एवढ्यात काय खरेदी केलंत?- ३

रेवती's picture
रेवती in काथ्याकूट
2 Apr 2017 - 11:03 pm
गाभा: 

नमस्कार मंडळी,
माझ्या आधीच्या धाग्याला भरपूर प्रतिसाद देऊन, मुख्य म्हणजे फक्त प्रतिसाद देण्यासाठी खरेदी करून तुम्ही मोठे काम केले आहे. "आता पुरे" म्हटल्यानंतरही तुम्ही न थांबण्याचे ठरवले आहे. मग विचार केला की आता तिसरा भाग काढूयात व तोही असाच यशस्वी करुयात. मागीलवेळी ज्यांना काही खरेदी करायची नव्हती त्यांनी मीठ मिरच्या का होईना घेतल्यात व त्याची नोंद इथे केलीत म्हणून आभार. हे धागे जतन केले गेले पाहिजेत म्हणजे अजून धा वीस वर्षांनी अमूक दिवशी तुम्ही भाजी खरेदी केलीत असे सिद्ध करता येईल. पूर्वी भाजीच्या किमती किती होत्या हे आपल्या पुढील पिढ्यांना कळणे सोपे जाईल. या धाग्यावर तुम्ही नवी खरेदी नमूद कराल या आशेसह प्रसिद्ध करीत आहे. माझी आजची अ‍ॅमेझॉन ऑर्डर साधारणपणे अशी असेल- मुलाच्या सेलफोनचा स्क्रीन व केस, माझा लेनोव्हो, ड्रायरच्या व्हेंटमध्ये पक्षी जातात म्हणून बर्ड स्टॉपर, ईअर रिंग्जचे सेफ्टी बॅक्स किंवा फिरक्या, डिशवॉशरचे डोअर सील.
धन्यवाद.

प्रतिक्रिया

गवि's picture

2 Apr 2017 - 11:18 pm | गवि

माती, खापर, धूळ यांचा पर्फ्यूम झाला घेऊन.

आता इतर काही विचित्र पण अावडणार्या वासांविषयी.

मला पेट्रोलियम (गॅसोलीन) टाईपचा पर्फ्यूम कुठे मिळेल का?

तसंच गॅरेजमधला धातू, ग्रीस, ऑईल्स वगैरेचा मिश्र वास.

लाकूड, सनमायका आणि कार्पेटयुक्त थंडगार एसीयुक्त केबिनमधे येणारा वास.

सोसायट्यांमधे फिरत फिरत डासप्रतिबंधक शुक्र धूर सोडणारी स्मोक गन.

आपणापैकी कोणाला असे जगावेगळे वास आवडतात का?

यापैकी काही वासांचे पर्फ्यूम्स सापडले पण सर्व फॉरेनवाले किंमती २० ते ३५ हजारपर्यंत. :-(

फटाक्यांची माळ फुटल्यावर येणारा वास मला भारी आवडतो !

गवि's picture

3 Apr 2017 - 3:13 pm | गवि

+१..

हा वास फटाके हाताळल्यावर हातांनाही येतो.

शिवाय हातात फुलबाजी तडतडत असताना नाकात शिरणारा विशिष्ट तप्त वास.

आपणापैकी कोणाला असे जगावेगळे वास आवडतात का?

बुकबायंडिंग केलेला नव्या नव्या पुस्तकाचा वास,
फ्लेक्स मशीन चालू असताना सॉल्व्हंटचा उग्र वास,
ऑफसेट मशीन क्लीन करताना थिनर आणि इंकचा मिक्स वास'
पेपरचे गट्ठे खोलताना येणारा विशेष वास,
गाड्या सर्व्हिसिंग करताना वॉश करतात तेंव्हाचा वास,
कीवी शू पॉलिशचा वास,
स्वेड लेदरचे शूज नवेनवे असताना येणारा वास.
.
ह्यातले बरेचसे रोजच्या अनुभवातले आहेत पण मला आवडतात ते.

आनंदी गोपाळ's picture

4 Apr 2017 - 10:00 pm | आनंदी गोपाळ

फ्लेक्स मशीन चालू असताना सॉल्व्हंटचा उग्र वास,
ऑफसेट मशीन क्लीन करताना थिनर आणि इंकचा मिक्स वास'
कीवी शू पॉलिशचा वास,

<<

हे सगळे नशा आणणारे आहेत, असे नोंदवितो.
यादीतले इतर याचेच डायल्यूटेड वास आहेत.

वास म्हणजे दुरून घेतलेली चव, हे माझे जुने निरिक्षण / फॅक्ट यानिमित्ताने इथे नोंदवितो.

आपणापैकी कोणाला असे जगावेगळे वास आवडतात का?

नुकतेच गवत कापल्यावरचा वास
सकाळी कॅफे मधला कॉफीचा वास ( का कोणास ठाऊक तसा सुगंध घरी कॉफी केली की नाही येत )
माती, खापर, धूळ यांचा पर्फ्यूम झाला घेऊन. आहा!
जसमीनचा एक पर्फ्यूम मागवला होता त्याचा वास मात्र अजीबात आवडला नाही. केयो कार्पिन तेल अंगावर फवारल्यासारखे वाटत होते.

अत्रुप्त आत्मा's picture

2 Apr 2017 - 11:44 pm | अत्रुप्त आत्मा

JBL C100SI In-Ear Headphones with Mic घेतला एव्हढ्यातच. https://images-na.ssl-images-amazon.com/images/I/61S3EAUpK7L._SL1500_.jpg https://images-na.ssl-images-amazon.com/images/I/61-PrxofcPL._SL1500_.jpg
कर्णरम्य आवाज आहे.

सावत्या's picture

2 Apr 2017 - 11:57 pm | सावत्या

खरतरं कालच हा धागा काढायचा ठरवलं होतं, पण कंटाळा केला. anyway धागा काढलाच आहे तर..

जुना सॅमसंग S3 वापरून ४ वर्ष झाली, अजून तरी चांगला चालतोय पण जरा स्लोलावलाय.. म्हणून नवीन मोबाईल घ्यायचं ठरवलं. दुबई शॉपिंग फेस्टिवल मध्ये काही विशेष ऑफर्स नव्हत्या. इथं अबूधाबीत GITEX डिजिटल एक्स्पो होतं ४ दिवस. इलेक्ट्रॉनिक्स वर जबरया सेल होता.आयफोन ७ प्लस कि S7 edge ड्युअल सिम मध्ये सॅमसंगने बाजी मारली. बरेच सुपरमार्केट्स आणि इलेक्ट्रॉनिक्स ऑउटलेट्स धुंडल्यानंतर LULU सुपरमार्केटला मस्त ऑफर मिळाली म्हणून S7 edge घेतला.
HP च्या जुन्या लॅपटॉपची तीच गत झालीय म्हणून DELL i7 7th generation 8GB रॅम, 15.6" डिस्प्ले लॅपटॉप घेतला. Bose वर काही ऑफर मिळतंय का बघतोय. होम थिएटर सिस्टिम घ्यायचीय.. बघू कधी शक्य होतंय.

स्वारी हां, मी नवा धागा काढून ताकल्याबद्दल. आता यापुढील तुम्ही काढा. १०० प्रतिसाद झाले की लगेच!
स्लोलावलाय.
हा हा हा.

