(२) डेटा लॉस - अर्थात् हार्ड डिस्क फेल होणे

केंट's picture
केंट in तंत्रजगत
4 Feb 2017 - 9:46 pm

सर्वप्रथम माझा उत्साह वाढवल्या बद्दल धन्यवाद् .

समस्या क्र 1. हार्डडिस्क वर्किंग आहे पण डेटा डिलीट झाला आहे. किंवा हार्ड ड्राइव फॉरमॅट झाली आहे..

इंटरनेट वर उपलब्ध अनेक सॉफ्टवेअर जसे की r-studio , recover my data , EaseUS Data Recovery, इत्यादी वापरुन डेटा रिकवर करता येऊ शकतो..
आता डेटा रिकवरी सॉफ्टवेअर आणि आपल्या हार्ड ड्राइव ह्यांच्या मधे संगणकाची ऑपरेटिंग सिस्टम आहे.. याचा अर्थ संगणकाच्या ऑपरेटिंग सिस्टम ने सर्व प्रथम हार्ड ड्राइव डिटेक्ट केली पाहिजे.. मग डेटा रिकवरी सॉफ्टवेर आपले काम करू शकतो..

डेटा दोन प्रकारे रिकवर होऊ शकतो

एक ) फाइल सिस्टम --> फाईल सिस्टम मधे फोल्डर स्ट्रक्चर जसेच्या तसे मिळते . जसे की सब फोल्डर, सब सब फोल्डर ई.

दोन ) रॉ डेटा --> समजा सॉफ्टवेअर ला फोल्डर स्ट्रक्चर मिळाले नाही.. तर ज्या सिंगल फाइल्स जसे की इमेजस , ऑफीस फाइल्स , notepad फाइल, ई. चे हेडर्स स्कॅन केले जातात आणि फाइल्स सेक्टर वरुन जमा केल्या जातात.. ह्या प्रोसेस मधे फोल्डर स्ट्रक्चर बायपास केले जाते, आणि सेक्टर स्तरावर डेटा रिकवरी केली जाते.

पण जर कॉंपाउंड फाइल जसे की sql database , tally फाइल्स ई. ज्या मधे प्रोग्रॅम एकाहून अधिक फाइल्स मिळून रन होतो , त्या परिस्थिती मधे रॉ फाइल रिकवरी निष्कामी ठरते.

"आता ऑपरेटिंग सिस्टम नेच हार्ड डिस्क डिटेक्ट केली नाही तर ? "

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

5 Feb 2017 - 6:38 am | तुषार काळभोर

अजून वाईच डिट्टेलवार अन वाईच मोठं मोठं भाग टका की शेठ!

केंट's picture

5 Feb 2017 - 10:24 am | केंट

लिहायची प्रॅक्टीस होतेय आता :)

एक महत्वाचे,
कुठल्याही परिस्थिती मधे , सॉफ्टवेर ने रिकवरी करताना डेटा , पुन्हा त्याच हार्डडिस्क मधे सेव करू नये. दुसर्‍या हार्ड डिस्क मधे रिकवरी पाथ द्यावा. कारण जर रिकवरी फेल झाली तर अर्धवट रिकवर झालेला डेटा , जुन्या डेटा सेक्टर ला पुर्नलेखित ( overwrite) करेल, आणि तेव्हा जुना डेटा रिकवर करणे अशक्य होऊन बसेल.

इरसाल कार्टं's picture

5 Feb 2017 - 5:27 pm | इरसाल कार्टं

बरेच जण हि चूक करतात