मिसळपाव भटकंती विशेषांक : १) ताम्हीणी घाट

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in भटकंती
28 Apr 2017 - 5:49 pm

मिसळपाव भटकंती विशेषांक : १) ताम्हीणी घाट

आत्ताशी कुठे वैशाख सुरु झालाय , अजुन अख्खा ज्येष्ठ यायचाय आणि आजकाल तर आषाढस्य प्रथमे दिने ही नुसता रखरखाटच असतो. पण आपल्याला मात्र आत्ता पासुनच श्रावणाचे वेध लागायला लागलेत. कसं आहे की "पाऊस तर मनात असतो ना " असं कोणीतरी पुर्वी म्हणालं होतं तेव्हा पासुन मनात ढग दाटुन येतात आणि आपण आपले चिंब चिंब होऊन जातो ...

हां तर ते असो . तुर्तास तो विषय नाही .

पाऊस म्हणलं की अश्या आजवर केलेल्या अनेक पावसाळी भटकंतीचे क्षण असे सरकन मनात तरळुन जातात , आणि त्यात ह्या झुक्याने लय भारी सोय करुन ठेवली आहे की मनात आले की कधीही आपलेच जुने अल्बम उघडुन परत त्या क्षणांचा आनंद घेता येतो :)
असेच जुने अल्बम तपासुन पहाताना मिपाकरां सोबत केलेल्या ताम्हीणी घाटाच्या पावसाळी भटकंतीची आठवण झाली , म्हणलं आहेच रिकामा वेळ तर चला लिहुन काढु लेख . तसंही , बाहेरच्या ४० ४२ च्या उन्ह असताना हे असे हिरवेगर्द फोटो पाहुन आपल्याला कसं भारी वाटतं तसंच सेम वाटणारा कोणी इथेही भेटेल :)

१) ताम्हीणी घाटात जाणारा हिरवा गर्द रस्ता
1

२) धुक्यामागे लपलेले हिरवे गर्द डोंगर अन धबधबे
2

३) ताम्हीणीघाटाचे वैभव
3

४) अशा जंगलात हरवुन जाण्याची मजा काही औरच ... अहाहा - दवणे सर
4

५) किसनदेव धबधब्या खाली मनसोक्त भिजताना
dasa

७) गावडे सर वल्ली सरांना पाताळात ढकलताना
6

८ ) वल्ली सरांचे "एकला चालो रे" जगप्रसिध्द काळा टीशर्ट : मी हा फोटो पाहिल्यावर लक्षात आलं की ह्यावर जिजित्सु लिहिलेलें आहे ... लोल ... वल्ली सर जिजित्सु खेळताना कसे दिसतील ह्या विचाराने हसु येत आहे =))))
7

९) ध्यानस्थ गावडे सर : अभ्याला म्हणालेलो कि हा फोटो एदिट करुन दे मस्त ऑरा लावुन वगैरे पण त्याने दिलाच नाही दुत्त दुत्त :-\
9

६) मिपाकरांसोबत एक पोझ
5

१०) चिंतनाचा आव आणुन फोटो सेशन करताना अस्मादिक - There is nothing to achieve, there is no where to go, you are already perfect and you are already complete. Peace !!!
a

११) भातशेती
bhat

कसं असतं की असं खुप दिवसांनी खुप महिन्यांनी भटकंतीचा वृतांत लिहित असताना चिल्लर चिल्लर रेफरन्सेस पुसट झाल्याने काही तरी लय भारी वाटले असेच क्षण लक्षात रहातात. ह्या भातशेती कडे पाहुन गावडे सर म्हणाले होते " कसं बदललय ना सगळं. दहा एक वर्षां पुर्वी मी असा कधी भात शेतीत गुढघाभर चिखलात उभाराहुन भात लावत होतो तर कधी ही अशी गुरे चरायला नेत होतो , आज कुंपणाच्या ह्या बाजुला उभा राहुन अलिप्तपणे फोटो काढतोय " हे वाक्य फार आवडलं होतं तेव्हा ! आमचाही प्रवास इतका डायवर्स नसला तरी असाच काहीसा आहे ! एकेकाळी सज्जनगड वर जायचो पावसाळ्याच्या दिवसात तेव्हा तिकिटाचे जायचे यायचे २२ रुपये नसायचे खिषात ! कास यवतेश्वर अजिंक्यतारा तर अख्खा पायाखालुन घातलाय अक्षरशः ! चिंब भिजत तरीही सायकल नेच जायचो कॉलेजला अन तसेच लेक्चर्स करायचो ! चिंब पावसात भिजल्यानंतर मित्रांमध्ये २-२ रुपये कॉन्ट्रीब्युशन काढुन शेयर करत पिलेल्या त्या एका सिगारेटची मजा आता नाय येत राव !

