७०० बिलियन डॉलर !

७०० बिलियन का व कश्यासाठी ह्यांची काही उत्तरे !

1. अर्थव्यवस्था बरबाद होण्यापासून वाचवणे

इमरजेंसी इकनॉमिक स्टेबलाइजेशन एक्ट 2008 च्या खाली अमेरिकन वित्तमंत्री ला ७०० अरब डॉलर दिले जातील.
ह्या पैशाचा उपयोग ते कर्ज व संपती विकत घेण्यासाठी करतील ज्यांच्या मुळे अमेरिकन फाइनांशियल इस्टिट्यूशंस ची चांगलीच वाट लागली आहे.. व ज्यामुळे छोट्यामोठ्या उद्योजकांना आपला व्यवसाय चालवण्यात अडचणी येत आहेत.. लोन मिळत नाही आहे , ह्या गोष्टी मुळे अर्थव्यवस्था मजबूत होईल.

2. लोकांना बेघर होण्यापासून वाचवणे.

इमरजेंसी इकनॉमिक स्टेबलाइजेशन एक्ट 2008 च्या अंतर्गत जे कर्ज डुबत आहे त्याला मोडीफाई करण्याचा अधिकार देखील आहे, कर्ज देणा-याने हे न पाहताच कर्ज दिले की घेणारा परत करु शकतो की नाही अश्या काही कर्जांची जिम्मेदारी सरकार घेईल.

3. जो सामान्य टॅक्स पेयर आहे त्याची काळजी घेणे.

शेयर मार्केटच्या चुकांची किमत सामान्य टॅक्स पेयर ला चुकवावी लागू नये ह्यासाठी अशी व्यवस्था केली गेली आहे की ज्या कंपन्या बुडाल्या आहेत त्या पुढे कधी फायद्यात आल्या तर त्याचा लाभ सामान्य टॅक्स पेयर ला देखील मिळो !

4. एक्जिक्यूटिव ना ताळ्यावर आणणे

ज्या एक्जिक्यूटिव च्या चुकीच्या निर्णयामुळे अर्थव्यवस्थेचा बोजवारा उडाला त्यांना आपली बँड एसेट सरकार च्या डोक्यावर ठेवण्याची सुट मिळू नये.. व एक्जिक्यूटिव ह्यांची सामान्य पगार देखील सरकार तय करेल.

5. पैसे कसे खर्च केले जातील.

इमरजेंसी इकनॉमिक स्टेबलाइजेशन एक्ट च्या अतंर्गत सगळी रक्कम एक साथ न देता तुकड्या तुकडया मध्ये दिली जाईल.
आधी २५० अरब डॉलर दिले जातील त्या नंतर राष्ट्रपती सांगतील की अजून किती रक्कम हवी व कोठे वापरण्यासाठी हवी तेव्हा १०० अरब डॉलर व नंतर ३५० अरब डॉलर अश्या पध्दतीने दिलेले जातील व ह्यासाठी अमेरिकन कांगेसला विचारावे लागेल त्यांना !

छान ..

राजे यांचे आभार.. उत्तम माहीती.
पुण्याचे पेशवे

सहमत ----- वाह

सहमत

-----
वाहनचालक मुली पाहिल्या की आमची उत्सुकता वाढते,
झाकली मुठ किती लाखाची !!!!!!!! Wink

अर्थव्यवस्था बरबाद

अर्थव्यवस्था बरबाद करणे नंतर ती सुधरणे हेच काम आपले पण सरकार करते

हे वाचून बघा

७०० बि. $ बद्दल ईथेही छान विश्लेशण केलेले आढळले
http://anilselarka.wordpress.com/

मोहन

विदेशी

विदेशी भाषेमध्ये खुप विष्लेशने महाजालावर सापडतील पण मराठीत एक ही नाही... त्यामुळे हा प्रयत्न केला होता मी !

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

बर का

बर का राजे
यातील महत्वाची गोष्ट अशी की सुरवातीचे २५० बिलियन डोलर्स हे कर्जरुपानेच उभारणार आहेत. चीन व जपानशी बोलणी चालु आहेत.
कर्ज फेडायला कर्ज...
बघुया
काय काय होते ते...

... चीन व

... चीन व जपानशी बोलणी चालु

हो !
हे वाचलं मी !
बँक ऑफ चायना पैसे देण्याची तयारी करत आहे !

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

ह्यात नविन काय ते

बँकांचा व्यवहारच मूळी असा चालतो..
छोटी बँक मोठ्या बँकेकडून कर्ज घेऊन तर तुम्हाला देत असते..
आता तसेच तर करत आहे अमेरिकन सरकार...

अहो हे

अहो हे सरकार करत आहे
बैंकाबैंकाचा व्यवहार नाही आहे.
याचे फार दुरगामी परीणाम होणार आहेत.

$ छापणार!

माझ्या माहिती प्रमाणे $ छापणार आणि ७०० बि. $ उभे करुन देणार. त्याने $ गाळात जाणार व महागाई अस्मानाला भिडेल. सर्व जगातलीच. व्याज दर पण न परवडणारे राहातील.

मोहन