आर्किटेक्चर आणि मी !

स्वतन्त्र's picture
स्वतन्त्र in काथ्याकूट
28 Feb 2017 - 1:38 am
गाभा: 

थोड माझ्या विषयी सांगतो.
माझे वडील मी दहावीत असतानाच वारले.त्या नंतर अर्थातच घरातला मोठा असल्याने घराची जवाबदारी माझ्यावर पडली.
त्यानंतर बारावी Science मधून केली.आधीपासूनच माझ drawing चांगला असल्यामुळे आणि आर्किटेक्चर ची ओढ असल्यामुळे ठरवलं होता कि architecture करायचे.

पण त्यावेळीस माझ्या आईचा ऍक्सीडेन्ट झाला आणि जवळपास दीड लाख खर्च झाला.त्यावेळीस नुकतीच बारावीची परीक्षा संपली होती आणी ऍडमीशन्स ची गडबड सुरु होती.त्यावेळेस पाच हजाराची रक्कम सुद्धा खूप वाटणारा मी,त्या फीज,डोनेशन्स पाहून चक्रावलो.

त्यावेळी काय झाला होता मला,एकदाचं ठरवलं,इतकी फी भरायची आपली ऐपत नाही.आपण तिकडे ना गेलेलाच बरं.आणि सांगायला पण कोणी नाही.त्यामुळे काय चूक काय बरोबर समजत नव्हते.घरात आई आजारी,बेड वर असताना तिला मी कसा सांगू ,मला काय करायच आहे हे समजतच नव्हत.

मग ठरवलं,आपल्याला लवकरात लवकर स्वतःच्या पायावर उभा राहिल पाहिजे ,science मधून ग्रॅडज्यूएट हाच पर्याय दिसला ,मग तीन वर्षाचे ग्रॅडज्यूएशन (B.Sc ) करता करता छोटी मोठी कामं करून शिक्षण केल.पुढे जे मिळतंय जशी वाट दिसतेय तसं शिकत गेलो.

ग्रॅडज्यूएशन झाल्यावर एका सॉफ्टवेअर कंपनीत डेटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून जॉब मिळाला.तो करता करता आणखी कस शिकता येईल,पप्रोफाइल कसा चांगला करता येईल या हेतूने MCA केल.दिवसा कॉलेज करून Night Shift ला जॉब करू लागलो.MCAसुद्धा फर्स्ट क्लास मध्ये पास झालो.

त्यानंतर MCA च्या बेसिस वर त्याच कंपनीत प्रोमोशन होऊन सॉफ्टवेअर इंजिनियर झालो.
आता मला जवळपास ८-९ वर्षाचा अनुभव असून,सध्या टीम लीडर आहे.

But MCA was not the choice I wanted to be !
ह्या सगळ्या वर्षात मला architecture करायचा राहूनच गेल.पण अजूनही मन स्वस्थ बसू देत नाही.मला अजूनही त्या क्षेत्राची ओढ वाटते.
आत्ताही मी निवांत वेळेस डिजाईन करतो ,फ्लोर प्लॅन्स आखतो.ती ओढ मला स्वस्थ बसू देत नाही,मानसिक रित्या सुद्धा.

मला अजूनही ते शिक्षण (B .Arch ) घ्यायची इच्छा असून मला जे शिकता नाही आल ते शिकायचंच आहे,व पुढे जाऊन स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय करण्याचा मानस आहे.

माझ सध्या वय २९ असून मला हे जॉब बरॊबर कस करता येईल याबाबत जाणकारांनी प्रकाश टाकावा .

प्रतिक्रिया

योगी९००'s picture

28 Feb 2017 - 9:01 am | योगी९००

सर्वप्रथम तुमच्या जिद्दीला सलाम...घरच्या परीस्थितीला जुळवून घेत तुम्ही तुमच्या पायावर उभे राहीलात याचे कौतूक वाटले. (तुमच्या पुढे आमचे कष्ट फारच तोकडे वाटतात).

आक्रिटेक्चर या क्षेत्रासी फारसा संबंध नाही पण एकच सुचवेन की मनातली आस सोडू नका. पार्ट टाईम कोर्स करता येतो का ते पहा. कोठल्यातरी आक्रिटेक्चर फर्म बरोबर विकांताला जॉब करता येतो का ते पहा. यातून पुढचा मार्ग नक्कीच सापडेल. माझ्या माहीतीतल्या लोकांशी बोलून तुम्हाला कळवतो.

स्वतन्त्र's picture

12 Mar 2017 - 1:21 pm | स्वतन्त्र

शतशः आभारी आहे !

लालगरूड's picture

28 Feb 2017 - 9:32 am | लालगरूड

मला mechanical design engineer बनायचे आहे.कोणी आहे का मिपा वर

पिलीयन रायडर's picture

28 Feb 2017 - 11:39 pm | पिलीयन रायडर

मी आहे मी!! ६ वर्ष ह्या प्रकारात मी घातली आहेत. (मला खरंच कल्पना नाही की का मला ही डिग्री घ्यावी वाटली. माझे वडील ह्याच क्षेत्रात आहेत म्हणुन असेल.)
तर मी आहे mechanical design engineer. तुम्हाला नक्की काय हवंय? कारण हे बनायला तुम्हाला इंजिनियरिंगच करावं लागतं. ह्याला काही कोर्सेस नाहीत.

लालगरूड's picture

1 Mar 2017 - 12:39 am | लालगरूड

diploma झाला आहे mechanical.सध्या job करतोय. पण design मधे नाही.CAD courses करणार आहे

पिलीयन रायडर's picture

1 Mar 2017 - 12:53 am | पिलीयन रायडर

ओके. त्यात इंटरेस्ट असेल तर कोर्स करा. पण ते निव्वळ कागदावरचे उचलुन त्याचे ३डी मॉडेल करणे झाले. काम वाईट नाही, पण किती दिवस करणार? खरा डिझाईन इंजिनिअर हा ते स्पेसिफिकेशन्स बनवतो. जो ते फक्त मॉडेल करेल त्याला पुढे करियर मध्ये जास्त स्कोप नाही ना. तेव्हा जमल्यास डिग्री घ्याच.

एकदा ठरवल्यावर आणि प्रयत्न केल्यावर सगळं कांही शक्य आहे.
तंत्रशिक्षणास वयोमर्यादा नाही, हे चांगलं आहे. प्रयत्न सुरू ठेवलेत तर यश नक्की.
दोन महत्वाच्या गोष्टी साम्गितल्या नाहीत. एक आपण विवाहित आहात का? असल्यास पार्टनरचं त्याबाजूने मत आणि सहकार्य आवश्यक आहे. दुसरे- तुम्ही कोणत्या गावात रहाता ते महत्वाचे. वर सांगितल्याप्रमाणे एका विशारदाकडे काम सुरू करू शकता. अर्थिक स्थितीनुसार पांच वर्षे पूर्णवेळ शिकून त्याच वेळी नोकरीही करू शकता. (मी असेच शिकलो म्हणून म्हणत आहे)

दक्षिण भारतातील चारही राज्यांत दूरशिक्षणाद्वारे 'बी आर्च' करता येते. जरा गुगलून पहा.
आणि अगदी सोप्पा मार्ग पाहिजे तर आपले इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ आहेच!

त्यामुळे फॉर्मल डिग्रीचा हट्ट सोडा. पहिल्यांदा एखाद्या आर्किटेक्टकडे पार्ट-टाईम जॉब बघा. तिथं कामं कशी केली जातात ते पाहा. तुम्हाला कंप्युटरची माहिती आहे तर डिजाईन सॉफ्टवेअर वापरुन काम सोपं होईल का पाहा. जिथे प्लान सँक्शन लागतं तिथे आर्किटेक्ट लागतो पण डिजाईन स्टेजला कुणीही काम करु शकतं. मग जमल्यास यथावकाश डिग्री घेता येईल.

आणखी एक शॉर्ट कट आहे. एखाद्या इंटीरीअर डिझाईन ऑफिसमधे पार्ट-टाईम जॉब बघा. त्याला क्वालिफिकेशन लागत नाही पण तिथे क्रिएटिविटीला जोरदार स्कोप आहे. माझा मुलगा आर्टीस्ट आहे पण नुकतंच त्यानं एक संपूर्ण कॅफे (एक्स्टीरीअर प्लस इंटीरीअर डिजाईन केलंय), धमाल माहौल केलायं.

संक्षींशी सहमत, मात्र तुम्ही सॉफ्टवेअर कंपनीत असताना दुसरी पार्ट टाईम पगारी नोकरी करणे शक्य होणार नाही. ऑफर लेटर नीट वाचून बघा. त्यामुळे तो पर्याय काळजीपूर्वक निवडा.

तुम्ही शनिवार रविवार किंवा अगदी दिवसातल्या शिल्लक वेळी फ्री लान्सिंग करू शकता. पुन्हा पैसे कसे घ्यावेत हा प्रश्न येईलच. पण पैशांच्या बदल्यात तुम्ही एखादी सोय / सवलत मागू शकता. उदा. पैसे नकोत पण सकाळी ३ तास काम करेन किंवा फक्त शनिवार / रविवार उपलब्ध असेन. सुरूवातीला तुमच्याकडे स्टँडबाय प्रकारचे किंवा डेडलाईन नसणारे काम येईल. (आता मला आर्किटेक्चर मधले माहिती नाही पण) तुमच्या सवडीच्या वेळात फाऊंडेशन प्रकारचे काम तुम्ही करून देऊ शकता ज्यावर फायनल काम मेन / फुल टाईम आर्किटेक्ट करेल असे काहीतरी.

तुम्हाला त्या इंडस्ट्रीत असा शिरकाव करून घेता येईल. नंतर तुमची आवड आणि किती प्रमाणात पगार मिळेल यानुसार क्षेत्र बदलायचे ते ठरवा. (कांहीही झाले तरी परतीचे दोर कापू नका. स्वच्छंद जगा वगैरे सांगायला ठीक असते - पण त्याने दोन वेळेचा प्रश्न सुटत नाही.)

आणखी एक वेळखाऊ मार्ग म्हणजे आहे त्या कंपनीत कांही आहे का ते शोधा. मात्र त्यामध्ये सध्याचा मॅनेजर, त्याचा मॅनेजर आणि तुमचा क्लायंट अशा अनेक लोकांच्या "कां..??" ला उत्तर द्यावे लागेल.

सुबोध खरे's picture

28 Feb 2017 - 12:33 pm | सुबोध खरे

फॉर्मल डिग्रीचा हट्ट सोडा.
याच्याशी मी अजिबात सहमत नाही. कारण आपल्याला त्या विषयातच करियर करायचे असेल तर औपचारिक पदवीची आवश्यकता कधी तरी पडेल त्या वेळेस आपल्याला पश्चात्ताप होईल. आज केलेले कष्ट उद्या आपल्याला नक्की फायद्यात ठरतील.
माझ्या स्वतःच्या वडिलांना केवळ पदवी नाही म्हणून बढती नाकारली होती त्यामुळे त्या जिद्दीतून ते द्विपदवीधर झाले बी ए, एल एल बी आणि त्यानंतर त्यांनी जमनालाल बजाज सारख्या संस्थेतून व्यवस्थापनाचा पदव्युत्तर डिप्लोमा केला. हे सर्व शिक्षण आम्ही शाळेत असताना त्यांनी केले आहे.
आपणही असेच जिद्दीचे आहेत म्हणून असे सांगावेसे वाटते.
माझ्या माहितीचा एक सर्जनचा सहाय्यक आहे तो केवळ एम बी बी एस आहे म्हणून स्वतंत्र व्यवसाय करू शकत नाही अन्यथा सहाय्यक म्हणून काम करून मिळवलेल्या ज्ञानातुन त्याचे शल्यक्रियेतील कौशल्य इतके आहे कि कित्येक हृदयरोग शल्यक्रियेतील सुपर स्पेशालिस्ट तोंडात बोट घालतील. परंतु केवळ पदवी नाही म्हणून तो आजही शल्यक्रिया विशारदाला सहाय्यक म्हणूनच काम करतो. त्याला ते सर्जन दोन लाख रुपये महिना देत असत( २००९).

संजय क्षीरसागर's picture

28 Feb 2017 - 12:59 pm | संजय क्षीरसागर

आर्किटेक्टला फक्त प्लान टाकायला सही लागते बाकी सर्व डिजाइन्स ज्युनिअर्सच करतात. शिवाय डिग्री नाही म्हणून खंत करत बसण्यापेक्षा हँडस-ऑन कामला सुरुवात करणं लगेच आनंद मिळवून देईल.

मोदक's picture

28 Feb 2017 - 1:17 pm | मोदक

संक्षीसाहेब, विथ ड्यु रिस्पेक्ट, तुम्ही फक्त B.Com च्या डिग्रीवर आत्ता करताय ते काम करत असता तर किती क्लायंट मिळाले असते..? असा विचार करा.

