PAKISTAN DIDN’T KILL MY DAD “WAR” DID !!

डँबिस००७'s picture
डँबिस००७ in काथ्याकूट
1 Mar 2017 - 5:57 pm
गाभा: 

एका राम सुब्रमण्यम नावाच्या बेकार माणसाने एका बिंडोक मॉडेलला घेऊन " वॉईस ऑफ राम " या बॅनरसाठी एक फिल्म बनवली.
त्यानंतर हा उठलेला गदारोळ !!

PAKISTAN DIDN’T KILL MY DAD “WAR” DID !!
ह्या वाक्याचा अर्थ कोणी मला समजुन सांगेल का ?

ह्या राम सुब्रमण्यंम चे काम :
While the Profile for Peace campaign found many takers from both the neighbouring countries, celebrities like filmmaker Mahesh Bhatt and music composer Vishal Dadlani also extended their support. It was relaunched last year after Indian army’s surgical strike across the Line of Control (LoC) into Pakistani territory.
Subramanian who has volunteered for Arvind Kejriwal’s anti-corruption political movement claims that he is not a member of the Aam Aadmi Party.

गुरमेहर कौरचे वडिल पाकिस्तान बरोबर झालेल्या कारगील युद्धात शहीद झाले, तेंव्हा ही गुरमेहेर फक्त २ वर्षांंची होती.

प्रतिक्रिया

साधा मुलगा's picture

1 Mar 2017 - 6:58 pm | साधा मुलगा

यामध्ये नक्की काय झाले ?(वर लेखात दिलेला मजकूर सोडून),सोशल मीडियावर चाललेल्या बाचाबाची व्यतिरिक्त यामागे काय चालू आहे? का उगाच एक स्टंट आहे प्रसिद्धीसाठी? कुणी संदर्भासहित स्पष्टीकरण ( कुठलाही पूर्वग्रह न ठेवता) करेल काय?

ट्रेड मार्क's picture

2 Mar 2017 - 2:24 am | ट्रेड मार्क

दिल्लीतल्या रामजस नावाच्या कॉलेजमध्ये "Cultures of Protest" नावाचे एक चर्चासत्र आयोजीत केले होते. त्यात सहभागी होण्यासाठी उमर खालिद व शेहला रशीद या दोघांना पाहुणे म्हणून बोलावले होते. या दोघांवर देशविरोधी घोषणा दिल्याचा आरोप आहे त्यामुळे अभाविपने या दोघांच्या सहभागावर आक्षेप घेतला. त्यातून निर्माण झालेला वाद चिघळला. दुसऱ्या दिवशी रामजास कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी अभाविपच्या विरोधात पोलीस स्टेशन समोर प्रोटेस्ट केला. त्यात डाव्या विचारसरणीच्या AISA या विद्यार्थी संघटनेची अभाविपच्या मुलांबरोबर मारामारी झाली.

दोन दिवसांनी लेडी श्रीराम कॉलेजच्या गुरमेहेर कौर ने "I am not scared of ABVP", असं सोशल कॅम्पेन चालू केलं. पुढे तिचा "PAKISTAN DIDN’T KILL MY DAD “WAR” DID !!" हे प्लॅकार्ड घेतलेला फोटो वायरल झाला आणि सोशल मीडिया वॉर चालू झालं. त्यात राजकीय पक्षांनी उड्या घेतल्या आणि पुढचं रामायण घडतंय.

निमिष ध.'s picture

1 Mar 2017 - 9:28 pm | निमिष ध.

हा व्हिडीओ बघा. पूर्ण बघा. मग विचार करा. आणि कसला गदारोळ ? कशासाठी ? आणि आताच का ? असा प्रश्न विचारा !

https://www.youtube.com/watch?v=97yJsfddi4w

गॅरी ट्रुमन's picture

1 Mar 2017 - 9:52 pm | गॅरी ट्रुमन

नेहमीप्रमाणे डाव्या विचारवंतांचे उर्फ बुबुडाविपुमाधविंचे याप्रकरणी ढोंग सुरू झाले आहे. मागच्या वर्षी कन्हैय्या प्रकरणी झाले होते त्याचीच पुनरावृत्ती होत आहे.

ती मुलगी नक्की काय बोलली याचे लंबेचवडे मराठी भाषांतर सध्या फेसबुकवर फिरत आहे. ती खरोखरच तसे बोलली असेल तर तिची मते मान्य नसूनही तिला स्वतःचे मत ठेवायचा अधिकार आहे हे मान्य करण्यात मला तरी कसलीच अडचण नाही. तिची मते का मान्य नाहीत? कारण पाकिस्तानची मुळातली निर्मितीच हिंदूद्वेषावर झालेली असेल आणि या द्वेषामागे कित्येक शतकांचा इतिहास असेल तर पीस प्रोसेस वगैरे बकवास मला तरी नक्कीच मान्य नाही. प्रत्येक वेळा आपण मैत्रीचा हात पुढे करायला जायचा आणि त्यांनी खंजीर खुपसायचा हे फार वेळा झाले आहे. तरीही परतपरत तीच तीच चूक आपले लोक करत असतातच. तसेच युरोपातल्या परिस्थितीशी तुलनाही अत्यंत अनाठायी आहे. मान्य आहे की युरोपातली राष्ट्रे कित्येक शतके एकमेकांशी लढत होती पण ते आता गुण्यागोविंदाने नांदत आहेत.पण युरोपातल्या देशांमध्ये आणि पाकिस्तानात प्रचंड मोठा फरक आहे. युरोपातले लोक २०० तर सोडाच ७० वर्षांपूर्वीचेही वैर सोडायला तयार आहेत आणि पाकडे मात्र १४०० वर्षांपूर्वीचीच वाळवंटातील विचारसरणी चोंबाळत बसलेले आहेत. जर पाकड्यांमध्येही फार पिढ्या वैर झाले आणि यापुढे शांततेत राहू असे खरोखरच वाटणारे लोक मोठ्या प्रमाणावर निघाले तर गुण्यागोविंद्याने राहायला आमचीही ना नाही. पण तो प्रकार आपल्याच काय आपल्या नातवंडांच्या जीवनकाळात तरी बघायला मिळेल याची जरासुध्दा शक्यता वाटत नाही--खात्री तर सोडूनच द्या. इतक्या वेळा आपण खड्ड्यात पडूनही त्या मुलीला परत खड्ड्यात पडायचेच असेल तर ते तिला लखलाभ असो. तरीही असे मत ठेवायचा अधिकार तिला आहे हे मान्य करायला कसलीच अडचण नाही. त्यातूनही ती पाकड्यांना अनुकूल होईल असे कुठलेही कृत्य करत नसेल तर (नुसती भारत-पाकिस्तानमध्ये शांतता व्हावी अशी शेखमहंमदी स्वप्ने ठेवणे हा मूर्खपणा असेल पण त्यात इतके आक्षेप घेण्यासारखे मला तरी काही वाटत नाही-- पण भारताचे तुकडेतुकडे व्हावे अशी इच्छा धरणे हे मात्र नक्कीच आक्षेपार्ह आहे आणि त्या प्रकाराला योग्य ते शासन झालेच पाहिजे).पण त्याचबरोबर ती राम सुब्रमण्यम, कविता कृष्णन असल्या माणसांबरोबर वावरत असेल तर मात्र तिला बेनेफिट ऑफ डाऊटही देता येईल का याविषयी मी तरी नक्कीच साशंक आहे.

तिच्या व्हिडिओमधील एक वाक्य आऊट ऑफ कन्टेक्स्ट घेऊन सगळा गदारोळ होत आहे असे डाव्यांचे म्हणणे आहे. ठिक आहे. पण मग डाव्यांनी स्वत:चाच इतिहास तपासून बघावा-- इतरांनी म्हटले असेल त्याला आऊट ऑफ कन्टेक्स्ट घेऊन डाव्यांनी किती चिखलफेक केली आहे हे बघता अश्रूसिंचनासाठी त्यांना उदंड वाव आहे. आणि हो हे भाषांतर येण्यापूर्वी फेसबुक-मिपावरच्या किती लोकांनी तिचा मुळातला व्हिडिओ बघितला होता? जसा तिच्या टिकाकारांनी तो व्हिडिओ बघितला नाही तसाच यांनीही बघितला नव्हता असे का म्हणू नये? सगळा डोलारा त्याच आऊट ऑफ कन्टेक्स्ट घेतलेल्या वाक्यात ---Pakistan did not kill my father, war did चुकीचे कसे नाही (म्हणजे पाकड्यांना उध्वस्त करावे अशी इच्छा धरणारे कसे चुकीचे) आणि तिला असे बोलायचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य कसे आहे असली बिनबुडाची आर्ग्युमेन्ट करण्यावरच आधारीत होता. कन्हैय्याप्रकरणाशी साम्य का जाणवते? कारण खरोखरच कन्हैय्या तसे काही बरळला होता की नाही याचा तपास काय होतो याकडे लक्ष न देता-- तो तसे बोलला त्यात चुकीचे काय, त्याला अभिव्यक्तीस्वातंत्र्य नाही का वगैरे वगैरे बडबड सुरू झाली होती. म्हणजे भारताचे तुकडेतुकडे व्हावेत अशी इच्छा धरण्यात या हरामखोरांना काहीही चुकीचे वाटत नव्हते. म्हणजे खरोखर कन्हैय्या दोषी आहे की नाही हा प्रश्न राहिला बाजूलाच. मी म्हणतो की जे लोक भारताचे तुकडेतुकडे व्हावेत अशी इच्छा धरतात त्यांना भारतात राहायची परवानगी मुळातच का दिली जाते आणि या असल्या हरामखोरांवर करदात्यांचे पैसे का खर्च केले जातात हेच समजत नाही. असल्यांना पाकिस्तानात हाकलून द्या अशी मागणी केल्यावर इथेच काही लोक मला 'पाकिस्तानी टुरिझमचे ब्रॅन्ड अ‍ॅम्बॅसॅडर' म्हणतीलच. अशांना फाट्यावर मारत आहे.

तिला बलात्काराची धमकी दिली आहे असा दावा तिने केला आहे. कोणाही सुसंस्कृत माणसाला असा विचार करणेही अत्यंत घृणास्पद आणि अयोग्य वाटेल. पण ती धमकी कोण एक भट्टाचार्य म्हणून डाव्या संघटनेचाच देत आहे असेही फेसबुकवर फिरत आहे (खरेखोटे माहित नाही). पण पहिल्यांदा या प्रकरणावरून जितका गदारोळ उठला होता त्याच्या १% ही आवाज याविषयी उठणे बंद झाले आहे आणि वेगळे मुद्दे चर्चेत येत आहेत हे पाहता त्या बातमीत तथ्य असावे असे सकृतदर्शनी वाटते. आपले केजरीवाल महाशय नेहमीप्रमाणे यात उतरलेच. असल्या धमक्या देणारे भाजप आणि अभाविपचेच असे त्यांनी जाहिरही करून टाकले आणि त्याबद्दल भाजप आणि अभाविपची 'घिन्नत' वाटते असेही त्यांनी जाहिर करून टाकले. म्हणजे सर्जिकल स्ट्राईकचे यांना पुरावे हवेत आणि अशी कुठली बातमी आल्यावर त्यामागे नक्की कोण आहे याची शहानिशा करायच्या भानगडीत पडायची गरज त्यांना वाटली नाही.

जे काही असेल ते. तिला बलात्काराच्या धमक्या येत असतील तर त्यावर नक्कीच कडक कारवाई व्हायला हवी. पण त्याचबरोबर आणखी एक गोष्टही लक्षात ठेवायला हवी. शेफाली वैद्य यांना किती घाणेरडे प्रश्न विचारले जातात, कसल्या कसल्या धमक्या दिल्या जातात हे त्यांनी त्यांच्या फेसबुक भिंतीवर अनेकदा लिहिलेही आहे. त्याविरूध्द या डाव्यांनी कधी अवाक्षर काढलेले कधी ऐकलेले आहे का? कारण अगदी सहज समजण्यासारखे आहे. ऑरवेलसाहेब म्हणून गेलेत त्याप्रमाणे: "All animals are equal but some animals are more equal than others".

दुसरे म्हणजे २० वर्षाच्या मुलीला ट्रोल करणे चुकीचे आहे असे लोक म्हणत आहेत. पण तिच्याविरूध्द साधारणपणे तिच्याच वयाच्या (दोन-तीन वर्षे मोठी असेल कदाचित) बबिता फोगाट आणि गीता फोगाट तसेच साक्षी मलिक यांनी भूमिका घेतल्यावर त्यांना मात्र ट्रोल केलेले चालते. जावेद अख्तरने तर नेहमीप्रमाणे वेगळेच तारे तोडले आहेत. म्हणे "जवळपास अंगठाछाप" मल्लांनी असे ट्रोलिंग केले तर समजू शकतो पण शिकल्यासवरलेल्यांनीही असेच करावे याचे वाईट वाटते असे काहीसे तारे त्यांनी तोडले. त्यावर बबिता फोगाटने "मैंने जब स्कूल देखा भी नहीं था तबसे भारतमाता की जय बोल रही हूं। देशभक्ति किताबों से नहीं आती।" असे म्हणून खरे तर जावेद अख्तरच्या सणसणीत कानफाटीत लगावली आहे. बरोबर आहे. आपल्या मातृभूमीविषयी प्रेम असणे ही मूलभूत प्रेरणा आहे. या बुबुडाविपुमाधविंना नाही कळायची ती.

राहता राहिला प्रश्न तिच्या वडिलांनी दिलेल्या बलिदानाचा. तिच्या वडिलांविषयी आदरच आहे. त्यांच्यासारख्या असंख्य लोकांमुळे मी हे घरी बसून टाईप करू शकत आहे याची जाणीव मला नक्कीच आहे. पण अशा वडिलांची मुलगी झाल्यामुळे आपोआप तोच आदर तिला द्यावा असे मला तरी अजिबात वाटत नाही. जसा बाळासाहेबांविषयीचा आदर उद्धवला कदापि मिळणे शक्य नाही तोच प्रकार इथेही.

होत काय आहे की ती खरोखर या प्रकरणी किती दोषी आहे हे एकतर कळायला मार्ग नाही. पण जर केजरीवाल, कविता कृष्णन, जावेद अख्तर असे थर्ड (नाही फोर्थ नाही फिफ्थ) क्लास लोक तिच्यामागे उभे असतील तर मात्र ती तितकी सोवळी असू शकणार नाही हिच शक्यता जास्त.

तरीही या असल्या लोकांची खूप गरज आहे. ही मुलगी, कन्हैय्या असे लोक ठिकठिकाणी जाऊन सभा घेऊदेत. बुबुडाविपुमाधवि म्हणजे किती हलकटातली हलकट जमात आहे हे अधिकाधिक लोकांना त्यामुळे समजेल. जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरियसी ही आमची संस्कृती. आणि हे बुबुडाविपुमाधवि त्यांचाच लिलाव करायलाही मागेपुढे बघायचे नाहीत. असल्या लोकांनी खरोखरच प्रचार करावा अशी इच्छा आहे. २०१९ मध्ये मोदींना अन्यथा मिळाली असती त्यापेक्षा जास्त मते मिळवून द्यायला मदत करतील हे लोक.

असो... खूप दिवसांपासून या डाव्या विचारवंतांविषयीची उर्फ बुबुडाविपुमाधविंविषयीची चीड व्यक्त करायची होती. ती संधी मात्र या निमित्ताने मिळाली.

ट्रेड मार्क's picture

2 Mar 2017 - 12:41 am | ट्रेड मार्क

ट्रुमन भाऊ एकदम स्पष्ट आणि मस्त प्रतिसाद. दंडवत घ्यावा __/\__

गामा पैलवान's picture

2 Mar 2017 - 1:14 am | गामा पैलवान

एकदम बरोबर. गॅरीभाऊंना दंडवत.
-गा.पै.

अजया's picture

3 Mar 2017 - 11:34 pm | अजया

अप्रतिम प्रतिसाद!

आनंदयात्री's picture

2 Mar 2017 - 1:07 am | आनंदयात्री

स्पष्ट आणि खणखणीत मतप्रदर्शन आवडले.

प्रसाद_१९८२'s picture

2 Mar 2017 - 10:44 am | प्रसाद_१९८२

संपूर्ण प्रतिसाद आवडला.

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Mar 2017 - 12:38 pm | डॉ सुहास म्हात्रे

नेहमीप्रमाणेच सरळ, समतोल आणि वैचारिक गोंधळ (किंवा, ज्याच्या त्याच्या नीतिमत्तेप्रमाणे... चलाखी) नसलेला रोखठोक प्रतिसाद !

सर्वात प्रथम म्हणजे गुरमेहर कौरला स्वतःचे विचार मांडायचा जो अधिकार लोकशाहीने दिला आहे, त्या अधिकाराचा सर्वांनीच आदर केला पाहिजे. तिच्या विचारांचा विरोध करायचा असेल तर तो विचारांनीच व्हायला हवा. तेव्हा ज्यांनी कोणी छोट्यामोठ्या ते तद्दन अशिष्ट धमक्या दिल्या आहेत त्यांचा स्पष्ट निषेधच नव्हे तर त्यांच्याविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई व्हायलाच हवी.

त्याचबरोबर, हे पण तितकेच खरे की, आपल्या वडिलांच्या (किंवा इतर कोणा नातेवाईकाच्या) बलिदानाचे राजकारण करणे किंवा राजकारणासाठी उपयोग करण्यास अनुमती देणे हे सुद्धा निषेधार्हच आहे. आणि अर्थातच, तश्या कृतीचा वैध पद्धतिने निषेध करण्याचा हक्क इतरांनाही आहेच.

ती व्हिडिओ क्लिप सुब्रमण्यम नावाच्या केजरिवालशी जवळीक असलेल्या माणसाने तयार केली आहे हे त्यानेच कबूल केले आहे. तो "अर्थगर्भ" मजकूर त्याच्याच डोक्यातून निघाला आहे व त्या मुलीचा राजकारणासाठी वापर करून घेतला आहे याचे पुरावे बाहेर येत आहेत.

Man Behind ‘Pakistan Did Not Kill My Father’ Video Backs Gurmehar

या माणसाचे केजरिवालबरोबर गाडित बसून हिंडतानाचे आणि गुरमेहर कौरबरोबरचे फोटो राष्ट्रिय वाहिन्यांवर दाखवले जात आहेत.

एका बाजूने "त्या मुलीचे वय लहान (किड्) आहे" असे म्हणून सहानभूती जमा करणारे, त्याच श्वासात, "त्या क्लिपमधील अर्थपूर्ण शब्द, वाक्यरचना आणि संदेश देण्याची प्रगल्भता तिच्यात आहे" हे पण ठासून सांगतात; तेव्हा त्यांच्या तद्दन कांगावाखोरपणाची आणि त्या कांगावाखोरपणाला सत्य मानण्याची चूक (किंवा, ज्याच्या त्याच्या नीतिमत्तेप्रमाणे... चलाखी) करणार्‍या लोकांच्याबद्दल मनात करुणा दाटून येते !

हे विधान अजिबात नाही पटले ...
अत्यंत आक्षेपार्ह लिहिलंय तुम्ही .

जावेद अख्तर असे थर्ड (नाही फोर्थ नाही फिफ्थ) क्लास लोक तिच्यामागे उभे असतील तर मात्र ती तितकी सोवळी असू शकणार नाही हिच शक्यता जास्त.

तुमच्या बऱ्याचशा म्हणजे सर्वच मुद्द्यांशी सहमत मलाही चीड आहे या डबल स्टॅंडर्ड लोकांची पण जावेद अख्तर यांना थर्ड ,फोर्थ क्लास म्हणून संबोधने अजिबात पटले नाही .
या माणसाने नेहमीच पाकड्यांविरुद्ध आणि या देशातल्या विखारी मुसलमानांविरुद्ध कठोर भूमिका घेतली आहे याचे भान तुम्ही ठेवायला हवे होते .
जावेद अख्तर डावे विचारवंत कधीपासून झाले ?तुम्हाला चीड व्यक्त करायची म्हणून कोणावरही घसराल?
जेव्हा ओवैसीने भारत माता की जय ही घोषणा मी किंवा कोणताही मुसलमान देणार नाही अशी भाषा केली होती तेव्हा भर राज्यसभेत याबाबत मी एकदा नाही तर शंभरदा भारत माता की जय म्हणेन कारण भारत आमचीही माता आहे हे वक्तव्य केले होते ते विसरलात ?
भारतीय खासदारांचे शिष्टमंडळ पाकिस्तान दौऱ्यावर गेले असताना तिथल्या टेलिव्हिजन वर जावेद अख्तर यांची मुलाखत घेतली होती तेव्हा मुलाखतकर्तीने भारतात मुस्लिमांवर अन्याय होत असल्याची कोल्हेकुई चालू केली , तेव्हा अख्तर यांनी मार्मिक उत्तरे संदर्भासहीत देऊन पाकड्याना सणसणीत चपराक लगावली होती तेही विसरलात .
या घटना माहीत नसतील तर यु ट्यूब विडिओ उपलब्ध आहे ते बघा .
या विशिष्ट घटनेच्या (गुरुमेहर)च्या बाबतीत कदाचित ,ती एका शहीदाची मुलगी आहे लहान आहे म्हणून तिच्या बाजूने स्टेटमेंट दिले असेल आणि त्यांच्या सारखे अनेक आहेत हा विचार करणारे (आता काल गौतम गंभीर ने ही सेहवाग ला खडसावलंय याबाबतीत ) म्हणून ते थर्ड फोर्थ क्लास होतात ?
ते त्यांच्या क्षेत्रात केवढे महान आहेत हे तुम्हाला माहिती नसेल असेही नाही .पण या बाबतीत तुम्ही सिलेक्टिव्ह झालात
म्हणून स्वतःच्या मुद्द्यांच्या समर्थनासाठी अगदी जावेद अख्तर यांची
तुम्ही लायकी काढलीत आणि त्यांचा क्लास ठरवलात .....?
तेवढी उंची आपली आहे का नाही हा साधा विचार एकदाही तुमच्या मनाला शिवला नाही .

