आईस क्रिम

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
10 Apr 2017 - 12:19 pm

आमच्या बालपणी " वाडीलाल..अमुल..वॉल्स"असे ब्रान्डेड आईसक्रिम नसायचे...
सुट्या लागल्या कि पॉट भा्डयानी आणायचा..्बर्फ आणायचा...खडे मिठ..आणायचे..
घरचे दुध साखर..त्यात आंबे वा कलिंगड घालुन ते मिश्रण पॉट मधे घालायचे बाजुनी बर्फ ्मिठ घालुन पोराना बसवायचे फिर्वायला....
फिरवताना जड जायला लागले कि समजायचे आईस क्रिम तयार झाले...
मग आतले भांडे अलगद बाहेर काढायचे..अन मस्त आईस क्रिम चापायचे..
आईस क्रिम फिरवत असताना ह्याच्या शर्टाच्या आत बर्फ टाक अश्या मज्या मस्करी चालायच्या

.

इतिहास

प्रतिक्रिया

औरंगजेब's picture

11 Apr 2017 - 7:44 am | औरंगजेब

ठाण्याला गावदेवी मैदानाजवळ जनसेवा आईसक्रीम आहे.( काहीजण त्याला जोगदेवाचे आईसक्रीम म्हणतात.) तो पॉट भाड्याने देतो.पण माणुस कटकट्या आहे. पॉट त्याच्याकडून स्वतःच न्यायला लागतो.

गामा पैलवान's picture

13 Apr 2017 - 5:26 pm | गामा पैलवान

औरंगजेब,

आम्ही तिथनंच आणायचो पॉट. बिल्डिंगीतली कार्टी आयसक्रीमांत कायकाय टाकायची. एकदा तर चक्क मिरच्या टाकलेल्या. सगळ्या तळाशी जाऊन बसल्या. शेवटी त्यासुद्धा खाल्ल्या! दुसऱ्या दिवशी दुसरीकडे तिखट लागल्या. पण कोठा बद्ध नसून सुळसुळीत होता. सगळं कसं बसल्याबसल्या आणि झपाट्याने होत होतं. अग्निशिखा सळसळल्याची जाणीवच जणू ती! काय तो दिव्यानुभव! सहसा कोणांस येत नाही असा परम दुर्मिळ हो! आम्हीच पहिले, या बाबतीत!!

आ.न.,
-गा.पै.

प्रमोद देर्देकर's picture

11 Apr 2017 - 8:41 pm | प्रमोद देर्देकर

अकु गोठलास काय आईसक्रिमचा लेख लिहता लिहिता.

अविनाशकुलकर्णी's picture

13 Apr 2017 - 5:21 am | अविनाशकुलकर्णी

नाही हो ..एक दीर्घ कथा लिहीत आहे

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

13 Apr 2017 - 9:46 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

दीर्घलेखन आवडलं. माझ्या लहानपणी ब्रँडवालं आईसक्रीम असुनही कधी कधी आम्ही पॉट आणायचो. परत एकदा आणुन पहायला लागणार. पिंचिं मधे कुठे मिळतो का हो आईसक्रीम पॉट?

सिरुसेरि's picture

13 Apr 2017 - 1:22 pm | सिरुसेरि

खत्री