कृपया प्रतिसाद वैयक्तीक घेऊ नये. तुमच्या फील्डचे उदाहरण जास्ती लवकर रिलेट होईल म्हणून हे उदाहरण दिले आहे.

फॉर्मल डिग्री गरजेची आहेच. फॉर्मल डिग्री / सर्टिफिकेशन यांमुळे नवीन क्षेत्रात सुरूवात करणे सोपे जाते कारण डिग्री आहे म्हणजे आवश्यक किमान ज्ञान आहे असा अर्थ घेतला जातो.

चुकीचे असल्यास जरूर प्रतिसादावे.

संजय क्षीरसागर's picture

28 Feb 2017 - 2:50 pm | संजय क्षीरसागर

ज्यात केवळ सहीनं कागदाला ऑथेंसिटी येते. आर्किटेक्टचं तसं नाही त्याचं डिजाइन उत्तम असावं लागतं आणि प्लान पास व्हायला एमाअर्चवाला लागतो. म्हणजे डिजाइन करणारा अन्क्वालिफाइड असेल तरी फरक पडत नाही . आणि त्यांना डिजाइनमधे इंटरेस्ट आहे म्हणून आर्किटेक्चर करायचंय

>>>आर्किटेक्टचं तसं नाही त्याचं डिजाइन उत्तम असावं लागतं आणि प्लान पास व्हायला एमाअर्चवाला लागतो

हे माहिती नव्हते, धन्यवाद.

सुबोध खरे's picture

28 Feb 2017 - 6:56 pm | सुबोध खरे

प्लॅन पास व्हायला "एम आर्च" असायला लागते
इतकी शुद्ध आणि लोणकढी थाप बऱ्याच दिवसात वाचली नव्हती. हसून हसून पुरे वाट .
संक्षी साहेब अजून येऊ द्या.
असा कोणताही कायदा नाही. मुंबईत नाही आणि पुण्यातही नाही. हे दोन्ही महापालिकेतील सक्षम लोकांकडून खात्री करूनच मी लिहीत आहे.
ज्याला आर्किटेक्चर करायचे आहे त्याला अशी चुकीची माहिती बेधडकपणे पुरवण्यात काय हशील आहे?
बाकी मुंबई महापालिकेत आजही काही जुने स्थापत्य अभियंते( सिव्हिल इंजिनियर) आर्किटेक्त्त म्हणून काम करीत आहेत कारण तेंव्हा त्याला असे परवाने दिले गेलेले होते. काही काळानंतर ते थांबवले गेले.

सुबोध खरे's picture

28 Feb 2017 - 7:00 pm | सुबोध खरे

सीए हा एकमेव असा व्यावसाय आहे ज्यात केवळ सहीनं कागदाला ऑथेंसिटी येते.
लाल डबा सांडला आहे.
डॉक्टर किंवा मंत्री किंवा सनदी अधिकारी काय प्राध्यापक यांच्या पण "सहीशिक्क्या"शिवाय कागद ढीम हलत नाही.
(प्राध्यापकाची सही नसेल तर आपला थिसीस विद्यापीठ कचऱ्याच्या टोपलीत टाकते)
उगाच आपलीच लाल कशासाठी?

संजय क्षीरसागर's picture

28 Feb 2017 - 7:40 pm | संजय क्षीरसागर

प्रतिसाद ठोकण्यापूर्वी नीट वाचत चला. त्यानी काय विचारलंय ते पाहा :

तुम्ही फक्त B.Com च्या डिग्रीवर आत्ता करताय ते काम करत असता तर किती क्लायंट मिळाले असते..? असा विचार करा.

त्यानं सीएबद्दल विचारलंय म्हणून लिहीलं. त्यात तुम्हाला काय त्रास झाला समजलं नाही. शिवाय पुढे लेखकाला उमेद मिळावी म्हणून लिहीलंय :

डिजाइन करणारा अन्क्वालिफाइड असेल तरी फरक पडत नाही . आणि त्यांना डिजाइनमधे इंटरेस्ट आहे म्हणून आर्किटेक्चर करायचंय

तुम्ही बहुदा ते वाचलेलंच दिसत नाही.

दुसरी गोष्ट : मी म्हणतोयं बिल्डर्ससाठी जे आर्किटेक्ट काम करतात त्यांची सही कॉप्रोरेशनला प्लान सबमीट करते वेळी लागते. डोळे उघडे ठेवून चालणार्‍याला, प्रत्येक बिल्डींगचं बांधकाम सुरु असतांना आर्किटेक्टचं नांव डिस्प्ले बोर्डवर दिसेल. थोडक्यात, लेखक अनक्वालीफाइड असतांनाही आर्किटेक्टकडे काम करु शकेल, फक्त नांव त्या आर्किटेक्टचं लागेल.

संजय क्षीरसागर's picture

28 Feb 2017 - 7:55 pm | संजय क्षीरसागर

कॉर्पोरेशनला

सुबोध खरे's picture

28 Feb 2017 - 8:04 pm | सुबोध खरे

मला अजूनही ते शिक्षण (B .Arch ) घ्यायची इच्छा असून मला जे शिकता नाही आल ते शिकायचंच आहे,पुढे जाऊन स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय करण्याचा मानस आहे.
हे लेखकाने स्पष्टपणे निसंदिग्ध भाषेत लिहिलेले असताना तुम्हाला पदवीची गरज नाही हे "शहाणपण" त्यांना शिकवण्याची गरज काय होती?
प्रतिसाद "ठोकण्या"अगोदर मुंबई महापालिकेतील उपायुक्तांशी आणि मोठ्या बांधकाम व्यवसायातील संचालकांशी बोलून चर्चा करून माहिती घेतली आहे.
त्यांची सही कॉप्रोरेशनला प्लान सबमीट करते वेळी लागते. हि सही बिना पदवीची कशी मिळणार आहे?
प्लॅन पास व्हायला "एम आर्च" असायला लागते याचा काही पुरावा विदा याबद्दल बोलायचे नाही. ज्याला "बी आर्च" साठी पाच वर्षे काढणे कठीण आहे त्याला "अजून दोन वर्षे" लागतील म्हणून नाउमेद करायचा अधिकार तुम्हाला कुणी दिला?
कोणत्याही विषयावर अधिकारवाणीने बोलण्याअगोदर त्याबद्दल "तज्ज्ञांकडून" माहिती घ्यावी हा शिष्टमान्य संकेत आपल्याला मान्य नाही असे दिसते.

संजय क्षीरसागर's picture

28 Feb 2017 - 8:14 pm | संजय क्षीरसागर

हळूहळू प्रतिसाद नीट वाचायची सवय लागेल आणि त्यामुळे मग अर्थ सुद्धा कळायला मदत होईल.

मी प्रतिसादात लिहीलंय

जिथे प्लान सँक्शन लागतं तिथे आर्किटेक्ट लागतो पण डिजाईन स्टेजला कुणीही काम करु शकतं. मग जमल्यास यथावकाश डिग्री घेता येईल.

शेवटचं वाक्य पुन्हा वाचायचं राहिलेलं दिसतंय . मी डिग्रीसाठी नाऊमेद करत नाही तर आत्ता जी उर्मी आहे ती तगून राहाण्यासाठी काय करता येईल हे सांगतो आहे.

सुबोध खरे's picture

28 Feb 2017 - 8:23 pm | सुबोध खरे

अगोदर तुम्ही मूळ लेख नीट वाचायची सवय लावून घ्या म्हणजे असे गोल प्रतिसाद द्यायची गरज पडणार नाही
आपलं स्वतः च पहिलं वाक्य वाचा त्यामुळे फॉर्मल डिग्रीचा हट्ट सोडा.
स्वयंमपि लिखितम स्वयंमपि न वाचति एवं
अगोदर एक लिहायचं मग दुसरंच लिहायचं. मग थाप मारायची "एम आर्च" लागतो.
एवढे घोळ घालण्यापेक्षा मूळ लेखनच नीट वाचत चला.
उगाच एखाद्या माणसाला नाउमेद करण्यासाठी असे लिखाण केल्यामुळे अशीच भाषा वापरावी लागली त्याबद्दल खेद तर मुळीच नाही

पुन्हा वाचा

मग जमल्यास यथावकाश डिग्री घेता येईल.

यात नाऊमेद करण्याचा प्रश्नच नाही आणि याच काय माझ्या कोणत्याही प्रतिसादात कुणालाही नाऊमेद करण्याचा हेतू नसतो. तुम्हाला कळला नसेल तरी मोदकला अर्थ कळला आहे यावरनं तरी ही गोष्ट लक्षात यायला हरकत नाही. बीआर्च ऐवजी एमार्च लिहीलं ही टेक्निकल मिस्टेक मंजूर आहे पण क्वालिफेकेशन कुठे लागतं हे सांगत होतो त्यामुळे डिग्रीचा हट्ट (सध्या) सोडा इतकाच सांगण्याचा उद्देश होता.

उगाच एखाद्या माणसाला नाउमेद करण्यासाठी असे लिखाण केल्यामुळे अशीच भाषा वापरावी लागली त्याबद्दल खेद तर मुळीच नाही

गैरसमज दूर झाल्यास खेद वाटला नाही तर तुमची मर्जी. मी हेतू स्पष्ट केला आहे तो किमान इथून पुढे लक्षात ठेवला तरी पुरे.

सुबोध खरे's picture

28 Feb 2017 - 11:01 pm | सुबोध खरे

कशाला उगाच या बोटावरची थुंकी त्या बोटावर करताय ?
लेखकाने मला अजूनही ते शिक्षण (B .Arch ) घ्यायची इच्छा असून मला जे शिकता नाही आल ते शिकायचंच आहे,व पुढे जाऊन स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय करण्याचा मानस आहे इतके स्पष्ट लिहिले असताना औपचारिक पदवीची गरज नाही म्हणून अनाहूत सल्ला दिला.
"आवडीचं काम करायला क्वालिफीकेशन लागत नाही""त्यामुळे फॉर्मल डिग्रीचा हट्ट सोडा."हा पहिलाच प्रतिसाद
मग जमल्यास यथावकाश डिग्री घेता येईल. मग हि सारवासारव
त्यानंतर आर्किटेक्टला फक्त प्लान टाकायला सही लागते हा सल्ला
त्यानंतर आपलीच लाल करायला सीए हा एकमेव असा व्यावसाय आहे ज्यात केवळ सहीनं कागदाला ऑथेंसिटी येते हे लिहिले.
सी ए च्या कार्यालयात कारकून आणि आर्टिकल करणारी मुलेच सगळी कामं करत असतात आर्किटेक्टच्या कार्यालयात काय वेगळे असते का? उगाच आम्हीच हुशार कशाला?
यानंतर आर्किटेक्टचं तसं नाही त्याचं डिजाइन उत्तम असावं लागतं आणि प्लान पास व्हायला एमाअर्चवाला लागतो.
आणि वर हि टेक्निकल मिस्टेक आहे हि सारवासारव ती सुद्धा मी स्पष्ट पणे तुम्ही थापा मारता आहात असे लिहिल्यावर. वर मला लिहिता आहात प्रतिसाद "ठोकल्या" बद्दल.
परत मला भाषा सुधारण्याबद्दल लिहीत आहात
हळूहळू प्रतिसाद नीट वाचायची सवय लागेल आणि त्यामुळे मग अर्थ सुद्धा कळायला मदत होईल.
मान्य आहे कि आम्हाला अशी अलंकारिक भाषा समजत नसेल जी नंतर कोलांट्या मारण्या साठी सोयीची आहे.
मी लष्करी पठडीतील माणूस आहे. उगाच अलंकारिक भाषा वापरून लोकांना थुका लावायची सवय नाही आणि चूक झाली तरी आपलीच लाल म्हणण्याची सवय हि नाही. चूक झाली तर चूक झाली म्हणून माफी मागून मोकळे होता येते. उगाच पिसारा घेऊन नाचायला लागले तर पार्श्वभाग उघडा पडतो.
पाहिल्यान्दा लेखकाने काय विचारले आहे ते न पाहता अनाहूत सल्ले देणे. मग आपलीच लाल करणे आणि शेवटी थापा मारल्यावर उघडे पडल्यावर टेक्निकल मिस्टेक म्हणून या बोटावरची थुंकी त्या बोटावर करत आहात. हे पाहून करमणूक मात्र भरपूर झाली .

स्वतन्त्र's picture

12 Mar 2017 - 1:28 pm | स्वतन्त्र

बी आर्च जमलं नाही तर काय करावं ? AMIE ला तेवढा स्कोप आहे का ? ऐकून आहे कि M.Arch full time without attendance सुद्धा करू देतात काही कॉलेज. तसं करता येईल का ?

अस ज्युनिअर्स वर काम सोपवून नाही चालत हो. फक्त सही पुरते पाच वर्शाचे खडतर शिक्षण कोण घेइल?

