(२) अकाउंट्स कसे लिहावेत ( अकाउंट बुक्स आणि एन्ट्रीज )

कंजूस's picture
कंजूस in तंत्रजगत
2 Feb 2017 - 10:20 pm

२) अकाउंट्स कसे लिहावेत ( बुक्स आणि एन्ट्रीज )

मागच्या (१) अकाउंट्स ( सुरुवात आणि तयारी ) लेखामध्ये अकाउंट्सची जुजबी माहिती घेतली. आता त्यासाठी लागणारी बुक्स आणि त्यात नोंदी कशा करायच्या ते शिकुया.

अकाउंट्स लिहिण्यासाठी लागणारी बुक्स आणि त्यांचे रुलिंग ( आखणी )-

१ ) जर्नल अथवा नोंदवही
यांमध्ये नोंदी करून रिसिट्स "सोर्स डॅाक्युमेंट रेकॅार्डस" फाइलमध्ये ठेवणार आहोत.

एका मोठ्या वहीत पानावर उजवीकडे क्रेडिट,डेबिट रक्कम लिहिण्यासाठी दोन कॅालम, एक छोटा L.F. ( ledger folio ) ,डावीकडे अनुक्रमांक आणि तारखेचा कॅालम, विवरण ( particulars चा मोठा कॅालम असतो.

२ ) कॅश-इन-हँड बुक
एका छोट्या वहीत उजवीकडून शिल्लक, जमा रक्कम,खर्च रक्कम, विवरण, तारीख, अनुक्रमांक असेल.

३ ) कॅश बुक.

कॅश बुकची आखणी ( रुलिंग ruling)

बाजारात काही प्रिंटेड तयार बुक्स मिळतात तरी स्वत: एक मोठे रेजिस्टर ( फुलस्केप पेपर्सची शंभर पानांची वही घेऊन आखणी ( ruling ) केल्यास काम समजायला मदत होईल. कॅशबुकमध्ये समोरासमोरची पाने एका महिन्यासाठी लागतात. फक्त उजवीकडच्या पानाच्या वरच्या कोपय्रात १,२,३,४...२७,२८ असे क्रमांक टाकावेत. पानाचा उजवीकडचा भाग क्रेडिट ( Credit /Cr. )साठी असतो. वरती Cr. लिहा. तीनतीन सेंमीचे दोन कॅालम बँक आणि कॅशसाठी सोडावेत. अनुक्रमांक (S no), Date, Particulars, L.F. असे कॅालम असतील. हेच कॅालम डाव्या पानावर येतात परंतू वरती डावीकडे Dr. लिहावे Debitसाठी.
सर्वात वर मध्यभागी महिन्याचे नाव जानेवारी ,जून वगैरे येईल.

४ ) लेजर.

लेजरची आखणी ( ruling )
इथे एका पानावर एक अकाउंट असते. त्यामुळे प्रत्येक पानाला अनुक्रमांक द्यावेत. जेव्हा कॅशबुकच्या L.F. कॅालममध्ये एखाद्या नोंदीसाठी १५ आकडा असेल तर ती या लेजरच्या १५व्या पानावर सापडेल. इथल्या एखाद्या नोंदीचा J.F. नंबर ६ असेल तर याची सुसंगत नोंद ( corresponding entry) कॅशबुकच्या ६व्या पानावर सापडेल असे J.F. आणि L.F. परस्परसंबंधी असतात. ( cross reference).
लेजर अकाउंटसाठी 'T' form ruling असते. पानाच्या मध्यभागी दुहेरी रेघेने डावीकडे डेबिट(Dr.), आणि उजवीकडे क्रेडिट(Cr.) असे दोन भाग करतात. छोट्याशा जागेत तारीख,विवरण, J.F. आणि रक्कम (amount) कॅालम करायचे.

फोटो
१ ) जर्नलची आखणी (रुलिंग) आणि काही नोंदी.

