पुस्तकांविषयी सर्वकाही...

मोदक's picture
मोदक in जनातलं, मनातलं
27 Feb 2017 - 1:39 pm

नमस्कार मिपाकर्स..

सर्वप्रथम जागतीक मराठी दिनाच्या भरपूर शुभेच्छा..!!

आपल्यापैकी बहुतांश लोक पुस्तकप्रेमी आहेत आणि सतत कांहीना कांही वाचत असतात. आपल्यापैकी अनेक दिग्गजांना पुस्तकांविषयी भरपूर गोष्टी माहिती असतात आणि अनेक वैविध्यपूर्ण माहिती / अनुभवही असतात. ही माहिती सर्वांसोबत वाटून घेण्याच्या अनुषंगाने हा धागा काढत आहे.

सध्या काय वाचत आहात, अलिकडे काय वाचले, एखाद्या पुस्तकाची माहिती हवी आहे किंवा एखादे पुस्तक मिळत नाहीये / मिळवायचे आहे, एखादे पुस्तक पूर्वी कधीतरी वाचले पण नांव आठवत नाहीये अशा कोणत्याही गोष्टी लिहिण्यासाठी या धाग्याचा वापर करू शकता.

एखादे पुस्तक विकत घेतले आणि सध्या नको आहे अशावेळी कुणाला विकत / तसेच द्यावयाचे असेल तर त्यासाठीही हा धागा जरूर वापरा (फक्त मिपा प्रशासनाला आर्थिक व्यवहारांपासून दूर ठेवा)

चला तर मग.. सर्व मिपाकर मिळून पुस्तकांविषयी कोणत्याही शंका, निरीक्षणे, सल्ले, अनुभव यांची पोतडी उघडूया. वाचनसंस्कृतीची आपल्या परीने जपणूक करूया.

(पुस्तकप्रेमी) मोदक.

****************

१) येथे मराठी, हिंदी, इंग्लीश.. सर्व भाषांमधील पुस्तकांबद्द्ल लिहू शकता. हा धागा फक्त मराठी पुस्तकांपुरता मर्यादित नाही.
२) शक्य झाले तर मराठीशिवाय इतर भाषांमधील पुस्तकाबद्दल लिहिताना, त्याचे मराठीत भाषांतर झाले आहे का आणि झाले असल्यास भाषांतरीत पुस्तकाचे नांव दिले तर पुस्तक शोधणे सर्वांना सोयीचे पडेल.

****************

संस्कृतीप्रकटनशुभेच्छाआस्वादसमीक्षाशिफारससल्ला

प्रतिक्रिया

कैलासवासी सोन्याबापु's picture

21 Mar 2017 - 12:17 pm | कैलासवासी सोन्याबापु

आता अमरचित्रकथा ईबुक स्वरुपात उपलब्ध :.

मोदकराव, जालावर उपलब्ध मराठी ईपुस्तकं मिळतील अशा स्थानांची यादी करा ना. उदा० डीएलआय, mslbc वगैरे.

एमी's picture

22 Mar 2017 - 7:51 am | एमी

बील हॉग्ज (की होजेस?) ट्रायलॉजीतली २ आणि ३ नुकतीच पुर्ण केली. मिस्टर मर्सिडीज आधीच वाचलेलं. ते बर्यापैकी आवडलं होतं. फाइंडर्स किपर्स मात्र जबराट आहे. अतिचशय आवडलं. एंड ऑफ वॉच ठिकठाक आहे.

स्टिफन किंगबद्दल नक्की काय मत बनवावं ते मला अजुनही कळत नाही. त्याची दोन पुस्तकं (द शायनींग आणि फाइंडर्स किपर्स) फार आवडलीत, दोन ठिकठाक आवडली (मिस्टर मर्सिडीज आणि एंड ऑफ वॉच) आणि दोन महाबोअर झाली (डॉक्टर स्लिप आणि इट. इटतर अर्धवटच सोडून दिलं.)

एनीवे सध्या ब्रेकफास्ट अॅट टिफनीज वाचतेय. मस्त आहे.

अरेच्चा. इट खूप फेमस आहे ना? मी स्टिफन किंग वाचायला सुरुवातच त्यापासून करणार होतो.

