काही ठिकाणे काही आठवणी-३ (पुणे विशेष भाग)

औरंगजेब's picture
औरंगजेब in जनातलं, मनातलं
7 Jan 2017 - 11:49 am

सन २०१२-१३ मध्ये मी राज्यसेवा परीक्षेसाठी क्लास लावल्यामुळे पुण्यात राहायला होतो. त्यावेळच्या काही आठवणी.

माझा क्लास म्हणजे नव्यापेठेतील चाणक्य मंडळ परिवार.आणी मी रहायचो ते पेरुगेटाजवळ. पेरुगेटचवळचे पुना बोर्डिंग म्हणजे माझी जेवणावळ. रोज तेथुन जेवण आणणे आणी खाणे यामुळे तेथील लोकांची छान(च) ओळख झाली.

पेरुगेटवरुन मागे ज्ञानप्रबोधीनीकडे गेलं की त्या कॉर्नरला आनारसेवाला समोसे वाला आहे.त्याचे समोसे अख्या जगात ( पुणेकरांच्यामते)फेमस आहेत. बाजुलाच A1 का काय ते नाव आसलेला ज्युसवाला आहे. त्याचाकडे ज्युस/मिल्कशेक फार छान मिळतात. बाकी बादशाहीथाळी बद्दल मी बोलणे योग्य नव्हे.

क्लासच्या समोर फार सुंदर चहाही मिळायचा.त्याच्याचकडे सकाळी गेल की शिरा/सांबार+पोहे पण मिळायचे. कौल्डकॉफीपण सुमारे ३० रुपयाला मिळायची.

घरातील इतर सटरफटर वस्तुंकरता मात्र मी सरळ टिळकरस्त्यावरच्या ग्राहकपेठेत जायचो.बिर्याणी फारशी आवडत नसल्याने एसपी बिर्याणी हाउसला जायचा प्रसंग कधीच आला नाही.

बाकी टाईमपाससिठी आर डेक्कन मॉल , अ.ब.चौकात जाऊन पुस्तके विकत आणणे., कोथरुडचे जोशी रेल्वे म्युझियम , कात्रज , सारसबाग आसे अनेक पर्याय मी वापरलेत.
English-vinglish हा एकमेव चित्रपट मी आर डेक्कनला सकाळी८ च्या ब्रेकफास्ट शोला पाहिला तेसुद्धा फक्त ९० रुपयात.

बाकी क्लासमधल्या आठवणी म्हणजे दर बुधवारी श्री धर्माधिकारी सरांचा तास पत्रकार भवनाच्या बाजुला आसलेल्या एका व्रूध्दाश्रमात भरत असे. खुप मजा यायची तासाला.

जानेवारी ७-१४ भरणार्या आभ्यास महौत्सावात पण खुप दिग्गज लोकांची व्याख्याने ऐकायाला मिळाली. यापैकी किही तास हेतर चक्क केसरीवाड्यात होत. टिळकांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जागी आम्ही सगळे आहोत हे फिलींगच छान वाटे.

तुमच्याकाही आठावणी आहेत का पुण्याच्या मला त्या वाचायला आवडतील तेव्हा पतिसाद मात्र अवश्य द्या.

टिप- काही ठीकाणे ही लेखमाला मीपुढच्या ३ महिन्यासाठु बंद करतो आहे.फॉकलंड युद्धाबरची अर्धवट सोडलेली मालिका पुर्ण करायचा माझा मानसइहे त्याचा पुढचा भाग पुढील शनिवारी दि.१४-जाने-२०१७ला प्रकाशित होईल. त्यालाही तुम्ही उत्तम प्रतिसाद द्याल याची खात्री आहे.

kathaaराहती जागाप्रकटनलेख

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

7 Jan 2017 - 12:20 pm | प्रचेतस

आमच्याही काही पुण्याच्या आठवणी आहेत त्याबद्दल असेच नंतर कधीतरी

औरंगजेब's picture

7 Jan 2017 - 12:37 pm | औरंगजेब

जरुर सांगा बाकी परत कट्टा करायचा आहे का ठाणे/पुणेमध्ये.

प्रचेतस's picture

7 Jan 2017 - 12:38 pm | प्रचेतस

पुण्यात करु.

कैलासवासी सोन्याबापु's picture

7 Jan 2017 - 4:03 pm | कैलासवासी सोन्याबापु

पुण्यात आमचे आगमन झाले २००७ साली, सोबतची पोरे इंजिनियर झाली, अन आम्ही उकिरडे फुकत वायडी होत बीएस्सी झालो, कॉर्पोरेट आपल्यासाठी नाही ही गाठ बांधत मनात यूपीएससी करून साहेब व्हायचे आले अन वडिलांच्या खंबीर सपोर्ट ने ते स्वप्न पुरे करायला पुण्यात २४/११/२००७ रोजी डेरेदाखल झालो. (ते लक्झरी बसचे तिकीट अकोला-पुणे अजूनही जपून ठेवलंय) .
पहिले गेलो चाणक्य मंडळ तिथे त्या रिसेप्शनिस्ट ताई ने 'इकडे कुठे आला कपाशीला डवरे देणे सोडून' लुक दिल्यावर प्रबोधिनी मध्ये गेलो, तिकडे कोणीतरी शबनम बॅग वाल्या दादांनी '२००८ पूर्व परिक्षे करता प्रवेश बंद झालेत' असे सांगितल्यावर एकदम अवसान गळाले, म्हणले २ दिवस राहून दारू पिऊ मित्रांसोबत अन परत घरची वाट पकडू, असं ठरवून प्रबोधिनीहुन थेट सुटलो झेड ब्रिजावर. तिथे फाकफाक एक सिगरेट मारून खिशातली टोटल मोजली अन मित्राला बॅलन्स जाळत फोन केला

"हॅलो राख्या कुठं आहेस बे? "

"रूम वर"

"माही ऍडमिशन नाही झाली लेका, आता रे?"