संजय क्षीरसागर's picture

5 Mar 2017 - 8:59 pm | संजय क्षीरसागर

बेसिक डिझाइन ज्युनिअर्सच करतात .

संजय क्षीरसागर's picture

5 Mar 2017 - 9:06 pm | संजय क्षीरसागर

बी आर्च आणि कॉपोरेशनमधे राजिस्ट्रेशन असल्याशिवाय प्लानवर सही करता येत नाही इतका उघड मुद्दा मी सांगितलायं . तुम्ही अर्थ काढतायं की नुसती सही करण्यासाठी पाच वर्ष शिक्षण घेणं !

तुमच्या धडपडीला शुभेच्छा.

फेदरवेट साहेब's picture

28 Feb 2017 - 1:35 pm | फेदरवेट साहेब

मला फ्रॉम अ स्क्रॅच प्रोग्रामिंग शिकायचे आहे, सी लँग्वेज पासून सुरुवात करावी म्हणतो, कोणी मदत करू शकेल का? मला व्यवसायभिमुख शिकायचे नाहीये सर्टिफिकेशन वगैरे नसले तरी चालेल, फक्त उत्तम प्रोग्रामर व्हायचे आहे, प्रोग्रामिंगमुळे सुस्पष्ट विचार करायला मदत होईल असे वाटते. कानिटकर ह्यांचे लेट अस सी विकत आणले पण प्रामाणिकपणे सांगता मला त्यातला काही सुधरेना.

कोणी मदत करू शकले तर उपकृत होईल हेवेसांन :)

कुंदन's picture

28 Feb 2017 - 1:54 pm | कुंदन

इतरही शिका , फुकटात

https://www.tutorialspoint.com/

फेदरवेट साहेब's picture

28 Feb 2017 - 2:16 pm | फेदरवेट साहेब

आपले खूप खूप आभार साहेब :)

वरुण मोहिते's picture

28 Feb 2017 - 2:58 pm | वरुण मोहिते

नका फॉलो करू. ते सर्टिफिकेशन कोर्स कॉलेज मध्ये असतात त्या साठी आहे .त्यामुळे तुम्हाला नुसतं प्रोग्रामर व्हायचंय तर बरीच पुस्तकं उपलब्ध आहेत .

फेदरवेट साहेब's picture

28 Feb 2017 - 7:00 pm | फेदरवेट साहेब

सुचवा की दोन चार चांगली टायटल्स

सतिश गावडे's picture

28 Feb 2017 - 9:02 pm | सतिश गावडे

सी चा नाद सोडा. "लेट अस सी" सिझन्ड प्रोग्रामरलाही कळणार नाही इतकं किचकट आहे. का प्रसिद्ध झालं कोणास ठाऊक.

तुम्ही पायथॉन शिका. आजची घडीची सर्वात सोपी प्रोग्रामिंग लॅंग्वेज आहे ती. आणि सोपी असूनही प्रचंड ताकदवान.

आणि हो, प्रोग्रामिंगमधील येणारा काळ पायथॉनचा आहे. :)

आदूबाळ's picture

28 Feb 2017 - 9:19 pm | आदूबाळ

मला पायथॉन शिकण्याची इच्छा आहे. ऑनलैन कोर्सेसपैकी कोणते चांगले आहेत?

सतिश गावडे's picture

28 Feb 2017 - 10:53 pm | सतिश गावडे

ऑनलाईन कोर्सेसबद्दल काही कल्पना नाही. मी स्वतः A Beginner's Python Tutorial इथून शिकलो.

एक सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे, बरीचशी पायथॉनची ऑनलाईन टुटोरियल्स व्हर्जन २.क्ष ची आहेत. यातील print "Hello, World!" ही ओळ व्हर्जन ३.क्ष मध्ये
print("Hello, World!") अशी लिहावी लागते. सध्या पायथॉनचे 3.6.0 हे अद्ययावत व्हर्जन आहे.

पायथॉनमध्ये एन्ट्री लेव्हल प्रोग्रामिंग खुपच सोपे आहे. ऑनलाईन टुटोरियल्स वाचूनही सहज जमून जाईल.

आनंदयात्री's picture

28 Feb 2017 - 9:22 pm | आनंदयात्री

सुरुवातीला बिगिनर्सनी पायथॉन शिकावी या सल्ल्याशी सहमत आहे.
नॉन प्रोग्रॅमर्स साठी तोंडओळख आणि अभ्यासासाठी हि पायथॉन डॉट ऑर्गवरची विकी उपयुक्त आहे.
https://www.pythonanywhere.com/ सारखे क्लाउड बेस्ड आयडीई वापरून सराव करणे अत्यंत सोपे आहे.

एकदा सराव झाल्यावर मात्र कॉम्पुटर सायन्स मुळातून शिकावे. यासाठी इंटरनेटवर भरपूर चांगले रिसोर्सेस उपलब्ध आहेत. MIT Open CourseWare हा त्यापैकी अतिशय चांगला रिसोर्स.

स्रुजा's picture

1 Mar 2017 - 12:39 am | स्रुजा

+१०००००००

कोर्सेरा वर चांगले कोर्सेस आहेत. एक पायथॉन फॉर किड्स म्हणुन पण पीडी एफ आहे. हवी असल्यास सांगा , पाठवेन. नाही तर गुगल करा, सहज डालो करता ये ईल.

सतिश गावडे's picture

1 Mar 2017 - 9:33 am | सतिश गावडे

पायथॉन फॉर कीड्स पीडीएफ इथे आहे.

योगी९००'s picture

28 Feb 2017 - 9:25 pm | योगी९००

फेदरवेट साहेब..

मी आयटी क्षेत्रात आहे. प्रोगामर म्हणून सुरुवात केली आणि हळू हळू वरच्या पायर्‍या चढत आहे.

स्पष्ट सांगायचे म्हणजे मला तुमचा प्रश्न नीटसा उमगला नाही. तुम्हाला उत्तम प्रोग्रामर व्हायचे आहे म्हणजे नक्की काय? उत्तम प्रोग्रामर होऊन नक्की कुठल्या प्रकारचे सॉफ्टवेअर तयार करणार आहात? ह्या प्रश्नामागचा उद्देश असा की समजा तुम्ही आत्ता सी शिकला तर त्याचा उपयोग फक्त काही विशिष्ट क्षेत्रात होतो. त्यामुळे घरातल्या घरात तुम्हाला फार लिमिटेड प्रोग्रामिंग करता येईल. प्रोग्रामिंगमुळे सुस्पष्ट विचार करायला मदत होईल असे तुम्ही लिहीले आहे. सी च्या high learning curve मुळे बराचसा वेळ शिकण्यात जाईल आणि डिसकरेज व्हाल.

त्यापेक्षा माझे सजेशन असे असेल की HTML शिका मग हळूहळू javascript शिकून वेब पेज बनवायला लागा. खूप समाधान मिळेल. आणि तुमचे प्रोग्रामिंगचे स्वप्न पण पुर्ण होईल. जर इलेक्ट्रॉनिक्र क्षेत्राशी संबंध नसेल तर सुरूवातीला सी शिकण्याच्या नादाला लागू नका. फार डिसकरेज व्हाल. HTML, Javascript मध्ये फास्ट शिकू शकाल.

सतिश गावडे's picture

28 Feb 2017 - 10:59 pm | सतिश गावडे

HTML शिकायला सोपी आहे. शिवाय आपलं स्वतंचं "वेब पेज" बनवताना समाधान मिळतं. मात्र HTML डीझाईन आहे प्रोग्रामिंग नव्हे. प्रोग्रामिंगसाठी तुम्ही म्ह्टल्याप्रमाणे Javascript वापरावी लागते.

मात्र HTML + Javascript ही जोडीही थोडीशी अवघड आहे शिकायला.

योगी९००'s picture

1 Mar 2017 - 9:58 am | योगी९००

मात्र HTML + Javascript ही जोडीही थोडीशी अवघड आहे शिकायला
हो खरंच..पण सी पेक्षा सोप्प पडेल. बाकी तुम्ही सुचवलेला पायथॉनचा पर्याय पण चांगला आहे.

हतोळकरांचा प्रसाद's picture

6 Mar 2017 - 11:31 pm | हतोळकरांचा प्रसाद

Pluralsight.com हि एक वेबसाईट खूप फायदेशीर ठरेल. अर्थात ही पेड मेंबरशिप आहे (६००० एका वर्षासाठी, २००० रु. ३ महिन्यांसाठी). या संकेतस्थळावर कुठल्याही प्रोग्रामिंग लँग्वेज चे बेसिक ते एडवांस्ड टुटोरिअल विडीओज आहेत. कुठलीही लँग्वेज खूप सोप्या पद्धतीने शिकता येईल.

आर्कीटेक्चर हे शिक्षण कला आणि तंत्र ह्यावर जास्त अवलंबून असते. हौशेने चित्र काढणारे खूप जण असतात. चित्रकला महाविद्यालयात ५ - ५ वर्षे शिकवतात ते काय शिकवणार असेच वाटते. पण अनुभवाने सांगतो ती ५ वर्षे कमी पडतात. चार नॉर्मल लोकात चांगला चित्रे काढणारा असणे अन आपल्यासारख्या सगळ्या चित्रं जमणार्‍यातच राहून शिकणे ह्यातला फरक तेथे कळतो. आपल्या कलेचा कस लागतो. आर्कीटेक्चरचे तसेच आहे (जेजे चे आर्कीटेक्चर आणि आर्ट हे म्हणून संलग्न आहे.)
तुम्ही एमसीए केले आहे, सॉफ्टवेअरचे अन अ‍ॅप्लिकेशनचे ज्ञान आहे. त्याचा तुम्हाला फायदा होईल. चारपाच वर्षे आर्थिक स्थितीला हँडल करु शकत असाल तर अवश्य शिका.
ह्यातले कॉन्स असेकी, लग्न, करीअर, स्थिरता हे सारे तुमच्या सध्याच्या वयातच गाठून येते. ह्या वेळेत असा धाडसी निर्णय घेणे म्हणजे ह्याचा परिणाम ज्या कुणा आप्तेष्ट, कुटुंबिय ह्यांच्यावर होईल त्यांना कल्पना देऊन, डिस्कस करुन ठरवणे.
एक सुवर्ण मध्य म्हणजे थ्रीडी (मॅक, माया) प्रायव्हेट इन्स्टिट्युट्मध्ये शिकून थ्रीडी रेंडरिंग, वॉकथ्रु, प्लान्स अशी फ्रीलान्स कामे करणे. एखाद्या आर्कीटेक्टबरोबर अ‍ॅटॅच्मेंट घेऊन कामे मिळू शकतात. पैसाही मजबूत मिळतो. आपला स्वतःची नोकरी सांभाळून फावल्या वेळात करण्यासरखा हा व्यवसाय आहे.

संजय क्षीरसागर's picture

28 Feb 2017 - 2:03 pm | संजय क्षीरसागर

एक सुवर्ण मध्य म्हणजे थ्रीडी (मॅक, माया) प्रायव्हेट इन्स्टिट्युट्मध्ये शिकून थ्रीडी रेंडरिंग, वॉकथ्रु, प्लान्स अशी फ्रीलान्स कामे करणे. एखाद्या आर्कीटेक्टबरोबर अ‍ॅटॅच्मेंट घेऊन कामे मिळू शकतात. पैसाही मजबूत मिळतो. आपला स्वतःची नोकरी सांभाळून फावल्या वेळात करण्यासरखा हा व्यवसाय आहे.

यानं लगेच सुरुवात होईल.

संदीप डांगे's picture

28 Feb 2017 - 7:36 pm | संदीप डांगे

अभ्याशी सहमतच!

स्वतंत्र व्यवसाय करायचा किंवा नावापुढे आर्किटेक्ट अशी उपाधी हवी असेल तर रितसर पदवीशिवाय गत्यंतर नाही. खेडूत सरांचे मार्गदर्शन उपयुक्त आहे.

आर्किटेक्टची चार-पाच वर्षे आणि तिथून पुढे तीन वर्षे अशी आठ वर्षे इन्कमची दुसरी सोय असावी लागेल. आता तुम्ही २९ म्हणजे अजून ३६ व्या वर्षापर्यंत व्यावसायिक वास्तुकार होऊ शकाल. हेच ध्येय असेल तर तेच करा.. काही व्यवसाय असे आहेत जिथे डिग्री असल्याशिवाय मजा नाही, आर्किटेक्चर त्यापैकी एक.

हिम्मते मर्दा तो मदत दे खुदा! आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा तुमच्यासोबत आहेतच.

जयंत कुलकर्णी's picture

28 Feb 2017 - 7:20 pm | जयंत कुलकर्णी

ए. एम आय ई सारखे आर्किटेक्टची पण मला वाटते परिक्षा/मेंबरशिप असते. आताही असेल. ती सरकारमान्य आहे. कृपया चौकशी करावी. मला वाटते ती परिक्षा आपल्या सारख्या लोकांसाठीच आहे...

