कथाकथी

पुंबा's picture
पुंबा in जनातलं, मनातलं
23 Mar 2017 - 7:30 pm

नमस्कार मिपाकर, आजच अस्मादिकांना मिपागावाचे रहीवासी झाल्याला एक वर्ष पूर्ण झाले. इतके दिवस धागा लिहिण्याला धीर होत नव्हता पण आज आदूबाळ म्हटले धागा काढा. त्यांची आज्ञा शिरसावंद्य मानून, हा धागा काढून मिपावाढदिवस साजरा करत आहे.

आपल्यापैकी बहुतेक प्रत्येकाच्या वाचनाची सुरूवात कथांपासूनच झाली असेल. याला कारण म्हणजे, मराठी, हिंदी, इंग्रजीच्या पुस्तकांतील धडे. या धड्यांमध्ये मातब्बर लेखकांच्या छोट्या कथा असत/असतात. पुस्तक घरी आलं की सगळ्यात आधी पुस्तकाचा वास घ्यायचा आणि वेष्टणं पण घालायच्या आधी सगळे धडे वाचून टाकायचे असं केल्याचे कित्येकांना आठवत असेल. आपल्यापैकी कित्येकांची प्रेमचंद, दि. बा. मोकाशी, पु. ल, श्री. दा. पानवलकर, व्यंकटेश माडगूळकर, आणाभाऊ साठे, कमलेश्वर, ओ हेन्री, चेकोव्ह अश्या एकापेक्षा एक महान लेखकांची पहिली ओळख पाठ्यपुस्तकांतूनच झाली. जीव छोटा असला तरी आशयसमृद्ध, वाचकाला गुंतवून ठेवणारी कथा ही माझ्यामते सर्वश्रेष्ठ साहित्यप्रकार आहे.

तुमच्या आवडत्या कथांविषयी सांगा ना. मराठीतील सर्वश्रेष्ठ कथांविषयी गूगल सर्च केला तर ना यादी मिळते ना कोणत्या साईटवर कथा मिळतात. याउलट हिंदी कथांकरीता हिंदी समय ही अप्रतिम साईट आहे. तर इंग्रजी अभिजात कथावाङ्मय या अप्रतीम साईटवर साठवले आहे. मराठीसाठी मात्र असला काही प्रकार नाही. तेव्हा मराठीतील तुमच्या आवडत्या, तुमच्यामते सर्वश्रेष्ठ कथांविषयी चर्चा झाली तर चांगलंच आहे. सर्वांनाच चांगल्या कथांशी परिचय होईल. प्रेमचंद, मंटो, इस्मत चुगताई, ओ हेन्री, चेकोव्ह, मोम्पासा, वूडहाऊस, जी ए, शंकर पाटील, श्री दा पानवलकर, दि बा मोकाशी, द मा, जयवंत दळवी, श्री ना, माळगावकर, आर के नारायणन या महारथींची तर चर्चा करूच त्याबरोबर तुलनेने अप्रसिद्ध अश्या लेखक लेखिकांच्या कथांवर देखील प्रकाश पडला तर भारी होईल. मराठी आंजावरील सर्वश्रेष्ठ कथांची पुन्हा उजळणी झाली तरी चांगलंच आहे. एखादी खूप आधी वाचलेली कथा आठवत नसेल तर त्याची पण उकल होऊ शकेल इथे.

--(कथा वाचताना सगळ्या व्यथा विसरणारा) सौरा

सर्वप्रथम माझ्या आवडत्या कथांची(सगळ्यात जास्त) यादी देतो आठवतील तश्या आणखी नावांची भर प्रतिसादांत घालत राहीलच.

विश्वनाथ एक शिंपी- वि वा शिरवाडकर
नागिण- चारूता सागर
विदूषक, प्रदक्षिणा- जि ए
किडके जग- गंगाधर गाडगीळ
आता आमोद सुनासी आले- दि. बा. मोकाशी
सूर्य- श्री दा पानवलकर
स्मशानातील सोनं- आण्णाभाऊ साठे
द लास्ट लिफ- ओ हेन्री
द लास्ट लेसन- Alphonse Daudet
द बेट- चेकोव्ह

चला लिहा मग तुम्हीही तुमच्या आवडत्या कथांविषयी..

कथाशिफारस

प्रतिक्रिया

रामपुरी's picture

23 Mar 2017 - 7:54 pm | रामपुरी

पण सगळ्यात पहिल्यांदा हेच नाव डोळ्यासमोर आलं

How Much Land does a Man Need?

पुंबा's picture

3 Apr 2017 - 11:48 am | पुंबा

अप्रतिम आहे ही कथा..

द लिटल मॅच गर्ल ही हान्स अँडरसन याची कथा चटकन आठवली. कारुण्यमय आणि तरल.

प्राची अश्विनी's picture

24 Mar 2017 - 7:26 am | प्राची अश्विनी

+1

पुंबा's picture

3 Apr 2017 - 10:56 am | पुंबा

आत्ताच वाचली. खरोखर तरल.

