विवाह मंडळ

सचिन७३८'s picture
सचिन७३८ in काथ्याकूट
12 Apr 2017 - 8:10 pm
गाभा: 

नमस्कार,
आंतरजातीय व आंतरधर्मिय एखादे चांगले विवाह मंडळ असल्यास जाणकारांनी सुचविणे. पत्रिका व विधी यांवर विश्वास नाही. थोडक्यात कोर्ट मॅरेज करण्यास तयार. तज्ज्ञ मंडळींच्या सल्ल्याच्या प्रतिक्षेत…

प्रतिक्रिया

संजय क्षीरसागर's picture

12 Apr 2017 - 8:48 pm | संजय क्षीरसागर

तुमचा हेतू शुद्ध आहे.
नजर शोधक असली आणि थोडं धाडस असलं की मॅरेज ब्यूरोची गरज नाही.

स्रुजा's picture

12 Apr 2017 - 9:07 pm | स्रुजा

धाडस?

सावधान ! असा सल्ला दिला तर चालेल का हो धागा लेखक? :P

सावधान ऐकून पळू नका. संकट हारतुरे घेऊन पलीकडे उभे असते. ते टाळल्यास शेजारी.
कुठेतरी गाठेलच. तर आता तुम्ही सुंदर संकटाच्या शोधात आहात.

अप्पा जोगळेकर's picture

13 Apr 2017 - 1:13 pm | अप्पा जोगळेकर

ते ठीक आहे हो. पण तरणी पोरे गळ टाकून जरासुद्धा वाट पाहात नाहीत हल्ली.
सकाळी मुलीशी ओळख झाली की संध्याकाळी यांना लगेच लॉजवर जायचे असते.
मग पोपट होतो आणि इथे धागे काढत बसतात.

सचिन७३८'s picture

13 Apr 2017 - 6:49 pm | सचिन७३८

तुम्ही नक्की कोणाबद्दल बोलताय ते कळू शकेल का?

अप्पा जोगळेकर's picture

14 Apr 2017 - 10:36 am | अप्पा जोगळेकर

गमतीने लिहिले आहे हो.

कंजूस's picture

12 Apr 2017 - 8:51 pm | कंजूस

sunday times of india पाहा.

फेसबुक का कैतरी आहे म्हणे, बघा ब्वा.

प्रसाद गोडबोले's picture

13 Apr 2017 - 2:56 pm | प्रसाद गोडबोले

फेसबुक जुनं झालं राजे !

सध्या इन्स्टाग्राम आणि स्नॅपडील ची च्लती आहे !!

इन्स्टा समजुस शकतो मार्क्या,
हाऊ स्नॅपडिल?
काय गिफ्टा वगैरे देऊन चॅट करावे लागते काय? का अ‍ॅज अ प्रॉडक्ट म्हणून? दुन्या लैच पुढं चालली राव. :(

अनुप ढेरे's picture

14 Apr 2017 - 10:17 am | अनुप ढेरे

लग्नाचा बाजार स्नॅपडीलवरपण भरतो का?

पुण्यात 'साथ-साथ' म्हणून एक छान आणि प्रागतिक विचारमंच आहे. तिथे जाऊ शकता.

www.saathsaath.com

अत्रे's picture

13 Apr 2017 - 6:34 am | अत्रे

आजकाल बरेच विवाह मंडळ आंतरजातीय झाले आहेत. फक्त त्यात अपेक्षा वाचून ठरवायचे कॉन्टॅक्ट करायचा कि नाही. प्रोफाइलमधे लिहिले असते जातीची अट आहे की नाही वगैरे.

शब्दबम्बाळ's picture

13 Apr 2017 - 10:59 am | शब्दबम्बाळ

वायूमंडल धाग्याखाली विवाहमंडळ धागा पाहून आधी विडंबन वगैरे आहे कि काय वाटले! :)
मुलींपर्यंत पोहोचण्यासाठी तिच्या आजूबाजूला असणारे काही महत्वाचे थर पार करणे महत्वाचे!

भ्राताम्बर: जसे स्थितांबर अतिनील किरणे शोषून घेऊन त्यांना गायब करते तसाच हा थर मुलीच्या आजूबाजूला असणाऱ्या अति-nill मुलांना बाहेर फेकतो. हे करताना त्याचे तापमान वाढून वातावरण गरम देखील होत राहते.
बाकी मग पितांबर :P
मातांबर असे वेगळे थर आहेतच... पण लैच्च विषयांतर होतंय...

तुम्हाला शुभेच्छा!

अनुरुप का कायसं आहे म्हणे, गुगलून बघा.

त्यांचा मेळावा होता ९ तारखेला पुण्यात.