मानवाचेच मुळ अफ्रिकेत का?

दीपक११७७'s picture
दीपक११७७ in काथ्याकूट
25 Mar 2017 - 2:38 am
गाभा: 

आताची श्री शैलेन्द्र यांची सुरु असलेली||कोहम्|| लेख मलिका आणि डॉ सुहास म्हात्रे याची 'पृथ्वीतलावरचा सर्वात महान प्रवास' लेख मलीका, या दोन्ही लेख मालिका अत्यंत छान आहेत. या दोन्ही लेख माले मध्ये मनुष्य प्राण्याच्या उगमाची आणि भ्रमणाची कथा/गाथा तर्क आणि शास्त्रीय आधारावर मांडली आहे. या मध्ये वारंवार उल्लेखलेली एक थेरी आहे (जी सर्व मान्य आहे?). ती आशी की डिएनए चाचणी नुसार सर्व मनुष्य प्राण्यांचे उगम स्थांन अफ्रिकेत आहे तेथुनच सर्व मनुष्य अरब,चिन, भारत, अमेरिका, युरोप, ई. ई म्हणजे जगभर पसरले. म्युटेशन मुळे ते वेगळे दिसतात/ आहेत बाकी त्यांचे मुळ डिएनए हे अफ्रिकेतलेच आहे.
याबाबत मुळात माझ्या मनात शंका आहे. मुळातच हा शोध मला जरा संणसणाटी या प्रकरातील वटतो. या शोधा कडे बघितल्यावर एखादा उत्तम गुढ सिनेमा अठवतो. ज्या मध्ये आपल्याला सतत वाटत असते की याने खुन केला असेल त्याने खुन केला असेल पण शेवटी खुनी वेगळाच निघतो. मग आपण डोक्यावर हात ठेवतो आणि म्हणतो अरेच्या!. डिएनए संशोधनाचा निशर्कष ही असाच आहे. आपल्याला वटत उगम युरोपात असेल, अमेरिकेत असेल, भारतात असेल ई. ई. पण नाही अरेच्या! तो तर अफ्रिकेत आहे. आहे की नाही निकाल सिनेमाला साजेसा.
आता मला असे का वाटते त्याविषयी,

१. जर मनुष्य प्राणी हा आफ्रिकेतुन इतरत्र स्थलांतरीत झाला असेल तर, फक्त मनुष्यच का? की हे इतर सर्व प्राण्यांना अपोआप लागु होते. जसे वाघ, सिंह, हत्ती, घोडे, कुत्रा, गाय, ई. ई. सर्व प्राणी आफ्रिकेतुन आले आणि मग म्युटेशन मुळे वेग-वेगळया खंडातील प्राणी हे वेग वेगळे दिसतात, पुर्वी त्यांचे पण आई बाप एकच होते आणि ते ही आफ्रिकेत. जर हे खर असेल तर मग आफ्रिका सोडुन दुसरी कडे कुठेच सजिव प्राणी जन्मला नाही असे समजायचे का? हा विचार पचायला जरा जड वटतोना. म्हणुनच मला वाटते की भुतलावर जेंव्हा मनुष्य प्राण्याला जन्मासाठी अनुकुल वतावरण झाले तेंव्हा ते सर्व खंडात अवतरले. नंतर भलेही भ्रमण झाले असतील. पण एकच उगम स्थान जरा अतिच वटते. झाडांची ही गणना सुध्दा सजिवात होते, मग पहिल झाड सुध्दा आफ्रिकेत उगवलं का?

२. मुळात ज्या आफ्रिकेतुन मनुष्य प्राणी आला आहे तिथे तो अजुन खुप मगास वाटतो. त्या मानाने अरब, चिन, भारत, अमेरिका, युरोप, ई. ई ठिकाणी प्राचिन ईतिहासातही त्याने ठसा उमटवला आहे. या प्रत्येक संस्क्रुतीत जगण्यासाठीच अस एक विज्ञान होत जे सतत प्रगल्भ होत होत, शहर वसवली जात होती त्या मानाने मनुष्य प्राणी ज्या आफ्रिकेतुन इतरत्र स्थलांतरीत झाला तेथे काहीच घडत नव्हत. आजही मुळ आफ्रिकन लोकांच संशोधनात जगाच्या पटलावर कुठेही उल्लेखनिय स्थान नाही, तिथेच मनुष्य मागे का आहेत, उगम स्थान असुनही. मायन, मोहन जोदरो, हडप्पा ई ई या सारख्या रेखिव संस्क्रुती अमेरिका, भारत, चिन, युरोप ई ई देशात सापडतात, अस आफ्रिकेत सापडल्याच आठवत नाही. काहीही न करता हे लोक आफ्रिकेत हजारो वर्ष राहिले आदिवासी सारखे , हे पटत नाही. हजरो वर्षा नंतर सुधा हे लोक पुर्वजांच्या जवळ जास्त वाटतात ईतर मनुष्यां पेक्षा. (क्रुपया यात ईजिप्त धरु नये कारण ते लोक मुळ अफ्रिकन पेक्षा वेगळे आणि युरोप- अरब च्या जवळ चे वाटतात. मी टिपीकल आफ्रिकन लोकांन विषयी बोलत आहे, ज्यांना मानवाचे मुळ पुरुष संबोधित केले आहे.).

आत सांगा तुम्हाला काय वाटतं?

प्रतिक्रिया

माहितगार's picture

25 Mar 2017 - 12:48 pm | माहितगार

वरकरणी एकच दिसत असेल तरी या धागा लेखातील अर्ग्यूमेंटचे मला वाटते जास्त भाग पडतात. धागा लेखात काही व्हॅलीड शंका आहेत तरी काही सहज न दिसणारे पुर्वग्रहाच्या प्रभावाने झालेली सरमिसळ सुद्धा आहे.