हे बघा जरा
https://youtu.be/LhxblbcuV80
Javed Akhtar takes on Owaisi, chants Bharat Mata Ki Jai, slams fringe

https://youtu.be/qK8S254AUS8
Javed Akhtar slapping on pakistani Reporter's Face

https://youtu.be/YnrV_szFn9M
Pakistani Journalist gets OWNED by Javed Akhtar

गॅरी ट्रुमन's picture

2 Mar 2017 - 2:05 pm | गॅरी ट्रुमन

ठिक आहे.

जावेद अख्तर हा मनुष्य दोन्ही बाजूंनी बोलतो. ते कधी ओवेसीला खडसावतील तर त्याचवेळी नयनतारा सेहगलसारख्या पुरस्कारवापसी गँगमधील कुणाला पाठिंबा देतील. कधी म्हणतील की मोदींचे समर्थक 'लो क्वालिटीचे आहेत' (म्हणजे एका अर्थी इतरांची लायकी काढतील) तर सहा महिन्यातच त्याच्या अगदी विरूध्द बोलतील. आताही विनाकारण फोगाट भगिनी आणि साक्षी मलिक यांना "हार्डली लिटरेट" म्हणतील. यातून होते हे की दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी (नुसते मध्यममार्गी नव्हे) बोलले की विश्वासार्हता कमी होते. त्यामुळे ते एकदा काही बोलले त्याच्या विरूध्द ते बोलणारच नाहीत याची काय गॅरंटी? त्यामुळे ते काहीही बोलले असले तरी त्यांच्यावर तुम्ही ठेवाल तितका विश्वास मला तरी ठेवता येत नाही.

असो.

बाकी प्रतिसाद जाऊ दे पण जावेद अख्तर जे बोलले त्याचा इकडून तिकडे संबंध लावला गेला आहे!

If a hardly literate player or a wrestler troll a pacifist daughter of a martyr its understandable but whats wrong with some educated folks

या वाक्यात ते "एका" खेळाडू बद्दल (सेहवाग) आणि "एका" कुस्तीगीर (योगेश्वर दत्त) बद्दल बोलत होते. पण नंतर काही लोकांनी त्याचा संबंध फोगट बहिणी आणि आता तर साक्षी मलिकला पण आणलं जातंय यात!
कमाल आहे बुआ, जो विरोधात बोलेल त्याच्या वाक्याचा विपर्यास करून काहीही आरोप करायचेत का?
उद्या जावेद अख्तर हिंदुस्तानच्या महिला मल्लाना असे म्हणाले अशीही वार्ता येईल फेसबुकवर...
तुम्ही आज पर्यंत कितीही काहीही काम केलेलं असू देत जर तुम्ही आमच्या बाजूच्या कोणाला काही बोललात तर लगेच तुम्ही बुबुडाविपुमाधवि/फोर्थ क्लास असे काहीसे प्रकार इथेही सुरु झालेत असे दिसतंय.

हा जो काही वाद असेल तो ज्याच्या त्याच्या पातळीवर राहायला हवा होता, ते लोक एकमेकांना उत्तर द्यायला समर्थ आहेत!

या माध्यमांची मुख्यालये दिल्लीतून हलवायला पाहिजेत पहिल्यांदा! दिल्लीत काहीतरी होणार आणि संपूर्ण देशाला हे लोक तेच दिवस रात्र दाखवणार! त्या मुलांना पण आता कळलं असेल कि आपण किती सहजपणे प्रसिद्धी ओढू शकतो.

तुम्ही १०० चांगली काम करा अनेक वर्ष समाजसेवा करा पण हि माध्यमे विचारायला पण यायची नाहीत पण तिकडे कुठे कुठल्या तरी पोराने काही बोलले कि त्याची नॅशनल न्यूज करून अख्ख्या देशाला तेच ऐकायला लावणार!

फेदरवेट साहेब's picture

2 Mar 2017 - 4:04 pm | फेदरवेट साहेब

बुबुडाविपुमाधवि

सारखी स्वतः सोडून इतर कोणीही वापरत नसलेली टर्मिनॉलॉजी सतत चमकवण्याचे विशेष प्रयोजन काय हे ही कळले नाही विशेषतः.

ट्रुमन साहेब, तुम्ही जावेद अख्तरांचे विधान वाचले तरी होते की नाही अशी शंका ह्या नव्या प्रतिसादामुळे (दुर्दैवाने) घ्यायला वाव उघड झालाय असे हताशपणे म्हणावे लागेल,

आजचा धडा हाच की सदस्य कितीही ज्ञानी मानी असो त्याचे बोलणे चिमूटभर मिठासोबतच घ्यायला हवे. असो.

विशुमित's picture

2 Mar 2017 - 4:20 pm | विशुमित

<<<<आजचा धडा हाच की सदस्य कितीही ज्ञानी मानी असो त्याचे बोलणे चिमूटभर मिठासोबतच घ्यायला हवे. असो.>>>

-- आयो ... कोल्याप्स...

आयुष्याच्या शेवटापर्यंत हे वाक्य विसरणार नाही.

गॅरी ट्रुमन's picture

2 Mar 2017 - 4:30 pm | गॅरी ट्रुमन

बुबुडाविपुमाधवि
सारखी स्वतः सोडून इतर कोणीही वापरत नसलेली टर्मिनॉलॉजी सतत चमकवण्याचे विशेष प्रयोजन काय हे ही कळले नाही विशेषतः.

नसेल कळले तर नको कळू दे. इतरांना मी काय करतो ते समजावून द्यायची अजिबात गरज मला भासत नाही.

ट्रुमन साहेब, तुम्ही जावेद अख्तरांचे विधान वाचले तरी होते की नाही अशी शंका ह्या नव्या प्रतिसादामुळे (दुर्दैवाने) घ्यायला वाव उघड झालाय असे हताशपणे म्हणावे लागेल,

म्हणा की मग. मी जावेद अख्तरांचे मुळातले विधान आणि त्यावर बबिता फोगाटचे उत्तर या दोन्ही गोष्टी वाचल्या होत्या. बाकी तुम्हाला पाहिजे त्या शंका घ्यायला तुम्ही स्वतंत्र आहात.

आजचा धडा हाच की सदस्य कितीही ज्ञानी मानी असो त्याचे बोलणे चिमूटभर मिठासोबतच घ्यायला हवे. असो.

मी ज्ञानी मानी आहे की नाही माहित नाही आणि ते माहित करून घेण्यात मला इंटरेस्टही नाही. पण कोणाचेही बोलणे चिमूटभर मिठाबरोबरच घ्यायला हवे हे युनिव्हर्सल सत्य आहे. त्यात वेगळे काहीच नाही. काय म्हणता?

गॅरी ट्रुमन's picture

2 Mar 2017 - 4:26 pm | गॅरी ट्रुमन

या वाक्यात ते "एका" खेळाडू बद्दल (सेहवाग) आणि "एका" कुस्तीगीर (योगेश्वर दत्त) बद्दल बोलत होते. पण नंतर काही लोकांनी त्याचा संबंध फोगट बहिणी आणि आता तर साक्षी मलिकला पण आणलं जातंय यात!

फोगाट भगिनी आणि साक्षी मलिक या पण कुस्तीगीरच आहेत हो. आणि ट्विटरवर बबिता फोगाटने स्वत:च उत्तर जावेद अख्तरना दिले असेल तरी जावेद अख्तरच्या त्या ट्विटचा आणि फोगाट भगिनींचा संबंध नाही? अर्थातच काही लोकांना तरी हे मान्य होणारच नाही त्यामुळे त्यांच्या बाबतीत पास. पण इतरांच्या संदर्भासाठी:

फेदरवेट साहेब's picture

2 Mar 2017 - 4:49 pm | फेदरवेट साहेब

फोगाट भगिनी कुस्तीगीर असणे एक, जावेद बोलले दोन, बबिता ने त्यांना उत्तर दिले तीन, गीता अन बबिता दोघीच महिला मल्ल आहेत काय? अख्तरांनी नाव घेतले होते का दोघींपैकी कोणाचे? बबिताने ते स्वतःवर ओढवून घेतले नसेल? अशी शक्यता नाही? म्हणजे त्यांनी 'एक खेळाडू' 'एक मल्ल' म्हणले त्याला तावतावात उत्तर दिले बबिताने अन तिने उत्तर दिले म्हणून अख्तर तिच्याकडेच अंगुलीनिर्देश करीत होते असा निष्कर्ष निघेल?

बाकी चिमूटभर मुळे तुमचा इगो दुखावला असेल तर त्याच्या तुम्ही मांडलेल्या प्रदर्शनाशी माझेही काही विशेष घेणे नाही.असो.

फेदरवेट साहेब's picture

2 Mar 2017 - 4:55 pm | फेदरवेट साहेब

अख्तरांचे ट्विट

If a hardly literate player or a wrestler troll a pacifist daughter of a martyr its understandable but whats wrong with some educated folks

गॅरी ट्रुमन's picture

2 Mar 2017 - 5:00 pm | गॅरी ट्रुमन

फोगाट भगिनी कुस्तीगीर असणे एक, जावेद बोलले दोन, बबिता ने त्यांना उत्तर दिले तीन, गीता अन बबिता दोघीच महिला मल्ल आहेत काय? अख्तरांनी नाव घेतले होते का दोघींपैकी कोणाचे? बबिताने ते स्वतःवर ओढवून घेतले नसेल? अशी शक्यता नाही? म्हणजे त्यांनी 'एक खेळाडू' 'एक मल्ल' म्हणले त्याला तावतावात उत्तर दिले बबिताने अन तिने उत्तर दिले म्हणून अख्तर तिच्याकडेच अंगुलीनिर्देश करीत होते असा निष्कर्ष निघेल?

इतरांच्या संदर्भासाठी:

बरं जावेद अख्तरना ज्यांच्याकडे निर्देश करायचा होता त्याचे तरी नाव आहे का या ट्विटमध्ये? तसा तो निर्देश नसेल तर यातील wrestler हे विशेषण फोगाट भगिनींना नक्कीच लागू पडते आणि या भगिनी फार शिकलेल्या नाहीत हे पण जगजाहिर आहे त्यामुळे तो टिवटिवाट या दोन गोष्टी (wrestler आणि फार शिकलेले नसणे) ज्यांना लागू पडतात त्या सगळ्यांना आपल्यालाच उद्देशून आहे असे वाटले तर त्यात काय चुकीचे आहे? असो.

बाकी चिमूटभर मुळे तुमचा इगो दुखावला असेल तर त्याच्या तुम्ही मांडलेल्या प्रदर्शनाशी माझेही काही विशेष घेणे नाही.असो.

उत्तम. धन्यवाद.

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Mar 2017 - 6:05 pm | डॉ सुहास म्हात्रे

हे जावेद अख्तर यांचे ट्वीटरवरचे विधान.

त्यांच्या शिक्षणाचा, लेखनाचा आणि समाजातल्या स्थानाचा मान ठेवूनही या मजकूरात खटकण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत आणि त्या स्वतःला एजुकेटेड समजणार्‍या आणि अर्थातच समाजात मान असलेल्या व्यक्तीला शोभणार्‍या नक्कीच नाहीत.

त्यांच्या विधानातला "लिटरेट" हा शब्द त्यांनी शब्दार्थाने "शिक्षित" असा आणि वाच्यार्थाने (लिटरेट माणसाकडून त्यांनी जी अपेक्षा ठेवली आहे त्यावरून) "सुसंस्कृत" असा वापरला आहे.

१. मुळात "हार्डली लिटरेट" हे विशेषण "प्लेयर ऑर अ रेसलर" यांच्याशी जोडण्याचे कारणच काय ?

अ) माणूस शिकला म्हणजे आपोआप सुसंस्कृत होतो ?
आ) "हार्डली लिटरेट प्लेयर ऑर अ रेसलर" सुसंस्कृत नसतो ?
इ) सगळे "प्लेयर ऑर रेसलर" "हार्डली लिटरेट"च असतात ?
आणि मुख्य म्हणजे...
इ) "हार्डली लिटरेट प्लेयर ऑर अ रेसलर" ला लोकशाहीत वैध उपायांनी आपले विरोधी मत मांडायचा हक्क नसतो ?

वरच्यापैकी काहीही, एक किंवा अनेक, त्यांना म्हणायचे असले तर त्यांना या बाबतीत अधिक अभ्यास करण्याची गरज आहे. सुसंस्कृतपणा आणि शिक्षण यांचा अर्थाअर्थी संबंध नाही हे त्यांना माहीत असायला हवे होते. नाहीतर जालावर शिक्षित लोक ट्रोलिंग करताना दिसले नसते आणि जगातल्या शिक्षित (त्यांच्या भाषेत, एजुकेटेड) लोकांनी कधी चुकीचे वर्तन केले नसते !

२. दुसर्‍याचे शिक्षण पाहून त्याच्या सुसंस्कृतपणाचा अंदाज बांधायचा झाला तर भारताची बरीच लोकसंख्या असंस्कृत आहे असे त्यांना म्हणायचे आहे काय ? आणि शिकूनसवरून त्या शिक्षणाचा (आणि कलाकौशल्याचा) स्वार्थी उपयोग करणारी मंडळी तर त्यांनी जरासे आजूबाजूला (किंबहुना त्यांच्या व्यवसायातच) पाहिले तर पैशाला पासरीभर दिसतील. शिक्षण-पैसा-अधिकार हातात असलेल्या माणसाला सगळेच (निदान त्याच्याकडे काम अडलेले असेल तेव्हा तरी, मनात नसले तरीही,) मुजरा करतात, ही जगरहाटी आहे. शिक्षण-पैसा-अधिकार नसलेल्या माणसालाही माणूसकीचा तो योग्य मान देणे ज्याला जमते तो माणूस सुसंस्कृत आहे असे म्हणायला हरकत नाही.

३. अख्तर यांचे पूर्ण वाक्यच "स्वतःच्या शिक्षणाबद्दलचा/मोठेपणाबद्दलचा अहंभाव दाखवणारे", "उच्चनीचतेची मानसिकता दाखवणारे" आणि "सुसंस्कृतपणाच्या कार्यकारणभावाबद्दल अज्ञान दाखविणारे" मानभावी वाक्य आहे. असे भेदभावपूर्ण (discriminatory) वाक्य... नामवंत कलाकार, समाजाचे मान्यवर सभासद आणि काही काळ भारतिय लोकसभेचे सभासद असलेल्या... जावेद अख्तर यांच्याकडून अपेक्षित नव्हते असे खेदाने म्हणावे लागत आहे. दुसर्‍याने मोठे म्हटलेले आपल्या डोक्यात न जाऊ देण्यात आणि माणूसकीच्या बाबतीत आपण सगळेच एका स्तरावर आहोत हे समजण्यात सुसंस्कृतपणाचे इंगीत दडलेले असते.

४. "प्लेयर ऑर अ रेसलर" हे शब्द गाळले असते तर ते वाक्य त्यांना शोभून दिसले असते. ते शब्द वापरायचे आणि मग त्यांनी ते शब्द अमुक व्यक्तीला उद्द्येशून होते/नव्हते अशी शाब्दीक कसरत (जावेद यांनी किंवा अजून कोणी) करणे केवळ विनोदी आणि पत अजून जास्त घसरवणारी कृती आहे.

शब्दबम्बाळ's picture

2 Mar 2017 - 4:57 pm | शब्दबम्बाळ

तुम्हाला खरंच माहिती नाही कि मुद्दाम हा युक्तिवाद करताय माहित नाही.

पण आता उदाहरण घ्यायचं तर, तुम्ही जावेद अख्तर याना आपल्या प्रतिसादात काही बाही बोलतात. ते मला बरोबर नाही वाटलं म्हणून मी तुमच्या त्या वाक्यावर आक्षेप घेऊन प्रतिसाद दिला.

याचा अर्थ हा होतो का कि तुमचा प्रतिसाद माझ्यासाठी होता किंवा मला उद्देशून होता??

तेच बबिता ने केलंय! पण "काही लोकांना हे मान्य व्हायचं नाही कदाचित!" माझा पण पास बुआ त्यावर!

बाकी "a wrestler " चा अर्थ भगिनी (अनेकवचन) हा होऊ शकतो का?

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Mar 2017 - 9:14 pm | डॉ सुहास म्हात्रे

जरा असा विचार करून पहा..

"हार्डली लिटरेट प्लेयर ऑर अ रेसलर" असा मोघम सर्वसमावेशक शब्दप्रयोग करून त्यांनी सर्वच खेळाडू आणि विशेषतः कुस्ती खेळणार्‍या खेळाडूंना "अशिक्षित आणि असंस्कृत" गटात सामील केले नाही का ?

असे सरसकटीकरण केल्यानंतर, दुखावलेल्या सर्व खेळाडूंना आणि खेळाडूंबद्दल ममत्व बाळगणार्‍या इतरांना त्यांचा प्रतिवाद करण्याचा हक्क मिळतो.

"हार्डली लिटरेट प्लेयर ऑर अ रेसलर" या शब्दरचनेत "प्लेयर ऑर अ रेसलर" ऐवजी "मूव्ही इंडस्ट्री वर्कर" हा शब्दप्रयोग वापरला असता तर जावेद अख्तर यांची काय प्रतिक्रिया असती असा प्रश्न मनात आला. तसे बधितले तर मूव्ही इंडस्ट्रीतले अनेक "जानेमाने" लोकही सुसंस्कृत नागरिकाची उदाहरण आहेत असे म्हणवत नाही !

ट्रेड मार्क's picture

2 Mar 2017 - 10:00 pm | ट्रेड मार्क

या भगिनी दोघी एकत्र मिळून कुस्ती खेळत नसून वैयक्तिकरित्या खेळतात. त्यामुळे a wrestler हे प्रत्येक कुस्तीगीराला लागू होऊ शकतं.

विल्यम्स भगिनी दोघी टेनिस खेळत असल्या तरी a tennis player म्हणलं की प्रत्येकीला स्वतंत्रपणे लागू होतं. जरी क्रिकेट हा सांघिक खेळ असला तरी a cricketer म्हणलं कि क्रिकेट खेळणारे सगळेच वैयक्तिकरित्या येतात.

हतोळकरांचा प्रसाद's picture

2 Mar 2017 - 4:52 pm | हतोळकरांचा प्रसाद

या वाक्यात ते "एका" खेळाडू बद्दल (सेहवाग) आणि "एका" कुस्तीगीर (योगेश्वर दत्त) बद्दल बोलत होते. पण नंतर काही लोकांनी..........

तो कुस्तीगीर म्हणजे योगेश्वर दत्त हा निष्कर्ष कसा काय काढला जातोय? जर समजा ते योगेश्वरला उद्देशून होते असे मानले तर फोगट बहिणींच्या "गैरसमजातून" आलेल्या ट्विटवर अख्तरसाहेबांनी काही स्पष्टीकरण दिले आहे का?

बाकी अख्तर साहेबांची आजपर्यंतची मते काय आहेत, ते कसे आहेत वगैरे थोडावेळ बाजूला ठेवले तर त्यांच्या या तर्कशून्य आणि विवेकशून्य वाक्याचे खंडन व्हायलाच हवे. शिवाय ते वाक्य फोगट बहिणींना नसून योगेश्वर आणि सेहवागला उद्देशून असले तरीही त्या वाक्यातील तर्कशून्यता तसूभरही कमी होणार नाही असे मला वाटते.

फेदरवेट साहेब's picture

2 Mar 2017 - 4:57 pm | फेदरवेट साहेब

सहमत, हा अँगल सुद्धा आहेच, पण मग ह्या तर्काने स्वतःचे नाव नसताना उत्तर देणाऱ्या फोगाटना सुद्धा हेच लागू होईल नाही का?

शब्दबम्बाळ's picture

2 Mar 2017 - 5:10 pm | शब्दबम्बाळ

२७ फेब्रुवारी ला योगेश्वर दत्त ने खाली जो ट्रुमन यांनी फोटो टाकला आहे तो त्याच्या ट्विटरवर टाकला होता.
फोटो

तेव्हाचे सेहवाग चे ट्विट आपल्याला माहित असेलच!
मग २८ फेब्रुवारी ला जावेद अख्तर यांनी या दोघांचा समाचार वगैरे घ्यायला वरचे ट्विट केले.
आपल्या मिपावर होत तसेच! ;)
साधा सोपा घटनाक्रम.. पण त्याला आता फाटे फुटलेत!

गॅरी ट्रुमन's picture

2 Mar 2017 - 5:26 pm | गॅरी ट्रुमन

ठिक आहे. अगदी मिपावरही असे काही झाले --म्हणजे सदस्य 'अ' ने 'ब' साठी लिहिलेला प्रतिसाद 'क' ने आपल्यावर घेऊन त्यावर काही उलटे लिहिले तर 'अ' हा सदस्य माझा मुळातला प्रतिसाद 'क' साठी नव्हताच असे स्पष्टीकरण देत असतो. किमानपक्षी तसे करणे अपेक्षित असते. अन्यथा गैरसमज वाढतात. मुळात जावेद अख्तरनी बबिता फोगाटला असे काही लिहिले असते तर विषय पुढे ताणला जायची गरज नव्हती.