पुंबा's picture

22 Mar 2017 - 2:36 pm | पुंबा

एमी's picture

23 Mar 2017 - 3:39 am | एमी

हो. इट फेमस आहे खरं.
किंग वाचायला सुरवात 'द शायनिंग'पासून करावी असे सुचवते. झक्कास आहे! त्यानंतर बील हॉग्ज ट्रायलॉजी.

मी आतापर्यंत जी दोनच पुस्तकं अर्धवट सोडून दिली आहेत त्यातलं दुसरंदेखील फेमसच आहे. कैच-२२ :-D यातला काळा विनोद खरंतर मला आवडत होता. पण भाषा/प्रोज खूप बोजड वाटू लागलेली.

ओके. आहे द शायनिंग माझ्याकडे. कॅच २२ बद्दल माझं सेम असंच झालंय. असं अर्धवट सोडलेले दुसरे पुस्तक म्हणजे 'फाऊंटनहेड'. अतिशय आवडलेले, जवळजवळ मानगुटीवर बसलेले पण माझ्यजवळ असलेल्या पुस्तकाचा फाँट इतका लहान होता आणि त्याच काळात दुसरी अनेक कामे मागे लागली. शेवटी राहिलं ते राहिलंच. शेवटी पिक्चर बघितला, शेवट काय होतो ते पाहण्यासाठी. :))

कॅच २२ अर्धवट सोडली?? व्हेर यू विल रीपे दीज सिन्स आय डोन्ट नो...

पुंबा's picture

23 Mar 2017 - 2:40 pm | पुंबा

:)) आबा, खरं तर मी पहिल्या पगारातून घेतलेलं हे पुस्तक आहे. पण सुरुवातीला ३०-४० पाने वाचेपर्यंत रिकामा वेळ मिळाला नंतर जे भयानक काम आलं ३ महिने कि जेवायलाही वेळ मिळत नसे. त्यात राहिलं ते राहिलंच. आता जरा मोठी सुट्टी मिळाली कि वाचणार आहे.

इथे 'अर्धवट वाचलेली प्रसिद्ध पुस्तकं' यादीत कैच-२२ प्रथम आहे :-D (३६ आकडा कमी वाटेल कदाचीत. पण पैला नंबर मंजे कुछ तो होगाच ना!)

काल प्रतिसाद दिल्यानंतर आठवलं की मी अजुनेक पुस्तक अर्धवट सोडलंय. तेतर फारफार प्रसिद्ध आहे. लॉर्ड ऑफ द रिंग्ज. कंटाळा आला वाचताना ;-(

फाऊंटनहेड मला ठीकच वाटलेलं. त्यातला दुय्यम नायक आवडलेला. चित्रपटदेखील पाहिला आहे. बहुदा ही असली पुस्तकं तुम्ही कोणत्या वयाचे असताना वाचता त्यावरुन ती तुम्हाला आवडतील की नाही ठरत असावं. उदा कैचर इन द राय मी २७ की २८ ची होते तेव्हा वाचलं. अजीबातच आवडलं नाही (तसंही ते मुलींना कितपत आवडेल शंकाच आहे म्हणा). पण तेच मी १७ वर्षांची असताना द पिक्चर ऑफ डोरीयन ग्रे वाचलं. त्याचं गारुड पुढे कित्येक वर्ष राहिलेलं.

===
ब्रेकफास्ट अॅट टिफनीज पुर्ण केलं. हँगओवर राहणार याचा काही काळ.

पुंबा's picture

23 Mar 2017 - 3:36 pm | पुंबा

वॉल्डन खरोखर भयानक कठीण पुस्तक आहे. हाफ तर सोडूनच द्या मी १३ पाने कशीबशी वाचली. म्हणजे हे वाचावसं वाटावं पण जमू नये असलं पुस्तक आहे. आणि ह्यात अ‍ॅटलास श्रग्ड कसं काय नाही काय माहीत?

वॉल्डन हे नावच मी पहिल्यांदा वाचलं. १८५४ सालचं आहे म्हणजे बहुदा मी वाचणार नाहीच. तुला आधीच ते पुस्तक माहीत होतं; एवढंच नव्हे तर तू १३ पानं का होइना पण वाचलीत तेच मोप आहे :-D

अॅटलास श्रग्ड असले यादीत पुढे कुठेतरी. लॉगीन करुन पहावं लागेल. एकुण १२हजार आहेत. हे फक्त टॉप ५०.