सजीवांची उत्क्रांती आणि त्यांचे स्थानांतरण या बद्दल शैलेंद्र सारखे जाणकार अधिक व्यवस्थीत उत्तरे देऊ शकतील पण होमोसेपीअन बनण्यासाठी मानवाचे जनुकीय म्यूटेशन आफ्रीकेतच होणे हा एक निव्वळ अपघात(किंवा योगायोग) असू शकतो, जेवढा माझा तुमचा इतर मिपाकरांचा जन्म अमुकच ठिकाणी होणे आणि अमूक ठिकाणी स्थानांतरण करणे एक अपघात (किंवा योगायोग) असू शकतो तेवढेच ते सहज असावे, यात खूप काही संशय घेण्यासारखे असलेच पाहिजे असे नाही. तरीही युरोमेरीकन संशोधकांचे दावे इतर संशोधकांनी तपासून पाहू नयेत असेही काही नसावे.

प्रत्येक संस्क्रुतीत जगण्यासाठीच अस एक विज्ञान होत जे सतत प्रगल्भ होत होत, शहर वसवली जात होती त्या मानाने मनुष्य प्राणी ज्या आफ्रिकेतुन इतरत्र स्थलांतरीत झाला तेथे काहीच घडत नव्हत.

हे बहुधा अंशतःच बरोबर असावे, वरील गृहीतकात, लेखकाला उपलब्ध झालेल्या अथवा 'उपलब्ध न झालेल्या' माहितीने प्रभावित गृहीतक आहे. मुलतः प्रगती आणि मागासपणाची व्याख्या काय आहे आणि ती सापेक्ष आहे का हेही तपासून पहावयास हवे. आमची ती संस्कृती आणि तुमची ती संस्कृती नव्हे 'तो असंस्कृतपणा आहे' हा अट्टाहास या गृहीतका मागे नाही ना हे तपासून पहावयास हवे. माझ्या व्यक्तिगत मतानुसार स्थलांतरामुळे नव्या परिस्थिती जुळवून घेण्यासाठी जो संघर्ष करावा लागतो त्यातून काही वेगळी सांस्कृतीक जडण घडण घडत असेल नाही असे नाही पण म्हणून स्थलांतर न केलेले लोक सांस्कृतीक उन्नयन आणि बदल प्रसवणारच नाहीत असेही नसावे. इथिओपीआ (नंतर आर्थीक संकटात पडलातरी ऐतिहासीक वसाहतवादाच्या काळातही राजकीय स्वातंत्र्य गहाण जाऊ न देणारा त्याचा इतिहास स्पृहणीय असावा आणि सांस्कृतीक इतिहासही अभ्यसनीय असावा) घाना, बेनीन आणि ओयो साम्राज्यांचा विकास ख्रिश्चन अथवा इस्लामी सांस्कृतीक प्रभावांशिवाय झाल्याचे अभिमानाने नोंदवताना आफ्रीकन लेखक दिसतात.

नागरीकरणाच्या विकासासाठी शेती, उद्योग, व्यवसाय आणि सोबतीला तंत्रज्ञानाचे पाठबळ हवे, याआर्थीक चक्रात शेती व्यवसायाचाच विकास नाही झाला तर इतर उद्योग आणि म्हणून पुढे नागरी व्यवस्थाही विकसीत होणे कठीण असू शकेल का. 'आफ्रीकेतील शेती व्यवस्था' हा वेगळ्या अभ्यासाचा विषय असावा ज्यातला मी तज्ञ नाही पण शेती व्यवसाय आकारास येण्यासाठीही एक्सेस उत्पादन विकले जाऊ शकेल अशा बाजारपेठेची गरज असावी आणि कदाचित सक्षम अशी बाजारपेठ आफ्रीकेत स्थानिक परिस्थितींमुळे आकारास येऊ शकली नाही का ? कि आशीयन निर्यातक अधिक कॉपींटेटीव्ह ठरले हे तपासावयास हवे (माझ्या या तर्कात मी पूर्णतः चुकही असू शकतो)

दीपक११७७'s picture

25 Mar 2017 - 4:47 pm | दीपक११७७

१. एक स्पष्ट करतो की यात आमची ती संस्कृती आणि तुमची ती संस्कृती नव्हे 'तो असंस्कृतपणा आहे' हा अट्टाहास या गृहीतका मागे नाही मी जगातील इतर सर्व संस्कृती (मला हा कृ टंकवता येत नाही तसेच दोन मत्रा ही देता येत नाही) सोबत compare करत आहे. संस्कृती म्हणजे सभ्यता जे एकत्र राहुन प्रतिकुलतेवर मात करतात. एक मेकावर आधारलेल आयुष्य जगतात.

२. इतर प्राणी सुध्दा म्युटेशन मुळेच जन्माला आले आहेत. मग उगम स्थानाचा विचार करता उदा. हरिण हि सुध्दा जगातील कुठल्या तरी एका ठिकाणीच जन्मली असेल आणि मग जगभर प्रवास........ तो पण हरणीचा.

३. आफ्रिकेतुन जग भर प्रवास पण मग जगाच्या इतरत्र ठिकाणाहुन आफ्रिकेत प्रवास का नाही की त्यांना महित होत १००० एक वर्षा पुर्वी आपण आफ्रिकेतुनच आलो आहोत मग आता परत तिकडे जायचे नाही.

४. जग भर प्रवास ते पण वाळवंट , समुद्र ओलंडुन ते ही आफ्रिकेत मुबलक साधान संपत्ती असताना.

५. इथिओपीआ संघर्ष हा अलिकडला, तसं आफ्रिकेत कबिला वारच जास्त, छोटा कबिला मोठा कबिला. तसेच तंत्रज्ञान पण कमिच,
इथिओपीआ हा व्यापारी अरबांच्या जवळ असल्यानेच इतर आफ्रिकन देशा पेक्षा जरा उजवा वाटतो.

