‘शिफू’च्या बुरख्याआड दडलंय काय?

अभिजित - १'s picture
अभिजित - १ in काथ्याकूट
5 May 2017 - 9:40 pm
गाभा: 

गेले बरेच महिने हे शिफू सन कृती चे प्रकरण गाजत आहे. आत्ता लोकप्रभा मध्ये हा खालील लेख वाचला. हा कुलकर्णी नागपूरचा आहे. याचे सर्व धंदे कशाच्या जोरावर चालत होते ते काही अजून बाहेर आले नाहीए, म्हणजे याला पैसे कुठून मिळत होता. याच्या बाबतीत बोटचेपे धोरण पोलिसांनी का स्वीकारले होते ? मुंबई पोलीस आयुक्त कडे जाऊनही प्रश्न तसाच का होता ?? बाकी या लेखात न दिलेली बातमी म्हणजे , वसंतदादा पाटील यांची मुलगी , विजया पाटील, सामाजिक कार्यकर्त्या , यांनी या पालकांना सपोर्ट दिला आणि केस कोर्टात फाईल करायला मदत केली. वसंतदादा म्हटले कि समाजाच्या काही थरातील लोक सहकार सम्राट , शिक्षण सम्राट वगैरे बोलतात . पण इथे खरेच कौतुकास्पद आहे कि त्यांची मुलगिच मदत करायला पुढे आली. आणि संस्कृती , धर्माच्या बाता मारणारे लोक गप्प !!
हे सगळे प्रकार अतिशय धोकादायक आहेत पण याच्यावर काही action घेण्या ऐवजी सरकार गप्प. प्रत्येक गोष्टीत कोर्टाकडे का जावे लागते ? कोर्टचा दट्ट्या बसला कि मग सिस्टिम जागी होते !! या असल्या लोकांना कायमचे आत टाकले पाहिजे.
हा माणूस बाहेर आला आणि याने आपले धंदे परत सुरु केले तर ? उद्या आपले जवळचे लोक पण यात फसू शकतात . याच्या वर उपाय काय ?
http://www.loksatta.com/coverstory-news/shifu-sanskriti-maharashtra-1466...
मुळात कसलेही वैद्यकीय शिक्षण नसताना सुनील कुलकर्णी जी काही कामं करत होता ती सर्वच बेकायदेशीर म्हणावी लागतील. त्याने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीनुसार तो अडचणीत असलेल्या व्यक्तींना मार्गदर्शन करून त्यांना मुक्त जगण्याचा मार्ग दाखवत असे. त्याच्या वक्तव्यानुसार १८ ठिकाणी त्याचे प्रतिनिधी शिफू संक्रितीच्या प्रसाराचे काम करत होते. सुळे भगिनींवर आपण कोणतेही संमोहन केले नसून उलट त्यांचे पालक त्यांना छळत असल्यामुळे त्यांच्यापासून सुटका केल्याचे तो सांगतो.
आपल्या मुली या व्यक्तीच्या म्हणजेच सुनील कुलकर्णीच्या प्रभावाखाली असल्याचे त्यांना लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. पण दोन्ही मुली सज्ञान असल्यामुळे त्यावर काही कारवाई करता येणार नाही, अशी पोलिसांनी मखलाशी केली. त्यानंतर सुळे यांनी मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांची भेट घेऊन त्यांना सर्व परिस्थिती कथन केली. आयुक्तांनी या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवला. पण त्यानंतरदेखील तीन महिन्यांत या तपासात कसलीच प्रगती झाली नाही. त्यामुळे सुळे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने मात्र प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस खात्यावर ताशेरे तर ओढलेच, पण तातडीने आणि गांभीर्याने तपास करण्याचे आदेश दिले.

प्रतिक्रिया

प्रसाद गोडबोले's picture

6 May 2017 - 6:47 am | प्रसाद गोडबोले

तुम्ही सुनील कुलकर्णी चे किंवा सुळे कुटुंबियांचे मित्र आहात का हो ?
नाही म्हणजे तुम्ही इतक्या कॉन्फिडेंटली लेख लिहिलाय ते पाहून वाटलं की ह्या प्रकरणातील अंतिम सत्य तुम्हाला माहित आहे म्हणून !

पेपरात जेवढं वाचलं त्यावरून तरी असं वाटलं की अजून आरोपपत्र दाखल व्हायचं आहे , कोर्टात केस उभी राहायची आहे , सगळे पुरावे तपासून पहायचे आहेत , निकालपत्र यायचे आहे ! ते येई पर्यंत तरी सदर व्यक्ती चे निर्दोषत्वच गृहीत धरावे लागेल !
शिवाय पोरी लहान आहेत , त्या जर स्वतःहून म्हणत असतील की आई वडील छळ करतात तर ह्यात पॅरेंटल चाईल्ड abuse चा प्रकार ही असू शकतो . (पोरी चाईल्ड नसल्या तरी लहानच आहेत की )

असो। उगाच मीडिया ट्रायल नको इतकेच :)

#मिपा_संस्कृती

:D

ओम शतानन्द's picture

6 May 2017 - 8:17 am | ओम शतानन्द

श्रीमान ओरेलियस तुमच्या सारखिच भूमिका पोलिसान्नी घेऊन ते स्वस्थ राहिले असावेत, जो पर्यन्त कुणी तक्रार करत नाही तो पर्यन्त नसत्या फन्दात पडुन कशाला आपल्या मागची कामे वाढवायची असा सूज्ञ विचार पोलीसांनी केला असावा.

