मराठी मालिका आणि एडिटिंगचा आनन्दीआनन्द

झपाटलेला फिलॉसॉफर's picture
झपाटलेला फिलॉसॉफर in काथ्याकूट
21 Apr 2017 - 8:32 pm
गाभा: 

गेले काही दिवस झी मराठी वरच्या मालिका पाहताना प्रचण्ड मानसिक त्रास होतो ... कारण नसताना घेतलेले क्लोज-अप्स , पात्रांच्या संवादातले अनावश्यक पॉझेस , कथासूत्रातला कर्मदरिद्रीपणा आणि पात्रांचे स्वभाव अतिशय बटबटीत पणे रंगवणे यासारख्य असंख्य बिनडोक चुकानी भरलेल्या या सीरियल पाहण्यात समस्त महिला वर्गाच्या सन्ध्याकाळी बर्बाद होत आहेत याचे खरोखर वैशम्य वाटते

अगदी चान्गल्या गाजलेल्या कादम्बर्‍यान्वर आधारित मालिका केल्या तरी दिग्दर्शक आणि एडिटर्स त्या कथेची / संकल्पनेची माती करतात असा अनुभव आहे... बापजन्मात कधी हे लोक हॉलीवुड च्या लेव्हल्स च्या सीरियल बनवू शकतील का? असा प्रश्न पडतो.

अमेरिकन टीव्ही वरच्या डेली सोप सीरियल्स चे प्रमाण कमी करून तिथे वीकली सीरिज दाखवण्याचा ट्रेन्ड वाढल्यामुळे तिकडे गुणवत्तेत सकारात्मक बदल झाला आहे ... आपल्याकडे देखील तो ट्रेन्ड सुरु व्हायला हवा आहे . पूर्वी दूरदर्शन च्या जमान्यात वीकली सीरिज असल्यामुळे दर्जा उत्तम होता.....

प्रतिक्रिया

आदूबाळ's picture

21 Apr 2017 - 8:46 pm | आदूबाळ

काहीही काय राव! मला तर लय आवडतात या सिरियेल!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

22 Apr 2017 - 11:55 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

अगदी अगदी. जानवीची डिलिव्हरी झाली का हो आ.बा.?

आदूबाळ's picture

22 Apr 2017 - 2:12 pm | आदूबाळ

कप्तान - चांगलं काय आहे ते कळण्यासाठी वाईट काय तेही माहीत असायला पाहिजे ना.

जानवीचं पोर आता केजीत असंल. आता मोनिकाच्या मुलीची चिंता वाहा.

अभिजीत अवलिया's picture

23 Apr 2017 - 3:22 pm | अभिजीत अवलिया

+ १००
मी अधून मधून(महिन्यातून एकदा दोनदा) बघतो ह्या मालिका. फक्त बघताना कॉमेडी सिरीयल समजून बघायचे की खूप मजा येते.

सागर's picture

21 Apr 2017 - 8:52 pm | सागर

टीव्ही मालिकांच्या दर्जाबद्दल हा धागा एक रेकॉर्ड करणार हे नक्की..
थोडे मुद्दे:
१. पांचट्पणे तेच तेच जोक्स व ओव्हर एक्टींग करुन मूळ चांगल्या कल्पनेची वाट लावणे
२. अभिनेते चांगले पण कथानकच पकड न घेणारे
३. कथानक छान पण लांबण फार

अशा प्रकारचे अनेक मुद्दे विचारात घेऊन टीव्ही सिरियल्स ची जमेची व टीकेची अशा दोन्ही बाजू मांडता येतील.
टीका करण्यासाठी उदाहरणार्थ नकटीच्या लग्नाची सिरियल घेतो. ओव्हर एक्टींग एवढी आहे अक्षरशः अंगावरचे केस उभे राहतात
स्तुती करण्यासाठी उदाहरणार्थ चूकभूल द्यावी घ्यावी सिरियल घेता येईल. दिलिप प्रभावळकर आणि सुकन्या मोने यांचे अफलातून टायमिंग या सिरियलमधे जान आणते.
अनेकदा अगदी कथा दर्जेदार नसली तरी सुद्धा.

