न बाळगता माझ्या पोस्टसवर काहीही ठोकू शकतात आणि मी तर अर्थात, ....ठोकतोच ! एकदा ओळख झाली की सगळी निर्वैयक्तिकता हरवते. फोकस मुद्यावर न राहाता, संबंध जपणं आणि पुढे कंपूगिरीवर जातो.

विशुमित's picture

6 Jun 2017 - 2:53 pm | विशुमित

एकदा ओळख झाली की सगळी निर्वैयक्तिकता हरवते. फोकस मुद्यावर न राहाता, संबंध जपणं आणि पुढे कंपूगिरीवर जातो.

+1

मुक्त विहारि's picture

6 Jun 2017 - 3:47 pm | मुक्त विहारि

"एकदा ओळख झाली की सगळी निर्वैयक्तिकता हरवते. फोकस मुद्यावर न राहाता, संबंध जपणं आणि पुढे कंपूगिरीवर जातो."

असे म्हणणे एकांगी आहे.

मी आणि बरेच मिपाकर (उदा. सुबोध खरे, डॉ. म्हात्रे, स्पा, औरंगजेब...सूड (ह्याचे शाब्दिक आसूड बर्‍याचदा खाल्ले आहेत....)पण आज जर काही मदत लागली तर हीच मंडळी मदत पण करतात.) इथेही बर्‍याच मुद्द्यांवर एकमतात नसतो. पण एकत्र गप्पा मारतांना "मिपा"चा उपयोग फक्त एक बहाणाच असतो.

मतभेद असणे उत्तमच...पण एकमेकांच्या मताचा आदर करून इतर अनेक गोष्टींचा एकत्र उपभोग तर घेवू शकतोच की.

मला चेस खेळायला येत नाही...पण इथे जेंव्हा-जेंव्हा चेसचे धागे निघतात तेंव्हा तेंव्हा हजेरी लावतोच.

चित्रकला अजिबात येत नाही आणि फोटोग्राफी पण येत नाही...पण म्हणून एसचे किंवा अभ्याचे किंवा चित्रगुप्त ह्यांचे धागे बघतोच की....

संजय क्षीरसागर's picture

6 Jun 2017 - 4:25 pm | संजय क्षीरसागर

हाच धागा बघा. समजा माझी लेखकाशी ओळख आहे. आता पोस्टमधली सगळी मजाच गेली !

याला अनेक कारणं असू शकतात :

१) लेखक विवाहित आहे (आता काय लिहीणार मी ?)
२) लेखक बेंगरुळ असल्यानं त्याच्या विवाहाचा मुहूर्त निघत नाही ( कसं बोलणार या धाग्यावर?)
३) त्याच्या वैवाहिक जीवनाचा बाजा वाजला आहे. (ओळखे म्हटल्यावर झक मारत गप बसायला लागेल!)
४) लेखकाला विवाहातही यश नाही आणि खेड्यात कसली आलीये घंटा लिव-इन ? तस्मात, तो उगीच खयाली धागे टाकतोयं (पण हे उघड कसं लिहीणार?)
५) लेखकानं लिव-इनमधे माती खाल्ली आहे. आता लग्नचं वय ही उलटून गेलं आहे पण पहिल्या लफड्यांमुळे लग्न ही नाही आणि लिव-इन ही नाही अशी गोची झाली आहे ! ( काय बोलणार दोस्तीत?)

_____________________________

आता वास्तविक पोजिशन बघा : माझी लेखकाशी ओळख नाही ! आता लेखनाचा सगळा फोकस विवाह वर्सेस लिव-इन या एका मुद्यावर आहे :)

मुक्त विहारि's picture

6 Jun 2017 - 4:35 pm | मुक्त विहारि

लेखात काय आहे? हे बघून प्रतिसाद देणे (मेक द थिंकिंग स्वीच ऑन)

कुणी लेख लिहिला आहे, हे बघायचे नाही... (मेक द रेकनायझेशन स्वीच ऑफ)

तुम्हाला हे असे वागणे जमत नसेल तर...... एक साधी टिप....

चहा कसा झाला आहे? हे बघा... कुणी केला आहे? हे बघत बसू नका...(बायकोच्या हातच्या चहापेक्षा काही ठराविक मेहूणीच्या हातचा चहा उत्तम लागतोच.त्याला आमचा नाईलाज.)

मुक्त विहारि's picture

6 Jun 2017 - 4:47 pm | मुक्त विहारि

http://www.misalpav.com/comment/reply/39914/942451

तुम्ही जर कायम वर्तमानातच राहणार असाल तर, तुम्हाला वैयक्तिक ओळखीचा आणि प्रतिसादांचा बाऊ करण्यात अर्थ नाही.

तुम्ही उगाच भीत आहात, अशी शंका आहे.

शिवाय मला तरी तुम्ही कधी वैयक्तिक प्रतिसाद (चिखलफेक) दिलेला नाही. आपले जे काही वाद-प्रतिवाद झाले ते विषयानुरुपच झाले... (जे आपण दोघांनीही सांभाळले.)

