मधुबनी ड्रॉईंग

सप्तरंगी's picture
सप्तरंगी in मिपा कलादालन
6 Apr 2017 - 6:57 pm

मिपा वर बाकी बरेच लेख - पाककृती वगैरे दिसतात पण कला दालनात कधीच चहेल-पहेल दिसत नाही. इथे कुणी काही पोस्ट हि करत नाही आणि कुणी फारसे फिरकतच नाही असे वाटते. मी खरे तर कला क्षेत्रात बरेच काही करते पण इथे कुणीच काही करताना दिसत नाही म्हणून लोकांना फारसा इंटरेस्ट नसावा असे मानून आणि असे लिहिणे हे पण एक कामच आहे हे जाणून तुमच्यासोबत कधीच काही share केले नाही. तरीही हा एक पहिलाच प्रयत्न.

मधुबनी 1:
माझे अतिशय साधे सोपे तरीही कोणत्याही घराची शोभा वाढवणारे असे मधुबनी ड्रॉईंग !! खरे तर हा माझा प्रांत नाही पण १/२ - १ तासाच्या फावल्या वेळात , जेंव्हा जास्त काही करण्यासाठी लागणारी बैठक अशक्यपप्राय गोष्ट असते तेंव्हा आणि कोणत्याही वेळी सुरु करून वाट्टेल तेंव्हा त्यात रेखा, चित्रे , विविध आकार यांची हवी तशी जुळवणी करण्यासाठी मी कधी कधी मधुबनी चित्रे काढते. त्यातलेच हे एक.

मधुबनी ड्रॉईंग

मधुबनी - थोडक्यात माहिती : तुमच्या आग्रहाखातर

मधुबनी हि बिहार च्या मधुबनी आणि मिथिला जिल्ह्यामधील एक लोककला आहे. पूर्वी लग्न-कार्याच्या वेळी फक्त घरातल्या बायकाच असे काम घरे सजवायला , भिंती , जमीन रंगवायला करायच्या. यात प्रामुख्याने घरातल्याच हळद, पाने , सिंदूर, शाई इत्यादींचा रंग बनवण्यासाठी उपयोग केला जायचा आणि हि बारीक कलाकुसर काडेपेटी, ब्रश , पेन, काड्या, बोटे यांचा उपयौग करून केली जायची. हि कलाकुसर पारंपरिक सणांवर आधारित असायची, ज्यात होळी. कालीपूजा, रामायण, स्वयंवर, सूर्य, देव-देवता, चंद्र , सूर्य , तारे , तुलसी वृंदावन , पिंपळ , हत्ती , घोडे, फुले , पाने आणि वेगवेगळ्या आकृत्या यांचा समावेश केला जात असे. यात बॉर्डर साठी सुद्धा काही खास आकार वापरले जातात. मुख्य म्हणजे या कलाकृतीत कोणताही भाग मोकळा ठेवला जात नाही आणि सहसा खूप भडक / कॉन्ट्रास्ट रंगांचा वापर केला जातो. यात काही patterns परत परत वापरले जातात. पॅटर्न चुकला तरी तो तसाचा पुढे वापरणे शहाणपणाचे ठरते. मधुबनीचे ४-५ प्रकार हि आहेत- कातचनी , भरणी , कोहबार, तांत्रिक , गोडना हि त्यांची नावे. सुरुवातीला अशी पेंटिंग्स फक्त कायस्थ , ब्राम्हण बायका करत असत असे मानले जाते. कालांतराने या कलाकृतीचे रूपांतर सर्वांच्याच उपजीविकेचे साधन म्हणून करण्यात येऊ लागले आणि घरातील इतर पुरुषमंडळी हि त्यांना साथ देऊ लागली आणि हि कला पुढे चालत , वाढत, फुलत, बहरत आपल्यापर्यंत येऊन पोहोचली.