६.

उपलब्ध झालेल्या अथवा 'उपलब्ध न झालेल्या' माहितीने प्रभावित

अंशतः मान्य आहे मला.

माहितगार's picture

27 Mar 2017 - 11:51 am | माहितगार

उर्वरीत उत्तर मला वाटते तुमच्या या प्रतिसादातच अंशतः सामावले असावे. आपल्या पाचव्या मुद्द्यात दुसर्‍या संस्कृतीशी

सानिध्य आणि देवाणघेवाणीची संधींची उपलब्धता

हा सांस्कृतीक उन्नयनासाठी महत्वाचा घटक आहे, तुमच्या दृष्टीकोणातून कदाचित सध्या निसटत असलेला मुद्दा '(फेअर टर्म्सवर) आर्थीक देवाण घेवाणींच्या संधी (व्यापार संधी)' चा सांस्कृतिक उन्नयनासाठी सहभागाचा असावा. आर्थीक देवाण घेवाणींच्या संधी (व्यापार संधी)' सेवा आणि वस्तुंच्या तसेच शेतकी उत्पादनास जसे उत्तेजक ठरतात तसे नागरीकरणासही कारणीभूत ठरतात पण काही कारणाने हा घटक मिसिंग गेला तर संस्कृतीचा आर्थीक विकास दृगोचर होणार नाही. जिथे सानिध्य सांस्कृतीक देवाणघेवाण आणि '(फेअर टर्म्सवर) व्यापारी संधी' उपलब्ध दिसणार नाहीत तिथे तो भाग तुमच्या व्याख्येतून बहुधा सांस्कृतीक मागास दिसेल मग तो आफ्रीकेच्या बाहेर असो वा आफ्रीकेच्या आत. तुमच्या दृष्टीतून ज्या संस्कृती विकसीत झाल्या आहेत त्यांना या तीन घटकांचा फायदा मिळाला की नाही हे तपासावे.

समजा बौद्धीक दृष्ट्या विकसीत (होमो सेपियन का काय ते) माणूस ७० हजार वर्षापुर्वी तयार झाला असेल आणि शेती करावयास लागणे आणि त्यावर आधारीत अर्थशास्त्र उभारणीस सुरवात केवळ ७ हजार वर्षापुर्वी झाली असेल, आणि नागरी संस्कृतींचा विकास केवळ ५ हजार वर्षापुर्वी झाला असेल तर शारीरीक आणि मेंदूच्या क्षमता असूनही; आफीकेच्या बाहेरच्या मानावांनीही त्या मागची ६० हजार वर्षे फार मोठे कतृत्व दाखवले असे होत नाही. आणि तसे पहाता आज दिसणार्‍या आर्थीक आणि तंत्रज्ञान प्रगतीचा कालावधी केवळ मागच्या ५ शे वर्षांचा आहे. म्हणजे कोणत्याही ५शे वर्षात साधता येऊ शकणारी प्रगती आज विकसीत दिसणार्‍या संस्कृतींनी मागेच साधावयास हवी होती, पण तसे झालेले दिसत नाही. सांस्कृतीक विकासासाठी एकुण घेतलेल्या कालावधीचा मुद्दा लक्षात घेतला तर आफ्रीकेतरांनी फार मोठा तीर मारला आहे असे होत नसावे. इतर संस्कृतींशी सानिध्य देवाण घेवाण आणि '(फेअर टर्म्सवर) व्यापारी संधी' मिळाल्यातर अफ्रिकनानांही इतरांनी साधलेली आर्थीक आणि तंत्रज्ञान प्रगती जमावयास हवी होती ते त्यांना अद्याप (गेल्या ६० वर्षात) का जमलेले नाही असा मुद्दा तुमच्या कडून आणि इतर वाचकांकडून येण्याची शक्यता गृहीत धरून त्याचे उत्तर पुढच्या प्रतिसादात देतो.

आज आर्थीक आणि तंत्रज्ञानक्षेत्रात आफ्रीकन लोक तोडीस तोड का नाहीत ? या प्रश्नाला हात घालण्यापुर्वी वैचारीक प्रावलंबीत्वाच्या प्रश्नाचा उहापोह करणे कदाचित रास्त असावे.

या प्रश्नाकडे जाण्यापुर्वी संस्कृती विषयक राहीलेला एक मुद्दाही लक्षात घेणे जरुरी आहे. वस्तुतः धर्म आणि संस्कृती यांची गल्लत होण्याचे कारण नसावे पण नेमकी ती तशी होत असते. जेव्हा एखाद्या ठिकाणी बाहेरचे धार्मीक तत्वज्ञान पोहोचते तेव्हा केवळ निव्वळ तत्वज्ञान जात नाही बहुतांश केसेस मध्ये संस्कृतीसुद्धा घेऊन जाताना (कदाचित लादताना) दिसते. त्यामुळे मूळ संस्कृतिचे सांस्कृतिक वेगळेपण आणि अस्तित्व प्रकर्षाने जाणवत नाही अथवा पुढे येत नाही. आणि बर्‍यापैकी अंशाने ख्रिस्चन आणि इस्लाम हे दोन धर्म आफ्रीकेत पोहोचवले तेव्हा स्थानिक संस्कृती जी कदाचित भारतातल्या प्रमाणेच पण वेगळ्या पद्धतीने निसर्गपुजक अंधश्रद्ध वेगळे विश्वास जपणारी वगैरे वगैरे राहीली असेल तिचे वेगळे सांस्कृतिक अस्तीत्व बर्‍याच अंशी गौण झाले असेल अथवा काही अंशी संपुष्टात आले असेल. सांस्कृतिक बदलात प्रथमदर्शनी वावगे काही नसते एक संस्कृती गेली तिचि जागा नव्या संस्कृतीने घेतली एवढेच. सानिध्याने बाहेरचे तत्वज्ञान घेतले जात आहे हेही तौलनिकच आहे. बाहेरच्या तत्वज्ञानासोबत, आपल्याकडे वैचारीक दुष्काळ आहे असे गृहीत धरुन तुम्ही वैचारीक परावलंबीत्व घेत आहात का ? हा मोठा प्रश्न असतो जो तुमच्या प्रदेशाला संस्कृतीला इतर परावलंबीत्वांकडे घेऊन जाण्यास कारण होणारच नाही हे सांगणे कठीण जाऊ शकते किंवा कसे आणि हि आफ्रीकन लोकांची अडचण झाली का ? हा प्रश्न एक तटस्थ भारतीय विचार म्हणून मनात आल्या शिवाय रहात नाही.

