मायक्रोसॉफ्ट ऑफिस ला पर्याय...

इरसाल कार्टं's picture
इरसाल कार्टं in तंत्रजगत
24 Nov 2016 - 4:10 pm

नमस्कार मिपाकरहो !
कृपया मला कुणी मायक्रोसॉफ्ट ऑफिसला साजेसा पर्याय सांगेल का?
अवतीभवती अशी बरीचशी माणसे आहेत ज्यांना ते विकत घेणे परवडत नाही आणि पायरेटेड वापरणे योग्य वाटत नाही. अशांसाठी काही पर्याय माहित असल्यास सुचवावे.

धन्यवाद.

प्रतिक्रिया

पैसा's picture

24 Nov 2016 - 4:15 pm | पैसा

ओपन ऑफिस, लिब्रे ऑफिस चांगले चकटफू पर्याय आहेत.
http://www.openoffice.org/download/
http://www.libreoffice.org/

इरसाल कार्टं's picture

24 Nov 2016 - 4:21 pm | इरसाल कार्टं

इतक्या लवकर प्रतिसादाबद्दल खरोखरच आभारी आहे.

प्रीत-मोहर's picture

24 Nov 2016 - 4:41 pm | प्रीत-मोहर

हेच लिहायला आले होते

महासंग्राम's picture

24 Nov 2016 - 4:54 pm | महासंग्राम

पण, ओपन ऑफिसला ती मजा नाय, जी व्हर्जिनल मायकोरसॉफ्ट ऑफिसला आहे.

गुगल शीट... जर २४ तास इंटरनेट उपलब्ध असेल तर बिन्धास्त गुगल शीट वापरा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Nov 2016 - 4:19 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शीर्षक वाचून असं वाटलं की मायक्रोसॉफ्टला काही नवीन पर्याय आला की काय !
धागा वाचल्यावर भावना पोहचल्या.

विकत घ्यायचं नाही आणि पायरेटेड वापरायचं नाही असं अ‍ॅप्लीकेशन एक तर क्रॅक असलेले व्हर्जन शोधलं पाहिजे. दुसरं असं की आता मोबाईलवर आता ही सर्व प्रकारची ही अ‍ॅप्लीकेशन उपलब्ध आहेत, व उत्तम चालत आहेत. ती वापरुन बघावीत असे सुचवेन.

-दिलीप बिरुटे

इरसाल कार्टं's picture

24 Nov 2016 - 4:24 pm | इरसाल कार्टं

मोबाईल च्या मानाने संगणकावर संपादन जास्त वेगाने होते. तसेच "स्मार्ट" झाले तरी फोन्स अजून संगणकाची पुरेपूर जागा नाही घेऊ शकले.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Nov 2016 - 4:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितीबद्दल आभारी.

-दिलीप बिरुटे

अद्द्या's picture

24 Nov 2016 - 4:50 pm | अद्द्या

पायरेटेड वापरणे योग्य वाटत नाही

काय रे देवा , पायरसी का तो जमानाच नाही ऱ्हाया.

लिब्रा ऑफिस वापरून बघा . मस्तय ,

आऊटलूक ला पर्याय म्हणून थंडरबर्ड वापर

तुषार काळभोर's picture

24 Nov 2016 - 5:38 pm | तुषार काळभोर

ओपन ऑफिस
फाइलहिप्पोवरची डाऊनलोड लिंक १३४ एमबी

लिब्र ऑफिस (ओपन ऑफिस प्रोजेक्टच पुढे लिब्रमध्ये रुपांतरित झाला)
फाइलहिप्पोवरची डाऊनलोड लिंक २१२ एमबी

लिब्र, ओपन ऑफिसपेक्षा जरा उजवे आहे (दिसायला/वापरायला)

शिवाय लाखो रो'ज चा डेटा नसेल व जास्त गुंतागुंतीचे काम नसेल (आणि २४*७ ऑनलाईन असण्याची सुविधा असेल) तर गूगल शीट/डॉक/स्लाईड हे सुद्धा उत्तम पर्याय आहेत.
गुगल ड्राईव वापरण्याचे फायदे: ऑनलाईन असल्याने, कुठूनही अ‍ॅक्सेस करता येतो. शेअरिंग सोपे आहे. एकावेळी हवे तितके जण एकाच वेळी एडिट करू शकतात, व दुसर्‍याने केलेले बदल इन्स्टंटली पाहू शकतात. एखादी फाईल चुकून बदल केल्यानंतर सेव्ह झाली तरी जुने वर्जन मिळवणे सोपे आहे. हार्डडिस्क क्रॅश होणे/डेटा करप्ट होणे, अशा चिंता नसतात. तोटे: मर्यादित (सध्यातरी) गुणवैशिष्ट्ये, मर्यादित डेटा साईज (संपूर्ण गुगल अकाऊंटची साईज १५ जीबी) इत्यादी.