प्रसाद गोडबोले's picture

6 May 2017 - 7:36 pm | प्रसाद गोडबोले

Hmm , मी स्वतः पोलीस डिपार्टमेंट मध्येच असल्याने माझी विचारसरणी पोलीस कार्यपद्धतीशी जुळणे स्वाभाविक आहे !

त्यात बातमीत म्हटल्याप्रमाणे, नव्या पिढीला पालकांच्यापेक्षा मित्र (बघा : मराठी सिरियल दिल-दोस्ती-दुनियादारी) आणि इतर (इथे कुलकर्णी टाईप फसवे गुरु) जास्त जवळचे वाटतात.

त्यात पालकांचा मुलांशी संवाद जुजबी झाल्यानं अशा लोकांचं फावतं. पालकांची अवस्था दुहेरी पेचात आहे : म्हणजे मुलांना विचारावं सध्या नक्की काय चालललंय ? आणि योग्य मार्ग सांगावा तर संबंध बिघडण्याची काळजी आणि गप्प बसून पाहात राहावं तर असा प्रकार घडण्याची शक्यता !

पुन्हा मुलांची विश्व इतकी विस्तारलीयेत की पालकांना त्यांच्या निर्णयातलं घंटा काही कळत नाही. म्हणजे सुळ्यांची मोठी मुलगी लॉ सोडून इवेंट मॅनेजमेंट करतेयं म्हटल्यावर, नक्की काय तपासायचं याची पालकांना कल्पनाच नाही !

यात आता नक्की दोष परिस्थितीचा फायदा उठवणार्‍या कुलकर्णीचा, असहाय पालकांचा, की संवाद न साधणार्‍या युवा पिढीचा हा एक प्रश्नच आहे !

टवाळ कार्टा's picture

6 May 2017 - 2:22 pm | टवाळ कार्टा

मागच्या पिढीचे संस्कार सरकारी कार्यालयात गेल्यावर दिसतात कि

सतिश गावडे's picture

6 May 2017 - 3:04 pm | सतिश गावडे

लैच वाईट अनुभव आलेला दिसतोय सरकारी कार्यालयात. तसा तो प्रत्येकालाच कधी ना कधी येतो म्हणा. ;)

वरुण मोहिते's picture

6 May 2017 - 3:12 pm | वरुण मोहिते

मल्टिनॅशनल कंपन्यात का रे ?

सतिश गावडे's picture

6 May 2017 - 3:18 pm | सतिश गावडे

नाही. तिथे ते "डीसिप्लिन" पाळतात. क्याम्पसमध्ये कुठे थुंकणार नाहीत, कचरा कुठेही फेकणार नाहीत. चहा/पाणी/जेवण/बस यासाठी शिस्तीत रांगेत उभे राहतात.

टवाळ कार्टा's picture

7 May 2017 - 7:09 pm | टवाळ कार्टा

निदान कामे तरी पटापट होतात की

अत्रुप्त आत्मा's picture

6 May 2017 - 2:16 pm | अत्रुप्त आत्मा

शिफू नावाचं अफू-एक नवटनाटनी कल्ट!

सतिश गावडे's picture

6 May 2017 - 3:05 pm | सतिश गावडे

या कुलकर्णींचे चुकले. त्यांनी संस्कृती वगैरेच्या नादी न लागता स्वतःच्या नावापुढे बाबा/बापू/महाराज लावायला हवे होते. चित्र उलट दिसले असते.

प्रसाद गोडबोले's picture

8 May 2017 - 10:33 am | प्रसाद गोडबोले

त्यापेक्षा कुलकर्णींनी सुधारित सत्यनारायण घालायला हवे होते , म्हणजे कसे की धर्माच्या नावावर भोळ्या भाबड्या लोकांना गंडवता येते, स्वतःची तुंबडी भरता येते आणि महत्वाचं म्हणजे हे सगळं करून सुधारक असल्याचा आव आणता येतो .

शिवाय सुधारणावादी बामन म्हणून जाहिरात होते ते ही फुक्कट !!

आम के आम , गुठलियो के भी दाम ;)

:D

सन कृती- संक्रिती..संस्कृती?

असो.. वाट पाहूया - उलगडा होईलच.
बाकी संस्कृती म्हटलं की एकच मिपाकर आठवतात ब्वॉ..

(अवांतरः वसंतदादा यांच्यासारखा मुख्यमंत्री काँग्रेसला परत मिळालाच नाही. नंतर फोलपटांना शेंगदाणे अन पुढे पुढे तर बदाम म्हणण्याची प्रथा पडली.)

अत्रुप्त आत्मा's picture

8 May 2017 - 11:41 pm | अत्रुप्त आत्मा

अफू संस्कृती वाले टनाटनी नीच असतात.. आणी मुख्यत: या ना त्या मार्गानी स्त्रीवर्गाला लक्ष करत असतात.. त्यासाठी अश्या नव्या नव्या क्ल्रुप्त्या तरी योजतात. नाहीतर आपल्या प्राचीन टनाटनी धर्मपरंपरांचं कपटीपणे समर्थन करतात. धर्मसुधारकांच्या सुधारणावादालाच आपलं आपल्या कोत्या व हिडीस मनानी- धर्म ,असं संबोधून आपला शिखंडीप्रवण शेपूटघालूपणा दाखवतात.
आज शिफू नाव आहे... पण मुळातले ते टनाटनी क्रुमीकीटकच!