किसन शिंदे's picture

23 Mar 2017 - 11:07 pm | किसन शिंदे

दमडी

आषाढ_दर्द_गाणे's picture

23 Mar 2017 - 11:27 pm | आषाढ_दर्द_गाणे

फार कथा नाही वाचलेल्या, पण तरी पटकन आठवणाऱ्या -
जेम्स जॉईसच्या डब्लिनर्स मधली 'काऊंटरपार्ट्स'
आणि मार्केझची 'क्रोनिकल्स ऑफ अ डेथ फोर्टोल्ड'*
*हिला खरे तर लघुकादंबरी म्हणावे लागेल. पण नव्वदेक पानात अक्खी कादंबरी वाचल्याचे समाधान मिळते!

पुंबा's picture

3 Apr 2017 - 10:53 am | पुंबा

'क्रोनिकल्स ऑफ अ डेथ फोर्टोल्ड' वाचली. फार फार सुंदर आहे. धन्यवाद.

आनंदयात्री's picture

23 Mar 2017 - 11:32 pm | आनंदयात्री

उत्तम धागा. हिंदी समयच्या लिंकसाठी विशेष धन्यवाद.

शेवटचा डाव's picture

23 Mar 2017 - 11:46 pm | शेवटचा डाव

भेट तुझी माझी स्मरते
शापीत समय
क कायद्याचा

आषाढ_दर्द_गाणे's picture

24 Mar 2017 - 12:33 am | आषाढ_दर्द_गाणे

ओह हां, 'स्मशानातील सोनं' नक्कीच आवडलेली!

सस्नेह's picture

24 Mar 2017 - 11:46 am | सस्नेह

'माझ्या बापाची पेंड' द .मा.

केडी's picture

24 Mar 2017 - 12:06 pm | केडी

आफ्टर ट्वेंटी इयर्स (After Twenty Years), ओ, हेन्री, हि कथा शाळेत होती, आज का कोणास ठाऊक तीच डोक्यात आली पटकन.

पुंबा's picture

3 Apr 2017 - 10:49 am | पुंबा

खुप आवडली. ओ हेन्रीच्या सगळ्या प्रसिद्ध कथा वाचल्या आहेत.

जव्हेरगंज's picture

24 Mar 2017 - 1:37 pm | जव्हेरगंज

शंकर पाटलांंच्या बऱ्याच वाचल्यात. विशेष आवडल्या.
जिएंची 'पारधी' मस्त आहे!

'पारधी' कुठल्या कथासंग्रहात आहे?

शंकर पाटलांचा 'पाटलाची चंची' हा खुप जबरदस्त संग्रह आहे. एक से एक कहर कथा आहेत यात.

मस्त आहे ती लिंक! ही कथा ऑनलाइन कुठे वाचता येइल का?

अरेच्चा! मला वाटलं इथे फक्त मराठी लघुकथांबद्दल बोलत असतील. म्हणून मी धागा उघडलाच नव्हता. माझं मराठी वाचन शुन्य आहे. आय मिन दहावीपर्यंत जे काय धडेबिडे वाचले होते ते सगळे म्हातारपणामुळे विसरुन गेलेय :-D

एनीवे मी वाचलेल्या इंग्रजी लघुकथांपैकी बेस्ट:
* गेट अ लोड ऑफ धिस - जेम्स हैडली चेस आणि
* नो कमबैक्स - फ्रेडरीक फोरसिथ
बाकी वुडहाऊस वाइल्ड ख्रिस्ती डॉयल वगैरे नेहमीचे यशस्वी कलाकार आहेतच.

पुंबा's picture

3 Apr 2017 - 10:52 am | पुंबा

:))

नो कमबॅक्स आहे माझ्याकडे. ते आणी फोर्सिथचंच डे ऑफ जॅकल वाचायचं आहे. अ‍ॅगाथा ख्रिस्तीची 'द विटनेस ऑफ द प्रॉसिक्युशन' वाचलियेत का? खुप भारी कथा.

वरुण मोहिते's picture

3 Apr 2017 - 11:31 am | वरुण मोहिते

फ्रेडरिक फोर्सिथ विशेषतः लघुकथांना हात घालत नाहीत . सगळ्या नाही पण काही कथा चांगल्या जमल्या आहेत नो कमबॅकस मधील . डे ऑफ जॅकल वाचा चांगलं आहे .

नाही. ही अजून वाचायचीय. ख्रिस्टीचा आकडा ५८/८९ आहे.

यशोधरा's picture

3 Apr 2017 - 11:08 am | यशोधरा

मस्त धागा, लिहिते थोड्या वेळाने.

विचित्रा's picture

4 Apr 2017 - 9:57 am | विचित्रा

कथा हा वाङ्मयप्रकार अतिशय आवडतो. इथे खुप छान संदर्भ मिळाले.
आभार

अनुप ढेरे's picture

6 Apr 2017 - 10:01 am | अनुप ढेरे

पार्सन्स प्लेजर -- रोआल्ड दाह्ल

स्वधर्म's picture

6 Apr 2017 - 11:05 am | स्वधर्म

धन्यवाद सौरा.
भयकथा विशेष अावडतात. खासकरून धारपांच्या कथा खूप भावतात. अतिशय संयमित अाणि काही ना काही तर्क, विचार असलेली, पण गूढ कथा लिहीण्यात ते माहिर होते. त्यांची चंद्राची सावली ही दीर्घ कथा/ लघु कादंबरी अजून अाठवते.