विल्हेल्मा झू (Wilhelma zoo)

शब्दबम्बाळ's picture
शब्दबम्बाळ in मिपा कलादालन
25 Oct 2016 - 3:17 am

जर्मनी मधल्या मोठ्या प्राणिसंग्रहालयांपैकी एक म्हणजे विल्हेल्मा!
स्टुटगार्ट मध्ये मध्यवर्ती भागात मोठ्या आकाराचे हे प्राणिसंग्रहालय आहे. पिंजऱ्यातले प्राणी पाहणे हा तितका चांगला अनुभव वाटत नसल्याने कधीच इथे गेलो नव्हतो पण शेवटी काहीच न करण्यापेक्षा निदान वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी बघून तरी येऊ या विचारांती इथे जाणे झाले.
इथे मुख्यत्वे मी वेगवेगळ्या प्राण्यांचे 15-16 फोटो टाकणार आहे त्यामुळे डेटा वाचवायचा असेल तर बघा! :)
पक्ष्यांचा वेगळा धागा करेन...

1. प्रवेशद्वार
entry

31 ऑक्टोबर ला हॉलोवीन सेलिब्रेशन असणार आहे असा बोर्ड होता! आत थोडीफार तयारीही दिसत होती.

2.
halloween

इथून पुढे मग वेगवेगळ्या दिशांना जाणारे अनेक रस्ते होते. पक्ष्यांचा विभाग, फुलपाखरांचा विभाग, मत्स्यालय तसेच एप आणि अन्य प्राण्यांचे स्वतंत्र विभाग अशी ढोबळ विभागणी होती. स्वच्छता आणि टापटीप नेहमीप्रमाणेच उत्तम होती.

चला मग आता काही माकडांचे प्रकार बघूया...

3. emperor tamarins - मिशीवाला छोटू
tamarins

4. Goeldi's marmoset - गोंडस बाळ
marmoset

5. pygmy marmosets - हे तळहातावर मावतील एव्हडेच होते!
pigmy

6. स्लॉथ - अतिमंद प्राणी!
sloth

7. gold-headed lion tamarins - आकाराने लहान असला तरी याला सिंहासारखी आयाळ असते!
lion

8. Forest Baboon - यांच्याकडे पाहून मला अचानक 'तेरे खुशबू मी बसे खत' हि गझल आठवली! ;)
forest baboon

9. white-handed gibbons - आई तुझा आशीर्वाद...
gibbons

10. white-handed gibbons - याच्याकडे पाहून थोडे वाईट वाटले
gibon

11. Spider monkey - याची खासियत काय हे शोधात असाल तर एकदा शेपटी पहा साहेबांची! सगळ्यात ताकदवान शेपूट या माकडांची असते...
spider

12. Spider monkey - जवळून
spider

13. gelada baboons - (bleeding heart monkeys ) यांची छाती लाल असते म्हणून असे नाव!
gelada

14. red-faced macaques - (Snow Monkeys ) यांचे मूळ स्थान जपान! बर्फाच्छादित भागात राहणे पसंद करत असल्याने असे नाव...
red face

15. अजून एक
redface

16. गोरिला :
gorilla

17. अजून एक
gorilla1

बरेच फोटो झाले. पेज लोड व्हायला खूप वेळ लागू नये म्हणून इथेच थांबतो...
काही प्राणी आणि उर्वरित पक्षी दुसऱ्या धाग्यामध्ये...

प्रतिक्रिया

रेवती's picture

25 Oct 2016 - 3:21 am | रेवती

छान आहेत फोटू.

मलातरी फारच केविलवाणे वाटले हे प्राणी! :-( माणसाने आपल्या करमणुकीसाठी असे कुणाला बंदिस्त करून ठेवावे हे पटत नाही!

शब्दबम्बाळ's picture

25 Oct 2016 - 4:46 pm | शब्दबम्बाळ

सहमत आहे! त्यामुळेच इतक्या जवळ असूनही कधी जाणे झाले नव्हते...
इथे सगळेच प्राणी काचेत किंवा पिजर्यात बंद नाहीत पण... त्यांच्या नैसर्गिक अधिवासाप्रमाणे रचना करण्याचा प्रयत्न केला आहे, तरीही शेवटी तेवढ्याच भागात फिरायची सोय त्यांची. पूर्ण आयुष्य इतक्याच भागात काढायचं... कसे वाटत असेल काय माहित... :(

एस गिब्ट नुअं आफं ओडं अन्दरं टियरआर्टन आऊख?

एस गिब्ट नुअं आफं ओडं अन्दरं टियरआर्टन आऊख?

एस गिब्ट नुअं आफं ओडं अन्दरं टियरआर्टन आऊख?