२ ) कॅशबुकचे क्रेडिट साइड पान

३ ) कॅशबुकचे डेबिट साइड पान

४ ) लेजर अकाउंट मेडिकल इक्सपेन्सिज a/c

५ ) लेजर अकाउंट काकांचे अकाउंट

~~~~~

आपण अगोदर बँक पासबुकात पाहिलेच आहे की डेबिट आणि क्रेडिट अकाउंटींगच्या मुख्य संज्ञा आहेत. त्याची व्याख्या आणि कोणती रक्कम डेबिट / क्रेडिट होते याची जंत्री देण्यापेक्षा एक उदाहरण घेतले तर समजण्यास सोपे होईल. या उदाहरणातले आर्थिक व्यवहार दोन पद्धतीने लिहून काढल्याने बुक कीपिंग समजेल.

उदाहरण : -
विश्वासच्या काकांचे हॅास्पिटलमध्ये ओपरेशन आहे आणि त्यांनी विश्वासला सांगितले की तू माझे हॅास्पिटलचे बिल भरणे, औषधे आणणे वगैरे कर. त्यासाठी पैसे लागतील म्हणून काकांनी विश्वासला तीन क्रॅास्ट चेक त्याच्या नावे दिले आहेत. चेक्स प्रत्येकी पंचवीस हजारांचे आहेत. आता हा व्यवहार करून उरलेले पैसे काकांना नंतर परत करायचे आहेत.
प्रत्यक्ष असा व्यवहार झाला-
--- नोंदी ----
१) २०१६ डिसेंबर १ -
काकांच्याकडून प्रत्येकी २५००० हजार रुपयांचे तीन ( क्रॅास्ट चेक्स विश्वासला मिळाले.)
२ ) डिसेंबर १- एक चेक रु २५००० विश्वासने त्याच्या स्वत:च्या बँक अकाउंटला डिपॅाझिट केला.
३ ) डिसेंबर ५ - विश्वासने बँकेतून २५००० रोख काढून आणली.
४ ) डिसेंबर ५ - वरदान हॅास्पिटलमध्ये रु दहा हजार डिपॅाझिट भरले.
५ ) डिसेंबर ५ - केमिस्टकडून रु २००० औषध खरेदी.
६ ) डिसेंबर ५ -काकांच्या सोसायटीचे बिल रु २५०० आले आहे.
७) डिसेंबर ५ - इलेक्ट्रिक बिल रु १५०० आले आहे.
८) डिसेंबर ६ - पॅथॅालजी लॅब बिल मिळाले रु ४०००
९) डिसेंबर ६ - दुसरा चेक विश्वासने त्याच्या स्वत:च्या बँक अकाउंटला डिपॅाझिट केला. रु २५०००
१० ) डिसेंबर ७ - केमिस्टकडून रु ८००० औषध खरेदी.
११ ) डिसेंबर ९ - विश्वासने बँकेतून २५००० रोख काढून आणली.
१२ ) डिसेंबर १० - पॅथॅा लॅब बिल भरले रु ४०००
१३ ) डिसेंबर १३ - वरदान हॅास्पिटलचे बिल मिळाले रु ३०००० आणि भरले रु २००००
१४) डिसेंबर १४ - सोसायटी मेंटेनन्स भरले रु २५००
१५) डिसेंबर १४ -इले बिल भरले रु १५००

सर्व हिशोब विश्वासने काकांना दिला.

हे दोन पद्धतींनी करणार आहोत.
अ ) साधीसोपी कॅश- इन - हँड अर्थात जमाखर्च रीत.
ब ) डबल एन्ट्री बुक कीपिंग रीत.

________________________________________

अ )साधीसोपी कॅश- इन - हँड अर्थात जमाखर्च रीत.

तारीख - -----विवरण------------शिल्लक रु

डिसेंबर ५ --बँकेतून रोख आणली 25000.00
25000.00
डिसेंबर ५ -- हॅा० डिपो. भरले - 15000.00
- 10000.00

डिसेंबर ५ औषध खरेदी.... 13000.00
- 2000.00

डिसेंबर ७ --औषध खरेदी.......... 5000.00
8000.00

डिसेंबर ९ ...बँकेतूनकाढले......... 30000.00
25000.00

डिसेंबर १०.. .पॅथा बिल भरले 26000.00
4000.00

डिसेंबर १३.. हॅास्पि० बिल भरले 6000.00
20000.00

डिसेंबर १३..सोसायटी मेंटे० दिला 3500.00
2500.00

डिसेंबर १३..इले० बिल भरले। 2000.00
1500.00. ========

________________________________________

ब ) डबल एन्ट्री बुक कीपिंग रीत.