काल टिफनीचा हँगओवर फारच झाला होता बहुतेक मला. एकतर 'इथे' म्हणून लिंकच दिली नाही. परतपुढे ५० चं ३६ केलं.

बालभारती मध्ये एक "झेल्या" म्हणून एक धडा होता तो कोणत्या कथासंग्रहामधला आहे. तसेच "कातरवेळ" पण होता ११ वी मराठीत ही कथा कोणत्या कथासंग्रहातील आहे.

अप्पा जोगळेकर's picture

22 Mar 2017 - 4:54 pm | अप्पा जोगळेकर

झेल्या धडा माणदेशी माणसे या पुस्तकातील आहे.
सगळे पुस्तकच छान आहे.
व्यंकटेश माडगूळकर लेखक आहेत.

धनावडे's picture

23 Mar 2017 - 2:04 am | धनावडे

धन्यवाद

गेल्या वर्षी वाचलेल्या पुस्तकांपैकी काही रेकमेंडेशन्स:

* लकीएस्ट गर्ल अलाइव
* मिस पेरेग्रीन्स होम फॉर पेक्युलीअर चिल्ड्रन
* करीअर ऑफ इवील
* फैनगर्ल
* द काइंड वर्थ किलिंग - हे भन्नाट पुस्तक आहे. मस्ट रिड!
* द थर्टींथ टेल - हेदेखील
* थर्टीन रिझन्स व्हाय
* इलिनॉर अँड पार्क
* बिफोर आय गो टू स्लिप
* आय लेट यु गो
* बिग फ्रेंडली जायंट
* द व्हेकेशनर्स
* वुइ वेअर लायर्स
* बिहाइंड क्लोज्ड डोअर्स
* इन अ डार्क डार्क वुड
* माय सिस्टर्स किपर
* ब्लैक डैगर ब्रदरहुड १ ते ८
* आऊटलँडर १ ते ४ - मस्ट रिड!
* अ सिरीज ऑफ अनफॉर्च्युनेट इवेंट्स १ ते ४

याखेरीज ट्वायलाइट आणि फिफ्टी शेड्स मालिका दुसर्यांदा वाचली.

===
यावर्षी आत्तापर्यंत वाचलेली आणखी काही:

* क्रोनिकल्स ऑफ नार्निया १ ते ४
* अ मैन कॉल्ड ओव्ह
* द वुमन इन केबीन १०
* अमेरीकन गॉड्स

याखेरीज अगाथा ख्रिस्टी, पेरी मैसन आणि जेम्स हैडली चेस यांची प्रत्येकी एकेक पुस्तकं दर महिन्याला वाचायचा विचार आहे.

अंतु बर्वा's picture

23 Mar 2017 - 11:01 pm | अंतु बर्वा

* द काइंड वर्थ किलिंग - हे भन्नाट पुस्तक आहे. मस्ट रिड!

हे आत्ताच वाचून संपवलं. खरोखरीच छान पुस्तक आहे... बाकीची पाहायला हवीत!

ऐला :O चोवीस तासांच्या आत पुस्तक मिळवून, वाचून, संपवलंदेखील?? भारीच की _/\_

एवढं आवडलं का?
अनपुटडाऊनेबल आहेच म्हणा ते! पण वाचणार्याचा वेगदेखील चांगला हवा. मी आपली सावकाश, आस्वाद घेत घेत पुस्तकं वाचत असते. दिवसभरात शंभरेक पानं. रहस्य, थरार प्रकार अजुनजरा वेगात संपवते (कारण पुस्तक सुरु केलं की एक रात्र झोप येते. पण पुढची रात्र झोप येणे अशक्यच. एकतर पुस्तक संपवा किंवा शेवटची रहस्यभेदाची एकदोन पानं वाचा. हे दोनच उपाय 8-)). पण इतके फास्ट नाहीच!

