पण लक्षात घेत कोण ?

भटकीभिंगरी's picture
भटकीभिंगरी in जनातलं, मनातलं
22 Apr 2017 - 10:42 pm

आपण नेहमी रिक्षाचालक रीक्षा बेजबाबदारपणेचालवतात असे म्हणतो .. कारण आपल्याला अनुभवही तसेच येतात .
परवाचेच पहा ना .. मी मासुंदा तलावाच्या बाजूने ओव्हर ब्रीजामुळे बनलेल्या एका चिंचोळ्या रस्त्याने सायकलवरून जात होते. बाजूने जवळूनच एक रिक्षा निघून गेली. लगेचच माझ्या डोक्याच्या मागच्या बाजूला फटका बसला .एकाएकी काय झाले ते मला कळेचना केवळ नशिबानेच मी पडले नाही . वाचले. समोर पाहिले तर आत्ता जी रिक्षा शेजारून गेली तिच्यातून केळीचा घड लागलेले केळीचे झाड बाहेर आले होते. त्या केळी लागलेल्या फांदिचाच जोरदार मार माझ्या डोक्याला लागला होता..रिक्षातून कोणीतरी समारंभासाठी केळीचे झाड नेत होते..खरे तर अशा प्रकारे सामान नेऊ नये. नेले तर चालकाने वाहन जबाबदारीने चालवायला पाहिजे.
पण लक्षात घेतो कोण ....

मांडणी

प्रतिक्रिया

भिंगरी's picture

22 Apr 2017 - 10:46 pm | भिंगरी

जास्त लागले नाही ना?
दैव बलवत्तर म्हणून पडली नाहीस.

भटकीभिंगरी's picture

22 Apr 2017 - 10:57 pm | भटकीभिंगरी

भटकी भिंगरी आहे ना.. पडले तरी उठुन फिरायला सुरवात ...

भटकीभिंगरी's picture

22 Apr 2017 - 10:57 pm | भटकीभिंगरी

भटकी भिंगरी आहे ना.. पडले तरी उठुन फिरायला सुरवात ...

अरूण गंगाधर कोर्डे's picture

23 Apr 2017 - 11:40 am | अरूण गंगाधर कोर्डे

बेफिकिरी हा आपल्याकडचा स्थायी भाव आहे. रिक्षावालेच कशाला, इतर वाह न चालकही असेच वागतात. मुख्यतः दुचाकी वाले. यापुढे काळजी घ्यावी. थोडक्यात बचावलात.

आणी पादचरी
मला तर वाटते ज्या प्रमाणे वहान चालवताना सेलफोन वापरण्या वर बंदी आहे तसेच रस्त्यावर चालताना फोन वर बोलण्या वर हवी
थांबा आणी बोला. मग पुढे जा

अरूण गंगाधर कोर्डे's picture

23 Apr 2017 - 5:44 pm | अरूण गंगाधर कोर्डे

खरं आहे.

आणी पादचरी
मला तर वाटते ज्या प्रमाणे वहान चालवताना सेलफोन वापरण्या वर बंदी आहे तसेच रस्त्यावर चालताना फोन वर बोलण्या वर हवी
थांबा आणी बोला. मग पुढे जा

नशिबाने वाचलात. सायकललाही रिअर व्ह्यू मिरर असावा, किमान उजव्या बाजूला, असे प्रकर्षाने वाटते. मी माझ्या सायकलला बसवून घेतला आहे. खूप उपयोग होतो शहरातल्या रहदारीतून सायकल चालवताना.

पैसा's picture

23 Apr 2017 - 2:29 pm | पैसा

अरे बापरे!