मुळात बबिताने गुरमेहरविषयी काही लिहिले नसेलही (नसावेच) आणि योगेश्वर दत्तने लिहिले त्याचा मुद्द्यांचा प्रतिवाद न करता जावेद अख्तर यांनी ती चर्चा वैयक्तिक पातळीवर नेली (अन्यथा हार्डली लिटरेट रेसलर वगैरे लिहायचे काम नव्हते). आणि दुसरी एक "हार्डली लिटरेट रेसलर" त्यावर विनाकारण प्रतिवाद करत असतानाही जावेद अख्तर यांनी त्यावर काहीही स्पष्टीकरण दिले नाही यावरून जावेद अख्तर या गृहस्थांना हे कुस्तीगीर फार शिकलेले नाहीत यावर कारण नसताना टिप्पणी करायची आहे असाही अर्थ कोणी काढू शकतोच. बबिता-गीताच्या वडिलांनी महावीर फोगाट यांनी पुढील ट्विट लिहिली आहे त्याचे हे कारण होते का?

हे सगळे रामायण जावेद अख्तर यांनी वेळीच स्पष्टीकरण दिले असते तर टळले असते.

असो.

हतोळकरांचा प्रसाद's picture

2 Mar 2017 - 8:30 pm | हतोळकरांचा प्रसाद

फरक फक्त एवढाच आहे की बबिताने या प्रकरणावर 27 ला ट्विट केले होते, योगेश्वरने २८ ला आणि जावेदसाहेबांचं ट्विटपण २८ ला आलं. अर्थातच बबिताला ते ट्विट आपल्या बाबतीत आहे असं वाटणं साहजिक आहे.

गॅरी ट्रुमन's picture

2 Mar 2017 - 9:23 pm | गॅरी ट्रुमन

बबिता फोगाटने २७ फेब्रुवारीला जे काही म्हटले होते ते ट्विटरवर आले आहे. ते पुढीलप्रमाणे:

Babita

शक्यतो मी ट्विट एम्बेड करतो पण ट्विट एम्बेड केल्यास ही ट्विट बबितानेही रिट्विट केली आहे हे समजत नाही म्हणून इथे त्याचा स्क्रीनशॉट देत आहे. जर का तिने रिट्विट केले असेल तर तिचा या गोष्टीला पाठिंबा आहे असे समजायला हरकत नसावी.

योगेश्वर दत्तने मी याच चर्चेत श्रीगुरूजींच्या प्रतिसादावर दिलेला फोटो (आंतरजालावरून साभार या शीर्षकाने) २७ फेब्रुवारी रोजी ट्विट केला होता.

त्यानंतर जर जावेद अख्तरनी २८ फेब्रुवारीला "हार्डली लिटरेट रेसलर्स" असे ट्विट केले असेल तर ते बबिताला आपल्याविषयी आहे असे वाटले तर त्यात तिचे काय चुकले?

त्यावरून नक्की कोणते अनुमान बांधायचे हे वाचकांवर सोडतो. हातोळकरांचा प्रसाद हा महत्वाचा मुद्दा मांडल्याबद्दल धन्यवाद.

शब्दबम्बाळ's picture

3 Mar 2017 - 12:18 am | शब्दबम्बाळ

पहिले प्रथम मी या ठिकाणी सांगू इच्छितो कि मला या घटनेमध्ये कोण बरोबर कोण चुकीचे या मुद्द्यात पडायचे नाही तरी कृपया कोणी काही सर्टिफिकेट देऊ नये!
मला ट्विटच्या बाबतीत तुम्ही घाई करून एक निष्कर्ष काढलात आणि तो "बरोबरच" आहे असे मानून जावेद अख्तर यांच्यावर बरीच विधाने केलीत यावर आक्षेप होता/आहे.
तुमचा निष्कर्ष असा होता कि ते ट्विट फोगट बहिणी आणि त्यानंतर खाली म्हणाल्या प्रमाणे साक्षी मलिक देखील याना उद्देशून केलेले आहे.

योगेश्वर दत्त ने २७ फेब ला केलेले ट्विट

हे वीरेंद्र सेहवागने २६ फेब ला केलेले ट्विट

या दोन्ही ट्विट मध्ये समानता काय दिसते आपल्याला? दोन्ही मध्ये खिल्ली कोणाची उडवलीये, कोणाचेही नाव घेतलेले नाही! पण समझदार को इशारा काफी होता है या नियमानुसार हि ट्विट्स नेमक्या जागी लागली.
एक गोष्ट लक्षात घ्या कि दोन्ही ट्विट मध्ये खिल्ली उडवली आहे. या अर्थाने "troll " हा शब्द येतोय, काहीसा क्रूर थट्टा या अर्थाने.

बबिता ने स्वतः तिच्या ट्विटर वरून कोणतेही खिल्ली उडवणारे ट्विट केलेले नाही. तसेच स्वतःहून त्या मुलीचा उल्लेख देखील केला नाही. तिच्या ट्विटर वरचा जो फोटो आपण दाखवलाय त्यात खरी बबिताची वाक्य पहा खाली.
"ENTER BABITA PHOGAT
When journalist Rana Ayyub took a jibe at Randeep Hooda's statement that Kaur "is being used as a political pawn" saying the latter is from Haryana and he is doing his bit in liberating women, it didn't go down well with Babita Phogat among many others. She responded to Ayyub saying "We Phogat sisters are from Haryana too. What do you know about Haryana?"
Ayyub urged Babita to speak and stand up for Gurmehar Kaur, but Babita responded saying, "Is it right to talk in favour of someone who doesn't talk in favour of her nation?"

बबिता केवळ इतकंच बोलली होती. ते पण एका व्यक्तीने विनंती केली म्हणून!

आता मग जावेद अख्तर यांचे ट्विट बघा, त्या ट्विट मध्ये देखील कोणाचेही नाव नाहीये (ज्या प्रकारे दत्त आणि सेहवाग ने केले) पण हळूच मापं काढलीत.
इथेही समझदार को इशारा... हाच प्रकार आहे. बबिताने त्या ट्विटवर प्रतिक्रिया देणे हा सर्वस्वी तिचा निर्णय आहे आणि त्याला कोणाचा आक्षेप असू शकत नाही. पण म्हणून जावेद अख्तर "बबितालाच" बोलले असे म्हणणे आणि नंतर हळूच त्यात साक्षी मलिक लाही ओढणे गैर वाटते.

बाकी दत्त ने जे ट्विट केले त्यात "भाईचा" आणि हरिनाचा देखील उल्लेख आहे, मग हा उल्लेख सलमानसाठी आहे असे मानले तर दत्त चक्क सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची खिल्ली उडवतोय असा अर्थ झाला!
म्हात्रे काका या वाक्यांचाही विस्तृत अर्थ काढतील अशी अपेक्षा आहे.

आणि हो तुमचे वाक्य "त्यानंतर जर जावेद अख्तरनी २८ फेब्रुवारीला "हार्डली लिटरेट रेसलर्स" असे ट्विट केले असेल तर ते बबिताला आपल्याविषयी आहे असे वाटले तर त्यात तिचे काय चुकले?"
अनेकवचन नव्हते तिथे, खूपच सहजपणे शब्द फिरत आहेत!

हतोळकरांचा प्रसाद's picture

3 Mar 2017 - 10:40 am | हतोळकरांचा प्रसाद

मला वाटतं उगाचच घोळवत बसण्यात हशील नाही! १. जावेद अख्तर यांचे ट्विट बबिताला असण्याची (किंवा तसे वाटण्याची) शक्यता नाहीये का? २. "हार्डली लिटरेट" हे अत्यंत उपहासात्मक आणि निगेटिव्ह टेस्टने नव्हते का? परत एकदा - ते ट्विट बबिताला होते कि अजून कोणाला हा महत्वाचा मुद्दा असूच शकत नाही. लिटरेट असला तरच आपली मते ग्राह्य धरण्यात येतील हे तर्कट कशाला? हा कसला अहंकार?

जर योगेश्वर दत्तने/सेहवागने केलेले ट्विट "ट्रॉल" होते तर मग जावेदजींनी केलेले ट्विटही त्याच लेवलचे होते - हे मानण्यात अडचण कसली असू शकते?

शब्दबम्बाळ's picture

3 Mar 2017 - 1:39 pm | शब्दबम्बाळ

हे बाकी भारीये! च्यामारी इतके प्रतिसाद मी केवळ यासाठी देतोय कि ट्रुमन यांनी पहिल्या प्रतिसादात जी माहिती दिली ती पूर्णतः सत्य नव्हती. बबिताने गुरमेहर ची खिल्ली उडवलेली नव्हती. ती सेहवाग आणि दत्त ने उडवली होती आणि त्या रेफरन्स मध्ये जावेद यांचे ट्विट होते एवढेच मी आधीपासून सांगतोय!

इतकं सगळं लिहून झाल्यावर आता तुम्ही म्हणताय कि "ते ट्विट बबिताला होते कि अजून कोणाला हा महत्वाचा मुद्दा असूच शकत नाही" आता तुम्हीच महत्वाचे मुद्दे ठरवा मग आणि सांगा कशावर चर्चा करायची...

आणि अजून एकदा, कोणाचे ट्विट उपहासात्मक टीकात्मक विरोधात्मक नकारात्मक सकारात्मक इत्यादी मध्ये मला काही देणे घेणे नाही! तुम्हाला वाटत ना जावेद यांचे ट्विट उपहासात्मक तर मग ठीक आहे कि! मला कोणाचीच कसली अडचण नाहीये!

हतोळकरांचा प्रसाद's picture

3 Mar 2017 - 3:02 pm | हतोळकरांचा प्रसाद

असं बघा, जावेद "खिल्ली" उडवणार्यांना बोलत आहेत असे आपण गृहीत धरून चालला आहात आणि वरील प्रतिसाद साधारणपणे जावेद अख्तर बबिताला काही म्हणाले नाहीत तर खिल्ली उडवणार्यांना म्हणाले आहेत असं गृहीतक दिसतं. आता ट्रुमन यांचं जावेद यांच्याबद्दलचं मत ते बबिताला म्हणाले म्हणूनच तसे होते का हे मी सांगू शकणार नाही. माझ्यामते जावेद अख्तर यांनी दुसऱ्याची "अक्कल" काढायची तसूभरही आवश्यकता नव्हती. सेहवाग आणि योगेश्वर दोघेही मेहरच्या मताच्या विरुद्ध मत मांडता आहेत (मार्ग ट्रॉल आहे कि अजून काही हे सगळे वैयक्तिकरित्या ठरवू शकतातच की). याउलट अख्तर समोरच्याची पात्रता शोधात आहेत. आता खरा प्रश्न तर असा आहे की इथे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आणि खिल्ली कोण उडवत आहे?

इतकं सगळं लिहून झाल्यावर मी म्हणतोय म्हणजे नेमके काय? मी आधी काही वेगळे आणि आता काही वेगळे म्हणत आहे का? तुम्ही प्रतिसाद दिल्यावर मी माझे वरचेच मत परत एकदा सांगितले.

आता राहिला मुद्दा बबिताला उद्देशून ट्विट लिहिलं आहे का तर जावेद अख्तर यांनी फक्त "अशिक्षित पहेलवान" यांचं (मेहरबद्दलचं) मत समजू शकतो पण शिकल्यासवरलेल्यांचं काय असे म्हटल्यामुळे हे बबिताला कसे काय लागू होत नाही ते सांगा? लागू होण्याची शक्यता आहेच की! शिवाय बबिताला असू किंवा नसू अख्तर यांचं ट्विट बेनिफिट ऑफ डाउट च्या पलीकडलं होतं असे मला वाटते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Mar 2017 - 4:09 pm | डॉ सुहास म्हात्रे

माझ्यामते जावेद अख्तर यांनी दुसऱ्याची "अक्कल" काढायची तसूभरही आवश्यकता नव्हती.

याला +१००

हे तर सर्वसामान्य माणसाने केले तरी अयोग्य आहे. आश्चर्य हेच की इथे एक जानामाना पूर्वराज्यसभा सभासद आहे. सिद्धहस्त लेखक म्हणून प्रसिद्ध असलेल्या अख्तरसाहेबांना आपल्या लेखनाचे काय अर्थ/अनर्थ होतील याचे भान नव्हते, असे म्हणण्याची चूक मी करू शकत नाही. तर मग...

१. घटनेने दिलेल्या अधिकारात, "हार्डली लिटरेट" असलेले अनेकजण, लोक-राज्य-सभेत अख्तर यांच्या पूर्वी व बरोबर बसलेले आहेत आणि भविष्यातही बसतील. याला अख्तर यांचा विरोध आहे काय ? अश्या लोकांबद्दल, अख्तरसाहेब, ट्वीटरवर तोच शेरा मारतील काय ?

२. हार्डली लिटरेट याचे शुद्ध मराठी भाषांतर "अशिक्षित अथवा अडाणी" असे होते. समाज, संस्कृती, इत्यादीसाठी त्यांनी केलेल्या योगदानासाठी जाणकारांनी पारखून निवड केलेले वरिष्ठ लोक राज्यसभेचे सभासद होतात. लोकसभेसारखे "निवडणूकीला उभे रहा आणि लोकांची मते मिळवून निवडून या" या तत्वातर तेथे जाता येत नाही. म्हणूनच लोकशाही व्यवस्थेत राज्यसभेला अप्पर हाऊस (आणि लोकसभेला लोअर हाऊस) म्हणतात आणि राज्यसभा सभासदांना जुनेजाणते (एल्डर्स) असेही समजतात. अख्तर यांच्यासारखा एक "शिक्षित" पूर्वराज्यसभासभासद केवळ शिक्षणाचा मानदंड लावून अशिक्षितांच्या मताला किंमत नाही असा निर्देश करतो, तेव्हा आश्चर्य वाटायलाच हवे.

३. आंतरराष्ट्रीय प्रतिस्पर्धांत देशाला पदके मिळवून देणारे (लिटरेट व हार्डली लिटरेट असलेले) लोक देशाची पत जगभरात वाढवायला मदत करतात. त्यांनी ते काम स्वतःच्या घोर मेहतनीने आणि बहुतेक वेळेस सरकारी उपेक्षा सहन करत केलेले असते, हे माध्यमांतून समजते आहेच. त्याविरुद्ध, "भारतात भरपूर प्रसिद्धी आणि पैसा मिळवलेल्या चलतचित्रव्यवसायातल्या "शिक्षित" लोकांपैकी किती जणांनी देशाची मान उंचावेल अशी आंतरराष्ट्रीय पदके जिंकून आणली आहेत ?", या प्रश्नाचे सर्वांना माहीत असलेले सोपे उत्तर, डोळे उघडायला मदत करेल, असे वाटते.

वरुण मोहिते's picture

3 Mar 2017 - 4:16 pm | वरुण मोहिते

बाकी लोकांनी केला असता तर ...तुला अक्कल नाही ?? समजत का काही ?? तर आपली भूमिका काय राहिली असती
कितीतरी शिक्षितांना अशिक्षित म्हणणारी लोकं आहेत

फेदरवेट साहेब's picture

3 Mar 2017 - 5:47 pm | फेदरवेट साहेब

टाळ्या घ्यायला काहीही ठोकून द्याल का? तुम्ही म्हणता

हार्डली लिटरेट याचे शुद्ध मराठी भाषांतर "अशिक्षित अथवा अडाणी" असे होते.

हार्डली लिट्रेट = अशिक्षित अथवा अडाणी

का

हार्डली लिट्रेट = जेमतेम साक्षर ??

तरी बरं मिसळपाव मराठी(च) संस्थळ आहे...

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Mar 2017 - 6:50 pm | डॉ सुहास म्हात्रे

केंब्रिज डिक्शनरी

hardly
adverb [ not gradable ] US ​ /ˈhɑrd·li/
hardly adverb [ not gradable ] (ONLY JUST)

only just or almost not:
Hardly a day passes that I don’t think about it.
You’ve hardly eaten anything.
Something is wrong with the phone – I can hardly hear you.
I can hardly wait for your visit.
We hardly ever see them anymore.

================================

हारवर्ड डिक्शनरी

hardly

ADVERB

1 Scarcely (used to qualify a statement by saying that it is true to an insignificant degree)
‘the little house in which he lived was hardly bigger than a hut’
‘a thing hardly bigger than a credit card’
‘we hardly know each other’

More example sentencesSynonyms
1.1 Only a very short time before.
‘the party had hardly started when the police arrived’

1.2 Only with great difficulty.
‘she could hardly sit up’
‘I nodded, hardly able to breath’

1.3 No or not (suggesting surprise at or disagreement with a statement)
‘I hardly think so’

================================

काय हे फेदरवेटसाहेब !

"हार्डली वर्कींग" म्हणजे "हार्ड वर्किंग" यांच्यात घोळ घालणारे खूप पाहिले आहेत. इतकेच काय, हार्डली शब्दाचा नुआंस न समजणारे अनेकजण माहीत आहेत. पण तुम्हीही ?!

असो गोर्‍या देशातल्या तुमच्यासारख्या सायेबाला आम्ही नेटिव काय शिकविणार म्हणा ! (तसे खूप गोर्‍यांना इंग्लिशसकट इतर खूप धडे दिले आहेत म्हणा. पण त्याचा इथे काय संबंध ?)

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Mar 2017 - 7:01 pm | डॉ सुहास म्हात्रे

याशिवाय अजून एक...

टाळ्या घ्यायला काहीही ठोकून द्याल का?

ही भाषा तुमच्या नेहमीच्या नाक वर करून इतरांना उपदेश करणार्‍या अवताराच्या लिखाणाला शोभून दिसत असली तर काहीच म्हणणे नाही... चालूद्या. गेस व्हॉट, आय टेक इट इन स्ट्राईड ! =))

फेदरवेट साहेब's picture

3 Mar 2017 - 7:26 pm | फेदरवेट साहेब

only just or almost not:

अख्तरांना 'अलमोस्ट नॉट(च)' म्हणायचे होते हा निष्कर्ष कशावरून काढलाय? सगळा पिंगा हार्डली भोवती घालताना यु हॅव हार्डली नोटिस्ड 'लिट्रेट' , असो तुमचा अजेंडा असला झोडपायचाच तर त्याला नाईलाज आहे, अन तसंही साठी नंतर माणसाची चुका कबुल करायची इच्छा कमी होते, उगाच साठी बुद्धी नाठी म्हण तयार झाली नसावी.

तर कसंय तुम्ही माझा पूर्वअवतार कुठला काय, ह्या फंदात पडल्यामुळे तर्काला तुम्ही लुळे पडून पर्सनल व्हायला लागलाय असा सहज निष्कर्ष निघतोच आहे. तुम्ही मला कोणाचा अवतार समजताय हे मी तुमची विचारशक्ती किती खाली पडू शकते त्यावर सोडतो. फॉर नाऊ, यु कंटीन्यु, तुम्ही स्वतःला बृहस्पतीचे अवतार समजणे चालू ठेवा अन चुकीही दामटत राहा.

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Mar 2017 - 8:59 pm | डॉ सुहास म्हात्रे

पूर्वावतार ? कोणता पूर्वावतार ?! तुमच्या याच अवतारातल्या (फेदरवेट साहेब) दुसर्‍यांना केलेल्या उपदेशांबद्दल लिहिले आहे मी. :)

******

१. हारवर्ड डिक्शनरी :

No or not (suggesting surprise at or disagreement with a statement)

हे (सोईस्कररित्या) नजरेआड झालेच (की, केलेच) की ! =))

मला माझेच घोडे दामटायचे असते तर, मी फक्त हारवर्ड डिक्शनरीमधला, हा माझ्या सोईचा एकुलता एक अर्थ, उर्धृत करू शकत होतो; हे राग न धरता वाचले असते, तर सहज ध्यानात आले असते !

२. शब्दांच्या पुढे त्यांचे स्पष्ट अर्थ दिले असले तरीसुद्धा त्याबद्दल गैरसमज होऊ शकतो असा डिक्शनरी लिहिणार्‍या तज्ज्ञांचा अनुभव आहे. त्याकरिताच, शब्दांचा उपयोग केलेली वाक्ये सुद्धा ते देतात. सोईसाठी दोन्हीही डिक्डिक्शनरीतली ती वाक्ये मी उद्धृत केलेली आहेत. ती खूप उपयोगी आहेत. शब्दांचा अर्थांच्या छटा (नुआंस) त्यांच्या वाक्यातील उपयोगाप्रमाणे बदलतात. त्यामुळे, शब्दांचा अर्थ, त्यांच्या वाक्यातल्या इतर शब्दांच्या पार्श्वभूमीवर आणि त्यांच्या वाक्यातील स्थानावर ठरतो. किंबहुना, ते शब्द कोणत्या परिस्थितीत वापरले यावरही त्याची अर्थछटा अवलंबून ठरतो, हे सांगायला नकोच.*

असो. हा इंग्लिशचा तास नसल्याने. इथेच थांबूया. मुख्य मुद्द्यांबद्दल पुढे काही नवी माहिती आली आणि चर्चा करण्यास काही जागा असेल तर भविष्यात चर्चेचा विचार करता येईल.

=====================================================

* : बोलतानाचा एखाद्या शब्दाचा उच्चार कसा केला जातो त्यावरही त्या शब्दामागचा खरा अर्थ दडलेला असतो. हे सुद्धा खूप महत्वाचे आहे, पण लिखाणात तो मुद्दा गैरलागून असल्याने, केवळ मुद्दा पूर्ण होण्यासाठी फूटनोटमध्ये त्याचा उल्लेख करून, त्याबाबत अधिक काही न लिहिणे योग्य समजतो आहे.

दीपक११७७'s picture

10 Mar 2017 - 11:56 pm | दीपक११७७

या Hardly च्या लडाईत

@फेदरवेट साहेबांची दांडी गुल झाली असे वाटते.

आणि @ डॉ सुहास म्हात्रे जिंकले

भारत-पाकिस्तानमध्ये शांतता व्हावी अशी शेखमहंमदी स्वप्ने ठेवणे हा मूर्खपणा

म्हणजे मोदिजींनी जे केलं (शपथविधीला आमंत्रण, 'पाकड्यांच्या' प्रधानमंत्र्याला सरप्राइज व्हिजिट देणं इ.) ते सगळं शेखमहंमदी मूर्खपणा होता?