चौकटराजा's picture

28 Feb 2017 - 7:21 pm | चौकटराजा

मी पहिली ते ११ वी शाळेतील सर्वात हुशार विद्यार्थी होतो. पण अचानक ११ वी च्या परीक्षेत गणिताचा पेपर अवघड गेला व एकदम सरासरी ७८ वरून ६८ वर आली. ( त्याकाळी ८२ टक्के वाला मुलगा पहिल्या पन्न्नसात येत असे. सबब ७८ टक्के हा स्कोर हुशार विद्यार्थ्याचाच. मी काहीतरी वेगळे करायचे म्हणून व थोडीफार चित्रकला बरी म्हणून पुण्याला अभिनव मधे नाव घातले. त्यावेळी महिन्याची फी कॉलेजची रूपये ५० व रहाण्याजेवण्याचा महिन्याचा खर्च ५० होता. २५ पैशाला अप्सरा पेन्सील
मिळत असे इम्पिरियल पेपर ५० पैसे.

शिकवायला काही हुशार शिक्षक होते पण त्यांची खाजगी प्रॅक्टीस फार चाललेली आहे असे चित्र नव्हते. ( डफ्फड वकील न्यायाधीश होतो असे म्हणतात ). इथे हुशारांना धन्दा मिळत नसे. त्यावेळी ५ वर्ष सलग पास होणे हे दुरापास्त होते. एकूण ३७ विषय ५ वर्षात शिकावे लागत. त्यामाने बी ई सिव्हील हा कोर्स फारच साधा असे. जवळ जवळ आठवड्याला दोन ते तीन या दराने सबमिशन करावी लागत. मी तो कोर्स दोन वर्षानंतर सोडून दिला. कारण २ र्‍या वर्षाला मी एकाच विषयात ५ मार्काने नापास झालो( अप्लाईड मेकॅनिक्स) .त्या अभ्यासक्रमात ५० टक्के ला पासिंग होते. व सर्व विषयात कमीत्यकमी ५० टक्के तरच वर्ष सुटणार असा कडक नियम. नो ए टी के टी.. ७५ टक्के उपस्थिती नसेल तर परीक्षेतला परवानगीच नाही. व कोणत्याही तासाला रॅन्डम रोलकॉल असायचा. एक तास अबसेण्ट म्हणजे एक दिवस अबसेंट.

आता मी ज्या स्थितीला आहे त्यापेक्षा माझे त्या कॉलेजमधील वर्ग मित्र यांनी फार मोठे मैदान आयुष्यात मारले आहे असे नाही. या क्षेत्रात डिझाईनचे बक्शिस ब्राह्मण अर्किटक्टला पण कामाचे टेडर मराठा आर्किटेक्टला याचा अनुभव अनेक वेळा घेऊन माझ्या एका मित्राने प्राध्यापकी स्वीकारली. मोठमोठ्या गाजलेल्या डोक्टरला मोठा व्यवसाय पुढे अपोपाप मिळत जातो तसे इथेही आहे. माझ्या त्याच मित्राला मोठी कामे मिळण्यासाठी जवळ जवळ १९८० ते २००८ इतका काळ वाट पहावी लागली. एकाच आयुष्यात जी डी आर्क, एम ई. व एल एल बी अशा तीन क्षेत्रातील पदव्या असलेल्या या मित्राची आता कोठे कीर्ती होऊ लागली आहे. आता बरेच आर्किटक्ट इन्टेरिअर डेकोरेटर होऊन होतात. यात पैसा मिळतो. पण पाच वर्षे जर घासायची तर ती इन्टेरिअर साठी का.... ? असा प्रश्न आहे. आजची काही डिझाईन पाहिली की याना कुणी पास केले असा प्रशन पडतो. अर्थात बिल्डर च्या लेखी वास्तुविदाची किंमत शून्य असते. केवळ सहीचा धनी.

संदीप डांगे's picture

28 Feb 2017 - 7:40 pm | संदीप डांगे

+१००००

संजय क्षीरसागर's picture

28 Feb 2017 - 7:44 pm | संजय क्षीरसागर

अर्थात बिल्डर च्या लेखी वास्तुविदाची किंमत शून्य असते. केवळ सहीचा धनी.

चौकटराजा's picture

28 Feb 2017 - 7:50 pm | चौकटराजा

अगदी अपवाद असे असतात की एखादे प्रोजेक्ट फार प्रतिष्ठेचे , पैशाची काळजी करू नका असे असेल तर मग वास्तुविदाला असे काम मिळाल्याने सर्जनाचा आनंद मिळतो. असे एक जरी काम आख्या आयुष्यात मिळाले तर त्याला धन्योहं असे वाटते. अशी ज्याना संधि मिळाली त्याना आपला मुजरा ! अच्युत कानविंदे हे असेच एक नाव !

सुबोध खरे's picture

28 Feb 2017 - 11:12 pm | सुबोध खरे

बिल्डरच्या लेखी स्थापत्य अभियंत्याचीच(BE CIVIL) काय स्ट्रक्चरल इंजिनियर(M TECH STRUCTURE) ची पण किंमत सुद्धा शून्य असते अन्यथा एवढ्या इमारती आणि पूल पडले नसते.
आपले म्हणणे खरे करण्यासाठी दुसऱ्याची री ओढणे ओडून द्या

सुबोध खरे's picture

28 Feb 2017 - 11:14 pm | सुबोध खरे

हा संक्षी साठी प्रतिसाद आहे

सुबोध खरे's picture

28 Feb 2017 - 11:23 pm | सुबोध खरे

थ्री इडियट्स सिनेमात मूळ रणछोडदास चांचडचा बाप म्हणतो कि समोर सगळे सलाम करतात पण पाठीमागे अंगुठा छाप म्हणतात. ते दुःख काय असते ते त्या माणसालाच समजेल.
एक वर्ष मेडिकल चा प्रवेश हुकला तेंव्हा काय वाटते ते मी प्रत्यक्ष अनुभवले आहे. डॉक्टर व्हायचे असेल तर डॉक्टरची पदवीच पाहिजे. बाकी कामातील अनुभव इ आपल्या जागी आहेत त्याचे महत्त्व कमी होत नाही तरीही .
सी ए च्या कार्यालयात काम करणारी पण सी ए न झालेली (आर्टिकल करून परीक्षेच्या वाऱ्या करणारी) मुले पहा. ३०००-४००० रुपये महिना वर्षानुवर्षे राबवून घेतली जातात. शेवटी काय होते. पदवी हातात पडली तर ठीक अन्यथा वेठबिगारी आहेच

योगी९००'s picture

1 Mar 2017 - 10:00 am | योगी९००

सहमत..
+१००

फेदरवेट साहेब's picture

1 Mar 2017 - 7:57 am | फेदरवेट साहेब

सौजन्यपूर्ण भाषेत वार्तालाप करणे नसते का? असा सहज एक प्रश्न पडला, का संक्षीचे नावही कानफाट्या पडलंय ?

(गोंधळलेला) फेदूदा

लष्करी पठडीत सुरुवातीची भाषा नेहेमी आणि सौजन्यपूर्णच असते. प्रतिसाद पहिल्यापासून नीट वाचा.
पण थापा मारणे, या बोटावरची थुंकी त्या बोटावर करणे, लोकांची दिशाभूल करणे अशा वागण्याला ज् रा कडक भाषाच वापरावी लागते.

संजय क्षीरसागर's picture

1 Mar 2017 - 8:02 pm | संजय क्षीरसागर

इतकंच नशीब समजा . एकदा तो सुरू झाला की इतक्या फालतू प्रतिसादांचा यथोचित समचार घ्यायला फारसा वेळ लागणार नाही.

सुबोध खरे's picture

1 Mar 2017 - 10:03 pm | सुबोध खरे

ब्वॉर्र

प्रथम डिजाइन काय चिज़ आहे ते पाहू

सी ए च्या कार्यालयात कारकून आणि आर्टिकल करणारी मुलेच सगळी कामं करत असतात आर्किटेक्टच्या कार्यालयात काय वेगळे असते का? उगाच आम्हीच हुशार कशाला?यानंतर आर्किटेक्टचं तसं नाही त्याचं डिजाइन उत्तम असावं लागतं

हरेक आर्किटेक्ट शिकवल्या बरहुकूम तंतोतंत काम करेल पण प्रत्येक आर्किटेक्ट हा उत्तम डिजायनर असेलच असं नाही. इतका बारकावा आपल्याला झेपेल का ? तरीही प्रयत्न करतो.

आर्किटेक्टचं काम हा त्याचा वैयक्तिक लँडमार्क असतो. म्हणजे एखादी इमारत हाफ़िज काँट्रॅक्टरनी डिझाइन केली तर ती इतरांपेक्षा वेगळी असते म्हणून त्याचं नांव आहे. त्या अर्थानं आर्किटेक्चरमधे `डिझाईन' महत्त्वाचंय. या उलट कोणत्याही सीएनं सही केली तरी फायनल अकाऊंटस `एकसारखेच दिसतात'. तस्मात, आर्किटेक्चरला `डिजाइन' महत्त्वाचंय. इतक्या वास्तू घडतात पण त्यात एखादाच ताजमहाल निर्माण होतो. त्याला डिजाइन म्हणतात.

सीए आणि आर्किटेक्चर या व्यावसायात हा फरक आहे. म्हणून सीएच्या `सहीला' महत्त्व आहे आणि वास्तुविशारदाच्या `डिजाइनला' महत्त्व आहे. अर्थात सीएच्या सहीला महत्त्व आहे यात कुणाचा न्यूनगंड उफाळून येण्याचं काहीच कारण नाही.

पाहिल्यान्दा लेखकाने काय विचारले आहे ते न पाहता अनाहूत सल्ले देणे. मग आपलीच लाल करणे आणि शेवटी थापा मारल्यावर उघडे पडल्यावर टेक्निकल मिस्टेक म्हणून या बोटावरची थुंकी त्या बोटावर करत आहात.

बिल्डरच्या लेखी स्थापत्य अभियंत्याचीच(BE CIVIL) काय स्ट्रक्चरल इंजिनियर(M TECH STRUCTURE) ची पण किंमत सुद्धा शून्य असते अन्यथा एवढ्या इमारती आणि पूल पडले नसते.

कॉर्पोरेशनमधे प्लान सबमीट करायला आर्किटेक्टची फॉर्मल डिग्री लागते ती बीआर्च ऐवजी एमार्च लिहीली गेली ही टेक्निकल मिस्टेक आहे. इतकी साधी गोष्ट आपल्याला कळत नसेल असं नाही. तरीही यावरनं मी लेखकाला नाऊमेद करतो हा निष्कर्ष कसा निघतो ? याचं एकदा शांतचित्तानं आत्मपरिक्षण केल्यास गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे.

चौरा म्हणतायंत की बिल्डरच्या लेखी आर्किटेक्टच्या डिझाइनला किंमत नसते (त्याला फक्त कमाल एफएसाय मिळवून देणारा आणि महापालिकेत काँटॅक्टस असलेला आर्किटेक्ट लागतो) त्यामुळे एखादाच अच्युत कानविंदे आपल्या मनाजोगं आणि स्वतःच्या शर्तींवर काम करु शकतो. अर्थात अच्युत कानविंदे किंवा हाफ़िज काँट्रॅक्टर वगैरे समजण्या इतका व्यासंग नसावा त्यामुळे तो प्रतिसादच समजला नाही आणि परिणामी ` स्ट्रक्चरल इंजीनीयरची इमारत आणि पूल पडणे' इतका विसंगत प्रतिसाद दिला आहे.

बाकी प्रतिसादात किरकोळ गोष्टी आहेत पण तरी ही क्लिअर करतो.

मग जमल्यास यथावकाश डिग्री घेता येईल. मग हि सारवासारव ?त्यानंतर आर्किटेक्टला फक्त प्लान टाकायला सही लागते हा सल्ला

सद्य काळात प्रॅक्टीसींग आर्किटेक्टची सही लागणारं ते सर्वात महत्त्वाचं काम आहे.

त्यानंतर आपलीच लाल करायला सीए हा एकमेव असा व्यावसाय आहे ....

भाषेतून न्यूनगंडाची पुरेपूर प्रचिती येते. आधीच्या प्रतिसादात लिहील्याप्रमाणे सही कुठे लागते (म्हणजे फॉर्मल डिग्री कुठे लागते याविषयी तो प्रतिसाद आहे.) पण पूर्वग्रहच दूषित त्यामुळे गैरसमज तसाच राहाणार त्याला इलाज नाही.

उगाच पिसारा घेऊन नाचायला लागले तर पार्श्वभाग उघडा पडतो.

आता स्वतःचा कितपत झाकायला जमतोयं ते पाहा !

