मायक्रोवेव्ह पापलेट

आनंदी गोपाळ's picture
आनंदी गोपाळ in पाककृती
8 Dec 2016 - 11:16 pm

शिजवण्या आधीचा फोटो:
1before.jpg

सर्वात आधी पापलेट फ्रीझरमधून काढून मावेच्या डीफ्रॉस्ट सेटिंगनुसार डीफ्रॉस्ट करावे. मी मावेसेफ झिपलॉक बॅगमधे एकेक पापलेट धुवून कोरडे करून घालून ठेवतो. ४-५ दिवस टिकतात.

साहित्यः
पापलेट, काकडी/टमाट्याच्या चकत्या, फोटूत दिसताहेत तशा. टमाट्यावर थोडं मीठ चिमटीतून घाला.

मसाला/मॅरिनेशनः
माबोवरचा वर्‍हाडी ठेचा १ चमचा.
बारीक चिरलेली कोथिंबीर बचकभर
धणेपूड १ चमचा
जिरेपूड चिमूटभर
थोडं मीठ
चिंचेचा रेडीमेड कोळ सुमारे अर्धा-पाऊण चमचा
थोडी हळद.
१ चमचा तेल.
३ चमचे रेड वाईन

हे सगळं एकत्र कालवून मासा अन काकडी टमाट्याला चोळून धीर धरवेल तिथवर ठेवा.
मग मावेच्या क्रिस्प प्लेटला तेलाचा हात लावून वरच्या फोटूत दिसतंय तसं रचून ठेवा.

मावे सेटिंग :
क्रिस्प मोड (पिझ्झा करतो ते, त्याच प्लेटमधे.) पहिली साईड ७ मिनिट, मासा उलटवून ३ मिनिट.
पापलेट छान मोठा १०० ग्रामपेक्षा जास्त होता. ती प्लेट ३० लिटरच्या मावे मधली आहे. मासा लहान असेल तर थोऽडा कुकिंगटाईम कमी करायला लागेल.

अधिक क्रिस्पी हवं असेल तर थोडं तेल वरून घालून पुन्हा १-२ मिंटं क्रिस्प करावं. मला पोळीसोबत खायला थोडं ओलसर हवं होतं.

फायनल प्रॉडक्ट :2after.jpg

टीप : छान झाला होता ;)

प्रतिक्रिया

अजून एक अत्याचार! मार्गशीर्ष चालू आहे हो! त्रिवार निषेध.

(सवांतर- पापलेट कॅशलेस विकत मिळतात काय पुण्यात कुठे?)

नूतन सावंत's picture

10 Dec 2016 - 11:32 am | नूतन सावंत

Khup swast hotat mase marg shirish mahinyat

हल्ली नाही स्वस्त वगैरे होत मासे काही :)

अर्धवटराव's picture

9 Dec 2016 - 6:23 am | अर्धवटराव

चिल्ड बीअर आणि क्रिस्पी पापलेट... घेऊन टाक.

बाजीप्रभू's picture

9 Dec 2016 - 6:45 am | बाजीप्रभू

तोंडाला पाणी सुटलं,
फायनल प्रोडक्ट दाखवलेत तसे शेवटचे अवशेषहि दाखवा.

केडी's picture

9 Dec 2016 - 2:45 pm | केडी

मज्जा आ गया..! मस्त सुटसुटीत पाकृ!

पाटीलभाऊ's picture

9 Dec 2016 - 3:51 pm | पाटीलभाऊ

पापलेट हे नाव ऐकूनच णिषेध...!
बाकी फोटो दिसत नसल्याने आत्म्याला शांती मिळाली :D

एस.योगी's picture

10 Dec 2016 - 11:24 am | एस.योगी

उत्तम पाकृ आहे, परंतु
*निषेध - पापलेट पोळीसोबत ?

नूतन सावंत's picture

10 Dec 2016 - 11:33 am | नूतन सावंत

मस्त दिसतंय.

पैसा's picture

10 Dec 2016 - 4:17 pm | पैसा

तुमचे हे असले उपद्व्याप लै भारी असतात!

अत्रन्गि पाउस's picture

10 Dec 2016 - 9:30 pm | अत्रन्गि पाउस

मागे ते शेकोटी चिकन, आता हे ...एकदा बोलवाच बुवा .....
खतरनाक दिसतोय एंड प्रोडक्ट

त्रिवेणी's picture

11 Dec 2016 - 12:38 pm | त्रिवेणी

दिसतोय भारी. तरी मला कुरकुरीत तळलेले जास्त आवडतात.