एनीवे तुमचा प्रतिसाद खूपच एनकरेजींग वाटला म्हणून माझा माबोवरचा जुना लेख इकडेदेखील टाकला. कोणीतरी आपली रेकमेंडेशन्स गंभीरपणे घेतय आणि ती त्यांना आवडतातदेखील हे वाचुन छान वाटलं. धन्यवाद :-)

अंतु बर्वा's picture

24 Mar 2017 - 7:25 pm | अंतु बर्वा

थोडस कन्फ्यूजन झालय बघा. पुस्तक वाचतोय मागचा महिनाभर.. योगायोगाने तेच नाव इथे पाहिल आणि तुमच्या प्रतिसादाला +1 केलं. बाकी एका रात्रीत पुस्तक वाचण्याचे पराक्रमही केलेत कालिजात असताना पण आता नाही जमत...

हे पुस्तक आधीपासूनच कोणाला माहीत असेल हा विचारदेखील माझ्या डोक्यात आला नाही :-D

पण ठिकय. या कंफ्युजनमुळे का होइना माझा लेख इकडेदेखील आला.

सुमीत भातखंडे's picture

23 Mar 2017 - 2:10 pm | सुमीत भातखंडे

सध्या डेलीहंट अ‍ॅप वर डॉ. सदाशिव शिवदे यांचं "ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजा" हे पुस्तक वाचतोय. छान आहे.
संभाजी राजांच्या आयुष्यातील अनेक ज्ञात - अज्ञात घटनांचं समतोल विश्लेषण असं ह्या पुस्तकाचं वर्णन करता येईल. कादंबरी सारखा फॉर्मॅट नसल्यामुळे अलंकारिक भाषा, काल्पनिक संवाद ह्याचा आधार न घेता प्रत्येक घटना तटस्थ भुमिकेतून अभ्यासण्याचा लेखकानी प्रयत्न केलाय.

मराठीतील सर्वश्रेष्ठ कथा संग्रहित केल्या गेल्या आहेत का? या धाग्यावर श्रेष्ठ कथांची देखील चर्चा केली जावी असे वाटते.
मला आवडलेल्या कथांपैकी काही:

विश्वनाथ एक शिंपी- वि वा शिरवाडकर
नागिण- चारूता सागर
विदूषक, प्रदक्षिणा- जि ए
किडके जग- गंगाधर गाडगीळ
आता आमोद सुनासी आले- दि. बा. मोकाशी
सूर्य- श्री दा पानवलकर
स्मशानातील सोनं- आण्णाभाऊ साठे

याच्यासाठी वेगळा धागा काढा ना दादा.

डॉ. वि. ना. श्रीखंडे यांचे "..आणि दोन हात" वाचतोय.

.

आईशप्पथ!! मुखपृष्ठ कसलं सुंदर आहे.

येस्स.. एकदम नाजूक आणि तरल म्हणावे असे.

माझी अत्यंत आवडती म्हणावी अशी दोन मुखपृष्ठे एकाच पुस्तकाची आहेत.

.

मराठी अनुवाद.

.

वरुण मोहिते's picture

23 Mar 2017 - 6:04 pm | वरुण मोहिते

संपादक माझी सक्खी मावशी आहे . उज्ज्वल निकामांपासून ते नरेंद्र जाधवांपर्यंत लेख आहेत . बऱ्यापैकी चांगलं पुस्तक आहे
ग्रंथाली पब्लिकेशन

पुस्तकातल्या मजकुरासोबत आतील चित्रे आवडत असतील तर,

१) क्रिएशन ऑफ वेल्थ - आर एम लाला - यात मारिओ मिरांडांची रेखाचित्रे आहेत
२) इन द वल्ड ऑफ इंडीयन मॅनेजर्स - शरू रांगणेकर - यात आर के लक्ष्मण यांची धमाल व्यंगचित्रे आहेत
३) बिझनेस महाराजे - गीता पिरामल - याचा मराठीत अशोक जैन यांनी अनुवाद केला आहे. या पुस्तकात धिरूभाई अंबानी, रतन टाटा, भरत व विजय शहा, बी एम खैतान, आदित्य बिर्ला यांची अप्रतीम रेखाचित्रे आहेत. (आणि ही चित्रे फक्त मराठी आवृत्ती मध्ये आहेत.)