डिसेंबर १ :-
जे तीन चेक्स मिळाले आहेत त्याची नोंद जर्नलमध्ये करायची आहे. इथे दोन व्यवहार झालेत. तिनांपैकी एक चेक( क्रमांक १२१ म्हणू) विश्वासने त्याच दिवशी त्याच्या बँकेत भरला आहे. बाकी दोन तसेच ठेवले आहेत. जर्नलमध्ये अनुक्रमांक १ - तारीख २०१६ डिसेंबर १ पुढे "बँक अकाउंट Dr." - डेबिट रकान्यात 25000.00 लिहिले जाईल, खाली ......."To Credit काकांचे अकाउंट" --क्रेडिट रकान्यात 25000.00 येईल. ( काकांचा चेक ( क्र १२१) डिपॅाझिट केला) हे विवरण लिहून एक ओळ सोडायची. याची बँकेने छप्पा मारून दिलेली काउंटरफॅाइल "सोर्स डॅाक्युमेंट फाइलला लावायची आहे.

[ *टीप* जर्नल एन्ट्रीचा पुरावा फाइलमध्ये आणि त्या डॅाक्युमेंटची नोंद जर्नलमध्ये असं सुसंगत ( corresponding ) काम झालं. इथेच चूक झाली अथवा पुरक नसेल तर बुककीपिंगचा पुढचा डोलारा कोसळतो. बरेच व्यवहार होणाय्रा कंपन्यांत ही अचुकता फार महत्त्वाची आहे.]

डिसेंबर १ :-अजून दोन नोंदी याच तारखेला होणार आहेत. जे दोन चेक बँकेत भरले नाहीत त्यासाठी दोन नोंदी.
अनुक्रमांक २ ( S .No 2)-
डिसेंबर १- "Debit cash अकाउंट Dr. " debit रकान्यात 25000.00,
............" To Credit काकांचे अकाउंट" Credit रकान्यात 25000.00
( चेक नं १२२ काकांकडून मिळाला)
हा चेकच डॅाक्युमेंट फाइलमध्ये ठेवायचा.

अशीच तिसय्रा चेकची नोंद करायची.
[* टीप* चेक क्रॅास्ट असले तरी ते भरले नाहीत तर ते "कॅश"च समजतात. उलट पहिला चेक बँकेत वटल्यावर ( realise ) बँक बॅलन्स वाढेल. ]

नोंद क्र ४)
डिसेंबर ५:-" कॅश अकाउंट डेबिट Dr." -25000.00
....To Credit bank a/cc ...25000.00
( बँकेतून रु २५००० रोख आणली।)

६) डिसेंबर ५:"डेबिट वरदान हॅास्पिटल Dr...10000.00
....To Credit cash अकाउंट ... 10000.00
( हॅास्पिटलला डिपॅाझिट भरले। रिसीट नं xxxxc)

[*टीप* बँक पासबुकात या उलट नोंद दाखवेल. आपला बॅलन्स कमी होईल आणि २५०००डेबिटला दाखवेल.
कॅशबुकातली कॅश डेबिट साइडला असली तरी त्यात त्या दोन चेकच्या रकमाही आहेत. अगदी खरीच कॅश हातात किती आहे हे कॅश-इन- हँड वहितल्या शिल्लकवरून कळते. अर्थात बुक कीपिंगमध्ये कॅशिअर व्यक्तिला ही वही ठेवावी लागतेच.]

या नोंदी केल्यावर या नोंदी लेजरमधल्या योग्य अकाउंट्सच्या योग्य डेबिट/क्रेडिट खाली लिहाव्या लागतात. यास "पोस्टिंग" ( posting the entries) म्हणतात.

# लगेच पोस्टिंग करुया. लेजर रेजिस्टरमध्ये तयार केलेली कोरी अकाउंट्स आहेत. तिथे उदा० वरती "काकांचे अकाउंट" लिहून क्रेडिटखाली पहिली रक्कम 25000.00, तारीख ,particulars : By bank a/c येईल. दुसय्रा आणि तिसय्रा चेकसाठी By cash a/c असेल.

# हॅास्पिटलचे अकाउंट उघडून डेबिट मध्ये 10000.00 लिहून विवरण to cash accअसेल.

# लेजर अकाउंटस ज्या पानावर आहेत तो पानक्रमांक जर्नल अथवा कॅशबुकमध्ये नोंदीसमोर L.F. या रकान्यात लिहायचा. आणि तिकडचा पान क्रमांक लेजरमधल्या नोंदी समोर J.F. रकान्यात लिहायचा.

# काकांनी ७५००० दिले आहेत परंतू त्याचा काहीच मोबदला परत केलेला नाही त्यामुळे ते क्रेडिटर आहेत. हॅास्पिटलला रु दहा हजार दिले आहेत परंतू त्यांचेकडून काहीच परतावा अजून नाही त्यामुळे हॅास्पिटल आता डेटर आहे.

७) डिसेंबर ५: " डेबिट मेडिकल इक्सपेन्सिज अकाउंट" Dr.... 2000.00