आपल्या सारखा अनुभव असणारी माणसं भेटली की खुप भारी वाटतं राव !

१२) चिंतनात मग्न गावडे सर
da

१३ ) ही दोस्ती तुटायची नाय :)
dosti

नवीन मित्र न बनवता येणे हे म्हातरं होत असल्याचे व्यवच्छेदक लक्षण आहे असं म्हणतात म्हणे , मला तर मिपावर आल्या पासुन एक्केक नवीन मित्र बनवता आले की अगदी परत कॉलेजात असल्यासारखं वाटतं ! अभ्या वप्या गणामास्तर बॅट्या अन्या पन्नास नाखु चौरा ... नावे घेवु तितके कमीच... प्रत्येक जणच अवलिया ... प्रत्येकाचा वेगळाच नाद ! लैच डायवर्सिफिकेशन झालं की राव ! अगदी कॉलेजात भटकलो नव्हतो तितका मिपाकरांसोबत भटकलो असेन ! स्कोअर सेटलींग , कंपुबाजी , छुपी कंपुबाजी, बाय्सड प्रॉफायलिंग, वैयक्क्तिक श्रद्धांवर हल्ले वगैरे वगैरे प्रकारही होत असतील मिपावर , पण ते चालायचेच . उडीदामाजी काळे गोरे ! आपण चांगलं ते घ्यावं , वाईट ते सोडुन द्यावं ! हा जो नवीन मित्र समुह बनला आहे तो मिपामुळेच बनला आहे म्हणुन मिपाविषयी खुप आपलेपणा वाटतो.
आता ह्या पावसाळ्यात अजुन ट्रेक्स करुयात रे !

१३ ) दाट धुक्यात हरवुन गेलेली एक अनोळखी वाट : अजुन खुप लांब जायचयं ..........................................
8

पुढील लेख : मिसळपाव भटकंती विशेषांक : २) ग ग गोव्याचा

प्रतिक्रिया

स्रुजा's picture

28 Apr 2017 - 5:54 pm | स्रुजा

अरे वा ! फोटो आणि वृत्तांत आवडला.

कसं असतं की असं खुप दिवसांनी खुप महिन्यांनी भटकंतीचा वृतांत लिहित असताना चिल्लर चिल्लर रेफरन्सेस पुसट झाल्याने काही तरी लय भारी वाटले असेच क्षण लक्षात रहातात. ह्या भातशेती कडे पाहुन गावडे सर म्हणाले होते " कसं बदललय ना सगळं. दहा एक वर्षां पुर्वी मी असा कधी भात शेतीत गुढघाभर चिखलात उभाराहुन भात लावत होतो तर कधी ही अशी गुरे चरायला नेत होतो , आज कुंपणाच्या ह्या बाजुला उभा राहुन अलिप्तपणे फोटो काढतोय " हे वाक्य फार आवडलं होतं तेव्हा ! आमचाही प्रवास इतका डायवर्स नसला तरी असाच काहीसा आहे ! एकेकाळी सज्जनगड वर जायचो पावसाळ्याच्या दिवसात तेव्हा तिकिटाचे जायचे यायचे २२ रुपये नसायचे खिषात ! कास यवतेश्वर अजिंक्यतारा तर अख्खा पायाखालुन घातलाय अक्षरशः ! चिंब भिजत तरीही सायकल नेच जायचो कॉलेजला अन तसेच लेक्चर्स करायचो ! चिंब पावसात भिजल्यानंतर मित्रांमध्ये २-२ रुपये कॉन्ट्रीब्युशन काढुन शेयर करत पिलेल्या त्या एका सिगारेटची मजा आता नाय येत राव !

आपल्या सारखा अनुभव असणारी माणसं भेटली की खुप भारी वाटतं राव !

हे फारच छान.

पिलीयन रायडर's picture

28 Apr 2017 - 6:32 pm | पिलीयन रायडर

अगदी!

आणि हे ही

स्कोअर सेटलींग , कंपुबाजी , छुपी कंपुबाजी, बाय्सड प्रॉफायलिंग, वैयक्क्तिक श्रद्धांवर हल्ले वगैरे वगैरे प्रकारही होत असतील मिपावर , पण ते चालायचेच . उडीदामाजी काळे गोरे ! आपण चांगलं ते घ्यावं , वाईट ते सोडुन द्यावं ! हा जो नवीन मित्र समुह बनला आहे तो मिपामुळेच बनला आहे म्हणुन मिपाविषयी खुप आपलेपणा वाटतो.