फेदरवेट साहेब's picture

3 Mar 2017 - 8:03 am | फेदरवेट साहेब

सो मच फॉर बीइंग स्नॉब विथ संक्षी, तुम्हाला एक नंबर मंदी ब्रिटिश सिटीझनशिप भेटणार दिकरा!! इफ यु कम अक्रोस अ स्नॉब रुईन हिम लाईक एनिथिंग

सुबोध खरे's picture

3 Mar 2017 - 9:51 am | सुबोध खरे

परत सारवासारवच.

पिलीयन रायडर's picture

3 Mar 2017 - 7:46 pm | पिलीयन रायडर

अर्थानं आर्किटेक्चरमधे `डिझाईन' महत्त्वाचंय. या उलट कोणत्याही सीएनं सही केली तरी फायनल अकाऊंटस `एकसारखेच दिसतात'. तस्मात, आर्किटेक्चरला `डिजाइन' महत्त्वाचंय. इतक्या वास्तू घडतात पण त्यात एखादाच ताजमहाल निर्माण होतो. त्याला डिजाइन म्हणतात.

माझी ह्याला किंचित असहमती आहे. तुम्हाला बहुदा जे समोर दिसतंय त्याला डीझाईन म्हणायचं आहे. एखाद्या गोष्टीला किती सुंदर आणि कलात्मकतेने बनवले आहे किंवा व्हिज्युअली ती कशी दिसतेय.. ह्याला तुम्ही डिझाईन म्हणत आहात. आणि हाफिज कॉन्ट्रॅक्टरचा उल्लेख करताय म्हणजे "हटके कल्पना" असल्याने तो वेगळाय असं तुम्हाला वाटत असावं. तर डिझाईन फक्त तेवढंच नसतं.

मी मेकॅनिकलची आहे, पण आर्किटेक्चर साधारण त्याच तत्वावर आधारित आहे. उत्तम डिझाईन करायला तुम्हाला त्यामागचे विज्ञान समजुन घेणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक्ष अनुभव महत्वाचा आहे, वादच नाही. पण शिक्षण तेवढेच महत्वाचे आहे.

हे म्हणजे थोडं असं झालं की गॅरेजमधल्या मेकॅनिकला माझ्याहुन जास्तच माहिती असेल इंजिनची. पण म्हणुन इंजिन डिझाइन करणे त्याला जमेलच असं नाहीये. त्यामागे करोडो गोष्टी असतात. आणि शिकाव्याच लागतात.

लेखकाने नीट विचार करुन निर्णय घ्यावा कारण त्यांचे वय २९ आहे. ह्या वयात नोकरी सोडून फुल्ल टाईम शिकणे अवघडच आहे थोडे. आवड म्हणुन संक्षींचा सल्ला प्रॅक्टिकल वाटतो. पण शिक्षण अत्यंत महत्वाचे आहे.

चष्मेबद्दूर's picture

2 Mar 2017 - 12:19 pm | चष्मेबद्दूर

सर्व प्रथम तुमच्या जिद्दी ला अनेक सलाम आणि पुढील वाटचाली साठी शुभेच्छा.
या धाग्यावरची चर्चा वाचली. काही अनुभवाचे ..बोल सांगावेसे वाटले. मी गेले १५ वर्षे पुणे इथे अंतर्गत रचना कार ...सजावट कार नव्हे..म्हणून काम करत आहे. माझा एक खांबी तंबू आहे. वास्तू विषारदाचं आणि माझं काम यात खूप फरक आहे. मला एखाद्या घराचा किंवा कार्यालयाचा इंच इंच लक्षात घ्यायला लागतो. वा.वि. मोठ्या स्केल वर काम करतात. पण दोघे ही क्लायंट ची गरज, पैसे आणि raw मटेरियल ची उपलब्ध ता यांचा मेळ बसवत आपली रचना सुंदर आणि सर्वांत वेगळी कशी असेल याचा प्रयत्न करत असतात. हे काम शिक्षण (formal education) घेतल्या शिवाय शक्य नाही.
चांगली रचना/डिझाईन हे फक्त अनुभव किंवा आवडीतून तयार होत नाही.
तुम्हाला वा.वि. चे formal education घेणं शक्य असेल तर नक्कीच घ्या.
शुभेच्छा.

तुमची 'आर्किटेक्चर' हि खरेच पॅशन असेल, आणि पुढे जाऊन तुम्हाला जर याच क्षेत्रात करिअर करायचे असेल, तर तुम्हाला 'डिग्री'ला ऍडमिशन घ्यावेच लागेल. B Arch हि पूर्णवेळ 'पदवी' असून, त्यासाठी तुम्हाला 'प्रवेश' परीक्षेपासून सुरुवात करावी लागेल... तुमचे सध्याचे काम सांभाळत हि पदवी मिळवण्यासाठी तुमच्याकडे पुढील पर्याय आहेत... १. काही मुक्त विद्यापीठे पण हा कोर्स देऊ करतात असे मी ऐकले आहे, तुम्ही त्याची चौकशी करू शकता. २. अशा कॉलेज मध्ये प्रवेश घ्या कि जिथे तुम्हाला पूर्ण वेळ कॉलेज करावे लागणार नाही. शुभेच्छा!!!

गामा पैलवान's picture

2 Mar 2017 - 5:30 pm | गामा पैलवान

स्वतन्त्र,

चर्चा वाचल्या. माझं मत देतो. मी वास्तुविशारदशास्त्राशी (=आर्किटेक्चरशी) आजीबात संबंधित नाही.

तुम्हाला हे शास्त्र स्वान्तसुखाय शिकायचं असेल तर खुशाल संजय क्षीरसागर म्हणतात ते अंमलात आणा. ते जगातल्या बहुतेक गोष्टींचा स्वान्तसुखाय पद्धतीने अर्थ लावू पाहतात. वर प्रसाद_कुलकर्णी यांनी बी.आर्च. या पदवीची महती विशद केली आहे. अशा वेळेस संजय क्षीरसागर म्हणतील की पदवीच्या मागे लागू नका. सरळ पुस्तकं वाचून, सहअध्यायींचा व्हॉट्सप गट स्थापून त्यात चर्चा करून, विशारदाकडे काम करून त्यातून शिका. आणि हे शिकंत असतांना प्रक्रियेचा आनंद घ्या. पुढे प्रक्रियेत निपुणता आली की तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे काम हाती घेऊ शकाल. या आगमात (=अप्रोचमध्ये) चुकीचं काही नाही. पण तो बहुतांश लोकांच्या पचनी पडंत नाही. कारण की या सर्व घडामोडींत संजय क्षीरसागर केवळ स्वत:लाच जबाबदार आहेत.

याउलट तुम्हाला जर करियर करायचं असेल तर तुम्ही इतरांना जबाबदार असाल. निदान सुरुवातीला तरी. अशा वेळेस पाठीवर पदवीचा छाप असलेला बरा पडावा. स्वयंपाकाची आवड असलेला उत्तम आचारी असेलंच असं नाही. मोजक्या आप्तेष्टांसाठी जेवण बनवणे आणि त्रयस्थ शंभर लोकांसाठी जेवण बनवणे या दोन सर्वस्वी विभिन्न प्रक्रिया आहेत. तसेच उपाहारगृह (=हॉटेल) चालवणे हे या दोहोंहून पार वेगळं आहे. असाच प्रकार वास्तुविशारदशास्त्रांतही होत असावा. तुमची वास्तूसंकल्पनाची (=बिल्डींग डिझाईनची) ओढ निवांत वेळेतली आहे (असं तुम्ही लिहिलंय). भविष्यात तुम्हाला यांतून धंदा चालवायचा आहे. कुठला धंदा ते लेखातून स्पष्ट होत नाही. अशा वेळेस गणितं साफ म्हणजे साफंच बदलू शकतात. आपल्याला या क्षेत्रातलं नक्की काय आवडतं ते चाचपून पाहण्यासाठी माझ्या मते पदवीचा उपयोग व्हावा.

आ.न.,
-गा.पै.

पिलीयन रायडर's picture

2 Mar 2017 - 7:49 pm | पिलीयन रायडर

अत्यंत उत्तम प्रतिसाद! हेच म्हणणे आहे.

संजय क्षीरसागर's picture

2 Mar 2017 - 11:07 pm | संजय क्षीरसागर

तुम्ही समजू शकाल म्हणून प्रतिसाद देतो. मी लगेच कामाला सुरुवात करा म्हणतोयं डिग्री नाही म्हणून खंत करु नका, ती यथावकाश घेता येईल. कारण एकदा कामला सुरुवात केल्यावरच त्यातले बारकावे कळतात.

कारण की या सर्व घडामोडींत संजय क्षीरसागर केवळ स्वत:लाच जबाबदार आहेत.

मी स्वतः व्यावसायिक आहे हो ! आणि प्रत्येक व्यावसायिक हा क्लायंटलाच जवाबदार असतो. स्वच्छंदानं केलेलं काम सुद्धा चोख आणि वेळेवरच होतं आणि करायला पाहिजे.

मोजक्या आप्तेष्टांसाठी जेवण बनवणे आणि त्रयस्थ शंभर लोकांसाठी जेवण बनवणे या दोन सर्वस्वी विभिन्न प्रक्रिया आहेत. उपाहारगृह (=हॉटेल) चालवणे हे या दोहोंहून पार वेगळं आहे.

बरोबर पण त्यासाठी हाताला चव पाहिजेच, मग तुम्ही आप्तेष्ठांसाठी जेवण बनवा की लग्नसमारंभासाठी की हॉटेल चालवा. तद्वत आर्किटेक्चरला निर्मितीच्या आनंदासाठी डिजाइनचं अंग हवं. त्यात बिल्डरशी किती आणि स्ट्रक्चरल डिजायनरशी किती तडजोड करायची याचा सही अंदाज हवा. तो हँडस ऑन काम केल्याशिवाय शक्य नाही. माझा मित्र पुण्यातला प्रख्यात आर्किटेक्ट आहे. त्याच्या आग्रहाखातर मी स्वतः त्याच्याबरोबर तीन दिवस रात्रंदिवस राहून तो व्यावसाय जवळून बघितला आहे.

आपल्याला या क्षेत्रातलं नक्की काय आवडतं ते चाचपून पाहण्यासाठी माझ्या मते पदवीचा उपयोग व्हावा.

माझ्या मते आधी त्या क्षेत्रात नक्की काय चालतं हे पाहून (अ‍ॅक्च्युअल काम करुन) नंतर डिग्री घेणं श्रेयस.

जे तीन दिवस त्या आर्किटेक्ट मित्राबरोबर होतो त्यात त्याच्या ऑफिसच्या स्टाफ मिटींग्ज, त्याच्या असिस्टंट आर्किटेक्टसनी केलेली कामं, त्यातल्या कामांची सिलेक्शन प्रोसेस, बिल्डर्स बरोबरच्या मिटींग्ज, बिल्डर्सचा कामाकडे पाहाण्याचा दृष्टीकोन, बिल्डींग एलीवेशन्स, कॉस्ट कंस्ट्रेंटस, कॉर्पोरेशनमधलं काम, अ‍ॅक्च्युअल साइट विजीट, कॉर्पोरेशनच्या अधिकार्‍यांशी ऑन-साइट झालेली बोलणी हे सर्व होतं.

थोडक्यात, डिजाइनची आवड असणं, डीग्री घेणं आणि नंतर मनाजोगतं काम करायला मिळणं यात महद अंतर आहे. एकूण व्यावसाय काय आहे याची पूर्ण माहिती असल्याखेरीज, आधी डीग्री घेण्याचा सल्ला देणं निर्बुद्धपणाचं आहे.

सुबोध खरे's picture

3 Mar 2017 - 9:57 am | सुबोध खरे

मला अजूनही ते शिक्षण (B .Arch ) घ्यायची इच्छा असून मला जे शिकता नाही आल ते शिकायचंच आहे,व पुढे जाऊन स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय करण्याचा मानस आहे.
एवढे लेखकाने स्पष्ट लिहूनही आधी डीग्री घेण्याचा सल्ला देणं निर्बुद्धपणाचं आहे.
बिस्मिलाहरहिमनुर्रहीम

संजय क्षीरसागर's picture

3 Mar 2017 - 11:07 am | संजय क्षीरसागर

मला अजूनही ते शिक्षण (B .Arch ) घ्यायची इच्छा असून मला जे शिकता नाही आल ते शिकायचंच आहे,व पुढे जाऊन स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय करण्याचा मानस आहे.

लेखावरचे सर्व प्रतिसाद वाचले तर किमान थोडा तरी व्यासंग वाढायला मदत होईल. आता परत तेच लिहीण्यात अर्थ नाही कारण तुम्हाला दिलेल्या उत्तराचा प्रतिवाद करता येणं तुम्हाला शक्य नाही. थोडक्यात आता पिसारा पूर्णपणे उघडा पडला आहे. तस्मात, इथून पुढे माझ्यासमोर तरी पिसारा फुलवू नका.