....To Credit cash acc....2000.00
( औषध खरेदी रु 2000.00)
[ *टीप*
याचे पोस्टिंग लेजरमध्ये त्या नावाच्या अकाउंटला डेबिटला होईल. ]

समजा आता या क्षणाला "बॅलन्स शीट" केली तर -

काका ७५००० वजा २००० = ७३०००ला क्रेडिटसाइड( Liability] असतील. तर विश्वासकडे ६३००० कॅश आणि १०००० ची हॅास्पिटलची रिसिट असेल. काकांना दोन हजारचा मोबदला औषधरूपात मिळालाय त्यामुळे त्यांचे क्रेडिट दोन हजारांनी कमी झाले. असा आर्थिक व्यवहाराचा ठोकताळा कोणत्याही एका तारखेला/क्षणाला घेता येतो.

डिसेंबर ५ च्या दोन नोंदी बाकी आहेत त्या केल्यावर पाहू.
८ ) डिसेंबर ५ : "अदर इक्सपेन्सिज अकाउंट डेबिट" Dr....2500.00
...To Credit "bills payable a/cc.2500.00
(सोसायटी मेंटेनन्स बिल मिळाले.र 2500.00)

९ ) डिसेंबर ५ :"अदर इक्सपेन्सिज अकाउंट डेबिट" Dr..1500.00
...To Credit "bills payable a/cc"..1500.00
( इलेक्ट्रिक बिल मिळाले )

[* टीप : ही दोन बिले मिळालीत पण लगेच त्याविवशी भरली गेलेली नाहीत. त्यामुळे कॅश कमी झाली नाही. सर्व खर्च मग ते केलेले असोत अथवा त्याकाळात लागू झालेले असतील ते खर्च म्हणूनच धरतात आणि ते डेबिट समजायचे असा संकेत /( convention ) आहे. इथे इक्सपेन्सिज अकाउंट डेबिट झाले आहे. बिल्स पेयबल अकाउंट क्रेडिट झाले म्हणजे हे पैसे देय आहेत असा अर्थ आहे.
इथे अकाउंटंन्सीच्या अक्रुअल(accrual system) सिस्टमचा प्रभाव आहे. आपला खर्च होणार आहे असे धरले तसेच सोसायटी आणि इलेक्ट्रिक कंपनीने ही रक्कम त्यांना मिळणार असे धरले आहे.

# आता डिसेंबर ५ ला बॅलन्स शीट बनवल्यास लाइअबिलटी साइडला काका क्रेडिट ७३००० आणि बिल्स पेयबल ४००० दाखवेल. उजवीकडे अॅसेटसाइडला डेबिट बॅलन्स कॅश रु ६३०००, हॅा डिपो रिसिटचे १०००० असतील. याचा अर्थ ही बिले भरल्यावर काकांचे क्रेडिट ४००० ने कमी होईल आणि कॅश सुद्धा ४००० ने कमी होईल.

१० ) डिसेंबर ६:"मेडिकल इक्स० अकाउंट डेबिट" Dr...4000.00
....ToCredit "bills payable a/c "..4000.00
( पॅथॅा बिल मिळाले.)
११ ) डिसेंबर ६: बँक ac c debit Dr..25000.00
....To Credit "cash acc ...25000.00
( चेक नं १२२ बँके डिपॅा केला)

१२ ) डिसेंबर ७: मेडिकल इक्स acc ..Dr.8000.00
...To Credit Cash ..8000.00
( औषध खरेदी )
१३ ) डिसेंबर ९: कॅश acc Dr. 25000.00
..To Credit bank acc ...25000.00
( बँकेतून कॅश काढली )

१४ ) डिसेंबर १० : "bills payable a/c acc Dr. 4000.00
..To Cash...4000.00
( पॅथॅा बिल भरले.)

[* टीप बिल्स पेयबलचे क्रेडिट कॅन्सल आउट झाले.]

१५ ) डिसेंबर १३ : मेडिकल इक्स acc ..Dr.30000.00
...To Credit hospital acc..10000.00
...To Credit cash acc .........20000.00
( वरदान हॅास्पिटल फायनल बिल रु ३०००० वजा अडवान्स १०००० ---रु २०००० भरले.)
