रात्रीस खेळ चाले

सचिन७३८'s picture
सचिन७३८ in काथ्याकूट
23 Oct 2016 - 1:06 pm
गाभा: 

शेवटी 'रहस्यभेद' केला कसाबसा. निलीमाने कमीटमेंटसाठी 'खपवलं' नेनेवकीलांक अन् अजयाक. काय शेवट केला आहे.(?) दर्शकांक अगदीच 'भुतिया' समजतात भौ. मोप जांगळगुत्ता केलो बे मालिकेचो.

रात्रीस खेळ चाले

मालिकेचा शेवट म्हणजे त्यांच्याच भाषेत,
'अजीब है......आजकल तो किसीपे भरोसा ही नही रहा!'

प्रतिक्रिया

काहींच्या काही शेवट! पुरावे तर *टा काही दाखवले नाहीत शेवटपर्यंत. शेवटी शेवटी ही मालिका कशीबशी उरकल्यासारखी लिहिली जात होती. बरे झाले संपली एकदाची! आता हंड्रेड डेज काय दिवे लावणार आहे कोण जाणे!

कोथिंबीर जास्त घातलेली भेळ जशी मुळात मिळमिळीत असते तसं. त्यामुळे याही मालिकेकडून अपेक्षा शून्य.

हृषीकेश पालोदकर's picture

23 Oct 2016 - 2:49 pm | हृषीकेश पालोदकर

तळघरातल्या संगाड्यांचं काय झालं म्हणे मग ?

हृषीकेश पालोदकर's picture

23 Oct 2016 - 3:24 pm | हृषीकेश पालोदकर

तळघरातल्या संगाड्यांचं काय झालं म्हणे मग ?

कैलासवासी सोन्याबापु's picture

23 Oct 2016 - 4:40 pm | कैलासवासी सोन्याबापु

लोक असल्या सिरियलीबी नेटाने पाहतात हे समजले अन ड्वाले पाणावले

त्रिवेणी's picture

23 Oct 2016 - 5:14 pm | त्रिवेणी

हो बापू. मी सुध्दा रोज प्रयत्न करायचे ही सिरीयल बघण्याचा.
पहिले पाच मिनीट बघायचे आणि जेव्हा जाग आलेली असायची तेव्हा जय मल्हार सुरु असायचे.

उमेश नेने's picture

23 Oct 2016 - 11:09 pm | उमेश नेने

'रात्रीस खेळ चाले ' च्या निमित्ताने . . . . . . . . . . .
'रात्रीस खेळ चाले ' ही झी टीव्ही वरील मालिका नुकतीच संपली , परंतू शेवटच्या क्षणापर्यन्त खुनी कळू न देण्याच्या अट्टाहासा पोटी
अनेक प्रश्न अनुत्तरीत राहिले. खरे तर शुक्रवार च्या भागात खुनी सापडलेला दाखवून शेवटच्या भागात सर्व खुलासा करायला हवा होता.

काही अनुत्तरीत प्रश्न …..
१. सुषमा ला विष देऊन मारले व जाळले असे दाखवले आहे पण ती परत कशी आली ?
२. बाहुली पुरली होती ती देविका च्या घरात कशी आली ?
३. घरावर दगडफेक कोण करत होते ?
४. देवघरात अचानक मुंगया कशा आल्या ?
५. घरात अचानक वाळवी कश्यामुळे लागली ?
६. माधव वर हल्ला कुणी आणि कसा केला आणि त्याचा शोध लागला का नाही ?
७. नीलिमा च्या अंगात शेवंता कशी आली ?
८. नीलिमा च्या मोबाइल मध्ये शेवंता चा आवाज कसा आला ?
९. विहिरीतून प्रति आवाज कसा आला ?
१०. अभिराम ने पुणे येथे well furnished फ्लॅट घेण्यासाठीं ३०-४० लाख कोठून आणले ?
११. ही सिरीयल भुतांवर नव्हती तर अनेक अघटीत घटनांचा खुलासा का झाला नाही ?
१२. नाईक वाडया भोवती बाहुली च्या पाऊलांचे ठसे कसे आले ?
१३. विश्वासराव ने शोध कसा लावला .. नक्की कोणता पुरावा सापडला ?

अशा अनेक घटनांचा खुलासा ना करताच ही मालिका संपवली आणि प्रेक्षकांची निराशा केली .
कदाचित या प्रश्नाची उत्तरे पट्कथाकारा कडेच नसावीत ...