बीआर्च लगेच करावं की त्या व्यावसायाचं डिग्रीपश्चात स्वरुप काय आहे, याची (स्वानुभवानं) पूर्णकल्पना घेऊन करावं हा मुद्दा आहे. मी जे म्हणतोयं त्यामागची पूर्ण कारणमिमांसा गामांना दिलेल्या प्रतिसाद आहे आणि ते गामांना सुद्धा मान्य आहे. वाचा :

व्यवसायाचा एकंदरीत आवाका ध्यानी येण्यासाठी पदवीचा उपयोग पडेल असा अंदाज मी बांधला होता. तर पदवीऐवजी प्रत्यक्ष काम करून तो अनुभवून घ्यावा असं तुमचं म्हणणं पडलंय. हाही एक सुयोग्य मार्ग आहे. मला वास्तुविशारदशास्त्रातलं फारसं काही ठाऊक नसल्याने तुमचा सल्ला शिरसावंद्य.

लेखकानी धागा कशासाठी काढला आहे त्याचं विस्मरण होऊन तुम्ही स्वतःवर अनावस्था प्रसंग ओढवून घेतला आहे ! आता तरी वाचा म्हणजे स्वतःची आणखी बिकट परिस्थिती होणार नाही :

माझ सध्या वय २९ असून मला हे जॉब बरॊबर कस करता येईल याबाबत जाणकारांनी प्रकाश टाकावा .

सुबोध खरे's picture

3 Mar 2017 - 12:34 pm | सुबोध खरे

एवढा जळफळाट बरा नव्हे.
उगी उगी

सुबोध खरे's picture

3 Mar 2017 - 12:36 pm | सुबोध खरे

आं अच्च झालं तल
उगी उगी

संजय क्षीरसागर's picture

3 Mar 2017 - 12:46 pm | संजय क्षीरसागर

याचा अर्थ तुमच्याकडे आता प्रतिवाद नाही आणि पुरती गोची झाली आहे.

तुमच्या भंपक युक्तिवादाला आणि थापेबाजीला उत्तर देण्यासाठी माझ्याकडे रिकामा वेळ नाही
जन गण मन

संजय क्षीरसागर's picture

3 Mar 2017 - 12:56 pm | संजय क्षीरसागर

माझ सध्या वय २९ असून मला हे जॉब बरॊबर कस करता येईल याबाबत जाणकारांनी प्रकाश टाकावा .

यानं तर पुरती पाचर बसली आहे तरीही इकडून तिकडून वाट काढण्याची खटपट चालू आहे.

सुबोध खरे's picture

3 Mar 2017 - 1:24 pm | सुबोध खरे

ब्वॉर्र
तुमचीच लाल

तुमच्याकडून अपेक्षाच नाही. पण पुन्हा सांगतो भाषा सांभाळा !

सुबोध खरे's picture

3 Mar 2017 - 2:14 pm | सुबोध खरे

ब्वॉर्र

गामा पैलवान's picture

3 Mar 2017 - 3:29 am | गामा पैलवान

संजय क्षीरसागर,

एकूण व्यावसाय काय आहे याची पूर्ण माहिती असल्याखेरीज, आधी डीग्री घेण्याचा सल्ला देणं निर्बुद्धपणाचं आहे.

व्यवसायाचा एकंदरीत आवाका ध्यानी येण्यासाठी पदवीचा उपयोग पडेल असा अंदाज मी बांधला होता. तर पदवीऐवजी प्रत्यक्ष काम करून तो अनुभवून घ्यावा असं तुमचं म्हणणं पडलंय. हाही एक सुयोग्य मार्ग आहे. मला वास्तुविशारदशास्त्रातलं फारसं काही ठाऊक नसल्याने तुमचा सल्ला शिरसावंद्य.

मात्र हे करतांना काही दिवस (दोनेक वर्षे?) काम करावं लागेल आणि नंतरच पदवीचा विचार करता येईल. हातात प्रमाणपत्र यायला उशीर होईल. तितका वेळ आर्थिक नियोजन ताणलं जाईल.

आ.न.,
-गा.पै.

संजय क्षीरसागर's picture

3 Mar 2017 - 11:10 am | संजय क्षीरसागर

मात्र हे करतांना काही दिवस (दोनेक वर्षे?) काम करावं लागेल आणि नंतरच पदवीचा विचार करता येईल. हातात प्रमाणपत्र यायला उशीर होईल. तितका वेळ आर्थिक नियोजन ताणलं जाईल.

यासाठी पहिल्याच प्रतिसादात उपाय सुचवला आहे.

पहिल्यांदा एखाद्या आर्किटेक्टकडे पार्ट-टाईम जॉब बघा. तिथं कामं कशी केली जातात ते पाहा. तुम्हाला कंप्युटरची माहिती आहे तर डिजाईन सॉफ्टवेअर वापरुन काम सोपं होईल का पाहा. जिथे प्लान सँक्शन लागतं तिथे आर्किटेक्ट लागतो पण डिजाईन स्टेजला कुणीही काम करु शकतं. मग जमल्यास यथावकाश डिग्री घेता येईल.

चौकटराजा's picture

3 Mar 2017 - 10:30 am | चौकटराजा

तोच उशीरा नाव मिळालेला मित्र म्हणाला " माझा मुलगा न नापास होता सलग पाच वर्षे पास झाला .... हे काही विशेष नाही ..हल्ली नापास होणे वा करणे ही बाब तंत्र शिक्ष्णात राहिलेलीच नाही." पण १९७० ते १९८० या काळात एम डी होण्यापेक्षाही आर्किटक्ट होणे अवघड होते ही बाब सत्य आहे. तोच माझा मित्र कसाबसा ५ वर्षे सलग पास होऊन जी डी आर्क झाला पण त्याला एम ई होणे सोपे गेले. यात बी ई सिव्हील पेक्षा त्याकाळी अर्किटेक्ट होणे कठीण होते असे दिसून येईल. फार पूर्वी सीए होणे ही असेच कठीण होते. दुसरे अर्किटेक्चर ह्या करियरचे असे आहे की याचे क्लासेस नसतात त्यामुळे दुय्यम दर्जाच्या शिक्षकांची भर बाहेर होत नाही.

मेडीकल मधे पॅथलॅब डॉ चे जसे वेगवेगळे स्तर असतात तसेच आर्किटेक्चरल प्रॅक्टीस मधेही. म्हणजे बंगले स्पेशालिस्ट यात डिझाईन ला भरपूर वाव कारण थेट मालकाशी संपर्क. मग १ बीच के टू बी एच के च्या पाट्या टाकणारे- बिल्डरच्या कृपेखाली काम करणारे..... तिसरे फक्त प्लान पास करून आणणारे.. काही व व्हॅल्यूअर पण सर्वात उच्च कोटी म्हणजे अगदी मोठी सुंदर प्रमाणबद्ध , फिनिशेशवर तुफान खर्च केलेली प्रोजेक्ट करणारे.
आर्किटेक्ट होऊन हे इन्टेरिअर चेच काम करतात त्यांच्या करीयरला माझा सलाम नाही.

मलाही आर्किटेक्चर चे आजही आकर्षण आहे पण मी या करीयरला सुटेबल नव्हतोच असा माझा दावा आजही आहे. आवड व अभिक्षमता दोन गोष्टी भिन्न आहेत. एखाद्याला सी ए व्हायचे आहे पण आकडेमोडीचा कंटाळा आहे. एखाद्याला वकील व्हायचे आहे पण फारसे बोलायला आवडत नाही . अशी आपली केस आहे का हे पडताळून पहावे. नुसत्या सौंदर्याने उत्तम नटी होता येत नाही त्यासाठी अभिनयाची एक नैसर्गिक अदा आपल्यात असायला लागते.

काहीही होण्यासाठी नैसर्गिक अभिक्षमता, मेहनत व नशीब या तिन्ही गोष्टी लागतात या सर्व एकत्र येतात त्यावेळी यश चालत येते.

फार पूर्वी सीए होणे ही असेच कठीण होते.

अजूनही कठीणच आहे हो!

सुबोध खरे's picture

3 Mar 2017 - 12:34 pm | सुबोध खरे

म्हणूनच हे विचारतो कि सी ए च्या प्रवेश परीक्षेला बसण्या अगोदर तुम्ही मुलांना दोन वर्षे सी ए कडे पाट्या टाका असा सल्ला द्याल का?

सल्ला देईन की नाही माहीत नाही, पण मी स्वतः हे केलं आहे.

काय आहे - चित्रकार, डॉक्टर ही नैसर्गिक आवडींमुळे निवडली जाणारी प्रोफेशन्स आहेत. उदा० अभ्याला लहानपणापासून चित्रकलेत गती होती. रुग्णांना बरं करावं असं तुम्हाला कदाचित लहानपणापासून वाटत असेल.

पण "एखाद्याचं बॅलन्सशीट बनवावं" किंवा "एका कं०चे इंटरनल कंट्रोल तपासावेत" अशी आवड कशी असेल? तर आपल्याला हे आवडतं / जमतं आहे का हे तपासण्यासाठी मी आधी एका सीएच्या हापिसात काम करून पाहिलं...

सुबोध खरे's picture

3 Mar 2017 - 12:49 pm | सुबोध खरे

दोन वर्ष?
आमचा दंडवत घ्यावा.

फुलटाईम नाही हो, पार्टटाईम. सुट्टीत किंवा 'सीझन'मध्ये. तरबेज व्हावं असा हेतू नव्हता, जमतंय/आवडतंय का पाहणं हा होता. त्यातही याच्या-त्याच्याशी गप्पा झोड, रिटर्न फायलिंगच्या नावाखाली ऑफिस-स्वारगेट-प्रभातरोड-आकुर्डी असं पुणे दर्शन कर, वगैरे टाईमपास असे.

सहमत आहे. माझ्या शेजारी एका सीएचे हपिस आहे. बरीचशी बीकॉम करणारी मुले तेथे नाममात्र पगारावर पार्टटाईम काम करतात. सीए चा एन्ट्रन्स वगैरे कसा असतो कै म्हैत नै पण त्यातल्या एक दोघांना सीए करायचे आहे असे कळले.
रुग्णाला बरे करावे असे लहानपणापासून वाटणे हे माझ्या अल्पबुध्दीच्या बाहेरचे आहे. शरीराच्या, क्रियांचा, अवयवांच्या, जीवजंतूच्या वगैरे अभ्यासात गती असणे, कुतुहल असणे मी समजू शकतो. पण डायरेक्ट बरेच करावे असे वाटत नसावे. ;)

मला लहानपणापासून काही लोकांना 'सरळ' करावे असे वाटते, अजून जमत नाहीये :(

ता.क. मी लहानपणापासून मिपावर आहे.

अप्पा जोगळेकर's picture

3 Mar 2017 - 2:53 pm | अप्पा जोगळेकर

रुग्णाला बरे करावे असे लहानपणापासून वाटणे हे माझ्या अल्पबुध्दीच्या बाहेरचे आहे. शरीराच्या, क्रियांचा, अवयवांच्या, जीवजंतूच्या वगैरे अभ्यासात गती असणे, कुतुहल असणे मी समजू शकतो. पण डायरेक्ट बरेच करावे असे वाटत नसावे.
ते तसे नसते. एखादा माणूस प्रथितयश बनला की मग त्याची मुलाखत घेतली जाते. तेव्हा आपल्याला कशी लहानपणापासून अमुक अमुक क्षेत्राची आवड होती वगैरे सांगतो.
मग सचिनसारखा माणूस आपण कसा सतत क्रिकेटचा विचार करायचो ते सांगतो.
पादुकोण, करिना कपूर किंवा पिळगावकर सारखे दुय्यम् नट/ नटी मला लहानपणापासनच कशी ढमक्या क्षेत्राची आवड होती वगैरे सांगतात.
फार कशाला बर्याचदा आपले आई वडील किंवा इतर परिचीत सुद्धा लहानपणापासून आपण कसे कष्ट काढले किंवा फलाण्या क्षेत्रात संधी मिळाली असती तर आपण अमक्या जागी पोचलो असतो वगैरे गप्पा सांगतात.
लहानपणापासूनच एखाद्याला डॉक्टर व्हावे किंवा चित्रकार व्हावे असे एखाद्याला कसे वाटू शकते हे 'आपण रिक्षावाला व्हावे' असे वाटणार्‍या माझ्यासारख्या माणसाला कळण्यापलीकडचे आहे. कदाचित माझीच बुद्धी तोकडी असावी.
त्यामुळे 'धोंडो भिकाजी जोशींसारखे' आपले पाट्या टाकणारे आयुष्यच बरे असे नेहमी वाटते.

आदूबाळ's picture

3 Mar 2017 - 3:14 pm | आदूबाळ

अहो असंच असतं असं नाही.