[* टीप अगोदर अडवान्स दिलेला १०००० कॅन्सल आउट केला आणि २०००० कॅश भरली.)

१६ ) डिसेंबर १३ : Bills oayable acc Dr. 2500.00
...To Credit...Cash ...2500.00
( सोसायटी मेंटे भरला)

१७ ) ) डिसेंबर १३: Bills oayable acc Dr. 1500.00
..To Credit Cash acc ....1500.00
( इले बिल भरले)

१८ ) डिसेंबर १३: काकांचे acc Dr. 25000.00
...To Credit Cash acc ... 25000.00
( न वापरलेला तिसरा चेक परत केला )

[* टीप टोटल डेबिट= टोटल क्रेडिट हे नोंद १५ मध्ये लक्षात येईल.

बँकेतून कॅश काढली तर L.F. मध्ये फक्त C अक्षर लिहायचे. C म्हणजे contra entry. ]
---------------------------------------

आता "Receipts and Payments " statement बनवायचं.

थोडक्यात ताळा करायचा.
//* आलेले पैसे = खर्च झालेले + उरलेली कॅश. *//

हे बरोबर आले की हिशोब झाला.
यासाठी सर्व लेजर अकाउंट्स "बॅलन्स" करतात. डेबिट आणि क्रेडिट बाजुंची वेगळी बेरीज करायची. मोठी संख्या जी येईल ती दोन्हींकडे खाली मांडून आडवी दुरेगी आखायची. जिकडे बेरीज लहान असेल तिकडे दोघांतला फरक वाढवायचा. डेबिटला कमी असल्यास तो फरक "To balance " असेल. या खात्याला क्रेडिट बॅलन्स आहे. क्रेडिट बाजुला फरक वाढवावा लागल्यास " By balance" म्हणायचे आणि हा डेबिट बॅलन्स असतो. खर्चाच्या अकाउंट्सना डेबिट बॅलन्स असतो. कॅशचाही डेबिट बॅलन्स असतो.
सर्व डेबिट बॅलन्सिजची बेरीज सर्व लेजर अकाउंटसच्या क्रेडिट बॅलन्सिजच्या बेरजेएवढी आली की आपले बुककीपिंगचे काम संपले.

समालोचन:-
बुककीपिंगचे काम जिथे संपते तिथून अकाउंटन्सी सुरू होते. इथे घेतलेल्या छोट्याशा उदाहरणाला बुक कीपिंगचे नियम लावून रेकॅार्ड तयार केले. परंतू मोठ्या व्यवसाय,भागिदारी धंधे,हौझिंग सोसायट्यांचे अकाउंट्स लिहून योग्य सरकारी डिपार्टमेंटसना सादर करताना काही म्युनिसिपालटी, इन्कम टॅक्स, केंद्र तसेच राज्य सरकारचे लागू होणारे नियम लावून काही देय खर्च दाखवून एकूणच पुनर्रचना करावी लागते. ते काम सर्टिफाइड अकाउंटट्स करतात.

या दोन भागांतून थोडीफार या विषयाबद्दल माहिती होऊन आपण प्रत्यक्ष अकाउंट्स लिहित नसलोतरी इतरांचे काम समजायला मदत झाली तर लेखाचा हेतू साध्य झाला असे म्हणता येईल. ( फोटो टाकायचे का एचटीएमेल टेबल्स अथवा स्क्रीनशॅाट्स याचा विचार करतोय.)

आगामी शेवटचा लेख - हौझिंग सोसायटी अकाउंट्सची ओळख.
सुचनांचे स्वागत.

प्रतिक्रिया

आदूबाळ's picture

2 Feb 2017 - 10:50 pm | आदूबाळ

लय भारी! कितीतरी दिवसांनी जुन्या पद्धतीचं / मॅन्युअल बुक कीपिंग पाहिलं! आमच्या नाडगौडा मास्तरांची आठवण झाली!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

2 Feb 2017 - 11:21 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

डाव्या उजव्या कॉलमांचे फोटो काढुन डकवाल काय? आमच्या सारख्या अकाउंट अडाणी लोकांची तेवढीचं सोय.

रच्याकने ह्यावरुन एक जोक आठवला.