अद्द्या's picture

24 Mar 2017 - 4:06 pm | अद्द्या

The Great Gatsby आणि Moby Dick

चे पीडीएफ मिळाले आहेत.
कोणाला हवं असेल वाचायला तर सांगा

धर्मराजमुटके's picture

24 Mar 2017 - 6:46 pm | धर्मराजमुटके

१. मिपाकर आतिवास यांचं 'भय इथले' - राजहंस प्रकाशन.
२. डेव्हीड बॅल्डासी यांच्या 'द एस्केप' या कादंबरीचा डॉ. अजित कात्रे लिखित मराठी अनुवाद - श्रीराम बुक एजन्सी
३. ख्रिस्तोफर रिच यांच्या ' रुल्स ऑफ डिसेप्शन्स' या कादंबरीचा दीपक कुलकर्णी लिखित मराठी अनुवाद - मेहता पब्लिशिंग हाऊस
४. पारायण करण्यायोग्य 'पाडस' या कादंबरीचा राम पटवर्धन लिखित मराठी अनुवाद - मौज प्रकाशन.

पुस्तक विकत घ्यायचा माझा क्रायटेरीया म्हणजे
अ. जास्तीत जास्त पाने असली पाहिजेत. खर्च करायला लागणार्‍या पैशात जास्तीत जास्त पाने विकत घेता येणे. (दळभद्री मध्यमवर्गीय मानसिकता... दुसरं काय ?)
पुस्तक जास्तीत जास्त वेळ वाचता आलं पाहिजे. साधारण ४०० पानांपेक्षा जास्त जाड असलेल्या कादंबर्‍या वाचायला प्राधान्य. म्हणजे अगदी ५-६ तासांचे मनोरंजन.
ब. कादंबर्‍या जास्त आवडतात. (भुतकाळात रमण्याची सवय, वास्तवापासून दुर पळण्याची हौस).
क. तिसरा क्रमांक कथासंग्रहांचा. एक कथा वाचायची, त्यात रमायचे, विचार करायचा नंतर दुसर्‍या कथेकडे जायचे. मात्र हे तुकड्या तुकड्याने वाचण्याचे लिखाण. कादंबर्‍या म्हणजे पहिले प्रेम. एकदा हातात घेतली की संपेपर्यंत खाली ठेवायचा विचार नाही करायचा.
क. परिचयातील व्यक्तींनी केलेले लिखाण.

जुन्या लेखकांचे लिखाण वाचन्यास प्रथम प्राधान्य. तुलनेने नवीन लेखकांच्या पुस्तकांना कमी प्राधान्य.

मात्र वरील सगळ्या नियमांना अपवाद असणारे बरेच वाचतो. मात्र अतिवाचनामुळे काय काय वाचलं हे लक्षात राहत नाही. पुनर्वाचनात १०-१५ पाने वाचल्यावर डोक्यात प्रकाश पडतो की, अरे ! हे पहिले एकदा वाचले आहे ! (अपवाद गदिमा, श्री. ना. पेंडसे आणि अजुन असे काही लेखक - कधीही पुनर्वाचन करण्यायोग्य)
स्त्रीयांवर मी फार अन्याय केलाय. (म्हणजे लेखिकांची पुस्तके जास्त वाचली नाहीत. अपवाद केवळ उमा कुलकर्णींनी अनुवाद केलेली भैरप्पांची पुस्तके. एकदम सुंदर अनुभव). मात्र आता ही चुक सुधारायची ठरवली आहे.

पारायण करण्यायोग्य 'पाडस' या कादंबरीचा राम पटवर्धन लिखित मराठी अनुवाद - मौज प्रकाशन.

काय मस्त पुस्तक आहे हो हे.. जबरदस्त. यातली भाषा इतकी सुंदर, तलम तितकीच वळणावळणाची. ज्योडी, पेनी, मा, बक आणि सारेच फॉरेस्टर्स, हुतो आजी, ऑलिव्हर हुतो आणि ज्योडीचा लाडका फ्लॅग. ही सारीच पात्रे, त्यांच्या जिवनातील छोटे-मोठे प्रसंग, त्यांचे लढे, संघर्ष, भट्टी अशी जुळून आलिये की बासच. आणि या सार्‍या कथेत नर्मविनोद आणि निसर्गाच्या उदात्त भव्यतेची पखरण आहे. लायब्ररीतून आणलेलं पुस्तक परत करूच न वाटल्याने त्यांच्याकडूनच विकत घेतलं :)). ह्या पुस्तकाला मराठीतील सर्वोत्कृष्ट अनुवाद का म्हणतात हे वाचल्यानंतर कळलं.