अशी सर्व बाजूंनी चर्चा झाली तर मजा येईन या धाग्यावर.

मंदार कात्रे's picture

22 Apr 2017 - 11:24 am | मंदार कात्रे

कारण नसताना घेतलेले क्लोज-अप्स , पात्रांच्या संवादातले अनावश्यक पॉझेस , कथासूत्रातला कर्मदरिद्रीपणा आणि पात्रांचे स्वभाव अतिशय बटबटीत पणे रंगवणे यासारख्य असंख्य बिनडोक चुका

१०००% सहमत

विकतचा मनस्ताप आहेत ह्या सीरियल म्हणजे

प्रसाद_१९८२'s picture

22 Apr 2017 - 12:44 pm | प्रसाद_१९८२

कारण नसताना घेतलेले क्लोज-अप्स , पात्रांच्या संवादातले अनावश्यक पॉझेस , कथासूत्रातला कर्मदरिद्रीपणा आणि पात्रांचे स्वभाव अतिशय बटबटीत पणे रंगवणे यासारख्य असंख्य बिनडोक चुकानी भरलेल्या या सीरियल पाहण्यात समस्त महिला वर्गाच्या सन्ध्याकाळी बर्बाद होत आहेत याचे खरोखर वैशम्य वाटते

---

असे प्रसंग नसणारी, एकादी टिव्ही मालिका तुम्ही का नाही बनवत हो टफी?

---

गेले काही दिवस झी मराठी वरच्या मालिका पाहताना प्रचण्ड मानसिक त्रास होतो ...

---

ह्या मालिका पहायला झी मराठीने तुम्हाला काय स्पेशल आवताण दिले होते की काय? शिवाय झी टिव्हीवर दाखविण्यात येणार्‍या सर्व मालिका मानसिक त्रास देणार्‍या व इतर माध्यमांत दाखविलेल्या मालिका मानसिक आनंद देणार्‍या असे काही आहे का ?

विशुमित's picture

22 Apr 2017 - 4:58 pm | विशुमित

हा टफी चा धागा नाही आहे.

ते आता अभ्यासू लेख टाकत आहेत मिपावर..!!

प्रसाद_१९८२'s picture

22 Apr 2017 - 5:37 pm | प्रसाद_१९८२

झपाटलेला फिलॉसॉफरटर्बोचार्जड फिलॉसॉफर या दोन सारख्या नावांमुळे घोळ झाला.

---
चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. :)

गॅरी ट्रुमन's picture

22 Apr 2017 - 1:54 pm | गॅरी ट्रुमन

या सीरियल पाहण्यात समस्त महिला वर्गाच्या सन्ध्याकाळी बर्बाद होत आहेत याचे खरोखर वैशम्य वाटते

त्यांच्यावर या सीरीयली बघितल्याच पाहिजेत अशी कोणी सक्ती केल्याचे ऐकिवात नाही. या सीरीयली लोक स्वखुषीने बघत असतील तर त्याविषयी इतरांना तक्रार असायचे कारण काय?

दशानन's picture

22 Apr 2017 - 3:53 pm | दशानन

+१
माझी आई (वय 60+)
बायको (वय सांगू शकत नाही)
मुलगी ( वय ०.६)
तिघी टक लावून सर्व मालिका पाहतात, इव्हन संध्याकाळी एक प्राणी म्हणजे मी घरात असूच नये असे देखील त्यांना वाटते.
मी आपला नेट जिंदाबाद!

बोका-ए-आझम's picture

23 Apr 2017 - 2:50 pm | बोका-ए-आझम

संपूर्ण जबाबदारी दिग्दर्शकाची असते. संकलकावर उगाचच बिल फाडण्याचे कारण काय? उलट ते मालिका त्यातल्यात्यात सुसह्य करतात फापटपसारा कमी करुन. बाकी नेटफ्लिक्स, अमेझाॅन प्राईम आणि हाॅटस्टार यांच्यामुळे या सीरियल्सची कटकट कायमची गेली आहे. घरच्या बायकाही Voot वर सीरियल्स बघताहेत. त्यामुळे टीव्ही हा काही वर्षांत निदान शहरांत तरी शोभेची वस्तू होईल. मग असे धागे काढणाऱ्यांचे काय होईल? त्यांना आपलं म्हणा.

