मिपा पुस्तके लोकार्पण

सरपंच's picture
सरपंच in घोषणा
28 Mar 2017 - 12:45 pm

मिपावर आज पाडव्याच्या सुमुहुर्तावर "मिपा पुस्तकं" हे दालन खुले करतांना अतिशय आनंद होत आहे. मिपावर जमणारे तुम्ही आम्ही वाचनाची आवड या सामान धाग्याने बांधले गेले आहोत. कथा कादंबऱ्यांच्या स्वरूपात असलेले दीर्घलेखन वाचणे हि आपल्या सगळ्यांचीच आवडीची बाब. मिसळपावच्या मागच्या दहा वर्षाच्या प्रवासात अनेक लेखकांनी इथे योगदान दिले, दीर्घलेखन केले, भाषान्तर केले. ते सगळे मिपाकरांना सुसूत्रित एकत्र वाचता यावे यासाठी "मिपा पुस्तकं" या प्रकल्पाची सुरुवात करत आहोत. हे दालन हा याचा पहिला टप्पा. यात आजवर केलेले बहुतांश दीर्घलेखन वर्गीकृत केले आहे. इथे वर्गीकृत केलेल्या लिखाणाचे वैशिष्ट्य म्हणजे ते पुस्तक स्वरूपात जोडलेले आहे, अर्थात त्याला अनुक्रमणिका आहे आणि ती वापरून दीर्घलेखनाचे भाग एकानंतर एक वाचत जाणे सोयीचे आहे.

या प्रकल्पातले आजवरचे सगळ्यात मोठे काम म्हणजे, मिपावरचे मागच्या १० वर्षातले सगळे लेख स्वयंसेवकांनी वर्षभरापेक्षा जास्त काळ काम करून चाळले आणि त्यातून लेखमालांचे नोड क्रमांक शोधून नोंदवले. श्रीरंग जोशी, अजया, आदूबाळ, स्पंदना, पैसा, मधुरा देशपांडे, एस, कॅप्टन जॅक स्पॅरो, कवितानागेश, आनंदयात्री, खेडूत, पद्मावति, पिलीयन रायडर यांनी हे संकलनाचे काम बहुतांशाने पूर्ण केले. या सर्वांना आणि अन्य कोणाचा उल्लेख करायचा राहिला असेल तर त्यांनाही मिपाकरांतर्फे मनःपूर्वक धन्यवाद!

ते लेख आपण पुढे स्वयंचलित पद्धतीने जोडले. अजूनही माहिती जमा करण्याचे काम स्वयंसेवक करत आहेत आणि नजरचुकीने किंवा तांत्रिक कारणाने राहून गेलेले लेखन लवकरच जोडून पूर्ण होईल असा विश्वास आहे. दीर्घलेखन केलेल्या मिपाकरांनी त्यांचे लेखन तपासून त्यांच्या लेखमाला जोडल्या गेल्या नसतील तर साहित्य संपादकांना प्रत्येक भागाच्या नोड क्रमांकासह कळवावे.भविष्यात येणाऱ्या लेखमाला जोडण्यासाठी मिपाकरांनी साहित्य संपादकांची मदत घेणे अपेक्षित आहे.

मिपा पुस्तकं या मेन्यूखाली सध्या बोका-ए-आझम (२) आणि जयंत कुलकर्णी (१) यांनी भाषांतरित केलेली पुस्तकं आणि "मिपाकरांनी केलेले दीर्घलेखन" असे सबमेन्यू आहेत. भाषांतरित पुस्तक त्या त्या पुस्तकांच्या पहिल्या पानावर घेऊन जातील. या भाषांतरित पुस्तकांचा मिपाला अभिमान आहे आणि यातून स्फूर्ती घेऊन मिपाकरांनी असे अनेक प्रकल्प मिपावर करावेत अशी इच्छा आहे. याआधी मिपावर असे अजून काही भाषांतराचे प्रकल्प झाले असतील, तर ते इथे जोडायला हवेत. कृपया त्याची माहिती नीलकांत या आयडीला व्यनिने पाठवावी.

"मिपाकरांनी केलेले दीर्घलेखन" हा सबमेन्यू books या ट्रॅकरवर घेऊन जाईल. इथली यादी नवनवी पुस्तकं जोडली गेली कि अद्ययावत होत राहील. सर्व मिपाकरांना आणि रसिक वाचकांना पाडव्याच्या तसेच दीर्घ लेखन मालिकांच्या सलग वाचनानंदासाठी शुभेच्छा!

प्रतिक्रिया

धर्मराजमुटके's picture

10 Jun 2017 - 10:12 pm | धर्मराजमुटके

कोणी मिपाच्या दिवाळी अंकांच्या पीडीएफ देता का पीडीएफ ?

पैसा's picture

11 Jun 2017 - 8:39 pm | पैसा

२ दिवसात बाकी लिंक पाठवते. तोपर्यंत विशेषांक मेनुमध्ये ज्या मिळतील त्या घ्या.

धर्मराजमुटके's picture

11 Jun 2017 - 8:53 pm | धर्मराजमुटके

कुठल्याही मराठी संस्थळावर पीडीएफ दिसली की ती लगेच उतरवून घेतोच. त्यामुळे इथल्या पीडीएफ अगोदरच घेतलेल्या आहेत. वाट बघतो.

धर्मराजमुटके's picture

24 Jun 2017 - 8:00 pm | धर्मराजमुटके

लिंक प्लीज ! ए जेंटल रिमाईंडर :)

धर्मराजमुटके's picture

26 Jun 2017 - 11:24 am | धर्मराजमुटके

http://www.esahity.com/

या दुव्यावर बरीच पुस्तके पीडीएफ स्वरुपात उपलब्ध आहेत.