एका प्रतिष्ठित सी.ए.ना त्यांच्याकड्चे आर्टिकलशिप करणारा एक विद्यार्थी त्यांच्या यशाचं रहस्यं विचारतो. सी.ए. फक्तं हसतात आणि ड्रॉवर उघडुन त्यांच्या हातामधे चिठ्ठी देतात. त्या चिठ्ठीवर फक्तं एक ओळ असते.

डेबिट डावा कॉलम क्रेडिट उजवा =))!!!

(जरा बालबुद्धी विनोद आहे घ्या चालवुन) हाकानाका.

कंजूस's picture

3 Feb 2017 - 7:31 am | कंजूस

होय, कॅप्टन फोटो डकवणार आहे. ( फोटो काढले आहेत पण माझं अक्षर फारच वाइट आहे--)
करतो.

संजय क्षीरसागर's picture

3 Feb 2017 - 12:01 am | संजय क्षीरसागर

या गाण्याचा ऑडिओ अपलोड करायला तुम्ही मला आवर्जून मदत केलीत म्हणून या पोस्टवर प्रतिसाद देत नाही.

पण हल्ली अकाऊंटींग असं (मॅन्युअल) करत नाहीत. ते फार क्लीष्ट काम आहे. टॅली हे जवळजवळ सर्वांना उपयोगी पडणारं आणि अत्यंत उत्तम सॉफ्टवेअर आहे ज्यामुळे अक्षरशः एका दिवसात अकाऊंटींग शिकता येतं.

तुम्ही टॅली वापरलं नाहीये का ?

कंजूस's picture

3 Feb 2017 - 7:33 am | कंजूस

लेखाचे नाव अकाउंट्स कसे लिहावेत असं असलं तरी कोणी वह्या चोपड्या घेऊन काम चालू करावे ही अपेक्षा नसून लेखाचा हेतू विषय समजणे हा आहे. हे टॅली अथवा इतर कोणतेही अकाउंटिंग अॅपचा कोड या संकल्पनांवरच लिहिलेला असतो. कॅालेजात या विषयाच्या परीक्षा अजूनही कागदांवरच मॅन्यअली दिल्या जातात. माझा या विषयाशी शिक्षण ,नोकरी अथवा व्यवसाय म्हणून दुरान्वयेही संबंध नाही. एक गम्मत म्हणून वाचन केलेले चाळीस वर्षांपूर्वी. सोसायटीचा ट्रेजरर असताना १० एप्रिलला रिसिट अँड पेमेंट्स स्टेटमेंट बनवून अकाउंटटला देत असे.
"टॅली कसे वापरावे" हा लेख तरुण मिपाकरांनी लिहिल्यास हे लेख त्यास पुरक ठरतील अशी आशा आहे.
या दोन भागांत न आलेल्या संकल्पना - घसारा ( depreciation), रिजर्व फंड, स्पेशल फंड्स पुढच्या सोसायटी भागात येतील.

अवघड आहे. आपल्याला जमायचे नाही. ;-)

संजय क्षीरसागर's picture

4 Feb 2017 - 12:47 am | संजय क्षीरसागर

बघा कंजूसजी मी पहिल्यांदाच बोलेल्लो.

एक प्रश्न आहे संजय क्षीरसागर , टॅली अॅप/सॅाफ्टवेर शिकल्यावर बॅलन्सशीट्स ( उदाहरणार्थ सोसायट्यांची. जी समजावी अशी बय्राचजणांची इच्छा असते) समजू लागतील का? कॅालेजांतून हा विषय थेट सिएलेवलपर्यंत कागदोपत्रीच का राहिला आहे? परीक्षाही संगणकावर घेतल्या गेल्या पाहिजेत. लेखातली माहिती वाचून अकाउंट्स समजावेत हा हेतू साध्य होत नसेल तर प्रयत्न व्यर्थच.

संजय क्षीरसागर's picture

4 Feb 2017 - 11:18 am | संजय क्षीरसागर

विथ ड्यू रिस्पेक्ट,

टॅली अॅप/सॅाफ्टवेर शिकल्यावर बॅलन्सशीट्स ( उदाहरणार्थ सोसायट्यांची. जी समजावी अशी बय्राचजणांची इच्छा असते) समजू लागतील का?

टॅलीमुळे अकाऊंटस लिहीणं, समजणं आणि त्या प्रोसेसची मजा येणं एकावेळी साध्य झालं आहे.

कॅालेजांतून हा विषय थेट सिएलेवलपर्यंत कागदोपत्रीच का राहिला आहे?

सिंबायोसिस मॅनेजमेंट कॉलेजला मला स्वतःला सिलॅबस डिजाईन करायचं स्वातंत्र्य होतं आणि तिथे केवळ सॉफ्टवेअर वापरुन तो इतका भन्नाट शिकवला की सबको मजा आ गया !

