(३) डेटा लॉस - ऑपरेटिंग सिस्टम ने हार्ड डिस्क डिटेक्टच केली नाही तर

केंट's picture
केंट in तंत्रजगत
5 Feb 2017 - 12:35 pm

"आता ऑपरेटिंग सिस्टम ने हार्ड डिस्क डिटेक्टच केली नाही तर ? "

या पूर्वीच्या सॉफ्टवेअर प्रोसेस आपण घरच्या घरी करू शकतो. आता या पुढील प्रोसेस , महत्वाचा डेटा असलेल्या हार्डडिस्क वर करू नये. काही प्रश्न असल्यास इथे विचारावेत.

ऑपरेटिंग सिस्टम ने हार्डडिस्क डिटेक्टच केली नाही तर सॉफ्टवेअर प्रोसेस निरूपयोगी आहे.अश्या वेळेस हार्ड डिस्क खालील सिंप्टम्स दाखवते का ते नोंद करावे
1. हार्ड डिस्क मधे आत प्लॅटर फिरत असल्याचा आवाज येत आहे का ?
2. हा आवाज काही वेळेत बंद होऊन डिस्क फिरण्याची बंद होते आहे का ?
3. फिरण्याच्या वेळेत क्लिकिंग चा आवाज येतो का ?
4. किती क्लिक नंतर हार्डड्राइव फिरायाची बंद होते.
5. PCB चा कुठलाही भाग गरम होतोय का ?
6. हार्ड्ड्राइव computer -> Manage - > Disk Management मधे दिसत आहे का ?
जर दिसत असल्यास ड्राइव दाखवतेय की अन्अलोकेटेड असे दर्शवतेय
7. usb ड्राइव असल्यास लाईट ब्लिंक होतोय का. ?

काही अड्वान्स diagnosis प्रोसेस

तुम्ही हार्डड्राइव च्या डेटा आणि पॉवर केबल जवळ सोनेरी रंगाच्या 4 किंवा अधिक पिन्स बाहेर आलेल्या बघितलीये का ? IDE हार्ड ड्राइव मधे जिथे आपण जंपर सेट्टिंग्स करतो त्या ह्याच पिन्स. SATA ड्राइव मधे पण ह्या पिन्स असतात.

ह्या पिन्स मधे एक पीन Transmitter , एक पीन receiver आणि एक पीन ground असते. ह्या पिन्स व्दारे हार्ड ड्राइव ला प्रोग्रॅम करणे, एरर रिपोर्ट काढणे, हार्ड डिस्क ला फॅक्टरी मोड मधे ऑपरेट करणे शक्य होते. त्या साठी टर्मिनल सॉफ्टवेर ( Hyper Terminal , Putty etc. ) आवश्यक आहे. nokia ची केबल DKU-5 किंवा CA-42 वापरुन USB serial TTL बनवता येते. त्याच्या साहाय्याने टर्मिनल वरील आउटपुट वाचता येते. Segate ची Barracuda 7200.10 मॉडेल ची हार्ड ड्राइव ह्या प्रकारे डायग्नोस करणे सर्वात सोप्पे आहे. अर्थात सगळ्या हार्डड्राइव ना नोकिया केबल चालत नाही.

आता समजा हार्ड ड्राइव डिटेक्ट होत नाहीए पण स्पींनीग व्यवस्थित चालू आहे.. क्लीकिंग पण होत नाहीए . तेव्हा ज्या प्रमाणे टेंपेररी , cache फाइल्स मुळे कंप्यूटर हॅंग होतो त्या प्रमाणे हार्ड डिस्क पण हॅंग होण्याची शक्यता असते. पण फरक येव्हडाच की हार्ड ड्राइव डेटा मुळे हॅंग न होता एरर लिस्ट मुळे होते.
हार्डड्राइव जेव्हा कार्यरत असते तेव्हा एरर असलेल्या सेक्टर चा पत्ता नोंद करून ठेवते, जेणेकरून डेटा एरर सेक्टर वर लिहाला जाउ नये. ही एरर लिस्ट ओवरफ्लो झाली की हार्ड ड्राइव busy मोड ला जाते. मग प्रतिक्रिया करणे बंद करते. टर्मिनल सॉफ्टवेर व USB serial TTL वापरून ही एरर लिस्ट क्लियर केली की ड्राइव परत वर्किंग मधे येते. पण हे करताना चुकून फॅक्टरी सेट्टिंग मधली एरर लिस्ट क्लियर झाली तर हार्ड डिस्क चे कॅलिब्रेशन निघून जाउ शकते.
ज्या प्रमाणे सी ,सी++ मधे कमान्ड्स असतात, त्या प्रमाणे , हार्ड ड्राइव ऑपरेट करण्यासाठी पण कमान्ड्स असतात. ह्या कमान्ड्स हार्ड ड्राइव मॉडेल अँड कंपनी प्रमाणे बदलतात.