मी-सौरभ's picture

26 Apr 2017 - 4:22 pm | मी-सौरभ

जसे प्रेक्षक बदलतील त्याप्रमाणे मालिका बदलतील. आपण ईथे काथ्याकूटून काही होणार नाही. तुमच्या घरच्या स्त्रीवर्गाकडून रिमोट हिसकावून घ्या आणि त्यांना चांगल्या मलिका (ईंग्रजी असल्या तरीही) बघायला लावा.

तेव्हाच खरी क्रांती सुरु होईल (टीव्हीवर की समोर हे मात्र काळचं ठरवेल)

आमच्या शुभेच्च्छा!!

पैसा's picture

26 Apr 2017 - 4:41 pm | पैसा

काहीही हं सौरभ! ये नहीं हो सकता!

कपिलमुनी's picture

26 Apr 2017 - 6:22 pm | कपिलमुनी

घरच्या स्त्रीवर्गाकडून रिमोट हिसकावून घ्या

मिपा इतिहासातील सर्वात विनोदी वाक्य !

मंदार कात्रे's picture

6 May 2017 - 7:27 pm | मंदार कात्रे

सुमारे ३० वर्षांपूर्वी मुंबई दूरदर्शनवर 'गोट्या' नावाची मालिका सुरू झाली आणि त्या काळातली लहान मुलंच नव्हे तर मोठी माणसंही एका वेगळ्याच विश्वात दंग होऊन गेली. तो आ ठवणींचा हिंदोळा होता. खरं तर ती मालिका सुरू झाली, त्या काळातल्या लहान मुलांना, त्या मालिकेतलं विश्व हे पूर्णपणे अनोखं होतं. अगदी अस्सल मराठमोळं असूनही! त्याला कारणच वेगळं होतं.
टीव्हीच्या असंख्य मालिका घराघरांत जाऊन पोहोचल्यानंतर त्या मुलांचं भावविश्व बदलून गेलं होतं आणि त्यामुळेच त्यांना १९४०-५०च्या दशकातल्या त्या मराठमोळ्या वातावरणात काहीच सुचेनासं झालं होतं. पण त्या मुलांच्या आई-वडलांनाच नव्हे तर आजी-आजोबांनाही मात्र ती मालिका पाहावीशी वाटत राहिली याचं प्रमुख कारण म्हणजे टीव्हीचा जन्म होण्यापूर्वीचं ते विश्व त्यांचं होतं आणि तितक्याच अस्सलपणे ते लेखनातून उतरलं होतं. ते यश १९४०च्या दशकातले प्रख्यात बालसाहित्यकार ना. धों. ताम्हनकर यांचं होतं.
त्या म्हणजे १९४०च्या दशकात टीव्ही सोडाच रेडिओही दुर्मिळ असतानाच्या काळात माणसं आपला वेळ हा वाचनातच घालवत असणार, हे नव्यानं सांगण्याची गरज नाही. तरुण-तरुणींसाठी आणि प्रौढांसाठीही त्या काळात विविध प्रकारचं वाङ्मय सहजतेनं उपलब्ध होत असतानाच्या त्या काळात लहान मुलांसाठी फारसं काही वाचायला उपलब्ध नसे. ती गरज भा. ल. तथा काका पालवणकर यांनी 'खेळगडी' नावाचं मासिक सुरू करून मोठ्या प्रमाणात भरून काढली.
प्रामुख्यानं शाळकरी मुलांसाठी असलेलं ते मासिक अल्पावधीतच लोकप्रिय होऊन गेलं आणि त्याच मासिकातून 'गोट्या' नियमितपणे वाचकांच्या भेटीला येऊ लागला. ताम्हनकरांनी गोट्याची व्यक्तिरेखा इतक्या अकृत्रिम शैलीत साकार केली होती की बघता बघता तो तुमच्या आमच्या घरातलाच एक होऊन गेला. खरं तर तो कोणाच्याच घरातला नसतो.
