तू असतीस तर

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in जनातलं, मनातलं
22 Mar 2017 - 12:34 pm

तू असतीस तर ...

अमराठी व्यक्तीच्या प्रेमात पडण्याचा एकच प्रोब्लेम असतो , तुम्ही तिला मराठी कविता नाही समजाऊन सांगु शकत. भाषांतर करता येते , अगदीच नाही असं नाही, पण भाषांतराने कवितेचा आत्माच हरवुन जातो. हे म्हणजे अगदी खुप काही तरी सांगायचय पण व्यक्त करता येत नाहीये अशी काही अवस्था ! मग असं वाटतं की तुमची प्रेयसी तुमच्याकडे जणु ऑटिझम असलेल्या मुलाकडे पहावे तसे काहीसे पहात आहे अन कविता तिच्या जागी बसुन तुमच्या अगतिकतेवर गालातल्या गालात हसत आहे की काय !

नुकतीच ही कविता ऐकण्याचा योग आला :
http://www.aathavanitli-gani.com/Song/Tu_Asatis_Tar_Jhale_Asate

https://www.youtube.com/watch?v=_zbUO-ShkHs

आपल्या पाडगावकरांची कविता , संजीव अभ्यंकरांच्या गोड आवाजात !


तू असतीस तर झाले असते
गडे उन्हाचे गोड चांदणे
मोहरले असते मौनातून एक दिवाणे नवथर गाणे
तू असतीस तर झाले असते |
बकुळिच्या पुष्पापरी नाजुक
फुलले असते गंधाने क्षण
अन् रंगांनी भरले असते क्षितिजावरले खिन्न रितेपण
तू असतीस तर झाले असते |
तू असतीस तर झाले असते
आहे त्याहुनी जग हे सुंदर
चांदण्यात विरघळले असते
गगन धरेतील धूसर अंतर |
तू असतीस तर झाले असते
गडे उन्हाचे गोड चांदणे
मोहरले असते मौनातून एक दिवाणे नवथर गाणे
तू असतीस तर झाले असते ...

आता हे कसं समजावुन सांगणार ?

मोहरले असते मौनातुन एक दिवाणे नवथर गाणे हे हे जे काही फीलींग , जो काही अनुभव आहे तो कसा समजाऊन सांगणार ? किंव्वा बकुळिच्या पुष्पापरी नाजुक हे कसं समजाऊ ? किंव्वा मग अन् रंगांनी भरले असते क्षितिजावरले खिन्न रितेपण , क्षितिजावरले खिन्न रितेपण ... just speechless , I don't know english or hindi words to explain this !
जाऊन दे , हे मौनातील एक दिवाणे नवथर गाणे आहे , आपण नाही समजावुन सांगु शकत... अशा वेळेला आपण मौनातच राहिलेले बरे !

अमराठी व्यक्तीच्या प्रेमात पडण्याचा एकच प्रोब्लेम असतो , तुम्ही तिला मराठी कविता नाही समजाऊन सांगु शकत मग दुसर्‍या कुठल्या तरी भाषेतील कविता सुचत जातात , अगदी तशाच , अगदी तितक्याच उत्कट, जसे की आम्र-बौर का गीत -यह जो मैं कभी-कभी चरम साक्षात्कार के क्षणों में किंव्वा How Do I Love Thee? Sonnet 43 वगैरे वगैरे ....

.... पण त्याला आपल्या मायबोलीतल्या , आपल्या मराठीतल्या उबदार हळवेपणाची सर नाही !

कविताआस्वाद

प्रतिक्रिया

जगप्रवासी's picture

22 Mar 2017 - 2:40 pm | जगप्रवासी

असं होत कधी कधी.... जे नेमकं सांगायचं आहे तेच सांगण्यासाठी शब्द सुचत नाहीत किंवा आपली भावना तिच्यापर्यंत पोहोचवता येत नाही.

यातलं दुसऱ्या गाण्यात देखील मराठी + हिंदी + इंग्रजी असा प्रयोग केला आहे. दोन्ही गाणी माझी आवडती आहेत.

रंग हे नवे नवे
दुनिया है नयी नयी
Mornings are just magical
शामें भी हैं सुरमई...

दिल में जैसे तितलियों के सैंकड़ों हैं पर लगे
हंसते हंसते ख़्वाब से जैसे कोई जगे
गाठ जाई बांधली तरी कुठे दिेसे न दोर
This is not only a crush
I guess it's something more...
ख़्वाबों में भी, ख़यालों में भी
एकटी असे न मी, असेच तोही सोबती

पहिले कधी ही ना
मी अशी वेडी-भोलीभाली फ़ॅन्टसी
जगलेच नव्हते कधी
अब तो जब दिन ढलता है
ना पता कैसे कब
सिंड्रेला बनून जाते मी माझी
आते-जाते देख के वो दिल चुरा के ले गया
चोर इतका आपला न वाटला कधी
सौ तरह के रंग मेरे, सौ तरह के मूड हैं
आजसारखी अधीर ना तरी कधी
ख़्वाबों में भी, ख़यालों में भी
एकटी असे न मी, असेच तोही सोबती
रंग हे नवे नवे
दुनिया है नयी नयी
Mornings are just magical
शामें भी हैं सुरमई...
दिल में जैसे तितलियों के
सैंकड़ों हैं पर लगे
हंसते हंसते ख़्वाब से जैसे कोई जगे
गाठ जाई बांधली
तरी कुठे दिेसे न दोर
This is not only a crush
I guess it's something more...
ख़्वाबों में भी, ख़यालों में भी
एकटी असे न मी, असेच तोही सोबती

राघव's picture

18 Mar 2019 - 9:00 pm | राघव

सुंदर लेखन.. अगदी आतून.. मनापासून!
अभ्यंकर साहेबांनी सुंदरच म्हटले आहे. पण मला रवींद्र साठेंनी हे मूळ गायलेले आहे असे समजले. कुणाकडे काही माहिती असल्यास सांगावे. ऐकायची ईच्छा आहे! :-)

श्वेता२४'s picture

31 Mar 2019 - 2:27 pm | श्वेता२४

मला स्वत:ला हे गाणं खूप आवडतं. लेख खूप चांगला लिहीलाय

गरजच काय ? जेव्हा तुम्ही प्रेमात पडता तेव्हा बाकी सगळ्या गोष्टी बाय डिफॉल्ट फाट्यावर मारलेल्या असतात ना ?