पुष्पक

Anonymous's picture
Anonymous in जनातलं, मनातलं
7 May 2017 - 1:58 pm

तो पुष्पक सिनेमा काय मस्त घर करून बसलाय मनात, मधूनच कधीतरी आठवतो, मग काही फारच गमतीदार आणि काही फारच गंभीर प्रसंग आठवतात त्यातले!

१९८८ साली पुण्यात निलायम थेटरात पाहिलेला म्हणे आम्ही हा चित्रपट, मी पाहिलेला थेटरातला पहिला वहिला चित्रपट (मला आठवत नाही, आई सांगते की आपण पाहिलेला... बाजूलाच अशोका हॉटेल मध्ये होतो आपण वगैरे) असो नंतर दूरदर्शन मग घरी व्हीडीओ फाईल वरून पारायणं झाली ह्याची.

असो... पार्श्वसंगीत तर इतकं आवडलं की मी चक्क व्हीडीओ फाईल मधून एक एक पीस ऑडिओ कन्व्हर्ट केलेत. https://soundcloud.com/sam4grafix/pushpak-sad-end त्यातला हा पीस तर खड्डाच पाडतो!

अश्या वेळी जेव्हा भारतीय सिनेमा तडक भडक गाणी, अफलातून शब्दफेक ह्या तत्सम गोष्टींवर चालायचा त्याच वेळी ह्या मूकपटाने धम्माल केली हो! कमालच प्रामाणिक प्रयत्न संगीतम श्रीनिवासन राव कडून! (दिगदर्शक)

शहरात राहणाऱ्या गरीब तरुणाच्या स्वप्नाची वास्तववादी ओढाताण, त्यातून झालेली त्याची फजिती, त्याच्या फजितीमुळे झालेली इतरांची फजिती... कमल हसन अक्षरशः जगलाय ह्या भूमिकेत!

त्यातले काही सीन्स तर माणसाचे प्रतिबिंब अफलातून पणे तरंगतात!

● चाळीत वाकून काम वाल्या बाई कडे पाहणाऱ्या आजोबांचे डोळे
● शर्टाच्या काखेत घामामुळे डाग पडलेल्या भागापूरताच साबण लाउ पाहणारा हात
● कटिंग चहा, ग्लासात नाणी घालून फुल करून पितानाचे हावभाव
● नोट आणि फुल जमिनीवर पडलेले असताना नोट आधी घेण्याच्या नादात फुलाला चिरडून बाजूला झालेला पाय
● भिकाराच्या शवाला सोडून त्याच्या पैशांच्या खजिन्यावर धावून गेलेले लोकं

तसे पाहिले तर पूर्ण सिनेमाच अश्या सूक्ष्म पण जोरदार भावनांनी भरलेल्या क्षणांचा आहे!

कोणी हा मूकपट पाहिला नसेल तर नक्की पहा, युट्युबवर आहे. एकदा पाहिला की नक्कीच परत परत पाहाल ह्याबद्दल शंका नाहीच!

हॅट्स ऑफ टू पुष्पक टीम! दाक्षिणात्य टीम असली तरी त्यातून एक चेहरा वेगळा लक्षात राहतोच, तो म्हणजे टीनू आनंद! फरीदा जलाल पण आहे एका छोट्या भूमिकेत. पार्श्वसंगीत तर अफलातून आहे, रोजच्या जीवनातील आवाज आणि त्याची अफलातून मांडणी एल. वैद्यनाथन ह्यांनी केली आहे.

त्यावर्षीचे नॅशनल अवॉर्ड 'बेस्ट फिल्म' गोल्डन लोटस पारितोषक मिळाले पुष्पकला.

आपण मात्र 'ऑल टाइम बेस्ट मूवी' देऊन टाकलाय कधीच!

#सशुश्रीके

pushpak

मांडणीप्रकटन

प्रतिक्रिया

संजय पाटिल's picture

7 May 2017 - 3:17 pm | संजय पाटिल

मी पण पारायणं केलित ह्या पिक्चरची...
त्यातली अमला फारच आवडली होती! आणि तो खोपडी...

पाषाणभेद's picture

8 May 2017 - 12:02 am | पाषाणभेद

पहिलंच गाणं चक्क सुलोचनाबाई चव्हाण यांच 'तांबड फुटलंय आता राजसा' हे आहे.

एस's picture

8 May 2017 - 4:32 am | एस

आवडता चित्रपट आहे.