विशुमित's picture

3 Mar 2017 - 10:13 am | विशुमित

अर्थातच...!!

गॅरी ट्रुमन's picture

3 Mar 2017 - 10:26 am | गॅरी ट्रुमन

म्हणजे मोदिजींनी जे केलं (शपथविधीला आमंत्रण, 'पाकड्यांच्या' प्रधानमंत्र्याला सरप्राइज व्हिजिट देणं इ.) ते सगळं शेखमहंमदी मूर्खपणा होता?

उत्तर अगदी साधं आहे. जर 'जंग नही होने देंगे' असे म्हणत दोन देशांमध्ये खरोखरच शांतता नांदेल असा भाबडा समज ठेऊन मोदीजींनी जे काही केले असेल तर तो नक्कीच शेखमहंमदी मूर्खपणा होता. पण आपण यापूर्वीच्या पंतप्रधानांपेक्षा (वाजपेयी, मनमोहन) वेगळे नाही, निवडणुक प्रचारात कितीही काहीही बोलले तरी प्रत्यक्ष पंतप्रधानपदी आल्यानंतर आपणही तसाच सॉफ्ट स्टॅन्ड घेऊ असे शत्रूला वाटायला लाऊन गाफिल ठेवायच्या उद्देशाने मोदीजींनी तसे केले असेल तर तो शेखमहंमदी मूर्खपणा नाही.

नंतर बलुचिस्तानचा आणि पख्तुनिस्तानचा उल्लेख १५ ऑगस्टच्या भाषणात करणे, सर्जिकल स्ट्राईक वगैरे गोष्टींवरून या दोनपैकी दुसरी शक्यता जास्त आहे असे म्हणायला सकृतदर्शनी जागा आहे असे वाटते.आणि पाकिस्तान न्यूज चॅनेलवरील "अब मनमोहनसिंग का हिंदुस्तान नही अब मोदीका हिंदुस्तान है" अशा स्वरूपाच्या चर्चाही युट्यूबवर बघितल्या आहेत. तसे असेल तर दुसरी शक्यता जास्त बळावते. अर्थातच मोदी हे नाव ऐकताच अंगावर पाल पडल्यासारखे करणारे लोक दुसरी शक्यता विचारात घेणारही नाहीत हे वेगळे सांगायलाच नको.

हतोळकरांचा प्रसाद's picture

3 Mar 2017 - 10:45 am | हतोळकरांचा प्रसाद

गाफील ठेवणे वगैरे आहे कि नाही माहित नाही पण आपण (आक्रमक होण्याआधी) शांततेसाठी प्रयत्न केलेच नाहीत असे धोरण कोणताही पंतप्रधान घेईल असे वाटत नाही. आधी आंतरराष्ट्रीय परिस्थिती आपल्या बाजूने करून मगच आक्रमक होणे जास्त संयुक्तिक होते असे मला वाटते.

वरुण मोहिते's picture

3 Mar 2017 - 10:53 am | वरुण मोहिते

राष्ट्रभक्ती बोलतात त्यांनी मोदींना नवाज शरीफ यांच्या आईला साडी देताना कौतुक केले होते का ????
वा काय प्रयत्न आहे मोदींचा असं म्हणून .
समस्त राष्ट्रभक्त तेव्हा कुठे होते .

गॅरी ट्रुमन's picture

3 Mar 2017 - 12:44 pm | गॅरी ट्रुमन

इतरांचे माहित नाही पण मोदींनी साडी, आंबे आणि जे काही पाठविले तेव्हा, ते काबूलहून परतताना लाहोरला उतरले तेव्हा मला दोनच शक्यता वाटल्या:

१. वाजपेयींप्रमाणे मोदीही "कभी जंग ना होने देंगे" वगैरे स्वप्नाळू गोष्टींमध्ये गुरफटले आहेत.
२. आपण पूर्वीच्या पंतप्रधानांपेक्षा वेगळे नाही असे वातावरण निर्माण करून शत्रूला गाफील ठेवायचे पण योग्य वेळ येताच मुस्काटीत मारायची.

परत एकदा सांगतो की नंतर घडलेल्या घटनांमुळे दुसरी शक्यता असेल हे म्हणायला जास्त जागा आहे असे मला वाटते.

हे सगळे विचार करू न शकणारे आणि मोदी हे नाव ऐकताच अंगावर पाल पडल्यासारखे करणार्‍यांना उत्तरे द्यायला माझ्यासारख्या सामान्याकडेही वेळ, इच्छाशक्ती, संयम यापैकी काहीही नाही. तेव्हा मोदींना तसे काही करायची गरज भासत नसेल हे अगदी सहज समजण्यासारखे आहे.

भविष्यात जर मोदीही शांततेचे नोबेल प्राईझ पाहिजे म्हणून स्वप्नाळू गोष्टींमध्ये गुरफटले तर त्यावर प्रश्न विचारणारा मी पहिला असेन.

पण होते कसे की मोदींचे समर्थन कोणत्याही कारणामुळे केले की "मोदीभक्त" असे बिरूद चिकटते ते मलाही चिकटलेले आहेच. रिकामटेकड्यांच्या फेसबुक ग्रुपमध्ये त्यावर चर्चाही होते. असल्या लोकांना कितीही काहीही सांगितले तरी त्यातून काहीही निष्पन्न होत नाही हे समजून चुकल्यामुळे काहींना इग्नोर मारणे हेच माझ्या हातात आहे दुसरे काय.

वरुण मोहिते's picture

3 Mar 2017 - 1:06 pm | वरुण मोहिते

रिकामटेकड्यांचा फेसबुक ग्रुप म्हणजे??नोबेल आता अक्षरश स्वार्थासाठी विकलं जात ( मलाला ओबामा )हि उदाहरण माहिती असतीलच अशी अपेक्षा आहे
बाकी विषयावर नेहरूंचा स्वप्नाळू पणा योग्य होता अशे कधी विधान आहे का ??
गाफील नाही ठेवलं हो मेजवानी झोडून गेल्यावर कारगिल झालं
करून झालं म्हणून स्ट्राईक झालं आता
ह्याच कारण आर्मी चा दबाव .
आर्मी तर कोणीही असो सत्तेवर तरी तशीच वागते . उदाहरण आहे आर्मी अटॅक पहा स्वातंत्रोत्तर .आताच थोडी होत .
जाता जाता _ शांततेसाठी प्रयत्न करणार्यांना आपला सपोर्ट आहे का म्हणजे भाबड्या आणि सप्नाळु लोकांना

गॅरी ट्रुमन's picture

3 Mar 2017 - 1:11 pm | गॅरी ट्रुमन

का कोणास ठाऊक हा प्रतिसाद वाचून नेपाळी भाषेतला पेपर वाचत असल्याचा फिल आला.

वरुण मोहिते's picture

3 Mar 2017 - 1:25 pm | वरुण मोहिते

ते नेपाळविषयक धोरणाचे काय झाले . माहिती हवी आहे जरा . ते नेपाळी वाचता येतं म्हणून विचारलं

गॅरी ट्रुमन's picture

3 Mar 2017 - 1:30 pm | गॅरी ट्रुमन

हो नेपाळी वाचता येते ना. देवनागरीच असते त्यांची लिपी. वाचता न यायला काय प्रॉब्लेम आहे? फक्त प्रॉब्लेम असतो की काय लिहिले आहे त्याचा अजिबात पत्ता लागत नाही.नेमका तसाच फिल तुमचा तो प्रतिसाद वाचून आला. म्हणजे देवनागरी लिपीतला प्रतिसाद पण त्यातून नक्की काय म्हणायचे आहे याचा अजिबात पत्ता लागत नव्हता. इतर कोणाला जर त्या प्रतिसादातून नक्की काय म्हणायचे आहे (की विचारायचे आहे) हा अर्थबोध झाला तर त्या मिपाकराला माझ्याकडून एक मसाला सॅन्डविचची ट्रीट. ऑफर आजच लागू आहे.

आता परत एकदा सविस्तर -स्वप्नाळू पण आणि भाबडेपण ह्या विषयी
जे हिंदुत्ववादाचा सतत प्रचार करून आधीच घडलेल्या पाश्वभुमी सोबत पंतप्रधान होतात
ते भाबडे असतील का??? पाकिस्तान को एक दिन मैं देख लुंगा ते भाबडे असतील का ??
गोमाता को कैसे मार शकते हे बोलणारे आज भारत आज बीफ निर्याती वर प्रथम क्रमांकावर आहे
म्हणून विचारलं असं भाबडेपण कसं जमत ??
शेवटचा मुद्दा कोणी काही केलं कि भाबडेपणा स्वप्नाळू बोलून क्लीनचीट द्यायची का??

गॅरी ट्रुमन's picture

3 Mar 2017 - 2:08 pm | गॅरी ट्रुमन

जे हिंदुत्ववादाचा सतत प्रचार करून आधीच घडलेल्या पाश्वभुमी सोबत पंतप्रधान होतात ते भाबडे असतील का

असू शकतील किंवा नसूही शकतील. मी स्वतः मोदी नाही की मोदींचे काहीही झाले तरी समर्थन करायचेच असे ठरविलेलाही कोणी नाही. एक सामान्य मतदार म्हणून माझ्या परिने मी मोदींच्या कामाचे इव्हॅल्युएशन करणार. आणि परराष्ट्रसंबंध या गुंतागुंतीच्या विषयात सगळी माहिती चव्हाट्यावर येत नसते आणि पडद्याआडून अनेक गोष्टी होत असतात. तेव्हा रिझल्ट उघडउघड दिसले नाहीत तरी मधूनमधून ये मनमोहनका नही मोदीका हिंदुस्तान आहे वगैरे गोष्टींवरून काहीतरी चालू असावे हे म्हणायला वाव आहे इतकेच. तेव्हा मोदी भाबडे आहेत हा हायपोथिसिस अजून तरी रिजेक्ट होत आहे. भविष्यात काय होईल हे माहित नाही. भविष्यात तो हायपोथिसिस रिजेक्ट करता आला नाही तर मग एक सामान्य मतदार म्हणून काय करायचे ते तेव्हा ठरवेन.

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Mar 2017 - 12:49 pm | डॉ सुहास म्हात्रे

म्हणजे मोदिजींनी जे केलं (शपथविधीला आमंत्रण, 'पाकड्यांच्या' प्रधानमंत्र्याला सरप्राइज व्हिजिट देणं इ.) ते सगळं शेखमहंमदी मूर्खपणा होता?

"मित्रत्वाची पुरेशी संधी देऊन नंतर दुसरा कोणताच उपाय बाकी राहीला नाही म्हणून कडक उपाय सुरू केले आहेत" असे जगापुढे सिद्ध करावे लागते. युद्ध/सामरिक कारवाई करताना आणि त्यानंतर, आपल्या बाजूने महत्वाचे देश असावेत किंवा कमीत कमी ते तटस्थ तरी असावेत यासाठी आवश्यक मुत्सद्देगिरी असते. असे काही सर्वमान्य मानदंड महासत्ता असलेल्या अमेरिकेलाही पाळावे लागतात. म्हणूनच कोणतेही युद्ध किंवा सामरिक कारवाई करण्याअगोदर अमेरिका युएनचा आधार घेते.

जर मोदींनी तसे करून, "खूप प्रयत्न करूनही पाकिस्तान सुधारत नाही" हे जगासमोर सिद्ध न करता ताबडतोप कडक कारवाया केल्या असत्या तर आता आंतारराष्ट्रीय राजकारणात पाकीस्तान जितका एकाकी पडला आहे ते झाले नसते. आज पाकीस्तानचे आंतरराष्ट्रीय मंचावर पाठींबा देईल असा (भारतविरोधी हितसंबंधांस असलेला) चीन सोडून इतर कोणही देश नाही. सर्जिकल स्ट्राईक्सनंतर एकाही देशाने भारताला आक्रमक म्हटले नाही.

हे झाले देशाबाहेरील पाठींब्याचे. देशांतर्गत पाहिले तर, पाकिस्तानला पुरेशी संधी न देता, मोदींनी कडक धोरण सुरू केले असते तर भारतातले विरोधी पक्ष गप्प बसले असते का ? आधिपासूनच ते मोदींना हिटलर, आक्रमक एकाधिकारशहा, इ म्हणतच होते, त्यांच्या हाती आयतेच कोलीत मिळाले असते आणि... मोदींना विरोध करताना पाकिस्तानला मदत होत आहे का, याचा विचार केला जात नाही हे तर आपण दिवसगणिक नवीन उदाहरणात पाहत आहोतच.

राजकारण साध्या सोप्या सरळ लॉजिकने चालत नाही, ते करताना देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय वस्तूस्थितीचा विचार करावाच लागतो. ते दोन्ही बाजूंना समान असलेल्या खेळाच्या लॉजिकल नियमांनी बांधील नसते. ते प्रत्येक देशाचे हितसंबंध आणि काही सर्वमान्य दंडक यांच्या क्रमांतरण आणि संयोजन (permutation and combination) यावर चालते. देशातील आणि देशाबाहेरील विरोधक, संधी मिळेल तेव्हा आणि संधी मिळेल त्याप्रमाणे, पाय ओढायला टपलेले असतातच. त्यांना जरूर ते, जरूर तसे उघड व छुपे शह द्यावेच लागतात. मोदींचे वर्तन हा त्याचा भाग होता, हे आता त्याचे जागतिक परिणाम समोर आले असताना, मानायला हरकत नसावी.

वरुण मोहिते's picture

3 Mar 2017 - 1:11 pm | वरुण मोहिते

युनो मध्ये अनेकदा पाकिस्तान ला उघड पडलंय. ह्या पेक्षा हास्यास्पद स्थिती १९६५ १९७१ ला झालीये पुढे ९९ ला पण ९९ ला आपण भाव दिला म्हणून डोक्यावर चढले असा मुद्दा उपस्थित झाल्याने अजूनपर्यंत तोडगा काढता आला नाही .
बाकी आंतरराष्ट्रीय राजकारण कसे चालते आपल्याला माहित असेलच

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Mar 2017 - 1:23 pm | डॉ सुहास म्हात्रे

आंतरराष्ट्रीय राजकारण एकाद्या कृतीने होत नाही, भारताने "पाणी नाकाच्या वर गेले की कडक खेळी करून नंतर माती खात राहणे" हा "नी जर्क रिअ‍ॅक्शन" चा खेळ खूपदा खेळलेला आहे.

यशस्वी आंतरराष्ट्रीय राजकारण ही विचारपूर्वक आणि चिकाटीने अनेक मुत्सद्दी खेळ्यांच्या साखळीचा परिपाक असतो. सद्या तेच चालले आहे असा माझा सकारण अंदाज आहे.

वरुण मोहिते's picture

3 Mar 2017 - 1:37 pm | वरुण मोहिते

सहमत

चिर्कुट's picture

3 Mar 2017 - 12:01 pm | चिर्कुट

काहीही झालं की डाव्या विचारवंतांविषयीची उर्फ बुबुडाविपुमाधविंविषयीची चीड व्यक्त करायची संधी आपण सोडत नाही असे दिसते..असो.

जर "भारत-पाकिस्तानमध्ये शांतता व्हावी अशी शेखमहंमदी स्वप्ने ठेवणे हा मूर्खपणा असेल", तर तिकडे जाउन केक कापणे, शरीफच्या वाढदिवसाला ट्विट करणे, आयएसआयला तपासासाठी बोलावणे ई. काय आहे हो?

प्रत्येकवेळी आपण करू तेच देशासाठी आणि इतर सगळे करतील ते देशद्रोही, ही मांडणी नथुरामपासून आजतागायत बदलण्याची काहीच चिन्हे नाहीत. त्यामुळे हिंदू असूनही अस्ल्या डबल स्टँडर्डवाल्यांना कधी सपोर्ट करु वाटत नाही.

गॅरी ट्रुमन's picture

3 Mar 2017 - 12:46 pm | गॅरी ट्रुमन

काहीही झालं की डाव्या विचारवंतांविषयीची उर्फ बुबुडाविपुमाधविंविषयीची चीड व्यक्त करायची संधी आपण सोडत नाही असे दिसते..असो.

आणि सोडणारही नाही.

जर "भारत-पाकिस्तानमध्ये शांतता व्हावी अशी शेखमहंमदी स्वप्ने ठेवणे हा मूर्खपणा असेल", तर तिकडे जाउन केक कापणे, शरीफच्या वाढदिवसाला ट्विट करणे, आयएसआयला तपासासाठी बोलावणे ई. काय आहे हो?

याचे उत्तर याच चर्चेत दोनदा दिले आहे. तेव्हा परत लिहित नाही.

प्रत्येकवेळी आपण करू तेच देशासाठी आणि इतर सगळे करतील ते देशद्रोही, ही मांडणी नथुरामपासून आजतागायत बदलण्याची काहीच चिन्हे नाहीत. त्यामुळे हिंदू असूनही अस्ल्या डबल स्टँडर्डवाल्यांना कधी सपोर्ट करु वाटत नाही.

ओक्के.

गामा पैलवान's picture

3 Mar 2017 - 1:01 pm | गामा पैलवान

चिर्कुट,

हिंदू असूनही अस्ल्या डबल स्टँडर्डवाल्यांना कधी सपोर्ट करु वाटत नाही.

कम्युनिस्ट कसे स्वत:ला जगातल्या शोषितांचे एकमेव तारणहार मानतात. अगदी तस्संच माझ्यासारखे हिंदुत्ववादी स्वत:स अखिल हिंदूंचा तारणहार समजतात. डबल स्टँडर्डचा उगम कुठे आहे ते तुम्हाला कळलं असेलंच.

आ.न.,
-गा.पै.

चिर्कुट's picture

3 Mar 2017 - 2:34 pm | चिर्कुट

म्हणजे, त्यांनी शेण खाल्लं म्हणून आपण पण खायचं असं आहे का?

गामा पैलवान's picture

3 Mar 2017 - 6:20 pm | गामा पैलवान

चिर्कुट,

त्याचं काय आहे की रामदासस्वामी म्हणून गेलेत की :

धटासी असावे धट ।
उद्धटाशी उद्धट ॥
खटनटाचे नटखट ।
अगत्य करी ॥

आ.न.,
-गा.पै.

चिर्कुट's picture

3 Mar 2017 - 6:56 pm | चिर्कुट

माझ्या अल्पबुद्धीला या श्लोकाचा आणि वर चाललेल्या संवादाचा काय संबंध आहे ते कळत नाही. जाऊदे.

त्यावरून आठवलं, लहानपणी मी कुणाशी असं "उद्धटाशी उद्धट" वागायचा प्रयत्न केला की एक वाक्य माझी आजी नेहमी बोलायची - "तू पण त्याच्यासाखाच वागलास तर तुझ्यात आणि त्याच्यात फरक काय?" थोडक्यात आपली पातळी किती सोडायची ते आपण ठरवावं.

दीपक११७७'s picture

10 Mar 2017 - 11:16 pm | दीपक११७७

अप्रतिम _/\_

सचु कुळकर्णी's picture

2 Mar 2017 - 1:18 am | सचु कुळकर्णी

छान अन मुद्देसुद प्रतिसाद, एक प्रश्न सतत पडतो म्हणजे हि मंडळि फेब्रुवारी च्या आसपासच का जागे होतात ?

गॅरी ट्रुमन's picture

2 Mar 2017 - 10:04 am | गॅरी ट्रुमन

एक प्रश्न सतत पडतो म्हणजे हि मंडळि फेब्रुवारी च्या आसपासच का जागे होतात ?

याचे कारण एका अत्यंत कनवाळू महामानवाला जुलमी भारत सरकारने फेब्रुवारी महिन्यात अन्यायाने फासावर लटकवले आणि त्याची पुण्यतिथी फेब्रुवारी महिन्यात आहे ना.

चौकटराजा's picture

2 Mar 2017 - 6:05 am | चौकटराजा

या मुलीचे लॉजिक लावायचे झाल्यास तिच्या वडिलाना ना पाकने मारले ना युद्धाने. अनेक युगे गेली तरी मानव हा एक प्राणी आहे हे सत्य आहे. सर्व धर्मांची अशी श्रदद्धा आहे की " ईश्वरेच्छा बलियसी " सबब याला परमेश च जबाबदार आहे. आणि हो त्याला उत्पत्ति, स्थिती व लय याचा समवय साधायचा असल्याने त्याने मानवामधे हेतूपूर्वक षटरिपुंची स्थापना केली आहे. त्यात मोह हा एक आहे. मग तो मोह पाण्याचा असो वा जमीनीचा वा साधनसंपत्त्तीचा त्यानेच युद्धे होत असतात. सब सार्‍याला तो कर्ता करविताच जबाब्दार आहे. .... जर तिच्या तर्काने खोलात जायचे झाले तर......

ज्योति अळवणी's picture

2 Mar 2017 - 7:32 am | ज्योति अळवणी

गॅरी साहेब योग्य आणि विचारपूर्वक केलेला प्रतिसाद आवडला

फेदरवेट साहेब's picture

2 Mar 2017 - 8:48 am | फेदरवेट साहेब

तुमचे विचार बहुतांशी पटलेले आहेत, डावे विचारवंत काही तर्क सोवळे नाहीत हे बरोबरच आहे. प्रश्न तो नाही, प्रश्न डांगेंनी इतर धाग्यावर विचारला तसाच आहे 'युद्धात बाप गमावलेल्या पोरीने युद्धविहीन जगाची कल्पना केली, तर त्यात चूक काय?' मी ह्या प्रश्नाला थोडे मोफिडाय करतो.