स्वातंत्र्य हे संस्कृती-सिद्ध असते. वैचारीक परावलंबीत्वात प्रत्यक्षदर्शी नुकसान काय आहे ? कदाचित काहीच नाही. पण वैचारीक परावलंबीत्वाचा स्विकार इतरही -आर्थिक, तंत्रज्ञान, राजकीय, सामाजिक इत्यादी- परावलंबीत्वांना नैसर्गीक समजून समाज आणि संस्कृती यात कृत्रिमता आहे हे लक्षात न घेता स्वाभाविक समजून करत आहे का ? एखादी गोष्ट स्वाभावीक आहे ह्या इम्प्रेंशन खाली आहात तो पर्यंत तुम्ही परीस्थिती बदलण्यासाठी संघर्ष करत नाही. जेव्हा एखादी गोष्ट तेवढी स्वाभाविक नाही यात पारतत्र्यं आहे हे लक्षात येते तेव्हा तुम्ही संघर्ष करु लागता मार्ग शोधू लागता.

दुसर्‍या महायुद्धा नंतर (कोल्डवॉर काळापासून) आफ्रीकेतील बहुतांश देश कोणत्या न महासत्तेचे वैचारीक परावलंबीत्व घेतलेले दिसते त्यात उद्योग आर्थीक राजकीय सांस्कृतिक इत्यादी सर्वप्रकारच्या परावलंबीत्वाचा समावेश होतो. आफ्रीकन देश महासत्तांनी मुख्यत्वे रिसोर्सेसचे मार्केट अथवा आपल्या उत्पादनांची बाजारपेठ म्हणून तेही मुख्य म्हणजे अनफेअरली वापरुन घेतलेले दिसतात. त्यासाठी आणि प्रतिस्पर्धी महासत्ते एवजी देश राजकीय-आणि आर्थीक कारणांसाठी आपल्याकडे रहावेत म्हणून महासत्तांनी आफ्रीकेत सातत्याने घडवलेली राजकीय उलथापालथ आणि झुंजवत ठेवणे आणि राजकीय स्थैर्याचा अभाव निर्माण होणे आणि अशा प्रसंगी वैचारीक परावलंबीत्व झुगारुन देण्या एवढी जागृती जनतेत नसल्यामुळे किंवा ते परावलंबीत्व स्विकृत असल्यामुळे सामाजिक आर्थीक स्थैर्य आणि विकास साधला न जाणे आणि ते नाही म्हणून तुम्ही कुणातरी महासत्तेच्या अंकीत आहात हे दुष्ट चक्र भेदता न येणे हि आफ्रीकेची समस्या असावी. (माझे व्यक्तिगत मत)

इतर (देश) ठिकाणांप्रमाणे समाजवादी पद्धतीचे आणि इतरही आर्थीक प्रयोग आफ्रीकेतील देशांन करुन पाहीले त्यातील बर्‍याच प्रयोगांना काही ना काही कारणाने अपयश येणे हाही महत्वाचा मुद्दा म्हणावा लागेल. भारतात दुष्काळाला तोंड देण्यासाठी हरीत क्रांती घडवली गेली, समाजवादाच्या-संरक्षीत बाजारपेठेच्या- मर्यादा स्विकारुनही भारतात वस्तु आणि तंत्रज्ञान उत्पादनास प्राधान्य देण्याचा स्वतंत्र विचार भारतीय नेतृत्व करु शकले तो करण्यात अथवा प्रत्यक्षात आणण्यात आणि फेअरट्रेडची तत्वे खरेच फेअर राहतील या दृष्टीने वाटाघाटी करताना वैचारीक परावलंबीत्व झुगारण्यात आफ्रीकन नेतृत्व कमी पडले का हा प्रश्न मनात उपस्थित रहातो.

वैचारीक प्रावलंबीत्वाचा विचार आपण करतो तेव्हा आफ्रीकेतील शिक्षण पद्धतीसाठी जी काही मदत केली गेली ती मुख्यत्वे प्राथमिक शिक्षणासाठी केली गेली उच्चशि़क्षणाच्या सुविधा निर्मिती आफ्रीकन देशांनी पुरेशी केली नसावी किंवा बाहेरच्या देशांनी त्याबाबत त्यांना परावृत्त करावे एवढे महत्व प्राथमिक शिक्षणास द्यावयास लावले बेसिकली समतोल ढळला. जे काही उच्चशि़क्षण झाले त्यात ब्रेड ड्रेनची समस्या भारता प्रमाणेच त्यांनाही जाणवली. भारतातील ब्रेनड्रेनला अधिक आर्थीक परतावा मिळाल्याने सुसह्य झाले ती संधी आफ्रीकनांना मिळाली असे म्हणता येत नसावे. उच्चशिक्षीतांना हाताला कामही मिळावयास हवे ते होत नसेल तर जे विपरीत चित्र निर्माण होईल ते आफ्रीकेतही होत असावे अशी शंका वाटते.