परीक्षाही संगणकावर घेतल्या गेल्या पाहिजेत.

येस ! ही प्रथा मी तिथे पहिल्यांदा सुरु केली.

लेखातली माहिती वाचून अकाउंट्स समजावेत हा हेतू साध्य होत नसेल तर प्रयत्न व्यर्थच.

सॉफ्टवेअर वापरुन अकाऊंटस शिकवण्याची प्रथा सुरु करण्याचा उपक्रम सिंबायोसिस मॅनेजमेंट कॉलेजला हिस्ट्रीत प्रथमच राबवला गेला असेल. तिथे सगळ्या फॅकल्टीजचे विद्यार्थी होते आणि तो कमालीचा यशस्वी झाला.

संजय क्षीरसागर's picture

4 Feb 2017 - 11:49 am | संजय क्षीरसागर

तत्पूर्वी डिग्री कॉलेजला मी दहा वर्ष अध्यापन करत होतो. प्रयत्नांची शर्थ करुनही कॉलेजला तो विषय सॉफ्टवेअर वापरुन शिकवू दिला गेला नाही. कॉलेजची चेअरपर्सन माझी क्लायंट होती आणि ती स्वतः यशस्वी उद्योजिका होती. पण युनिवर्सिटी लेवलला बदल घडवणं माझ्या आवाक्याबाहेर आहे हे लक्षात आल्याक्षणी मी नोकरीचा राजीनामा दिला. तदनंतर सिंबायोसिस मॅनेजमेंट ़कॉलेजला फॅकल्टी म्हणून सिलेक्ट झाल्यावर मी तो कार्यक्रम मनसोक्त राबवला !

कंजूस's picture

4 Feb 2017 - 2:53 pm | कंजूस

मी टॅलीसारखी अॅप विंडोजस्टोरला शोधली परंतू नाही सापडली.
संगणकासाठी अधिकृतरित्या मिळणाय्रा सॅाफ्टवेरची किंमत किती, किती RAM, FILE SIZE आणि ओएसची कोणती लेवल लागते?
आपले प्रयत्न फारच आवडले.
बहुतेक युनिवरसटी आणि कॅालेज लेवलला सर्व विद्यार्थ्यांना हे परवडणारे असावे म्हणून पुस्तकावर भर असेल. शिवाय काही रॅायल्टीचाही प्रश्न येत असेल.

इथे जी माहिती लिहिली आहे त्यात सुधारणा हवी असल्यास सांगा आणि पुढचे भाग टाकावेत का?

आंतरजालावर अशी माहिती असावी असं मला वाटतं.
लेजरमध्ये लिहिण्यात डेटा बॅकपचा प्रश्न येत नसला तरी अकाउंट्सचे बॅलन्सिंग करणे कॅलक्युलेटरने किचकट होते. Excel sheet यासाठी वापरता आली तर पाहतो.
एक मॅन्युअल विरुद्ध सॅाफ्टवेअर माध्यम हा मुद्दा सोडला तर एकूण लेखाविषयी अभिप्राय आपल्याकडून अपेक्षित आहे. उदाहरणं अजून वाढवता येतील. सोसायटी अकाउंट्सनंतर भागिदारी, कंपनी अकाउंट्स फारच अडवान्स्ट असतात आणि ते व्यावसायिक लोकांकडूनच करवतात. ते इथे अपेक्षित नाही.

टॅली ७.२ चा सर्व सपोर्ट पीयूट्रॉनिक्सनं काढून घेतला आहे त्यामुळे ते अबंडन्ड सॉफ्टवेअर असल्यासारखं आहे. जिथे स्टॉक मेंटेन करण्याचा प्रश्न नाही तिथे (म्हणजे बहुतांशी अनेक केसेसमधे) वाट्टेल त्या अकाऊंटीगसाठी ते सर्वोत्तम सॉफ्टवेअर आहे. कंप्युटर असेंबल करणार्‍यांकडे ते सहज मिळेल.

बहुतेक युनिवरसटी आणि कॅालेज लेवलला सर्व विद्यार्थ्यांना हे परवडणारे असावे म्हणून पुस्तकावर भर असेल. शिवाय काही रॅायल्टीचाही प्रश्न येत असेल

आमच्या क्षेत्रातल्या जुन्या खोंडांना डायरेक्ट नोकरीच जायची भीती आहे म्हणून युनिवर्सिटी ते करु देत नाही. चार वर्षांचा अकाऊंटसाचा अभ्यासक्रम एका महिन्यात पूर्ण होऊ शकेल आणि गरजू विद्यार्थी डायरेक्ट कामंच घेऊ शकतील असं प्रपोजल मी कॉलेजला दिलं होतं. कोण माईचा लाल ते मान्य करेल ?

इथे जी माहिती लिहिली आहे त्यात सुधारणा हवी असल्यास सांगा आणि पुढचे भाग टाकावेत का?