'युद्धात बाप गेलेल्या पोरीने युद्धविहीन जगाची कल्पना करणे हे प्रॅक्टिकल नसले तरी तिच्या वैयक्तिक आयुष्या संदर्भातील फॅक्ट पाहून तिने युटोपियन संकल्पना मांडली तरी तिच्यावर शरसंधान करणे कितपत माणुसकी अन औचित्याला धरून असेल?'

दुसरे म्हणजे,

तुमचे एकंदरीत मत हे आत्यंतिक उजवे किंवा डावे नाही हे तर स्पष्ट आहे, तरी तुम्ही जेव्हा 'पाकडे' म्हणता त्यात नेमके कोण कोण समाविष्ट असते
१ पाकी जनता
२ पाकी सरकार
३ पाकी मुलकी अधिकारी
४ पाकी लष्करी अधिकारी

हे विचारायचे कारण म्हणजे वरील चार ह्या पाकिस्तानात वेगवेगळ्या संकल्पना आहेत, अन नंबर १ वगळता उर्वरित ३ आपापसात एकमेकांवरच कुरघोड्या करायच्या प्रयत्नात आहेत/असतात त्यामुळे एकाने काढलेले आदेश बाकी दोन पाळत नाहीत किंवा एकंदरीत पाक आर्मी बद्दल बोलताना तर एका वाक्यात बोलता येते

"इन इंडिया, स्टेट पोझसेस ऍन आर्मी
इन पाकिस्तान, आर्मी होल्ड्स अँड कंट्रोल्स अ स्टेट"

त्यामुळे तुमच्यासारखा जबाबदार माणूस जेव्हा 'पाकडे' वृत्ती वर बोलतो तेव्हा तो नेमका कोणावर बोलतोय असा एक कुतूहलवजा प्रश्न येतो मनात

गॅरी ट्रुमन's picture

2 Mar 2017 - 9:56 am | गॅरी ट्रुमन

'युद्धात बाप गेलेल्या पोरीने युद्धविहीन जगाची कल्पना करणे हे प्रॅक्टिकल नसले तरी तिच्या वैयक्तिक आयुष्या संदर्भातील फॅक्ट पाहून तिने युटोपियन संकल्पना मांडली तरी तिच्यावर शरसंधान करणे कितपत माणुसकी अन औचित्याला धरून असेल?'

नाहीच ना. मी पण माझ्या प्रतिसादात म्हटलेच आहे की अशी शेखमहंमदी स्वप्ने बघणे हा मूर्खपणा असला तरी त्यात आक्षेप घेण्यासारखे नाही.

तरीही एक गोष्ट पुढे येत आहे. गुरमेहर ही काही हलकटांच्या हातातील एक प्यादे म्हणून पुढे येत आहे. काल सिमरनजितसिंग मान यांनीही तिच्या समर्थनार्थ टिवटिवाट केला आहे अशा बातम्या आहेत. नेहमीचे यशस्वी कलाकार--केजरीवाल, काँग्रेसचे नेते इत्यादी आहेतच. असे लोक प्यादे म्हणून एखाद्याला वापरत असतील तर ती व्यक्ती मुळात काही प्रमाणात तरी तशी असलीच पाहिजे. केजरीवाल माझ्यासारख्या कोणाला प्यादे म्हणून वापरूच शकणार नाहीत कारण माझ्यासारखे पहिल्यांदाच तो प्लॅन हाणून पाडतील. आणि अशा लोकांचे प्यादे म्हणून ती मुलगी स्वतःला वापरू देत असेल तर त्याबद्दल काही प्रमाणात तरी तिच्यावर टिका होणारच.

तुम्ही जेव्हा 'पाकडे' म्हणता त्यात नेमके कोण कोण समाविष्ट असते

भारताविषयी वाईट भावना असलेले सगळे. मग ते सामान्य लोक असोत की सरकारमध्ये बसलेले असोत की आय.एस.आय मधले असोत की लष्करातले असोत.

सुबोध खरे's picture

2 Mar 2017 - 10:35 am | सुबोध खरे

फेदरवेट साहेब
कामटे, तुकाराम ओंबळे इ लोकांना मुंबईत घुसून कसाब आणि त्यांच्या इतर दहशतवाद्यांनी मारले.हे तर युद्ध नव्हते ना? कि रुमालात हात बांधून पाकिस्तानला शरणागत जायचे? तुम्ही म्हणाल त्या मागण्या मान्य करू पण युद्ध नको.
तत्व म्हणून युद्ध नको हे ठीक पण शेळीची अहिंसा हि भंपक असते हे लक्षात ठेवले पहिजे. जैन आणि बुद्ध धर्म भारतात टिकले कारण हिंदूंनी शास्त्र हातात घेतले होते हे विसरून चालणार नाही.
गुरमेहर कौर च्या वडिलांचे हौतात्म्याला वंदन करून मी एवढेच म्हणेन कि आपला वापर कुणाला आणि कशासाठी करू द्यायचा हे त्या मुलीला समजत नसेल तर ते तिचं दुर्दैव आहे. तिच्या सारख्या अशा काही अधिकाऱ्यांच्या मुलांच्या संपर्कात आजही मी आहे. ( ज्यांचे वडील लष्करी कारवाईत हुतात्मा झाले.) जर ती आपल्या वडिलांच्या हौतात्म्याचे राजकारण करत असेल तर तिचा पूर्ण निषेध.
आता राहिला प्रश्न पाकडे म्हणजे कोण यात तुम्ही वर्णन केलेले चारही लोक येतात
होय पाकिस्तानी जनता सुद्धा. कारण गेल्या ७० वर्षात त्यांना भारत काश्मीर मध्ये मुसलमानांवर अनन्वित अत्याचार करीत आहे आणि काश्मीरमधील मुसलमानांच्या अत्याचाराचा बदला घेतला पाहिजे हा इतिहास सातवी आठवी पासून शिकवला जातो. मुद्दाम पाकिस्तानी शाळात शिकवला जाणारा इतिहास काय आहे याचे खोदकाम करून पहा.
अख्ख्या दोन पिढ्यांचे मानसिक दूषीकरण झाले असल्याने आता शांततेची कबुतरे उडवून काहीही साध्य होणार नाही. काँग्रेस पक्ष केवळ मतांसाठी हे "अमन कि आशा" गीत आळवत असते.
बॉलिवूड चे 'सगळेच" लोक हरामखोर आहेत. आपले सिनेमे पाकिस्तानात चालावेत म्हणून तेथील सर्व लोक शांती, अमन इ नाटकीपणा चालवत असतात. त्यांच्यासाठी पैसे हेच सर्वस्व आहे देश खड्ड्यात गेला तरी चालेल.
प्रत्येक दहशतवादी हल्ल्याला सज्जड प्रत्युत्तर ( सर्जिकल स्ट्राईक) मिळेल. जेंव्हा "ब्लीडींग विथ थाऊजंड कट्स" या त्यांच्या डावपेचाला "ब्लीडींग विथ मिलियन कट्स" असेच उत्तर मिळेल तेंव्हाच पाकिस्तानची नाटके थांबतील.massive retaliation भयंकर प्रतिहल्ला याची भीती पाकिस्तानी हृदयात धडकी बसवेल तेंव्हा हि त्यांची नाटके कमी होतील.
कबुतरे उडवली तर ती तुमच्याच डोक्यावर बसून डोक्यावरच शीटतात हे अजून आपल्या सुडो सेक्युलर ओकून कळत नाही हेच आपले दुर्दैव

ओम शतानन्द's picture

2 Mar 2017 - 9:12 am | ओम शतानन्द

कान्गावखोर आणि आक्रस्ताळ्या डाव्या आणि समाजवाद्द्यान्ना खणखणीत उत्तर,
धन्यवाद ट्रुमन

पैसा's picture

2 Mar 2017 - 10:51 am | पैसा

गॅरी ट्रुमन आणि डॉ खरे यांचे प्रतिसाद नेहमीप्रमाणेच आवडले. फेद्॑रवेट साहेबांचे मुद्दे व्यक्तीचा विचार करता योग्य आहेत. पण समूहाचे मानसशास्त्र आणि वागणे याचा विचार करताना त्यांचे महत्त्व कमी होते.

यापुर्वी या डाव्यांची भारताच्या धोरण निर्मितीत मजबुत पकड होती आणि दिल्लीच्या वरीष्ठ वर्तुळात यांच्या मनाप्रमाणे ध्येय्य धोरणे सहज तयार होत होती. त्यातुन यांना भरपुर पैसा आणि सवलती मिळत होत्या. त्या आता बंद झाल्यात. एबीव्हीपी ने डाव्या संघटनांच्या हडेलहप्पी प्रकाराच्या विरोधात सरळ संघर्ष सुरु केल्याने यांची कोंडी होत आहे. सरकारचा विरोध, हातात पैसा नाही, संघटना चालविणे अवघड, जनतेचा पाठिंबा तर राहिला नाहीच त्यात विरोध सुरु झाला या कोंडीत डावे सापडलेत. मागील एक महिन्यात केजरीवाल टीव्हीवर दिसत नव्हता. त्याचा आपला भयानक त्रास होत असेल. या सर्व असंतुष्टांच्या सहभागाने रामजसची पटकथा लिहली असेल असे म्हणायला हरकत नाही. रामजसच्या प्राचार्याला उमर खालीद आणि ईतर वक्ते आल्यावर काय होईल याची कल्पना नसेल असे कसे समजायचे? हे ठरवलेले आणि घडवलेले आहे. एबीव्हीपी आणि भाजपाची प्रतिक्रिया काय होणार याविषयी खात्री असावी.

आकाश कंदील's picture

2 Mar 2017 - 11:28 am | आकाश कंदील

माझ्या माहिती प्रमाणे आणि "आज तक" या वाहिनीवर दिनांक २८/०२/२०१७ रोजी रात्री दाखवलेल्या माहिती प्रमाणे (जी त्यांनी सैनादलाकडून मिळवलेली आहे) गुरमेहेर कौर चे वडील कारगिल युद्धात शहिद झालेले नसून ते कुपवाडा मध्ये आतंकी लोकाबरोबरील चकमकीत शहिद झालेले आहेत आणि इतकी basic माहिती सुद्धा तिला असू नये याचे आश्चर्य वाटते. जी मुलगी आपल्या वडीलांच्या मृत्यू बद्दल इतकी बेफिकीर असू शकते त्या मुलीच्या या प्रकारे केलेल्या twit ला काय अर्थ असू शकतो .

यु ट्यूब वर वरील विडिओ ची लिंक मिळाली कि लवकरात लवकर देण्याचा प्रयन्त करतो

सुबोध खरे's picture

2 Mar 2017 - 11:53 am | सुबोध खरे

साहेब,
वडील प्रत्यक्ष युद्धात मारले गेले कि घुसखोरीविरुद्ध कार्यवाहीत(CI ops) मारले गेले हे माझ्या दृष्टीने गौण आहे. कारण असे कर्तव्य करीत असताना मृत्यूच्या छायेतच वावरावे लागते. ते प्रत्यक्ष शत्रूच्या विरुद्ध लढत असताना मारले गेले आहेत ( killed in action) आणि त्यामुळे त्यांच्या हौतात्म्यात कोणतीही कसर येत नाही.
मुलीला हे माहित "असणारच" पण ती सुडोसेक्युलर लोकांच्या हातातील प्यादे बनून राहिली आहे. आणि अशा वक्तव्याला फाटे फुटले कि हेच सुडोसेक्युलर लोक म्हणणार कि, "पहा हिचे वडील हुतात्मा झाले आणि या "तथाकथित देशभक्तांना" त्यांची कदरच नाही".
हे सर्व हलकटपणाचे डावपेच असतात.
http://indiatoday.intoday.in/story/gurmehar-kaur-captain-mandeep-singh-r...

वरुण मोहिते's picture

2 Mar 2017 - 12:16 pm | वरुण मोहिते

पण दोन्ही बाजूच्या आततायी विचारांनी हे राजकारण बाहेर आलं . मुळात त्या मुलीकडे लक्षच द्यायला नव्हतं पाहिजे . असे शांतीचे कबुतर सोडणारे लै झाले भारतात . त्यावर मीच देशभक्त म्हणून लोकांनी धडाधड सोशल मीडिया वर प्रतिक्रिया देऊन त्यांचीही इमेज गेली .
तिच्या बोलण्यात एक वाक्य होतं पाकिस्तान नाही युद्धाने मारलं . म्हणजे काय भारत एकाचवेळी १०० लोकांशी युद्ध खेळत असतो का ???ते पाहून तेवढं सांगता आलं असतं बाई हे चूक आहे .पण सगळीकडून आततायी पणा नडला.

विशुमित's picture

2 Mar 2017 - 12:44 pm | विशुमित

एक्साक्टली...

समजावून सांगणे आणि समजून घेणे हा प्रकारचं उरला नाही. लगेच हमरातुम्बरी.

बाकी वरील बरेच गोलगोल प्रतिसाद आणि त्याला दिलेले अनुमोदन एकच अजेंडा पुढे रेटण्याची धडपड दिसत आहे, हे लपून राहिले नाही.

पहिले तर तो ट्विटर नावाचा टिवटिवाट बंद केला पाहिजे. देशातल्या कोणत्यातरी कॉलेजमध्ये दोन-चार पोट्टे भांडले तर अक्ख्या देशात युद्ध चालू झाल्याचं चित्र ट्विटरवर दिसतं. हे अश्या प्रकारचे भांडणं प्रत्येक गल्लीबोळातल्या कॉलेजमध्ये रोजच होत असतील. त्यांना इतकं महत्व देण्याचं कारण नाही.
राहिला प्रश्न त्या मुलीचा तर तिचे विचार अति आदर्शवादी आहेत. पण तसे विचार ठेवण्यात काही गैर वाटत नाही.
फक्त देशातला प्रत्येक हरामखोर राजकारणी आपला उपयोग करून घेत आहे (ह्यात उजवे -डावे-आडवे -उभे सगळेच आलेत) हे तिला कदाचित कळत नसावं.

<<<राहिला प्रश्न त्या मुलीचा तर तिचे विचार अति आदर्शवादी आहेत. पण तसे विचार ठेवण्यात काही गैर वाटत नाही.>>>

-- तीव्र सहमत.
त्याचबरोबर त्या मुलीला विरोध करणारे सुद्धा अति राष्ट्रवादी (?) आहेत. पण तसे विचार ठेवण्यात ही काही गैर वाटत नाही.

हे राजकारणी त्यांचा उपयोग करून घेत आहेत हे त्या बिचाऱ्या मुलीला आणि एबीव्हीप च्या मुलांना पण कळत नसावं, याची खंत वाटते.

चिनार's picture

2 Mar 2017 - 3:10 pm | चिनार

राष्ट्रवादाची अलीकडली व्याख्या :
राष्ट्रवाद: ज्यात राष्ट्रहित सोडून इतर सर्व गोष्टींवर वाद घातला जातो तो राष्ट्रवाद..

ज्यादिवशी राष्ट्रवादाचा अर्थ समजून घेण्याची कुवत परमेश्वर माझ्यासहित सर्वांना देईल तो सुदिन!

विशुमित's picture

2 Mar 2017 - 3:15 pm | विशुमित

राष्ट्रवादाची अलीकडली व्याख्या :
राष्ट्रवाद: ज्यात राष्ट्रहित सोडून इतर सर्व गोष्टींवर वाद घातला जातो तो राष्ट्रवाद..

+1111111

वरुण मोहिते's picture

2 Mar 2017 - 3:29 pm | वरुण मोहिते

स्वयंघोषित राष्ट्रवादी तयार होत आहेत . अशी संधी मिळाली नव्हती म्हणून . बराच काळ काँग्रेस च वर्चस्व होत . त्यावेळी देशासाठी काँगेस ने चांगले निर्णय घेतलेही असतील . पण राष्ट्रभक्त ह्या विचारसरणी ला तेव्हा चालना मिळाली नाही . जी आताच्या काळात मिळाली . प्रश्न वृत्तीचा असतो . जगात सगळीकडे राष्ट्रभक्त हा मुद्दा झालाय केव्हा ना केव्हातरी . हि मानसिकता आहे .आणि ह्या मानसिकतेतून काहीच साध्य होत नाही .

गॅरी ट्रुमन's picture

2 Mar 2017 - 9:37 pm | गॅरी ट्रुमन

राष्ट्रवादाची अलीकडली व्याख्या :
राष्ट्रवाद: ज्यात राष्ट्रहित सोडून इतर सर्व गोष्टींवर वाद घातला जातो तो राष्ट्रवाद..

बाकीचा फापटपसारा राहू द्या हो. फक्त खाली दिलेल्या गोष्टीसारख्या गोष्टींवर आक्षेप घेतला तर तसा आक्षेप घेणे म्हणजे राष्ट्रहित सोडून इतर सगळ्या गोष्टींवर घातलेला वाद का?की ते पण अभिव्यक्तीस्वातंत्र्य? एकदाचा उलगडा होऊन जाऊ द्या.

JNU

अशा पध्दतीने दिशाभूल करून मुख्य विषयावरून लक्ष भरकटवायचे काम विचारवंत नेहमीच करत असतात.

अशा पध्दतीने दिशाभूल करून मुख्य विषयावरून लक्ष भरकटवायचे काम विचारवंत नेहमीच करत असतात.

बाबो!! हे वाक्य मला उद्देशून आहे की काय ??? मी नाही हो ट्रुमन भाऊ विचारवंत...
शिवाय थोडीशी सुधारणा..
अशा पध्दतीने दिशाभूल करून मुख्य विषयावरून लक्ष भरकटवायचे काम विचारवंत/राजकारणी/सरकार/विरोधक/समाजकंटक नेहमीच करत असतात.

राहिला प्रश्न ह्या पोश्टरचा..
ज्याने कोणी हे असले पोश्टर लावले असतील त्याच्या पार्श्वभागावर फटके द्यायला हवे. पण ते कोणी ?? तर पोलिसांनी आणि न्यायव्यवस्थेने...अभाविप आणि इतर कोणत्याही संघटनेला तसे करण्याचा अधिकार आहे का?
झालंय काय की आजकाल मूळ विषय बाजूला राहतो आणि सुरु होतो तो बोभाटा..मग बोभाटयावर बोभाटा...बोभाटयावरच्या बोभाटयावर बोभाटा..आणि तुमच्या आमच्यासमोर येतो एक वेगळाच बोभाटा..
माना अथवा नका मानू पण ह्या सगळ्याला सोशल नेटवर्किंग थोड्याफार प्रमाणात जबाबदार आहेच. त्यावर नियंत्रण हवे. पण तसे केल्यास परत अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरे बोंबा चालू होतील.

गॅरी ट्रुमन's picture

3 Mar 2017 - 10:10 am | गॅरी ट्रुमन

मी नाही हो ट्रुमन भाऊ विचारवंत...

नक्कीच :)

अभाविप आणि इतर कोणत्याही संघटनेला तसे करण्याचा अधिकार आहे का?

नक्कीच नाही ना. ते काम पोलिसांचे आणि न्यायव्यवस्थेचेच. पण प्रश्न कुठे निर्माण होतो? असे काही तिरपागडे विचार ठेवणे यात काही चुकीचे आहे हेच विचारवंतांना वाटत नसते. अशा विचारवंतांना शारीरीक नाही तरी शाब्दिक लाठ्या मिपासारख्या ठिकाणी लगावल्या जाणारच. कुठेही शारीरीक लाठ्या लगावल्या जात असतील तर ते नक्कीच चुकीचे आहे.

माना अथवा नका मानू पण ह्या सगळ्याला सोशल नेटवर्किंग थोड्याफार प्रमाणात जबाबदार आहेच.

मी म्हणेन याला मानवी स्वभाव जास्त जबाबदार आहे. सोशल मिडिया हे एक व्यासपीठ मिळाले आणि गॉसिप जास्त प्रमाणावर पसरले. एक उदाहरण द्यायचे झाले तर लॅन्डलाईन फोन आल्यानंतर पूर्वी 'कानगोष्टी' स्वरूपातील गॉसिप जास्त प्रमाणावर पसरले त्याला लॅन्डलाईन फोनपेक्षा मुळातील गॉसिपिंग प्रवृत्ती जास्त जबाबदार आहे. तसेच काहीसे सोशल मिडियाच्या बाबतीत.

१. गुरमेहर कौर या 'व्यक्ति'ला(शहीदाची मुलगी वगैरे नव्हे) आपले मत व्यक्त करण्याचा मुलभूत अधिकार घटनेने दिला आहे. तो समाजाने मान्य केला आहे. कायदेमंडळाने त्याच्या रक्षणासाठी कायदे केलेले आहेत आणि न्यायपालीका तिच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी कटीबद्ध आहे. तिचे मतस्वातंत्र्य अबाधीत आहे आणि त्याचा मी आदर करतो.
२. तरीदेखील तिचे विधान तद्दन गल्लाभरू, दांभिक आहे असा दावा करण्याचा आणि तिच्या वाक्यांची तार्किक चिरफाड करण्याचा अधिकार सेहवाग, मी, रणदीप हूडा आणि समस्त भारतियांना आहे. गुरमेहर करते ती अभिव्यक्ति आणि सेहवागचे ते ट्रोलींग आणि बुलीइंग हा वेगळा न्याय का?
३. सध्या तीने केलेले 'मी अभाविप ला घाबरत नाही' हे विधान योग्य आहे. माझ्या मते, कुठल्याही विद्यार्थी संघटनेला (डाव्यांची असो वा हिंदूत्ववाद्यांची) इतर विद्यार्थ्यांनी घाबरणे हे चांगले नाही.
४. कन्हैय्या असो वा सध्याचे हे रामजास कॉलेज प्रकरण, या दोहोंचाही हेतू आपापल्या शक्तींचे प्रदर्शन करणे हाच आहे. भाजपच्या मागे सामान्यांत असलेला प्रचंड पाठींबा आहे तर डाव्यांच्या बाजूला त्यांनी इतकी वर्षे निगुतीने सांभाळलेली डाव्या विचारांची बुद्धीवादी मंडळी आहेत. तुम्ही राष्ट्रद्रोही आहात हे ठरवायला उजव्या बाजूच्या मंडळींना एक सेकंदही लागत नाही, तुम्ही भाजपाच्या विरोधात काहीही बोललाअत की झाले. दुसर्‍या बाजूला नुसते सेहवागला अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही काय? असे विचारलंत की तुम्ही फॅसिस्ट, ट्रोल होता, हिंदूराज्य निर्माण करण्याच्या संघाच्या कटात तुम्ही सहभागी आहात, असे डावे म्हणतात.