आज हि या सर्व गोष्टींचा समावेश आधुनिक पेंटिंग्स मध्ये केला जातो पण नवीन कलाकारांनी त्यातून जीवन आवश्यक वस्तू बनवायला सुरुवात केली. कार्ड्स, पेनस्टॅण्ड, टी कोस्टरस, दगडावर पेंट करून वेटहोल्डर, ड्रेसेस वरील डिझाईनस , लॅम्पशेड्स, काचेच्या डिश वर काम करणे अशी अनेक युक्त्या लढवून या कलेचा आपल्या जीवनात समावेश केला जाऊ शकतो. अर्थात त्यासाठी पूर्वकालीन झाडे , पाने , फुले याच्या रंगापेक्षा आम्ही acrylic रंग वापरतो. हॅण्डमेड पेपर वर तर आजची मधुबनी पेंटिंग्स खुलून दिसतात आणि एकदा का हात बसला कि ती करायला पण अतिशय सोपी तरीही सुंदर दिसतात. अर्थात खूप बारकाईने काम करावे लागते. पण अगदी ५-७ रंगांचा वापर नाही केला तरी २-३ रंगांमध्येही कलाकृतीला उठाव येतो. किंबहुना मला तर २-३ रंगाचा वापर केलेले पेंटिंग्स जास्त आवडतात, नजरेला सुखावह वाटत. ते बघणार्याच्या आवडीवर अवलंबून आहे.

तर अतिशय सोपे हे मधुबनी प्रकरण, काहीही अशक्यप्राय असे नाही यात, फक्त थोडी चिकाटी आणि बारीक नजर हवी. करून पहाच !!

प्रतिक्रिया

तसे काही नाही. बरेचसे मिपाकर हे उत्तम कलाकार आहेत. इथे जास्तकरून आपली कला सादर करीत नाहीत त्याला काही कारणे असतील. पण आमच्यासारख्या कलेचा फारसा गंध नसलेल्यांना कलादालनातील धागे नेहमीच पाहावेसे वाटतात.

तुमचे हे रेखाटन आवडले. ह्यानिमित्ताने मधुबनी चित्रशैली म्हणजे काय ह्यावर थोडेसे लिहिल्यास अजून वाचनीय होईल.

आणि अर्थातच, अजून येऊद्यात अशी चित्रे.

शब्दबम्बाळ's picture

6 Apr 2017 - 8:27 pm | शब्दबम्बाळ

"पण आमच्यासारख्या कलेचा फारसा गंध नसलेल्यांना कलादालनातील धागे नेहमीच पाहावेसे वाटतात."
घ्या!! केव्हडी ती विनम्रता! :D

पिलीयन रायडर's picture

21 Apr 2017 - 10:38 pm | पिलीयन रायडर

वा! वा! काय प्रतिसाद.. कलेचा गंध नाही म्हणे!!

बबन ताम्बे's picture

6 Apr 2017 - 7:48 pm | बबन ताम्बे

मधुबनी कलेबद्द्ल अजुन माहीती घ्यायला आवडेल.

@एस,
तुमच्यासारखे कसलेले कलाकार कलेचा गंध नाही म्हणताय !! मग आम्ही हक्काने कुणाचं मार्गदर्शन घ्यायचं ? :-)

सप्तरंगी's picture

6 Apr 2017 - 8:07 pm | सप्तरंगी

@ एस - मलाही आवडेल तुमची चित्रे / पेंटिंग्स पाहायला, लिंक द्या ना जमल्यास.

मधुबनी / मिथिला पेंटिंग या लोककलेबद्दल बद्दल बाकी इतर कलाकारांना जी माहिती आहे तीच मलापण आहे . मी यात फार जास्त किचकट असे काम अजून तरी केलेले नाही आणि तुम्हा दिग्गजांसमोर मी अजून वेगळे असे काय लिहिणार ?

बाकी मी जे केले आहे ते करते पोस्ट , आभार तुमच्या प्रतिक्रियेबद्दल !!

पिलीयन रायडर's picture

21 Apr 2017 - 10:47 pm | पिलीयन रायडर

हा घ्या एक नमुना. मी एस भाऊंना केवळ एक-दोन फोटो दिले आणि सांगितलं की साधारण ह्या कल्पनेवर आधारित मुखपृष्ठ करुया का? एखादं स्केच देऊ शकाल का? तर त्यांनी अक्षरशः काहीच तासात कुणाकडुन तरी एक कागद मागुन घेऊन पटकन हे चित्र काढुन पाठवले. गोष्ट तशी.." मध्ये ते आम्ही सरळ मुखपृष्ठ म्हणुन वापरले आहे इतके ते गोड आहे!

तुमचे मधुबनी पेंटींगही आवडले. सुंदर आहे अगदी!

1

रातराणी's picture

6 Apr 2017 - 8:10 pm | रातराणी

हॉ!