इरसाल कार्टं's picture

25 Nov 2016 - 2:25 pm | इरसाल कार्टं

गुगल ड्राईव मी ३ वर्षांपासून वापरतोय. मला ऑफलाईन पर्याय हवा होता. ओपन ऑफिस माहित होते पण दुसरे काही पर्याय असतील तर जाणून घ्यायचे होते म्हणून हा धागा.
कालच लिब्रा डाऊनलोड केला. छान आहे.
सर्वांचे धन्यवाद.

पाइरसी, सिक्युअरटी कोण झंझट करत बसणार ? एक विंडोजचा lumia 540 /640 मोबाइल शेवटचा लॅाटमधला घेऊन ठेवा. 8.1 os आहे तशीच ठेवा. अजिबात अपग्रेड करू नका. परवाच नडेला सायबाने "आम्ही आमच्या पद्धतीचे मोबाइल ( सर्फेस)बनवू ,इतरांशी टक्कर देण्यासाठी नसतील पण कामाचे असतील." यांच्या ओएसवर असणारी अॅप्स मोजकीच परंतू खात्रीची असतात.

कंजूस's picture

24 Nov 2016 - 5:48 pm | कंजूस

ओफिस 365 एक वर्ष फ्री होते मोबल्यात. मला त्याचा काही उपयोग नव्हता.

बरीचशी माणसे आहेत ज्यांना ते विकत घेणे परवडत नाही आणि पायरेटेड वापरणे योग्य वाटत नाही. अशांसाठी काही पर्याय

मुक्त स्रोत प्रणाली (Free Software) वापरून बघा. फ्री सॉफ्टवेर म्हणजे पैशाने फुकट असे नाही,तर जे तुमचे स्वातंत्र जपते असे सॉफ्टवेर.
प्रोप्रायटरी सॉफ्टवेरऐवजी फ्री सॉफ्टवेर वापरल्याने तुमचे स्वातंत्र जपले जाते.
freedom 0 म्हणजे तुम्ही ते सॉफ्टवेर तुम्हाला वाटेल त्या कारणासाठी वापरू शकता.
freedom 1 म्हणजे ते सॉफ्टवेर कसे बनवले आहे याचा तुम्ही अभ्यास करू शकता आणि त्यात तुम्हाला वाटेल ते बदल करू शकता.
freedom 2 म्हणजे ते सॉफ्टवेर तुम्ही इतरांना देऊ शकता, शेअर करू शकता.
freedom 3 म्हणजे तुम्ही बदल केलेले सॉफ्टवेर तुम्ही कम्युनिटीमध्ये (समाजात) देऊ शकता ज्यामुळे इतरांचा पण फायदा होईल.

मी पुढील मुक्त स्रोत प्रणाली (Free Software) वापरतो. तुम्ही पण वापरून बघा.

  • Drupal - Content Management system. This website is designed in Drupal
  • Notepad ++ - Source code editor (replacement of Notepad, proprietary Microsoft editor)
  • KeePass - Password Manager
  • Firefox - web browser (replacement of Internet Explorer web browser)
  • Tor Project - For online privacy
  • Mozilla Thunderbird - email and news client, RSS feed reader (replacement of Microsoft Outlook)
  • Greenshot - Screenshot tool with image editor (for Microsoft Windows) - replacement of Microsoft Paint
  • LibreOffice - replacement of Microsoft Office suite
  • VLC Media Player - replacement of Microsoft Windows media player
  • 7z - File archiver with data compression and encryption (replacement of WinZip)
  • FileZilla - FTP & SFTP client (replacement of WS_FTP & Microsoft IIS)
  • GNU Privacy Guard (GPG) - replacement of PGP
  • Eraser - Securely erase data from Microsoft Windows
  • digiKam - Photo & image organizer (replacement of Adobe Lightroom)
  • GIMP - Photo and image editor (replacement of Adobe Photoshop and Microsoft Paint)
  • Pidgin - Universal Chat Client
  • Git - distributed version control system (replacement of Microsoft Visual SourceSafe)
  • SpamAssassin - Stop spam
  • Calibre - eBook management

टीपः मी फ्री सॉफ्टवेर फाउंडेशनचा सदस्य #८९५० आहे. जर कुणाला मुक्त स्रोत प्रणाली (Free Software) मध्ये योगदान करायचे असेल तर कृपया संपर्क साधावा.

