ह्या बातमीत काही तथ्य आहे का ?

साहना's picture
साहना in काथ्याकूट
5 May 2017 - 11:05 pm
गाभा: 

फडणवीस साहेब पहिल्या दिवसा पासून धिम्मी वाटत असले तरी धिम्मी लेवल १०,००० अनलॉक करायला आणखीन काही वर्षे तरी लागतील असा कयास होता. खालील बातमी पाहून फडणवीस अपेक्षा उंचावणारे मुख्यमंत्री आहेत असे वाटले. बातमी ५ दिवस आधी आली असली तरी हल्ली मीडिया वाल्यांची विश्वासार्हता दिग्गीराजा इतकीच असल्याने कुठलीही बातमी खरी आहे कि खोटी आहे हे पाहण्यासाठी किमान २ वेळ मी देते.

खालील बातमीत किती तथ्य आहे हे मराठी मंडळी सांगू शकतात का ?

rr
rr

टीप : आम्ही सामान्य माणूस असून राजकारण ह्या विषयातील विशेष काही कळत नाही, फडणवीस साहेबांनी आपले अर्धे शहाणपण वापरून काही तरी अती-कौटिलीय राजकीय व्यूह वगैरे रचला असेल तर जाणकारांनी नक्की माहिती द्यावी. त्या शिवाय अश्या नियमातून त्यांची सामाजिक शांततेची कळवळ आणि राजकीय परिपक्वता (कि काय ते ) वगैरे कशी स्पष्ट दिसून येत आहे ह्याचे तपशीलवार विवेचन सुद्धा नक्की करावे.

मूळ दुवा :http://www.opindia.com/2017/05/in-maharashtra-you-cant-install-a-statue-...

प्रतिक्रिया

जो धर्म मूर्तीभन्जक आहे , मूर्ती किन्वा पुतळा उभारणे हे ईश्वराज्ञेच्या विरुद्ध वर्तन आहे अशी ज्यान्ची सम्जूत आहे त्यान्च्याकडुन पुतळा उभारण्यास ना हरकत दाखला अपेक्षणे म्हणजे बिन्डोक पणा आहे

या मागे नक्की खोल विचार आहे. आपण शन्का घेणे योग्य नाही. :biggrin:

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

6 May 2017 - 11:07 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

फडणवीस साहेबांनी आपले अर्धे शहाणपण वापरून काही तरी अती-कौटिलीय राजकीय व्यूह वगैरे रचला असेल तर जाणकारांनी नक्की माहिती द्यावी

अर्धे शहाणपण

आपलं दुकान बंद झाल्याने म्युन्सिपाल्टीत उंदिर मारायची नोकरी करायला लागली का काय?

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

6 May 2017 - 7:33 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

त्यात विशेष काय आहे ग साहने ?
त्यांनी ती मार्गदर्शक तत्वे घालून दिली आहेत.
https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Mara...
समीतीवर पोलिस आयुक्तही/जिल्हा पोलिस अधिक्षक असणार आहेत. ना हरकत प्रमाणपत्र ते समीतीला सादर करतील. ह्यात गैर काय आहे? पुतळे अमाप झाले आहेत. शहरांचे सौदर्य वाढण्याऐवजी त्यास बाधा येते. समीती नेमण्यामागे हे मुख्य कारण आहे असे आमचे मत. मात्र डँबिस मिडियाला नेमके ते 'अल्पसंख्याक' असलेले वाक्य दिसले व ती हेडलाईन झाली.
आता उद्या 'सामना'मध्ये 'शिवाजीचा पुतळा राज्यात उभारण्यासाठी मुसलमानांची परवानगी आवश्यक' असा लेख तो संजय राऊत छापेल.

काय हो माईसाहेब, तुम्हाला नेमके नाही दिसले ते वाक्यं? अल्पसंख्यांकांच्या खास उल्लेखाचं प्रयोजन आम्हाला समजेल काय? तुम्हाला माहित नसल्यास तुमच्या 'ह्यां'ना जरा विचारून बघता का!
आ.न.,
-गा.पै.

साहना's picture

10 May 2017 - 4:30 am | साहना

>आता उद्या 'सामना'मध्ये 'शिवाजीचा पुतळा राज्यात उभारण्यासाठी मुसलमानांची परवानगी आवश्यक' असा लेख तो संजय राऊत छापेल.

आणि ते सत्यास धरून असणार नाही असे आपले म्हणणे आहे काय ?