अभिजीत अवलिया's picture

3 Apr 2017 - 5:51 am | अभिजीत अवलिया

पुढच्या वर्षी नक्की घेऊ असे म्हणत बरीच वर्षे न घेतलेली हेल्थ ईन्शुरन्स पाॅलिसी घेतली.

आदिदासचे क्लाउडफाॅम असलेले शूज घेतले. अतिशय आरामदायक आणी वजनाने हलके.

अत्रे's picture

3 Aug 2017 - 10:14 am | अत्रे

क्लाऊड फोम आणि गोगा मॅट टेक्नॉलॉजी सेमच आहे का?

स्केचर्स चे हे goga mat शूज पहा https://www.youtube.com/watch?v=VRhGChIo45o

अभिजीत अवलिया's picture

3 Aug 2017 - 10:46 am | अभिजीत अवलिया

क्लाऊड फोम आणि गोगा मॅट टेक्नॉलॉजी सेम नसावी.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

3 Apr 2017 - 6:54 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

वडलांसाठी असुस झेनफोन मॅक्स २ घेतला. मस्तं आहे. बहुधा मी माझा फोन बदलेन तेव्हा हाचं घ्यायचा विचार आहे.

प्रसन्न३००१'s picture

3 Apr 2017 - 9:06 am | प्रसन्न३००१

काही खरेदी केलं नाही. आधी जी खरेदी झालेली त्याचे पैसे फेडले... इन शॉर्ट क्रेडिट कार्डाचे बिल भरले :D

मागच्या आठवड्यात आमच्या नवीन ऑफिससाठी सिम्फनी चा Diet कुलर घेतला.
आणि
जुन्या बायकोसाठी नवीन Redmi 4A (Gold, 16GB, 2GB ) घेतला ५९९८/- ला ;)

आनंदी गोपाळ's picture

4 Apr 2017 - 10:03 pm | आनंदी गोपाळ

उद्या रेडमी एमाय नोत४ चा फ्लॅशसेल आहे १२ वाजता. लक्षात ठेवा. चांगला फोन आहे, लय स्वस्तात. मला मिळो अशी सदिच्छा द्या अशी विनंती!

(मास्तुरे, तुम्ही देणार नाही हे ठाउकेय :-P)

किसन शिंदे's picture

3 Apr 2017 - 2:07 pm | किसन शिंदे

उकाडा थोडा सुसह्य व्हावा म्हणून गेल्या आठवड्यात हा एअर कूलर घेतला विजय सेल्समधून नऊ हजार तिनशेला.

1

अभिजीत अवलिया's picture

3 Apr 2017 - 2:50 pm | अभिजीत अवलिया

कसा आहे परफॉर्मन्स?

किसन शिंदे's picture

3 Apr 2017 - 3:04 pm | किसन शिंदे

चांगला आहे. त्यातही साध्या पाण्यासोबत वरच्या भागात आईस क्युब टाकतो तेव्हा बर्‍यापैकी थंड हवा येते.

अभिजीत अवलिया's picture

3 Apr 2017 - 8:51 pm | अभिजीत अवलिया

धन्यवाद. जवळपास असाच दिसणारा सिम्फनीचा घेऊन आलो. ८९००/—

सोमनाथ खांदवे's picture

9 Apr 2017 - 9:24 pm | सोमनाथ खांदवे

मी फॅन च्या आवाजा मूळे कुलर वापरात नव्हतो , महाराष्ट्र टाइम्स मधील लेख वाचून मी 250 mm चा प्लास्टिक ची पाती असलेला एक्झॉस्ट फॅन ( रु 1150 फक्त ) खिडकी मध्ये उलट्या दिशेने लावला . संध्याकाळी 8 वाजे पर्यंत खिडकी बाहेर ची हवा घरातील हवे पेक्षा थंड झालेली असते पण घरातील गरम हवे मुळे बाहेर ची थंड हवा आत येत नाही पण एक्झॉस्ट फॅन उलट्या दिशेने लावल्या मुळे आत मध्ये मस्त थंड हवा येते , कधी कधी रात्री थंडी वाजल्या मुळे एक्झॉस्ट फॅन बंद करायची वेळ येते . प्रयोग 100 % टक्के सक्सेस झाला आहे , सिलिंग फॅन 25 वॅट ते 75 वॅट व एक्झॉस्ट फॅन 40 वॅट ची वीज वापरणारे असतात .

श्रीगुरुजी's picture

3 Apr 2017 - 2:21 pm | श्रीगुरुजी

उद्याच्या श्रीरामनवमीनिमित्त ३० रूपये देऊन ३ हार घेतले. ५० रूपयाला १ डझन गुलाबाची फुले घेतली. त्याचबरोबर १० रूपयांची ३ केळी, ८० रूपयांची अर्धा किलो डाळिंबे, ८० रूपयांची अर्धा किलो सफरचंदे व ८० रूपयांचे पट्टेवाले कलिंगड घेतले.

किसन शिंदे's picture

3 Apr 2017 - 2:36 pm | किसन शिंदे

८० रूपयांचे पट्टेवाले कलिंगड घेतले.

त्याला टरबुजे म्हणतात ना गुरूजी?

1

श्रीगुरुजी's picture

3 Apr 2017 - 2:55 pm | श्रीगुरुजी

मला वाटंत सर्व प्रकारच्या कलिंगडांना (काळ्या पाठीचे किंवा पट्टेवाले) हिंदीत टरबूज म्हणतात. हिंदीत कलिंगड असा शब्दच नाही. (चूभूदेघे)

अनुप ढेरे's picture

3 Apr 2017 - 2:50 pm | अनुप ढेरे

एक शंका आहे. आजकाल जी कलिंगडं खातोय ती सगळी अगदी गोड असतात. कधी फार जास्तं गोड. कंलिगडांमध्येही झोल करतात काय आजकाल? प्रत्येक कलिंगड एकदम लालबुंद आणि गोग्गोड हे कसं शक्यय?

साखर घातलेले लाल पाणी इंजेक्ट करतात असं ऐकलं आहे.. खखोदेजा.

चतुरंग's picture

3 Apr 2017 - 6:51 pm | चतुरंग

कलिंगडातच काय त्या वर्गीय सर्व फळात कृत्रिम रंग आणि स्वीटनर इंजेक्ट करुन ती लालबुंद्/गोड बनवली जातात. अगदी खात्रीच्या विक्रेत्याकडूनच खरेदी करावीत ही फळे. सगळ्या नैसर्गिक गोष्टींची वाट कशी लावावी हे माणसाकडूनच शिकावे! :(

आनंदी गोपाळ's picture

4 Apr 2017 - 10:11 pm | आनंदी गोपाळ

अगदी चांगलं दिसलं की भेसळ आहे अशी शंका येणे सहाजिक आहे.

If its too good to be true, it probably is.

कसंय ना,

गावातले "भोई" लोक पारंपारिक "डांगरवाड्या" नदीच्या पात्रातल्या वाळूत पेरत असत. उन्हाळा सुरू होतानाच्या यात्रेत ही डांगरं/टरबूजं/खरबुजं/फुटकाकड्या विकायला येत.यापैकी काहीच तितकं गोड नसे, पण तहान भागवणारं फळ असे, थोड मधुरही लागे.