शब्दबम्बाळ's picture

6 Apr 2017 - 8:31 pm | शब्दबम्बाळ

सुरेख!
मधुबनी चित्रांविषयी मिपावरच कोणाचा तरी धागा येऊन गेला आहे बहुतेक... नक्की आठवत नाही!
त्यात सूर्य वगैरे मोठा दाखवला होता असे काहीसे अंधुक आठवतंय...
बघू मीही थोडासा प्रयत्न करेन याचा, बरेच महिने असेच गेले...
धन्यवाद या धाग्याबद्दल! :)

शब्दबम्बाळ's picture

6 Apr 2017 - 10:42 pm | शब्दबम्बाळ

धागा मिळाला! :)
ईथे पहा!

सप्तरंगी's picture

7 Apr 2017 - 6:11 pm | सप्तरंगी

पहिले , सुंदर आहे

किसन शिंदे's picture

6 Apr 2017 - 8:32 pm | किसन शिंदे

इतकं बारकाईने चित्र काढण्यासाठी बराच फावला वेळ आहे म्हणायचा की तुमच्याकडे. ;)

सप्तरंगी's picture

7 Apr 2017 - 6:16 pm | सप्तरंगी

बारीक रिकामटेकडी फावल्या वेळेत करायची कामे मुद्दाम वेळ काढून करायची आवड असते हो एकेकाला...मी त्यातलीच :))

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Apr 2017 - 8:38 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर चित्र !

त्याच्याबरोबर, कलाप्रकार (उदा, येथे मधुबनी) आणि चित्राच्या विषयावर थोडेस लिहिलेत तर अजून रोचक ठरेल... मग आपोआप प्रेक्षक-वाचक येतीलच.

मधुबनी म्हणजे काय?
धन्यवाद.

रुपी's picture

6 Apr 2017 - 9:45 pm | रुपी

सुंदर!

खरंच मलाही मधुबनीबद्दल आणखी वाचायला आवडेल. मधुबनी म्हणजे नक्की काय? काही ठराविक आकार, काही विशिष्ट प्रकारची नक्षी त्यात असलीच पाहिजे का?

पद्मावति's picture

6 Apr 2017 - 9:48 pm | पद्मावति

खरोखर सुंदर आहे.

मधुबनी - थोडक्यात माहिती : तुमच्या आग्रहाखातर

मधुबनी हि बिहार च्या मधुबनी आणि मिथिला जिल्ह्यामधील एक लोककला आहे. पूर्वी लग्न-कार्याच्या वेळी फक्त घरातल्या बायकाच असे काम घरे सजवायला , भिंती , जमीन रंगवायला करायच्या. यात प्रामुख्याने घरातल्याच हळद, पाने , सिंदूर, शाई इत्यादींचा रंग बनवण्यासाठी उपयोग केला जायचा आणि हि बारीक कलाकुसर काडेपेटी, ब्रश , पेन, काड्या, बोटे यांचा उपयौग करून केली जायची. हि कलाकुसर पारंपरिक सणांवर आधारित असायची, ज्यात होळी. कालीपूजा, रामायण, स्वयंवर, सूर्य, देव-देवता, चंद्र , सूर्य , तारे , तुलसी वृंदावन , पिंपळ , हत्ती , घोडे, फुले , पाने आणि वेगवेगळ्या आकृत्या यांचा समावेश केला जात असे. यात बॉर्डर साठी सुद्धा काही खास आकार वापरले जातात. मुख्य म्हणजे या कलाकृतीत कोणताही भाग मोकळा ठेवला जात नाही आणि सहसा खूप भडक / कॉन्ट्रास्ट रंगांचा वापर केला जातो. यात काही patterns परत परत वापरले जातात. पॅटर्न चुकला तरी तो तसाचा पुढे वापरणे शहाणपणाचे ठरते. मधुबनीचे ४-५ प्रकार हि आहेत- कातचनी , भरणी , कोहबार, तांत्रिक , गोडना हि त्यांची नावे. सुरुवातीला अशी पेंटिंग्स फक्त कायस्थ , ब्राम्हण बायका करत असत असे मानले जाते. कालांतराने या कलाकृतीचे रूपांतर सर्वांच्याच उपजीविकेचे साधन म्हणून करण्यात येऊ लागले आणि घरातील इतर पुरुषमंडळी हि त्यांना साथ देऊ लागली आणि हि कला पुढे चालत , वाढत, फुलत, बहरत आपल्यापर्यंत येऊन पोहोचली.