काही शंका असल्यास विचाराव्यात अथवा पुढे जावुयात.

प्रतिक्रिया

जर का क्लिकिंग होत असेल, तर काय उपाय करता येईल?

फिरण्याच्या वेळेत क्लिकिंग चा आवाज येतो का ?
हे बहुधा अ‍ॅक्टोआर्म { actuator arm } / स्विंग आर्म ची पुंगी वाजली असेल तर असा आवाज येउ शकेल.
हे समजण्यासाठी खालील इडियो नक्की पहा. :)

काही काळामधुन डिस्कवर बॅड सेक्टर क्रिएट झाले आहेत का ? ते पहा.
हे कमांड प्रॉम्टमध्ये जाउन करता येउ शकते. विंडोज मध्ये डाव्या साईडला खाली असलेल्या स्टार्ट बटन वर क्लिक करा किंवा किबोर्डवर असलेले विंडोजचे चिन्ह असलेले बटन दाबा.
तुम्हाला ऑल प्रोग्राम्सच्यावर पहिलाच पर्याय कमांड प्रॉम्ट दिसेल त्याच्यावर राईट क्लिक करुन रन अ‍ॅज administrator या पर्यायावर क्लिक करा.
समजा तुम्हाला कमांड प्रॉम्ट प्रॉग्राम्सच्या लिस्ट मध्ये दिसला नाही तरी काही हरकत नाही, स्टार्ट बटन क्लिक केल्यावर पहिला जो सर्चचा पर्याय दिसतो त्यात cmd असे टाईप करा. तुम्हाला वरती कमांड प्रॉम्टचा काळा आयकॉन दिसेल त्यावर राईट क्लिक करुन रन अ‍ॅज administrator या पर्यायावर क्लिक करा.

आता बहुतेक स्कीनवर बहुतेक खालील प्रमाणे लाईन्स दिसतील, किंवा त्यात थोडा फार फरक असु शकेल.
C:\Windows\system32> मी C:\ ला मुव्ह व्हायचे ठरवतो. { हे केले नाही तरी चालतं }
C:\Windows\system32>cd.. { कमांड टाईप करुन झाल्यावर एंटर की प्रेस करा.}
C:\Windows>cd.. { कमांड टाईप करुन झाल्यावर एंटर की प्रेस करा.}
C:\>
आता इथे मी खालील कमांड टाईप करतो
C:\>sfc /scannow { कमांड टाईप करुन झाल्यावर एंटर की प्रेस करा.}
स्कॅनिग चालु होईल आणि स्कॅन पूर्ण झाल्यावर जर काही एरर सापडला नाही तर खालील प्रमाणे मेसेज दिसेल :-
Beginning system scan. This process will take some time.

Beginning verification phase of system scan.
Verification 100% complete.

Windows Resource Protection did not find any integrity violations.
जर काही सापडल्यास ते अ‍ॅटोमॅटिक फिक्स केले जाईल आणि बहुधा ते शक्य नसेल तर त्याचा एरर लॉग लिहला जातो.

असाच दुसरा कमांड आहे chkdsk हा चेकडिस्क कमांड आहे.यात तुम्हाला फाईल्स, इंडेक्स, बॅड सेक्टर इं गोष्टींची माहिती मिळेल.

C:\>chkdsk { कमांड टाईप करुन झाल्यावर एंटर की प्रेस करा.}
हा कमांड रन केल्यावर अंदाजे खालील प्रमाणे माहिती मिळेल. :-
C:\>chkdsk
The type of the file system is NTFS.

WARNING! F parameter not specified.
Running CHKDSK in read-only mode.

CHKDSK is verifying files (stage 1 of 3)...
281344 file records processed.
File verification completed.
515 large file records processed.
0 bad file records processed.
2 EA records processed.
64 reparse records processed.
CHKDSK is verifying indexes (stage 2 of 3)...
347334 index entries processed.
Index verification completed.
0 unindexed files scanned.
0 unindexed files recovered.
CHKDSK is verifying security descriptors (stage 3 of 3)...
281344 file SDs/SIDs processed.
Security descriptor verification completed.
32996 data files processed.
CHKDSK is verifying Usn Journal...
37131336 USN bytes processed.
Usn Journal verification completed.
Windows has checked the file system and found no problems.