आजकालच्या बिटी जमान्यात, (बायोटेक्नॉलॉजी=बीटी) उदा. शुगरबेबी नामक टरबूज, (आपल्या सर्वज्ञ गुरुजींच्या भाषेत तरबूजा/खरबूजा) मस्त गोड लागते, व ते नदीकाठच्या वाळूत पेरावे लागत नाही, नॉर्मल शेतात पेरतात, लवकर उगवतेही.

मार्केटात ट्रका भरून येतात ती टरबूजं रस्त्यात पिकतील म्हणून फार कच्ची तोडलेली असतात. अन भारताच्या एका टोकापासून दुसरीकडे जातात. सबब लाल दिसलीत तरी बेचव लागतात.

इंजेक्शन मिथ बद्दल : एक ड्रंकन वॉटरमेलन नामक प्रकार असतो. व्होडका टरबूजात इन्फ्यूज करणे. सिरिंज व्होडका अन टरबूज फुकट देतो, त्या टरबूजाच्या प्रत्येक फोडीत व्होडका पोचवणे महा कर्म कठीण. तस्मात सॅक्रीनचे इंजेक्शन हजार टरबूजांना देऊन मग ते ३०-५०-६० रुपये किलोने विकणार्‍याला सलाम!

अनुप ढेरे's picture

9 Apr 2017 - 9:31 pm | अनुप ढेरे

धन्यवाद शंका निरसनाबद्दल! म्हणजे भरपूर खायला काय हरकत नाही!

काही महिन्यांपूर्वी थेट कलोनमधल्या दुकानातून यु डी कलोन (४७११ वरिजनल) आणलं होतं. बेहद्द आवडलं. खिशात छोटी ३ मिलीची काचकुपी बाळगून कधीही वास घ्यावा. मूडमधे अत्यंत सुधारणा होते.

आता स्टॉक संपत आला. पण अमेझॉनवर दिसलं हेच वरिजिनल ४७११ नंबरचं.. आणि तेही मी जर्मनीत घेतलं त्याहून कमी किंमतीत. B

मराठी_माणूस's picture

4 Apr 2017 - 2:42 pm | मराठी_माणूस

व्वा , काय योगयोग. मीही हाच काही दिवसापुर्वी घेतला. पंप फॉल्टी निघाला. वास बाकी मस्त.

संजय क्षीरसागर's picture

3 Apr 2017 - 3:38 pm | संजय क्षीरसागर

या धाग्याचं आरोग्य फिटनेसच्या धाग्यापेक्षा जास्त आहे !

साधारण दीडेक वर्षापूर्वी घेतलेला Puma चा स्विमिंग गॉगल मागल्या आठवड्यात तुटला, त्यामुळे Speedo चा स्विमिंग गॉगल घेण्यात आला. झालंच तर एक Jockey चा पुलोव्हर्/झिपर पण घेतला.

योगी९००'s picture

3 Apr 2017 - 4:09 pm | योगी९००

पुढील दोन गोष्टी खरेदी करण्याअगोदर तुमचा मोलाचा सल्ला हवा आहे...

१) पोर्टेबल एअर कंडीशनर - बाजारात Llyod, Croma यांचे पोर्टेबल एअर कंडीशनर मिळतात. मुंबईमध्ये रहात असल्याने कुलरचा उपयोग होत नाही. तुमच्या पैकी कोणी पोर्टेबल एअर कंडीशनर वापरते का ? परफॉर्मन्स कसा आहे? नॉर्मल AC (window or split) लावण्यासाठी खूप खर्च आणि तसेच खूपच infrastructural changes असल्याने portable AC चा विचार करत आहे.

२) car seat massager कोणी वापरते का? १६००-२५०० च्या रेंजमध्ये ऑनलाईन मिळत आहे. अनुभव कसा आहे?

मला एक ब्लु टुथ स्पिकर हवा आहे. त्यातला ब्लुटुथचाच भाग वापरायचा आहे, स्पिकर दहा वाटचा घरातला जोडणार आहे.

राघवेंद्र's picture

3 Apr 2017 - 8:55 pm | राघवेंद्र

कंजूस काका असे काही तरी वापरा. हे जुन्या कार मध्ये ब्लूटूथने स्पीकरला जोडायला वापरतात.

https://www.amazon.com/iClever-Bluetooth-Hands-Free-Multi-Point-Activati...

सानिकास्वप्निल's picture

3 Apr 2017 - 8:15 pm | सानिकास्वप्निल

आमच्या जुळ्यांनी धुमाकूळ घालायला सुरूवात केल्यामुळे नविन बुकशेल्फ कम लाॅक कॅबिनेट घेतले.

अॅपलचे नवे झाड नुकतेच बागेत लावले.

बागेत नव्या फेन्स लावल्या काँक्ररीटचे पोस्ट घालून. स्विंगची आॅर्डर दिलिये.

मराठी पुस्तकांची खरेदी केली.

कुत्र्याचं / मांजराचं / पाळीव प्राण्यांचं अन्न आणि एकूण सप्लीमेंट्स अमेझॉनवरुन फार स्वस्त मिळतात असा अनुभव आहे.

A

पाळीव प्राण्यांसाठी गिरवीतलं बदक म्हणजे साष्टांग नमनच!! :)

यसवायजी's picture

3 Apr 2017 - 11:04 pm | यसवायजी

या महिन्यातली खरेदी-
पॉवरबॅन्क, पोन्चो, ट्रेकींग सॅक, ट्रेकींग शूज, वॉटरप्रूफ ग्लोव्हज, वेस्ट पाऊच, ट्रॅक पॅन्ट, थर्मलवेअर, आणी बरच काही.

डोक्यावर/हेल्मेटवर लावायचा दिवा हेडलॅम्प ( चार्जिंगवाला) रस्त्यावर चायनिज एक घेतला आहे २५०/- रुपयाला. १००मिटरस फोकस मारतो,एक तास चार्जवर चार तास जेमतेम वापरता येतो.
जरा भारी भरोसेमंद लँपचे रेटिंग काय असते ,कितीला मिळतो ते सांगा।

वरुण मोहिते's picture

4 Apr 2017 - 12:19 pm | वरुण मोहिते

मधून रोझ वाईन घेतली बायको बोल्ली असं काहीतरी सात्विक पीत जा रविवारी .
बाजूलाच चर्चगेट च्या आर्मी कॅन्टीन मधून अमृत नावाची व्हिस्की घेतली १ लिटर ची रविवार ला . किंवा पाहुणे आले कि . बायकोला अमृत आणि रोझ हि नावं आवडल्याने ती पण खुश मी पण खुश .
किंमत ६५०० दोन्हीची मिळून .

वमो, ही अम्रुत बाहेर पण मिळते का , का फक्त कँटिनलाच.

प्रसन्न३००१'s picture

4 Apr 2017 - 2:12 pm | प्रसन्न३००१

कोणत्या ब्रँड ची घेतलीत रोझ वाईन .....