ही मेथड आता बाद आहे. सीए झाल्यावर या कटकटींमुळे मी स्वतः जीवनाची संपूर्ण दिशाच बदलण्याच्या विचारात होतो. पण अचानक हे सॉफ्टवेअर आलं आणि जीवनाचा आनंदोत्सव झाला.

एक मॅन्युअल विरुद्ध सॅाफ्टवेअर माध्यम हा मुद्दा सोडला तर एकूण लेखाविषयी अभिप्राय आपल्याकडून अपेक्षित आहे.

जगातल्या कोणत्याही व्यक्तीला केवळ एका दिवसात मी अकाऊंटस शिकवू शकतो आणि तेही अत्यंत रंगतदार, फुल्ली विज्युअल आणि डायरेक्ट हँडस- ऑन मेथडनी ! आता मॅन्युअल वर्सेस सॅाफ्टवेअरमधे मी काय बोलणार ?

अनुप ढेरे's picture

4 Feb 2017 - 9:16 pm | अनुप ढेरे

चार वर्षांचा अकाऊंटसाचा अभ्यासक्रम एका महिन्यात पूर्ण होऊ शकेल

आयला, ते सीए करणारे लोक जे अकाउंट्स विषयाचे ठोकळे घेऊन अभ्यास करतात ते रिडंडंट आहे???

संजय क्षीरसागर's picture

4 Feb 2017 - 10:15 pm | संजय क्षीरसागर

वास्तविक कोणत्याही व्यावसायाचे अकाऊंटस टॅली वापरून मजेत करता येतात . सगळया क्लायंटसना मी स्वतःचे अकाउंटस स्वतः तयार करायला शिकवलं आहे (किंवा जिथे मोठा पसारा आहे तिथे त्यांचे अकांउंटंटस आहेत).

अकाऊंटींग इतकी शिकायला सोपी गोष्ट दुसरी नसेल कारण जगातल्या सर्वात जिव्हाळ्याच्या पैसा या विषयाचा तो सविस्तर अर्थपूर्ण आणि अत्यंत उपयोगी असा लेखाजोखा असतो.

ते ठोकळे कंपनी लॅा, टॅक्सेशन, बिझनस पार्टनरशिप लॅा वगैरेचे.हे समजण्यासाठी तैलबुद्धी लागते.

सं क्षी साहेब, या संदर्भात तुम्हाला व्य नि केला आहे.
उत्तराच्या प्रतीक्षेत आहे.

बोका's picture

14 Mar 2018 - 10:38 am | बोका

टॅली ला पर्याय म्हणून जीएनयू कॅश ही मुक्त स्रोत प्रणाली वापरता येईल.
अ‍ॅन्ड्रॉइड अ‍ॅप मर्यादित सुविधांसह उपलब्ध आहे.
https://www.gnucash.org/

कंजूस's picture

4 Feb 2017 - 5:55 pm | कंजूस

धन्यवाद!

सर्व मदत देईन.

मी संगणक पाहिला नाहीये. सर्व मोबाइलवर. मेमरीची चिंता नसते विंडोजच्या मोबाइलवर पण अॅक्सेस देत नाही ओएस वाटेल त्या सर्टिफिकेट नसलेल्या थर्डपार्टी फाइलिंना. संपूर्ण अॅप नाहीये फक्त संगणकाच्या प्रोग्रामला असिस्ट करणारी अॅप्स आहेत ती अधिकृत टॅलीलाच सपोर्ट देतात लिहिलं आहे. Excel वर शक्य आहे. फार्मुले टाकले की झालं.

संजय क्षीरसागर's picture

4 Feb 2017 - 10:22 pm | संजय क्षीरसागर

मोबाईलवर मला तरी ते शक्य वाटत नाही . मोबाईल हा मिनी कंप्युटर असला तरी टॅली ऑपरेट होईल का आणि डेटा एंट्री कितपत मजेची होईल याबाबत साशंक आहे.

सतिश गावडे's picture

11 Feb 2017 - 11:02 am | सतिश गावडे

संगणक आज्ञावली निर्मिती हा विषय सुद्धा वर्गात फळ्यावर आज्ञावलीचे छोटे छोटे तुकडे लिहून शिकवला जातो. नंतर प्रात्यक्षिकाच्या वेळी स्वतंत्रपणे संगणक वापरुन प्रत्यक्ष आज्ञावली लिहीण्याचा सराव केला जातो.

पैसा's picture

11 Feb 2017 - 4:19 pm | पैसा

शक्य तेवढं सोपं करून आणि चित्रांसहित छान सांगता आहात.

कॅश इन हँड, अर्थात जमा खर्च रितीपर्यंत वाचत आलिये. पुन्हा मागे जाऊन वाचावे लागणार आहे.