संजय क्षीरसागर's picture

6 Jun 2017 - 10:31 pm | संजय क्षीरसागर

संदर्भ तुमच्या लक्षात आला नाही ! व्यक्तिगत ओळख झाली की मुद्दा सोडून व्यक्तीला काय वाटेल याची फिकीर केली जाते.

मी तर जसा लेखनात आहे तसाच प्रत्यक्षात आहे. तुम्ही न सांगता कोणत्याही वेळी माझ्या घरी आलात तरी जे लिहीतो तसाच जगतो असं दिसेल. सो, मला कोणत्याच गोष्टीची काहीच काळजी नाही.

मला माझ्या लेखन स्वातंत्र्याची बूज राखण्यात रस आहे. कदाचित तुम्ही या भूमिकेतून कधी लेखन केलं नाही त्यामुळे तुम्हाला लक्षात येणार नाही. मित्र दोन-चार कमी असल्यानं काही फरक पडत नाही. हा जो माझ्या मर्जीनं, कधीही आणि केव्हाही ऑन-लाईन कट्टा चालतो, ती मजा फार वेगळी आहे.

अभिजीत अवलिया's picture

8 Jun 2017 - 9:11 am | अभिजीत अवलिया

एकदा ओळख झाली की सगळी निर्वैयक्तिकता हरवते. फोकस मुद्यावर न राहाता, संबंध जपणं आणि पुढे कंपूगिरीवर जातो.
--- असे होऊ शकते पण होईलच असे नाही. एकमेकांशी तात्त्विक मतभेद असले तर ते बिनधास्त मांडता आलेच पाहिजेत (वैयक्तिक उणीदुणी न काढता). जर तसे करता येत नसेल आणि कंपुगिरी करून संबंध जपण्याची गरज पडत असेल तर असे संबंध म्हणजे एक ओझे आहे असे मी समजतो.

संजय क्षीरसागर's picture

8 Jun 2017 - 9:32 am | संजय क्षीरसागर

पण जिथे व्यक्तिगत ओळख आहे तिथे सदस्याची सर्व बॅकग्राऊंड माहिती असते. मग सदस्य फ्रस्ट्रेशनमधून जरी लिहीत असला तरी तसं उघड बोलता येत नाही. शिवाय इथे सदस्यांना काहीही संबंध नसतांना सर्वज्ञ, अध्यात्म अशा कोणत्याही विषयावर घसरण्याची सवय आहे (इथलेच प्रतिसाद पाहा) अशा वेळी ओळखीत त्यांना ही ती सवय सोडावी लागण्याची शक्यता आहे आणि मग दोस्तीखातर मला ही निर्वैयक्तिक होता येणार नाही. कविता किंवा इतर ललित साहित्यात तर कंपुबाजी मोठ्याप्रमाणावर चालते तिथे पोस्टचं योग्य मूल्यमापन करायला दोस्ती कायम आड येते.

मराठी_माणूस's picture

8 Jun 2017 - 10:44 am | मराठी_माणूस

सहमत. प्रतिवाद करताना संबध आड येउ शकतात.

(एका चिकीत्सा करणारार्‍याला "अरे प्रतिवाद करताना वर कोणी लिहले आहे ते तर पहा" अशा प्रकारची कॉमेंट वाचल्याचे आठवते)

सतिश गावडे's picture

6 Jun 2017 - 12:24 pm | सतिश गावडे

स्व गवसलेल्या आणि आत्मज्ञान प्राप्त झालेल्या व्यक्तीने इतक्या क्षुल्लक गोष्टीच्या बाबतीत भोचकपणा करणे बरे दिसत नाही.

ते एक असो. तुमच्या उजेड पाडणाऱ्या वेबसाईटचे काय झाले? मी सदस्यत्व घेण्यास उतावीळ आहे. आधी मी कुठेतरी तरी वाचले होते की तुमचे अध्यात्मावरील मराठीतील एकमेवाद्वितीय असे पुस्तक येणार आहे. मी लगेच एमेझॉन आणि फ्लिपकार्टवर तुमचे पुस्तक ऍडव्हान्स बुकिंगला आहे का पाहीले. ते नाही कळल्यावर आणि नंतर तुम्ही पुस्तक लिहीणार नाही कळल्यावर माझा भ्रमनिरास झाला. मात्र तेव्हाच तुमची पायऱ्या-पायऱ्याने उजेड पाडणारी वेबसाईट येणार आहे म्हटल्यावर हायसे वाटले.

त्यामुळे असल्या फुटकळ गोष्टींकडे लक्ष न देता उजेड पाडणारी वेबसाईट बनवण्याकडे लक्ष द्या अशी आपणास नम्र विनंती.

मुक्त विहारि's picture

6 Jun 2017 - 11:49 am | मुक्त विहारि

ओके.