सावत्या's picture

4 Apr 2017 - 2:47 pm | सावत्या

वमो,
अमृत.. जबर्या सिंगल माल्ट!!!
अमृत कितीला पडलं हो!!
सालं मुंबई एअरपोर्ट आणि यूएई च्या कोणत्याही एअरपोर्टवर मिळत नाही.
पुढच्या मुंबई वारीत चर्चगेटला फेरी मारायला हवी....

वरुण मोहिते's picture

4 Apr 2017 - 3:18 pm | वरुण मोहिते

अमृत ३-४ च्या आसपास किती वर्ष जुनी आहे त्यावर . पण चांगल्या मोठ्या शॉपलाच मिळतेय सध्या .

नंदन's picture

4 Apr 2017 - 3:36 pm | नंदन

अमेरिकेत सॅन होजेसारख्या देशाळलेल्या भागांतल्या कॉस्को, बेव्हमोतही मिळते ;)

देशपांडेमामा's picture

28 Jul 2017 - 4:50 pm | देशपांडेमामा

अमृत इकडे ४०००/- ला आहे

देश

क्युटिक्युरा टाल्कम पावडर कुठे मिळेल कुणी सांगेल का ?

आनंदी गोपाळ's picture

4 Apr 2017 - 10:14 pm | आनंदी गोपाळ

अम्रूत ओव्हर हाईप्ड आहे असे वैम.

गवि,
प्रोजेक्टर मिळाला का? कोणता?

गवि's picture

5 Apr 2017 - 7:31 am | गवि

गवि,
प्रोजेक्टर मिळाला का? कोणता?

नाही ना. अजूनही सल्ल्याची वाट बघतोय.

http://www.visualapex.com/

इथे बरीच माहिती मिळून जाइल.

शिओमीचा नीलदन्त स्पिकर घेतला. एकदम मस्त.

वेदांत's picture

26 Jul 2017 - 4:59 pm | वेदांत

आयफोन एस ई घेतला .. ३२जिबि @१६३००

अभ्या..'s picture

26 Jul 2017 - 5:13 pm | अभ्या..

ओ, ओ वेदांतसाहेब.
प्लीजच ना एक सांगाल काय?
आयफोनच का घ्यायचा? म्हण्जे तुम्ही तो का घेतला?
लै जण इचारतेत, मी बी लै जणांना इचारलो पण प्रॉपर उत्तर काय गावलेले नाही.
सांगा ना.

पाटीलभाऊ's picture

26 Jul 2017 - 5:43 pm | पाटीलभाऊ

बाईकचे चांगल्या प्रतीचे पंक्चर रिपेयर किट आणि हवा भरायचा पंप पुण्यात कुठे मिळेल?
फ्लिपकार्ट आणि अमेझॉन वर बघितलं...पण रिव्ह्यूज...लय बेक्कार आहेत.

लाल महालाकडून फडके हौदाकडे जाताना डावीकडे (सरदार सायकल्स समोर) चावला सायकल नावाचे एक लहानसे दुकान आहे, त्याच्याकडे फुट दीड फुटाचा एक पंप मिळतो. तो पंप सायकल, फुटबॉल, गाड्या सर्वांना चालतो. किंमत २०० रू.

हा पंप कामचलाऊ प्रकारचा आहे व टायरमध्ये अगदीच हवा नसताना हवा भरण्यासाठी योग्य आहे, किंवा जवळच्या पंक्चरवाल्याकडे जाईपर्यंत वापरावा.

जर घरच्या घरी टायरमध्ये टामटुम हवा भरायची असेल तर डेकॅथलॉन मध्ये फूटपंप मिळेल. किंमत २००० रू.

.

पंक्चरकीटपेक्षा सोबत एक वेगळी ट्युब ठेवा. पंक्चर झाले की सरळ ट्युब बदला आणि नवीन ट्युबवर गाडी चालवा. जुनी ट्युब सावकाशीने टायरवाल्याकडे नेऊन पंक्चर काढा.

पाटीलभाऊ's picture

27 Jul 2017 - 1:11 pm | पाटीलभाऊ

धन्यवाद...!

पावर बँक (४०००एमेच लिहिलय पण २०००एमेच एकदा चार्ज करते)३०० रु.

जेम्स वांड's picture

26 Jul 2017 - 9:56 pm | जेम्स वांड

खादी भांडारातून लंगोटाचं कापड घेतलं, फडात ती गुळमुळीत सपोर्टरं कुचकामी असत्याती. उत्तम कसलेला लंगोट हाच निश्चिन्त मनाने अन पूर्ण एकाग्रतेने कुस्ती खेळायचा हमखास उपाय होय, हे सांगून मी माझी ज्ञानदानाची हौस पुरवून घेतो..

इको नॉन एसी! टुरिस्ट परमिट, आज घेतली.
उत्तम गाडी आहे, पुण्यातून कोणास रेंटवर हवी असेल तर मला सांगा ;)

शेखर's picture

27 Jul 2017 - 5:02 pm | शेखर

काँग्रॅट्स राजे....

अनेक ब्रँडेड टेल लँप हरवून / पाडून आणि अनेक स्वस्तातले टेललँप वापरून शेवटी हा एक दिवा घेतलाच.

.

हाताच्या बोटांच्या दोन पेरांइतकी लांबी आहे. मोबाईल चार्जरने चार्ज होतो आणि सायकल, सॅक, शर्टाची कॉलर, बॅक पॉकेट कुठेही बसवता येतो.

पांढरा आणि लाल - टॉर्च आणि ब्लिंकर असे मोड आहेत. एकदम छोटूकला असल्याने खिशात वगैरे आरामात बसतो.

किंमत - ७००/- रू.

सानझरी's picture

28 Jul 2017 - 5:12 pm | सानझरी

हे भारीए!!

मला घरच्यांना अन शेजार्यांना पिडायला एक कॅरावके सिस्टीम घ्यायची आहे. उत्तम ऑप्शन कोणता? इनबिल्ट हिंदी आणि इंग्लिश गाणी जास्तीतजास्त (हजारो) असली पाहिजेत आणि नंतर नेमकी हवी ती गाणी (सशुल्क अथवा निःशुल्क) मिळवण्याची सुलभ (यक्क!!) सोय हवी.

arunjoshi123's picture

27 Jul 2017 - 5:28 pm | arunjoshi123

हे विकत घेणं नाही, पण तरी ...
पुण्यात ९ ते ९ इतकी ड्यूटी असणारा ड्रायवर केवढ्यात मिळेल?
१. त्याचं सहसा काम फक्त ऑफिसमधे सोडणे आणि आणणे इतकंच असेल. मधे सगळा विराम.
२. मार्केटच्या हिशेबाने जे ओवरहेड आहेत ते सगळे मिळून महिन्याला पगारावर २००० ते ३००० होतात. (जास्तिचे तास, सुट्टीच्या दिवशी येणे, आउटस्टेशन ड्यूटी).
३. एजन्सीच्या ड्रायवर ८ तासांच्या ड्यूटिची बेसीक कॉस्ट १६००० पासून सुरु होते. वर हे २-३०००. त्यामुळे कंपन्यांना लावलेले रेट पर्सनली परवडत नाहीत.
४. ड्रायवरकडून गाडीचं नुकसान झालं तर विम्याव्यतिरिक्तच्या पैशाचं काय करायचं असतं?
=======================================================================
मी गेले एक वर्ष सरासरी १७००० रु. प्रतिमाह ड्रायवरवर खर्च करत आहे (एजंसीकडून घेतला तर किमान २०,००० होइल) आणि त्याच्या सर्विसेस अजिबात प्रोफेशनल नाहीत (मंजे शहर माहित असणं, पत्ता शोधता येणं, गाडी वेळेवर साफ असणं, इ इ). तो भरोसेमंद आणि सज्जन आहे इतकं मात्र आहे.

