रेखाटन

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in मिपा कलादालन
28 Apr 2017 - 12:05 pm

बर्‍याच दिवसांनी पेन हातात घेतलाय. हो, पेन्सील न वापरता थेट काळ्या शाईचा पेन वापरून स्केचेस करण्याचा प्रयत्न करतोय.त्यामुळे खाडाखोड करण्याला वाव नाहीये, कारण इरेझर वापरणे शक्य नाही. बराच गॅप पडलेला असल्याने लाइन्स आणि स्ट्रोक्स खुप कमजोर झालेत. पण जमेल हळूहळू सरावाने. दोन्ही स्केचेसला लागलेला वेळ साधारण १५ ते ३० मिनीटे. मोराचे स्केच निव्वळ कल्पनेतल्या चित्रावरून केलेय. गेट वे ऑफ इंडिया मात्र समोर बसून करायचा प्रयत्न केलाय. कसं झालय ते सांगा...

धन्यवाद !

१. मोर

Peacock

२. गेट वे ऑफ इंडीया

GOI

विशाल कुलकर्णी...

प्रतिक्रिया

पैसा's picture

28 Apr 2017 - 12:31 pm | पैसा

दोन्ही झकास! मी पुन्हा स्केचेस करणार आहे असे म्हणत सामान गोळा करत असते. तो 'उद्या' कधी येतच नाही! =))

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Apr 2017 - 12:57 pm | डॉ सुहास म्हात्रे

छान आहेत चित्रे ! आपली कला स्वतःला आनंद देत असली तर तिची जमेल तशी साधना करावी आणि तो आनंद उपभोगावा... बाकी जगाला ओसाडगावच्या फाट्यावर मारून.

"बराच गॅप पडलेला असल्याने लाइन्स आणि स्ट्रोक्स खुप कमजोर झालेत." हे लिहिलेत ते चांगले झाले. त्यामुळे हातात तलवारी घेऊन धाऊन येणार्‍यांचे अर्धे बळ कमी झाले असेल ! =))

(तरीही, काही उच्च्कोटीचे टीकाकार 'स्व'ला कुरवाळत दोनचार वार करणार नाहीत याची खात्री नाहीच म्हणा. तसे झाले तर त्यांना सरळ फाट्यावर मारा ;) :) कलाकाराला आपल्या मस्तीत राहता यायला पाहिजे.)

किसन शिंदे's picture

28 Apr 2017 - 2:03 pm | किसन शिंदे

हे लिहिलेत ते चांगले झाले. त्यामुळे हातात तलवारी घेऊन धाऊन येणार्‍यांचे अर्धे बळ कमी झाले असेल ! =))

(तरीही, काही उच्च्कोटीचे टीकाकार 'स्व'ला कुरवाळत दोनचार वार करणार नाहीत याची खात्री नाहीच म्हणा. तसे झाले तर त्यांना सरळ फाट्यावर मारा ;) :) कलाकाराला आपल्या मस्तीत राहता यायला पाहिजे.)

काका, चांगलेच शेलके जोडे हाणता की हो तुम्ही ;)

विशाल कुलकर्णी's picture

28 Apr 2017 - 5:12 pm | विशाल कुलकर्णी

खरय देवा :)

एस's picture

28 Apr 2017 - 1:05 pm | एस

वॉव ! फारच सुंदर.

पद्मावति's picture

28 Apr 2017 - 1:18 pm | पद्मावति

सुरेखच.

सुंदर ! चित्रकलेत मला फार कळत नाही पण बघून छान वाटलं एवढं नक्कीच सांगता येतं.

बाकी ते शाईपेन कोणतं आहे ?

दाते प्रसाद's picture

28 Apr 2017 - 4:49 pm | दाते प्रसाद

हे पेन बहुतेक Jinhao कंपनीचे आहे

विशाल कुलकर्णी's picture

28 Apr 2017 - 5:11 pm | विशाल कुलकर्णी

धन्यवाद :)
Parker Vector CT Fountain Pen, Stainless Steel !
http://www.amazon.in/Parker-Vector-Fountain-Stainless-Steel/dp/B00LM4SJW...