" आमच्याकडं तर कोंबडया नाय " प्रमाणे " आमच्याकडं तर उत्तरे नाय " - इती : कथाकार, दिग्दर्शक , निर्माता .

अन्नू's picture

24 Oct 2016 - 4:17 am | अन्नू

आल्याआल्या हे काय? काही अनुत्तरीत प्रश्न???
तुंम्हाला कळलेच नैत का ते अजुन?

१. सुषमा ला विष देऊन मारले व जाळले असे दाखवले आहे पण ती परत कशी आली ?
>> हे.. हे.. एप्रिल फुल...

२. बाहुली पुरली होती ती देविका च्या घरात कशी आली ?
>> "आई माझी करामती" इति- देविका

३. घरावर दगडफेक कोण करत होते ?
>> सगळ्याक हिस्सो भेटलो गाववाल्याचो काय?

४. देवघरात अचानक मुंगया कशा आल्या ?
>> ही नाईक कंपनी कुठंपण बसून आपला चहा ठोसत असल्यावर मुंग्या नाही तर काय होणार?

५. घरात अचानक वाळवी कश्यामुळे लागली ?
>> आण्णांनी स्वतःचं घर बांधतानाही घोटाळा केल्याचं प्रतिक

६. माधव वर हल्ला कुणी आणि कसा केला आणि त्याचा शोध लागला का नाही ?
>> आजी सुसल्या सुसल्या करुन घरात खुळी बनून हिंडत नव्हती का? मग? त्या देविकाचापण तिनं असाच हात मुरगळलानं! बिचारीला चार दिवस वेफरचा पुडा हातात धरता आला नाही

७. नीलिमा च्या अंगात शेवंता कशी आली ?
>> ती अ‍ॅक्टींग करु शकते हे प्रेक्षकांना दाखवता यावं म्हणून

८. नीलिमा च्या मोबाइल मध्ये शेवंता चा आवाज कसा आला ?
>> कश्शी गम्मत करते नै सारखी निलिमा

९. विहिरीतून प्रति आवाज कसा आला ?
>> आण्णाचं तिसरं लफड असणार. उगीच नै घरच्यांना भीती घालून- विहिरीजवळ जाऊ नका म्हणून बजावलं!

१०. अभिराम ने पुणे येथे well furnished फ्लॅट घेण्यासाठीं ३०-४० लाख कोठून आणले ?
>> सरप्राईज!

११. ही सिरीयल भुतांवर नव्हती तर अनेक अघटीत घटनांचा खुलासा का झाला नाही ?
>> सस्पेंस कायम टिकावं म्हणून

१२. नाईक वाडया भोवती बाहुली च्या पाऊलांचे ठसे कसे आले ?
>> ह्यॅ! त्यात काय, छायाला बाहुली बाहुली खेळायचा नाद होता. ते खेळताना आपलं उमटलं असेल.

१३. विश्वासराव ने शोध कसा लावला .. नक्की कोणता पुरावा सापडला ?
>> त्यानं डायरेक्ट लेखक पांडूलाच पकडल्यान! शेवटी नै का बोलून दाखवलं- तुला सगळं माहित आहे म्हणून!

पण मला तर काही भलतेच प्रश्न पडलेत ब्वॉ
> नाईक मंडळींना पाण्यापासून धोका होता, मग ते अंघोळपाण्याचं कसं काय करत होते? अन सकाळची तर त्यांची लैच पंचायत होत असेल नै?
> जेव्हा बघावा तेव्हा पांडू नाईकांच्या वाड्याजवळच उंडारत होता मग त्याला पैसे कोण देत होतं?
> सुसल्याला लिपस्टीक- पावडर- क्रिमा वगैरेसाठी पैसे कोण पुरवत होतं?
> ते नाना नावाचं म्हातारं नक्की कशावर जगत होत? म्हणजे त्याला कधीच कोणी जेवण देताना दिसलं नाही. मग म्हातारं काय खात होतं कि नव्हतं? शिवाय त्याच्याकडे कोणंच लक्ष देत नव्हतं, मग म्हातारं एक दोन नंबरसाठी काय करत होतं?

उमेश नेने's picture

23 Oct 2016 - 11:12 pm | उमेश नेने

कंमिटमेन्ट चे कारण फालतू आहे .

हतोळकरांचा प्रसाद's picture

24 Oct 2016 - 11:43 am | हतोळकरांचा प्रसाद

तद्दन फालतू शेवट! पण या मालिकेतून चांगले कलाकार समोर आले हेहि नसे थोडके.