महिन्याकाठी गाडीचा ईएमाय १५,००० + पेट्रोल ४००० + ड्रायव्हर १७,००० = महिन्याचे रु. ३६,००० झाले. (देखभालखर्च, टोलं/दंड, विमा, वगैरे धरलं नाही.) तुम्ही हापिसात २२ दिवस जाता असं समजू. म्हणजे दिवसाचे रु. १६३६ झाले.

इज इट रियली वर्थ इट?

याच अंतरासाठी उबेरचा सगळ्यात मोठ्ठा प्राईस क्वोट रु. ४५८ (वन वे) आहे. अगदी दोन्ही धरून रु. १००० पकडा.

#हात_दाखवा_उबेर_थांबवा

पर्सनल सेवेची आणि उबेरची तुलना करता येते काय? रोज कोण बोलवणार उबेर? रोज अ‍ॅड्रेस सांगा...
ते असो.
=====================
माझं म्हणणं असं आहे कि एवी तेवी प्रोफेशनल सर्विस नसेलच तर ड्रायवर अनऑर्ग्यनाइज्ड मर्केट मधे जो रेट आहे तोच द्यावा.

धर्मराजमुटके's picture

27 Jul 2017 - 5:51 pm | धर्मराजमुटके

हे विकत घेणे नाही पण कुणाला विकत घ्यायचे असेल तर

छोट्या ऑफिसांत, घरी प्रिंटर गरजेचा झाला आहे. डेस्कजेट घेतला तर स्वस्त पडतो पण रिफिलमधे फार कमी प्रिंट निघतात. न वापरता पडून राहिला तर खराब होतो.पण कलर प्रिंटर , स्कॅनर ई. चा पर्याय स्वस्तात मिळून जातो.
लेजर ची क्वालिटि उत्तम पण किंमत महाग. कलर असेल तर अजुनच जास्त.

दोघांचा मध्य काढायचा तर ईप्सन चे इंक टँक प्रिंटर घेणे. जास्त प्रिंटस, प्रति पान किंमत कमी, लवकर खराब होत नाही. प्रिंट, कॉपी, स्कॅन सगळं मिळतं. साधारण १०,००० पासुन किंमत आहे.

दोन वांगी, एक राजम्याचं पाकिट, म्यागीचा पास्ता. त्यात राजमे भिजत घालायला विसरलो आहे. सुदैवाने म्यागी आहे. उद्या वांग्याची थालीपीटं होतील. रैवारी दिव्यांच्या अवसेला आणलेला आम्रखंडाचा डबा फ्रीझर मध्ये आहे. आता तो संपवायचा म्हणजे उगाच मूठभर मास चढल्यासारखं वाटतं. बरं या आठवड्यात कोणी मित्रमंडळ पण येणार नाहीये. संपवता आला असता.

सध्या व्हॅक्क्यूम क्लीनरच्या शोधात आहे. बघू कस्काय जमतोय तो.

आम्रखंडाचा डबा फ्रीझर मध्ये आहे. आता तो संपवायचा म्हणजे उगाच मूठभर मास चढल्यासारखं वाटतं. बरं या आठवड्यात कोणी मित्रमंडळ पण येणार नाहीये. संपवता आला असता. सध्या व्हॅक्क्यूम क्लीनरच्या शोधात आहे.

येऊ काय क्लीनर घेऊन एक दिवसापुरता. तू क्लीनींग आटप, मी डबा संपवतो, भेटणेही होईल.

सूड's picture

28 Jul 2017 - 8:54 pm | सूड

चालतंय की!!

पैसा's picture

28 Jul 2017 - 10:49 pm | पैसा

कॅप्टन कूक मीठ एक किलो आणले. टोमॅटोचा भाव विचारला मग पाव किलो हिरवी वांगी आणि भारंगीची फुले घेतली. इंद्रायणी तांदूळ तुकडा 32 रुपये किलो हा भाव बरोबर आहे का? माहिती नसल्याने घेतले नाहीत.

इंद्रायणी तांदूळ चा भाव तर ठीक आहे!

पैसा's picture

28 Jul 2017 - 11:18 pm | पैसा

उद्या आणते. रत्नाग्री भयंकर महागडे शहर आहे, आणि इंद्रायणी तांदूळ इकडे होत नाही त्यामुळे दर माहीत नव्हते. अर्थात तांदूळ अस्सल इंद्रायणी असावेत असे समजून घेईन. साध्या तांदुळावर बासमतीचा वास येणारे गवत टाकून फसवतात असे ऐकिवात आहे. तसेच बेळगावातून येणाऱ्या एका दुकानदाराने पूर्वी काहीवेळा आपल्याकडे होणारा बासमतीसारखा वास येणारा दुसऱ्या कोणत्यातरी जातीचा तांदूळ (खरे सांगूनच) बराच स्वस्त दिला होता. इंद्रायणी तांदुळाच्या बाबत असे प्रकार कधी ऐकले नाहीत.

होय, हा भाव बरोबर आहे. म्हणजे चुकिचा असल्यास मलाही फसवले आहे म्हणता येईल. ;) पण मिपाकरांनी इंद्रायणी भात शिजल्यानंतर दरवळणार्‍या वासाचं जे वर्णन केलय ते काही लागू पडलं नाही. मग दुसरीकडे जाऊन तपासले तर तांदूळ दिसायला तसाच होता. पुन्हा भात करून पाहिला. पार नाक भातात खुपसून पाहिले पण कसलाही वास आला नाही.

तुला फसीवले तायडे ग.. चचच :P

हे असलं अर्धवट बोलू नकोस. नक्की कुठे फशिवलय ते सांग. दोन्ही दुकानात तांदूळ दिसायला सारखाच होता. दोन्ही भातांचा शिजल्यावर वास येत नव्हता. लहान दुकानात फसवले की काय असे वाटले म्हणून मोअरमध्ये गेले. म्हणजे सग्ळीकडे फसवतात का?

पैसा's picture

28 Jul 2017 - 11:23 pm | पैसा

आधी एकच किलो आणून बघेन तर!

अभिदेश's picture

28 Jul 2017 - 11:26 pm | अभिदेश

चांगला येतो तो आंबेमोहोरचाच ...ईंद्रायणी नाही..

५० रुपये भाव आहे सध्या आणि वासाचं म्हणाल तर मला हि कधी आला नाही त्या भाताचा वास

इंद्रायणीच्या बाबतीत मीदेखील सहमत आहे. आम्ही पार राजगडाच्या पायथ्याशी ज्यांच्याकडे पिकतो त्यांच्या घरातून विकत घेतला होता, अजिबात काही दरवळ वैगरे आला नाही. भाताच्या खाचरात मात्र घमघमाट होता.

आंबेमोहराच्या तोडीचा भात मिळणे आहे अजून.