माझ्या भाच्याचं उदाहरण डोळ्यांसमोर आहे. लहानपणी त्याच्या आईवडिलांची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. म्हणजे खाऊनपिऊन सुखी होते, पण महागडी खेळणी वगैरे आणून देऊ शकत नव्हते. एके दिवशी एका तुलनेने श्रीमंत नातेवाईकाने आपल्या मुलासाठी जपानहून एक रोबो-खेळणं आणलं. त्याला ते आवडलं नाही, का मोडलं ते आता आठवत नाही, पण काहीतरी कारणाने ते (तेव्हा तिसरी-चौथीत असलेल्या) भाच्याकडे आलं. तेव्हापासून "रोबो" या विषयाने त्याच्या डोक्याचा कबजा जो जो घेतला तो घेतलाच. आता भाचा बावीस वर्षांचा आहे, आणि अंतराळातल्या रोबॉटिक्सच्या उच्चशिक्षणासाठी परदेशी जायच्या विचारात आहे.

ओळखीतलं हे दुसरं कॅरेक्टर:

खुप चांगली माहितीपुर्ण चर्चा आणी प्रतिसाद . "आयुष्यात काहि दोर हे कापावेच लागतात ." असे एका महान लेखकाचे वाक्य आहे . अर्थात तरिही शक्य तेवढे प्रयत्न करणे हे आपल्या हातात आहे .

अप्पा जोगळेकर's picture

3 Mar 2017 - 2:31 pm | अप्पा जोगळेकर

गळक्या इमारती बांधल्या म्हणून हफीज कॉन्ट्राक्टरला पुण्यातल्या एका मोठ्या संस्थापनाने हाकलले हे खरे आहे का ? वर कुठेतरी हा उल्लेख आला आहे म्हणून विचारले.

अप्पा जोगळेकर's picture

3 Mar 2017 - 3:03 pm | अप्पा जोगळेकर

ह्या सगळ्या वर्षात मला architecture करायचा राहूनच गेल.पण अजूनही मन स्वस्थ बसू देत नाही.मला अजूनही त्या क्षेत्राची ओढ वाटते.
आत्ताही मी निवांत वेळेस डिजाईन करतो ,फ्लोर प्लॅन्स आखतो.ती ओढ मला स्वस्थ बसू देत नाही,मानसिक रित्या सुद्धा.
साहेब, आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत.
तुम्ही कष्ट करुन एमसीए केले आहे आणि कित्येक वर्षे कामाचा अनुभव आहे. डेटा एन्ट्री ऑपरेटर चे टीम लीड झालात. ते कष्ट आणि तो अनुभव वाया जाउ देउ नका. या क्षेत्रात तुम्ही नक्कीच खूप पुढे जाल.
इतक्या वर्षांनंतर आर्किटेक्चर पूर्ण जरी केले तरी आत्ता मिळवता तशी सॅलरी मिळायला किती वर्षे जातील हा व्यवहार्य विचार नक्कीच करा. एकदम ५०-६० % सॅलरी डेप्रिसिएशन खूप मानसिक त्रास देते.
'थ्री इडियट्स' चित्रपट एक करमणूक म्हणून पाहणे वेगळे आणि रोजचे जगणे वेगळे.
चित्रकला छंद वगैरे साठी जोपासणे नक्कीच शक्य आहे.

चौकटराजा's picture

3 Mar 2017 - 3:16 pm | चौकटराजा

भंपक वास्तुविद्या म्हणजे दिशा, मालकाचा व्यवसाय ई. अतर्क्य गोष्टी चा पाया धरून केलेली रचना. मग त्यात पूर्वाभिमुख व्हरांडा ई आचरट पणा असतो. खरी वास्तुविद्या म्हणजे ,भूगोलावरील योजित वास्तूचे स्थान, स्थानिक मालाची उपलब्धता, प्लॉटचा आकार व उंचसखल पणा, जमीनीचे काठिण्य, वर्षभरातील वायुची दिशा व आवेग, हवामान दमट की कोरडे ? वास्तुचा उद्देश खाजगी की सर्वजनिक ? वर्षभराततील सूर्यभ्रमणाचा तपशीलवार अभ्यास, ई ई घटक तर असतातच पण ग्राहकाची धार्मिक पार्श्वभूमी, ग्राहकाची रंगाची आवड निवड, त्याचे घरातील इतर सदस्यांशी असलेले नातेसंबंध यांचाही डिझाईनवर परिणाम होतो. ग्राहकाचे स्वतःचे व्यक्तिमत्व या सर्वाचा विचार प्राथमिक बैठकीत करावा लागतो. आता आहे की नाही माहीत नाही पण त्याकाळी टाईम सेव्हर स्टॅन्डर्ड नावाची एक ज्ञानेश्वरी, शुक्ला ग्रेवाल किंवा ग्रेज अनॉटोमी या धर्तीवर मिळत असे. त्यात चमच्या पासून लिमोसिन पर्यन्त सर्व गोष्टीची मापे दिलेली असत. मानवी शरीर , त्यातील डोके धड व मांडी इ, च्या मधील प्रमाणाला वास्तूशास्त्रातच काय सर्व प्रकारचा वस्तूंच्या डिझाईन मधे फार महत्व आहे .त्या अर्थाने त्या पुस्तकाचा उपयोग होत असे. कारण खर्‍या वास्तुविद्यत असे तत्व आहे की गरज- आकार -अंतर्गत भाग- बाह्य भाग असा प्रवास डिझाईनचा झाला पाहिजे. आधी रूम १० बाय १० असे ( अर्थात दहा बाय दहा या आकराला ही तर्क आहे ) ठरवायची मग इनटेरिअर वाल्याला त्यात डिझाईन कोम्बायला भाग पाडायचे हा उलटा प्रवास झाला. मला वाटते मानवी शरीरात अवयव पहिले तयार झाले मग डोके धड दोन हात दोन पाय असे झाले.व आता दिसते तशी मानवी ठेवण तयार झाली.

यातून मग पुढे स्टक्चरल डिझाएनर चा रोल सुरू होतो. आमचे एक सर म्हणत बीमचा स्पॅन काय पुणे ते लोणावला असाही करता येईल तिची उंची किती होईल याचा विचार केला का ? म्हण्जेच समजा वास्तूविदाने ठरविले की मला ४० फूट स्पॅन हवाच तर इंजिनिअर तो करून देइलही पण मालक म्हणेल 'एवढे पैसे मला स्टील व
कॉन्क्रीट मधे हे घालायचे नाहीत डिझाईन मधे तडजोड झाली तर चालेल. एकेक खाम्ब वीस फुटावर आला तरी चालेल.
सध्या मी ज्या सोसायटीत रहात आहे त्या आर्किटक्टची २०० एक प्रोजेक्टस चालू आहेत तरी आमच्या येथील दोन बिल्डिंगचे डिझाईन भंगार आहे असे माझे मत आहे.
त्याच्याशी बोललो असता त्याने एकच शब्द उच्चरला " जसे पैसे तसे डिझाइन" अर्थात तडजोड.

अप्पा जोगळेकर's picture

3 Mar 2017 - 3:30 pm | अप्पा जोगळेकर

काका, समोरा समोर किंवा एल शेप ला तरी खिडक्या असणे आणि उंच छत हे तूर्तास हद्दपार का झाले आहे ? तुम्ही आर्किटेक्ट आहात असे वाटते याकरता विचारत आहे.
वायुविजन हे आर्किटेक्टसाठी तितके महत्वाचे नाही का.

चौकटराजा's picture

3 Mar 2017 - 4:36 pm | चौकटराजा

वास्तूचे डिझाईन ठरविण्यात वायूची वर्षभरातील दिशा व आवेग हे आले आहेच. त्यात वायुविजन तर आलेच पण बाजूने येणार दाब lateral stress ही आलाच की !
उंच छताचे म्हणाल तर सार्वजनिक की खाजगी या बाबीत त्याचा विचार होतो. उदा. म्युसीयम ,रेलेवे स्टेशनचा फॉयर ,ऑडेटोरियम यात छत उंच असते आजही. समोरासमोर खिडकी ठेवायची की नाही यात वायु , प्रकाश व आतील फर्निचर ची आगामी रचना यांचा विचार केला जातो. बर्याच वेळा मधे असणारी खिडकी सलग असे वॉल युनिट करायला फार अडचणीची ठरते. पण आगामी अंतर्गत रचनेचा विचार न करता अर्किटेक्ट दडपून मधे खिडक्या पेरत असतात.

स्वतन्त्र यांचा धागा आणि त्यावरच्या खूप रंजक प्रतिक्रिया वाचून प्रतिसाद दिल्या वाचून राहवत नाहीय. गेली १० वर्ष architecture ह्या क्षेत्रात काम करत आहे आणि काही नामवंत महाविद्यालयात त्या विषयाचे अध्यापन (visiting faculty) देखील करत आहे म्हणून हा प्रतिसाद द्यायच धाडस दाखवतो.
धाग्यावर आलेल्या प्रतिसादांवर बोलण्या आधी धाग्याच्या गाभ्यावर प्रतिक्रिया देतो. @ स्वतंत्र : आधी तुम्हाला architecture ची का आवड आहे ह्याचा विचार करा. बर्याच वेळेला मला drawing ची आवड आहे/होती किंवा माझ drawing चांगला आहे म्हणून लोक architecture ची निवड करतात. पण architecture हे फक्त drawings किंवा प्लान्स एवढाच सीमित नाही आहे. architecture हि वास्तु / बिल्डींग्स (वास्तूशास्त्र वाला वास्तू नव्हे) निर्माण करण्याची कला (art) आणि विज्ञान (science) आहे. त्यामुळे एकच वेळी आर्किटेक्टला ती कला आणि त्यामागचे शास्त्र अवगत करावे लागते. फक्त चांगली चित्रे / drawings काढता आली म्हणून बिल्डींग्स उभ्या राहू शकत नाहीत आणि फक्त शास्त्र आले म्हणून बिल्डींग्स सुंदर दिसू शकत नाहीत. आर्किटेक्ट हा त्या बिल्डींग्स बनवण्याच्या तंत्राचा वापर करून एका कलाकृतीचा निर्माण करत असतो. त्यामुळे जर तुम्हाला खरच शास्त्र आणि कला दोन्ही शिकायच्या असतील तर औपचारिक शिक्षणाला पर्याय नाही.
आता औपचारिक शिक्षणाची कल्पना देतो. architecture चे औपचारिक शिक्षण ५ वर्षांचे पूर्णवेळ आहे. ह्यात जवळपास दरवर्षी १० -१२ असे एकूण ४०-४५ विषय शिकवले जातात. ह्या विषयात अगदी visual आर्ट्स पासून applied mechanics, बिल्डिंग constructions, हवामान शास्त्र, काही social sciences चे भाग ते अगदि history ऑफ architecture पर्यंतचे अनेक विषय शिकवले जातात. बऱ्याच वेळेला फक्त drawings ची आवड आहे म्हणून आलेल्या विद्यार्थ्यांना हे बाकीचे इंगीनीरिंग शी निगडीत किन्व इतर विषय खूप अवघड जातात. परविशाय्स्।सर्व विषय शिकल्याशिवाय चांगला architect designकरू शकत नाही
कुणाही architect च्या office मध्ये part time काम करून हे सगळे विषय शिकणे अशक्य आहे. एक चांगला architect उपलब्ध तंत्रद्यानाचा वापर करून, त्या ठिकाणच्या हवामानाचा, समाज जीवनाचा, आर्थिक निकषांचा, तेथील संस्कुतीचा मेळ घालून एक सुंदर वास्तु निर्माण करेल. अर्थात पुन्हा हि एक कला असल्यामुळे ती व्यक्तीसापेक्ष आहे. एखादी वास्तू मला आवडली म्हणून ती सगळ्यांनाच आवडेल असे नाही.
architects चा आणखी एक प्रकार म्हणजे बिल्डर्स साठी फक्त FSI ची गणिते जमवून ती सरकार दरबारी सम्मत करून आणणारा त्या वर्गाबद्दल मी काहीच बोलत नाही.
दुसरा भाग म्हणजे हा ५ वर्षांचा कोर्स प्रचंड workload असणारा आणि खर्चिक आहे. त्यामुळे architecture हि खरच passion असेल आणि तो ताण (आर्थिक आणि शारीरिक) झेपणार असेल तर नक्की चांगल्या महाविद्यालयात दाखल व्हावे. कारण architecture चा, निर्मितीचा आणि त्या मागच्या तत्वज्ञानाचा आनंद खूप वेगळा आहे.

यशोधरा's picture

3 Mar 2017 - 6:33 pm | यशोधरा

Atishay aavadalaa haa pratisaad.

संदीप डांगे's picture

3 Mar 2017 - 6:40 pm | संदीप डांगे

सौ सुनार की, एक लोहार की....

अतिशय उत्तम व थेट व्यावसायिकांकडून आलेला अतीव मोलाचा प्रतिसाद!

