लेखन साठवून ठेवता यावं

इरसाल कार्टं's picture
इरसाल कार्टं in काथ्याकूट
5 Apr 2017 - 11:28 am
गाभा: 

नवे लेखन करताना बऱ्याचदा पूर्ण लेखन एकाच वेणी करता येत नाही त्यामुळे प्रत्येक वेणी एक वार्ड फाईल बनवून ठेवावी लागते आणि तिला घर-ऑफिस अशी मेल अथवा पेन ड्राईव्ह मध्ये फिरवावी लागते. फक्त लेखन असल्यास ठीक पण फोटो डकवण्यास मात्र हे कटकटीचे ठरते. एकाच वेळी सगळे फोटो डकवणे आणि लेख संपवणे जमत नाही आणि दिरंगाई वाढत जाते, मिपावर अश्या लेखनाचा draft ठेवण्याची सुविधा उपलब्ध झाल्यास माझ्यासारख्यांना खूप बरे होईल. ऑफिसात कॉल आल्यावर मधेच उठून जावे लागते आणि लेखन अधुरे राहते.
जर लिंक केलेले फोटो, व्हिडीओ लिंक स्वरूपात सुरक्षित राहिले तर लेखन लवकर संपण्यास सोपे जाईल.
यालाच दुसरा काही सोपा पर्याय कुणी वापरात असेल तर कृपया तोही कळवावा.

प्रतिक्रिया

नोटपॅड वापरा अन्यथा स्वतःला व्यनी करून ठेवा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Apr 2017 - 6:01 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मीही मला व्य नि करतो.

-दिलीप बिरुटे

माझ्याकडे पर्याय आहे तो १)सर्वच स्थळांसाठी २)ओफलाइन कामासाठी,३)तुटक तुटक काम,४)कोणत्याही डिवाइसकरता कधिही करण्यासाढी आहे.

इडली डोसा's picture

5 Apr 2017 - 11:07 pm | इडली डोसा

मी जिमेल मधे मराठी इन्पुट वापऋन लिहिते. दर मिनिटाला किंवा ठराविक फ्रिक्वेन्सीने ड्राफ्ट सेव्ह होतो. नंतर इथे कॉपी/पेस्ट करता येते.

मीही जीमेल मध्ये सेव्ह करते. इथे थोडं थोडं टाइप करुन कॉपी करुन जीमेलमध्ये पेस्ट करते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Apr 2017 - 12:11 am | डॉ सुहास म्हात्रे

मिपावर किंवा इतर ठिकाणी लिहिलेले तुमचे अर्धवट लेखन वर्ड / नोटपॅड / गुगल कीप / इत्यादीमध्ये जपून ठेवावे व पूर्ण झाल्यावर मिपावर प्रसिद्ध करावे.

गुगल ड्राइव्ह हा या साठी उत्तम पर्याय आहे,

मी नेहमी गूगल ड्राईव्ह वापरतो, त्यामुळे सगळी महत्वाची डॉक्युमेंट्स नेहमी उपलब्ध राहतात.

ओफलाइनसाठी उपयोगाचे आहेत का गुगल प्रॅाडक्टस?

उपयोजक's picture

1 May 2017 - 7:41 pm | उपयोजक

ही अॅप वापरा.जेमतेम दोनअडीच MB ची आहे. जास्त काही लिहित नाही.फिचर्स पहा. वापरा आणि अनुभव इथे लिहा.मी स्वत: दोन वर्षे वापरतोय.
https://play.google.com/store/apps/details?id=org.mightyfrog.android.sim...

ही लिंक

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 May 2017 - 2:27 pm | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !

लॅपटॉपवर वापरता येईल असे विंडो१० साठी काही अ‍ॅप आहे का ? मोबाईलवर टायपणे छळदायक वाटते !