मध्यममार्गी, असल्या कुठल्याही विचारधारेच्या आहारी न गेलेल्या विचारी जनांची असल्या टोणग्यांमुळे आणी त्यांच्या रोज चालणार्‍या कळवंडीमुळे निष्कारण कुचंबणा होते. तेव्हा शहाण्यांनी असल्या कोणत्याही आयडियॉलॉजीला शरण न जाता प्रत्येक घटनेचा स्वतंत्रपणे संविधान, मानवी मुल्ये, नैतिकता आणि राष्ट्रीय सुरक्षा या सर्व गोष्टींचा अभ्यास करून मत बनवावे असे वाटते.

सुबोध खरे's picture

2 Mar 2017 - 1:29 pm | सुबोध खरे

गुरमेहर करते ती अभिव्यक्ति आणि सेहवागचे ते ट्रोलींग आणि बुलीइंग हा वेगळा न्याय का?
हे असं विचारलं तर तुमचं बुर्ज्वा, बुरसटलेल्या विचारांचे, प्रतिगामी, मनुवादी, स्वातंत्र्यवैरी अशा विशेषणांनी मिपावरील बुद्धिवंतांकडून स्वागत होईल.

फेदरवेट साहेब's picture

2 Mar 2017 - 3:52 pm | फेदरवेट साहेब

अन गुरमेहरला तिचे मत मांडायचे स्वातंत्र्य आहे, असे म्हणले की (ते ही तिचा वापर होतोय हा मुद्दा मान्य केल्यावर) सुद्धा 'खणखणीत प्रतिसाद डाव्या अन समाजवाद्यांना' असे नथीतून तीर मारल्या जातात, माझ्यामते डॉक्टर सौरा एकंदरीत पूर्ण व्यवस्थेबद्दल बोलतायत फक्त मिपाबद्दल नाही , मिपाचे काय घेऊन बसलात, परवाच एक पात्र 'अरे वा तुम्ही पण कुंपणावरचे का?' म्हणून एका (त्यातल्यात्यात) निष्पक्ष माणसाची लाज काढून गेलं, मुद्दा काय मूर्खपणा कुठेच चुकलेला नाही, डावे नाही का उजवे नाही. आपला कल जिकडे असतो त्याच्या विरुद्ध दिशेने किटाळ दिसते फक्त :)

श्रीगुरुजी's picture

2 Mar 2017 - 3:17 pm | श्रीगुरुजी

थोडक्यात सारांश -

१) गुरमेहर कौर या व्यक्तीला आपले मत असण्याचे, ते जाहीरपणे बोलून दाखविण्याचे, एखाद्या संघटनेविरूद्ध असण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. त्या स्वातंत्र्याला विरोध करणे अयोग्य आहे.

२) तिने १०-१२ फलक तयार करून ते एकापाठोपाठ दाखविण्याची चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रदर्शित केली. असे करण्याचा तिला पूर्ण हक्क आहे.

३) आपले वडील आपण २ वर्षाच्या असताना कारगिल युद्धात मारले गेले. सुरवातीची काही वर्षे आपण मुस्लिमविरोधी होतो. परंतु मला आईने समजावून सांगितले व त्यामुळे आपले वडील पाकिस्तानने मारले नसून त्यांना युद्धाने मारले आहे असे आपले मत जाहीर सांगण्याचा तिला पूर्ण हक्क आहे.

४) तिने समाजमाध्यमांवर आपली चित्रफीत प्रदर्शित केल्यानंतर त्यावर तिच्या बाजूने किंवा विरूद्ध प्रतिक्रिया देण्याचा सर्वांना पूर्ण हक्क आहे.

५) सेहवागने किंवा भाजपच्या एका मंत्र्याने प्रसिद्ध केलेले चित्र हे तिच्या "आपले वडील पाकिस्तानने मारले नसून त्यांना युद्धाने मारले आहे" या तिच्या एका फलकावरील वाक्याविरूद्ध दिलेली उपरोधिक प्रतिक्रिया होती. अशी प्रतिक्रिया देण्याचा त्यांना पूर्ण हक्क आहे. अशी प्रतिक्रिया देताना सेहवागने युद्धाची तुलना क्रिकेटशी किंवा भाजपच्या मंत्र्याने तिची तुलना दाऊदशी केलेली नसून आणि तिचा किंवा तिच्या वडीलांच्या हौतात्म्याचा अपमान केलेला नसून, तिच्या फलकावरील वाक्यावर दिलेली ही उपरोधिक प्रतिक्रिया आहे.

हिरोशिमा व नागासकी येथील लाखो नागरिकांना अमेरिकेने मारले नसून युद्धाने त्यांना मारले आहे किंवा ६० लाख ज्यूंना हिटलरने मारले नसून युद्धाने त्यांना मारले आहे हा युक्तिवाद जितका हास्यास्पद भासेल तितकाच माझे वडील पाकिस्तानने मारले नसून त्यांना युद्धाने मारले आहे हा युक्तीवाद देखील हास्यास्पद आहे. यापुढे जाऊन असेही म्हणता येईल की तिच्या वडीलांना युद्धाने मारले नसून भारताने मारले आहे कारण भारताने १९९९ मध्ये युद्ध न करता शांततेची बोलणी केली असती तर युद्धच झाले नसते व तिचे वडील शहीद झालेच नसते.

अर्थात तिच्या नकळत ती पुढे आणत असलेली विचारसरणी देशासाठी घातक आहे हे तिच्या अजून लक्षात आलेले नाही. या देशात एक विशिष्ट वर्ग भारत-पाकिस्तानमधील तणावाला, युद्धांना, दहशतवादी हल्ल्यांना, काश्मिरमधील फुटिरतावादाला व परिस्थितीला पाकिस्तान जबाबदार नसून भारतच जबाबदार आहे असे मानतो. भारत काश्मिरींवर अत्याचार करीत आहे, भारत तिथे दडपशाही करीत आहे असा ते सातत्याने प्रचार करीत असतात. भारताने काश्मिरमध्ये सार्वमत घ्यावे, काश्मिरला स्वातंत्र्य द्यावे, सीमेच्या दोन्ही बाजूकडील नागरिकांना व्हिसाची अट न घातला मुक्तद्वार ठेवावे अशा तर्‍हेच्या मागण्या ते वारंवार करीत असतात. असे करण्याने उर्वरीत भारतावर किती वाईट परीणाम होईल याचा विचारदेखील त्यांच्या मनात येत नाही. मालेगाव, समझोता एक्सप्रेस, अजमेर इ. ठिकाणी झालेले बॉम्बस्फोट "हिंदू" अतिरेक्यांनी केले, गोध्रामध्ये हिंदूंनी मुस्लिमांचे वांशिक हत्याकांड केले, संसदेवरील हल्ला हे वाजपेयी व अडवानींचेच कारस्थान होते, इशरत जहां निर्दोष होती, अफजल गुरू निर्दोष होता, याकूब मेमनची फाशी म्हणजे न्यायालयीन हत्या असा प्रचार ते आंतरराष्ट्रीय पातळीवर करून भारताची बाजू लंगडी करण्याचा ते सातत्याने प्रयत्न करीत असतात. ही मुलगी दाखवित असलेल्या फलकातून देशासाठी अत्यंत घातक असलेली हीच ती "बुद्धीवादी निधर्मी व पुरोगामी" विचारसरणी पुढे येते आहे हे या मुलीच्या लक्षात आलेले दिसत नाही.

६) तिला ज्यांनी मारहाणीच्या किंवा बलात्काराच्या धमक्या दिल्या असतील, त्यांच्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करणे आवश्यक आहे. अशा धमक्या देणे अत्यंच चूक आहे.

७) तिने #studentagainstABVP असा हॅशटॅग प्रसिद्ध केला असून आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने असून हिंसाचाराच्या विरूद्ध आहोत असे तिने सांगितले आहे. यातून जरा गोंधळ निर्माण होतो. ती इतर कोणत्याची विद्यार्थी संघटनांविरूद्ध नसुन फक्त अभाविपविरूद्ध आहे, ती फक्त अभाविपने केलेल्या कथित हिंसाचाराविरूद्ध असून इतर विद्यार्थी संघटनांच्या हिंसाचाराविरूद्ध नाही, अभाविप वगळता इतर विद्यार्थी संघटना अजिबात हिंसाचार करीत नाहीत असे अनेक गैरसमज यातून निर्माण होऊ शकतात.

८) या सर्व प्रकरणात केजरीवाल, राहुल, डावे नेते इ. यशस्वी कलाकारांनी भरपूर तेल ओतले असून आपल्या पोळ्या भाजून घेण्याचे कार्य सुरू आहे. तिचा प्यादे म्हणून वापर करून या निमित्ताने मोदी सरकार, अभाविप, भाजप इ. विरूद्ध वातावरण पेटवायचे प्रयत्न सुरू आहेत. २०१५ मध्ये एफटीआयआय, २०१६ मध्ये आधी हैद्राबाद विद्यापीठ व नंतर जनेवि येथे अगदी याच पद्धतीने वातावरण पेटविले गेले होते. आताही अगदी तसेच सुरू आहे.

९) १५-२० दिवसांपूर्वी मराठवाडा विद्यापीठात आयोजित केलेला दीनदयाळ उपाद्याय जयंतीचा कार्यक्रम बहुजन विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उधळला होता.

शाजिया इल्मी यांना अलिगड विद्यापीठात तलाक विषयावर बोलण्यासाठी मज्जाव करण्यात आला.

काही वर्षांपूर्वी तस्लीमा नसरीन यांच्यावर दोन वेळा शारिरीक हल्ला झाला होता.

२-३ आठवड्यांपूर्वी जनेविमधील निष्पक्ष वृत्तीचे प्रा. मकरंद परांजपे यांना तेथील काही विद्यार्थ्यांनी त्त्यांना यांच्या कार्यालयात जाण्यास मज्जाव करून त्यांना अडवून धरले. त्यांनी वारंवार विनंती करूनसुद्धा त्यांना अडवून धरण्यात आले. माझ्या कार्यालयात जाणे हा माझा हक्क आहे हे वारंवार सांगूनसुद्धा विद्यार्थ्यांनी ऐकले नाही. शेवटी त्यांनी गांधीवादी पद्धतीने सर्व विद्यांर्थ्याचे पाय धरले. याची चित्रफीत उपलब्ध आहे.

जनेवि किंवा रामजसमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी जीवाच्या आकांताने टाहो फोडणारे या प्रकारांबद्दल अजूनही मूग गिळुन गप्प आहे. निवडक विरोध व निवडक मौन हे यांचे व्यवच्छेदक लक्षण आहे.

१०) लहानपणी मुस्लिमविरोधी असलेली मुलगी आज वडीलांच्या मृत्युसाठी पाकिस्तानला जबाबदार धरीत नाही. कदाचित अजून १०-१५ वर्षांनी तिच्या जाणीवेच्या कक्षा विस्तृत झाल्यानंतर खरोखर पाकिस्तानमुळेच आपले वडील गेले असे तिच्या लक्षात येऊ शकेल किंवा कदाचित आताच्याच मार्गावर पुढे जाऊन, "माझ्या वडीलांना युद्धाने मारले नसून, त्यासाठी आक्रमक भारतच जबाबदार आहे" अशीही तिची समजूत होऊ शकेल.

११) ऐन निवडणुकीच्या तोंडावर असे प्रकार होणे यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नाही.

गॅरी ट्रुमन's picture

2 Mar 2017 - 4:41 pm | गॅरी ट्रुमन

आंतरजालावरून साभारः

Pic

२-३ आठवड्यांपूर्वी जनेविमधील निष्पक्ष वृत्तीचे प्रा. मकरंद परांजपे यांना तेथील काही विद्यार्थ्यांनी त्त्यांना यांच्या कार्यालयात जाण्यास मज्जाव करून त्यांना अडवून धरले. त्यांनी वारंवार विनंती करूनसुद्धा त्यांना अडवून धरण्यात आले. माझ्या कार्यालयात जाणे हा माझा हक्क आहे हे वारंवार सांगूनसुद्धा विद्यार्थ्यांनी ऐकले नाही. शेवटी त्यांनी गांधीवादी पद्धतीने सर्व विद्यांर्थ्याचे पाय धरले. याची चित्रफीत उपलब्ध आहे.

हे खरे असेल तर भयानक आहे. ह्या विद्यार्थी संघटना नक्की कसल्या मोटिव्ह ने काम करतात?

श्रीगुरुजी's picture

2 Mar 2017 - 11:09 pm | श्रीगुरुजी

हे खरं आहे ही बातमी अनेक माध्यमातून आलेली आहे.

http://m.dailyhunt.in/news/india/english/the+quint-epaper-quint/democrat...

JNU students stop faculty from entering office; professor threatens satyagraha, touches students' feet.

वरील बातमीत चित्रफीत आहे. नजीबचा पुळका आलेल्या, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गफ्फा हाणणाऱ्या असहिष्णु टोळीने ही गुंडगिरी केली आहे.

पुष्करिणी's picture

2 Mar 2017 - 4:25 pm | पुष्करिणी

तद्द्न मूर्खपणा आहे. आधी येडछाप चाळे करायचे आणि झेपेनासे झाले की लहान मुलगी / मुलगा आहे अशी रड चालू करायची. गुरमेहेरबद्दल मला राग नाही कारण तिनं जे काही केलय ते अटेंशन ग्रॅबिंग ;'मला बघा - फुलं वहा' प्रकारच वाटतं. पण त्यानंतर 'सिलेक्टिव्ह फ्रिडम ऑफ एक्स्प्रेशन' चे कैवारी जसे वागत आहेत त्याचा जास्त राग आहे. दिल्ली युनिव्हर्सिटीच्याबद्दल मत खराब होत चाललय माझं; तिथं काही रेग्युलर लेक्चर्स / सबमिशन्स / प्रोजेक्ट्स / परिक्षा असं काही नसतं का? इतक्या विद्यार्थ्यांना इतका मोकळा वेळ कसा मिळतो? खुद्द दिल्लीमधे राहणारे कमी असावेत यांत बरेचसे हॉस्टेल मधे राहणारे आहेत का? घरून काही विचारणा होत नाही का या बाळांची?

गुरमेहेरची कॉलेजमधिल अ‍ॅडमिशन डिफेन्स कोट्यातून आहे का? असली तर ती सुद्धा 'युद्धखोरीत' अप्रक्षरित्या सहभागी आहे.
कारण भारतानं सैन्य बाळगणं हाच जर 'युद्धखोरी' चा क्रयटेरिया असेल तर सरकारनं सैनिकांना / त्यांच्या परिवारांना दिल्या जाणार्‍या कोणत्याही सोयी-सुविधा तिनं घेउ नयेत आणि पर्यायानं या युद्धखोरीतला स्वतःचा सहभाग बंद करावा. भारतात सक्तीची मिलिटरी सर्व्हिस नसल्यानं तिला हे सहज शक्य आहे.

रेग्युलर लेक्चर्स / सबमिशन्स / प्रोजेक्ट्स / परिक्षा देऊन कोणाचे भले झाले म्हणा ?

गुरमीत तिचे मित्रमंडळी आणि एबीव्हीप मधील मुलांच्या पालकांनी नक्कीच आपल्या पाल्यांवर वचक ठेवला पाहिजे. काय म्हणता?

विशुमित's picture

2 Mar 2017 - 4:45 pm | विशुमित

??

पुष्करिणी's picture

2 Mar 2017 - 4:59 pm | पुष्करिणी

त्यांचं भलं होउ दे अथवा नाही इतरांना तरी त्रास नाही, एकीकडे स्वतःला 'यंग इंडिया' वगैरे म्हणत चमकोगिरी करायची आणि विरूद्ध बाजूनं कोणी बोलायला लागलं की मी लहानच आहे म्हणून रडायला सुरूवात करायची.

मी फक्त गुरमेहेर किंवा तिच्या कंपूबद्दल नाही तर अभाविप सहित सगळ्याच विद्यार्थीसंघटनांबद्दल बोलतीये, यांना इतका वेळ कसा मिळतो, वेळ तर वेळ वर फुकटची प्रसिद्धी पण ...थोडी जेलसी म्हणा हवं तर; आम्हांला असं आरामाचं विद्यार्थीजीवन का कधी नाही मिळालं? आत्ता अभ्यास नाही केला / नीट रिझ्ल्ट नाही लागला तर काय होइल / नोकरी मिळेल का अशी भविष्याची चिंता पण असायची वयाच्या २० व्या वर्षी, असं 'सर पे कफन' वगैरे बांधून काही करता येइल इतका वेळ आणि पैसाच नव्हता.

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Mar 2017 - 9:31 pm | डॉ सुहास म्हात्रे

रेग्युलर लेक्चर्स / सबमिशन्स / प्रोजेक्ट्स / परिक्षा देऊन कोणाचे भले झाले म्हणा ?

हे मात्र वट्ट खरे आहे !

एफटीआयआयमधले विद्यार्थीही दोन वर्षांचा अभ्यासक्रम ९-१० वर्षे करण्यासाठी प्रसिद्ध असल्याचे आणि त्या वाढीव काळासाठी त्यांना शिष्यवृत्ती वाढवून मिळत होती असे मागे उघड झाले आहेच ! :)

वरुण मोहिते's picture

2 Mar 2017 - 4:55 pm | वरुण मोहिते

परंपरा फार जुनी आहे .
एका फटक्यात कोण बोललं असतं दोन्ही बाजू चुकीच्या आहेत .
काय करता येईल यावर चर्चा चांगली झाली असती

विशुमित's picture

2 Mar 2017 - 5:17 pm | विशुमित

काय करता येईल यावर चर्चा चांगली झाली असती

-- अनुमोदन...!!

ह्या बारक्या पोरांच्या भांडणां पायी देशातील मोठ्या माणसांमध्ये जुंपली आहे.

गॅरी ट्रुमन's picture

2 Mar 2017 - 8:08 pm | गॅरी ट्रुमन

अजेंडा घेऊन यायची मिपा परंपरा फार जुनी आहे

फक्त प्रॉब्लेम असा असतो की आपण स्वतः सोडून (आणि कदाचित आपल्या कंपूमध्ये असलेले सोडून) इतर सगळे अजेंडा घेऊन मिपावर येतात पण "तो मी नव्हेत" (किंवा ते आम्ही नव्हेच) असे वाटायला लागले तर ते अधिक घातक आहे. अशा छुप्या लोकांपेक्षा उघडउघडपणे कुठला तरी अजेंड्याचा झेंडा घेऊन मिपावर येणारे लोक कधीही परवडले.

असो.

२०१० साली काँग्रेस सरकारच्या आदेशानुसार, तिस्ता सेटलवाडच्या (सबरंग ट्रस्ट ) ने एन सी ई आर टीच्या शिक्षकांसाठी प्रशिक्षणार्थ पुस्तक लिहुन दिली. त्या पुस्तकात ईयत्ता ५ व ६ च्या मुला मुलींना काय शिकवायच हे दिलेल होत.

त्या पुस्तकातले काही ठळक उदा,

१. महम्मद गझनीने सोमनाथ मंदिर हे कधीच तोडल नव्हत.
२. औरंगजेब , टिपु सुलतान, महम्मद गझनवी सारखे बादशहा दयाळु होते.
३. हिंदु राजांनी जनतेचा फार छळ केला.
४. मुसलमांन लोकांना आताच्या भारता बद्दल प्रेम असायलाच पाहीजे अस नाही, त्याची भावना ईतरत्र गुंतलेली असु शकते.