जुन्या लेखकांचे लिखाण वाचन्यास प्रथम प्राधान्य. तुलनेने नवीन लेखकांच्या पुस्तकांना कमी प्राधान्य.

सेम टू सेम..

एम.आय.टी मधील स्लोएन स्कूल ऑफ बिझनेसमधील मार्केटिंगचे प्राध्यापक डॅन एरीअली यांचे Predictably Irrational हे पुस्तक मध्यंतरी वाचले.

याच धाग्यात मी प्राध्यापक डॅनिएल कॅनेमन यांच्या एका पुस्तकाची ओळख करून दिली आहे. प्राध्यापक कॅनेमन आणि अ‍ॅमोस Tversky हे बिहेव्हिअरल इकॉनॉमिक्स या अर्थशास्त्रातील सध्या बरेच काम चालू असलेल्या शाखेचे संस्थापक असे म्हणायला हरकत नसावी. त्यांच्यापूर्वीही अर्थशास्त्र आणि मानसशास्त्र यांची सांगड घातली पाहिजे असे काहींनी म्हटले होते. पण या सगळ्याला मूर्त स्वरूप दिले या दोघांनी. प्राध्यापक डॅन एरीअली हे याच बिहेव्हिअरल इकॉनॉमिक्समध्ये काम करणारे प्राध्यापक आहेत.

बिहेव्हिअरल इकॉनॉमिक्सचा मुख्य गाभा हा की अर्थशास्त्रातील अनेक मॉडेल ज्या गृहितकावर आधारीत आहेत त्याप्रमाणे माणूस हा रॅशनल प्राणी नाहीच. त्यामुळे ही मॉडेल बदलायला हवीत. प्राध्यापक कॅनेमन हे मुळातले अर्थशास्त्रज्ञ नाहीत तर ते आहेत मानसशास्त्रज्ञ. तर प्राध्यापक डॅन एरीअली बी-स्कूलमधील प्राध्यापक आहेत. त्यामुळे कॅनेमन यांची उदाहरणे एकंदरीत मानवस्वभावाशी संबंधित आहेत. तर प्राध्यापक एरीअलींची उदाहरणे जास्त 'कमर्शिअल' (वस्तू विकणे/विकत घेणे याच्याशी संबंधित) आहेत.

पुस्तकाची सुरवात होते सापेक्षतावादाने. हा सापेक्षतावाद अर्थातच आईनस्टाईनचा सापेक्षतावाद नाही. इकॉनॉमिस्ट या मासिकाने काही 'सबस्क्रिप्शन ऑप्शन्स' दिले होते. ते होते-- फक्त ऑनलाईन सब्स्क्रिप्शन वर्षाला ५९ डॉलर, फक्त प्रिंट सबस्क्रिप्शन वर्षाला १२५ डॉलर तर ऑनलाईन आणि प्रिंट सबस्क्रिप्शन दोन्ही वर्षाला १२५ डॉलर. आता हे दोन्ही पर्याय १२५ डॉलरला असताना कोणीच नुसते प्रिंट सबस्क्रिप्शन घेणार नाही तर सगळे ऑनलाईन आणि प्रिंट अशी दोन्ही सबस्क्रिप्शन घेतील. मग असे असेल तर १२५ डॉलरला फक्त प्रिंट सबस्क्रिप्शन ठेवायचे तसे काहीच कारण नाही. तरीही ते का ठेवले? कारण माणसे निर्णय घेताना कुठल्या तरी बेसला सापेक्ष ठेऊन घेतात. म्हणजे नुसते प्रिंट सबस्क्रिप्शन १२५ डॉलर देण्यायोग्य आहे का की १२५ डॉलर म्हणजे महाग आहे? या प्रश्नाचे उत्तर देणे तितके सोपे नाही. पण त्याचवेळा १२५ डॉलरमध्ये प्रिंट आणि ऑनलाईन असे दोन्ही पर्याय मिळाले तर मुळातल्या बेसलाईनपेक्षा (प्रिंट) हा पर्याय नक्कीच अधिक चांगला वाटतो. त्यामुळे लोक १२५ डॉलर देऊन दोन्ही सबस्क्रिप्शन घ्यायची शक्यता जास्त. याविषयावरच टोरोंटोमधील रॉटमन स्कूल ऑफ बिझनेसचे प्राध्यापक दिलीप सोमण यांनी आणखी काम केले आहे. मॅकडॉनल्डसारख्या ठिकाणी स्मॉल, मिडिअम आणि लार्ज अशा तीन आकारात मिल्कशेक मिळतात. बहुतांश लोक मिडिअम आकाराचा मिल्कशेक घेतात. त्याचे कारण हे की स्मॉल आणि लार्ज मध्ये त्यांना सापेक्ष तुलना करता येते. स्मॉल म्हणजे खूप लहान वाटतो तर लार्ज म्हणजे खूप मोठा वाटतो. प्राध्यापक सोमण यांना लार्जपेक्षा मोठा अल्ट्रालार्ज आकाराचा मिल्कशेक उपलब्ध केला आणि स्मॉल काढला तर लोक उरलेल्या तीनमधील मध्यम आकाराचा (लार्ज) शेक घेतात असेही आढळले.