आज हि या सर्व गोष्टींचा समावेश आधुनिक पेंटिंग्स मध्ये केला जातो पण नवीन कलाकारांनी त्यातून जीवन आवश्यक वस्तू बनवायला सुरुवात केली. कार्ड्स, पेनस्टॅण्ड, टी कोस्टरस, दगडावर पेंट करून वेटहोल्डर, ड्रेसेस वरील डिझाईनस , लॅम्पशेड्स, काचेच्या डिश वर काम करणे अशी अनेक युक्त्या लढवून या कलेचा आपल्या जीवनात समावेश केला जाऊ शकतो. अर्थात त्यासाठी पूर्वकालीन झाडे , पाने , फुले याच्या रंगापेक्षा आम्ही acrylic रंग वापरतो. हॅण्डमेड पेपर वर तर आजची मधुबनी पेंटिंग्स खुलून दिसतात आणि एकदा का हात बसला कि ती करायला पण अतिशय सोपी तरीही सुंदर दिसतात. अर्थात खूप बारकाईने काम करावे लागते. पण अगदी ५-७ रंगांचा वापर नाही केला तरी २-३ रंगांमध्येही कलाकृतीला उठाव येतो. किंबहुना मला तर २-३ रंगाचा वापर केलेले पेंटिंग्स जास्त आवडतात, नजरेला सुखावह वाटत. ते बघणार्याच्या आवडीवर अवलंबून आहे.

तर अतिशय सोपे हे मधुबनी प्रकरण, काहीही अशक्यप्राय असे नाही यात, फक्त थोडी चिकाटी आणि बारीक नजर हवी. करून पहाच !!

फारच सुरेख चित्र. माहितीही आवडली.
सासं, ही माहितीवाली पोस्ट धाग्यात अपडेटवा की.

मधुबनी मध्ये केलेले हे तिसरे चित्र. हि तशी साधीच पण सुंदर (असे मला वाटते) चित्रे. कुठेतरी गणपती, हत्ती, रंग , भारतीय कला जवळची वाटते म्हणून आणि स्वतःचे क्रीयशन म्हणूनही.
जवळपास अशीच विविध रंगातील चित्रे मी केली होती आणि त्यातील काही आज काही घरांची शोभा वाढवत आहेत, याचा आनंद वाटतो.

****हा धागा मला कधीच वर दिसत नाहीये , शोधूनही पटकन सापडला नाही. शेवटी टाकलेली पोस्ट वरती असते ना ? आजकाल मिपा बघणे पूर्वीसारखे सोपे वाटत नाही. पूर्वीचा फॉरमॅट चांगला होता असे वाटते.

Madhubani-3

वा.. फार सुंदर आहे हे चित्र!
दुसरे चित्र मला दिसले नाही.

पण पहिल्या आणि तिसर्‍या चित्राच्या शैलीत थोडा फरक आहे का? तिसर्‍या चित्रात जरा नक्षीत सुटे-सुटेपणा आहे. पहिल्यात अगदी भरगच्च आहे.

हा धागा मला कधीच वर दिसत नाहीये , शोधूनही पटकन सापडला नाही. शेवटी टाकलेली पोस्ट वरती असते ना ?

'नवे लेखन'मध्ये ज्यावर शेवटी प्रतिसाद आलाय तो लेख वरती असतो. हा धागा शोधण्याचा तुमच्यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे डावीकडे 'माझे लेखन'वर टिचकी मारुन जे पान येईल त्यात पाहा. :)

यशोधरा's picture

21 Apr 2017 - 11:07 pm | यशोधरा

वा! किती सुरेख!

अहाहा! हत्ती क्लास आहेत!

पैसा's picture

22 Apr 2017 - 5:07 pm | पैसा

दुसरे चित्र मलाही दिसले नाही.

खटपट्या's picture

22 Apr 2017 - 11:20 pm | खटपट्या

खूप छान

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Apr 2017 - 2:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पेंटिंग्जही छान आहे.

-दिलीप बिरुटे

संजय क्षीरसागर's picture

30 Apr 2017 - 6:08 pm | संजय क्षीरसागर

क्रमांक तीनचं चित्र खरंच छान आहे. दोन नंबरचं मात्र काही दिसत नाही.

यानिमित्तानं मस्तकलंदरचा धागा आणि भारती दयालचा डेमो पाहून नेत्र सुखावले.