डेटा महापूर

अत्रन्गि पाउस's picture
अत्रन्गि पाउस in काथ्याकूट
1 Mar 2017 - 6:15 pm
गाभा: 

आंतरजालावर अनुभवांचा महापूर , भावनांचा महापूर, सल्ल्यांचा महापूर, कवितांचा महापूर, लेख, कथा निबंधांचा महापूर ....तत्वज्ञान पंथांचा तर महापुराचा धबधबा जणू ....

बऱ्याच वर्षांपूर्वी एका मुलाखतीत अस विचारलं होत कि "डेटा अनालिसिस चे अंतिम भवितव्य काय ?" तेव्हा "अंतर्ज्ञान" असं उत्तर देऊन मुलाखत काराला त्या उमेदवाराने नि:शब्द केले होते

कोणताही विषय घ्या ...अपरंपार डेटा उपलब्ध ..खरी, खोटी , पूर्ण, अपूर्ण...आमच्या भाषेत structured / unstructured डेटा आणि मग त्याचं पृथ:करण, चर्वित चर्वण, त्याचे प्रत्येक टप्प्यावरचे निष्कर्ष मग त्या निष्कर्षांचा वेगळा डेटा आणि मग त्यावरची अनुमाने ... पुढे जाऊन त्या अनुमानांचे पडताळणी आणि जर बरोबर असेल तर अजून अनुमाने आणि त्या अनुमान काढण्याची एक थियरी ...आशा अजून थियरी आणि त्यांचा सांगोपांग तौलनिक डेटा..वेगवेगळ्या जीवन सूत्रांची भरमार, निष्कर्षांचा रतीब आणि एकूणच ह्या सगळ्याचा एक व्यमिश्र काढा ...प्या लेको ....

निसर्गाचे गूढ आपल्याला जवळपास उलगडले आहेच, आयुष्यातील सगळी ाव्हेरियेबल्स आता लक्षात आलेलीच आहेत सगळी व्यक्त अव्यक्त सूत्र आपल्या लक्षात जवळपास आलेलीच आहेत ती कोडी सुटायच्या बेतात आहेत सगळ एकदा पूर्ण झालं कि मग कदाचित विश्वामित्रा प्रमाणे जणू प्रतिसृष्टी तयार करू शकूच कि काय असा अविर्भाव ...

कोणतीही गोष्ट आली समोर कि बसवा तिच्यायला एखाद्या कोष्टकात, हाणा एखाद तार्किक, बनवा एखादा पंथ आणि नानू सरंजामे म्हणतो तसे 'होऊ द्या रेजीमेंटेशन'

हा प्रवास अपरिहार्य असला तरी हे उन्नयन का अध:पतन का अजून काही ????

प्रतिक्रिया

दीपक११७७'s picture

1 Mar 2017 - 7:54 pm | दीपक११७७

आज काल जरा काही नविन सापडलं
आणि पुर्विच्या साच्यात बसत नसलं की त्याला अनुसरुन
लगेच नविन परिभाषा (डेफीनेशन) नविन तर्क आणि
नविन गणित पध्दती(शक्य तितकी किचकट आणि क्लिष्ट) तयार करण्याची रितच झाली आहे.
ज्ञात असलेल्या परिभाषेत का बसत नाही तसेच सोप उत्तर का असुशकत नाही याचा कोणी विचार करत नाही

कंजूस's picture

1 Mar 2017 - 8:01 pm | कंजूस

:)

सतिश गावडे's picture

1 Mar 2017 - 9:46 pm | सतिश गावडे

हा बराचसा डेटा पब्लिक डोमेनमध्ये मध्ये असतो. खूप काही करता येऊ शकतं हा देता वापरुन. :)

वामन देशमुख's picture

31 Mar 2017 - 12:49 pm | वामन देशमुख

RDBMS theory बद्धल मदत हवी आहे. विशेषतः नॉर्मलायझेशन फॉर्म्स आणि डेटा डिपेंडंसीज समजून घ्यायचे आहेत. कुणी इथे लेख लिहिला तर बरे होईल. मला फोनवर समजावून सांगितले तर फारच उपकार होतील. तज्ज्ञ मिपा करांनी मला व्यनी करावा ही विनंती.

वामन देशमुख's picture

31 Mar 2017 - 12:53 pm | वामन देशमुख

विकी, StackOverFlow आणि इतर साइटींवर वाचून झालेय पण पुरते समजले नाही. विशेषतः 3NF, BCNF फारसे काही कळले नाही.

अत्रन्गि पाउस's picture

4 Apr 2017 - 6:30 am | अत्रन्गि पाउस

व्यनी करा, बोलू....

संजय क्षीरसागर's picture

31 Mar 2017 - 1:23 pm | संजय क्षीरसागर

हा प्रवास अपरिहार्य असला तरी हे उन्नयन का अध:पतन का अजून काही ????

डेटा इज लाइक मेंटल फूड .
तो योग्य प्रमाणात ग्रहण करुन, व्यवस्थित प्रोसेस केला, तर निश्चितच मनाचं उन्नयन .
प्रमाणाबाहेर किंवा आवश्यकतेपेक्षा जास्त जमा झाला, तर हार्ड डिस्क हँग होणार हे नक्की !
आणि बायो-हार्ड डिस्क चुकून क्रॅश झाली तर.... खोलखोल अध:पतन.