या पुस्तकात अनेक गोष्टी विविध प्रयोगांद्वारे दाखवून दिल्या आहेत. त्यातील एक म्हणजे ग्राहक एखादी गोष्ट फुकटात मिळणार असेल तर आणखी खरेदी करायला तयार होतात. मी स्वतः अमेरिकेत असताना अ‍ॅमॅझॉनवरून पुस्तके ऑर्डर करताना २५ डॉलरपेक्षा जास्त बिल झाल्यास शिपिंग फुकट असायचे म्हणून उगीचच काही पुस्तके ऑर्डर केली होती :) फक्त पांढर्‍या रंगाचे मोजे फुकटात मिळतील म्हणून अन्यथा जे बूट विकत घेतले गेले नसते ते ही विकत घेतले जातात असेही कधीतरी घडतेच.

आता बाहेर निघायचे आहे. तेव्हा या पुस्तकाविषयी आणखी दुसर्‍या प्रतिसादात लिहितो.

Ariely

या पुस्तकाविषयी काल लिहायला घेतले होते. पण मधूनमधून फोन कॉल्स येत होते आणि नंतर बाहेर जायचे असल्यामुळे प्रतिसाद पूर्ण करता आला नव्हता. तो आता पूर्ण करत आहे.

या पुस्तकात प्राध्यापक डॅन एरीअलींनी विविध प्रयोग करून त्याचे निष्कर्ष सादर केले आहेत. नकळत आपणही या प्रयोगांमध्ये सहभागी झालेल्यांप्रमाणेच वागू असे वाटून जाते. या पुस्तकातील दोन गोष्टींविषयी वरील प्रतिसादात लिहिले आहे. अधिक लिहित नाही कारण मग तो 'स्पॉईलर' होईल. पण वर दिलेल्या दोन उदाहरणावरून लक्षात येईल की बिझनेसेससाठी कितीतरी इनसाईट्स यातून मिळू शकतील. म्हणजे कुठच्या वस्तूंचे 'बंडलींग' करायचे,किंमत किती ठेवायची इत्यादी. लोक वस्तू विकत घेताना नक्की कुठल्या गोष्टींचा विचार करतात आणि तो कसा विचार करतात या गोष्टी कळल्या की त्याचा बिझनेससाठी नक्कीच उपयोग होईल. मार्केटिंग म्हणजे 'understanding the mind of customer' हे मी बी-स्कूलमध्ये शिकलो होतो. पण ग्राहकांचे खरोखरचे मानसशास्त्र बी-स्कूलमध्ये मी होतो तेव्हा तरी नव्हतेच. आता मागे वळून बघताना समजते की तो खूपच वरवरचा (सुपरफिशिअल) प्रकार होता.

प्राध्यापक डॅन एरीअलींना या विषयात रस कसा निर्माण झाला याची कहाणीही रोचक आहे. वयाच्या १८ व्या वर्षी एका अपघातात ते ७०% भाजले आणि त्यानंतरची ३ वर्षे ते हॉस्पिटलमधील बर्न वॉर्डमध्ये होते. त्यांच्यामते या काळात ते 'दुसर्‍या ग्रहावर' असल्यासारखे होते म्हणजे त्यांचे जग वेगळे आणि इतरांचे जग वेगळे होते. या काळात त्यांना त्यांच्या पूर्वीच्या (आणि इतरांच्या) जगाविषयी अधिक तटस्थपणे विचार करता आला. त्यातूनच माणसाच्या विचार करायच्या पध्दतीविषयी त्यांना अधिक इनसाईट मिळाल्या.