हा व्हीडीयो बघीतला तर कळेल.
https://www.youtube.com/watch?v=R8s2xRN66zY&t=969s

डँबिस००७'s picture

2 Mar 2017 - 7:04 pm | डँबिस००७

मारवा's picture

2 Mar 2017 - 7:28 pm | मारवा

भारत व पाकीस्तान या दोन मानव समुहात जे काही चाललेल आहे.
शत्रुत्व हिंसाचार एकमेकांना ठार मारणे इ.
हे दोन्ही कडच्या मानवी टोळ्यांच्या उन्नत प्रगल्भ अवस्थेचे लक्षण आहे का ?
यात दोन्ही टोळींकडुन प्रत्येकाने रक्त न सांडता
आपापल्या टोळीसाठी रक्त सांडण्यासाठी काही ठराविक माणसांची निवड केलेली आहे.
इतर टोळी सभासदांनी रक्त सांडलेल्या व्यक्तीचा सन्मान त्यांच्या कुटुंबाचा सांभाळ त्यांना वंदन आर्थिक आधार इ. देणे अपेक्षीत आहे.
आता यात रक्त सांडलेल्या टोळी सभासदाच्या कुटुंबियाने ही टोळी संदर्भात मान मर्यादा पाळणे अपेक्षीत आहेच
तसे न झाल्यास ते एक पापच आहे.
तर एक टोळी सभासद म्हणुन काहींचा सात्विक संताप होऊन त्यांनी सामुहीक बलात्काराचे शासन तुला या पापासाठी देऊ अथवा व्हीडियो व्हायरल करु असे टोळीप्रतीच्या प्रेमभावनेच्या आवेगात जर एखादा टोळी सभासद बोलला तर
त्याचे काय नेमके चुकले ?
टोळीप्रती निष्ठा असण्यात नेमके गैर काय ?
युद्ध हिंसाचार इत्यादीवर प्रमाणापेक्षा जास्त विचार करणे किंवा त्याचे खापर टोळी धुरीणांवर फोडणे हे गैरच नाही का ?
मुळात इतका विचार करणे हेच किती सरळ सरळ टोळी प्रती गद्दारी असण्याचाच पुरावा नाही का ?
जेव्हा ती मुलगी असे म्हणते की पाकीस्तानने मारले नाही युद्धाने मारले तेव्हा ती ज्या युद्ध संदर्भातील मुलभुत कारणाकडे
त्यातील राजकारणाकडे त्यामागील गुंतागुंतीच्या हितसंबंधाकडे निर्देश करते तो मी म्हणतो मुळातच टोळीवादा ला टोळीच्या सभासदांना विनाकारण सेल्फ कॉन्शस करण्याचा एक घातक प्रयत्नच नाही का ?
शिवाय टोळी लोकशाहीवादी असण्याचे किती तोटे सहन करावे ?
म्हणजे शासन करावेसे वाटुनही आवंढा गिळुन किंवा मुग गिळुन स्वतःलाच शासन करुन घ्यावे लागते
शिवाय मुलगी स्वत रक्त सांडण्याची जबाबदारी " वाहीलेल्या " घरातील सभासद आहे. कर्तव्याचे ओझे वाटुन दिलेले आहे तिच्याकडे चर्चेचे ओझे वाहण्याचे कारणमीमांसा करण्याचे ओझे वाहण्याची जबाबदारी दिलेली नसतांना
ती अशी नेमलेल्या टोळी विचारवंताची जागा का घेऊ पाहतेय ?
याला उद्धटपणा नाहीतर काय म्हणावे ?

सुबोध खरे's picture

2 Mar 2017 - 7:51 pm | सुबोध खरे

मारवा साहेब
आपले विचार आदर्शवादी वाटतात. म्हणूनच ते व्यवहारात अने कठीणच नव्हे तर अशक्य आहेत. बाकी आदर्शवादी विचारसरणी असू नये असे मी म्हणत नाही पण तो वास्तवाच्या जवळ असावी असे वाटते.
दुर्दैवाने पाकिस्तानशी सलोखा करण्याचे जेवढे प्रयत्न आपल्या राजकारण्यांनी( सर्व पक्षाच्या) केले ते सर्व आतापर्यंत फोलच गेलेले आहेत. आपल्या प्रत्येक राजकीय पक्षाने आपल्या विचारसरणी नुसार केंव्हा ना केंव्हा प्रामाणिक प्रयत्न केलेले आहेत असेच मी म्हणेन.( साम्यवादी लोकांबद्दल शंकाच आहे. पण ते सोडून द्या)
विचारसरणीबद्दल त्यांचे आपसात विरोध असतील आणि त्याचे ते राजकारण करणारच( तो त्यांचा पूर्णवेळ धंदा आहे)
अशा परिस्थितीत केवळ आपल्याच बाजूने शांततेचे प्रयत्न चालू ठेवणे हे कितपत योग्य आहे.
उगाच शांतता हवी म्हणून बॉलिवूडचे लोक म्हणतात आणि सर्वच्या सर्व सिनेमे राजकारणी लोक कसे हरामखोर आहेत हे सांगत सिनेमे काढतात ते सुद्धा स्वतःचे सिनेमे पाकिस्तानात चालावेत म्हणून. त्यातून निष्पन्न काहीच होत नाही.
जोवर पाकिस्तान दहशतवादाची "निर्यात" थांबवत नाही तोवर स्थायी स्वरूपात काहीच होणार नाही हेही सर्वाना माहित आहे.
बाकी गुरमेहर, कन्हेय्या कुमार सारखी प्यादी येतील आणि जातील.
शब्दांचे बुडबुडे खूप झाले. प्रत्यक्ष काय करावे म्हणजे हा प्रश्न सुटेल हे मात्र कोणीच लिहीत नाही.

माहितगार's picture

2 Mar 2017 - 9:53 pm | माहितगार

डॉक्टर साहेब आदर्शवादाची प्रमाणपत्र स्वस्त झाली आहेत का ? हल्ली फार सहजपणे आणि नाही त्यांना वाटली जाताना दिसताहेत !

माहितगार's picture

2 Mar 2017 - 9:55 pm | माहितगार

आदर्श टोळ्यांनी नाही म्हणावायास आदर्श शब्दाची व्याख्या बदललेली आहे हे ही तेवढेच 'खरे' आहे.

गामा पैलवान's picture

2 Mar 2017 - 8:11 pm | गामा पैलवान

मारवा,

तुमचं पाहिलंच गृहीतक चुकीचं आहे. भारत ही टोळी नाही. पाकिस्तान ही मात्र टोळी आहे. चुकीच्या गृहितकावर आधारलेला प्रश्न चुकीचा ठरतो. चुकीच्या प्रश्नाचं बरोबर उत्तर घेऊन काय फायदा!

आ.न.,
-गा.पै.

भारत खाज म्हणून युद्ध करत नाही. भारताने केलेले प्रत्येक युद्ध त्यावर लादले गेलेले आहे. देशाची फाळणी होऊन दोन देशांच्या सीमा ठरवलेल्या असताना जर पाकडे गोळीबार करत घुसत असतील तर त्यांची खणा नारळाने ओटी भरायची का?

टोळी पोळी करून उगाच बुद्धीभेद कशाला करताय?

डँबिस००७'s picture

2 Mar 2017 - 9:07 pm | डँबिस००७

मारवा साहेब व ईतर,

तुमच्या एक लक्षात येत नाहीय !!

हा व्हिडीयो २०१६ मध्ये एका जाहीरात क्षेत्रात काम करणार्या व स्वतःचा जम बसवु पहाणार्या राम सुब्रमण्यम नावाच्या डायरेक्टरने बनवलेला आहे. त्यात त्या मुलीने (गुरमेहेरने) फक्त काम केलेल आहे, त्या मुलीचा बॅग्राऊंड ही ह्या डायरेक्टरने कथा म्हणुन वापरलेली आहे. त्या मुळे त्या प्लॅकार्डवर काय लिहीलेल आहे हे त्या मुलीने वाचल देखील नसेल कारण मूळात ती फिल्म म्युट आहे. गुरमेहेर सारख्या मॉडेल म्हणुन काम हव असलेल्या मुलीला ईतका विचार नसावा !

त्या नंतर रामजस कॉलेज मधल्या विद्यार्थी परिषद व अभाविपच्या भांडणात परत ह्या गुरमेहेरचा वापर करुन घेतलेला आहे. तीने त्या फिल्म सारखाच हातत प्लॅकार्ड धरुन बनवलेला आहे.

आताच्या गदारोळात धुर्तपणे तोच व्हिडीयो बाहेर येणे, लगेच गुर मेहरला सपोर्ट म्हणुन राम सुब्रम ण्य म चे अव तरणे हे संशयास्पद वाटते. हा व्हीडीयो वायरल सुद्धा कोणीतरी खास उद्देशाने केलेला आहे.

हा राम सुब्रमण्यम हा केजरीवाल बरोबरचाच कार्यकर्ता आहे . त्याचे धेय्य उघड आहे.

थोडक्यात ह्या मुलीचा वापर राम सुब्रमण्यम नावाच्या माणसाने केलेला आहे.

सचिन७३८'s picture

2 Mar 2017 - 9:34 pm | सचिन७३८

कायद्यासमोर सगळे समानही आहे म्हणायचे वर विशिष्ट समूहाबद्दलच टिका करायची. त्यातून इतर समूहाची चिकीत्सा करायची नाही. देशाबद्दल काहीबाही बोलणाऱ्यांचे लंगडे समर्थन करायचे. इतरांनी बोलले की असहिष्णूता आणि ह्यांची आरोळी म्हणजे अभिव्यक्तीस्वातंत्र्य. शिवाय आम्ही म्हणू तेच पुरोगामित्व अशी माळही वारंवार हेच जपणार. कोण पुरोगामी ह्याचे प्रमाणपत्रही हेच देणार. व्वा!

तुम्हाला विरोध करता-करता आम्हीच तुम्ही झालो,
वेष्टन फक्त वेगळे, आतून आरोपांचे खेळ खेळत राहिलो.

अनरँडम's picture

2 Mar 2017 - 11:39 pm | अनरँडम

त्या मुलीला तिचे मत मांडण्याचा अधिकार आहे. सेहवाग लोकांना तिच्या मतास विरोध करण्याचा हक्क आहे. इतरांनाही या दोघांविषयी मत मांडण्याचा अधिकार आहे. थोडक्यात वटवटणार्‍या लोकांना वटवट करण्याचा अधिकार आहे. हे सर्व मान्य करून काही मत मांडण्याचा माझा अधिकार वापरून पुढील मत मांडतो:

गुरमेहर कौर या मुलीने किंवा त्या चित्रफितीच्या कर्त्याधर्त्यांना त्यांचे मत अधिक परिणामकारकपणे मांडता आले असते. त्यांनी ती संधी वाया घालवली. इंग्रजीत लिहीलेला मजकुर, मुलीच्या शर्टावरचे आयफेल टॉवरचे चित्र वगैरेंमुळे चित्रफीत पाहणार्‍या व्यक्तिचा नकारात्मक पूर्वग्रह होणे सोपे झाले. डाव्या लोकांना लोकांपर्यंत पोहचण्यासाठी उच्चभ्रुपणा टाळायला हवा. म्हणून माझे मत काहीसे डाव्या बाजूला झुकलेले असले तरी या मंडळींनी उजव्यांच्या हातात कोलित दिल्यामुळे माझे मत त्या चित्रफितीविषयी नकारात्मक झाले आहे. तिच्या वडिलांनी देशासाठी केलेला त्याग इतक्या उथळपणे वापरल्याने मला वाईट वाटले.

जाता जाता: 'बुबुडाविपुमाधवि' म्हणजे काय हे कोणी स्पष्ट केल्यास बरे होईल. धन्यवाद.

गॅरी ट्रुमन's picture

3 Mar 2017 - 10:45 am | गॅरी ट्रुमन

ऑटो चालकों का ऐलान, 'देशद्रोहियों' को नहीं बैठाएंगे ही बातमी आज नवभारत टाईम्समध्ये आली आहे.

अशी गोष्ट प्रत्यक्षात करणे फारच कठिण आहे कारण कोणी कपाळावर 'देशभक्त' आणि 'देशद्रोही' असे शिक्के मारून वावरत नसतो. त्यामु़ळे रिक्षावाले दिल्ली विद्यापीठातच कोणाला घेऊन जाणार नाहीत असेही म्हटले आहे. त्याचे कारण तिथे मारामारी झाली तर विनाकारण गोत्यात यायला नको हे दिले आहेच पण त्याचबरोबर "'पुलिस को इन देशद्रोहियों को तुरंत गिरफ्तार करना चाहिए ताकि इस तरह की गतिविधियों पर रोक लगायी जा सके।" हे महत्वाचे वाक्यही आहे.

एकूणच या प्रकारावरून अभिव्यक्तीस्वातंत्र्य मोजणे वगैरे प्रकार जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील प्राध्यापक आणि कन्हैय्यासारखे विद्यार्थी (?), मोठे मोठे विचारवंत, परदेशातील पैशावर माजलेले एन.जी.ओ वाले, आपवाले इत्यादी इत्यादी सोडून इतर कोणी करत असेल ही शक्यता कमीच वाटते. सामान्य माणसाला "भारत तेरे तुकडे तुकडे होगे" असे म्हणणे मोठे अभिव्यक्तीस्वातंत्र्याचे नाही तर खाल्ल्या ताटात *गायचे लक्षण वाटत असावे हे म्हणायला नक्कीच जागा आहे. दिल्लीतले रिक्षावाले असे काही म्हणत असतील तर त्यामागचे कारणही तेच असावे असे म्हणायला नक्कीच जागा आहे.

रॉजरमूर's picture

3 Mar 2017 - 11:16 am | रॉजरमूर

अहो गेली ती ..........

जिच्या मुळे ह्या धाग्यावर बाजार भरवला गेला तीच गुरुमेहर गेलीय सोडून डाव अर्ध्यावर टाकून जालंधरला तिच्या घरी .
बहुधा घरच्यांकडून कानपिचक्या मिळालेल्या असतील .
आता इथे भोंगे वाजवून , आदळ आपट करून काय उपयोग ?

आवरा आता धागा.

माझीही शॅम्पेन's picture

3 Mar 2017 - 12:36 pm | माझीही शॅम्पेन

अस कस , मिपा हे समाजमनाचा आरसा आहे .
.
.
इथे प्रत्येक महत्वाच्या गोष्टीचा उहापोह झालाच पाहिजे :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Mar 2017 - 1:29 pm | डॉ सुहास म्हात्रे
शब्दबम्बाळ's picture

3 Mar 2017 - 1:55 pm | शब्दबम्बाळ

एखाद्याचे समर्थन करायचे ठरवले कि त्याच्या बाजूच्या कसल्याही/कुठल्याही (म्हणजे या तद्दन भिकार पातळीच्या या लेखासारख्या) गोष्टी डोळ्यावर पट्टी बांधून सत्यच मानायचे का? त्याला लेख पण म्हणता यायचे नाही, पप्पू वगैरे शब्दप्रयोगावरूनच वैचारिक पातळी दिसून येतेय. खेद याचा वाटतोय कि सिनियर लोक देखील असल्या "काहीही" लिंक शेअर करतात!

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Mar 2017 - 4:31 pm | डॉ सुहास म्हात्रे

दोन्ही बाजू नीट पडताळून मगच निर्णय घ्यावा, असे तुम्हाला वाटत नाही, याचे खरेच दु:ख झाले !

हवे (किंवा नावडते) असलेले शब्दप्रयोग तुम्हाला स्पष्ट दिसले पण एनडिटिव्हीने घेतलेली गुरमेहरची मुलाखत, बरखा दत्त बाईंचे ट्वीट्स, त्यातली व्हिडिओ क्लिपमधल्या शब्दांची बरहुकुम कॉपी आणि दर ट्वीटखाली गुरमेहर, कारगिल हिरोज डॉटर, इत्यादी गोष्टी "गौण" वाटतात याचे आश्चर्य नाही पण दु:ख जरूर वाटले ! :(

असा काहीसा प्रतिसाद अपेक्षित असल्यामुळेच मी त्या दुव्याचे विश्लेषण हेतूपूर्वक केले नव्हते :) असो. खुल्या मनाने, डोळे उघडून, पूर्ण दुवा, परत नीट वाचलात तर अजून बरेच धागेदोरे हाती लागतील.

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Mar 2017 - 4:45 pm | डॉ सुहास म्हात्रे

बरखा दत्त सारख्या जान्यामान्या आणि मोठी साधनसंपत्ती असलेल्या एनडीटीव्हीसारख्या राष्ट्रीय वाहिनीच्या इन्व्हेस्टीगेटीव्ह रिपोर्टरने गुरमेहरचे वडिल कारगिल युद्धात शहीद झाले नव्हते हा मुद्दा नीट न तपासता मुलाखत घ्यावी आणि काररगिलचा उल्लेख असलेल्या ट्वीटसची (एक नव्हे) मालिका, अचूकतेची खात्री करून न घेता प्रसिद्ध करावी (की कारगिलला वलय आहे म्हणून ते मुद्दाम केले गेले ?) आणि तीच "अचूक, भेदक व अर्थपूर्ण" शब्दयोजना व्हिडिओमध्ये केवळ "किड्" असलेल्या (म्हणजे एका अर्थी गंभीर विचार न करू शकणार्‍या, निरागस) गुरमेहरच्या हातातील पाट्यांवर यावी... किती ते आश्चर्यकारक योगायोग...

या सगळ्यात तुम्हाला काहीच आश्चर्य न वाटल्यास, मलाही तुमच्या वरच्या प्रतिसादाचे काहीच आश्चर्य वाटले नाही, असे समजायला अजिबात हरकत नाही. :)

डँबिस००७'s picture

3 Mar 2017 - 3:51 pm | डँबिस००७

म्हात्रे सा,

खरच डोळे उघडणारा लेख !!

अगोदर म्हटंल्या प्रमाणेच ह्या गुरमेहेरचा वापर प्यादी म्हणुन करण्यात आलेला आहे .
बरखा दत्त सारखी सुद्धा त्यात शामिल असेल हे वाटले नव्हते.

परिस्थीती खुप क्लीअर होत चाललेली आहे. डावे व डावी कडे झुकलेले , कललेले लोक आता टोटलच कलंडायला लागलेले आहेत.
युनिवर्सिटीजमध्ये ब्रेन वॉशींगमध्ये डावी कडे झुकलेल्या शिक्षकांचा वापर होत आहे.

१. आभा देब हबिब : ही म्हणते बुरहान वानी हा अतिरेकी नव्हता, स्वातंत्र सैनिक होता.
२. निवेदिता मेनॉन : ही म्हणते, भारताने काश्मिरवर बेकायदेशीर अतिक्रमण केलेल आहे , काश्मिर पाकिस्तानला दिला पाहीजे, तसेच
भारताचा उत्तर पुर्व भाग हा चीनला परत केला पाहीजे,

चिनार,


ज्याने कोणी हे असले पोश्टर लावले असतील त्याच्या पार्श्वभागावर फटके द्यायला हवे. पण ते कोणी ?? तर पोलिसांनी आणि न्यायव्यवस्थेने...अभाविप आणि इतर कोणत्याही संघटनेला तसे करण्याचा अधिकार आहे का?

माझ्या मते प्राचार्यांनी बोलावल्याशिवाय विद्यापीठात प्रवेश करायचा अधिकार पोलिसांना नाही. साहजिकंच न्यायालयही हस्तक्षेप करू शकंत नाही. म्हणून अभाविपसारख्या विद्यार्थी संस्थांनाच प्रत्युत्तर द्यावं लागतं. त्यातून पोलीस पडले भ्रष्ट आणि न्यायव्यवस्था आहे चेंगट. मग कोण करणार न्याय?

आ.न.,
-गा.पै.

सचु कुळकर्णी's picture

4 Mar 2017 - 1:27 am | सचु कुळकर्णी

माझ्या मते प्राचार्यांनी बोलावल्याशिवाय विद्यापीठात प्रवेश करायचा अधिकार पोलिसांना नाही. साहजिकंच न्यायालयही हस्तक्षेप करू शकंत नाही.

आ.न.गा.पै. आपले बरोबर आहे पण प्राचार्य नाहि तर कुलगुरुंची (V.C.) परमिशन लागते, पण एक गोष्ट आपण विसरत आहात कि ह्या देशात पोलिसांना जेव्हा जेव्हा खुलि छुट दिलि जाते त्यांच्या ईतका मोठा गुंड मग कोणिच नसतो चांगल्या चांगल्या ऑरगनाईझ क्राईम च मग ते कंबरड मोडतात इथे तर कोवळे विद्द्यार्थि आहेत हो.
उदाहरणच द्यायच झाल तर आमच्या अकोल्याला पंजाबराव देशमुख कृषि विद्द्यापिठ आहे ह्याचे कँपस नॅशनल हायवे ६ (आता बायपास झालाय) च्या बरोबर दोन्हि बाजुस विखुरलेले आहे महिन्याला एक तरि तिथे अपघात व्हायचा आणि विद्द्यापिठातले विद्यार्थि टोटल हायवे बंद पाडायचे, जाळपोळ करायचे आणि कँपस मध्ये निघुन जायचे, पोलिस मुकदर्शक म्हणुन रहायचि. देवेन भारती S.P. म्हणुन आले आणि एकदा सेम ईसिंडंट झाला जाळपोळिचा त्यावेळेस पोलिसांनि जे झोडपले होते ना विद्दार्थ्याना हॉस्टेल, कँपस मध्ये घुसुन लाठिचार्ज केला होता. मुलांनि भितिने २ र्या ३र्या माळ्यावरुन उड्या मारल्या होत्या. कित्येकांचे हात पाय तुटेस्तोवर मारल होत.

पुंबा's picture

6 Mar 2017 - 11:31 am | पुंबा

गापै, तुम्ही समांतर न्यायव्यवस्थेला पाठींबा देताहात. अश्या स्वयंघोषीत देशभक्तांच्या संघटनेच्या हातात न्याय करण्याचा अधिकार दिला की काय किंमत राहील संविधानाची अन त्याने निर्माण केलेल्या institutions ची? ह्याच लॉजीकने खाप पंचायत आणि जात पंचायत समर्थनीय ठरतील. लोकशाहीत न्याय, स्वातंत्र्य, समता ही सारी मुल्ये संविधानाने निर्माण केलेल्या institutions च्या मार्फतच प्रस्थापित व्हावी अन्यथा अराजक माजते.
अभाविप असो किंवा डाव्यांची विद्यार्थी संघटना. त्यांना कायदा हातात घेण्याचा अधिकार नसला पाहीजे. जी काही आंदोलने करायचीत ती अहिंसक मार्गाने करा नाही तर कारवाईला तयार रहा असा स्पष्ट संदेश सरकारने द्यायला हवा.

विशुमित's picture

6 Mar 2017 - 1:48 pm | विशुमित

जी काही आंदोलने करायचीत ती अहिंसक मार्गाने करा नाही तर कारवाईला तयार रहा असा स्पष्ट संदेश सरकारने द्यायला हवा.