विशाल कुलकर्णी's picture

28 Apr 2017 - 5:23 pm | विशाल कुलकर्णी

सॉरी, या चित्रातला पेन Boer Boer या कंपनीचा आहे. माझ्याकडे या दोन्ही कंपनीच्या पेन्सबरोबर (पार्कर आणि बोएर...) जुने एअरमेलचे सुद्धा दोन शाई पेन आहेत.

सप्तरंगी's picture

28 Apr 2017 - 1:30 pm | सप्तरंगी

मला आवडले..

"बराच गॅप पडलेला असल्याने लाइन्स आणि स्ट्रोक्स खुप कमजोर झालेत." हे लिहिलेत ते चांगले झाले. त्यामुळे हातात तलवारी घेऊन धाऊन येणार्‍यांचे अर्धे बळ कमी झाले असेल ! =))

अगदी खरे आहे

किसन शिंदे's picture

28 Apr 2017 - 2:00 pm | किसन शिंदे

मस्त काढलीयेत दोन्ही चित्रे

गवि's picture

28 Apr 2017 - 2:08 pm | गवि

फार मस्त रे दोन्ही..

अभ्या..'s picture

28 Apr 2017 - 4:09 pm | अभ्या..

मस्तच रे विशाल, आवडले.
आणि सायकल, पोहण्याप्रमाणे असते हे चित्रकला, कमजोर बिमजोर कै नै हू द्यायचे. कॉन्फीडन्सचा मामला असतो सगळा. दनकून स्ट्रोक्स हानायचे.
बाकी एक्काकाका म्हणतेत ते एकदम परफेक्ट. मस्तीत राह्यायाचं आर्टिस्टने. उलूसा आर्टिस्ट असलो तरी मीपण तेच करतो. ;)
फक्त मस्ती म्हणून मी हाताने काढलेली चित्रं जास्त दाखवतच नाही इथे. बॅनरचे ग्राफीक्स बिफिक्स काय फोटोशॉपचा खेळ आहे. ;)
आपले मिपाकर त्याचं पन कौतुक करतेत म्हनून आजकाल जास्त मस्ती चढलीय. ;)

पिलीयन रायडर's picture

28 Apr 2017 - 7:14 pm | पिलीयन रायडर

ते माज वगैरे चढलायशी सहमत आहेच.. ;)

आणि तुझी स्केचेस पाहिलेली नाहीत हे ही खरंच. एखादं दुसरं टाक की. किंवा आधी कधी मिपावर टाकली असतील तर लिंक दे.

इरसाल कार्टं's picture

29 Apr 2017 - 10:51 am | इरसाल कार्टं

बॅनरचे ग्राफीक्स बिफिक्स काय फोटोशॉपचा खेळ आहे.

कल्पकता मात्र तुमचीच असते ना... ती बुद्धी फोटोशॉपला नाही.
नाहीतर फोटोशॉप मलाही येतं थोडंफार पण जात्याच असावी लागणारी कल्पकता नाही हो.

नि३सोलपुरकर's picture

28 Apr 2017 - 4:20 pm | नि३सोलपुरकर

विशाल राव ..मस्त , रेखाटन आवडले.
लेख,कविता आणि आता चित्रकला... वाह .मस्त एकदम .

चित्रगुप्त's picture

28 Apr 2017 - 4:24 pm | चित्रगुप्त

छान आहेत दोन्ही.

मोराचे स्केच निव्वळ कल्पनेतल्या चित्रावरून केलेय. गेट वे ऑफ इंडिया मात्र समोर बसून करायचा प्रयत्न केलाय.

