टाटा समुहाचे अध्यक्ष पायउतार!

अनंत छंदी's picture
अनंत छंदी in काथ्याकूट
24 Oct 2016 - 10:31 pm
गाभा: 

टाटा समुहाचे अध्यक्ष पायउतार!
टाटा ग्रूप या औद्योगिक साम्राज्याचे अध्यक्ष सायरस मिस्त्री यांना टाटा सन्सच्या संचालक मंड्ळाने अध्यक्षपदावरून हटविले असून त्यांच्या जागी काळजीवाहू अध्यक्ष म्हणून श्री. रतन टाटा यांची निवड करण्यात आली आहे.
टाटा सन्सच्या घटना व नियमावलीस अनुसरून नवा अध्यक्ष चार महिन्यात निवडण्यात येणार आहे, त्याकरिता निवडसमिती तयार करण्यात आली आहे. या समितीत स्वत: रतन टाटा, वेणू श्रीनिवासन, अमित चंद्र, रोनेन सेन व लॊर्ड कुमार भट्टाचार्य यांचा समावेश आहे.
भारतातील या अग्रगण्य उद्योग समुहातील या खळबळजनक घटनेचा उद्योग क्षेत्रावर नेमका काय परिणाम होईल? व अचानक हा बदल करण्याचे कारण काय असावे याबाबत जाणकारांची मते जाणून घ्यायला आवडेल.

प्रतिक्रिया

भाते's picture

25 Oct 2016 - 12:23 am | भाते

मिसळपावचे आधिकारीक धोरण मध्ये लिहिल्यानुसार

२. स्वरचित साहित्याखेरीज इतर कुणाचेही लेखन, मूळ लेखकाच्या परवानगीशिवाय मिसळपावावर प्रकाशित करता येणार नाही. एखाद्या लेखा/चर्चेदरम्यान केवळ संदर्भाकरता म्हणून इतरांच्या लेखनातील दोनचार ओळी किंवा एखादा लहानसा परिच्छेद द्यावा. इतरत्र प्रसिद्ध झालेले लेखन जर मिसळपाव सदस्यांनी वाचावे व त्याच्यावर चर्चा घडवून आणावी असे जर लेखकाला वाटत असेल तर त्याने/तिने संबंधित लेखनाचा दुवा (लिंक) द्यावा.

इथे तर मटातली हि बातमी थोडीफार वाक्यरचना बदलुन लिहिली आहे.

कृपया, संमंने याची नोंद घ्यावी.

अनंत छंदी's picture

25 Oct 2016 - 4:15 pm | अनंत छंदी

भाते, आपण दिलेली लिंक आत्ता पाहिली. त्यापूर्वी मी ती मटातील बातमी पाहिलेली नव्हती! त्यामुळेच ती लिंक देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

शब्दबम्बाळ's picture

25 Oct 2016 - 5:07 pm | शब्दबम्बाळ

या सगळ्यामध्ये टाटा वि. डोकोमो या खटल्याचा निकाल कारणीभूत असू शकतो असे म्हटले जात आहे.
टाटांना तब्बल 1.2 बिलियन डॉलर्स परत द्यावे लागले होते डोकोमोला.
tata

मराठी कथालेखक's picture

25 Oct 2016 - 5:13 pm | मराठी कथालेखक

पुढे अनेक वर्षांनी टाटा समूहातल्या दुसर्‍या एखाद्या उच्चपदस्थाने आत्मचरित्र लिहिले तर या घटनेचे कारण कळेल :)

संदीप डांगे's picture

25 Oct 2016 - 7:07 pm | संदीप डांगे

इन्व्हेस्टर लोकांना मिस्त्री रुचले नसावे!

अप्पा जोगळेकर's picture

26 Oct 2016 - 12:49 pm | अप्पा जोगळेकर

कांदिवली , समतानगर झोपडपट्टी रिडेव्हलपमेंट कॉन्ट्रॅक्ट आपल्या पिताष्रींच्या शापूरजी पालनजी कंपनीला मिळावे यासाठी ३०० कोटी लाच दिली.
टाटा स्टारबक्स या पब्लिक लिमिटेड कंपनीला प्रायव्हेट लिमिटेड केले. शिवाय ही कॉफी (किंवा उपकरणे) इम्पोर्ट करताना रामनगर, डोंबिवली पूर्व येथील एका झोपडीचा फेक एड्रेस दिला.
वाघेला नावाच्या गुंडाला समतानगरचा लायसन हपिसर म्हणून नेमले
केतन तिरोडकरला लाच प्रकरणात १० लाख रुपये देऊ केले.
अशा स्वरुपाचे मोघम स्वरुपातील आरोप केतन तिरोडकर (हा बहुधा एक झोलर म्हणून ओळखला जाणारा वकील आहे) याने केल्याचे वॉट्सअप फॉरवर्ड नुकतेच वाचले. खरे खोटे माहीत नाही.

केतन तिरोडकर हे नाव बर्‍याच हाय प्रोफाईल, वादग्रस्त पीआयएल केसेसमध्ये वादी म्हणून असते, बहुतेक आदर्श प्रकरण त्यांच्याच पीआयएल मुळे धसास गेले. रच्याक झोलर आणि वकिल ही पुनुरूक्ती झाली.