एकुण तंत्रज्ञान, अर्थशास्त्र या गोष्टी न्युट्रल असतात कुणाला आफ्रीकन, अशियन, युरोपीयन असे ओळखत नसतात. असो. माझे मत मांडून झाले इथे पुर्ण विराम देतो.

सांस्कृतिक विकासासाठी आफ्रीकन लोक आपल्या एवढेच कॅपेबल असू शकतात का ?

हा प्रश्न तुम्ही विचारला नसलातरीही पुढच्या प्रतिसादाकडे वळण्यापुर्वी इतर वाचकांना लक्षात घेऊन भारतातच होऊन गेलेल्या महाराष्ट्रात कतृत्व गाजवलेल्या आफ्रीकन वंशाच्या मलिक अंबरचे उदाहरण घेऊ.

मलिक अंबर हा छत्रपती शिवाजी महाराजांचे पिता शहाजीराजे भोसले यांचा समकालीन होता. मलिक अंबर हा अरब व्यापारांनी इथियोपियातून विकत घेतलेला आणि हस्ते परहस्ते वेगवेगळ्या देशात विकला जाऊन भारतात पोहोचलेला गुलाम होता. तो त्याच्या गुलामगिरीतून केव्हा बाहेर पडला ते माहित नाही पण अहमदनगरच्या निजामाकडे पोहोचून स्वतःचे सरदारकी पद्धतीचे सैन्य उभे केले, अहमदनगरच्या बादशाहीला वाचवण्याच्या प्रयत्नात शहाजी महाराजांसोबत ह्या मलिक अंबरचाही मोठा वाटा होता. हि त्याची सरदारकी विषयक ओळख झाली. महसूल पद्धतीची व्यवस्था बसवणे, पाणि व्यवस्थापन आणि औरगांबाद जवळची खडकी ही नागरी वसाहत बसवणे हि आर्थीक-सांस्कृतिक उल्लेखनीय कामे त्याच्या नावावर नोंदवली जाताना दिसतात. मलिक अंबर इथोपियन होता ज्या ज्या देशात गुलाम म्हणून वावरत आला तिथेही त्याला काही शिकावयास मिळाले हा मुद्दा येऊ शकतो पण संधी मिळाल्यास आफ्रीकन माणूसही संधीचे तुमच्या आमच्या एवढेच सोने करु शकेल किंवा कसे.

माहितगार's picture

25 Mar 2017 - 4:04 pm | माहितगार

धागा लेखकास कदाचित हा लेख दुवा वाचणे आवडेल.

दीपक११७७'s picture

25 Mar 2017 - 4:54 pm | दीपक११७७

वाचतो मग सांगतो

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

26 Mar 2017 - 12:05 am | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

१९७२ साली आफ्रीकेतील इथिओपियात एका महीलेचा सांगाडा सापडला ,तिचे नामकरण ल्युसी असे केले गेले.homo sapiens चा पुर्वज असलेल्या Australopithecus aferensis या मानववंशातली ही महीला होती.तिचा मायटोकॉन्ड्रीयल डीएनए हा आजच्या जगातल्या प्रत्येक मानवाशी मेळ खातो,यावरुन तिला आद्यमाता अर्थात mitochondrial eve असे म्हणतात,ॲडम आणि इव्ह पैकी.
यावरुन मानवजातीचा उगम आफ्रीकेत झाला हे सिद्ध होते.

दीपक११७७'s picture

26 Mar 2017 - 1:01 am | दीपक११७७

उद्या समजा ४ मिलीअन जुना एखादा महिलेचा सांगडा Australopithecus anamensis या मानव वंशातला जर चिन मध्ये मिळाला तर मग पुन्हा अ‍ॅडम आणि इव्ह बदलनार का.

शैलेन्द्र's picture

26 Mar 2017 - 9:34 am | शैलेन्द्र

बदलावाच लागेल, विज्ञानाला हट्टी राहून चालत नाही.

+१
नवीन शोध लागूनसुद्धा जुन्याला चिकटून राहायला, विज्ञान म्हणजे धर्म नाही.

धाग्यात जबरं पोटॅन्शियल आहे.चांगली चर्चा होऊ शकते.शुभेच्छा!!!

दीपक११७७'s picture

26 Mar 2017 - 10:06 am | दीपक११७७

चांगली भरपुर चर्चा व्हावी मला ही हेच अपेक्षित आहे. धन्यवाद.

शैलेन्द्र's picture

26 Mar 2017 - 10:39 am | शैलेन्द्र

माझे दोन शब्द,

सगळ्या मानवांचा जन्म आफ्रिकेतील असं का मानलं जातं या मागे काही ठोस कारणं आहेत, पहिले कारण म्हणजे आजवर सापडलेले जिवाष्म आणि जनुकीय दृष्ट्या सारखेपणा असलेल्या प्राण्यांची आफ्रिकेतील उपस्थिती. काही काळापूर्वी एक मतप्रवाह होता की मानव ओरंगुटान पासून विकसित झाला, पण मग जेंव्हा त्याचा संपूर्ण जिनोम सिक्वेन्स केला गेला तेंव्हा तो मानवाशी 97 समान आढळला, मानवाचा जिनोम चिंपाजीची 99 टक्के समान आहे. जेंव्हा एखादा वंश दुसऱ्या वंशातून फुटून वेगळा होतो तेंव्हा त्यातील जनुकीय साम्य प्रचंड असते. त्या दृष्टीने पाहता आजचे मानव एकमेकांशी 99.5/ 99.7 टक्के सारखे आहेत तर चिंपजीशी 99% साम्य दर्शवतात ( हे साम्य मोजण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्या मी विस्तार भयास्तव लिहीत नाही) याचा अर्थ आपला आणि चिंपजीचा पूर्वज एक होता. इतरही अनेक प्रायमेट, जे चिमपाजी आणि आपल्याशी प्रचंड जनुकीय साम्य आहे दर्शवतात, ते आफ्रिकेतच आहेत. थोडक्यात वंशवृक्ष दर्शवताना आपल फादीच मूळ ज्या फांदीवर आहे, ती आफ्रिकेत आहे, त्यामुळे आपले पूर्वज आफ्रिकेतून आले असं समजलं जातं