244093951 KB total disk space.
54130404 KB in 128371 files.
84440 KB in 32997 indexes.
0 KB in bad sectors.
393167 KB in use by the system.
65536 KB occupied by the log file.
189485940 KB available on disk.

4096 bytes in each allocation unit.
61023487 total allocation units on disk.
47371485 allocation units available on disk.

तुम्ही खालील प्रकारे देखील या पर्यांयांचा वापर करु शकता.
C:\>chkdsk /R { कमांड टाईप करुन झाल्यावर एंटर की प्रेस करा.} :- {याचा उपयोग बॅड सेक्टर लोकेट करण्यासाठी होतो. तसेच रिडेबल इन्फरमेशन रिकव्हर करता येते. }

C:\>chkdsk /F { कमांड टाईप करुन झाल्यावर एंटर की प्रेस करा.} :- { याचा उपयोग डिस्कवरचे एरर फिक्स करण्यासाठी होतो. }

समजा वरील पैकी कोणताही कमांड रन करताना तुम्हाला खालील मेसेज दिसला तर :-
The type of the file system is NTFS. { इथे माझी फाईल सिस्टीम एनटीएफएस आहे, वापरकर्त्याची दुसरी असु शकते.}
Cannot lock current drive.

Chkdsk cannot run because the volume is in use by another
process. Would you like to schedule this volume to be
checked the next time the system restarts? (Y/N)
इथे तुम्ही y टाईप करा आणि एंटर कि प्रेस करा. तुम्ही तुमचा पिसी लगेच रिस्टार्ट केला तर किंवा जेव्हा केव्हा तुम्ही पिसी या नंतर बुट कराल तेव्हा सुरवातीलाच हे कमांड रन होतील आणि त्याप्रमाणे सिस्टीम चेक केला जाईल.
वेळ लागला तरी चिंता नाही, इतर कोणतीही बटन न दाबता प्रोसेस पूर्ण व्हायला वेळ ध्या.

जाता जाता :- एसएसडी ड्राईव्हवर डिस्क डिस्क डिफ्रॅगमेंट रन करु नये त्याने ड्राइव्हचा परफॉर्मन्स आणि आयुष्य कमी होते.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- धागे तोड़ लाओ चांदनी से नूर के, घूंघट ही बना लो रौशनी से नूर के... :- Jhoom Barabar jhoom

अजुन एक इडियो ध्यायची इछा झाली... { हार्डसिस्कला हॅडल करता झटके / पडणे इं प्रकार का करु नयेत किंवा घडु नये. याची काळजी घेण्याचे कारण आणि इतर माहिती देखील मिळेल.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- धागे तोड़ लाओ चांदनी से नूर के, घूंघट ही बना लो रौशनी से नूर के... :- Jhoom Barabar jhoom

इरसाल कार्टं's picture

5 Feb 2017 - 5:41 pm | इरसाल कार्टं

छान माहिती.

मदनबाण बढिया काम कर रहे हो।

एस's picture

9 Feb 2017 - 5:48 pm | एस

उपयुक्त माहिती.

गणेश उमाजी पाजवे's picture

9 Feb 2017 - 11:07 pm | गणेश उमाजी पाजवे

माझी ५०० जीबी ची सिगेट बॅराकुडा हार्ड डिस्क चालत नाही आहे. पीसी ऑन केला तर विंडोस ७ लोगो वरच हँग होतो पीसी आणि स्लेव्ह IDE ला लावली तर तिचे सगळे local drives दिसतात, त्यातले फोल्डर्स पण दिसतात पण डेटा ऍक्सेस करायला गेलं तर सगळं हँग होत. डिस्क मनजमेंट मधेही डिस्क शो होत नाही. हेल्प हेल्प प्लिज !!!

हार्ड ड्राइव ची असेंब्ली व्यवस्थीत असावी. रिकवर करण्या पलीकडील बॅड सेक्टर कींवा ट्रान्सलेटर चा प्रॉब्लेम असु शकेल.. हार्ड डिस्क ची कंपनी , मॉडेल नंबर कळू शकेल का ?
हया हार्ड ड्राइव वर बूटिंग करू नका.. सेकेंडरी लावून डेटा रिकवरी करावी लागेल. डेटा कॉपी करताना कोणता एरर मेसेज येतो. ?

सिगेट बॅराकुडा समोर कोणता नंबर आहे ?