चौकटराजा's picture

3 Mar 2017 - 8:03 pm | चौकटराजा

दुसरा भाग म्हणजे हा ५ वर्षांचा कोर्स प्रचंड workload असणारा आणि खर्चिक आहे. त्यामुळे architecture हि खरच passion असेल आणि तो ताण (आर्थिक आणि शारीरिक) झेपणार असेल तर नक्की चांगल्या महाविद्यालयात दाखल व्हावे. कारण architecture चा, निर्मितीचा आणि त्या मागच्या तत्वज्ञानाचा आनंद खूप वेगळा आहे.
नेमके हेच माझ्या बाबतीत घडले . कागद, पेन्सीली,मॉडेलिंग खर्च पेन्स ई ई खर्चाच्या बाजू तर सगळे जग विसरून रात्र रात्र सबमिशन करीत बसा हा उद्योग.५० ट्क्क्यास पासिंग , ए टी केटी चा अभाव व लेक्चरना उपस्थीतीचा बडगा अशी सर्व परिस्थिती त्यावेळी होती. पण दोन वर्षात चांगले डिझाईन म्हणजे काय असते ते मला
कळले. म्हणूनच आजही मी नव्या नव्या ईमारती " त्या" कोनातून पहातो. व तथाकथित यशस्वी वास्तुविदांवर टीकाही करतो. माझ्या घराचे इंटेरिअर मीच केले आहे. प्रत्येक क्षेत्रात काही अभिक्षमता अपेक्षित असतात त्याचे नक्की भान असणे आवश्यक आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Mar 2017 - 9:49 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर आणि खर्‍या दृष्टीने उपयुक्त प्रतिसाद !

स्वतन्त्र's picture

19 Mar 2017 - 3:21 pm | स्वतन्त्र

माननीय उल्लु साहेब ,
प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद !

तुम्ही जाणकार असून माझ्या धाग्यावर प्रतिसाद दिल्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे.

तुमचे विचारांशी १०० % सहमत.
मला फक्त चित्रकलेची आवड नसून.इमारतींच्या design आणि planning आकर्षण वाटते,आणि त्या उत्सुक्ते आणि आवडी मुळेच मला हि शाखा आधी पासून खुणावत होती. पण मी धाग्यात लिहिल्याप्रमाणे मला ते आत्ता पर्यंत जमलं नाही.ह्यापुढे मला हे शिक्षण घ्यावे असे मनापासून वाटते.

प्रतिसाद वाचून मला AMIE,इग्नोऊ अथवा असे कॉलेज जिथे Attendance अड्जस्ट होऊ शकेल.

ह्यापैकी कोणता पर्याय योग्य आहे ?
AMIE फायदेशीर आहे का ?

सुबोध खरे's picture

3 Mar 2017 - 6:59 pm | सुबोध खरे

त्यामुळे architecture हि खरच passion असेल आणि तो ताण (आर्थिक आणि शारीरिक) झेपणार असेल तर नक्की चांगल्या महाविद्यालयात दाखल व्हावे. कारण architecture चा, निर्मितीचा आणि त्या मागच्या तत्वज्ञानाचा आनंद खूप वेगळा आहे.

+१००
ज्जे बात

संजय क्षीरसागर's picture

5 Mar 2017 - 8:42 am | संजय क्षीरसागर

इतक्या पॅशनेटली धागा काढून मदत मागणाऱ्या खुद्द लेखकाचा मात्र संपूर्ण लेखावर एक सुध्दा प्रतिसाद नाही !

गामा पैलवान's picture

5 Mar 2017 - 2:38 pm | गामा पैलवान

संजय क्षीरसागर,

याचं कारण म्हणजे लेखकाला मदत होईल अशी एकही गोष्ट त्याला मिळाली नाही. लेखकाच्या मनात काय आहे हे ताडून त्यानुसार मार्गदर्शन करण्याचा मनकवडेपणा अपेक्षित आहे.

आ.न.,
-गा.पै.

जी व्यक्ती इतका सुस्पष्ट धागा काढू शकते तिला प्रतिसाद द्यायला काहीच हरकत नाही. एनी वेज, बहुसंख्य मदतीच्या धाग्यांवर हीच परिस्थिती असते. इट इज सॅड.... बट ट्रू.

चौकटराजा's picture

6 Mar 2017 - 2:11 pm | चौकटराजा

धागाकर्ता मुळात वास्तविद्या या तील करीयर विषयी फारसा माहीत गार नसावा. मी जर असा धागा " खरे तर मला मिलिटरीत जायचे होते" असा काढला तर
त्यावर समजा डॉ सुबोध खरे , शशिकांत ओक साहेब यानी त्या करीयरला कशी " पॅशन" च आवश्यक असते असे पटविले तर चौ रा काय लिहिणार कप्पाळ ?

सुबोध खरे's picture

6 Mar 2017 - 7:55 pm | सुबोध खरे

चौ रा साहेब
मिलिटरीसाठी पॅशन लागते कि नाही ते माहित नाही पण डॉक्टर होण्यासाठी मात्र नक्की तुम्हाला त्याविषयाबद्दल आकर्षण असलं पाहिजे. रक्त मांस पाहून तुम्हाला चक्कर येत असेल तर तुम्ही डॉक्टर होऊ शकत नाही. वेळी अवेळी बोलावणं येतं, तिथे सुद्धा तुम्हाला हसतमुख राहावं लागतं. छातीत दुखतं म्हणून रात्री दोन वाजता आलेल्या रुग्णाचा इ सी जि नॉर्मल येईपर्यंत वाट पाहावी लागते आणि तो नॉर्मल आल्यावर त्यानंतर काल पाच प्लेट पाणीपुरी खाल्ल्याने बहुधा गॅस झाला असेल असे म्हणून हॅ हॅ हॅ करणारा पुरोगामी पोटाचा रुग्ण (कितीही संताप आला तरीही) हसून साजरा करावा लागतो. हे सगळं गृहीत धरून पुढे जायची तयारी असेल तर डॉक्टर व्हा उगाच ते सिनेमा मध्ये स्वच्छ परीट घडीची पांढरी कापडं घालणाऱ्या डॉक्टरचे ग्लॅमर पाहून नाही असाच सल्ला मी तरुणांना देतो.

चौकटराजा's picture

6 Mar 2017 - 10:09 pm | चौकटराजा

मी डॉ. विल्यम नोलेन यानी लिहिलेले " मेकीन्ग ऑफ अ सर्जन " हे पुस्तक सुमारे ३५ वर्षापूर्ची वाचले होते. त्यात त्यानी " मेडिकलचा घाबरट विद्यार्थी ते परिपूर्ण सर्जन
याची गाथा विशद केली होती. त्यातले माय फर्स्ट इन्सीजन - अपेन्डोक्टमी हे तर फार भारी लिहिले होते. आजही आठवतेय.

स्वतन्त्र's picture

12 Mar 2017 - 1:34 pm | स्वतन्त्र

तुम्ही म्हणालात ते बरॊबर आहे.निरनिराळे प्रतिसाद वाचून गोंधळायला होतंय हे खर आहे.तरीही मला architecture चे फॉर्मल शिक्षण घ्यायचेच आहे.आलेल्या प्रतिसादांवरून मला असा वाटतंय कि इथे AMIE चा पर्याय मला सध्या बरा वाटत आहे.तो करून बी.Arch जरी होता नाही आले तरी M.आर्च ला प्रवेश मिळू शकतो का ?

स्वतन्त्र's picture

13 Mar 2017 - 7:42 pm | स्वतन्त्र

तुम्हा सर्वांच्या प्रतिसादांबद्दल आभारी आहे !

सर्वांनीं सुचवलेला पर्याय संक्षिप्त स्वरूपात :-

१.मी हा नाद सोडून द्यावा
२.मी practical वर भर देऊन,पदवी चा नाद सोडावा.
३.AMIE किंवा IGNOU या पर्यायांचा विचार करावा.
४.असे एखादे कॉलेज पाहावे जिथे Attendance ला महत्व नसेल.

त्यातला पर्याय १. महाल मान्य नाही कारण मला ह्या विचायतला शास्त्रोक्त शिक्षण घायचाच आहे.(त्यात रीतसर डिग्री हवी,खासगी पदविका नको)
पर्याय २:तुम्ही उद्या गॅरेज वाल्याला mechanical इंजिनीयर म्हणाल का ?

पर्याय ३ : या दोन पर्यायांचा विचार करत आहे.शक्यतो अमीर.

पर्याय ४:कोणाच्या माहितीत पुण्यात असे कॉलेज किंवा ओळख आहे का ?

मला काहीही करून त्या विषयातली पदवी घायचीच आहे.पण आहे तो जॉब करून हे सध्या साध्य होणं थोड challenging असून,ते अशक्य नाहीये हे सुद्धा मला पूर्वानुभावाने माहीत आहे.नाहीतर आयुष्यभर खंत राहणार हे नक्की.आणि मला जे करता नाही आल ते दुसर्याने करून त्यात समाधान मानणारा मी नाही.

धन्यवाद !

स्वतंत्र

त्यामुळे तुमच्याशी चर्चा होऊ शकली नाही आणि आता धाग्याचा ताव गेला आहे.

पर्याय २:तुम्ही उद्या गॅरेज वाल्याला mechanical इंजिनीयर म्हणाल का ?

तुम्हाला आर्किटेक्टच्या ऑफिसमधे नक्की काय आणि कसं काम चालतं, याची कल्पना पदवी घेण्यापूर्वी यावी असा त्याचा उद्देश आहे. स्वतःचा व्यावसाय करायला डिग्री लागेल पण ती घेण्यापूर्वी, सध्या जे चालू आहे ते सोडण्याचा आत्मविश्वास तुमच्यात निर्माण झाल्याविना ते साहस शक्य नाही. हा आत्मविश्वास निर्माण व्हायला हँडस ऑन अनुभव असेल तरच आशेचा किरण आहे. त्यामुळे इंजीनिअर आणि मेकॅनिक ही तुलना व्यर्थ आहे. अनुभव महत्त्वाचा आहे. अनुभवानं आत्मविश्वास येतो आणि आत्मविश्वासातून कृती घडते.

पिलीयन रायडर's picture

13 Mar 2017 - 9:14 pm | पिलीयन रायडर

संक्षी.. आधी थोडा हॅण्डस ऑन अनुभव घ्यावा हा काही वाईट सल्ला नाही, पण त्याशिवाय आत्मविश्वास निर्माण होऊच शकत नाही हे जरा जास्त नाही का झालं?

त्यांना डिग्री घ्यायची आहे हे स्पष्ट आहे. आवश्यक तेवढा आत्मविश्वास आहे त्यांच्याकडे हे दिसतंय की त्यातुन.

संजय क्षीरसागर's picture

13 Mar 2017 - 9:28 pm | संजय क्षीरसागर

इच्छा आणि आत्मविश्वास यात फरक आहे.

ज्याला डिग्री घ्यायचीच आहे आणि फुल आत्मविश्वास आहे ती व्यक्ती पहिल्यांदा अ‍ॅडमिशन घेईल आणि फावल्या वेळात चरितार्थ पाहील. अशा व्यक्तीला धागा काढायची आणि इतरांच्या सल्ल्याची गरजच नाही.

पिलीयन रायडर's picture

13 Mar 2017 - 9:40 pm | पिलीयन रायडर

अहो धागा बघा ना.. ते मी करु की नको करु? काय करु? असं विचारतंच नाहीयेत.

कसं करु हाच प्रश्न आहे.

जॉब करुन ही डिग्री घेण्याचे वेगवेगळे पर्याय काय हेच तर त्यांना विचारायचंय. अ‍ॅडमिशन घ्यायचीच आहे त्यांना.

संजय क्षीरसागर's picture

14 Mar 2017 - 10:08 am | संजय क्षीरसागर

डिग्री मिळेपर्यंत चरितार्थ पार्ट टाइम नोकरीवर चालवायला लागेल. ते जीवनाची दिशा बदलण्याचं काम आहे. तिथे काठावर उभं राहून पोहता येणार नाही. या कामाला साहस हवं, ते आत्मविश्वासाशिवाय शक्य नाही.

मुक्त विहारि's picture

13 Jan 2021 - 12:30 am | मुक्त विहारि

एक सांगतो...

1. पुढे जायचे असेल तर, योग्य ते शिक्षण हवेच आणि ते पण अहोरात्र कष्ट करायची तयारी असेल तरच...

2. तुम्ही जे शिक्षण घेणार आहात, त्याचा एक फायदा म्हणजे, तुम्ही मनांत असे पर्यंत काम करू शकता... वकील, डाॅक्टर, सीए, गुरू, ह्या सारख्या ज्ञानी मंडळींना, निवृत्तीसाठी वयाची अट नाही. कधीही व्यवसाय उत्तमच असतो..

त्यामुळे, तुमचा निर्णय अतिशय योग्य आहे. हे माझे वैयक्तिक मत आहे...

दुर्दैवाने, B. Arch. साठी उत्तम काॅलेज कोणते? हे माहीत नाही.

तुमची धडपड पाहता, आज नाही तरी उद्या, नक्कीच यशस्वी व्हाल, याची खात्री आहे...