--++111111111

डँबिस००७'s picture

3 Mar 2017 - 7:00 pm | डँबिस००७

https://www.youtube.com/watch?v=WHNlmxBdKQM

बरेच देश द्रोही जे एन यु च्या विद्यार्थ्यांच्या मागे राहुन आपल काम करत आहेत,

१. कविता कृष्णन : ही कम्युनिस्ट पार्टीच्या मासिकाची एडीटर आहे.
२. जॉन दयाल : हा युएस मध्ये जाऊन भारता विरुद्ध गरळ ओकत असतो.
३. निवेदीता मेनॉन : ही म्हणते, सैनिक भारताच्या सिमेवर आपल्या ब्रेड बटर साठी उभे रहातात देशासाठी नाही.

ह्या लोकांना फक्त कायद्याच्या चौकटीत आणुन उअपयोग नाही. त्यांना जनतेने शिक्षा दिली पाहीजे.

ट्रेड मार्क's picture

3 Mar 2017 - 9:06 pm | ट्रेड मार्क

मोदींना फॅसिस्ट, एकाधिकारशहा, हिटलर ईई संबोधणाऱ्यांनी खरी एकाधिकारशाही किंवा त्यांची लाडकी कम्युनिस्ट राजवट अनुभवायला पाहिजे. सरकारी, म्हणजेच हुकूमशहाच्या, धोरणांविरुद्ध एक शब्द काढणारी व्यक्ती एका रात्रीत गायब केली जाते, पुन्हा कधीही न दिसण्यासाठी. अभिव्यक्ती स्वातंत्र्य तर जाऊच द्या, कसलेच स्वातंत्र्य नसते.

मला एका गोष्टीचा उलगडा अजून होत नाहीये की या असल्या देशद्रोह्यांवर सरकार सरळ सरळ कारवाई का करत नाही? या घटनांवर मोदी एक सुध्दा कमेंट करत नाहीत, याचे काय कारण असावे? एवढी मोठी यंत्रणा हाती असताना तसंही एखाद्याला "कामाला" लावायला फारसे प्रयास पडू नयेत.

वरुण मोहिते's picture

3 Mar 2017 - 9:48 pm | वरुण मोहिते

कम्म्युनिस्ट पूर्वी न्हवते का ?? २०१४ नंतर आले का ???मनमोहन सिंगांना ह्यांना फासावर लटकवायला हवं असं कोणी बोलले का ??
असा मारण्याचा आतातायी निर्णय घेऊन नाही जमत कोणाला
म्हणून मोदी गप्प आहेत .५ वर्ष टिकवायची आहेत ना प्रत्येकाला

पिजा's picture

3 Mar 2017 - 11:50 pm | पिजा

वरच दिलेला एक युक्तिवादयुक्तिवाद

सचु कुळकर्णी's picture

4 Mar 2017 - 12:52 am | सचु कुळकर्णी

या घटनांवर मोदी एक सुध्दा कमेंट करत नाहीत, याचे काय कारण असावे? एवढी मोठी यंत्रणा हाती असताना तसंही एखाद्याला "कामाला" लावायला फारसे प्रयास पडू नयेत.

बिरादर यहि तो वो चाहते है.
१) देशाच्या पंतप्रधानाने असल्या गोष्टि नोटिस करुन त्यावर कॉमेंट करणे म्हणजे एकप्रकारे त्यांना महत्व देणे होईल आणि सध्याच्या काळात तरी असलेले पंतप्रधान असल्या खेळांमध्ये ह्यांचे बाप आहेत. २००२ पासुन आरोप होताहेत खरे खोटे देवजाणे पण या देशाच्या सुप्रिम कोर्टाने त्यांना निर्दोष सोडले आहे, असंख्य वेळा डिवचायचे प्रयत्न झाले पण ह्यांनी पब्लिक प्लेस किंवा मिडियासमोर तरी आपला धीर सोडल्याचे माझ्या बघण्यात नाहि. तेव्हा असल्या पोरखेळांना ते महत्व देतिल असे वाटत नाहि.

२) आंदोलन मग ते कसलेहि असो आणि कितिहि उग्र किंवा मोठे असो कुठल्याहि राज्य किंवा केंद्र सरकार साठि ते चिरडणे काहि फार मोठे काम नाहि, आठवा रामदेव बाबांना मुलिचा वेष करुन पलायन करावे लागले होते. असेच एक आंदोलन (गोवारी हत्याकांड) चिरडण्याचा नागपुर मध्ये सुद्धा प्रयत्न तेव्हाच्या राज्यसरकार ने केला होता बहुधा मि अकरावि ला असेन त्यावेळेस पण नक्कि आठवत त्या चेंगराचेंगरित खुप लाहन मुले बायका मरण पावल्या होत्या. पण ह्या दिल्लि युनिवर्सिटि किंवा जे.एन.यु. साठि बळाचा वापर चुकुनहि केंद्र सरकार करणार नाहि कारण एकदम साफ आहे कि सरकार हे ओळखुन आहे कि ह्या सो कॉल्ड कोम्रेड लोकांना हेच हवे आहे कि असे काहि घडावे म्हणजे देशभर राळ उठवता येईल आणि अराजक माजवता येईल. नॉन स्टेट अ‍ॅक्टर किंवा प्रॉक्झि वॉर हे शब्द आपण नेहमि ऐकतो पण ते पाकिस्तान च्या संदर्भात, तुम्हाला नाहि वाटत कि ते सेम सेम टु सेम इथे लागु पडतय.
हम तेरे दर पे सनम रोज आयेंगे......
हम तेरे दर पे सनम रोज आयेंगे......
घंटि बजायंगे और भाग जायेंगे.

मागच्या फेब्रुवारीत थोर क्रांतिकारक कॉम्रेड कन्हैय्या कुमार ह्यांच्यावर एक धागा आला होता मिपावर बहुधा २ धागे आले होते एक रींगमास्टरांचा* होता दुसरा आठवत नाहि कोणि काढला होता ते पण मि तेव्हाच म्हणालो होतो कि ये बहोत बडा गेम है और खेलने वाले भि इसे बडि फुरसत से खेल रहे है. पटावरच्या सोंगट्या बदलत जाणार त्यामागे खेळणारे हात मात्र तेच आहेत आणि राहतिल, होळि पेटलि कि नारळ वहायला युगपुरुष केजरीवाल, रा.रा. राहुलजी गांधि, झालेच तर लेनिन चे भारतिय व्हर्जन :) शिताराम येचुरि हे दरवर्षी येतच राहणार. तिकडे भाजप चे काहि महाराज किंवा साध्वि लोक काहि बाहि बरळत राहतात ह्यामधे होतय काय कि ह्या सगळ्या घटना पोलरायझेशन नामक रीअ‍ॅक्शन मधे कॅटॅलिस्ट चा काम करताहेत.

ट्रेड मार्क's picture

4 Mar 2017 - 2:35 am | ट्रेड मार्क

मोदींनी कन्हैया किंवा बाकी गँगपैकी कोणाचं नाव घेऊन कमेंट करावी असं म्हणणं नाहीये. पण इन जनरल या देशद्रोही मंडळींचं जे चाललंय त्यावर नेहमीच्या इस्टाईलने कोणाचं नाव न घेता कानफटात मारायला पाहिजे असं वाटतं. कदाचित योग्य वेळ आली नसावी.

बळाचा वापर करून चिरडलं तर ती राजकीय चूक ठरेल. पण प्यादी वापरून उपाय करता येईल. कदाचित अभाविपचा वापर म्हणूनच केला असावा. पण कुठे तरी गडबड झाली आणि प्रकरणाला वेगळा रंग चढला असावा. त्यात मेनस्ट्रीम मीडिया पण विरोधात आहे.

बहोत बडा गेम है और खेलने वाले भि इसे बडि फुरसत से खेल रहे है

माझं पण हेच मत आहे. बुद्धिबळाचे पट मांडले आहेत आणि खेळ्या चालू आहेत. आत्तापर्यंतच्या घटनांवरून वाटतं की मोदी आपल्या विरोधकांना मुद्दाम एखादी गोष्ट करायला प्रवृत्त करतात आणि मग अडकवतात. काय होतंय ते बघू पण हा प्रतिसाद वाचा. देशद्रोही विचारांचं लोण जास्त पसरू नये असं वाटतं एवढंच.

सचु कुळकर्णी's picture

4 Mar 2017 - 2:55 am | सचु कुळकर्णी

त्यात मेनस्ट्रीम मीडिया पण विरोधात आहे.

मिडिया ने मिडिया च काम करावच साहेब अगदि कठोर बनुन कराव पण विद्यार्थ्यांना प्याद बनवुन, त्याला एक रेडीमेड स्क्रिप्ट देउन आपल्या लॉबिंग* च्या घाणेरड्या खेळात सामिल करु नये.

आत्तापर्यंतच्या घटनांवरून वाटतं की मोदी आपल्या विरोधकांना मुद्दाम एखादी गोष्ट करायला प्रवृत्त करतात आणि मग अडकवतात.

ह्याबाबतित नशिब पण मस्त साथ देत ह्या माणसाला, विरोधक सुद्धा असे फसतात कि २०१४ ला "एक चायवाला" संबोधल होत आणि आता तर कच्छ च्या गाढवाचिच उपमा दिलिय.

लॉबिंग* :- बरखा दत्त चा मेन ऑक्युपेशन हाच आहे शि इज अ पॉलिटिकल लॉब्यिस्ट. NDTV न्युज अँकरिंग हा तर जोडधंदा आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Mar 2017 - 1:49 pm | डॉ सुहास म्हात्रे

मिडिया ने मिडिया च काम करावच साहेब अगदि कठोर बनुन कराव पण विद्यार्थ्यांना प्याद बनवुन, त्याला एक रेडीमेड स्क्रिप्ट देउन आपल्या लॉबिंग* च्या घाणेरड्या खेळात सामिल करु नये.

दुर्दैवाने, हे शक्य नाही. कारण, आजकालची मिडिया उच्च तत्वांवर चालणारी नाही किंवा केवळ पैशासाठी चालणारीही नाही तर राजकारणी आणि इतर पैसेवाले हितसंबंधी यांनी खरेदी केलेला (त्यांचे मेजर शेअरहोल्डिंग असलेला) आणि त्यांच्या हितसंबंधांचा पाठपुरावा करणारे उद्योगधंदे आहेत. खालील दुवा चाळून पहा म्हणजे ही पाळेमुळे किती खोलवर रुजलेली आहेत आणि एकमेकात किती गुंतलेली आहेत हे पाहून चक्कर येईल...

Who owns your media?

ट्रेड मार्क's picture

4 Mar 2017 - 1:53 am | ट्रेड मार्क

कम्म्युनिस्ट पूर्वी न्हवते का ?

होतेच. चीन, रशिया यासाठी प्रसिद्ध होते. भारतातही प. बंगाल कम्युनिस्ट विचारसरणीसाठी प्रसिद्ध आहे. नक्षलवाद ही पण कम्युनिझमचीच देणगी आहे. प. बंगालमधील कम्युनिस्ट लोकांनी केलेल्या हत्याकांडांविषयी जालावर भरपूर माहिती उपलब्ध आहे. सध्या केरळमध्ये पण हेच चालू आहे.

२०१४ नंतर आले का ??

२०१४ नंतर यांना उघड विरोध होऊ लागला असावा का?

मनमोहन सिंगांना ह्यांना फासावर लटकवायला हवं असं कोणी बोलले का ??

याचा काही संदर्भ लागला नाही.

असा मारण्याचा आतातायी निर्णय घेऊन नाही जमत कोणाला म्हणून मोदी गप्प आहेत.

मारायला कोण सांगतंय? इतर बऱ्याच गोष्टी करता येतात. एखाद्या भानगडीत अडकवता येतं, प्रत्येकाचा कुठला न कुठला वीकपॉइंट असतोच, त्याचा वापर करता येतो. अगदी मारायचंच ठरवलं तरी जाहीरपणे मारायला पाहिजे असं कोणी सांगितलंय? बरेच मार्ग आहेत.

५ वर्ष टिकवायची आहेत ना प्रत्येकाला

मोदींना या टर्ममध्ये तरी कार्यकाळ पूर्ण होईल का नाही ही चिंता नाहीये. असल्या देशद्रोह्यांना वेळीच धडा शिकवला पाहिजे.

वरुण मोहिते's picture

4 Mar 2017 - 1:48 pm | वरुण मोहिते

लेडी श्रीराम च्या मुली किंवा उच्च विचारसरणी टाईप मुले माहित आहेत दिल्ली सर्कल ची . मी आधी पण एका धाग्यात उल्लेख केलाय ह्याचा.
पण त्याच बरोबरीने स्वघोषित राष्ट्रभक्त नको हेच म्हणायचंय .
ह्या लोकांना विचारांनी ठेचा .
हा मुद्दा का उठला कारण सगळ्यांचे वेस्टेड इंटरेस्ट .
कारण राष्ट्रभक्ती काय कम्युनिस्ट काय नुकसान देशाचाच होत .
फार उदाहरण आहेत अशी जगात

ट्रेड मार्क's picture

6 Mar 2017 - 9:15 pm | ट्रेड मार्क

सध्या परिस्थिती अशी दिसतेय की देशाच्या विरोधात कोणी बोलत असेल तर ते त्याचं/ तिचं FoE असतं पण जर कोणी त्या व्यक्तव्याच्या विरोधात बोलायला लागलं की मात्र त्याला स्वघोषित राष्ट्रभक्त म्हणून हिणवलं जातं. इतर कुठल्या देशात अशी देशविरोधी विधानं सार्वजनिक ठिकाणी केली तर ती व्यक्ती अशी उजळ माथ्याने वावरू शकते का?

माझ्या मते इतक्या वर्षांनी केवळ इतरधर्मीय अल्पसंख्यांकांचे लांगुलचालन न करता हिंदूंना सपोर्ट करेल असे सरकार आहे असं लोकांना वाटतंय त्यामुळे राष्ट्रभावना जरा जास्त उचंबळून आलीये. कुठलीही टोकाची भावना (Extremism) ही धोकादायकच असते, पण जो पर्यंत हे केवळ देशविरोधी बोलण्याला व कृतीला विरोध म्हणून आहे तोपर्यंत ठीक आहे. हे स्वघोषित राष्ट्रभक्त किंवा सरकारसुद्धा अशी देशविरोधी वक्तव्य करणाऱ्यांना गोळ्या घालत नाही किंवा फासावर लटकावत नाही. प्रत्येक कुटुंबात एक कांगावखोर मूल असतं, जे जे स्वतः खोड्या काढतं पण इतरांनी नुसतं बघितलं तरी कांगावा करायला लागतं आणि मग तिथे त्यावेळी उपस्थित नसलेल्या पालकांना वाटतं की या मुलाला बाकीचे किती त्रास देतात. तशी ही टोळी कांगावखोर आहे.

बाकी विद्यार्थी संघटनांमधली मारामारी खूप पूर्वीपासून चालू आहे. विद्यार्थी संघटनांचे व राजकीय पक्षांचे लागेबांधे असणे हे पण बरीच वर्षे आहे. पण सध्या मात्र अभाविप भाजपशी संलग्न आहे म्हणून जरा काही झालं की त्यांच्याविरुद्ध रान उठवलं जातं.

प्रसाद_१९८२'s picture

4 Mar 2017 - 2:32 pm | प्रसाद_१९८२

कारण राष्ट्रभक्ती काय कम्युनिस्ट काय नुकसान देशाचाच होत .

<<

खर आहे या अति राष्ट्रभक्ती मुळेच, भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अनेक भारतीयांना स्वत:च्या जीवाची हकनाक आहूती द्यावी लागली, याच अतिराष्ट्रभक्ती मुळे स्वातंत्र्यानंतर झालेल्या भारत-पाकिस्तान फाळणीत अनेक निरपराध लोक मारली गेली आणि याच अतिराष्ट्रभक्ती मुळे पाकिस्तान सारखा कुरापती देशाची निर्मिती झाली आणि त्याचा परिणाम आजही भारतीय जनता भोगत आहे.

गामा पैलवान's picture

4 Mar 2017 - 6:05 pm | गामा पैलवान

लोकहो,

गुरुमेहेरबाईंच्या वक्तव्याप्रमाणे तिच्या पित्यास पाकिस्तानने मारलं नसून युद्धाने मारलं आहे. यावरून एक प्रश्न पडलाय. पाकिस्तानात २००३ पासून दररोज सरासरी १२ लोक हल्ल्यांत मरतात (आकडेवारी : http://www.satp.org/satporgtp/countries/Pakistan/database/casualties.htm). ह्यांना कोण मारतो? पाकिस्तान की युद्ध?

आ.न.,
-गा.पै.

त्यासाठी लोकशाहीत संस्था निर्माण करणे, त्यांना पुरेसे स्वातंत्र्य देऊन सक्षम करणे, कायद्याची अंमलबजावणी निर्भयपणे करण्याची क्षमता त्यांच्यात निर्माण करणे हे काम लोकनियुक्त सरकारल नेहमीच करणे भाग असते. लोक लोभी, संधी मिळाल्यास भ्रष्ट असणारच. नागरी समाज आणि सरकार यांचे कर्तव्य हे असते की ह्या संस्थांना उत्तम चेक्स आणि बॅलन्सेस देणं, व्यवस्थेला बळकटी देणं. भ्रष्टांना भ्रष्टाचार करण्याची संधी मिळू नये अशी व्यवस्था निर्माण करणे हे सतत चालणारे काम आहे आणि ते लोक आणि सरकार यांच्या सतत चालणार्‍या वाद संवादातूनच व्हावे. संविधानाने दिलेल्या व्यवस्थेला न मानण्याचे, संस्थांचा, कायद्याचा अनादर करण्याचे कॉस्टस हे व्यवस्थेतील कमतरतांमुळे येणार्‍या कॉस्टसच्या तुलनेत भयानक असतात. तेव्हा, इथे कायद्याचेच राज्य चालणार, झुंडीचे नाही हे पुनःपुन्हा प्रतिष्ठापीत करणे सरकारचे कर्तव्य आहे.

नी संविधानाचं रक्षण करायचं तेच भ्रष्ट असले तर कोणाकडे दाद मागायची?

आपली न्यायव्यवस्था(विशेषत: उच्च व सर्वोच्च न्यायमंडळे) स्वतंत्र, कमी भ्रष्ट आणि जास्त पारदर्शक आहे. त्यांच्याकडे दाद मागितल्यास न्याय मिळण्याची शक्यता अधिक आहे.
आतापर्यंत संविधानाचे रक्षण ह्यांच्याच highest level of professional excellence मुळे झाले. विशेषतः आणीबाणी व नंतरच्या काळात संविधानावर लोकनियुक्त सरकारने जो घाला घातला त्याचा न्यायमंडळाने प्रतिकार केला त्यामुळेच आपले संविधान अक्षय्य राहिले. अर्थात न्यायव्यवस्था सुद्धा सतत अधिकाधिक पारदर्शक होत राहीलीच पाहिजे.

गामा पैलवान's picture

6 Mar 2017 - 10:47 pm | गामा पैलवान

सौरा,

त्यासाठी लोकशाहीत संस्था निर्माण करणे, त्यांना पुरेसे स्वातंत्र्य देऊन सक्षम करणे, कायद्याची अंमलबजावणी निर्भयपणे करण्याची क्षमता त्यांच्यात निर्माण करणे हे काम लोकनियुक्त सरकारल नेहमीच करणे भाग असते.

ही कामं होईस्तोवर नक्षलवादी देश ताब्यात घेऊन त्याची विल्हेवाट लावतील. भ्रष्ट व्यवस्थेचा गैरफायदा देशद्रोह्यांना घेऊ द्यावा का, असा प्रश्न आहे. देश टिकवण्यासाठी देशतोड्यांना बडवलं तर त्यात चुकीचं ते काय?

आ.न.,
-गा.पै.

काही जणांना त्या विशीष्ट उद्गारांची खिल्ली उडवणे रुचले नाही तरीपण बर्‍याचशा खिल्ली अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या कक्षेत व्यवस्थीत बसतात. त्यांच्या वाक्यासहीत त्या वाक्याची खिल्ली उडवणारी वाक्ये विकिक्वोट या विकिपीडिया बंधू प्रकल्पाच्या कक्षेत येतात इंग्रजी विकिपीडियाने गुरमेहेर कौर यांच्यावरचा लेख वगळला नाही. तेव्हा विकिक्वोट प्रकल्पानेही खिल्ली उडवणार्‍या वाक्यांची यादी करुन दखल घेण्यास हरकत नसावी. खिल्ली उडवणार्‍या वाक्यांची कोण म्हणाले आणि संदर्भ यासहीत यादी मिळाल्यास तसा विकिक्वोटवर लेख बनवताअ येऊ शकेल.

"This comment is not written by me, its written by my key board" हे उद्गार बहुधा कुणातरी मिपाकराचेच होते, कुणाचे होते ? हि कॉमेंटे बहुधा याच धाग्यावर अथवा मिपावर वाचली पण त्या प्रतिसादाला पंख लागले का काय माहित पण गुगलवरुन शोधता दिसत नाही.

PAKISTAN DIDN’T KILL MY DAD “WAR” DID !!

हे वाक्य 'गन्स डोन्ट किल द पिपल, पिपल किल द पिपल' या वाक्याच्या समकक्ष आहे. किंवा ' अपराध वाईट असतात, म्हणून अमुक तमुक ला वाईट अपराधास जबाबदार धरु नका" हे वाक्य अशीच एक फॉलसी दर्शवते. या फॉलसीचे वर्गीकरण नेमके कोणकोणत्या प्रकारात करावे ह्याची स्वतंत्र चर्चा व्हावी म्हणून बद्दल एका चर्चा धाग्यासाठी टंकन केले पण ते मिपा सॉफ्टवेअर ऐनवेळी रागावल्याने जतन झाले नाही. पुन्हा तेवढे सगळे लिहिणे होणार नाही पण जिज्ञासूंनी या विषयावर आपली मते द्यावीत असे वाटते