"जाऊ दे ये रूम वर दारू पाजतो"

"तू येतं का घ्याले मले डेक्कन वरी?"

"बाप्पा, संग काही ^गुलाब बाबा बँड पार्टी बी आणा लागते काय मंग? "

"ये न राख्या फोकनीच्या, लेका मले काही सुचू नाही राहले"

"बायल्यावानी करू नको चु**रीच्या, सरका डेक्कन ले धस अन कोथरूड डेपो बस पकड, मी जास्तीत जास्ती पौड ब्रिज ले येईन घ्याले"

"बरं तसंच करतो मंग, 10 मिंट लागतीन नाही रे?"

"हौ! लेका जसा का तू मोठ्या उमरी मधून विठ्ठलनगरले चालला नाही रे होबाऱ्या?, अर्धा घंटा पकड"

"बरं"

असा काहीसा पुण्यात आल्या आल्या आमचा तिसरा तास होता, बाकी कधी लय जमली तर लिहून काढू, तोवर वाचत बसतो

^अकोल्यातली एक अकोलेमे वर्ल्ड फेमस बँड पार्टी

----------×--------------×---------

प्रबोधिनी जवळ "सांबर पोहे" "शिरा" मिळणारे ठिकाण म्हणजे उभे स्पोर्ट्स शेजारची पडकी बखळ, तिथे पोहे विकणारा उभे पार्टी पैकीच कोणीतरी एक होता, तिकडे कच्चुन नाश्ता केला की आम्ही 'उभ्याला आडवा केला' म्हणत परत लायब्ररी मध्ये जात असू, पुण्यात राहून यूपीएससी होऊ शकते, त्याला चांगला क्लास नाही चांगले वाचनालय शोधावे लागते, हा स्वानुभव (आयएएस हुकल्यावर झालेला साक्षात्कार)

अनारसे सामोसेवाला फालतू आहे, त्याच्याच समोर एक डेअरी आहे नाव विसरलो, तिकडे त्याकाळी १०₹/ग्लासच्या दराला उत्तम ताक, रोज मिल्क, स्ट्रॉबेरी मिल्क वगैरे मिळत असे, अनियमित खाणे जागरण अन अभ्यासाने ऍसिडिटी झाली का आम्ही तिथे दुधाला जात असू

>>^अकोल्यातली एक अकोलेमे वर्ल्ड फेमस बँड पार्टी

=)) =))
बापूसाहेब तुम्ही लिहण्यासाठी काय घ्याल? आग्रहच ना? तो आम्ही सगळेच करतो आहोत. त्यामुळे जीवाला खा .. आणि आम्हा 'बापू फॅन क्लब' साठी लिहा लवकर.
(बाकी अनारसे सामोसेवाल्याला फालतू म्हटल्याने प्रतिसादाला दोन स्मायली कमी झाल्यात याची नोंद घ्यावी ;-) )

कैलासवासी सोन्याबापु's picture

7 Jan 2017 - 7:10 pm | कैलासवासी सोन्याबापु

अहो आग्रह वगैरे काय उगीच आनंदयात्री , तुम्ही वाचक लोक्स आहात म्हणून आम्ही बापूसाहेब आहोत. तुमचा अन अजयाताईंचा आदेश पोचला, फक्त वेळ नाहीये, तो मिळाला की लेखन करूच, तोवर असेच प्रतिसादातून लिखाण होत राहील, बाकी अनारसेवाला मुद्दा मुद्दा ध्यानी घेतलेला आहे, चवी व्यक्तिसापेक्ष हो, तुमचा आदर आहेच, फक्त आमच्या चवीला प्रामाणिक राहता अनारसेच्या समोस्याचा आदर राखणे काही जमले नाही बघा =)) =))

अजया's picture

7 Jan 2017 - 6:43 pm | अजया

मस्त प्रतिसाद. सोन्याबापू लिहाच !

कैलासवासी सोन्याबापु's picture

7 Jan 2017 - 7:11 pm | कैलासवासी सोन्याबापु

बघतो ताई थोडे रुटीनला लागू दे परत लिहितोच :)

नंदन's picture

7 Jan 2017 - 7:42 pm | नंदन

मस्त प्रतिसाद. सोन्याबापू लिहाच !

लंपनच्या भाषेत सांगायचे तरः तंतोतंत!

आदूबाळ's picture

7 Jan 2017 - 8:44 pm | आदूबाळ

+२

"उभ्याला आडवा केला" हे वाक्य त्या उभे स्पोर्ट्सवाल्याच्या संदर्भात फ्यामस दिसतंय.

किती दिवसांनी फॉलोअप करायचा बापूसाहेब?