हे खूप चांगले करत आहात. चित्रावरून वा फोटोवरून बघून अजिबात चित्रं काढायची नाहीत, ही खूणगाठ मनाशी बांधून धावू द्या चित्रकलेचा घोडा भरधाव. शुभेच्छा.

विशाल कुलकर्णी's picture

28 Apr 2017 - 5:14 pm | विशाल कुलकर्णी

नक्की देवा ! धन्यवाद ..

उल्का's picture

28 Apr 2017 - 4:32 pm | उल्का

मस्त!

विशाल कुलकर्णी's picture

28 Apr 2017 - 5:12 pm | विशाल कुलकर्णी

मनःपूर्वक आभार मंडळी !

सचु कुळकर्णी's picture

28 Apr 2017 - 5:26 pm | सचु कुळकर्णी

उच्च्कोटीचे टीकाकार 'स्व'ला कुरवाळत दोनचार वार करणार नाहीत याची खात्री नाहीच म्हणा. तसे झाले तर त्यांना सरळ फाट्यावर मारा ;) :)

सानझरी's picture

28 Apr 2017 - 5:39 pm | सानझरी

दोन्ही स्केचेस झकासच!! Facebook वर Urban Sketchers Mumbai आणि Urban Sketchers Pune असे ग्रुप आहेत. on the spot sketching करण्यावर यांचा भर असतो. दर शनिवारी आणि रविवारी हौशी Sketchers एकत्र येऊन स्केचिंग करतात. बरेच अनुभवी चित्रकारही येतात. खूप शिकायला मिळतं. जमलं तर येत जा तुम्ही पण..

विशाल कुलकर्णी's picture

28 Apr 2017 - 5:51 pm | विशाल कुलकर्णी

धन्यवाद ! बघतो गृप्स जॉइन करुन. जमलं तर नक्की येइन :)

स्रुजा's picture

28 Apr 2017 - 5:55 pm | स्रुजा

अरे वा ! गेटवे खास आवडलं.

मिपाकरांची व्यंगचित्रं काढा कोणीतरी.

सुरुवात बिरुटे,मग अगोबा-ढगोबा.

पिलीयन रायडर's picture

28 Apr 2017 - 7:14 pm | पिलीयन रायडर

दोन्ही रेखाटने आवडली!

विशाल कुलकर्णी's picture

28 Apr 2017 - 8:45 pm | विशाल कुलकर्णी

धन्यवाद मंडळी !

रुपी's picture

29 Apr 2017 - 1:05 am | रुपी

सुंदर!

आनंदयात्री's picture

29 Apr 2017 - 1:24 am | आनंदयात्री

छान आहेत स्केचेस. अजून येऊ द्या.

इरसाल कार्टं's picture

29 Apr 2017 - 10:54 am | इरसाल कार्टं

दोन्हीही खूप अवडलीत.

अभ्या..'s picture

29 Apr 2017 - 12:13 pm | अभ्या..

-

सपे-पुणे-३०'s picture

29 Apr 2017 - 12:30 pm | सपे-पुणे-३०

वा ! दोन्ही रेखाटने अतिशय सुरेख!
एक हौशी कलाकार म्हणून हा प्रयत्न करावासा वाटू लागलं.

चौथा कोनाडा's picture

29 Apr 2017 - 1:12 pm | चौथा कोनाडा

रेखाटने आवडली !

रेषेचा वेग चांगला आहे.
विकुदादा, आणखी रेखाटने पाहयला आवडतील.

पुचिशु.

गामा पैलवान's picture

30 Apr 2017 - 12:30 am | गामा पैलवान

विशाल कुलकर्णी,

तुमची चित्रं उत्तम जमलीयेत असं वाटतंय. मला चित्रकलेत काही म्हणजे काहीही गती नाही. अधिक पाहायला आवडतील.

आ.न.,
-गा.पै.

विशाल कुलकर्णी's picture

30 Apr 2017 - 11:31 pm | विशाल कुलकर्णी

धन्यवाद मंडळी !