दीपक११७७'s picture

26 Mar 2017 - 1:49 pm | दीपक११७७

सर थांबा येतोय

जर मानवाचा जिनोम चिंपाजीची शी 99 टक्के समान आहे आणि जे चिमपाजी आणि आपल्याशी प्रचंड जनुकीय साम्य आहे दर्शवतात, ते आफ्रिकेतच आहेत मग होमो (Homo)ग्रुप मधिल neanderthalensis ज्यांचे मुळ युरोप आणि साउथ वेस्टर्न ते सेन्ट्र्ल एशिया आहे कालावधी सधारण ४ लाख वर्ष. आणि floresiensis ज्यांचे मुळ इंडोनेशिया आहे कालावधि सधारण १ लाख वर्ष. याबद्द्ल काय म्हणाल करण यांच मुळ अफ्रिकेत नाही. परंतु यांचा जिनोम आपल्याशी(sapiens) जुळतो म्हणुनच तर ते होमो (Homo) ग्रुप मध्ये आहेत. आता जर neanderthalensis व floresiensis यांचा जिनोम आपल्याशी(sapiens) जुळतो, म्हणजेच चिंपाजीची शी 99 टक्के समान आहे पण चिंपाजीची फक्त आफ्रिकेतच आहेत. मग neanderthalensis व floresiensis यांचे पुर्वज कोण. या वरुन ह्या विचाराला बळ मिळत की, जरी जिनोम चिंपाजीची शी 99 टक्के समान आहे तरी humman (सगळे आले होमो आणि त्या आधिचे) चा जन्म केवळ आणि केवळ चिंपाजी च्या म्युटेशन मुळेच झाले नसावे. थोडक्यात काय तर केवळ चिंपाजी मधिल म्युटेशनच करणी भुत नसावे, बाकी म्युटेशन होमो स्पेसिज तयार करु शकतात.

शैलेन्द्र's picture

26 Mar 2017 - 7:54 pm | शैलेन्द्र

थोडा गोंधळ वाटतोय, मी लिहितो परत

शैलेन्द्र's picture

27 Mar 2017 - 10:13 am | शैलेन्द्र

खरंतर तुम्ही उल्लेखलेले सगळे मानव वंश हे आफ्रिकेतूनच वेगवेगळ्या ठिकाणी गेले, कारण याचा जो कॉमन पूर्वज होता तो आफ्रिकेत विकसित होत होता, याचा दुसरा अर्थ, या स्पिसीज मध्ये, स्थलांतरानंतर कंट्रोल्ड इन्ब्रीडिंग आणि सिलेक्टिव्ह developement मुळे काही बदल घडून विशिष्ट वंश तयार झाले. म्हणूनच बरेच शास्त्रज्ञ आपल्याला होमो सेपियन सेपियन म्हणतात, तर त्या वंशाना होमो सेपियन निण्डेर्थेलीस, होमो सेपियन नालेंडी अशी नावं देतात.

थोडक्यात, होमिनीन म्हणता येईल ते सगळे आफ्रिकेतूनच बाहेर पडले..

मराठी_माणूस's picture

27 Mar 2017 - 10:34 am | मराठी_माणूस

खरंतर तुम्ही उल्लेखलेले सगळे मानव वंश हे आफ्रिकेतूनच वेगवेगळ्या ठिकाणी गेले,

हे कोणत्या स्टेज (कोणती स्पिसीज ?)मधे असतना गेले आणि हजारो मैलांचा प्रवास त्यांनी कसा केला ?

दीपक११७७'s picture

27 Mar 2017 - 1:40 pm | दीपक११७७

अजुन तरी neanderthalensis व floresiensis यांच उगम स्थान अफ्रिकेत आहे हे सिद्ध झालेल नाही तसेच त्या कडे अंगुली निर्देश करणारा पुरावा सुद्धा नाही
१. neanderthalensis साधारण कालावधी चार लाख ते चाळीस हजार वर्ष निवास युरोप आणि साउथ वेस्टर्न ते सेन्ट्र्ल एशिया आहे म्हणजे आपले मुळ(sapiens) जन्माच्या २ लाख वर्षा आधी उगम व आपले मुळ(sapiens) जन्मानंतर १.४ लाख वर्षा पर्यंत अस्तित्व

२. floresiensis साधारण कालावधी एक लाख ते पन्नस हजार वर्ष निवास इंडोनेशिया आहे, म्हणजे आपले मुळ(sapiens) जन्मानंतर १ लाख वर्षानंतर उगम व ५० हजार वर्षा आधि पर्यंत अस्तित्व.

आता आपले मुळ(sapiens) हे अफ्रिकेत जन्माला आले आणि जगभर प्रवास केला आणि जगभर पोहोचले. ही थेरी तुम्ही मंडली, आणि आता हीच थेअरी तुम्ही २ लाख वर्ष आधी जन्मलेल्या neanderthalensis व एक लाख वर्षा नंतर जन्मलेल्या floresiensis ला सुध्दा लावता. गमतच वाटते म्हणजे अफ्रिकेत जन्म घ्यायचा आणि युरोप, इंडोनेशियात स्थलांतरीत व्हायच. ते ही अफ्रिकेत जन्म झाला याचा कोणताही पुरावा मागे न ठेवता.

हे म्हणजे आज जस developing country तील पोरं शिक्षण घेउन पोटापाण्यासाठी युरोप अमेरिका ला स्थाईक होतात तसं वाटतय.

History repeat itself म्हणतात ते काही खोट नाही तर.