करेक्ट आहे! मिपाचा जाम वैताग येतो अनेकदा. पण संन्यास वगैरे घेववत नाही.

भटकंती विशेषांक मस्तच सुरु झालाय!

फेसबुकची पोस्ट इकडे आली रे

शेवटचा फोटो बघून आपली भीमाशंकर भटकंती आठवली.

अभ्या..'s picture

28 Apr 2017 - 7:58 pm | अभ्या..

अहाहाहाहाहा,
आमचं मित्रमंडळ पाहताना किती बरं वाटलं म्हनून सांगू. अहाहाहा.
तेच ते काड्या नाहीतर ओंडके घालणारे आणि मज्जा बघत बसणारे निरागस वल्लीसर, सात्विक संतापाचा महामेरु भाभडा किसनदेव, हक्काने शिव्या घालणारा धण्या, औत्सुक्याचे झाड गिर्जा.
एकसे एक नग हायेत राव. ह्या सर्वांची भूतपूर्व कॉमन कर्मणूक अत्रुप्त बुवा फोटोत नसल्याने एक छोटासा निषेध नोंदवत आहे.
द ग्रेट डीबी, पशा, बॅटू, वप्या, गणा, अन्या, पन्नास, नाखून्स ह्या सर्वांचेच मैत्र म्हणजे माझ्यासाठी मोठी कमाई आहे.
.
.
बाकी ते फोटोतला निसर्ग बिसर्ग, धबधबा न घाट आपणाला मित्रासोबत पाहण्यात कै इंटरेस्ट नै. ;)

तुषार काळभोर's picture

29 Apr 2017 - 7:23 am | तुषार काळभोर

बाकी ते फोटोतला निसर्ग बिसर्ग, धबधबा न घाट आपणाला मित्रासोबत पाहण्यात कै इंटरेस्ट नै. ;)

जीवाला जीव देणारी मैत्री करू, पण हे असं फिरणं फक्त तिच्याबरोबर!

इरसाल कार्टं's picture

29 Apr 2017 - 8:09 am | इरसाल कार्टं

लै भारी

ठिक हाय ना मंग, औंदा लगिन हाय ना त्वाल. जाय ह्या रेनि शीझन ले सौ. अभ्या संग मंग ;) हा.का.ना.का.
अभिनंदन शुभेच्छा बे अभ्या

मस्त लिहिलंय ! भातशेती आणि धुक्यात हरवलेली वाट बघून जिवाला गार वाटलं !!!

बाकी मिपाबद्दल लिहिलेल्या उताऱ्याला तंतोतंत असंच म्हणते !

नीलमोहर's picture

28 Apr 2017 - 11:07 pm | नीलमोहर

जेव्हा आपण एखाद्या गोष्टीबद्दल मनापासून फील करतो, ते शब्दांतही खूप छान उतरतं,
तुम्ही मनापासून जे लिहिता ते नेहमीच वेगळं, भारी काही असतं,
अजून अशाच लिखाणाच्या प्रतीक्षेत,

यशोधरा's picture

28 Apr 2017 - 11:32 pm | यशोधरा

मस्त लिहिलंय, भारी आवडलं.

इरसाल कार्टं's picture

29 Apr 2017 - 8:11 am | इरसाल कार्टं

आणि वर्णनही

प्रचेतस's picture

29 Apr 2017 - 9:26 am | प्रचेतस

सहीच रे.

दार पावसाळ्यात एकदातरी ताम्हिणीची सफर असतेच असते. येत्या पावसाळ्यातही अपवाद नाहीच. हिरव्या रंगाच्या अफाट शेड्स बघायला मिळतात.

सस्नेह's picture

29 Apr 2017 - 10:54 am | सस्नेह

धबधब्याचे फोटो बघून गार गार वाटलं. पण पैले तीन फोटो हिरवे गर्द बिर्द काही दिसले नाहीत.
अंमळ एक शंका : मा. किसन देव यांनी चुकून वल्लीशेठचा टी शर्ट घातलाय काय ?

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Apr 2017 - 11:34 pm | डॉ सुहास म्हात्रे

धमाल भटकंती, तीही भर पाऊस आणि धबधब्यांच्या संगतीने, म्हणजे ती खूप काळासाठी मनात घर करून राहतेच ! वर्णन आणि फोटो मस्त !