आदूबाळ's picture

28 Jul 2017 - 11:16 pm | आदूबाळ

सर्दी झाली नव्हती ना?

रेवती's picture

29 Jul 2017 - 1:03 am | रेवती

नाही हो, सर्दी कुठली, पण किलोभर आणलेला प्रकार इडली करून वगैरे खपवला.

रुस्तम's picture

29 Jul 2017 - 10:12 am | रुस्तम

इंद्रायणी भाताचा वास चांगला येतो. आंबेमोहोर सारखा. इथे मागे चर्चा वाचूनच तांदुळ घेतले. आधी 32 वाले 30 किलो घेतले. आता 35 वाले 30 किलो घेतले. आता परत हाच तांदुळ घ्यायचा विचार आहे.

अभिजीत अवलिया's picture

28 Jul 2017 - 11:25 pm | अभिजीत अवलिया

इंद्रायणी तांदूळ तुकडा 32 रुपये किलो हा भाव बरोबर आहे का?

प्रचंड स्वस्त आहे.

मागे कुणी मिपाकराने लिहिले होते ना त्यांच्याकडे इंद्रायणी तांदूळ होतो म्हणून?

पिलीयन रायडर's picture

29 Jul 2017 - 2:03 am | पिलीयन रायडर

मी!!

माझ्याकडे मित्राच्या शेतातुन येतो. भाव ३२ च्या आसपासच असेल. आणि त्याचा शिजल्यावर सुंदर वास दरवळतो.

पिलीयन रायडर's picture

29 Jul 2017 - 8:45 pm | पिलीयन रायडर

चौकशी केली. ४०-४२ ने घेतो आम्ही.

मला आठवत होता तो हा अजून एक प्रतिसाद सापडला..
सध्या ते मिपावर येतात की नाही माहीत नाही. पण तो धागाही मस्त आहे :)

पिलीयन रायडर's picture

30 Jul 2017 - 3:17 am | पिलीयन रायडर

अगदी सत्यवचन आहे ते! मऊ गुरगुट्या भात होतो तो. जगात तसला सुंदर भात नाही. शेतातुन मिळत असेल तर लगेच घ्यावा.

रुंबा नामक अ‍ॅटोमॅटिक फिरणारा वॅक्युम क्लिनर कोणी वापरला आहे काय? उपयोगी आहे का हा प्रकार?

रॉजरमूर's picture

2 Aug 2017 - 3:20 pm | रॉजरमूर
रॉजरमूर's picture

2 Aug 2017 - 3:25 pm | रॉजरमूर
पद्मावति's picture

28 Jul 2017 - 11:29 pm | पद्मावति

मी वापरलाय. तसा सोयीचा आहे पण कानाकोपर्‍यांमधली धूळ साफ करायला त्याचा फारसा उपयोग नाही. पण मोठी मोकळी जागा असेल तर रूंबा आपले काम व्यवस्थीत करतं. अडीअडचणीला उपयोगी आहे पण रोजचे क्लीनिंग मला तरी नीट नाही जमलं. अर्थात रूंबा मी शेवटचे ट्राय केले त्यालाही आठ दहा वर्षे झाली आहेत. आता त्याचं तंत्रज्ञान अजुन यूज़र फ्रेण्डली झाले असावे अशी आशा आहे.

रुम्बा वापरतिये त्याला तीन वर्षे होत आली. फार्फार मदत करतोय. उदा. पद्मावथी म्हणतेय तसा अगदी कोपर्‍यातला केर काढला जात नाही म्हणून तेवढे झाडून घ्यायचे, म्हणजे मध्ये आणून ठेवायचे. जी खोली साफ करून हविये त्यातील वायरी, अध्येमध्ये पडलेल्या वस्तू उचलायच्या. जसे, मुलांची खेळणी, बॉल्स वगैरे. व्हर्चुअल वॉल स्विच ऑन करून ठेवायची म्हणजे त्यापुढे तो जात नाही. त्याचे डॉकिंग स्टेशन त्या खोलीतच नेऊन ठेवायचे म्हणजे डिस्चार्ज होण्याची वेळ येतात आपला आपण चार्ज होईल व आपण बाहेर जायचे असल्यात चालेल. स्वच्छतेसाठी त्यात पर्याय उपलब्ध आहेत. उदा. स्पॉट क्लिनिंग, अठवड्याचे वार, वेळेनुसार सफाई करणे. जे मी करत नाही. एकदा तो बेडखाली जाऊन अडकला व सूचना देऊन गप्प बसला. मी घरात नव्हते. काही नुकसान झाले नाही. काल एक कॉर्ड उचलायला विसरले तर त्यात गुंतून पडला. आणखी एक प्रकार म्हणजे गालीच्यावर जर खूप गडद रंग असेल तर त्याला तो टाळून जायला बघतो. त्याला ते होल आहे असे वाटते. माझ्याकडील गालिच्यावर जिथे काळे त्रिकोण आहेत ते काही दिवसांनी मळाकट दिसू लागले. तेवढेच हँडी क्लिनरने साफ करावे लागतात. एका मैत्रिणीला तिचा गडद गालिचा बदलावा लागला.
माझ्याकडील मॉडेल नव्यातले नाही. यंत्राखाली ब्रिसल्स आहेत व एक रबरी रोटर आहे. यंत्राच्या सर्कम्फरन्सला एक ब्रश आहे.
नव्या सिरीजचा मैत्रिणीने घेतल्यावर पाहिला त्याला ब्रिसल्स नाहीतच. दोन रबरी रोटर्स आहेत. त्यात केस अडकत नाहीत. माझ्याकडील रुम्बाचे ब्रिसल्स दर वापरानंतर साफ करावे लागतात. पण मला या यंत्राचा खूप उपयोग होतो. पूर्वी मी त्याच्या मागेमागे जाऊन सफाई करतोय का हे पहात असे. कालांतराने लक्षात आलेय की तो आपल्याला वाटतो त्यापेक्षा जास्तवेळ फिरवावा लागतो. मग व्हर्च्युअल वॉल लावून दुर्लक्ष करते.
रुम्बाचे केर काढण्याचे काम होताच आपण मॉप करून घेतल्यास झटकन काम होते. पण रुम्बाचा जमीन पुसणारा प्रकार आहे तोही मैत्रिण वापरते. तिला आवडलाय. घरात कमी सामान असल्यास खूप सोयिचे पडते.

इंद्रायणी भात मऊ चिकटपणा आणि चवीसाठी लोकप्रिय आहे. घमघमाटासाठी नव्हे. त्याचा वास तसा मंदच असतो. वर चर्चेत बहुधा एकाच पट्ट्यात होणार्या जिरगा, घनसाळ आणि इंद्रायणी यांविषयक मिसळण झालेली दिसते.

हे बरोबर आहे. आणि मिसळ नाही आमच्या शेतातच पिकतो

पिलीयन रायडर's picture

30 Jul 2017 - 3:18 am | पिलीयन रायडर

मी कधी अस्सल आंबेमोहराचा वास घेतलेला नाही. तेव्हा कदाचित त्या तुलनेत हा मंद वाटत असावा. पण त्याचा अगदी कुकर झाल्या झाल्या कळेल असा वास दरवळतो खरा.