स्थलांतरानंतर कंट्रोल्ड इन्ब्रीडिंग

कंट्रोल्ड इन्ब्रीडिंग बाय हुम?

शैलेंद्र जी वाचक प्रतिसादाची वाट पहात अाहेत

शैलेन्द्र's picture

29 Mar 2017 - 10:09 pm | शैलेन्द्र

Due to some technical glitch, i can't type marathi form mobile, don't know why.. will surely reply in short while

दीपक११७७'s picture

29 Mar 2017 - 11:54 pm | दीपक११७७

धन्यवाद सर. वाचक वाट पहातील

दीपक११७७'s picture

29 Mar 2017 - 11:54 pm | दीपक११७७

धन्यवाद सर. वाचक वाट पहातील

शैलेन्द्र's picture

31 Mar 2017 - 9:09 pm | शैलेन्द्र

Fossil teeth and a partial jaw from hominins assumed to be ancestral to H. floresiensis were discovered in 2014 and described in 2016.[9] These remains are from a site on Flores called Mata Menge, about 74 km from Liang Bua. They date to about 700,000 years ago[10] and are even smaller than the later fossils.[11] The form of the fossils has been interpreted as suggesting that they are derived from a population of H. erectus that arrived on Flores about a million years ago (as indicated by the oldest artifacts excavated on the island) and rapidly became dwarfed.[11]

आता आपण तुमच्या प्रश्नाकडे वळूया, एक लक्षात घ्या की उत्क्रांती हा एकाच दिशेने वाहणारा प्रवाह नाही, सगळे मानवी वंश हे archaic humans ह्या संज्ञेत घेतले जातात, मग यात निण्डेरथाल आले, डेनिसोवन आले आणि इतरही काही नष्ट झालेले मानव, ज्यांची आज आपल्याला माहिती नाही. थोडक्यात असं समजलं जातं की होमो इरेक्टस पासून हे अर्चाईक ह्युमन निपजले. समजा, होमो इरेक्टसचा एक गट युरोपात गेला, 50000 वर्ष तिथे राहिल्यावर थंडीमध्ये राहण्यासाठी अनुकूल असलेले बदल, म्युटेशन ज्या मानावांमध्ये घडले, त्यांची संख्या तिथे वाढत गेली आणि इरेक्टसपेक्षा एक वेगळा वंश तयार झाला, तरीही, आणि हे फार महत्त्वाचं, कि हा वंश फक्त दिसायला वेगळा होता, कारण लाखभर वर्षानंतर जेंव्हा सेपियन तिथे आले, किंवा परत 30000 वर्षांनी ते जेंव्हा आले, तेंव्हाही, या दोन वंशात संकर शक्य होता. साधारण 50000 वर्षांपूर्वी मात्र असा बिंदू आला, कि या दोन वंशातील जनुकीय नकाशा बदलला आणि संकर अशक्य झाला.
थोडक्यात, तुम्ही म्हणत असल्या प्रमाणे, हे दोन वंश तयार झाले याच कारण अडपटेशन आणि भौगोलिक सीमानी लिमिटेड झालेले संकर आहेत.

याचा प्रतिसाद शेवटी खाली दिला आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Mar 2017 - 12:41 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

च्यायला, हे सर्व माहितीपूर्ण आहे. आम्ही आपले भारतातच पहिला देखणा माणूस आणि सुंदर स्त्री जन्माला आली आणि पुढे त्याचा हा जगभर विस्तार झाला असे समजत होतो. आता जुने भारतीय सांगाडे जालावर शोधणे आले. आम्ही धार्मिक लोक असे म्हणतो की परमेश्वराने इतक्या चराचर सृष्टीची निर्मिती केली त्याला एक माणुस बनवायला वानराची, चिंपाझीची गरज लागणार नाही. एक देखणा पुरुष आणि एक अतिशय सुंदर स्त्री त्याने निर्माण केली, असं माझं एक धार्मिक मत आहे.

-दिलीप बिरुटे
(धार्मिक)

पृथ्वीवर माणूस केव्हा आणि कसा आला - शरद बेडेकर यांचा लोकसत्तातील एक वाचनीय लेख. अमिबासारख्या प्राचीन जीवापासून ते आत्ताचा मिपावर वावरणार्‍या माणसापर्यंतचा प्रवास थक्क करणारा असा आहे. पण पहिला माणुस कुठे जन्माला आला याचा शोध लावून तो भारतापर्यंत येऊन थांबावा अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. :)

-दिलीप बिरुटे
(आधुनिक, विज्ञानवादी)

दीपक११७७'s picture

26 Mar 2017 - 1:47 pm | दीपक११७७

बिरुटे सर क्रुपया चर्चा धार्मिक, आध्यात्मिक, सेक्यलरिझम तसेच भारतीय आस्मिता कडे उगचच वळवुनका ते सगळ राजकारण्यान साठी राहुद्या या चर्चेत नको.

ईथे फक्त तर्क आणि शास्त्रिय आधारावर चर्चा अपेक्षित आहे. या आधारावर समर्थन करा किंवा खोडुन काढा

चर्चेत भाग घ्याचा नसेल पण चर्चा आवडली असेल तर प्रोत्साहन द्या.

धन्यवाद.

अभ्या..'s picture

26 Mar 2017 - 2:52 pm | अभ्या..

खरंय, बिरुटेसरांनी आधी चर्चेचे मुख्य नियम वाचूनच लिहायला हवे होते.
फार घाई करतात आजकाल सर. ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Mar 2017 - 8:36 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपणास पटत नसेल तर आपण वाचू नये. मला जे वाटतं ते मी लिहीनच धन्यवाद.