प्राध्यापक डॅन एरीअली म्हणतात की मनुष्यप्राणी हा इररॅशनल आहेच पण तो कुठल्या प्रकारे आणि कधी इररॅशनल पध्दतीने वागू शकेल याचा अंदाजही आपल्याला बांधता येऊ शकतो. म्हणूनच या पुस्तकाचे नाव Predictably Irrational आहे. आपण सगळेच स्वतःला वस्तुनिष्ठ (रॅशनल) समजत असतो. विशेषतः गणितामध्ये गती असलेले थोडे जास्तच आणि विज्ञानाशी संबंधित शाखांमध्ये उच्चशिक्षण घेतलेले अजूनच जास्त. पण आपण आपल्याला वाटतो तितके रॅशनल नाही. अनेकदा आपण अनेक गोष्टी नकळतपणे करून जातो आणि आपल्याच वागण्यातील विसंगती आपल्या लक्षातही येत नाही याचा उलगडा या पुस्तकात वेळोवेळी होतो आणि खरोखरच धक्का बसतो.

वर म्हटल्याप्रमाणे या पुस्तकात अनेक प्रयोगांचा उल्लेख केला आहे. समजा आपण त्या प्रयोगांमध्ये सामील झालो असतो तर आपण नक्की कसे वागलो असतो याची त्या प्रयोगाचा रिझल्ट बघण्यापूर्वी नोंद करून ठेवल्यास आणि नंतर त्या प्रयोगांमध्ये प्रत्यक्ष सामील झालेल्यांचे वर्तन आणि अर्थातच रॅशनॅलिटी यातील तुलना बघितली तर या पुस्तकाचा सर्वात जास्त परिणाम जाणवेल.

तेव्हा वाचायलाच हवे प्राध्यापक डॅन एरीअलींचे Predictably Irrational. माझाकडून या पुस्तकाला १० पैकी १० मार्क. त्यांची वेबसाईट http://danariely.com/ आहे. त्या वेबसाईटवर नवीन प्रयोग आणि निष्कर्षांविषयी ते लिहितात.

ही परिक्षणे वाचतो आहे... नंतर कधीतरी वाचायच्या पुस्तकांच्या लिस्टमध्ये ही सगळी पुस्तके नक्की असतील इतकी प्रभावी ओळख आहे..!

स्मृतीजागर हे मधु मंगेश कर्णिकांचे छोटेखानी पुस्तक आणखी एकदा वाचले.

पुलं, जयवंत दळवी, बाबूजी, कुसुमाग्रज, व्यंकटेश माडगुळकर, तर्कतीर्थ, श्री ना पेंडसे, श्री पु भागवत, मधू दंडवते अशा १६ दिग्गज लोकांची व्यक्तीचित्रे, आठवणी आहेत.

.

मागच्या आठवड्यात संजय बारू यांचे the accidental Prime Minister वाचले

संजय बारू 2004 ते 2008 पंप्र मनमोहन सिंग यांचे मीडिया अडवाईजर होते

पुस्तक वाचून धक्का बसला. UPA 1 आणि 2 मध्ये कशाप्रकारे मनमोहन सिंग यांचे व्यवस्थित खच्चीकरण केले गेले याचे चित्रण आहे

UPA 2 मुळे मनमोहन सिंग यांची प्रतिमा ज्याप्रकारे खालावली ते अयोग्य वाटल्याने बारू यांनी हे पुस्तक लिहिले

पुस्तकाच्या शेवटी मनमोहन सिंग यांवर policy paralysis बद्दल आणि भ्रष्टाचाराबद्दल खरमरीत टीका केली आहे

पुस्तक 2014 च्या प्रचाराच्या वेळीस; अत्यंत चुकीच्या वेळेला आले आणि भाजपाने या फुलंटॉसचा व्यवस्थित वापर करून घेतला

UPA-2 PMO ने हे पुस्तक नाकारले आणि काल्पनिक आहे अशी टीका केली