पैसा's picture

30 Jul 2017 - 9:28 am | पैसा

आंबेमोहोर ला एकदम सुपर्ब वास असतो पण 95 रुपये किलोचे तांदूळ घेऊन रोजचा भात घशाखाली कसा उतरेल!

अनुप ढेरे's picture

29 Jul 2017 - 7:02 pm | अनुप ढेरे

रेवती/पद्मावती आभार!

काळेवाडी डीमार्ट मधून 43.5 ₹ किलो दराने इंद्रायणी तांदूळ आणला. कच्चा आणि शिजवलेला दोनही चा मस्त वास येतो. कुकर लावला कि घरभर वास दरवळतो.
आंबेमोहोर आणि बासमती दोन्ही पचायला फार जड असतात. रोज वापरला इंद्रायणी किंवा कोलम चांगला. कोलम बीनवासाचा.

एन्जॉय मुरमुरा आणला. एकवर एक फ्री 45 ₹ किलो.

वरती इतकेजण इंद्रायणी तांदळाचा वास येत नाही म्हणतायत.. मग आम्ही डीमार्टमधून आणतो काय असतं?? इंद्रायणी नावानेच विकताय्त ते....

मोदक's picture

2 Aug 2017 - 11:01 am | मोदक

"Yonex Sunr 1004-PRM Badminton Kit Bag (Black)" ही किट बॅग खरेदी केली.

एक रॅकेट, शूज, पाण्याची बाटली, एक ड्रेस आणि नॅपकिन इतके सामान आरामात बसते. मोबाईल आणि पाकिटासाठी वेगळा कप्पा आहे.
.

.

.

दोन किंवा तीन रॅकेट ठेवायच्या असतील तर मोठी बॅग घ्यावी लागेल.

इरसाल's picture

2 Aug 2017 - 3:38 pm | इरसाल

फिट्बीट चार्ज -२, फिलाचे खेळजोडे घेतले.

https://encrypted-tbn0.gstatic.com/images?q=tbn:ANd9GcSMRPoz68oINnJYH4u4...

https://www.google.co.in/imgres?imgurl=http%3A%2F%2Fecx.images-amazon.co...

दादरहुन मराठी बुके ८/१० आणी बीसीटी वरुन २/३ बुके.

फिटबिट चार्ज २ घेताना नक्की काय काय बघितले..? आणि MI बँड 2 पेक्षा काय वेगळे आहे..?

(तुमच्यासाठी "चेहरे" घेतले आहे.. या आठवड्यात हातात येईल.)

इरसाल's picture

2 Aug 2017 - 4:24 pm | इरसाल

https://s3-us-west-1.amazonaws.com/wearablezone/uploads/posts/September2...

तुमच्या दोघांकडे पाहुन पोट जरा आत घ्यावं असा हुरुप आलेला होत तो टिकलाय ;)

इरसाल बुवा.. हेच सगळे MI-2 पण मोजतो. आता तर नवीन अपडेट प्रमाणे सायकलिंगचेही डिटेल्स मोजले जातात.. मग त्याच सोयींसाठी १४ हजार कशाला घालवायचे..? २००० मध्ये MI-2 मिळतो आहे की..

इरसाल's picture

2 Aug 2017 - 4:35 pm | इरसाल

अ‍ॅमेझॉनच्या स्कीम मधे. थोडा महाग पडलेच पण ते दिल परी गधी झालं.

ओके ओके.. मग प्रश्नच संपला.

(वयस्कर म्हणजे ३३-३४ च्या पुरुषाचं वजन सांभाळेल असलं)

.

अभिजीत अवलिया's picture

2 Aug 2017 - 8:40 pm | अभिजीत अवलिया

काय आहे हे?

पोगो स्टिक असे सर्च करा, अ‍ॅमेझॉन / फ्लिपकार्ट कुठेही मिळेल.

जेम्स वांड's picture

3 Aug 2017 - 10:23 am | जेम्स वांड

तिकडे सगळ्या पोगो स्टीक बारक्या पोरांच्या आहेत हो......

याला आणखी एक काहीतरी नांव आहे ना..?

श्रीगुरुजी's picture

2 Aug 2017 - 8:46 pm | श्रीगुरुजी

मिंत्रावरून आदिदासचे टेनिस शूज मागविले. मूळ किंमत २२९९ + ४१४ (१८% वसेक) = २७१३ ला मिळाले.

मोदक's picture

3 Aug 2017 - 12:26 am | मोदक

स्वदेशी नव्हते का..? ;)

कपिलमुनी's picture

3 Aug 2017 - 12:31 am | कपिलमुनी

पातंजलीचे बूट अजून आले नाहीत वाटतं :D

श्रीगुरुजी's picture

3 Aug 2017 - 9:35 am | श्रीगुरुजी

तुम्हाला कशाला बूट हवेत? तुमच्यासारख्यांसाठी पतंजलीचं जळजळशामक चूर्ण उपलब्ध आहे. ते गट्टम् करावे.

श्रीगुरुजी's picture

3 Aug 2017 - 9:31 am | श्रीगुरुजी

Made in India च आहेत.

हलके घेतल्याबद्दल धन्यवाद हो..! :)

टेनीस कधीपासून खेळता..?

श्रीगुरुजी's picture

6 Aug 2017 - 8:47 pm | श्रीगुरुजी

हो. माझ्या पूर्वीच्या नाईके बुटांच्या तुलनेत खूपच हलके आहेत.

टेनिस बर्‍याच वर्षात खेळलेलो नाही. परंतु टेनिस शूज टेनिससाठीच वापरले पाहिजेत असे नाही. मी हे शूज जलद चालण्यासाठी व नेहमीच्या वापरासाठी घेतले आहेत.

शप्पत! मी मित्राकडून आणि आदिवासींचे बूट वाचलं! :)
सारखं पेपर अन बातम्या वाचण्याचा परिणाम..दुसरं काय!

श्रीगुरुजी's picture

6 Aug 2017 - 8:47 pm | श्रीगुरुजी

ळॉळ

अमित मुंबईचा's picture

3 Aug 2017 - 11:03 am | अमित मुंबईचा

दोन दिवसांपूर्वी आई फोन ७+ (३२ GB) घेतला रु. ५५०००, पण फार जड फोन यजास्त दिवस वापरेन असा वाटत नाही, अशाही मंडळी आशेवर आहेत बहुदा त्यांच्यावरच कृपा होईल

वेफेअर वेबसायटीवरून दोन खुर्च्या मागवल्या होत्या त्यातील एक आली. जोडण्यास सोपी होती.

मिनेश's picture

10 Aug 2017 - 9:38 am | मिनेश

एक peltier घेतलाय . आता प्रयोग करून बघतो

लोकांना भाताची एक व्हरायटी खात्रीलायक रित्या ओळखता येत नाही ही आधुनिक शिक्षणाची देणगी म्हणायची का? तांदूळ इतका नियमीत खाल्ला जातो त्याची ही गत आहे तर बाकी तर आनंदच असेल.