-दिलीप बिरुटे

बिरुटेसरांचा उपरोक्त प्रतिसाद अनुषंगिक आहे अनुषंगिक अवांतर आहे आहे की अवांतरच आहे हा वेगळ्या काथ्याकुटाचा विषय तेथेच ठेऊन त्यांच्या प्रतिसादाने आमच्या विचार आणि भावनांना नेमकेपणाने व्यक्त केल्याचे श्रेय त्यांना देतो.

माहितगार's picture

27 Mar 2017 - 1:40 pm | माहितगार

धार्मिक आणि आधुनिक विज्ञानवादी विचार हे लिहिण्याचे राहीलेच की !

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

27 Mar 2017 - 11:10 am | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

शैलेन्द्र यांचे बरोबर आहे.सर्व होमीनीन हे आफ्रीकेत उगम पावले आहेत.निॲनदर्थल व फ्लोरेन्सीसचे पुर्वज होमो इरेक्टस होते ,जे आफ्रीकेतून बाहेर पडले.

दीपक११७७'s picture

27 Mar 2017 - 1:57 pm | दीपक११७७

होमो ग्रुप मधील erectus, neanderthalensis, sapiens व floresiensis या Species आहेत एक मेकांचे पुर्वज नव्हेत.

'मानवाचेच मुळ अफ्रिकेत का?' ह्या प्रश्नाचा अनुषंगिक शक्यता मानव वेगवेगळ्या खंडावर अथवा देशात वेगवेगळ्या जेनेटीक्स म्युटेशन्सचे अपघात होऊन वेगळा वेगळा घडला असता तर ? मानवी जनुकांमध्ये आणि रेसेस मध्ये वरवर दिसणार्‍या फरकां पलिकडे जाऊन खुप मोठे फरक जाणवले असते पण तसे न होता वैज्ञानिकांच्या मते जगभरच्या मानवी जनुकांचा नकाशा वरवर दिसणार्‍या फरकांपलिकडे फारसा वेगळा नाही आणि म्हणून जि काही होमोसेपियन का काय ते ती झाली ती एकाच प्रदेशात झाली असणे स्वाभाविक आहे आणि प्रांत आफ्रीकेचा असणे हा योगायोग आहे किंवा कसे.

मानवी जनुकांमध्ये आणि रेसेस मध्ये वरवर दिसणार्‍या फरकां पलिकडे जाऊन खुप मोठे फरक जाणवले असते पण तसे न होता वैज्ञानिकांच्या मते जगभरच्या मानवी जनुकांचा नकाशा वरवर दिसणार्‍या फरकांपलिकडे फारसा वेगळा नाही

ठिक म्हणुन जर मानवाचे उगम एकाच ठीकाणी असल्याचा दावा करत असाल तर मग जनुकीय नकाशा सारखा असणा-या वन्य प्राण्यांना सुध्दा हा नियम लागु असला पाहिजे, आणि ज्या खंडात त्यांचा जन्म झाला तेथुन जगभर प्रवास, ते पण समुद्रातुन आणि वाळवंटातुन सुध्दा.

माहितगार's picture

27 Mar 2017 - 5:49 pm | माहितगार

अगदी

दीपक११७७'s picture

27 Mar 2017 - 9:34 pm | दीपक११७७

पहिला प्राणी उंदिर जगभर कसा पोहोचला

समजा, होमो इरेक्टसचा एक गट युरोपात गेला, 50000 वर्ष तिथे राहिल्यावर थंडीमध्ये राहण्यासाठी अनुकूल असलेले बदल, म्युटेशन ज्या मानावांमध्ये घडले, त्यांची संख्या तिथे वाढत गेली आणि इरेक्टसपेक्षा एक वेगळा वंश तयार झाला

याला कुठलाही पुरावा नाही हे केवळ स्पेक्युलेशन आहे. neanderthalensis साधारण कालावधी चार लाख ते चाळीस हजार वर्ष निवास युरोप आणि साउथ वेस्टर्न ते सेन्ट्र्ल एशिया आहे म्हणजे आपले मुळ(sapiens) जन्माच्या २ लाख वर्षा आधी उगम व आपले मुळ(sapiens) जन्मानंतर १.४ लाख वर्षा पर्यंत अस्तित्व. स्पेन मध्ये ४ लाख वर्ष जुना जो सांगडा मिळाला(December 5, 2013 ) तो neanderthalensis चा आहे. erectus साधारण कालावधी १८ लाख ते १.४ लाख वर्ष निवास आफ्रिका आणि वेस्टर्न एशिया व ईस्ट एशिया (चायना , इनडोनेशिया) म्हणजे आपले मुळ(sapiens) जन्मानंतर १.४ लाख वर्षा पर्यंत अस्तित्व. ह्या erectus चा युरोपात असण्याचा कुठलाही पुरावा नाही. आता जर हा erectus युरोपात गेलाच नाही तर त्याच्यात म्युटेशन होण्याचा प्रश्नच येत नाही

http://news.nationalpost.com/news/oldest-ever-human-forerunner-dna-found...

साधारण 50000 वर्षांपूर्वी मात्र असा बिंदू आला, कि या दोन वंशातील जनुकीय नकाशा बदलला आणि संकर अशक्य झाला.
मुळातच स्पेन मध्ये ४ लाख वर्ष जुना जो सांगडा मिळाला(December 5, 2013 ) तो neanderthalensis चा आहे, म्हणजे वेगळा वंश हे अस्तित्व neanderthalensis यांच किमान ४ लाख वर्ष जुना आहे. त्यामुळे साधारण 50000 वर्षांपूर्वी मात्र असा बिंदू आला, कि या दोन वंशातील जनुकीय नकाशा बदलला आणि संकर अशक्य झाला याला काही अर्थ रहात नाही. कारण आपापसात तर ते संकर करु शकत होते. neanderthalensis यांच्या डिएनए चा काही भाग आज ही युरोपीयन लोकान मध्ये सापडतो (सुलभ संदर्भ कोहम भाग २ )