मराठी_माणूस's picture

26 Oct 2016 - 12:57 pm | मराठी_माणूस

आजच्या लोकसत्तेतील अग्रलेखात यावर थोडासा प्रकाश टाकलेला आहे.

http://www.loksatta.com/agralekh-news/cyrus-mistry-removed-from-tata-son...

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

26 Oct 2016 - 1:36 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

खूपच गंभीर आरोप दिसता आहेत रे अप्पा. खरे असूही शकतील. शापूरजी पालनजी ह्यांचे नाव आदराने घ्यावे अशातला भाग नाही.६०-७०च्या दशकात मध्य-दक्षिण मुंबईत अनेक ईमारती त्यांच्या मालकीच्या होत्या.येन केन प्रकारेण मोक्याची जागा घ्यायची व व्यापारी संकुले उभी करायची..जुन्या ईमारती ताब्यात घ्यायचा प्रयत्न करायचा...हे करताना संबंधित अधिकारी,राजकारणी..ह्यांना पैसे देऊन गप्प करायचे. पूर्वी ही मंडळी असली कामे करून घेण्यासाठी इंदिरा गांधींपर्यण्तही गेलेली आहेत अशी चर्चा होती.

प्रान्जल केलकर's picture

26 Oct 2016 - 2:00 pm | प्रान्जल केलकर

मुळात टाटा समूहाकडून याचे स्पष्टीकरण मिळणार नाही असा वाटत आहे. कारण हा वाद ऑलरेडी न्यायालयात गेला आहे किंवा जाणार. वाचनात आलेल्या सगळ्या वृत्तपत्रात सूर असाच आहे कि सायरस मिस्त्री यांचीच चूक आहे. पण काही अंशी टाटा मोटर्स मध्ये आता जे काही चालू आहे त्यावरून तरी बाहेर आलेली माहिती खरी असावी.
फक्त आता अपेक्षा एकाच कि वृत्त वाहिन्या आणि वृत्त पत्रे यांनी हा विषय फार चघळून त्याचा चुथडा करू नये.

कलंत्री's picture

27 Oct 2016 - 4:55 pm | कलंत्री

सर्वसाधारण औद्योगिक कंपन्यात नोकरी करणार्याना ही गोष्ट नवीन नाही. नोकरीतून काढणे, खांदेपालट करणे, दुय्यम जबाबदार्या देणे इत्यादी इत्यादी.

सर्वसाधारण पणे हे करतांना वादंग होणार नाही याची काळजी घेतली जाते.

टाटा सारख्या उद्योग समूहाला इतकी छोटीशी गोष्ट जमली नाही.

४ महिने घरी बसवून पगार दिला असता तर काही बिघडले नसते. किंवा प्रकृती अस्वास्थामूळे किंवा वैयक्तिक कारणास्तव नोकरी सोडत आहे असे साळसूदपणे सांगता आले असते.

कोळश्याच्या वखारीत कधीही कपडे काळे पडू शकतात इतकेतरी तारतम्य ठेवायला हवे होते.

रतन टाटा तुम्हारा चुक्याच.....

बबन ताम्बे's picture

27 Oct 2016 - 5:04 pm | बबन ताम्बे

आमचे तिंबूनाना पण पारावर बसून कानकोरणीने कान कोरत ओबामा कसा आणि कुठे चुकला याची जंत्री सांगत असतात.

कलंत्री's picture

27 Oct 2016 - 5:30 pm | कलंत्री

रतण टाटांचे चुकले असले तरी तुमचे म्हणणे बरोबर आहे.

राजकारण आणि व्यवसायात काही फरक असतात.

राजकारणाला प्रसिद्धी हवी असते तर व्यवसायात वादंग नको असतात असे आम्हाला वाटते.

अप्पा जोगळेकर's picture

27 Oct 2016 - 6:05 pm | अप्पा जोगळेकर

४ महिने घरी बसवून पगार दिला असता तर काही बिघडले नसते. किंवा प्रकृती अस्वास्थामूळे किंवा वैयक्तिक कारणास्तव नोकरी सोडत आहे असे साळसूदपणे सांगता आले असते.
काय हास्यास्पद बोलताय साहेब. ४ महिन्याच्या सॅलरीसाठी सायरस मिस्त्री गप्प बसेल काय ?
जणू त्याच्या घरकर्जाचा हप्ता चुकणार म्हणून तो रागावला आहे.

मिस्त्री टाटा ग्रुपचा सीईओ होता. त्याच्याकडे करोडो रुपयांचे शेअर्स आजही आहेत.
शिवाय तो पालनजी चा वारसदार आहे. पालनजी कडे टाटा सन्स चे १८ % शेअर्स आहेत.
बाकी ते कपडे काळे वगैरे काही झाले नाहीत. रुसी मोदींना, अजित केरकरांना सुद्धा काढले होते.
कपडे काळे झालेच तर मिस्त्रीचेच होतील. त्याच्यावरचे आरोप बघून तसे वाटण्यास जागा आहे. शिवाय त्याच्याकडे अशा घोटाळ्यांचा वारसा सुद्धा आहे.
आणि स्पष्टच सांगायचे तर मिस्त्री १८% स्टेकचा ताकदवान गडी असला तरी ६६% शेअर्स असणार्‍या टाटा सन्स चे तो काय उपटणार.