एकुलती एक मुलगी असलेल्या एका कुटुंबाला हा मुलगा अवमानित जिणं जगत असताना सापडतो आणि ते दादा-वहिनी गोट्याला घरी आणण्याचा निर्णय घेतात. सुमाला तर भाऊ मिळतोच पण त्याचबरोबर महाराष्ट्रातील तमाम मुलामुलींना आपल्या हक्काचा असा एक सवंगडी खेळायला मिळतो.
गोट्या हा चतूर तर असतोच, त्याचबरोबर विनयशीलही. नाना प्रकारचे खेळ आणि बौद्धिक करामती त्याला अवगत असतात. त्यामुळेच तो केवळ दादा-वहिनी आणि सुमा यांचं त्रिकोणी कुटुंब चौकोनी करून सोडतो, असं नाही तर तुमच्या आमच्या घरातही आनंदाचं निधान घेऊन येतो.
ताम्हनकरांचा या लेखनामागचा हेतू अगदी स्पष्ट आहे. पुढे या मालिकेचे पुस्तक रूपानं तीन भागांत प्रकाशन झाले, तेव्हा दुसर्‍या भागाच्या प्रस्तावनेत त्यांनी तो उघड केला आहे. ‘बालजनांशी हसून खेळून त्यांच्या मनोविकासाला मदत करणारा एखादा सवंगडी त्यांना मिळवून द्यावा, ही मनातली इच्छा गोट्याच्या रूपाने मूर्त स्वरूपास गेली...’ असे त्यांनी लिहिले आहे. काय करतो हा गोट्या नेमकं? तो शाळेत एक हुषार विद्यार्थी म्हणून गणला तर जात असतोच पण त्याचवेळी तो गुरूजनांना अडचणीत आणणार्‍या, शिक्षकवर्गाला त्रास देणार्‍या विद्यार्थ्यांची खोडकी जिरवण्याचं कामही मोठ्या कौशल्यानं करत असतो. हे करताना तो लहानपणी शाळेत मुलं ज्या युक्त्या-प्रयुक्त्या, योजतात, त्याच योजत जातो. प्रसंगी तो दांगडधिंगाही घालतो पण ते सारं करतानाचा त्याचा हेतू स्पष्ट असतो. त्याचवेळी तो घरातल्या सुमावर मनापासून माया करत असतो.
सुमा आणि तिच्या मैत्रिणींची कोणी छेड काढत असेल, तर तो त्या मवाल्यांना चांगलाच इंगाही दाखवतो. दिवाळीत तो आकाशकंदिल तर करणारच पण त्याचवेळी सुट्टीत काही थोडंफार काम करून मिळणारा अल्पस्वल्प मोबदला हा गरीब विद्यार्थ्यांच्या कामी लावणार!’ मग असा हा सत्शील गोट्या तुमच्या आमच्या मनावर गारूड घालून न जाता तरच नवल...
आज गोट्या तुमच्या आमच्या भेटीला आला, त्यास जवळपास सात दशकं लोटली आहेत. तरीही गेल्या पिढीबरोबरच आजच्या सुजाण विद्यार्थीवर्गालाही तो हवाहवासा वाटतो, यापेक्षा ताम्हनकरांच्या लेखनाचं आणखी यश ते काय सांगायचं?
या मालिकेतील गोट्याचे काम करणारा जॉय घाणेकर आज अमेरिकेत सेटल असून एका मल्टिनॅशनल कंपनीत उच्चपदस्थ आहे ...
चला तर मग आता झुलूया या आठवणीन्च्या हिंदोळ्यावर॔ ...
पहा संपूर्ण गोट्या मालिका यूट्यूब वर
https://www.youtube.com/watch?v=hnEN-PVMGyg&list=PL95VKZqaZGF5tC2ToMJXCD...

पाटीलभाऊ's picture

8 May 2017 - 6:40 pm | पाटीलभाऊ

धन्यवाद...लिंक शेअर केल्याबद्दल...!

कात्रे साहेब खूप खूप आभारी आहे अश्या सुंदर मालिकेचे URL शेअर केल्याबद्दल