चांगला प्रतिसाद. ह्यातले बरेच वापरतोय बाकी पण वापरून पाहिन.

एस's picture

28 Nov 2016 - 6:36 am | एस

+2

प्रतिसाद आवडला. छान माहिती.

माझा अनुभव सांगतो.

मी मागच्या दोनेक वर्षांपासून एमेस-ऑफिस सोडून गूगल डॉक्स, शीट, स्लाईड्स, फॉर्म्स इ. वापरतोय. एमेस-ऑफिसची अनुपस्थिती फारशी जाणवत नाही; ह;, स्मार्टआर्ट गूगल मध्ये नाहीय ही मात्र खंत आहे.
लिबर ऑफिस, ओपन ऑफिस हेही वापरण्याचा अनुभव आहे.

बेसिक कामे सुलभतेने होणे, इंटरनेट उपलब्धतेनुसार पीसी, फोन, टॅब अश्या सर्व मार्गाने seamless connectivity (मराठी?) असणे, मर्यादित प्रमाणात विना-इंटरनेट काम करता येणे, ही गूगल डॉक्सची तर,

देखणे ग्राफिक्स, मोहक रंगसंगती, फॉरमॅटिंगचे असंख्य पर्याय इ. एमेस-ऑफिसची जमेची बाजू आहे.

लिबर / ओपन बद्धल माझे फारसे चांगले मत नाही.

"बेसिक कामे सुलभतेने होणे, इंटरनेट उपलब्धतेनुसार पीसी, फोन, टॅब अश्या सर्व मार्गाने seamless connectivity (मराठी?) असणे, मर्यादित प्रमाणात विना-इंटरनेट काम करता येणे, ही गूगल डॉक्सची तर,"

- अजोड/सुचारु/सुकाम हेच windows 10 बहुतेक साध्य करणार आहे.क्लाउड -

जिन्क्स's picture

26 Nov 2016 - 1:46 pm | जिन्क्स

ऑफिस ३६५ हा सर्व्वोत्तम पर्याय आहे. महिना ३५०/- रुपये भाडे तत्वावर सर्वात लेटेस्ट version वापरता येते. मी तेच वापरत आहे.

पैसा's picture

26 Nov 2016 - 1:50 pm | पैसा

त्यांची गरज फुकटच्या सॉफ्टवेअरची आहे हे त्यानी आधीच सांगितले आहे. विद्यार्थी किंवा केवळ तात्कालिक गरजांसाठी ऑफिस सॉफ्टवेअर वापरणार्‍या लोकांना इतके पैसे भरून सॉफ्टवेअर वापरणे शक्य नसते.

स्पार्टाकस's picture

28 Nov 2016 - 4:22 am | स्पार्टाकस

अ‍ॅपलचा आयफोन अथवा आयपॅड अथवा मॅक असल्यास पर्यायी ऑफीस प्रॉडक्ट्स - कीनोट, नंबर्स इत्यादी त्या बरोबरच येतात.

इरसाल कार्टं's picture

28 Nov 2016 - 1:43 pm | इरसाल कार्टं

सफरचंद वाल्यांची उत्पादने वापरणारी माणसं एम एस ऑफिस ला फुकट पर्याय का शोधतील? :)

शाम भागवत's picture

29 Nov 2016 - 4:10 pm | शाम भागवत

ओपन ऑफिस व लिब्रे ऑफिस कोणतेही वापरा. जर तुम्हाला प्रोग्रॅम लिहावयाचे नसतील तर दोन्ही छान आहेत.
१) कोणतीही मायक्रोसॉफ्ट ऑफिसची फाईल उघडता येते.
२) किंवा त्या फॉर्मॅट मधे सेव्ह करता येते.
३) पीडीएफ फाइल बनवता येते.
४) प्रोग्रॅमिंग अवघड आहे. प्युअर ऑब्जेक्ट ओरिएन्टेड आहे. लेअर अजिबात नसल्यामुळे सोपेपणा नाही.
५) पायव्होट टेबल शिकून घ्या. डाटा लाखो ओळींमधे असेल तरी फरक पडत नाही. आतमधे चक्क एसक्यूएल वापरलेले आहे.
६) डाटाबेस खतरनाक आहे. जर वापरणार असाल तर बॅकअप घेत चला.

शशिकांत ओक's picture

4 Dec 2016 - 12:07 am | शशिकांत ओक

http://www.kingsoftstore.com/
वरील सॉफ्टवेअर मी वापरू पाहिले आहे.आवडले. इतरांचा काय अनुभव आहे समजून घ्यायला आवडेल.