मोबाइल फोन ते थेट टिव्ही(एलइडी) वर फोटो व्हिडिओ दाखवणारी केबल कुणी वापरली आहे का?
माइक्रो युएसबी - एचडिएमआइ केबल.
सध्या किंमत ५००रु सांगत आहेत.
( क्रोमकास्ट वगैरे मध्ये न वापरता थेट कनेक्ट होते असे कळले म्हणून )

संग्राम's picture

10 Aug 2017 - 6:30 pm | संग्राम

काही मॉडेल असेल तर लिंक द्या

केबल लाउन मोबाइल टीव्हीवर बघण्या साठी मोबाईल मधे काहीतरी एमएचएल ( किंवा असे काहीतरी ) असायला लागते. तसे नसेल तर केबल वाया जाइल. हे एमएचएल बर्‍याच फोन मधे नसते.

दुसरा उपाय म्हणजे टिव्ही सार्ट असेल आणि फोन मधे स्मार्ट व्हियु सारखी सोय असेल तर केबल पण लागणार नाही.

अ‍ॅमेझॉनची डिलिव्हरी आली. वस्तू पुढीलप्रमाणे- रिमोटच्या ब्याटर्‍या, पाणी पिण्याचे ग्लासेस सहा. ग्लास प्लेन आहे पण तळात वेगवेगळे रंग आहेत.
लगेज स्केल, लेझी सुझन, मुलाचा धनुष्यबाण, डोअरम्याट, व्यायाम शॉर्ट्स, खेळाचे साहित्य नेण्याचे ब्याकप्याक.

क्रोसिन आणि बेनाड्रिल :(

गवि's picture

20 Aug 2017 - 1:03 pm | गवि

बापरे. काळजी घे ताई.. विश्रांती घेणे.

बेनाड्रिलने भारी झोप येईलच.

पैसा's picture

20 Aug 2017 - 1:07 pm | पैसा

परवा रात्री 10 तास झोपलेय. कालची झोप अजून पुरी झाली नाहीये. :(

मंदार कात्रे's picture

20 Aug 2017 - 2:22 pm | मंदार कात्रे

नुकताच एच पी १ टीबी / ४ जीबी / आय ३ लॅप्पी घेतला . अमेझॉन सेल ला

२५ सहस्र रुप्यकाणि

अतिसूक्ष्म-मुलायम खिडक्या १० बाहेरून बसवाव्या लागल्या . डॉस येते कम्पनीकडून

रेवती's picture

21 Aug 2017 - 3:22 am | रेवती

हीहीही.

अतिसूक्ष्म-मुलायम खिडक्या १० साठी किती रुप्यकाणि आणि कुठुन?

तुषार काळभोर's picture

1 Oct 2017 - 8:45 pm | तुषार काळभोर

I3/4GB/1TB/डॉस
22990 -१०%डिस्काउंट hdfc कार्डाचा =20691
+नो कॉस्ट इ एम आय (तेसुद्धा जानेवारी पासून सुरू होणार)
अमेझॉन वर घेतला मागच्या आठवड्यात.
एका दुकानात 500 मध्ये w10 व बेसिक सॉफ्टवेअर टाकून मिळाले.

अॅमेझाॅनवरुन वाॅल स्टिकर्स घेतले . बिपी मशिन घेतले omron चे. बिग बास्केटवर Aroma magic चे night cream,levon Moroccan hair serum घेतले.

गंम्बा's picture

21 Aug 2017 - 5:24 pm | गंम्बा

अलिएक्स्प्रेस वर बघा वॉल स्टिकर्स चे भरपुर प्रकार आहेत.

https://www.aliexpress.com/wholesale?catId=200002937&initiative_id=AS_20...

सावत्याजी, नवा धागा काढा की! हा स्लोलावलाय. ;)
खूप महिन्यांनंतर आमची एक अ‍ॅक्सेंट चेअर आज आली तसेच फूट मसाजर आज आला.
दसर्‍यादिवशी आल्याने चांगले वाटले. चेअर चांगली आहे. तशीच एक आधी घेतल्याने अंदाज होता. फूट मसाजर हा शिआत्सु कंपनीचा मिको म्हणून आहे. चांगला वाटला.

मनिमौ's picture

1 Oct 2017 - 7:07 am | मनिमौ

तीन शर्ट आणी एक प्यांट. घेतली लोक सोलापुरातून खरेदीला पुण्याला जातात आम्ही मात्र न चुकता इथे आल्यावर खरेदी करतो. उद्याच्या खरेदी मधे पवनकुमार स्वीट्स चे लाडू व भाग्यश्री कुंदा ही दोन नावे आहेत

सहमत, पुण्यात खरेदीला मलातरी फारशी मजा येत नाही. माझी वहिनी मात्र तिच्या माहेराहून, औरंगाबादहून खरेदी करते ती आवडते. हे पाहून तिच्या माहेरच्यांनी कितीतरीवेळा तिकडे खरेदीला बोलावलेय. पुणे, मुंबै सोडता बाकीच्या गावांमध्ये, शहरांमध्येही चांगले कपडे मिळतात यावर विश्वास आहे. एक मिपाकरीण कोल्हापूरला म्हणजे माहेरी गेली की भरपूर सुंदर कपडे आणायची. पूर्वी आम्ही दोनदा सोलापूरला जाऊन पुलगमच्या चादरी आणल्या होत्या ते आठवले.

अरेवा, रेवाक्का सोलापूरास येऊन गेलेली आहे वाटते?
बहुधा मी मिपाकर नसेन तेंव्हा, किंवा रेवाक्का.
.
.
.
नायतर फ्लेक्स लावला असता स्वागताचा.

अरे हो, सोलापूरला पाचेकवेळा तरी येणे झाले होते तेंव्हा मी शाळकरी पोरगी होते. तुझा जन्म व्हायचा होता. घरातून निघायचे, मोडनिंबला एका नातेवाईकांकडे चहापाणी, मग सोलापूर, तिथले काम उरकायचे किंवा परिक्षा द्यायची असली तर बहुतेक सिद्धेश्वर हायस्कुलात जावे लागे, नंतर बार्शीला वडिलांच्या आजोळी मुक्काम असे काहीवेळा केले होते. सोलापूर अत्यंत आवडायचे तेव्हा.
सोलापुरात त्यावेळी तरी एक मोठी बाग होती. पुण्यात सारसबाग आहे तशी. एकदा भावाची परिक्षा देऊन झाल्यावर आम्ही त्या बागेत बसलो असताना संध्याकाळी तेथील खाण्याचे स्टॉल्स सुरु झाले व अचानक एक गृहस्थ भेटले. ते वडिलांना ओळखत होते व आग्रहाने त्यांच्या उपहारगृहात घेऊन गेले. तेंव्हा पहिल्यांदा मी पावभाजी खाल्ली होती.
काही कारणाने डॉक्टरांकडे जाण्याची वेळ आली की तेंव्हा वालचंदनगर गाठावे लागे. आता अर्थातच परिस्थिती बदलली असेल. मला तेंव्हाचे आठवते.

माझ्या काही मैत्रिणी हरिभाई देवकरण शाळेतल्या होत्या. इंदापूरला काही जमेना म्हणून आम्ही पुण्याला व त्या मैत्रिणी सोलापुरास परत गेल्या.

पवनकुमार एकच लंबर. चाटी/फलटण गल्लीतला ना?
कुंद्याला ऑप्शन्स आहेत म्हणा. आप्पा हलवाई, आनंद वगैरे.